सरडा हमेशा ऋतु नुसार रंग बदलतो असे म्हणतात,पण त्यांचे विश्व रिकार्ड भारतातील राजकीय नेत्यांनी तोडले, विचार सरणी कोणती ही असो राजकीय नेता हा नेहमी सरडया सारखा रंग बदलनारा असतो, नव्हे सत्ता मिलविण्या करीता आणि टिकविण्या करीता त्याला आपली जात,धर्म,विचार आदर्श बाजूला ठेवून प्रसंगानिरूप त्याला वागावे लागते. यांचे उदाहरण आपण नेहमी ऐंकतो पण काल महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहण्यास मिळाले.राज्याचे मुख्यमंत्री व विदर्भाच्या मागणीचे खंदे समर्थक मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज ' विदर्भ निर्मितीचा कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच नसुन अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे जे विधान केले आहे हे अत्यंत दुर्दैवी असुन त्यांनी विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. यानिमित्ताने सत्ता माणसाला कशी लाचार व हतबल करते त्याचे हे ताजे उदाहरण आहे.
विदर्भ आंदोलनात संयुक्त दौरे करतांना प्रत्येक सभेत " विदर्भाचा विकास आता पॅकेज जाहीर करून किंवा विदर्भाच्या आमदाराला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून होणार नाही तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य करूनच होईल " असे छातीठोकपणे सांगणारा हा त्यावेळचा तडपदा र विरोधी नेता देवेंद्र फडणवीस संधी मिळताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळा झाला. खुप दिवसांनी विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले व आता हा माणूस विदर्भाला न्याय मिळवून देईल या आशेवर वैदर्भीय लोकांनी गेली 20 महिने वाट पाहिली पण आज "विदर्भ निर्माण करणे केन्द्र सरकारच्या अखत्यारीत आहे."राज्याचा तो अधिकार नाही " असे विधान करून आपण काही वेगळे राजकीय नेते नाही. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, त्यामुळे विदर्भातील तमाम नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे.
आमदार देवेन्द्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असतांना, एक तडफदार, स्वच्छ चारित्र्याचे ,नितिमत्तेचे पुरस्कार करणारे, विषयाची जाण असणारे, बांधिलकी म्हणुन अभ्यास असलेले एक सुजाण नेता म्हणुन विदर्भवाशियाच्या मनात स्थान होते,त्यांचे जे स्वच्छ चित्र होते, त्यांच्या वर जो विश्वास होता, त्यालाच आता तडा गेला आहे.सेनापतीच जेव्हा शत्रुशी हातमिळवणी करतो तेव्हा स्वाभिमानी जनतेवर जसे आभाळ कोसळते तशी वैदर्भीय जनतेची अवस्था झाली आहे.
भाजपाने 1996 मधेच विदर्भ राज्याचा भुवनेश्वर येथील अधिवेशनात स्पष्ट ठराव केला होता, पण 2000 मधे मागणी नव्हती अशा छत्तीसगड सह तिन राज्यांची निर्मिती केली. पण विदर्भ निर्माण केला नाही कारण दिले की शिवसेनेचा विरोध आहे व ते आमचे सहयोगी आहेत. भाजपाने विदर्भ राज्याची निर्मिती करावी या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा केला, आंदोलने केलीत. कॉंगेसचा वाटेल तसा उद्धार केला. आम्हाला एकहाती सत्ता द्या आम्हीच विदर्भाची निर्मिती करू त्यात कुठेही बेईमानी होणार नाही असे म्हणणारे आता एकदम घुमजाव करीत आहेत त्याचे दुखः वाटते. नितीन गडकरी साहेबां विषयी काय बोलावे तेच समजत नाही. " मी मर्दाचा बच्चा आहे, शब्दांचा पक्का आहे " असे बेंबीच्या देठापासून गर्जना करणारा मर्द तर आता विदर्भाचे नावही काढत नाही.
राज्याची निर्मिती करणे हा केन्द्र सरकारचा अधिकार आहे हे फडणविसांना यापूर्वी माहित नव्हते काय ?.भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना विदर्भाची निर्मिती करणे हा आमच्या घोषणापत्रात आहे व त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेच सर्वत्र सांगत फिरलेत.मग मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी विदर्भा विषयीची भुमिका कां स्पष्ट केली नाही?.यानिमित्ताने मा. देवेंद्र फडणवीस विदर्भ व महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख बनवित असुन एकतर त्यांनी केन्द्रीय नेतृत्वाकडे विदर्भ राज्याची निर्मिती करावी म्हणून मागणी करावी किंवा विदर्भाचा मुद्दा आता शक्य नाही असे जाहिर करावे.पण विदर्भातील जनतेची फसवणूक करू नये अशी साधारण अपेक्षा आहे.
"पावर के लिए कितना बदल गया इंसान " अशी देवेंद्र फडणवीस यांची गत झाली आहे. " बेच दे अपनी जुंबा ,अपनी अना, अपना जमिर ,फिर तेरे हाथोमे सोनेके निवाले होंगे फिर ना कोई गुरूद्वारा, कोई मस्जिद ना कोई शिवाले होंगे सिर्फ तु होंगा और तेरे चाहनेवाले होंगे " असे देवेंद्र साठीच एका शायर ने हा शेर लिहीला असावा असे वाटते.
जनता भोळी जरूर असते पण खुळी नक्कीच नसते. जनता दरबारात सर्व माफ असते पण विश्वासघात कधीही सहन केल्या जात नाही आणि त्याची प्रचिती भाजपाला नक्की येईल .
विदर्भ हा कायमच चर्चेचा विषय आहे.काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले.आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) - 9.2% आहे, आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2%.
झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले. आता झारखंड चा विकास दर 11.1% आहे, आणि बिहार चा फक्त 4.7%
उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले. आता उत्तराखंड चा विकास दर 8.8% आहे, आणि उत्तरप्रदेश चा 4.6% .तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8% आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5%.तर आता तुम्हीच सांगा कि, विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% वीज तयार होते.विदर्भात महाराष्ट्राच्या 70% खनिज आहे.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% कापूस उत्पादन होते.विदर्भात तर 80% जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे.विदर्भात तर 54% वनसंपदा आहे.विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन, कापूस, डाळ, तूर, तांदूळ, संत्री महाराष्ट्राला देतो.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे.विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे.विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे.तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल.
कृपया तुम्हीच विचार करा.आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे.फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता.राजकीय फायद्या करीता वेळो वेळी विदर्भातील नेत्यांना पुढे करून म्हणून राजकारण केले.म्हणुन विदर्भातील जनतेने आता पक्षा वर विश्वास न ठेवता. उमेदवारा वर विश्वास ठेऊन मतदान करावे आणि गांवागांवात जनजागृती करने आवश्यक आहे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा फ़क्त राजकीय लोकांचा विषय असता कामा नये, हा सर्वांचा विषय झाला पाहिजे आणि हा विषय सर्वाना पाठवा आणि विदर्भा विषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या, आणि अभिमानाने म्हणा जय विदर्भ.
विदर्भाला विरोध करणारे मुंबई ठाण्यात राहून विरोध करतात,त्यांना विदर्भातील शेतकरी शेतमजुर आणि असंघटित कामगारांची काय परिस्थिति आहे हे कसे समजेल?.विदर्भ राज्य झाल्यास यांचे काय नुकसान होईल.यांना आज जो मुक्तपणे कामगार मजुर उपलब्ध होतो तो होणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाची आज ज्या पद्धतने लूटमार करण्याची दादागिरी आहे ती बंद होईल,म्हणुन ते इंडियात राहून विरोध करतात तो मोडून काढण्या करीता जय भवानी!. जय शिवाजी!!. सोबत जय विदर्भ!!!. म्हणावे लागेल.तर विदर्भा ला न्याय मिळेल करीता राजकारणातील वेगळा विदर्भ दिसेल.(संदर्भ:- वृतपत्रातील आणि सोशल मिडिया वरील अनेक मान्यवराच्या लेखाचे हे संकलन आहे)
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई 9920403859,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा