गोष्ट सासूच्या अज्ञानाची आणि सुनेच्या विज्ञानाची
मुलाच नवीन नवीन लग्न होत.नवी सून घरात आली. दोन तीन दिवस गेल्यावर सासू सुनेला विचारते तू सगळ्यात जास्त कुणाला मानतेस?. सूनेन उत्तर दिल आईला.एक जीने मला जन्म दिला.आणि दुसरी तुम्ही.सासू असलात तरी मला आई समानच आहात.हे उत्तर ऐकून सासू खूप खूष होते. आपल्याला खूप चांगली आणि हुशार सून मिळाली असे तीला वाटते.पुढे सासू सुनेला बोलते हे बघ तुला किनई आणखी एका आईला मानाव लागेल. आपल्या कुळ देवीला.आपण उद्या जायच दर्शनाला. दोघी दुस-या दिवशी जातात देवळात. जाताना एका गाईच वासरु गाईच दूध पिताना दिसत. सून सासूला बोलते आई थोड थांबा,मी बालदी आणून दूध काढते. सासू कप्पाळावर हात मारते आणि म्हणते अरे देवा मी जीला हुशार समजत होते ती माझी सून मूर्ख आहे,ठार वेडी आहे.मी फसले.सासू सूनेवर ओरडते, अग इतकही कळत नाही तुला की ही गाय आणि वासरु दगडाची आहे.त्या दोघी पुढ जातात,सासू पुढ,सून माग माग चाललेल्या असतात.पुढ काही आंतरावर गेल्यावर सून अचानक सासूला माग ओढत.आई पुढ नका जाऊ,तो सिंहं तुम्हाला खाईल.सासून पुन्हा कप्पाळाला हात लावला.अग तो दगडाचा सिंह मला कसा खाईल.सासू वैतागत सूनेला देवळात नेते आणि म्हणते ही आपली कुळ देवी. हात जोड आणि माग हवे ते.सून सासूला विचारते माझ्यासाठीच मागू कि तुमच्या साठी पण? सासू बोलते तुझ्या मनाला वाटेल ते मनापासून माग.सून विचारते दागिने मागू?. सासू बोलते नको.तसल काही मागायच नसत.मग पैसे मागू ? सासू बोलते नको, तसल काही मागायच नसत.मग कपडे? नको ग तसल काही मागायच नसते.
आई मग मला कि नई खूप भूक लागली आहे,चांगली पंचपक्वानांनी भरलेली दोन ताट मागू?.सासू चिडते आणि म्हणते तस काही मागायच नसत ग.बघ मी तुला सांगते ते माग. सासू सुनेला सांगते आणि सून देवीजवळ ते मागते. आणि मांडी घालून खाली बसते.सासूला वाटते सून देवीला बसून प्रार्थना करते,सासू थोडावेळ उभी राहून वाट बघते सून आता उठेल, आता उठेल.पण सून बसूनच राहीली.सासू विचारते, काय ग का बसलीस अशी इतका वेळ..? तर सून म्हणते,तुम्हाला नातवाच तोंड बघायचय ना?.देवीजवळ मागितलय ना आत्ता आपण.मी वाट बघतेय देवी कधी देतेय याची.
आता सासू भांभावून गेली आणि सूनेवर खेकसली.तू इतकी मूर्ख असशील अस वाटल नव्हत,माझ्या लेकाच नशीब फुटक.आसली येडी त्याच्या पदरात पडली.कसं होईल माझ्या लेकाच..? सासू रडवेली झाली. त्यात सून विचारते आई माझ काही चुकल का..? सासू आणखी चवताळते आणि बोलते,नाही माझच चुकलं,काय गं काल तर एकदम शहाण्या सारख उत्तर दिलस आणि आज अशी मूर्खासारखी का वागतेस..?
दगडाची गाय वासरु पाहून दूध काढायला जातेस, अग दगडाची गाय कधी दूध देते काय..?. दगडी सिंहं पाहून घाबरलीस, दगडाचा सिंहं माणसाला काही करु शकतो का..? सांग. इतकही कस कळत नाही तुला..?.सून बोलते आई दगडाची गाय दूध देत नाही, दगडाचा सिंहं माणसाला काहीच करु शकत नाही. मग दगडाची देवी कसं काय आपण मागितलेल देईल..?
आजोबा पणजोबा पासून रीतीरिवाज परंपरा ने आजवर हे दगडच आपल्याला सगळ काही देतात अस आपण मानत आलो.पण आई आपण कष्ट करतो तेंव्हाच धन संप्पत्ती मिळते. अन्न मिळत. हवा सर्वत्र भरलेली आहे पण ती आपण नाकानं आत ओढण्याच कष्ट करतो म्हणून जगतो, ती हवाही आपोआप फुफ्फुसात जात नाही. या दगडांना पायाखाली धरुन आकार दिला माणसान. ज्याला माणूस घडवतो तो माणसाला काय देऊ शकतो. गाडगे बाबा म्हणतात देवळात देव नसतो. देवळात असते पुजा-याचे पोट. गणपतीच वाहन उंदीर आपण दगडी उंदराला पुजतो, पण घरातल्या उंदरांना विष घालून मारतो. नाग शंकराच्या गळ्यात असतो म्हणून आपण मातीचा नाग पूजतो. पण खरा नाग दिसला तर मारुन टाकतो.खंडोबा म्हणजे कुत्रा,दत्ताचा आवडता कुत्रा, दिसला की हाड हाड, दगडांचा मार. आजून किती काळ हे निरुपयोगी माती धोंड्याचे देव पुजायचे..?. कुठला असा देव आहे तो आज भुकेलेल्याला जेवण आणि तहानलेल्याला पाणी देईल. शेतकरी पाणी नाही म्हणून आत्महत्या करतात. का तिथ पाऊस पडत नाही. देवळात बलात्कार होतात,बाँम्बस्फोट होतात, चो-या होतात,चांदीचे,सोन्याचे देवाचे डोळे चोर काढून नेतात. म्हणून गाडगे बाबा म्हणतात आरे, जो त्याच्या पुढ्तल्या जेवणावर बसणारा कावळा पिटाळू शकत नाही तो तुमच्या जीवनातल दुः खा दैन्य काय दूर करणार..? ब्राम्हणांनी स्वत:चं पोट जाळण्यासाठी अनेक थोतांडे तुमच्या डोक्यात भरली..! तुम्हाला मानसिक गुलाम केले..!.यातलं उघड सत्य स्वीकारायला माणूस तयार नाही आणि शिडीला तिरूपतीला पायी जातो.पंढरपूरला पायी चालतो,परंतू चोख्याला विठ्ठलाच्या पायरी खाली कां पुरले याचा विचार करत नाही, तुकाराम महाराजांचे तुकडे करून पाण्यात बुडवून मारले हे विसरून जातो..!.बुद्धीची देवता गणपतीची दिड दिवसापासून दहा दिवस मनोभावो पूजा अर्चा उपास,नवस करून हजारो रुपये खर्च करून विज्ञानाच्या तत्वज्ञाने बनविलेली यंत्रणा वापरतात. तेव्हा माणूस मेंदूची,पैशाची आणि वेळेची बरबादी करतो..!! अज्ञान अंधश्रद्धा सर्व श्रेष्ठ ठरविल्या जाते.विज्ञानाला हार मानवी लागते.स्मार्ट मोबाईल,गुगल नेटवर्क वापरून ही विज्ञान कळत नसेल तर?.कधी कळेल विज्ञान..?.कधी जळेल अज्ञान..?. आजच्या सासूला असे विचारणारी सुशिक्षित सून मिळाली पाहिजे.माफ करा वाचकांनो त्यात सून विचारते आई माझ काही चुकल का..? हे बरोबर आहे ना ???.
संकलन:- सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा