गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.

 अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.


वर्णव्यवस्था निर्माण करणाऱ्या समाजाला बुद्धाच्या काळा पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पर्यंत थारा नव्हता.तरी ते तीन टक्के शेंडी वाल्यांनी समाजात कटकारस्थान,षंढयंत्र निर्माण करून सत्ताधारी वर्गाच्या राजाच्या विरोधात असंतोष निर्माण करून समाजात दंगली घडविल्या आहेत.त्यात बहुसंख्य लोकांचा रोजगार देणारे उद्योग बुडविला जातो. हीच परंपरा वेगवेगळ्या राज्यात राबविली जाते.त्यासाठी अण्णाजी पंत निर्माण केले जातात. महारष्ट्रात असा अण्णाजी पंत निर्माण झाला आहे.म्हणूनच हा अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.असा प्रश्न पडतो.

    अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचा सत्ताधारी झाल्या नंतर या उद्योगांनी महाराष्ट्र सोडला रायगडमधील बल्क ड्रग पार्क,महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र,नागपूर इथलं राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ,जहाज तोडणी उद्योग,पालघरमधील सागरी पोलीस अकादमी,एअर इंडिया मुख्यालय,ट्रेडमार्क पेटंट कार्यालय असे अनेक उद्योग आणि कार्यालयं राज्याबाहेर गेली आहेत.एखादा उद्योग,कार्यालय राज्यातून स्थलांतरित होणं म्हणजे भूमीपुत्रांच्या रोजगारावर गदा येण्यासारखंच आहे. आधीच महागाई आणि बेरोजगारीनं जनता त्रासलीय त्यात उद्योग स्थलांतरित होत राहिले तर याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतो.हिंदुत्वाचा मुखवटा धरण करून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन सांगणारे अण्णाजी पंत-देवेंद्र फडणवीस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली.ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठा सरदारांना अण्णाजी पंतानी फितूर केले त्याच पद्धतीने मराठी हिंदू हृद्य सम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेना मधील मराठा आमदारांना इडी इन्कमटॅक्सची भिती दाखवून फितूर केले. मुंबई ते सुरत प्रवास करतांना हिंदुत्वासाठी हा मुख्य मुद्धा होता.सुरत ते गुवाहाटी प्रवास करतांना मुद्धा आमदार निधी कडे वळला,गुवाहाटी ते गोवा प्रवासात मुद्धा पन्नास खोके सर्व ओके कडे वळला.अण्णाजी पंत माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार हे जवळ जवळ निश्चित असतांना गोवा ते मुंबई राजभवन प्रवासात काही तरी वेगळे घडले दिल्लीश्वरांनी मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना एक नंबर वरून दोन नंबर वर राहण्यास सांगितले.आणि धोबी का कुत्ता घरका ना घटका झाला.असे चित्र निर्माण केले गेले.पण सत्य चित्र तसे नाही,तर एकनाथाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सर्व मराठी माणसांची महाराष्ट्राची शिकार हे आण्णाजी पंत देवेंद्र फडणवीस करीत आहेत.हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीस दिवसात महा राष्ट्रातून गुजरात मध्ये गेलेला वेदांता-फॉकस्कॉन प्रकल्प होय.

        कोणतीही पूर्व सूचना न देता आदरणीय नरेंद्र मोदींनी २४ मार्च २०२१ देशात सुरु झालेला लॉक डाऊन नंतर चा इतिहास डोळ्या समोर आणा.असंघटीत कामगारांची झालेली दैना विसरू नका.जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष,विरोधी पक्ष,नागरिक,डॉक्टर,परिचारिका,पोलिस यंत्रणा,मिडिया,इतर सेवेकरी हे एकत्र येऊन कोरोनाशी लढा देत होते.आणि आमच्या देशात कोरोना विरूद्ध लढा यांची तुलना केली.तर भाजपा प्रणित राज्यात अण्णाजी पंतांचे अष्टमंत्री मंडळ सत्ताधारी नागरिकांना सेवा देतांना उघड उघड पक्षभेद जातीभेदाच्या नांवावर भेदभाव दाखवीत होते. विशेष महाराष्ट्र राज्यातील विरोधी पक्ष फक्त आणि फक्त असहकार आणि सरकार विरोधात आंदोलन करत होता. देश,राज्य जेव्हा संकटात असतो तेव्हा सारे मतभेद विसरून आलेल्या संकटाला एकत्रीत येऊन लढा द्यायचा असतो. हे साधं गणित तेव्हाच्या सुजाण विरोधी पक्षनेत्यानां कळत नव्हते. हे महाराष्ट्राचे व महाराष्ट्रातील जनतेचे दुर्दैव होते.राजकारणात नवखा असलेला मुख्यमंत्री मोठ्या गांभीर्याने परिस्तिथी हाताळत होता.तेच शल्य अण्णाजी पंतांना झोंबत होते.त्यामुळेच त्यांनी शिवसेनेच्या कावळ्यांना पितर घालायला लावले.कारण हिंदू धर्मात रीतीरिवाज परंपरा आहे कि बाप मेला कि पितर म्हणजे श्रध्द घालावे लागते.ज्या बापाने जन्म दिला लहानचे मोठे केले शिक्षण दिले ओळख निर्माण करून दिली त्याच बापाशी जिवंत पणी बेईमानगिरी करणारी मुळे बाप मेल्यावर त्यांच्या नावाचा सातबारा कोरा करून न घेता स्वताच्या नांवे करतात.एकनाथ शिंदे आणि एकोणचाळीस शिवसेना आमदार आज तेच करीत आहे.शिवसेना पक्ष त्यांचे चिन्ह आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अधिकार सांगत आहेत.सातबारा मागत आहेत.हे फक्त अण्णाजी पंत आणि त्यांच्या अष्ट मंडळाच्या सल्ल्याने होत आहे. हे उघड आहे.आजच्या न्यायालयात संविधाना च्या चौकटीत शिवसेनेला योग्य न्याय मिळेल ही अपेक्षा करणे मूर्खपणा ठरेल,

          अण्णाजी पंत देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील मराठी माणसांची एकच नम्र विनंती आहे. तुर्तास तरी राजकारण बाजूला ठेवून राज्यातील जनतेसाठी नितीमत्ता सामाजिक बांधिलकी ठेऊन काम करा.महाराष्ट्राचे आपण मित्र आहात कि शत्रू हे आपल्या आचरणातून दाखवून देऊ नका. राज्याची जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचते.असेच राजकारण करत बसाल तर हिच जनता तुम्हाला पायदळी तुडविल्या शिवाय राहणार नाही.आज तुम्ही जे जे काम कराल त्यांचा इतिहास लिहला जाणार आहे. अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?. हे जगातील विचारवंत त्यांची बारकाईने नोंदी करून ठेवतील.
            छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा महाराष्ट्राचा इतिहास मराठा,ओबीसी, मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाने वाचला नाही.आणि ज्यांनी वाचला त्यांनी सांगितला नाही.शिवसेना प्रमुखांनी तो शिवसैनिकांना वाचायला सांगितला नाही. राजकारणासाठी जय शिवाजी जय भवानी ही घोषणा वापरली.पण इतिहास सांगितला नाही. या बाबत मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड यांच्या कडून खूप मोठ्या प्रमाणात प्रबोधन होत आहे. पण हजारो वर्षाची मानसिकता बदलायला वेळ लागणार आहेच.म्हणूनच पेशव्यांचे वारसदार अण्णाजी पंत-फडणवीस डोके वर काढत आहेत.महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी, मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या खांद्यावर उभा राहून भाजपा मोठा झाला.भाजपानी फडणवीस मोठा केला. आज त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही.त्याचं बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील मराठा,ओबीसी,मागासवर्गीय,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला ही राहिला नाही.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.म्हणून कोरोनाच्या महामारीत नागरिकांना विविध प्रकारच्या सोयी सुविधा,सहकार्य मदतीची गरज असतांना वैचारिक,सामाजिक,राजकीय पक्षभेद,जातीभेद,प्रांतभेद निर्माण करण्याचे काम विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी केले होते.आणि सत्तेवर आल्यावर महाराष्ट्रा पेक्षा गुजरात राज्याची काळजी करणारे अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?. हा प्रश्न निर्माण होतो.यांचा विचार महाराष्ट्रातील मराठी माणसांनी,पत्रकार,संपादक,साहित्यिक आणि विचारवंतांनी गांभीर्याने केला पाहिजे.
 सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा