वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू
वृत्तपत्रांची कामगिरी ही लक्षवेधी असते,त्यातून ते समाजातील चांगल्या वाईट प्रवृत्तीवर प्रहार करतात,कधी सामाजिक बांधिलकी म्हणून प्रबोधन करतात.समाजात जे दिसते ते तशेच मांडण्याची जबाबदारी ही पत्रकारांची असायला पाहिजे,त्यात सत्यनिष्ठा असली तर माणसं अहिंसा पाळतील आणि तिरस्कार निर्माण करणारी बातमी लेख दिले तर निश्चितच हिंसा झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच अज्ञानी माणसांना सज्ञानी करण्याची जबाबदारी ही वृत्तपत्रांची असते,वृत्तपत्र जर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अंधश्रद्धा अज्ञान वाढविण्यासाठी कोरे कागद काळे करत असतील तर माणसं विज्ञानवादी न होता पारंपरिक रीतिरिवाजांचे आंधळेपणाने पालन करणारे मानसिक गुलाम बनत राहतील.हेच काम काही वृत्तपत्र इमानदारीने धंदा न करता.पैशासाठी बुद्धी गहाण ठेवून वृत्तपत्र चालवतात.आणि समाजाला प्रकाशातून अंधाराकडे घेऊन जातात.आधुनिक तंत्रज्ञान वापरून सामाजिक,शैक्षणिक आर्थिक प्रगती करण्याकडे वाटचाल केली पाहिजे कि अधोगतीकडे हे श्रद्धावान बुद्धीजीवी माणसांनी ठरविले पाहिजे.निसर्गाचा नियम आहे जे पेराल तेच उगवते.
जन्मपासून मुलगा बुद्धीवादी नसतो,पण काही कला कौशल्य जन्मजात आत्मसात करूनच तो मोठा होतो.नंतर तो जशा मोठा होत जातो तसा तो बुद्धीवादी बनतो.आणि निसर्गाच्या नियमानुसार विवेकवादी विचासारणी माणसाला उपजत बुद्धी असते.कोणत्याही गोष्टीचे कुतूहल असते.घडलेल्या घटनांचे निरीक्षण करण्याची आवड असते.त्यातून अनुभव मिळतो. त्यावर तर्क बुद्धीने विचार करून ज्ञान मिळते.पत्रकार,संपादक बनतात.संपादक साहित्यिक विचारवंत बुद्धीजीवी म्हणून ओळखले जातात.त्यांनी प्रिंट मिडिया वृत्तवाहिन्या अज्ञान अंधश्रद्धा दूर करणारे लिहले पाहिजे,बोलले पाहिजे,चर्चा संवाद घडवून आणले पाहिजे.कोणाचे ही महत्व जरूर सांगा पटवून द्या पण त्यांचा जन्म कुठे,कधी झाला.आई वडिलांचे नांव गांव,तालुख,जिल्हा राज्य देश.शिक्षण,लग्न झाले असेल तर पतीचे नांव गांव,तालुख,जिल्हा राज्य देश.त्यांचे लग्न झाले म्हणजेच मुल,मुली आलीच मग त्यांची माहिती आलीच पाहिजे.हे सर्व बाजूला ठेऊन त्यांचे महत्व सांगत असाल तर तुम्ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून जनतेची वाचकांची उघड उघड फसवणूक करता हे वृत्तपत्रांचे काम नाही सिद्ध होते.हा तर वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू आहे.
विवेकवाद वस्तुनिष्ठ आहे.विवेकवादी तत्त्वे कोणालाही तपासता येतात.प्रत्येक विधानामागे पुरेसा तर्क असतो.म्हणजेच ही तर्कशुद्ध विचारसरणी आहे.विवेकवादी विचार पूर्णतया इहलौकिक असतात.विवेकवाद परलोक मानत नाही.मरणापूर्वी जे घडते तेच अर्थपूर्ण असू शकते.मरणा नंतर जीवन नसतेच.असा हा अनुभवाधारित विचार आहे.धर्म,राष्ट्र,वंश,जात,भेदां वर माणसा माणसात भिंती उभ्या करणाऱ्या भावूक कोत्या निष्ठा विवेकवादाला मान्य नाहीत.मारण्या-मरण्याचे उदात्तीकरण विवेकवादी व्यक्तीला प्रभावित करू शकत नाही.त्यापेक्षा एकमेकांशी संवाद करत समाजात सुधारणा घडवून गुण्यागोविंदाने राहायला जीवन जगायला सांगणारा विवेकवाद्याचा आणि भारतीय संविधानाचा भर असतो. अज्ञान अंधश्रद्धा,पूर्वग्रह,हे कट मनोवृत्ती,अनाठायी आत्मगौरव या प्रवृत्ती विवेकवादात संविधानात बसत नाहीत.त्यालाच खतपाणी घालण्याचे काम वृतपत्र करीत असतील तर वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू जागरूक वाचकांनी लक्षात घेतला पाहिजे.विश्व,निसर्ग नियमांनी मानव प्राणी,पक्षी बांधलेला आहे.माणसाला हे नियम शोधता येतात.वैज्ञानिक पद्धतीने मिळवलेले ज्ञान हे सर्वात विश्वसनीय ज्ञान असते.अशी विवेकवाद्याची धारणा असते.विवेकवाद हा माणसाला स्वतःशी प्रामाणिक राहायला आणि समाजात सामाजिक बांधिलकी ठेऊन जबाबदारीने वागायला शिकवतो. तसेच घेतलेल्या निर्णयावर ठाम राहून त्यामुळे होणाऱ्या परिणामांना धाडसाने सामोरे जाण्याची शक्ती अंगी भिनवतो.त्यातूनच संघशक्ती निर्माण होते.मग ती कुटुंबातील असो,कि राज्यातील देशातील मानवांची,प्राण्यांची पक्षांची असो.
वर्तमानपात्राशी संबंधित लोकांना एक प्रश्न.जसं सिगारेटच्या जाहिरातीवर "धूम्रपान आरोग्याला हानिकारक आहे" असं लिहावं लागतं तसं काही लेखांखाली "अंधश्रद्धा पसरवायचा हेतू नाही" असं (इशारा कम पळवाट) लिहिण्याचा काही नियम,कायदा,संकेत असतो का?.किंवा लेखकांच्या मताशी संपादक व संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.ते लेखकाचे व्यक्तिगत मत आहे.अनेक लोकप्रिय दैनिकात ऑनलाईन आवृत्तीत नियमित पणे राशी भविष्य असते.पण त्यातून कोणाला किती फायदा झाला किती तोटा झाला कोणी कधीच सांगत नाही.पण काही सरकारी नोकरी करणारे लोक हे राशी भविष्य वाचल्यावर दिवस भराचे काम कसे करावे ते ठरवितात. वृत्तपत्रांत छापून आलेल्या अशा अनेक गोष्टीवर नियमितपणे विश्वास ठेवून कार्यालायचे काम करतात. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार का होत नाही तर पितृपक्ष सुरु आहे.सध्या पितृपक्षाबद्दल "माहितीचा" मारा अनेक दैनिकात चालू आहे. काय केले तर पितर खुश किंवा नाराज होतील याबद्दल 'मार्गदर्शन' चालू आहे.जिवंतपणी वयोवृद्ध आई वडिलांना चांगले जेवण देऊन सेवा न करणारे सुशिक्षित मुल मेल्यानंतर इमानदारीने विविध स्वादिष्ट पदार्थ बनवून कावळ्याला पात्र भरवतात. कावळ्याची संख्या लक्षात घेऊन पितर हे केवळ कावळा नाही तर गाय,कुत्रा या रूपांमध्येही येऊ शकतात असे संदर्भ देऊन सांगितल्या जाते.अर्थातच हे "मागणी तसा पुरवठा" यानुसार चालू असेलच.पण मग याच्या खाली नेहमी विशेष टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही असं का छापल्या जाते. म्हणजेच एकावेळी इतक्या अज्ञान अंधश्रद्धा रीतीरिवाज परंपरा वापरून ही आधुनिक तंत्रज्ञान वापरून विज्ञानावर विश्वास का ठेवला जातो.म्हणूनच वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू जागरूक वाचकांनी लक्षात घेतला पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा