गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२

बहुजन समाजाला दिशा दाखविणारा आमचा अभिमान

 बहुजन समाजाला दिशा दाखविणारा आमचा अभिमान 



      जगात अशी एक न दिसणारी वस्तू असते.पण तिचा सुगंध लपत नाही लोक तिचा नाकाने शोध घेतात. अश्या सुगंधाने लोक एकत्र येऊन वातावरण बदलू शकतात.  सत्य,अहिंसा आणि निष्ठा या तत्वाचे आचरण करणारा सायं दैनिक आमचा अभिमान या नावाचा अर्थ कधी समजून घेतला नाही.बहुजन शब्दाचा अर्थ बहुसंख्य होतो.तर आमचा अभिमानचा अर्थ कोणाला सांगता येत नाही. म्हणजे आमचा अभिमान काय असेल तर अन्याय अत्याचाराला वाचा फोडून समाजाला सत्य, अहिंसा आणि निष्ठा या तत्वाने योग्य दिशेला घेऊन जाणारा मार्गदाता असलेला  सायं दैनिक आमचा अभिमान असेल. असा हा सायं दैनिक आमचा अभिमान घटना जशी बातमी तशी हे ब्रीदवाक्य घेऊन बहुजनाच्या सामाजिक व सांस्कृतिक चळवळीचे मुखपत्र सतरा वर्षाचे झाले आहे. आणि अठराव्या वर्षात प्रदार्पण करीत आहे.त्याच्या वर्धापनदिनला शुभेच्छा देतांना आनंद होत आहे.
       देशात आणि राज्यात बहुसंख्य वृत्तपत्र आहेत.आंबेडकरी चळवळीत बातम्या देणारे पेपर खूप कमी आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो. पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन दिशाहीन बहुजन समाजाला दिशा दाखविणारा सायं दैनिक आमचा अभिमान एक पत्र नव्हे तर एक सत्य चित्र दाखवणार आरसा वाटतो.आरसा कधी खोटे बोलत नाही.म्हणूनच घटना जशी बातमी तशी या तत्वानुसार दैनिक खोट कधी लिहत नाही असा शंभर टक्के सर्व सामान्य जनतेचा विश्वास असतो. गेल्या सतरा वर्षात सायं दैनिक आमचा अभिमानने बहुजन समाजाच्या मनात विश्वास निर्माण केला आहे.सोशल मिडीयाच्या जलद प्रचार प्रसारावर हे नेटद्वारे पीडीएफ (pdf) च्या माध्यमातून वाचकांच्या पसंतीला उतरला आहे.हे मी का सांगू अथवा लिहू शकतो, कारण माझे नियमितपणे सायं दैनिक आमचा अभिमान मध्ये लेख व मी पाठविलेल्या मित्रांचे लेख व बातम्या प्रसिद्ध होत असतात.त्यामुळे अनेक वाचकांच्या प्रतिकीर्या नियमितपणे मिळतात आणि त्यांनी मला त्यांच्या वाट्साप ग्रुपवर घेतल्यामुळे मैत्रीभावना वाढली आहे.
     दैनिक काढण्यासाठी निर्भीडपणे लिहण्यासाठी बौद्धिक ताकद आणि आर्थिकबल खर्च करण्यास खूप हिंमत लागते. दैनिक सुरु करणे म्हणजे एखाद्या कामधंदा सुुरु करण्याचे साधे काम नाही.एक उद्दिष्ट ध्येय डोळ्यासमोर ठेऊन वृतपत्र काढण्याचे धाडस माननीय संस्थापक राजेंद्रकुमार बाबुराव होळकर यांनी केले.त्यांचे आणि संपादकीय मंडळांचे सर्वांनी मनपूर्वक हार्दिक अभिनंदन केले पाहिजे.
     वृत्तपत्र चालविण्यासाठी वेळोवेळी राजकीय पक्षाशी साटे लोटे करावे लागते. तेव्हा त्यांच्या कडून जाहिराती मिळतात. वृत्तपत्र केवळ जाहिराती वरच चालतात. त्याशिवाय कोणतेही दैनिक चालूच शकत नाही.पण सायं दैनिक आमचा अभिमान बहुजन समाजातील चळवळीतील प्रामाणिक वाचकांच्या बळावर सत्य, अहिंसा आणि निष्ठा या तत्वाने गेली सतरा वर्ष चालू आहे. बहुजन समाजाच्या चळवळीतील कायम किर्याशील कामामुळे व अनुभवामुळे त्यांनी प्रेरणादायी टीम उभी केली ती कायमस्वरूपी यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही.अमजद खान उपसंपादक,सय्यद फेरोजअली उपसंपादक, दादासाहेब कसबे विशेष प्रतिनिधी,  भागवत देशपांडे,महादेव गित्ते,एम देशमुख, किशोर निकाळजे,किसन भदरगे, अनिल वैरागे ही नांवे वाचली तरी बहुजन समाजाची पत्रकारिता क्षेत्रातील वैचारिक वारसा सांगणारी आमचा अभिमान दाखवणारी प्रेरणादायी टीम दिसते.त्यांच्या विचारांचे सत्य,अहिंसा आणि निष्ठा या तत्वाचे प्रतिबिंब दररोजच्या सायं दैनिक आमचा अभिमान मध्ये वाचायला पाहायला मिळते.
     त्यांचा मला व्यक्तिगत आनंद होत आहे.कारण मी आणि माझी असंघटित कामगारांच्या न्याय हक्क,प्रतिष्ठीसाठी लढणारी "सत्यशोधक कामगार संघटना" पार परदेशात पोचली,आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांची ट्रेड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन (इंडिपेंडन्ट लेबर युनियन ILU) च्या माध्यमातून संघटीत व असंघटीत कामगारा पर्यंत सायं दैनिक आमचा अभिमान पोचला आहे. 
दिशाहीन समाजाला दिशा दाखविणारा सायं दैनिक आमचा अभिमान बहुजन मिशनचा कॅडर बेस कार्यकर्ता,नेता आहे,चळवळीतील कार्यकर्ते,नेते आणि समाज याची दररोज वैचारिक भूक भागवितांना,त्यांच्या जनसंघर्षला ठळक प्रसिद्धी देण्याचे काम सायं दैनिक आमचा अभिमान करीत आहे.चळवळीला यशस्वी होण्यासाठी तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असते. ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या या वाक्यचा वापर करून गेली काही वर्ष काही वृत्तपत्र धंदा करीत आहेत. नालायकाला "नालायक" आणि मूर्खाला "मूर्ख" म्हणून सत्य मांडण्याची हिंमत जर बुद्धिजीवी संपादकात नसेल तर ते वृत्तपत्र केवळ धंदाच करणार, रोखठोक भूमिका घेण्याची शक्ती नसल्यामुळे बहुजन समाजाची क्रांतिकारी महापुरुषांच्या विचारांची आंबेडकरी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे आहे,नव्हे त्यापेक्षा ही दिशाहीन झाली आहे. म्हणून बहुजन समाजाला दिशा दाखविणारा सत्य,अहिंसा आणि निष्ठा या तत्वाचे आचरण करणारा सायं दैनिक आमचा अभिमान बहुजन चळवळीतील बुद्धिजीवी,साहित्यिक,जागरूक वाचक,अनुयायांना मार्गदर्शक वाटतो,सायं दैनिक आमचा अभिमान अठराव्या वर्षात प्रवेश करीत आहे,त्यांच्या त्या संघर्षाला मानाचा जयभिम,आणि वर्धापनदिना निमित्य वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
      आज पर्यत आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी लिहले, त्याला  सायं दैनिक आमचा अभिमान यांनी विशेष दखल घेऊन प्रसिद्धी दिली.त्याचा मला व्यक्तिगत खूप आनंद होत आहे. कारण तो मला होणारा आनंद कोणत्याही यंत्राने मोजता येत नाही.सायं दैनिक आमचा अभिमान मराठवाडा प्रदेशातील बीड सारख्या ग्रामीण भागातून निघते आणि मी मुंबईत राहतो.तरी जागरूक वाचकांची संध्याकाळी पाच वाजताच प्रतिकिया मिळते.म्हणजे विचारांचे नेटवर्क वाट्साप सुपरफास्ट असते.माजलगांवचे धडाडीचे कार्यकर्ते अनिल साळवे,अंबाजोगाई विश्वनाथ कांबळे मानव मित्र हे कायमस्वरूपी जागरूक वाचक अनेक ग्रुपवर पीडीएफ टाकून मोकळे होतात.त्याचा बरोबर सायं दैनिक आमचा अभिमान संपादक माननीय राजेंद्रकुमार बाबुराव होळकर वाट्साप वर नियमितपणे संपर्कात असतात. मी रात्री त्यांचे आभार मानून अभिनंदन करतो. म्हणूनच बहुजन समाजाला दिशा दाखविणारा आमचा अभिमान हा सतरा वर्ष पुर्ण करून अठराव्या वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्ताने माननीय संपादक सर्व संपादकीय मंडळांतील सहकारी आणि जागरूक वाचकांना वर्धापनदिना निमित्ताने हार्दिक शुभेच्छा.आणि मनपूर्वक हार्दिक अभिनंदन.पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
आपला जागरूक वाचक आणि स्तंभ लेखक 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप-मुंबई -९९२०४०३८५९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा