गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

समाजाचा गद्दार नेता आणि अधिकारी ?.

समाजाचा गद्दार नेता आणि अधिकारी ?.
बहुजन समाजात विविध जाती,पोटजाती आहेत प्रत्येक जात स्वतःला इतर पेक्षा मोठी समजते त्यांचाच फायदा आज पर्यंत काँग्रेस आणि भाजपा ने घेतला आहे.त्यांनी प्रत्येक जातीत एक गद्दार नेता आणि एक अधिकारी निर्माण केला.सर्व समाज शैक्षणिक, साहजिक आणि आर्थिक दृष्टया सारखा असतांना एकच नेता राजकीय दृष्ट्या मोठा कसा होतो.ही खरी ग्यानबाची मेख आहे.त्यांची प्रगती कशी होत जाते.यांचा सर्वच बहुजन समाजाने विचार करण्याची गरज आहे.रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा नरेन्द्र भाई मोदी देशाचा पंतप्रधान होण्यास किती वर्ष लागली याचा विचार करा.त्या करिता कोणा कोणाची सेवा,हुजरे गिरी आणि कुराडीचा दांडा बनुन (समाजाला)वटवृक्षाला तोडावे लागले त्यांचा हिशेब कारायलालयास खरा इतिहास समोर येईल. जो आपल्या विचार धारे च्या विरोधात काम करणाऱ्या संस्था,संघटना,पक्षात म्हणजे शत्रू गटात कार्य करतो.त्यांच्या मोठे पणाचा समाजाला काय फायदा?. नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी आहेत.पण विचाराने मनुवादी असल्यामुळे ते ओबीसी च्या स्वाभिमानी योजना राबवु शकत नाही.
>ओ बी सी, आदिवासी,दलित म्हणजे फक्त बौद्ध, किंवा महार नाही.तर चांभार,मातंग कोणत्या ही समाजातील नेता आणि अधिकारी जो आपल्या विचार धारेच्या विरोधी गटात कार्य करतो,तो कितीही मोठा झाला तरी त्याचा स्वतःच्या समाजाला काही फायदा होत नाही.कारण त्याच्या मोठेपणाचा संदर्भ हा त्या विरोधी राजकीय किंवा समाजातील कार्याच्या संदर्भात मोजण्यात येतो असतो.त्यामुळे त्याच्या मोठेपणाचा फायदा झालाच तर त्याच्या विरोधी वर्गाला होत असतो.आणि स्वतःच्या समाजाचा तोटा होत असतो.तरुणमुलांनी पुढाऱ्यांच्या,नेत्याच्या किंवा डाॅन लोकांच्या (दादा, भाई)  मागे फालतू फिरून आपला वेळ वाया घालवू नये.अनेक भागांत वेगवेगळ्या टोपणनावाने पुढारी, नेते व भाई  आहेत.उदा: नाना, दादा, भाऊ, भाई, तात्या, काका, दादासाहेब, इत्यादी.अशी अनेक तरुण मुले प्रत्येक पुढाऱ्याच्या,नेत्याच्या व डाॅनच्या मागे आपला कामधंदा, व्यवसाय, करिअर सोडून रात्रीच्या एका दारुच्या बाटलीसाठी आणि चिकन बिर्यानी साठी काही तरुण मुल फिरताना दिसतात.नेत्याचे आणि अधिकाऱ्याचे नेहमीच साटेलोटे असते.त्याशिवाय दोघेही मोठे होत नसतात. ऐन तरुणपणातला वेळ अक्षरशा वाया घालवतात तरूण वयातील मुलांना एक दिवसही वेळ घालवणे परवडणारे नाही.जेव्हा आपल्या आयुष्यातील हा वेळ वाया जातो.,तेव्हा आपले वय वाढत जाते, लग्नाचे वय झाले तेव्हा मुलगा काय नोकरी,धंदा करतो त्यांचे महिना इनकम किती असे प्रश्न विचारे जातात तेव्हा आई वडील,मामा,काका,भाऊ कोणीच उत्तर देण्याची हिंमत करीत नाही.तेव्हा तरुण मुलांना गेलेल्या दिवसातील आपण केलेली कामे आठवतात.तरुण मुलांची अवस्था घरका ना घाटका झालेली असते.
> बहुजन समाजातील अनेक तरुण वेगवेगळ्या पक्षात कार्यकर्ता म्हणून किती ही दिवस नेत्यांच्या मागे फिरले तरी त्यांच्या हाती काय आले?.बसपा ते बामसेफ किती सुशिक्षित तरुण बरबाद झाले?.यांचा हिशेब नाही,जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा कुठलाच नेता त्याचा पक्ष तुमच्या मागे उभा रहात नाही. पहिल्यांदा पैसा कमवा घरच्यांना वेळ द्या घरातल्या कामात हातभार लावा तुमच्या जवळ पैसा असेल तरच दुनिया तुम्हाला सलाम करेल. नेते पुढारी भाई लोक तुमच्या मांडिला मांडी लावून बसतील नाही तर असं राहिलात तर त्यांच्या दरवाजा जवळच बसावं लागेल आणि त्यांच्या गाडीत कुठे मागे जागा मिळेल तिथे बसावे लागेल.नेता पुढारी दादा रूबाबात चालतो तो फक्त आणि फक्त आपल्या सारख्या कार्यकर्त्याच्याच जिवावर  म्हणुन वेळीच सावध व्हा. तुमचा वापर संपला की तुम्हाला बरोबर खड्याप्रमाणे बाजुला केले जाते.एकदा वेळ गेली की पुन्हा काहीही करता येणार नाही.आपले लक्ष नेहमी आपल्या विकासाकडे केंद्रीत करा. म्हणुन स्वत:चा उद्योग मोठा करा. स्वत:ची केबीन आलिशान सिंहासने बनवा,तुमच्या उद्योगात काम करणारे लोक तूमचे मावळे समजा, तूम्ही तूमच्या उद्योगाचे छत्रपती व्हा. तुम्ही तुमच्या विभागात सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवा एक चांगले समाजसेवक म्हणुन यशस्वी व्हाल.तेव्हा तुमची इज्जत, नाव हे एका नेत्यापेक्षाही मोठ्या आदराने घेतले जाईल. तुम्ही उद्योगात यशस्वी झाल्यानंतर उद्या एखाद्या सामाजिक कामाचीही सुरुवात करु शकता व पूढे जाऊन उद्योग व सामाजिक कार्य या दोन्हीही महत्वकांक्षा पूर्ण करू शकता.
> एक लक्षात ठेवा, मोठ्या झाडाखाली दुसरे छोटे झाड कधीही मोठे होत नाही हा निसर्गाचा नियम आहे.तेव्हा दुसऱ्याला मोठे करण्यापेक्षा स्वत: मोठे व्हा. कोणत्याही नेत्याच्या मागे फिऱू नका.वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी ५ रूपयांना असतो, तोच रात्री रद्दीत ५ रूपये किलोने विकला जातो.म्हणुन जीवनात वेळेला महत्व द्या आणि स्वत:चा व समाजाचा विकास करा. एक विचार करा आपण जर यांना आणि त्यांना मोठे करतो तर आपण का मोठे होणार नाही?. सिद्धार्थ राजपुत्र होता तेव्हा त्याला सुरा, मदिरा व अप्सरा प्रकारचे अनेक व्यसने लागावी म्हणुन किती प्रयत्न झाला पण राजपुत्र सिद्धार्थ ने ते सर्व प्रयत्न उलट करून
> ठेवले त्यांनी सुरवात पासुन सत्य शोधण्याचे व मांडण्याचे काम केले.त्यासाठी त्यांनी अनेक ऋषी ज्ञानी पंडिता कडून ज्ञान घेण्याची जिध्द ठेवली.आजच्या तरुणांनी त्यांच्या सारखा आदेश ठेवला पाहिजे.सर्वच समाजात आज ज्ञानी पंडित खूप झाले आहेत.पण त्यांचे विचार आणि आचरण यात तुफान फरक आहे.त्याच पद्धतीने समाजात कार्यकर्ते,नेते व अधिकारी खूप झालेत. पण सामाजिक जबाबदारी म्हणुन किती प्रामाणिक आहेत.जे असतील ते समाजात आदर्श ठरतात.त्यांना त्यांच्या गांवात मानसन्मान मिळतो.ते सदैव सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असतात.त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा.आपण आपल्या परिसरातील नेत्यांना आणि अधिकऱ्यांना ओळखत असतो.ते सामाजिक जबाबदारी किती प्रामाणिक पणे राबवितात यांचा योग्य त्या पद्धतीने विचार करा त्यांना समाजात किती व कसा वापर आहे हे तापसुन त्यांचा मानसन्मान कि वस्त्रहरण करण्याची तयारी आपल्या विभागातील तरुणांचीच असली पाहिजे.दुसऱ्या विभागातुन तरुण येतील आणि आपल्या विभागातील नेत्यावर,अधिकाऱ्यावर कारवाई करतील ही अपेक्षा ठेवणे चूक ठरेल.ह्याची गांभीर्याने दाखल आपण घेत नसल्यामुळे समाजात गद्दार नेते आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.तेव्हा तरुणांनो उठा जागे व्हा!. अन्यता पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही.सोशल मीडियावर अनेक तरुणाच्या छोट्या पण महत्वपूर्ण मताचे हे संकलन आहे.यात अनेकांच्या पोस्ट मधील संदर्भ घेतला आहे.
> सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859.

राजकीय पक्षाचे उत्पन्न आणि खर्च ???.


भारत कृषिप्रधान देश आहे. सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून असतात.शेती शी संबंधित अनेक लोकांचा रोजगार आहे.मग तो भाजीपाला विकणारा असो कि कीटक नाशक औषध,बिबियाने विकणारा असो.की शेतीकरण्यासाठी 
लागणारे साहित्य किंवा गुजर मारवाड्याचे,वाण्याचे किराणा दुकान,या सर्वांना वाणसामान-किराण्याचा हिशोब ठेवावा लागतो.खरेदी आणि विक्री यातुन मिळणारे उत्पन्न त्यातुन कामगाराचा पगार,जागेचे भाडेे,लाईट,पाणी बिल एकूण सर्व खर्च केल्यावर उरलेली रक्कम म्हणजे निवळ नफा.त्यालाच ग्रामीण भागात जमा खर्च ताळेबंद पत्रक आणि सरकार शासकीय भाषेत उत्पनाचे विवरण पत्र म्हणतात..हे भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यवसाय धंदा,नोकरी करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे.मग यातून राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कशे सुटतात?. राजकीय लोकांना भांडवलदाराची प्रचार प्रसार माध्यमं प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया कशी मोठी करतात.त्यांचा एकूण खर्च कोण करतो याचा विचार सर्व सामान्य माणुस करूच शकत नाही. भांडवलदार आणि राजकीय लोकांचे कसे साटेलोटे असते त्याचा हिशेब पाहू.
भारतात ७०००० वृत्तपत्र आहेत.त्यात ४०००० चालू आहेत किंवा जाहिराती देण्याच्या लायकीचे आहेत अस समजा.पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात द्यायला कुणाचे दर लाख रुपये तर कुणाचे ६० लाख रुपये आहेत. सरासरी दहा लाख धरले आणि दहा दिवस जाहिरात दिली तर किती झाले ?.एक कोटी रुपये , ४०००० पेपरचे चाळीस हजार कोटी. चॅनल मीडिया म्हणजे टी व्ही च्या भारतात सगळ्या मिळून ८८० वाहिन्या आहेत.१० सेकंद जाहिरात द्यायला सरासरी खर्च एक लाख रुपये.रोज १५ मिनिट एकूण जाहिरात दाखवली तर रोजचा खर्च ९० लाख रुपये आणि अशी महिनाभर जाहिरात केली तर एक महिन्याचा खर्च २७ कोटी रुपये.अश्या फक्त ७०० वाहिन्या धरल्या तर होतात १८९०० कोटी रुपये.एका एफएम रेडियोवर जाहिरात करायला सगळ्या दिवसाचे मिळून पन्नास हजार धरले आणि महिनाभर जाहिराती केल्या तर झाले १५ लाख रुपये. अश्या १००० रेडियो वाहिन्या धरल्या तर १५० कोटी रुपये.एक हेलिकॉप्टर भाड्याने घेतल तर तासाला भाड आहे दीड लाख रुपये.२५ हेलिकॉप्टर महिनाभर रोज फक्त दहा तास वापरली तर भाडे झाल किती ? ११२ कोटी रुपये.खाजगी जेट विमानच भाड आणि रोजचा खर्च विचारूच नका.इमेज बिल्डींग कंपनी , कॉम्पुटर प्रोग्राम्स , थ्रीडी सभा , वेगवेगळ्या मिरवणुका खर्च अजून हिशोबात घेतलेले नाहीतच.बाकी फेसबुक पेजेस चा खर्च आणि फुटकळ खर्च वेगळा.ढोबळ खर्च किती आहे ?.६०००० कोटी रुपये. साठ हजार कोटी रुपये फक्त.“ अब कि बार मोदी सरकार “ , माननीय प्रधानमंत्री मोदिजींच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चाचा आकडा मी तसा दबकत मांडलाय.(संदर्भ सोशल मीडिया)
आता पुढला हिशोब.करपात्र देणग्या घेत असल्यामुळे वार्षिक विवरणपत्र दाखल करतात सगळे राजकीय पक्ष.भाजपच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ ह्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा काय आहे ?. उलाढाल काय आहे ते तपासून पहा अतिशय चारित्र्यवान आणि देशभक्त लोकांचा पक्ष सगळा हिशोब चोख आणि पारदर्शक ठेवत असेलच. हा ६०००० कोटींचा खर्च जर ताळेबंदमध्ये आला असेल तर आपली काहीच हरकत नाहीये. जर आला नसेल तर मग मात्र,अच्छे दिन कुणाचे आलेत ? कुणी गुंतवणूक केली होती आणि कोण व्याजासहित वसूल करतय सगळ समजून घ्या. 
भारतातील शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगार हाच मोठ्या संख्येने मतदार आहे.तोच मतदान करणे आपला जन्मसिध्द अधिकार आहे असे समजुन मतदान करतो.त्याला शोषण मुक्त अच्छे दिन येणार या भरोशावर त्याने मोदींच्या सर्व सोम्या, गोम्या उमेदवारांना त्यांनी मतदान केले.त्यामुळे भाजपाचे शेपन्न इंच छातीचे मोदी सरकार बनले त्याला आता दोन वर्ष झाले तरी गोरगरिबांच्या खात्यात विदेशी काळा पैसा अजुन जमा झाला नाही.जुलै आगस्ट महिना वार्षिक आर्थिक 
विवरण पत्र भरण्याचा असतो.नोकरी करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्याचा टॅक्स आणि केंद्राचा इंकॉमटक्स पगारातून कापला जातो.
पण शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगार मजुरांना नियमित रोजगार नाही.त्यांना कोणती ही सामाजिक सुरक्षा नाही.त्यांचे शोषण तर सर्व बाजुने मुक्त पणे होते.त्यात राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी नेहमीच आघाडी वर असतात.शेतकऱ्यांचा शेतातील माल कृषिबाजार समितीत आला की अडते,व्यापारी आणि अधिकारी मालाची किंमत पडणार तेव्हा उत्पादन खर्च वजा करून किंमत ठरविण्याचा कायदा का लागु होत नाही?.हा मोठा प्रश्न देशातील बहुसंख्य  शेतकरी,शेतमजूर व असंघटीत कामगारांना पडत नाही.तो पर्यंत या देशात भांडवलदार आणि राजकीय पक्षातील नेत्याचे आर्थिक उत्पन्नाचे खरे विवरण पत्र सादर होणार नाही.तो पर्यंत आपण भारत माता की जय हो !!.गो माता की जय हो करीत राहणार.भांडवलदार आणि राजकीय पक्ष कोणत्याही विचारधारेचा
असला तरी तो शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगारांचे शोषण करीतच राहणार आहे.त्या शोषणातून होणारी आर्थिक लूट प्रिंट मीडिया,चॅनल मीडियावर  जाहिराती द्वारे उधळत राहणार आहे.शेतकरी,शेतमजूर,असंघटीत कामगार मजुरांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखविण्या करीता. म्हणुन जागृत भारतीय नागरिकानो चावडी वर बसुन हे राजकीय पक्षाचे व  प्रत्येक नेत्याचे आर्थिक उत्पन्नाचे  विवरण पत्र काय असते ते सार्वजनिक ठिकाणी चर्चेला घ्या आणि उघडा डोळे नि पहा निट काय चालले हे????.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई-९९२०४०३८५९.

असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?


असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?
भारतात विविध जाती धर्माची माणस राहतात.त्यांचे संसार खूप वेगळे आहेत.त्यात सर्वात मोठा धर्म म्हणजे हिंदू धर्म त्यात त्यांचे मनुस्मुर्ती ने लावलेले सर्व अलिखित कायदे भारतातील बहुसंख्य जाती जमातीचे लोक प्रामाणिकपणे पार पडतात.जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व धार्मिक विध्या ह्या ब्राम्हणा कडून करून घेतल्यास पाहिजे.ते हजारो वर्षापासून चालू असलेली परंपरा कोणीच नाकारण्याची हिंमत करीत नाही.तर अशा समाजात जेव्हा गोरगरीब माणसाला मग तो कोणत्याही जातीचा असो.त्याला ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न केल्यास सामुदाहिक पणे मारल्या जाते.तेव्हा हि मारलेली माणस इतर लोकांच्या मानगुटीवर भूत बनून बसतात.मग त्यांचा बंदोबस्त मांत्रिक,बाबा,महाराज,किंवा ब्राम्हण भरपूर दक्षिणा घेऊन करतात.देशात प्रत्येक गांवात असा घटना घडतात.अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाची संख्या मोठी आहे.त्याही पेक्षा अन्याय अत्याचाराचे बळी जाणाऱ्या समाजाची संख्या देशभरात खूपच मोठी आहे.मग प्रवित्र हिंदू धर्माच्या संस्कारानुसार मागासवर्गीय जातीजमातीचे हे बळी जाणाऱ्या माणसाचे आत्मे असंतुष्ट असतात.मग ते भूत बनून शांत का बसतात?.हा प्रश्न मला खूप दिवसा पासून सतावित आहे.म्हणून आज हा लेखप्रपंच.देशात सर्वच गांवातील भूत हे सगळी कडे पिंपळाच्या किंवा वडाच्या ​
झाडाखाली का आढळत असतात.​भारतात काश्मिर ते कन्याकुमारी व गुजरात ते गोहाटी कोठे ही जा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीच भुते असतात असे लोकं सांगतात, म्हणतात. भारतात वनस्पतींच्या लाखो प्रजाती आहेत मग
सगळी भुते , हडळी, प्रेतात्मे, पिशाच्चे पिंपळाच्याच झाडाखाली/वर का आढळत असावेत?.कारण हिंदू धर्म मानणाऱ्या मानवा करिता मनुस्मुर्ती कारणीभूत आहे.देशातील मानव जातीत जेवढ्या जाती पडतील तेवढ्या निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी माणसा माणसात विषमता निर्माण करून ठेवली.आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा,व भिती कायम माणसाच्या मनावर ठेवली.यालाच प्राचीनकाळी तथागत गौतम बुद्ध यांनी स्वत प्रयोग करून कायमची मूठमाती दिली.पण त्यातून आजही भारतातील बहुसंख्य लोक मुक्त नाहीत.
प्राचीन काळी गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणुन !
भारतात पिंपळाच्या झाडाचे महत्व प्रचंड वाढले.याला शास्त्रीय कारण असे की पिंपळ वातावरणात आँक्सिजन जास्त सोडतो.जुन्या काळी लोक योगविद्या,ध्यानधरनेसाठी पिंपळाखाली बसून अध्यात्मिक चर्चा करीत असत .आजही लोक गावात पारावर जमतात तेथे पिंपळाचेच झाड असते. एवढेच नव्हे तर बोधगया येथील २५०० वर्षापुर्वीचे झाड अजुनही लोकांनी जपुन ठेवले आहे. अशा रीतीने पिंपळाचे झाड बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रसाराचे ठिकाण बनले.याचा काही कर्मठ मनुवाद्यांनी याचा खुपच धसका घेतला आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार 
रोखण्यासाठी,त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली भुत अस​तात अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. म्हणुन आजही सामान्य माणसाचा असा समज असतो की पिंपळाच्या झाडाखाली भुते असतात.विज्ञान अज्ञान,अंधश्रद्धा,भिती दूर करते.हे  
लक्षात ठेवा
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' हा पिंपळाच्या पानावरच दिला जातो.*भारताचा राष्ट्रीय वृक्ष सुद्धा पिंपळ आहे.अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी राजघाटावर
"पिंपळ'वृक्षाचे रोपण केले.हे कशाचे लक्षण आहे​?.​
आत्मा आहे कि नाही या बाबत तथागत गौतम बुद्ध आणि ब्राम्हण पंडित यात झालेला संवाद लक्ष देऊन वाचा. बुध्दांना एका पंडितने विचारले की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.बुध्द म्हणाले , तुम्हाला असे कुणी सांगितले की मी असे बोललो?.पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही .मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का?.पंडीत म्हणाला नाही.मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का?.पंडित म्हणाला-  नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चेतून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?. तथागत म्हणाले मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो १)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा. माणूस डोळ्यान बघतो,कानान आवाज ऐकतो,नाकान वास घेतो,जीभेन चव घेतो,आणि त्वचेन स्पर्श जाणतो .या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.पंडित विचारतो - कसे ?.पाणी डोळ्याने दिसते पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?.तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?.पंडित म्हणाला नाही.याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?.पंडित म्हणाला नाही .हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही ,आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?.पंडित म्हणाले नाही .तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?.पंडित- नाही.तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?​.​पंडित- नाही.मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?. पंडित -नाही.मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही.आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही.त्याचा उपयोग नाही.ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला.तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?.तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?.पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?पंडित -आत्मा शरीर सोडतो.का सोडतो आत्मा शरीर ?कंटाळा आला म्हणून ?.पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर. तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,पंडितजी -तथागत बरोबर आहे तुमच .पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?....तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड ,भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता .बरोबर ?.पंडित - बरोबर .मग मला सांगा वात कधी विझते?.पंडित -तेल संपत तेंव्हा .तथागत -आणखी ?.पंडित -तेल आहे पण वात संपते तेंव्हा.तथागत-आणखी ?.पंडितजी काहीच बोलले नाहीत.तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला ,पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा .आणि जीव म्हणजे आग (उर्जा ).सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती) २) आप -द्रवरुप पदार्थ (पाणी ,स्नीग्ध तेल ) ३) वायु - वारा.४) तेज -उर्जा, उष्णता या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनणे थांबते .यालाच म्हणतात माणूस मरणे .आणि सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसाने कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो.अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे.संतुष्ट असंतुष्ट आत्मे मेलेल्या माणसात नसतात तर जिवंत माणसात असतात त्यामुळेच ते नितीमतेने न वागता अधर्माने वागून मानव जातीत समाजात तणाव निर्माण करतात.त्यातुन मुक्त व्हा त्यातच सर्वांचे मंगल आहे.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप,मुबई-९९२०४०३८५९.

राजकारणातील वेगळा विदर्भ ?.


रडा हमेशा ऋतु नुसार रंग बदलतो असे म्हणतात,पण त्यांचे विश्व रिकार्ड भारतातील राजकीय नेत्यांनी तोडले, विचार सरणी कोणती ही असो राजकीय नेता हा नेहमी सरडया सारखा रंग बदलनारा असतो, नव्हे सत्ता मिलविण्या करीता आणि टिकविण्या करीता त्याला आपली जात,धर्म,विचार आदर्श बाजूला ठेवून प्रसंगानिरूप त्याला वागावे लागते. यांचे उदाहरण आपण नेहमी ऐंकतो पण काल महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहण्यास मिळाले.राज्याचे मुख्यमंत्री व विदर्भाच्या मागणीचे खंदे समर्थक मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज ' विदर्भ निर्मितीचा कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच नसुन अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे जे  विधान केले आहे हे अत्यंत दुर्दैवी असुन त्यांनी विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. यानिमित्ताने सत्ता माणसाला कशी लाचार व हतबल करते त्याचे हे ताजे उदाहरण आहे. 
विदर्भ आंदोलनात संयुक्त दौरे करतांना प्रत्येक सभेत " विदर्भाचा विकास आता पॅकेज जाहीर करून किंवा विदर्भाच्या आमदाराला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून होणार नाही तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य करूनच होईल " असे छातीठोकपणे सांगणारा हा त्यावेळचा तडपदा र विरोधी नेता देवेंद्र फडणवीस संधी मिळताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळा झाला. खुप दिवसांनी विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले व आता हा माणूस विदर्भाला न्याय मिळवून देईल या आशेवर वैदर्भीय लोकांनी गेली 20 महिने वाट पाहिली पण आज "विदर्भ निर्माण करणे केन्द्र सरकारच्या अखत्यारीत आहे."राज्याचा तो अधिकार नाही " असे विधान करून आपण काही वेगळे राजकीय नेते नाही. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, त्यामुळे विदर्भातील तमाम नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. 
आमदार देवेन्द्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असतांना, एक तडफदार, स्वच्छ चारित्र्याचे ,नितिमत्तेचे पुरस्कार करणारे, विषयाची जाण असणारे, बांधिलकी म्हणुन अभ्यास असलेले एक सुजाण नेता म्हणुन विदर्भवाशियाच्या मनात स्थान होते,त्यांचे जे स्वच्छ चित्र होते, त्यांच्या वर जो विश्वास होता, त्यालाच आता तडा गेला आहे.सेनापतीच जेव्हा शत्रुशी हातमिळवणी करतो तेव्हा स्वाभिमानी जनतेवर जसे आभाळ कोसळते तशी वैदर्भीय जनतेची अवस्था झाली आहे. 
भाजपाने 1996 मधेच विदर्भ राज्याचा भुवनेश्वर येथील अधिवेशनात स्पष्ट ठराव केला होता, पण 2000 मधे मागणी नव्हती अशा छत्तीसगड सह तिन राज्यांची निर्मिती केली. पण विदर्भ निर्माण केला नाही कारण दिले की शिवसेनेचा विरोध आहे व ते आमचे सहयोगी आहेत. भाजपाने विदर्भ राज्याची निर्मिती करावी या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा केला, आंदोलने केलीत. कॉंगेसचा वाटेल तसा उद्धार केला. आम्हाला एकहाती सत्ता द्या आम्हीच विदर्भाची निर्मिती करू त्यात कुठेही बेईमानी होणार नाही असे म्हणणारे आता एकदम घुमजाव करीत आहेत त्याचे दुखः वाटते. नितीन गडकरी साहेबां विषयी काय बोलावे तेच समजत नाही. " मी मर्दाचा बच्चा आहे, शब्दांचा पक्का आहे " असे बेंबीच्या देठापासून गर्जना करणारा मर्द तर आता विदर्भाचे नावही काढत नाही. 
राज्याची निर्मिती करणे हा केन्द्र सरकारचा अधिकार आहे हे फडणविसांना यापूर्वी माहित नव्हते काय ?.भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना विदर्भाची निर्मिती करणे हा आमच्या घोषणापत्रात आहे व त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेच  सर्वत्र सांगत फिरलेत.मग मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी विदर्भा विषयीची भुमिका कां स्पष्ट केली नाही?.यानिमित्ताने मा. देवेंद्र फडणवीस विदर्भ व महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख बनवित असुन एकतर त्यांनी केन्द्रीय नेतृत्वाकडे विदर्भ राज्याची निर्मिती करावी म्हणून मागणी करावी किंवा विदर्भाचा मुद्दा आता शक्य नाही असे जाहिर करावे.पण विदर्भातील जनतेची फसवणूक करू नये अशी साधारण अपेक्षा आहे. 
"पावर के लिए कितना बदल गया इंसान "  अशी देवेंद्र फडणवीस यांची गत झाली आहे. " बेच दे अपनी जुंबा ,अपनी अना, अपना जमिर ,फिर तेरे हाथोमे सोनेके निवाले होंगे फिर ना कोई गुरूद्वारा, कोई मस्जिद ना कोई शिवाले होंगे सिर्फ तु होंगा और तेरे चाहनेवाले होंगे " असे देवेंद्र साठीच एका शायर ने हा शेर लिहीला असावा असे वाटते. 
जनता भोळी जरूर असते पण खुळी नक्कीच नसते. जनता दरबारात सर्व माफ असते पण विश्वासघात कधीही सहन केल्या जात नाही आणि त्याची प्रचिती भाजपाला नक्की येईल .
विदर्भ हा कायमच चर्चेचा विषय आहे.काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले.आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) - 9.2% आहे, आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2%.
झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले. आता झारखंड चा विकास दर 11.1% आहे, आणि बिहार चा फक्त 4.7%
उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले. आता उत्तराखंड चा विकास दर 8.8% आहे, आणि उत्तरप्रदेश चा 4.6% .तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8% आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5%.तर आता तुम्हीच सांगा कि, विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% वीज तयार होते.विदर्भात महाराष्ट्राच्या 70% खनिज आहे.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% कापूस उत्पादन होते.विदर्भात तर 80% जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे.विदर्भात तर 54% वनसंपदा आहे.विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन, कापूस, डाळ, तूर, तांदूळ, संत्री महाराष्ट्राला देतो.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे.विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे.विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे.तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल.
कृपया तुम्हीच विचार करा.आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे.फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता.राजकीय फायद्या करीता वेळो वेळी विदर्भातील नेत्यांना पुढे करून म्हणून राजकारण केले.म्हणुन विदर्भातील जनतेने आता पक्षा वर विश्वास न ठेवता. उमेदवारा वर विश्वास ठेऊन मतदान करावे आणि गांवागांवात जनजागृती करने आवश्यक आहे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा फ़क्त राजकीय लोकांचा विषय असता कामा नये, हा सर्वांचा विषय झाला पाहिजे आणि हा विषय सर्वाना पाठवा आणि विदर्भा विषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या, आणि अभिमानाने म्हणा जय विदर्भ.
विदर्भाला विरोध करणारे मुंबई ठाण्यात राहून विरोध करतात,त्यांना विदर्भातील शेतकरी शेतमजुर आणि असंघटित कामगारांची काय परिस्थिति आहे हे कसे समजेल?.विदर्भ राज्य झाल्यास यांचे काय नुकसान होईल.यांना आज जो मुक्तपणे कामगार मजुर उपलब्ध होतो तो होणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाची आज ज्या पद्धतने लूटमार करण्याची दादागिरी आहे ती बंद होईल,म्हणुन ते इंडियात राहून विरोध करतात तो मोडून काढण्या करीता जय भवानी!. जय शिवाजी!!. सोबत जय विदर्भ!!!. म्हणावे लागेल.तर विदर्भा ला न्याय मिळेल करीता राजकारणातील वेगळा विदर्भ दिसेल.(संदर्भ:- वृतपत्रातील आणि सोशल मिडिया वरील अनेक मान्यवराच्या लेखाचे हे संकलन आहे)
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई 9920403859,