भारत कृषिप्रधान देश आहे. सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून असतात.शेती शी संबंधित अनेक लोकांचा रोजगार आहे.मग तो भाजीपाला विकणारा असो कि कीटक नाशक औषध,बिबियाने विकणारा असो.की शेतीकरण्यासाठी
लागणारे साहित्य किंवा गुजर मारवाड्याचे,वाण्याचे किराणा दुकान,या सर्वांना वाणसामान-किराण्याचा हिशोब ठेवावा लागतो.खरेदी आणि विक्री यातुन मिळणारे उत्पन्न त्यातुन कामगाराचा पगार,जागेचे भाडेे,लाईट,पाणी बिल एकूण सर्व खर्च केल्यावर उरलेली रक्कम म्हणजे निवळ नफा.त्यालाच ग्रामीण भागात जमा खर्च ताळेबंद पत्रक आणि सरकार शासकीय भाषेत उत्पनाचे विवरण पत्र म्हणतात..हे भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यवसाय धंदा,नोकरी करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे.मग यातून राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कशे सुटतात?. राजकीय लोकांना भांडवलदाराची प्रचार प्रसार माध्यमं प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया कशी मोठी करतात.त्यांचा एकूण खर्च कोण करतो याचा विचार सर्व सामान्य माणुस करूच शकत नाही. भांडवलदार आणि राजकीय लोकांचे कसे साटेलोटे असते त्याचा हिशेब पाहू.
भारतात ७०००० वृत्तपत्र आहेत.त्यात ४०००० चालू आहेत किंवा जाहिराती देण्याच्या लायकीचे आहेत अस समजा.पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात द्यायला कुणाचे दर लाख रुपये तर कुणाचे ६० लाख रुपये आहेत. सरासरी दहा लाख धरले आणि दहा दिवस जाहिरात दिली तर किती झाले ?.एक कोटी रुपये , ४०००० पेपरचे चाळीस हजार कोटी. चॅनल मीडिया म्हणजे टी व्ही च्या भारतात सगळ्या मिळून ८८० वाहिन्या आहेत.१० सेकंद जाहिरात द्यायला सरासरी खर्च एक लाख रुपये.रोज १५ मिनिट एकूण जाहिरात दाखवली तर रोजचा खर्च ९० लाख रुपये आणि अशी महिनाभर जाहिरात केली तर एक महिन्याचा खर्च २७ कोटी रुपये.अश्या फक्त ७०० वाहिन्या धरल्या तर होतात १८९०० कोटी रुपये.एका एफएम रेडियोवर जाहिरात करायला सगळ्या दिवसाचे मिळून पन्नास हजार धरले आणि महिनाभर जाहिराती केल्या तर झाले १५ लाख रुपये. अश्या १००० रेडियो वाहिन्या धरल्या तर १५० कोटी रुपये.एक हेलिकॉप्टर भाड्याने घेतल तर तासाला भाड आहे दीड लाख रुपये.२५ हेलिकॉप्टर महिनाभर रोज फक्त दहा तास वापरली तर भाडे झाल किती ? ११२ कोटी रुपये.खाजगी जेट विमानच भाड आणि रोजचा खर्च विचारूच नका.इमेज बिल्डींग कंपनी , कॉम्पुटर प्रोग्राम्स , थ्रीडी सभा , वेगवेगळ्या मिरवणुका खर्च अजून हिशोबात घेतलेले नाहीतच.बाकी फेसबुक पेजेस चा खर्च आणि फुटकळ खर्च वेगळा.ढोबळ खर्च किती आहे ?.६०००० कोटी रुपये. साठ हजार कोटी रुपये फक्त.“ अब कि बार मोदी सरकार “ , माननीय प्रधानमंत्री मोदिजींच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चाचा आकडा मी तसा दबकत मांडलाय.(संदर्भ सोशल मीडिया)
आता पुढला हिशोब.करपात्र देणग्या घेत असल्यामुळे वार्षिक विवरणपत्र दाखल करतात सगळे राजकीय पक्ष.भाजपच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ ह्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा काय आहे ?. उलाढाल काय आहे ते तपासून पहा अतिशय चारित्र्यवान आणि देशभक्त लोकांचा पक्ष सगळा हिशोब चोख आणि पारदर्शक ठेवत असेलच. हा ६०००० कोटींचा खर्च जर ताळेबंदमध्ये आला असेल तर आपली काहीच हरकत नाहीये. जर आला नसेल तर मग मात्र,अच्छे दिन कुणाचे आलेत ? कुणी गुंतवणूक केली होती आणि कोण व्याजासहित वसूल करतय सगळ समजून घ्या.
भारतातील शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगार हाच मोठ्या संख्येने मतदार आहे.तोच मतदान करणे आपला जन्मसिध्द अधिकार आहे असे समजुन मतदान करतो.त्याला शोषण मुक्त अच्छे दिन येणार या भरोशावर त्याने मोदींच्या सर्व सोम्या, गोम्या उमेदवारांना त्यांनी मतदान केले.त्यामुळे भाजपाचे शेपन्न इंच छातीचे मोदी सरकार बनले त्याला आता दोन वर्ष झाले तरी गोरगरिबांच्या खात्यात विदेशी काळा पैसा अजुन जमा झाला नाही.जुलै आगस्ट महिना वार्षिक आर्थिक
विवरण पत्र भरण्याचा असतो.नोकरी करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्याचा टॅक्स आणि केंद्राचा इंकॉमटक्स पगारातून कापला जातो.
पण शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगार मजुरांना नियमित रोजगार नाही.त्यांना कोणती ही सामाजिक सुरक्षा नाही.त्यांचे शोषण तर सर्व बाजुने मुक्त पणे होते.त्यात राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी नेहमीच आघाडी वर असतात.शेतकऱ्यांचा शेतातील माल कृषिबाजार समितीत आला की अडते,व्यापारी आणि अधिकारी मालाची किंमत पडणार तेव्हा उत्पादन खर्च वजा करून किंमत ठरविण्याचा कायदा का लागु होत नाही?.हा मोठा प्रश्न देशातील बहुसंख्य शेतकरी,शेतमजूर व असंघटीत कामगारांना पडत नाही.तो पर्यंत या देशात भांडवलदार आणि राजकीय पक्षातील नेत्याचे आर्थिक उत्पन्नाचे खरे विवरण पत्र सादर होणार नाही.तो पर्यंत आपण भारत माता की जय हो !!.गो माता की जय हो करीत राहणार.भांडवलदार आणि राजकीय पक्ष कोणत्याही विचारधारेचा
असला तरी तो शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगारांचे शोषण करीतच राहणार आहे.त्या शोषणातून होणारी आर्थिक लूट प्रिंट मीडिया,चॅनल मीडियावर जाहिराती द्वारे उधळत राहणार आहे.शेतकरी,शेतमजूर,असंघटीत कामगार मजुरांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखविण्या करीता. म्हणुन जागृत भारतीय नागरिकानो चावडी वर बसुन हे राजकीय पक्षाचे व प्रत्येक नेत्याचे आर्थिक उत्पन्नाचे विवरण पत्र काय असते ते सार्वजनिक ठिकाणी चर्चेला घ्या आणि उघडा डोळे नि पहा निट काय चालले हे????.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई-९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा