समाजाचा गद्दार नेता आणि अधिकारी ?.
बहुजन समाजात विविध जाती,पोटजाती आहेत प्रत्येक जात स्वतःला इतर पेक्षा मोठी समजते त्यांचाच फायदा आज पर्यंत काँग्रेस आणि भाजपा ने घेतला आहे.त्यांनी प्रत्येक जातीत एक गद्दार नेता आणि एक अधिकारी निर्माण केला.सर्व समाज शैक्षणिक, साहजिक आणि आर्थिक दृष्टया सारखा असतांना एकच नेता राजकीय दृष्ट्या मोठा कसा होतो.ही खरी ग्यानबाची मेख आहे.त्यांची प्रगती कशी होत जाते.यांचा सर्वच बहुजन समाजाने विचार करण्याची गरज आहे.रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा नरेन्द्र भाई मोदी देशाचा पंतप्रधान होण्यास किती वर्ष लागली याचा विचार करा.त्या करिता कोणा कोणाची सेवा,हुजरे गिरी आणि कुराडीचा दांडा बनुन (समाजाला)वटवृक्षाला तोडावे लागले त्यांचा हिशेब कारायलालयास खरा इतिहास समोर येईल. जो आपल्या विचार धारे च्या विरोधात काम करणाऱ्या संस्था,संघटना,पक्षात म्हणजे शत्रू गटात कार्य करतो.त्यांच्या मोठे पणाचा समाजाला काय फायदा?. नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी आहेत.पण विचाराने मनुवादी असल्यामुळे ते ओबीसी च्या स्वाभिमानी योजना राबवु शकत नाही.
>ओ बी सी, आदिवासी,दलित म्हणजे फक्त बौद्ध, किंवा महार नाही.तर चांभार,मातंग कोणत्या ही समाजातील नेता आणि अधिकारी जो आपल्या विचार धारेच्या विरोधी गटात कार्य करतो,तो कितीही मोठा झाला तरी त्याचा स्वतःच्या समाजाला काही फायदा होत नाही.कारण त्याच्या मोठेपणाचा संदर्भ हा त्या विरोधी राजकीय किंवा समाजातील कार्याच्या संदर्भात मोजण्यात येतो असतो.त्यामुळे त्याच्या मोठेपणाचा फायदा झालाच तर त्याच्या विरोधी वर्गाला होत असतो.आणि स्वतःच्या समाजाचा तोटा होत असतो.तरुणमुलांनी पुढाऱ्यांच्या,नेत्याच्या किंवा डाॅन लोकांच्या (दादा, भाई) मागे फालतू फिरून आपला वेळ वाया घालवू नये.अनेक भागांत वेगवेगळ्या टोपणनावाने पुढारी, नेते व भाई आहेत.उदा: नाना, दादा, भाऊ, भाई, तात्या, काका, दादासाहेब, इत्यादी.अशी अनेक तरुण मुले प्रत्येक पुढाऱ्याच्या,नेत्याच्या व डाॅनच्या मागे आपला कामधंदा, व्यवसाय, करिअर सोडून रात्रीच्या एका दारुच्या बाटलीसाठी आणि चिकन बिर्यानी साठी काही तरुण मुल फिरताना दिसतात.नेत्याचे आणि अधिकाऱ्याचे नेहमीच साटेलोटे असते.त्याशिवाय दोघेही मोठे होत नसतात. ऐन तरुणपणातला वेळ अक्षरशा वाया घालवतात तरूण वयातील मुलांना एक दिवसही वेळ घालवणे परवडणारे नाही.जेव्हा आपल्या आयुष्यातील हा वेळ वाया जातो.,तेव्हा आपले वय वाढत जाते, लग्नाचे वय झाले तेव्हा मुलगा काय नोकरी,धंदा करतो त्यांचे महिना इनकम किती असे प्रश्न विचारे जातात तेव्हा आई वडील,मामा,काका,भाऊ कोणीच उत्तर देण्याची हिंमत करीत नाही.तेव्हा तरुण मुलांना गेलेल्या दिवसातील आपण केलेली कामे आठवतात.तरुण मुलांची अवस्था घरका ना घाटका झालेली असते.
> बहुजन समाजातील अनेक तरुण वेगवेगळ्या पक्षात कार्यकर्ता म्हणून किती ही दिवस नेत्यांच्या मागे फिरले तरी त्यांच्या हाती काय आले?.बसपा ते बामसेफ किती सुशिक्षित तरुण बरबाद झाले?.यांचा हिशेब नाही,जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा कुठलाच नेता त्याचा पक्ष तुमच्या मागे उभा रहात नाही. पहिल्यांदा पैसा कमवा घरच्यांना वेळ द्या घरातल्या कामात हातभार लावा तुमच्या जवळ पैसा असेल तरच दुनिया तुम्हाला सलाम करेल. नेते पुढारी भाई लोक तुमच्या मांडिला मांडी लावून बसतील नाही तर असं राहिलात तर त्यांच्या दरवाजा जवळच बसावं लागेल आणि त्यांच्या गाडीत कुठे मागे जागा मिळेल तिथे बसावे लागेल.नेता पुढारी दादा रूबाबात चालतो तो फक्त आणि फक्त आपल्या सारख्या कार्यकर्त्याच्याच जिवावर म्हणुन वेळीच सावध व्हा. तुमचा वापर संपला की तुम्हाला बरोबर खड्याप्रमाणे बाजुला केले जाते.एकदा वेळ गेली की पुन्हा काहीही करता येणार नाही.आपले लक्ष नेहमी आपल्या विकासाकडे केंद्रीत करा. म्हणुन स्वत:चा उद्योग मोठा करा. स्वत:ची केबीन आलिशान सिंहासने बनवा,तुमच्या उद्योगात काम करणारे लोक तूमचे मावळे समजा, तूम्ही तूमच्या उद्योगाचे छत्रपती व्हा. तुम्ही तुमच्या विभागात सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवा एक चांगले समाजसेवक म्हणुन यशस्वी व्हाल.तेव्हा तुमची इज्जत, नाव हे एका नेत्यापेक्षाही मोठ्या आदराने घेतले जाईल. तुम्ही उद्योगात यशस्वी झाल्यानंतर उद्या एखाद्या सामाजिक कामाचीही सुरुवात करु शकता व पूढे जाऊन उद्योग व सामाजिक कार्य या दोन्हीही महत्वकांक्षा पूर्ण करू शकता.
> एक लक्षात ठेवा, मोठ्या झाडाखाली दुसरे छोटे झाड कधीही मोठे होत नाही हा निसर्गाचा नियम आहे.तेव्हा दुसऱ्याला मोठे करण्यापेक्षा स्वत: मोठे व्हा. कोणत्याही नेत्याच्या मागे फिऱू नका.वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी ५ रूपयांना असतो, तोच रात्री रद्दीत ५ रूपये किलोने विकला जातो.म्हणुन जीवनात वेळेला महत्व द्या आणि स्वत:चा व समाजाचा विकास करा. एक विचार करा आपण जर यांना आणि त्यांना मोठे करतो तर आपण का मोठे होणार नाही?. सिद्धार्थ राजपुत्र होता तेव्हा त्याला सुरा, मदिरा व अप्सरा प्रकारचे अनेक व्यसने लागावी म्हणुन किती प्रयत्न झाला पण राजपुत्र सिद्धार्थ ने ते सर्व प्रयत्न उलट करून
> ठेवले त्यांनी सुरवात पासुन सत्य शोधण्याचे व मांडण्याचे काम केले.त्यासाठी त्यांनी अनेक ऋषी ज्ञानी पंडिता कडून ज्ञान घेण्याची जिध्द ठेवली.आजच्या तरुणांनी त्यांच्या सारखा आदेश ठेवला पाहिजे.सर्वच समाजात आज ज्ञानी पंडित खूप झाले आहेत.पण त्यांचे विचार आणि आचरण यात तुफान फरक आहे.त्याच पद्धतीने समाजात कार्यकर्ते,नेते व अधिकारी खूप झालेत. पण सामाजिक जबाबदारी म्हणुन किती प्रामाणिक आहेत.जे असतील ते समाजात आदर्श ठरतात.त्यांना त्यांच्या गांवात मानसन्मान मिळतो.ते सदैव सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असतात.त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा.आपण आपल्या परिसरातील नेत्यांना आणि अधिकऱ्यांना ओळखत असतो.ते सामाजिक जबाबदारी किती प्रामाणिक पणे राबवितात यांचा योग्य त्या पद्धतीने विचार करा त्यांना समाजात किती व कसा वापर आहे हे तापसुन त्यांचा मानसन्मान कि वस्त्रहरण करण्याची तयारी आपल्या विभागातील तरुणांचीच असली पाहिजे.दुसऱ्या विभागातुन तरुण येतील आणि आपल्या विभागातील नेत्यावर,अधिकाऱ्यावर कारवाई करतील ही अपेक्षा ठेवणे चूक ठरेल.ह्याची गांभीर्याने दाखल आपण घेत नसल्यामुळे समाजात गद्दार नेते आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.तेव्हा तरुणांनो उठा जागे व्हा!. अन्यता पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही.सोशल मीडियावर अनेक तरुणाच्या छोट्या पण महत्वपूर्ण मताचे हे संकलन आहे.यात अनेकांच्या पोस्ट मधील संदर्भ घेतला आहे.
> सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा