सत्कार एक इंजिनिअर कामगार नेत्यांचा !.
शिक्षणात आरक्षणाची सवलत घेऊन उच्चशिक्षित झालेले लोक नोकरीत सुद्धा आरक्षणाचा सर्वात जास्त लाभ घेतात. पण आरक्षणाच्या कोणत्याही रस्तावरील आंदोलनात भाग घेत नाही.शासकीय नोकरी मिळाली की आपले घर व कुटुंबात रममाण होतात.स्वतःच्या जन्मभूमीत तालुक्यात जिल्ह्यात कोणत्याही संस्था संघटना मध्ये उच्चशिक्षित म्हणून सहभागी होत नाहीत. समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरोधात होणाऱ्या संघर्षमय लढ्यात भाग घेत नाही.असे उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे लोक तेव्हा ही होते.त्याचा अनुभव स्वतः डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतला होता म्हणूनच ते खेदाने म्हणत होते की "मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया". त्याला काही लोक अपवाद आणि लक्षवेधी असतात.
आयु नरेंद्र जारोंडे इलेक्ट्रिकल इंजिनिअर महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ मध्ये उपअभियंता होते. शासकीय नोकरी करून कुुुटुंबात रममाण होण्यापेक्षा समाजावर होत असलेल्या अन्याय दूर करण्यासाठी संपूर्ण आयुष्य सनदशीर मार्गाने संघर्ष करून आपण समाजाला काही देणे लागतो,ही वृत्ती जोपासणारा नेता म्हणजेच नरेंद्र जारोंडे
आहेत.आजकाल असे नेते मिळणे दुर्मिळ झाले असतांना
आपल्या सेवेत कसूर न करता कामगार,कर्मचारी हितासाठी लढणारा मागासवर्गीय कामगारांची चळवळ मजबूत पणे उभी करण्यासाठी तोंडात साखर,डोक्यावर बर्फ आणि पायाला भिंगरी लावणारे नेते म्हणजे नरेंद्र जारोंडे हे मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांना प्रेरणा देणारे नेतृत्व
जे महानिर्मिती मधून ३१ जुलै २०१८ ला डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर या पदावरुन निवृत्त झाले आहेत .त्यांच्या कार्याचा गौरव करण्याचा कार्यक्रम संघटनेने ५ ऑगष्टला संघटनेच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण केंद्र प्रेरणा नगर,हजारी पहाड,नागपूर येथे आयोजित केला होता.त्यात 13 राज्यातील कामगार,कर्मचारी व पदाधिकारी यांनी मोठया उत्स्फूर्तपणे भाग घेऊन सत्कार साजरा केला.
एक इंजिनियरचा तो भव्य सत्कार नव्हता.तर फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या चळवळीत विद्यार्थी दशेपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा नेता असलेल्या नेत्यांचा तो सत्कार होता.विद्यार्थी दशेपासून ते निवृत्त होण्या पर्यंत त्यांनी जो संघर्ष केला.त्यात त्यांच्या पत्नीचे,मुलांचे योगदान खुप मोठे आहे.
नरेंद्र जारोंडे हे निवळ कामगार नेते नाहीत तर ते क्रांतिकारी आंबेडकरवादी विचारांचे प्रभावी लेखकही आहेत.त्यांच्या लेखनीची झलक त्यांनी दर वर्षी ऊर्जा श्रमिकच्या डायरीचे प्रकाशन करून त्या डायरीमध्ये महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे,व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट देवून कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्याचे काम केले.तसेच मागासवर्गीय विद्यार्थी व कर्मचारी संबंधी डायरीमध्ये शासनाचे नियम देवून कर्मचारी यांच्या ज्ञानात भरच पाडली आहे. त्यांनी देशव्यापी स्वतंत्र विद्युत एम्लाईज फेडरेशन मध्ये व देशव्यापी स्वतंत्र मजदूर युनियनच्या कार्यकारिणीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली. तसेच दर दोन वर्षांनी होणाऱ्या राज्यव्यापी द्विवार्षिक अधिवेशनामध्ये ऊर्जा श्रमिक मुखपत्र स्मरणिका प्रकाशित करून त्या स्मरणिकेमध्ये आंबेडकरवादी विचारवंताचे लेख प्रकाशित करुन आंबेडकरवादाला पुढे नेण्याचे काम केले.संघटनेचे मुखपत्र ऊर्जा श्रमिक हे मागील २५ वर्षापासून मान.नरेंद्र जारोंडे यांच्या संपादनाखाली चालू आहे.हे मुखपत्र नसते तर २२ पतसंस्था, कल्याण निधी, प्रशिक्षण संस्था, क्रांती ऊर्जा सार्वजनिक वाचनालय उभे झाले नसते.मा.नरेंद्र जारोंडे यांच्यामुळेच संघटनेने इंजिनियर रमेश रंगारी यांची १) आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता २) बहुजन कामगार चळवळीची आवश्यकता व स्वतंत्र मजदूर युनियन ३) बहुजन राष्ट्र ही तीन पुस्तके प्रकाशित केली आहेत.
स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मान.जे.एस.पाटील यांच्या कडून प्रेरणा घेऊनच त्यांनी आपले कार्यक्षेत्र वाढवुन ठेवले आहे. नाही तर एका इंजिनियरचे कार्यक्षेत्र डिपार्टमेंट, डिव्हिजन आणि कॅबिन असते. त्यात ते बायको मूल प्लॉट बांगला व गाडी यांच्यातच निवृत्त होतात.आपण पाहत असाल काही लक्षवेधी उच्चशिक्षित अधिकारी निवृत्तीनंतर समाज,संस्था आणि संघटना मध्ये स्वतःचे स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.त्यात आंबेडकर भवन होत्याचे नव्हते होते.परंतु जे एस पाटिल,रमेश रंगारी,नरेंद्र जारोंडे,संजय घोडके,सुदाम हनवते,जीवन गायकवाड, ज्ञानेश्वर खैरे,राजु गायकवाड सारखे अनेक इंजिनियर आणि अधिकारी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय ट्रेंड युनियन जिवंत ठेऊन मान्यताप्राप्त करून घेण्यासाठी देशभरातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांना संघटित करीत आहेत.त्यात नरेंद्र जारोंडे किर्याशील असतांनाच निवृत्त झाल्यामुळे स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) चे काम अश्वगतीने वाढणार आहे. शासकीय नोकरी करीता असतांना ते जेवढा वेळ कुटुंबाला देत नव्हते तेवढा वेळ संघटनेला देत होते.आता यापुढे नोकरी साठी जाणारा वेळ संघटना वाढी साठी ते देतील यात शंकाच नाही.कारण ते एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित झालेले नेते आहेत. म्हणूनच नरेंद्र जारोंडे यांचे भावी आयुष्य निरोगी राहून त्यांच्या हातुन ऐतिहासिक मागासवर्गीय कामगार,कर्मचारी संघटनेचे कार्य देशव्यापी व्हावे हीच अपेक्षा व त्यांना सत्यशोधक कामगार संघटना संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन च्या वतीने हार्दिक शुभेच्छा !.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई 9920403859,