गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?


असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?
भारतात विविध जाती धर्माची माणस राहतात.त्यांचे संसार खूप वेगळे आहेत.त्यात सर्वात मोठा धर्म म्हणजे हिंदू धर्म त्यात त्यांचे मनुस्मुर्ती ने लावलेले सर्व अलिखित कायदे भारतातील बहुसंख्य जाती जमातीचे लोक प्रामाणिकपणे पार पडतात.जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व धार्मिक विध्या ह्या ब्राम्हणा कडून करून घेतल्यास पाहिजे.ते हजारो वर्षापासून चालू असलेली परंपरा कोणीच नाकारण्याची हिंमत करीत नाही.तर अशा समाजात जेव्हा गोरगरीब माणसाला मग तो कोणत्याही जातीचा असो.त्याला ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न केल्यास सामुदाहिक पणे मारल्या जाते.तेव्हा हि मारलेली माणस इतर लोकांच्या मानगुटीवर भूत बनून बसतात.मग त्यांचा बंदोबस्त मांत्रिक,बाबा,महाराज,किंवा ब्राम्हण भरपूर दक्षिणा घेऊन करतात.देशात प्रत्येक गांवात असा घटना घडतात.अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाची संख्या मोठी आहे.त्याही पेक्षा अन्याय अत्याचाराचे बळी जाणाऱ्या समाजाची संख्या देशभरात खूपच मोठी आहे.मग प्रवित्र हिंदू धर्माच्या संस्कारानुसार मागासवर्गीय जातीजमातीचे हे बळी जाणाऱ्या माणसाचे आत्मे असंतुष्ट असतात.मग ते भूत बनून शांत का बसतात?.हा प्रश्न मला खूप दिवसा पासून सतावित आहे.म्हणून आज हा लेखप्रपंच.देशात सर्वच गांवातील भूत हे सगळी कडे पिंपळाच्या किंवा वडाच्या ​
झाडाखाली का आढळत असतात.​भारतात काश्मिर ते कन्याकुमारी व गुजरात ते गोहाटी कोठे ही जा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीच भुते असतात असे लोकं सांगतात, म्हणतात. भारतात वनस्पतींच्या लाखो प्रजाती आहेत मग
सगळी भुते , हडळी, प्रेतात्मे, पिशाच्चे पिंपळाच्याच झाडाखाली/वर का आढळत असावेत?.कारण हिंदू धर्म मानणाऱ्या मानवा करिता मनुस्मुर्ती कारणीभूत आहे.देशातील मानव जातीत जेवढ्या जाती पडतील तेवढ्या निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी माणसा माणसात विषमता निर्माण करून ठेवली.आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा,व भिती कायम माणसाच्या मनावर ठेवली.यालाच प्राचीनकाळी तथागत गौतम बुद्ध यांनी स्वत प्रयोग करून कायमची मूठमाती दिली.पण त्यातून आजही भारतातील बहुसंख्य लोक मुक्त नाहीत.
प्राचीन काळी गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणुन !
भारतात पिंपळाच्या झाडाचे महत्व प्रचंड वाढले.याला शास्त्रीय कारण असे की पिंपळ वातावरणात आँक्सिजन जास्त सोडतो.जुन्या काळी लोक योगविद्या,ध्यानधरनेसाठी पिंपळाखाली बसून अध्यात्मिक चर्चा करीत असत .आजही लोक गावात पारावर जमतात तेथे पिंपळाचेच झाड असते. एवढेच नव्हे तर बोधगया येथील २५०० वर्षापुर्वीचे झाड अजुनही लोकांनी जपुन ठेवले आहे. अशा रीतीने पिंपळाचे झाड बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रसाराचे ठिकाण बनले.याचा काही कर्मठ मनुवाद्यांनी याचा खुपच धसका घेतला आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार 
रोखण्यासाठी,त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली भुत अस​तात अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. म्हणुन आजही सामान्य माणसाचा असा समज असतो की पिंपळाच्या झाडाखाली भुते असतात.विज्ञान अज्ञान,अंधश्रद्धा,भिती दूर करते.हे  
लक्षात ठेवा
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' हा पिंपळाच्या पानावरच दिला जातो.*भारताचा राष्ट्रीय वृक्ष सुद्धा पिंपळ आहे.अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी राजघाटावर
"पिंपळ'वृक्षाचे रोपण केले.हे कशाचे लक्षण आहे​?.​
आत्मा आहे कि नाही या बाबत तथागत गौतम बुद्ध आणि ब्राम्हण पंडित यात झालेला संवाद लक्ष देऊन वाचा. बुध्दांना एका पंडितने विचारले की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.बुध्द म्हणाले , तुम्हाला असे कुणी सांगितले की मी असे बोललो?.पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही .मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का?.पंडीत म्हणाला नाही.मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का?.पंडित म्हणाला-  नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चेतून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?. तथागत म्हणाले मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो १)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा. माणूस डोळ्यान बघतो,कानान आवाज ऐकतो,नाकान वास घेतो,जीभेन चव घेतो,आणि त्वचेन स्पर्श जाणतो .या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.पंडित विचारतो - कसे ?.पाणी डोळ्याने दिसते पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?.तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?.पंडित म्हणाला नाही.याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?.पंडित म्हणाला नाही .हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही ,आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?.पंडित म्हणाले नाही .तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?.पंडित- नाही.तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?​.​पंडित- नाही.मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?. पंडित -नाही.मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही.आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही.त्याचा उपयोग नाही.ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला.तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?.तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?.पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?पंडित -आत्मा शरीर सोडतो.का सोडतो आत्मा शरीर ?कंटाळा आला म्हणून ?.पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर. तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,पंडितजी -तथागत बरोबर आहे तुमच .पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?....तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड ,भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता .बरोबर ?.पंडित - बरोबर .मग मला सांगा वात कधी विझते?.पंडित -तेल संपत तेंव्हा .तथागत -आणखी ?.पंडित -तेल आहे पण वात संपते तेंव्हा.तथागत-आणखी ?.पंडितजी काहीच बोलले नाहीत.तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला ,पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा .आणि जीव म्हणजे आग (उर्जा ).सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती) २) आप -द्रवरुप पदार्थ (पाणी ,स्नीग्ध तेल ) ३) वायु - वारा.४) तेज -उर्जा, उष्णता या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनणे थांबते .यालाच म्हणतात माणूस मरणे .आणि सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसाने कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो.अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे.संतुष्ट असंतुष्ट आत्मे मेलेल्या माणसात नसतात तर जिवंत माणसात असतात त्यामुळेच ते नितीमतेने न वागता अधर्माने वागून मानव जातीत समाजात तणाव निर्माण करतात.त्यातुन मुक्त व्हा त्यातच सर्वांचे मंगल आहे.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप,मुबई-९९२०४०३८५९.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा