अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?
जग कुठे चालले आणि आपण कुठे चाललो हे पाहण्यासाठी आज स्मार्टफोन मोबाईल,कॉम्प्युटरवर गुगल सर्च इंजिन उपलब्ध आहे. त्याच बरोबर अनेक संशोधन करणारे चॅनल ही उपलब्ध आहेत.दोनशेच्या वरून वृत्तवाहिन्या आहे,ते सर्व सत्य दाखवतील यांची शंभर टक्के खात्री नसतांना ही लोक ती पाहतात.बातम्या पाहण्यास आवडत नसतील तर अनेक मालिका सुद्धा आहेत,सुख म्हणजे काय असते?,फुलाला सुगंध मातीचा,आई काय करते,मुलगी झाली हो,रंग माझा वेगळा मराठी माध्यमाच्या सर्वच मालिका कायमस्वरूपी पुढे काय होईल?. यासाठी कामधंदयातुन वेळ काढून पहाव्याच लागतात.तारक मेहताचा उलट चष्मा,हिंदी लोकप्रिय धारावीक तुम्हा अर्धा एक तास निश्चितच सर्व प्रकारच्या अडघड घटना विसरायला लावतात.मन करमणूक होते.पण शांत होऊन झोप लागत नाही. मग परत रात्री उशिरापर्यंत मोबाईल वर काय काय पाहावे असा प्रश्न उभा राहतो. त्यामुळेच अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?.
काय स्वीकारा हेच बहुसंख्य लोकांना कळतंच नाही.मग ते रितीरिवाज परंपरा स्वीकारतात, मग त्यांचे वार ठरलेले असतात,रविवार,बुधवार आणि शुक्रवार वसट म्हणजे मांसाहार खाण्याचे दिवस.घर कार्यालय,हॉटेलमध्ये ठरलेले असते.बाकी उपास,तपास,पूजा अर्चा आणि देव देवीचे दिवस असतात.त्यांचे संघटित सुशिक्षित असंघटित अशिक्षित,कामगार,मजूर कर्मचारी अधिकारी काटेकोरपणे पालन करतात.यातून काही निष्कर्ष आम्ही काढले आहेत.
घरी सुखात असणारा माणूस कार्यालयात दुःखात असतो,तर काही ठिकाणी उलटे असते, कार्यालयात सुखात असणारा माणूस घराकडे निघाला की दुःखी होतो,हे प्रत्येकांचे अनुभव खूप गमतीदार व चमत्कारिक असतात.दहा मिनिटे बायकोसमोर बसा,आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे, हे समजेल.त्यासाठी विचार सकारात्मक असावे लागतील नकारात्मक असतील तर समस्या आणखी कठीण वाटेल,आणि दृष्टिकोन बदलावा लागेल. विज्ञानवादी विकास हवा असेल तर,स्मार्टफोन,मोबाईल,कॉम्प्यु टर इंटरनेट जरूर लागेल. अज्ञानवादी अंधश्रद्धा रीतिरिवाज परंपरा मान्य असणारा विकास हवा असेल,तर लिंबू,मिरची कोळसा,हळद कुंकू,नारळ,अगरबत्ती आणि भटजी शिवाय पर्याय नाही. शॉट कट हवा असेल तर कडक उपवास ठेऊन मंदिर किंवा घरातील देवघरात पूजा घालून उपवास सोडला पाहिजे. असेच अनेक प्रकारचे माणसं आपल्या आजूबाजूला खूप असतात. त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदली करा.
जगात दारू पिणारा कोण नाही.सर्वच आहेत पण प्रत्येकाचा बाँड वेगळा असतो त्यामुळे तो तसा ओळखल्या जातो.म्हणूनच दहा मिनिटे जो बहुसंख्य बेवडा नांवाने ओळखला जातो त्या बेवड्यासमोर बसा,त्यांचे आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे,हे समजेल.कारण त्याला प्रचंड दुःख झाले आहे त्यामुळेच तो सुखात राहण्यासाठी पितो.त्याला अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचाचं नको आहे.त्यामुळेच तो कामधंदा करून पिण्यासाठीच जगतो. दुसरे उधिस्ट त्याच्या समोर नसते.त्यांची संख्या जास्त असल्यामुळे जगात साठ,सतर टक्के दारूचे उत्पादन होत असते.त्यातून सरकारला मोठा कर मिळतो.म्हणूनच दारू अत्यावशक वस्तू,पदार्थात मोडते.हे कोरोना काळात सर्वच देशात पाहण्यास मिळाले.
देशातील सर्वात लक्षवेधी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणजे साधू,संत म्हणूनच दहा मिनिटे साधू संन्याशासमोर बसा,आपल्याजवळील सर्वकाही दान करून टाकावे,असे वाटेल. त्यांचे अज्ञान आपल्यासाठी प्रचंड ज्ञान असते.त्यासाठी त्यांनी खूप तपश्चर्या रानावनात गांजा अफू पिऊन केली असते.कारण कोणताही साधू बघा त्याला चिलम लागते,त्याला ते धुनी म्हणतात.म्हणूनच ते आपल्याला ग्रेड वाटतात.
देशातील सर्व कारभार चालवणाऱ्या राजकीय सत्ताधारी नेत्या समोर दहा मिनिटे बसा, आपण आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ,निरुपयोगी व कुचकामी असल्याचे,कळून येईल. राजकारणातील पॉवर किती मोठी असते,भ्रष्टाचार,गुन्हेगारी,अन् याय,अत्याचार करून ही माणस समाजात प्रतिष्ठित म्हणून यांचे आपल्याला अप्रूप वाटेल.इथे पण हाच नियम अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा महत्वाचा असतो.मनी पॉवर,मसल पॉवर, म्यान पॉवर
देशातील आणखी एक लक्षवेधी व्यक्ती म्हणजे विमा एजंट दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा,जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे,असे वाटेल...अपंग झाल्यास किती आणि पूर्ण मेल्यावर किती यांचा वयाच्या हिशेबाने वारसदारांना कसा पैसा मिळेल यांचे संपूर्ण गणित समजावून सांगेल.त्यामुळे जिवंत राहून कष्टकरत हप्ता भारत राहणे महत्वाचे कि पॉलीशी काढून मेल्याचे फायदेशीर असते.हाच त्यांचा मुख्य मुद्धा असतो.
दहा मिनिटे गुजर मारवाडी व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे, असे वाटेल.धंदा करतांना तो देवाची शप्पत घेऊन सांगतो.मी तुम्हाला फसवून जास्त पैसे घेईल तर माझा मुलगा खाईल.म्हणजे अर्थ काय त्याच्या पैशाचा उपभोग मुलगाच घेणार आम्हाला वाटते त्याने देवासमोर मुलाची शप्पत घेतली तो खोटे बोलणार नाही.वरून म्हणतो गंदा है लेकीन धंदा है,यातुन आपल्याला काय अपेक्षित आहे.अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?
आता आपण प्रत्येक क्षेत्रातील तज्ञा समोर बसा तो त्याचे अगाध ज्ञान तुम्हाला सांगेल.दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा,स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे,हे समजेल.
शाळा कॉलेज मधील शिक्षणाचा धंदा,बाजार म्हणून पाहू नका.शिक्षण खूप महत्वाचे असते त्यासाठी दहा मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा,पुन्हा विद्यार्थी व्हावे,अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.शिक्षणासाठी पालकांचे आर्थिक शोषण संस्था संचालक करतात हे अजिबात शिक्षक सांगणार नाहीत.पण शिक्षण किती महत्वाचे आहे त्यासाठी वाटेल तितका पैसा खर्च करा आणि पदव्या मिळवा एक वेळ पदवी मिळाली की नोकरी शंभर टक्के मिळालीच समजा मग खर्च केलेला पैसा खोऱ्याने गोळा करा.त्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? ते मात्र तुम्हीच ठरवा.
तुम्ही प्रामाणिक इमानदार कर्तव्यदक्ष नागरिक असाल तर दहा मिनिटे शेतकरी,कामगार यांच्यासमोर बसा,त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता,असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.पेनाने कागदावर शेरा मारणे सोपी असते.किंवा शून्याच्या पुढे मागे कोणता आकडा टाकावे ते समोरच्या चेहरा पाहून ठरवता आले पाहिजे.तेच खरे शिक्षण असते.तिथे ही तुम्हाला कोणाचा सहवास हवा ते ठरवतात येत. अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?
डोनेशन घेऊन घेतलेला प्रवेश आणि तिथे घेतलेली शिक्षणाची पदवी त्यामुळे मिळालेली गलेलठ्ठ पगाराची रक्कम थोडावेळ बाजूला ठेवून दहा मिनिटे सैनिकासमोर बसा,तुम्ही करत असलेली सेवा,समर्पण,त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे,याचा साक्षात्कार तुम्हाला होईल.जर तुम्ही देशाचे प्रामाणिक जागरूक कर्तव्यदक्ष सुज्ञान नागरिक असाल तर अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? ते ठरवता येईल.
दहा मिनिटे माऊलींच्या वारीत चाला,आपोआप तुमचा अहंकार,मीपणा गळून पडेल. दहा मिनिटे मंदिरामध्ये डोळे बंद करून शांत बसा,मनाला मनःशांती मिळेल.दहा मिनिटे लहान बालकाशी खेळा, नि:स्वार्थ प्रेमाचा अनुभव मिळेल.दहा मिनिटे आई वडिलांसोबत बसा,त्यांनी तुमच्या भल्यासाठी केलेल्या कष्टाची व त्यागाची जाणीव होईल.याचाच अर्थ सहवास कुणाचा,हे खूप महत्त्वाचं असतं..! अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..? उघडा मनाची कवाडे पहा निट.सगळे काही विकत घेता येते,मात्र कोणाचेही मन आणि भावना कुणीच विकत घेऊ शकत नाही.तुमचे सर्वात मोठे चाहते हे कुणी तरी अनोळखी असतात,परंतु तुमचे सर्वात जास्त तिरस्कार करणारे हे तुमच्या ओळखीचे, नात्यातले जवळचे असतात.हो कि नाही ?. कोण ठरवणार अज्ञान,अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?
निसर्गाने अनेक उदाहरणे आपल्याला दाखवून दिले त्याकडे पाहण्याचा दुष्टीकोन आपला कसा असावा हे आपल्यावर आहे.रानावनात एकाकी पडलेले फूल जसे कोणीही कौतुक करण्याची वाट न पाहता फुलत असते,तसेच तुम्हीही कोणाच्या कौतुकाची वाट न पाहता,तुमच्या प्रामाणिक प्रयत्नावर टिकून राहा.कौतुक करणारेच तुम्हाला शोधत येतील.कारण तुम्ही कोणाच्या सहवासात काम केले त्यांची निसर्ग नोंद घेतो.अज्ञान, अंधश्रद्धा आणि विज्ञान सहवास कोणाचा हवा..?,आपणच ठरवाल ही अपेक्षा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा