शनिवार, २८ डिसेंबर, २०१९

कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:- सागर तायडे



कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे:-  सागर तायडे
मालवण दि. २२ डिसेंबर – राज्यातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दीड लाख कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आणणारे शासन आदेश रद्द करावे आणि कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी कामावर ठेवावे.त्यासाठी महानगरपालिका,नगरपालिका, नगरपंचायत, नगरपरिषद मधील दीड लाख कंत्राटी कामगारांनी संघटित व्हावे असे सागर तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी आवाहन केले.

मालवण नगरपालिका कामगारांच्या वतीने समाज मंदिर सभागृहात मालवण येते संघटित असंघटित कामगारांची चिंतन बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी भाई सुदीप कांबळे, सचिन कासरे, अनिल वळंजू आनंद वायगणकर सहप्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यात सागर तायडे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

शासनाच्या विविध सेवा मधील मागील २० वर्षापासून कार्यरत असणारे हजारो कंत्रांटी कामगार कर्मचारी आज आपल्या न्याय मागण्यांसाठी वेगवेगळे लढत आहेत.ते सर्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीकारी विचारांच्या स्वतंत्र मजदूर युनियन च्या बॅनर खाली संघटित झाले तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीयपातळीवर सनद शीर मार्गाने लढता येईल.राष्ट्रीय पातळीवर बारा ट्रेंड युनियन महासंघ आहेत पण ते मनुवादी विचारधारा मानणारे  असल्यामुळेच मागासवर्गीय कामगारांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्या ऐवजी कंत्राटी कामगार म्हणून काम करावे लागते. ज्या ठिकाणी २४० दिवस सलग काम चालते त्या ठिकाणच्या कामगारांना कायमस्वरूपी कामगार म्हणून घेतले पाहिजे असा कायदा असतांना ही देशात कंत्राटी कामगारांची पद्धत रूढ होतांना दिसत आहे. याला आपण जबाबदार आहोत, कारण बहुसंख्य मागासवर्गीय कामगार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करण्यातच धन्यता मानतात.पण बाबासाहेबांची कामगार चळवळी बाबतची भूमिका समजून घेत नाही.असे सागर तायडे यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व नगरपालिका, नगरपंचायत,नगर परिषद,मधील संघटित असंघटित कामगारांना स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन संलग्न स्वतंत्र मजदूर युनियन शी जोडण्याचे काम मी जबाबदारीने पार पाडेल, मला सध्या कोणतेही पद नको आहे असे भाई सुदीप कांबळे यांनी सांगितले.सलग १०/२० वर्ष शासन सेवेत कंत्राटी पध्दतीने तुटपुंज्या मानधनावर सेवा केल्यानंतर ही सामान्य प्रशासन विभाग त्या कामगारांची नोंद घेत नाही. त्या कंत्राटी कामगारांचे शोषण मोठ्या प्रमाणात होत असतांना आपण पाहतो त्यासाठी काही तरी केले पाहिजे ही माझी खुप दिवसाची धडपड सुरू होती.त्याला आता योग्य पर्याय निर्माण झाल्यामुळे आता शांत बसून चालणार नाही. त्याविरोधात संघटीत पणे संघर्ष करण्यासाठी तयार व्हावे असे भाई सुदीप कांबळे यांनी चिंतन बैठीकाचा समारोप करतांना सांगितले,अनिल वळुंज यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

बाळकृष्ण जाधव 9370884402 मालवण यांस कडून 




संघर्षातुन नवा आत्मविश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे- सुरेखा अथरगडे

संघर्षातुन नवा आत्मविश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाला पाहिजे- सुरेखा अथरगडे
मागासवर्गीय असंघटित कामगारांचा डाव्या उजव्या विचारांच्या संघटना भीती घालून असंतोष शांत करतात.आणि जातीव्यवस्थेचे छुपे समर्थन करतात.दोन लाख अंगणवाडी सेविका १९७४ पासुन डाव्या विचारधारा मानणाऱ्या संघटनेच्या सोबत जोडल्या असतांना त्यांना मानधनावर कायमस्वरूपी ठेवल्या जात आहे. त्यांना सरकारी यंत्रणा कायमस्वरूपी वेतनश्रेणी का लागु करीत नाही. असा सवाल सुरेखा अथरगडे चिमूर चंद्रपूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका यांनी प्रचंड मोर्चात नागपुर येथे विचारला.
 नागपूर विधानभवनावर स्वतंत्र मजदूर युनियन वतीने आयोजित प्रचंड मोर्चात राष्ट्रीय अध्यक्ष मान. जे. एस. पाटील साहेब यांच्या नेतृत्वात हजारो संघटित शासकीय कर्मचारी व अधिकाऱ्यां सोबतच असंघटित क्षेत्रातील कार्यकर्ते संवैधानिक हक्कांच्या रक्षणासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या प्रसंगी बोलताना स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या सुरेखा अथरगडे यांनी अतिशय भावूक होत मोर्चाला संबोधित केले. त्या म्हणाल्या, आमचा मुलगा डॉक्टर, इंजिनीयर, तहसीलदार होऊ शकत नाही, कारण इतकी वर्षे अंगणवाडी सेविका म्हणून काम करून सुद्धा आम्हाला वेतन नसून केवळ तुटपुंज्या मानधनावर आपला उदरनिर्वाह करावा लागतो. वेळोवेळी शासनाद्वारे मानधनात नावापुरती वाढ करून आमच्यातला वाढता असंतोष शांत केल्या जातो. परंतु, आता हे तुटपुंजे मानधन नको तर वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी भावूक अंतःकरणाने या प्रसंगी त्यांनी केली. त्यावेळी बाबासाहेबांनी याच नागभूमीवर केलेल्या १९५६ सालच्या त्या ऐतिहासिक भाषणाची आठवण होते ज्यात विषमतावादी व्यवस्थेचे वर्णन करताना बाबासाहेब म्हणतात कि, "ब्राम्हण बाई बाळंतीण झाली कि तिची नजर हायकोर्ट जज्जाची जागा कोठे रिकामी आहे त्याकडे असते.आमची झाडूवाली बाई बाळंतीण झाली तर तिची नजर कोठे झाडू वाल्याची जागा रिकामी आहे, तिकडे असते." अशा तऱ्हेने ही विषमतावादी वर्णवादी व्यवस्था सामाजिक, मानसिक, शैक्षणिक ऱ्हासा सोबतच बहुजन समाजाच्या आर्थिक दडपशाहीचे सुद्धा मुख्य कारण ठरली आहे.
महाराष्ट्र राज्यात गेल्या चाळीस वर्षांपासून अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. त्या ब्राम्हणवादी, डाव्यांच्या संघटनांमध्ये आजपर्यंत कार्य करत होत्या. परंतु, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात तसुभरही फरक पडला नाही. त्या संघटनांं मधील त्यांचे स्थान केवळ पावती फाडण्यापूरतेच मर्यादित होते. कामगारांचे हित साधण्याचे ढोंग करणाऱ्या या ब्राम्हणवादी, डाव्यांच्या संघटना या विषमतावादी व्यवस्था कायम ठेवण्यासाठीच कार्यरत असतात.हे मागासवर्गीय अंगणवाडी सेविकांनी लक्षात घेऊन आपली चूक सुधारावी स्वतंत्र अंगणवाडी कर्मचारी युनियन मध्ये सहभागी व्हावे.
 स्वतंत्र मजदूर युनियनच्या संघटित शक्तीच्या जोरावर मान. जे.एस.पाटील साहेब यांच्या नेतृत्वात बाबासाहेबांनी सांगितलेले बहुजन कामगारांचे शत्रू भांडवलशाही व ब्राम्हणशाही यांच्या विरुद्ध असलेल्या संघर्षातुन नवा आत्मविश्वास अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये आणि असंघटित संघटित कामगार कर्मचारी अधिकारी वर्गात निर्माण होत आहे म्हणूनच आज सर्व संघटित असंघटित या प्रचंड मोर्चात सहभागी झाले हे सिद्ध होत आहे.

सुमित चिंचखेडे नागपुर यांस कडून 

मोदीजी शहाजीने गरीबाचे जगने हराम केले.



मोदीजी शहाजीने गरीबाचे जगने हराम केले.
देशातील बहुसंख्य असंघटीत शेतकरी शेतमजूर,मजदूर ,कामगारांनी स्वाभिमानाने जगु नये.दररोज जगण्या करीता संघर्ष केलाच पाहिजे.त्यांनी धन संपत्ती,जंगम मालमत्ता बनविण्याचे स्वप्न पाहूच नये.अशी ज्यांची सोच विचारधारा आहे.त्या विचारधारेच्या वैचारिक गुलामाने पाचशे,हजारचे मोठे नोट बंद करून बहुसंख्य गोरगरीबावर सर्जिकल स्ट्राइक केला होता. आता NRC म्हणजे National Register of Citizens असून या रजिस्टर मधे देशातल्या नागरिकांची नोंद केली जाणार आहे. NRC लिस्ट मधे ज्यांचे नाव असेल ते भारताचे नागरिक ठरतील आणि ज्यांचे नाव नसेल त्यांना घुसखोर समजण्यात येईल.  NRC संपूर्ण देशात लागू करण्याची घोषणा अमित शहा नी केली आहे.म्हणजे आता भारतात राहणाऱ्या नागरिकांना भारताचा नागरिक असण्याचे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे सादर करावी लागतील. ज्यांना अन्न, वस्त्र,निवारा शिक्षण आरोग्य आणि रोजगारांची कोणत्याही हमी नाही.ते पन्नास वर्षाची कागदपत्रे कशी सादर करतील हा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे.
मोदीजी शाहजीने गरीबाच्या जगण्यात एवढया अडचणी निर्माण केल्या आहेत त्या कमी पडत नाहीत त्यात ही एन आर सी ची मोठी समस्या समोर उभी केली आहे.बहुसंख्य असंघटीत समाजा कडे कुठे काळाधन असते तर हे सकाळ पासुन उन्हातान्हात बँका समोर रांगा लाऊन उभे राहिले असते काय?.या बहुसंख्य असंघटीत समाजातील गोरगरीबाला मानसिक त्रास देऊन देशाची अर्थव्यवस्था कशी सुधारली काय?.किती काळेधन बाहेर आले?. काळेधन गोरे करणारे श्रीमंत खुलेआम फिरतात आणि दिवसाला हजार पाचशे रुपये कमविणाऱ्याला मोदीजी शाहजीने दोनवेळचे जेवणा करीत लागणारे साहित्य मिळविण्यासाठी चारचार तास रांगेत उभे राहण्याची शिक्षा दिली होती, ती भारतातील सर्व नागरिकांनी भोगली आहे . आता त्यामुळे प्रत्येकाच्या तोंडून एकच वाक्य येते. मोदीजी शाहजी ने गरीबाचे जगने हराम केले.प्रधानसेवक मोदी नेहमी सांगत होते भ्रष्टाचार, काळाधन,नकली नोटा आणि आतंकवाद एकमेकांत जुळले आहेत.ते देशाला अनेक संकटात टाकतात. त्यामुळे हा तातडीने नोटा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.परंतु मोदी सरकार याचारी संकटावर कशी केली यांची अधिकृत माहिती देत नाही. भ्रष्टाचार आणि काळाधन वाले खुले आम देशात परदेशात फिरतात.त्यांना हात लावण्याची हिंमत मोदी शहाचे सरकार करीत नाही. आर एस एस प्रणित भाजपा कट्टर हिंदुत्ववादी पार्टी आहे.आणि हिंदुत्वाच्या संस्कारात वचन हे खूप महत्वाचे संस्कार आहे. हे मोदी शहाचे सरकार विसरू शकते पण जनता विसरणार नाही. योग्य वेळी ते आपली जबाबदारी पार पाडतील.
भ्रष्टाचार आणि काळाधन वाल्यावर प्रभावी कारवाई करण्यास 56 इंच छातीवाले मोदी शहाचे सरकार गांडू ठरले,आणि गोरगरीब जनतेला जीवन जगण्यासाठी दैनंदिन गरजा भागविण्या करीता लागणाऱ्या पैसा वर बंदी घालण्याची अधर्म नीती वापरली.इथे महाभारतातील एका प्रसंगाची प्रकर्षाने आठवण येते.अर्जुन आणि कर्ण रणांगणावर समोरा समोर लढत असतांना कर्णाच्या रथाचे चाक एका खड्डयात रुतते तेव्हा कर्ण आपलें धनुष्यबाण गाडीव खाली ठेऊन रथाचे चाक काढण्यासाठी जोर लावतो तेव्हा श्रीकृष्ण अर्जुना ही संधी कधीच मिळणार नाही उचल बाण लाव गाडीव तेव्हा अर्जुन बोलतो निहत्यार शुरविरावर वार करणे शुरविराला शोभणारे नाही.कृष्ण म्हणतो अर्जुन कर्णाला तू कोणत्याही युद्धात हारऊ शकत नाही.हे लक्षात ठेव.आणि अर्जुन डोळे बंद करून वंदन करतो आणि कर्णावर बाणाचा वर्षाव करतो.
नरेंद्र मोदी कधीच गुजरात सोडून दिल्लीत पोचु शकले नसते.त्यांनी गुजरात मघ्ये जे हत्याकांड घडविले त्यामुळे ते जगभर प्रसिद्ध झाले.त्यालाच रामायण,महाभारत आदर्श असणाऱ्या मनुवादी हिंदुत्ववादी आर एस एस ने मोदीला भाजपाचे नेतृत्व बहाल केले.आणि मोदींने धर्म अधर्माचे कुशल कौशल्य दाखवुन सर्व भांडवलदारांना जवळ केले त्यांनी सर्व प्रिंट चॅनल मीडिया खरेदी केला आणि संपूर्ण देश बदलला. त्याचे फळ आज सर्वसामान्य जनता तोंड बंद करून पोट भर खाते.
देशातील बहुसंख्य जनता छोटी छोटी टॅक्स चोरी करते. भाजीपाला,अन्नधान्य जकात किंवा वजन काट्यावर चार पैसे वाचविते पण मोठे घोटाळे करीत नाही.मोठे घोटाळे तर सरकारच्या मदती शिवाय होऊच शकत नाही.काही उधोगपती सरकारी बँका कडून करोडो रुपये घेतात कसे ?.  सरळ सरळ बैलेंसशीट मध्ये आकडे मोड करून गडबड करूनच नां ?. 15 लाख करोड रुपया पेक्षा कर्ज मोठ्या उधोगपतीनी घेतले.केंद्र सरकारने ते उद्धार मनाने माफ केले.आणि रिजर्व बँक च्या आकड्या नुसार गेल्या 44 वर्षात एक्‍सपोर्ट व इनवाइसिंगच्या माध्यमाने देशात मोठे घोटाळे झाले.ते एकूण जीडीपी एक चौथाई असु शकते. मोदी सरकार मोठ्या उधोगपती समूहाच्या फारेंसिक आणि सीएजी ऑडिट करण्या ऐवजी जनतेला गुन्हेगार ठरवुन शिक्षा देत आहे.
सुप्रीम कोर्टच्या आदेशा नंतर काळेधन विरोधात ही एसआईटी ची समिती,संस्था सरकार ने गठीत केली. काळेधन कोणा कडे जास्त असेल यांची यादी
एसआईटी ने बनविली त्यात रियल इस्टेट,सोन्याचे व्यापारी,बोगस एक्सपोर्ट्स आणि ड्रग्स माफिया यांच्यावर लक्षकेंद्रीत पाहिजे होते.पण त्यांना राजकीय पक्षातील मोठ्या धेंड्यांचे आशीर्वाद आणि सहभाग असल्यामुळे सरकार त्याकडे काना डोळा करते.आणि प्रशासकीय अधिकाऱ्यास करण्यास सांगते.ही सत्य परिस्थिती कोणीच नाकारू शकत नाही. 
पाचशे ,हजारच्या नोटा बंद करून 2000 रुपयाचा मोठा नोट का काढला?.जिथे पाचशे हजारचे छुटे कोणीच भाजीपाला, किराणा दुकानदार,हॉटेल वाले,रिक्षा, टॅक्सी वाले देत नाही.मग ते दोनहजार रुपयाची नोट कसे घेतील?.म्हणजे दोन हजारांची नोट घरात शोकेस मध्ये ठेऊन पोटा पाण्याची व्यवस्था कशी करणार?.हा बहुसंख्य जनतेला पडलेला प्रश्न होता.त्यांचे उत्तर कोणी दिले नाही. म्हणजेच काळेधन वाले आज भी चैन मजेत जगणार आणि गोरगरीब जनते त्यांची शिक्षा भोगणार.म्हणुन मोदी शहाच्या सरकारच्या नोट बंदीचा निर्णयाने गरीबाचे जगने हराम केले होते आणि आजही आहे.
आर एस एस प्रणित भाजपा सरकारची नितीच देशव्यापी दंगल निर्माण व्हावी अशी आहे. त्यासाठी ते वेगवेगळे फंडे वापरते.आर एस एस प्रणित मोदी सरकारचे स्वप्न साध्य तरी धुळीस मिळविले आहे.पांचशे, हजारांची नोट बंदी मोठे उधोगपती, व्यापारी, बिल्डर्स यांच्या कडील काळ्याधना करीत होती. पण त्यांना योग्य संधी देऊन.गरिबांचे जगणे मुस्कील केले आहे.तरी तो त्या संकटाला समर्थपण संघर्ष करून तोंड देत आहे.मोदी सरकारला अपेक्षित असलेली दंगल,जाळपोळ,करीत नाही.म्हणुन बहुसंख्य गरीब असंघटीत मजदूर कामगारांचे मोठे नुकसान होऊन देखील तो शांतपणे विचार करून जगतो आहे.मोदी शहाच्या सरकारने जनतेचे जगणे हराम केले तरी सुध्दा तो शांत राहिला.हीच भारतीय संविधानाची मोठी ताकद आहे.म्हणुन त्यांचे सर्व श्रेय ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. सी ए ए,एन आर सी हया देशासाठी घातक आहेत.आणि संविधानाच्या विरोधी आहेत.संविधानाच्या चौकटीत असे निर्णय घेतले जाऊच शकत नाही. पण लोकसभा, राज्यसभेतील बहुमताच्या जोरावर मनुस्मृती लाधण्याचा हा स्पष्टपणे निर्णय घेण्यात आला आहे. अनेक सुप्रसिद्ध घटनातज्ञांचे विचारवंतांचे नोबेल पुरस्कार विजेत्यांचे जगातील विविध देशातील तज्ञांच्या मताचा हवाला देऊन विदेशी मीडिया जगा समोर सत्य परिस्थिती मांडत असतांना ही अमित शहा,नरेंद्र मोदी आर एस एस प्रणित मनुवादी मानसिकता सोडायला तयार नाहीत.
मोदी शहाची बुद्धिमत्ता संविधान निर्मितीसाठी ज्यांनी ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्या पेक्षा मोठी नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर, डॉ राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, देशासाठी बलिदान देणारे भगत सिंग, सुभाषचंद्र बोस, यासारख्या सर्व महान स्वातंत्र्य सेनानीच्या जवळपास पोहचण्याचा लायकीचे अमित शहा, नरेंद्र मोदी नाहीत तरी त्यांनी भारतीयांना सुखाने जगणे मुश्किल केले आहे. 
मोदी, शाहा आणि त्यांच्या कागदपत्रांवर सही करणाऱ्या राष्ट्रपती यांचीच NRC म्हणजे National Register of Citizens नुसार भारताचे नागरिक आहेत काय हे तपासणे अति आवश्यकता आहे. तेच या कायद्यानुसार भारतीय नागरिक नसतील तर त्यांना भारतीयांचा मानसिक छळ करण्याचा काय अधिकारआहे?. या कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी कोण आहेत?. त्यांचे या रजिस्टर मध्ये देशाचे नागरिक म्हणून नोंद आहे काय?. NRC लिस्ट मधे ज्यांचे नाव नाही तेच भारताच्या नागरिकांचे जगणे हराम करीत नाही काय?.मोदीजी शाह जी ने गरीबाचे जगने हराम केले.असे म्हणावे लागत आहे.
सागर रामभाऊ तायडे,भांडूप, मुंबई 9920403859
https://mail.google.com/mail/u/0?ui=2&ik=8359f7bccc&attid=0.1&permmsgid=msg-a:r4454396254794537845&th=16f415b576cc1421&view=att&disp=safe&realattid=16f413f6276fb54d7801

गुरुवार, १२ डिसेंबर, २०१९

पहिली कामगार कर्मचारी अधिकारी महिला परिषद

पहिली कामगार कर्मचारी अधिकारी महिला परिषद
जगात आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. परिवहन मंत्रालयाने सर्व ऑटो रिक्षा वर लिहण्यास सांगितले ते आपण वाचतो "मुलगी शिकली प्रगती झाली" पण मुलींना,महिलांना प्रथम शिक्षण देणाऱ्या महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना महिला विसरतात. 19 व्या शतकात या दोघांनी कोणत्याही विरोधाला न जुमानता संघर्ष करून केलेलं कार्य म्हणजे आजची सर्व क्षेत्रात समान संधीचा उपभोग घेणारी महिला आहे.आज महिला मान सन्मान मिळवत आहेत.त्यांची पायाभरणी फुले दांपत्यानेच केली हे कोणीच नाकारू शकत नाही.मनुवादी मानसिकता असणाऱ्या महिलांनी किती ही सरस्वती, शारदा,लक्ष्मी,कोणत्याही देवीचे पात्र उभे केले तरी त्यांचा जन्म. कुठे?.कधी?,कोणत्या जिल्ह्यात राज्यात झाला. त्याच्या आईवडीलांचे नांव, पती,मुलामुलींचे नांव ?. शिक्षण कुठे?. कधी?. किती?. झाले हे सांगता येत नाही. त्यांची कितीही उपासना केली तरी त्या महिलांवर होणारे अत्याचार अन्याय,लैंगिक शोषण थांबविण्यास त्या असमर्थ आहेत. हे शंभर टक्के सत्य माहिती असुनही उच्च शिक्षित कामगार,कर्मचारी आणि अधिकारी महिला अंधश्रद्धा अज्ञान रीतीरिवाज सोडायला तयार नाहीत.असा सुशिक्षित कामगार,कर्मचारी अधिकारी महिलांची राज्यातील नव्हे तर देशातील पहिली महिला परिषद 23 नोव्हेंबर ला नागपुर येथे स्वतंत्र मजदूर युनियनच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
महिलांना आज जे काही मिळत आहे ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे भारतीय राज्य घटनेत त्यांनी लिहून मजूर करून घेतले त्यांची तुलना होऊच शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितले कोणत्याही समाजाची प्रगती ही त्या समाजाच्या महिलांच्या प्रगती वरून मोजली पाहिजे. महिलांना प्रथम घरात मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी पुरुषांशी संघर्ष करावा लागतो. तेव्हा मुलगी शिकते,संघर्ष करते,पण संघटित होत नाही. हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी २० जुलै १९४२ साली नागपुरात महिला परिषदेत सांगितले होते. त्यावेळी २२ हजार असंघटित महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सुशिक्षित व्हावे तरच त्या कुटुंबातील सर्वांना सुशिक्षित करतील.जिच्या हाती पाळण्याची दोरी ते केवळ बाळाचा उद्धार नाही तर जगाचा उद्धार करेल असे म्हटल्या जाते.महिलांचा पेहराव कपडे परिधान करण्याच्या पध्दती किती झपाट्याने बदलल्या तरी नोकरी करणाऱ्या महिला नवरात्रात कोणाचे अनुकरण करतात.त्या कोणते शिक्षण घेऊन कोणत्या जगात वावरतात?. शिक्षण वाघिणीचे दूध आहे.असे म्हणतात वाघीणीवर बसलेली देवी कोणत्या राज्यातील होती?. वाघ,सिंह आजही हिंस प्राणी म्हणून ओळखल्या जातात मग तेव्हा ते पाळीव प्राणी होते काय?.असा प्रश्न नोकरी करणाऱ्या सुशिक्षित महिलांना का पडत नाही. कारण ज्या मानसिक विचारधारेच्या कामगार,कर्मचारी अधिकारी वर्गाच्या संघटना, युनियन सोबत त्या जोडल्या गेल्या आहेत त्या यांना मानसिक गुलाम बनविणाऱ्या संस्काराचे रितीरिवाजाचे खुलेआम समर्थन करण्यास भाग पडतात. त्यांचा परिणाम आज सर्वत्र दिसत आहे.महिलांना समान काम समान वेतन मिळत नाही. लाखो अंगणवाडी सेविका, आशा वर्क्स मानधनावर काम करतात. त्यांचे नेतृत्व करणाऱ्या ट्रेंड युनियनच्या नेत्यांना मानधन व वेतन या शब्दांचा अर्थ समजत नाही?. लाखो अंगणवाडी सेविका मध्ये कोणीच भारतीय संविधान, कायदेविषयक अभ्यासक नाही.महिलांना अनेक सोयी सवलती डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी व्हाईसरॉय मंत्रिमंडळात मजुरमंत्री असतांना मंजूर करून दिल्या होत्या.अमेरिका सारख्या देशात महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यासाठी त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. भारतातील महिलांना कोणत्याही प्रकारचा संघर्ष न करता मतदानाचा हक्क आणि अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून मिळवून दिला. त्यांची जाणीव महिला कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गाला नाही.ते करून देण्याचे काम मान जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन करीत आहे.
संघटित असंघटित क्षेत्रातील कामगार,कर्मचारी व अधिकारी महिलांना नेतृत्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होत आहे. भारताची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १२५ कोटी आहे.त्यात ६२ कोटी महिलांची संख्या आहे.तर साक्षरतेचे प्रमाण ७४.०४ टक्के आहे.त्यात पुरुषांचे ८०.९ टक्के तर महिलांचे प्रमाण ६४.४ टक्के आहे.ग्रामीण भागातील शिक्षण हे फक्त कागदावर आहे.जिल्हापरिषद, पंचायत समितीच्या शाळेतील मुलामुलींना आणि  महानगरपालिका शाळेतील मुलामुलींना 
भारतीय महिलांची सामाजिक, शैक्षणिक प्रगतीची तपासणी करतांना मागासवर्गीय, आदिवासी व अल्पसंख्याक महिला कोणत्या सामाजिक स्तरातील आहेत.यांची आकडेवारी जाहीर करण्याचे जाणीवपूर्वक टाळले जाते.प्रस्थापित कामगार चळवळीनी महिला कामगार शक्तीचा स्वतःच्या राजकीय उधिष्टपूर्ती साठी गैरवापर केल्याचे दिसुन येते. मागासवर्गीय, आदिवासी अल्पसंख्याक समाजातील कष्टकरी कामगार,शोषित,पिडीत महिलांच्या स्वातंत्र्य, समता व न्याय मिळवून देणारी क्रांतिकारी विचारधारा ही फुले,शाहू आंबेडकरी विचारांची असु शकते. आणि हाच मुलभूत पाया मजबूत करण्यासाठी फुले,शाहु आंबेडकरी विचारांची देशातील एकमेव कामगार संघटना "स्वतंत्र मजदूर युनियन" २००३ साली स्थापन करण्यात आली आहे.
फुले,शाहू आंबेडकरी विचाराच्या परिवर्तनशील लढ्यात महिलांचा मोठा सहभाग होता तसाच सहभाग कामगार चळवळीच्या परिवर्तनशील लढ्यात स्थापित करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन आता सिद्ध झाली आहे. विशेष सुशिक्षित महिला कामगार,कर्मचारी व अधिकारी यांची जबाबदारी हे असंघटित क्षेत्रातील महिलांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या विकास व कल्याणासाठी कसे वाढविता येईल यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन आज देशभरात प्रयत्नशील आहे. 
आणि एका सामाजिक, शैक्षणिक व राजकीय परिवर्तनासाठी सज्ज व्हावे.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.
भांडुप मुंबई,

संविधान मानणारे जागृत आहेत काय ?
डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा होत आहे.फुले,शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आणि जाणणारे लोक,  समाज मोठा उत्सव साजरा करणारे आहेत. काही संस्था संघटना एकत्र येऊन भव्य गौरव यात्रा,रैली काढत असतात.
२५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला एक प्रश्न विचारला होता.मुठभर लोकांकडे अमाफ धन संपती आहे,तर असंख्य जनता दारिद्याच्या खोल खाईत जगत आहेत.२६ नोव्हेंबर १९५० ला आपण एका नव्या जीवनात प्रवेश करीत आहोत.आज २०१९ ला संविधान ७० वर्षाचे झाले पण विषमता कमी होण्या ऐवजी अमाफ वाढली.ती पण लोकशाहीच्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने त्याला संपुर्ण देश लबाडी,फसवणूक झाल्याचे मान्य करते. आणि न्यायलयात सुध्दा हेच लबाडी,फसवणूक!.देशाचा राष्ट्रपती व  राज्याचे राज्यपाल मनुस्मुर्ती नुसार वागत आहेत.राष्ट्रपती पंतप्रधानाच्या व राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या पाया पडतो. कोणत्या नियमानुसार?. मनुस्मुर्ती कि संविधान ?. राष्ट्रपती व 
राज्यपालांनी संविधानातील कलमांचे कदाचित थेट उल्लंघन केले नसेल, पण त्यांनी डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत संविधानिक नीतिमत्तेचा ( Constitutional Morality ) खून केला मात्र हे नक्की. महाराष्ट्र राज्यात रात्री राष्ट्रपती राजवट मागे घेतली.अंधारात जमवजमव केली नि जवळपास अंधारात सरकारला शपथ दिली.
ज्याची महाराष्ट्राच्या जनतेला जराही कल्पना नव्हती . हे सगळं राज्यपालांनी केले. हा सरळ सरळ संविधानिक नीतिमत्तेचा खून राज्यपालांनी केला.ज्या संविधानाचे गोडवे आम्ही गातो त्याची दररोज एक एक पान नष्ट करण्याचे काम आर एस एस प्रणित केंद्र व राज्ये सरकारे करीत आहेत. आणि संविधान मानणारे त्यावर टीका टिपणी करीत आहेत.त्यामुळे संविधान मानणारे खरेचं जागृत आहेत काय हा प्रश्न निर्माण होतो. संविधान न मानणाऱ्यानी साम,दम,भेद,नीती वापरून निवडणुका जिंकल्या.ज्या बहुजनाची संख्या ८५ टक्के आहे. ते मात्र कुठेच संविधानानुसार वागत नाही.त्यातील व्यक्तिगत मतभेद,स्वार्थ कमी होतांना दिसत नाही. सर्व शिक्षण, जुगाड जमावण्याची कला,तडजोड करण्याचे विशेष कला, कौशल्य असतांना बहुजन समाजातील लोक स्वतःला वंचित समजतात.म्हणजेच ८५ टक्के माणसांचा सांगाडा व संविधानाचा सांगाडा दिसत आहे.म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात 
 " माझ्या मतानुसार लोकशाही यशस्वी होण्यासाठी 'संविधानिक नीतितत्त्वां' चे पालन करणे हि चौथी शर्थ आहे. आपल्या संविधानात ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्या संविधानाचा एक सांगाडा मात्र आहेत हे आपण विसरूनच जातो. संविधानिक नीतीतत्वांमुळेच संविधानाला जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. हाच लोकशाहीचा गाभा आहे..." डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे भाषण - " संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठीच्या आवश्यक शर्ती " २२ डिसेंबर १९५२ , पुणे जिल्हा न्यायालय,पुणे.

सकल मराठा क्रांती मोर्चा, एक मराठा लाख मराठा.कोपर्डी बलात्कार करणाऱ्यांना जाहीर फाशी द्या!. याघटनेला राष्ट्रीय मुद्धा बनवुन मराठा समाज आरक्षण मांगणी साठी लाखो लोकांचा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून मुकसंघ शक्ती दाखवीत 
होते.
.त्यांचा परिणाम राज्य व केंद्र सरकारवर काडीचा ही झाला नाही.
असे आम्ही समजत होतो.
पण इतर सर्व समाजा समोर आव्हान निर्माण झाले. सर्व समाजातील सुशिक्षित,अशिक्षित अज्ञानी,अडाणी लोकां समोर मात्र हे का होऊ शकत नाही.हा मोठा प्रश्न पडला आहे.यामागे कोणती प्रचंड शक्ती आहे की जे लाखो करोडो लोकांनी मोर्चे काढल्यावर न घाबरता, दखल पण घेत नाही.तर ते आहे या देशाचे "संविधान" !. ज्यांना संविधान मान्य नाही ते ही मोर्चे काढतात.ज्यांना संविधान माहित आहे.ते पण मोर्चे काढत आहेत.तेच संविधान किती वर्षाचे झाले हे माहित नाही.ज्यांनी कधीच संविधान वाचले त्यानुसार कधी आचरण केले नाही.ते लोक ही संविधान समर्थन मोर्चे काढत आहेत.काही हुकूमशहा संविधाना नुसार पाचशे,हजारच्या नोट बंद करण्याचे धाडस देशात प्रथमच केल्याचे सांगत आहेत.त्यांना ही संविधान किती वर्षाचे झाले हेच त्यांना माहित नाही.असे म्हणल्यास चूक ठरणार नाही.असो.
एखादया घरात बाळाचा जन्म झाला.कि सर्वांनाच खूप आनंद होतो मग दररोज त्याचे गोडगोड कौतुक होते, घरातील मोठी माणस त्याला आईबाबा,काका, मामा,आबा आजी,नानानानी असे शिकवितात.मग ते बाळ दिवसा दिवसाने मोठे होते आणि शिकते.त्यावर आपल्या धर्माचे संस्कार होतात.शाळेत गेल्यावर त्याला भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत,सर्वांशी मी बंधुभावाने वागेल असे शिकविले जाते.शाळेतूनबाहेर पडल्यावर त्याला देशातील जाती धर्म त्याचे रिती रिवाज याचे ही शिक्षण आपोआप मिळते.तोच मग भारताचा जबाबदार नागरिक होतो.हाच इतिहास भारतीय संविधान बनविताना बाबासाहेबानी डोळ्या समोर ठेवला होता.संविधान लिहताना त्यांनी अनुभवलेले सर्व दररोजचे अपमानास्पद,तिरस्काराचे जीवन पाहले होते.म्हणुन त्यांनी पिण्याचे पाणी,चूल पेटविण्यासाठी लागणारे सरपण,शिक्षण घेताना वर्गातील वागणूक याचा सर्व सविस्तर आढावा भारतीय संविधानात लिहून बाबासाहेबानी भारतीय नागरिकांना दिला आहे.घटनाकारांनी संविधानात कोणत्याही जातीला, धर्माला, प्रांताला,प्राधान्य दिले नाही. कोणाचाही राग मनात ठेऊन संविधानात येऊ दिला नाही. पण दुर्दव्य भारतीय नागरिकाचे त्यांनी सत्तर वर्षात हे संविधान वाचले नाही.भारतीय नागरिकांनी सोडा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी तरी वाचले असेल असे वाटत नाही.जर वाचले असते तर आज तो समाज जेवढा विभागला गेला आहे तेवढा विभागला गेला नसता.२६ नोव्हेंबर १९४९ जन्मलेले ते संविधान बाळ आज सत्तर वर्षाचे झाले.त्याची सर्व ठिकाणी योग्य तो मानसन्मान देऊन त्याची पूजा अर्चा झाली पाहिजे म्हणून राज्यांना केंद्र सरकारला आदेश काढावा लागला. त्याचा किती परिणाम भारतीय नागरिकावर होतो.लाखो करोडो लोकांचे मोर्चे पाहिल्यावर जाणवते.
भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० साली अंमलात आलेले असली तरी भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापने विषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढयातील नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षते खाली पुणे येथे पार पडली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी स्वरुपात काम केले होते.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान समितीची स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस " भारतीय संविधान दिन" म्हणून फक्त कागदावर साजरा केला जातो.संविधान दिनाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि भारतीय संविधान ठेवून त्यांची शाळा कॉलेज,शासकीय,प्रशासकीय कार्यालयात गेल्या ५८ वर्ष म्हणजे २००८ प्रर्यंत साजरा केला जात नव्हता.२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन,२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,१५ आगष्ट स्वतंत्र दिन हे फक्त सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा घालण्यासाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस असी ८५ टक्के भारतीयांच्या मनावर बिबवण्याचे काम वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारी अलिखित यंत्रणा काम करते हा धोका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच ओळखला होता. म्हणूनच बाबासाहेबांनी संविधान सभेतील शेवटचे भाषणात ठामपणे सांगितले होते.भारत हा विषमतावादी मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या लोकांचा देश होता.तो सहजासहजी भारतीय संविधान स्वीकारणारा नाही.माझ्या मते,संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्या शिवाय राहणार नाहीत. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग , जसे की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणासाठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे.राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर ते राज्यघटना,संविधानाची अंमलबजावणी होऊ देणार नाहीत.
भारतात केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल, तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे. याच अर्थ हा की, क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे.याचा अर्थ कायदेभंग, असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.असे आत्मविश्वासाने बाबासाहेबनी शेवटच्या भाषणात सांगितले होते.
बाबासाहेब पुढे असे सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये.
 आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणी साठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहीं जवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. 
२६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.हे बाबासाहेबांचे शब्द आज देशात जासेचे तसेच अंमलात येताना दिसत आहेत.म्हणूनच देशातील जनतेेेने पाचशे,हजारच्या नोटा बंदीची
शिक्षा भोगली आहे.ज्यांनां लोकशाहीने लोकांच्या मतदानाने लोकांसाठी लोकउपयोगी निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले.ते लोकप्रतिनिधी भांडवलदाराच्या रक्षणा करीता गोरगरीबाचा बळी देत आहे.म्हणजे लोकशाही ने दिलेल्या संविधाना नुसार नाही.तर हुकूमशाही च्या मार्गाने चाललेला मार्गक्रम आहे.
देशात म्हणजे आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय? जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल.ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करु इच्छितो, ती घटना अशी- “काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला. ”ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल.
 हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल? . सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वा शिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे, कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्या शिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. 
काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बले ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.हे बाबासाहेबांनी संविधान सभेत शेवटचे भाषण आहे. सविधान दिनाचा हा २६ नोव्हेंबर १९४९ ते २६ नोव्हेंबर २०१९ ला ७० वर्षाचा प्रवास भारतीय नागरिकांनी न वाचताच पार केला.त्यामुळेच आज देशात अदुष्य युद्धाची परिस्थिती दिसत आहे.त्याला ८५ टक्के बहुजन समाज विशेष आंबेडकर विचाराला मानणारा समाज मोठ्या प्रमाणात दोषी आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही,बाबासाहेबांनी जे जे सावधानतेचे इशारे दिले होते त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करणारा समाज बाबासाहेबाचा कसा काय असू शकतो ?.लाख मराठा,बहुजन पर्व,संविधान समर्थन,इतर बऱ्याच समाजाला माहित तरी आहे काय?. संविधान लिहण्याला किती वर्ष झाले?. ७० वर्षात त्यांची किती अमंलबजावणी झाली?.म्हणुन भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचलेच पाहिजे.तरच तो गर्वाने सांगेल मी एक भारतीय आहे. नरेंद्र मोदी व देवेन्द्र फडणवीस केंद्रात व राज्यात जो खेळ खेळत आहेत.ते कोणाच्या हिताचे आहे.संविधान समर्थक कोण व विरोधक कोण?. विचार भारतीय नागरिकांना करायचा आहे.
(संदर्भ:डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
आपला- सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई -९९२०४०३८५९ 
कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे.
भारतात नव्हे तर जगात असा स्मृतीं दिन कोणाचा साजरा होत नसेल. त्यांची गिनिज बुकात नोंद झाली पाहिजे चैत्यभूमी आणि शिवाजी पार्क परिसरात फिरत असताना लोकांकडे पाहून एक प्रश्न सारखा सतावत असतो?.कोण ही माणसं कशाची पर्वा न करता का ही माणसे येतात?
भव्य मंडपात राहायला मिळते, झोपायला जागा मिळते. स्वयंसेवी संस्था,संघटना जागोजागी मोफत भोजनदान करतात.त्यामुळे खायला भरपूर मिळते. म्हणून चैत्यभूमीची ओढ का आहे? तर बिलकुल नाही.एकच जिद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती स्मारकाला चैत्यभूमीला माथा टेकवून वंदन करणे,अभिवादन करने.
लहान बालकं, तरुण मुले-मुली,वयोवृद्ध बाई माणसं जिवाची पर्वा न करता खेड्या पड्यातून झुंडीच्या झुंडीने येतात.शहरातील सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी जात लपवून राहणारे चैत्यभूमी दादरला  येतांना शंभर अडचणी सांगतात.त्यातील बहुसंख्य लोक पांच डिसेंबर रात्रीच सफेद वस्त्र परिधान अभिवादन करण्यासाठी येतात.म्हणजे दिवसा कोणी ओळखीवाला भेटू नये.त्याच बरोबर सहा डिसेंबरला कामावर हजर राहून आम्ही त्यातले नाही हे दाखविण्याचा खोटा अहंकार,पण कागदावर जात लपविता येत नाही.जातीच्या सवलती घेण्यासाठी सर्वात पुढे आणि वैचारिक निष्ठा नाही म्हणूनच मी म्हणतो माझा असंघटित शेतमजूर, कामगार कर्तृत्ववान नसला तरी निष्ठावंत आहे. मग शिक्षण घेतांना नोकरीवर लागताना सवलत घेणारा कर्तृत्ववान नसला तरी चालले पण निष्ठावंत पाहिजे.खेड्या पाड्यातील हा असंघटित शेतमजूर शिवाजी पार्कला आजूबाजूच्या रस्त्यावर झोपायला जागा नसली तरीही अस्तव्यस्त पडलेला असो.अंथरुण नाही अन पांघरुणही नाही.कडाक्याची थंडी शौचालयाची अपुरी व्यवस्था.
रात्रभर जागून भिमगिते गाणारे.पुस्तके,फोटो,मुर्त्या,कॅलेंडर यांचे स्टॉल पाहणी करून खरेदी,विक्री करणारे सर्वच असंघटित आहेत.
देशभरातुन आलेला निष्ठावंत भिमसैनिक,अनुयायी कोणाच्या सांगण्यावरून दादर चैत्यभूमीला येत नाही.इथे आल्यावर तो प्रथम बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमे समोर नतमस्तक होतो,समुद्राच्या वाळूत बनविलेल्या शिल्पा समोर हारफुल मेणबत्ती, अगरबत्ती अर्पण करून त्रिवार वंदन करून वंदना म्हणतो.नंतर तो त्यांच्या आवडी नुसार सामाजिक,शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय नेतेच्या सभामंडपा समोर हजेरी लावतो.कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे तसे नेते सुध्दा आहेत.
असंघटित कष्टकरी शेतमजूर, इमारत बांधकाम कामगार,नाका कामगार,घरकामगार,कचरा वेचक,फेरीवाला यांच्या न्याय हक्का साठी लढणारे अनेक कार्यकर्ते आहेत. तेच या लोकांच्या संकट समयी उपयोगी पडतात.तेच कार्यकर्ते कोणत्यानां कोणत्या नेत्यांचे निष्ठावंत असतात.मग हेच कार्यकर्ते या असंघटित शेतमजूरांना कामगारांना यांच्या दावणीला बांधतात.म्हणूनच सहा डिसेंबरला चैत्यभूमी दादरला येणार हा असंघटित शेतमजूर कामगार दरवर्षी कमी होण्या ऐवजी तीन पटीने वाढत आहे.त्याला आज पर्यत अनेकांनी फसविले आहे.पण बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे त्याला न्याय हक्क मांगण्याचा अधिकार आहे हे जो जाणतो तो अन्याय,अत्याचार सहन करून पुन्हा पुन्हा संघर्षाची लढाई लढण्यासाठी सज्ज होतो.
गुजरात,राजस्थान आणि बिहारच्या मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी खूप मार खाल्ला त्यांच्या समर्थनात देशभरातील मागासवर्गीय विशेष आंबेडकरी चळवळीतील लोक उभे राहिले,त्यामुळेच कधीच मुंबईतील चैत्यभूमी न पाहिलेले गुजरात,राजस्थान,आंध्रप्रदेश,कर्नाटक,छत्तीसगड, उत्तरप्रदेश आणि बिहारच्या मागासवर्गीय समाजाची संख्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा राष्ट्रीय स्मारक चैत्यभूमी पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वाढत आहे.आता पर्यत त्यांनी देवाच्या देवीच्या जत्रा पाहिल्या होत्या जेव्हा दादरच्या शिवाजी पार्कची बुक स्टोल,भोजनदान करणारे विविध बँका,रेल्वे,माझगाव डॉक, कामगार कर्मचारी युनियन चे मंडप पाहिले तेव्हा खूप प्रमाणात प्रभावीत झाला.आणि आजूबाजूच्या परिसरातील फुले शाहू,आंबेडकर विचारांचे विविध साहित्य,मुर्त्या फोटो,पेन दिनदर्शिका टी शर्ट,टोप्या त्या खरेदी करताना बहुसंख्येने असंघटित कष्टकरी माणसं हे नवीन माणसासाठी खूप प्रेरणादायी ठरते.ही प्रेरणा घेऊन तो आपल्या गावी जातो तेव्हा त्याने जे पाहिले त्यांच्या पेक्षा जास्त सांगतो.म्हणूनच महाराष्ट्राच्या खेड्या पाड्यातील असंघटित माणसा पेक्षा इतर राज्यातील असंघटित मागासवर्गीय समाज मोठया संख्येने उपस्थित होऊन तीन दिवस भारावून जातो.तेव्हाच तो ठरवितो मी या पुढे दरवर्षी चैत्यभूमी दादरला माझा समाज बांधवांना जास्तीतजास्त संख्येने घेऊन येईल आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक दाखवेल.म्हणूनच माणसं कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे.
शिवाजी पार्क दादरला केवळ आंबेडकरी चळवळीतील माणूसच येतो असे म्हणणे चूक ठरेल.या लोकांची गर्दी पाहण्यासाठी त्यातील ऊर्जा शक्ती पाहण्यासाठी अनेक दिग्गज पत्रकार,साहित्यिक,विचारवंत येतात.अनेक पुस्तक स्टोल्सनां भेटी देतात,पुस्तके, ग्रंथ खरेदी करतात.आणि म्हणतात खरच या गोरगरीब कष्टकरी लोकांची खूप निष्ठ आहे बाबासाहेब आंबेडकर यांच्या वर.काय मिळतं म्हणून येत नाही, तर आयुष्यात जे जे मिळालं ते ज्या महामानवामुळे मिळालं त्याला अभिवादन करण्यासाठी 
 किती ही त्रास झाला तरी आम्ही अभिवादन करण्यासाठी येणारच!.असे पुण्यकर्म करणारा माणूस देशात नव्हे जगात झाला नाही. स्वाभिमानी माणसं निर्माण करणारा युगपुरुष जगात दुसरा कुणी झाला नाही अन होणारही नाही.करोडों गोरगरीब जनतेच्या मनात बसलेला जगातील सर्वात श्रीमंत महामानव आपला बाप आजही आपली श्रीमंती टिकवून आहे.त्यांच्या नंतर किती स्वयंघोषित हिंदू हृदय सम्राट आले त्यांच्या स्मृती दिनाला माणसं फक्त राजकीय फायदा घेण्यासाठी फोटो घेण्यासाठी येतात आणि जातात. अनेकांनी सांगितले व लिहले होते की चैत्यभूमीवर गर्दीचा उंचाक मोडून काढणार.एकच नेता देशातील तमाम हिंदूंच्या मनावर अधिराज्य गाजवितो,पण काय झाले?. पहिल्याच वर्षी हजारो, दुसऱ्या वर्षी शेकडो लोकांनी स्मृतिदिन आठवणीत ठेऊन साजरा केला, तिसऱ्या वर्षी राज्यात देशात मनुस्मृती नुसार वागणाऱ्या हिंदुत्ववादी संघटनांचे पक्षाचे लोक सत्ताधारी असतांना ही फारसा बदल झालेला नाही.काय झाले असेल?. कर्तृत्ववान असलेल्या तमाम सहा हजार सहाशे जाती पोटजातीत विभागलेल्या ज्वलंत हिंदुत्ववादी लोकांनी निष्ठावंत सैनिक म्हणून निष्ठा का नाही दाखविली?.
हजारो गटात,संस्थेत संघटनेत आणि राजकिय पक्षात विभागलेला हा गोरगरीब कष्टकरी असंघटित समाज बाबा चे उपकारांची जाणीव ठेवून दरवर्षी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतो.बाबा तुमचे ऋण आम्ही फेडू शकत नाही. असे मान्य करून नतमस्तक होतो.६२ वर्षा नंतर ही सैनिकात,अनुयायात,भक्तात,शिष्यात,पत्रकारात, साहित्यिकात,विचारवंतात मोठी भर पडत चालली आहे. म्हणूनच मी दरवर्षी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करून या महामानवाच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने सहा डिसेंबर आणि आठ डिसेंबर नंतर लिहतो.या लक्षवेधी गर्दीवर,करोडो रुपयांच्या पुस्तक,मूर्ती,फोटो आणि प्रेरणादायी साहित्य निर्मितीसाठी पैसा टाकून तीन दिवसांत वसूल करणाऱ्या लोकांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. म्हणूनच आंबेडकरी चळवळीतील गोरगरीब कष्टकरी असंघटित समाज कोणत्याही क्षेत्रात पुढे गेला नसेल पण तो कोणत्याही क्षेत्रात मागे ही नाहीत.ते अपेक्षा पेक्षा कर्तृत्ववान व निष्ठावंत आहेत.फक्त त्यांचा कोणाचा कोणाला एकूण हिशोब नाही,ऑडिट रिपोर्ट नाही.
खरच या लोकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले भारतीय संविधान वाचले आणि त्यांची प्रामाणिक पणे अंमलबजावणी केली तर काय होईल?.मग कोणी म्हणेल कर्तृत्ववान नसले तरी चालतील पण निष्ठावंत पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,
सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
माणसांचे मन खुप विचित्र असते.ते कधीच समाधानी नसते. चांगल्या पगाराची उच्च पदस्थ नोकरी, कार्यालयात मान सन्मान नेहमीच आदेश देण्याची सवय मी दिलेला निर्णय सर्वांनी मान्य केलाच पाहिजे असे वागणे. अधिकारी असल्यामुळे सर्व कार्यालयीन कामगार कर्मचारी माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीत यांचा कायम गर्व असतो.त्यामुळेच माझे मन कार्यालयात प्रसन्न असते.त्यांचे समाधान घरी गेल्यावर संपते.कारण मी घरात प्रवेश केला की मी आदेश देणारा अधिकारी नसतो. कुटुंबातील एक सदस्य होतो. हा सकारात्मक विचार केल्यामुळेच आनंदीत असतो.तसेच प्रत्येक माणसाने कामगार,कर्मचारी अधिकारी यांनी सकारात्मक विचाराने मन प्रसन्न  ठेवले तर सर्वच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाल्या शिवाय राहणार नाही.
आज काल घरी प्रसन्न मनाने घरी जाणार कामगार,कर्मचारी ,अधिकारी जातांना दिसत नाही. लवकर घरी जाण्याची इच्छा मेलेली आहे.चांगला टू बी एच के प्लॉट आहे,टू व्हीलर, फोर व्हीलर गाडी आहे.आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. तरी घरी जाऊन बायको मुलामुलींच्या सहवासात राहण्याची व्यवस्था राहिली नाही. घरात कोणीच पाहिजे त्याप्रमाणात सुखी नाही. दुःख,वेदना,चिंता काही प्रमाणात मनात घर करून ठेवल्या आहेत. त्या दूर करण्यासाठी सकारात्मक विचारांचा स्वीकार केल्यास नव्यान्नव टक्के चिंता पळुन जातात.
शारीरिक वेदनांना विचारांपासुन तोडलं की चिंता पळुन जाते! मानसिकता वेदना देणाऱ्या घटना मनातुन काढून टाकल्या तर चिंता पाठलाग करत नाही. त्यासाठी भुतकाळात घुटमळणे बंद केले पाहिजे. माणसात,समाजात वावरताना कोणत्याही प्रकारच्या घटना डोक्यात येणार नाहीत. आणि रिकामे बसले तर आपल्या डोक्यात उगाच चक्र सुरु असते, ते एक नसते त्यांची मोठी लिंक लागते.मग त्यातुन बाहेर येणे अशक्य होते. दहा वर्षांपुर्वी मी चांगला अभ्यास केला असता, तर आज मी ही खुप मोठ्ठा ऑफीसर राहीलो असतो. चांगली बायको मिळाली असती तर सात वर्षांपुर्वी मी प्लॉट घेतला असता.आईवडीलांचे ऐकले असते तर तेव्हाच प्लॉट घ्यायला हवा होता, तेव्हा मी सुवर्णसंधी सोडली. त्यावेळी मी त्यांच्याशी आईवडीलांशी असे वागायला नको होते! खुप वाईट आहे मी!.
आज मी चांगल्या पगारावर काम करतो, पण मनाला समाधान नाही, तेव्हा कमी पगारात कुटुंबात सुखी समाधानी होतो.मी असे नव्हते करायला पाहीजे. व्हायच्या त्या घटना घडुन गेल्या, टाईममशीनमध्ये जाऊन ते काही बदलता येणार नाही, तेव्हा आता त्यावर विचार करुन फक्त आणि फक्त, आपली बहुमुल्य उर्जा, फालतुमध्ये खर्च करतो, त्यापेक्षा भुतकाळातल्या त्या सर्व चांगल्या वाईट घटना विसरुन गेले पाहिजे. त्यासाठी सकारात्मक ऊर्जा देणारे विचार करणे आवश्यक आहे.
इथे प्रत्येक जण दुःखी आहे.आणि बहुतेक दुःखांच मुळ हे तुलनेत असते.प्रत्येकाशी तुलना करीत राहिलो तर हया जगात प्रत्येक गोष्ट,घटना वेगवेगळी असते. त्यांची तुलना सकारात्मक विचाराने केली तर पुढच्या घटना घडनार  नाहीत.आणि नकारात्मक विचाराने विचार केला तर न घडणाऱ्या घटना घडविल्या जातील. घरात कार्यालयात किंवा एसटी, रेल्वे प्रवासात धक्का लागला, बसायला जागा उपलब्ध नाही.त्यामुळे होणारी चिडचिड घरातुन कार्यालया पर्यत कार्यालयातुन घरा पर्यत मनातील भावना वेदनेत रूपांतर होते.प्रत्येक वस्तू कडे पाहण्याचा दृष्टीकोन बदली होतो. जे जिथे घडले तिथेच सोडून आले तर निश्चितच आनंदी वातावरणात आपण राहू शकतो आणि दुसऱ्याला ठेऊ शकतो.प्रत्येक व्यक्तीचा चेहरा एक दुसर्‍यापासुन वेगळा आहे, म्हणुन ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती सर्वच बाबतीने वेगळा असु शकतो.

 आयुष्य कशासाठी आहे यांचे प्रत्येकांनी उत्तर शोधले पाहिजे. आयुष्य निसर्गाने आपल्याला दिलेली अनमोल भेट आहे, आयुष्य सतत आनंदी राहण्यासाठी आहे, आयुष्य उत्साहाने भरभरुन जगण्यासाठी आहे, आयुष्य भव्यदिव्य स्वप्नं बघण्यासाठी आणि ती स्वप्ने मनमुरादपणे जगण्यासाठी आहे, आयुष्य आपल्या आणि इतरांच्या चेहर्‍यावर हसु फुलवण्यासाठी आहे.जीवनाचा प्रत्येक क्षण निष्पापपणे बागडण्यासाठी आहे, मनातले सर्व अपराधी भाव, भुतकाळ-भविष्यकाळ, काल्पनिक जबाबदार्‍यांचे ओझे, सगळे सगळे फेकुन द्या, मनमोकळे व्हा, प्रत्येक क्षणाला, निरापराध वृत्तीने, निरागसपणे निःपक्षपातीपणे सामोरे जा!. कधी होईल हे सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवले तर.
माणसाला तीन गोष्टी जास्त त्रास देतात, प्रत्येक दुःखाच्या मुळाशी ह्या तीन गोष्टी सापडतील, अपेक्षा,अपुर्ण स्वप्ने, ध्येयप्राप्ती नंतर येणारा रिक्तपणा!
खुप वेळा आपण ऊसकी कमीज मेरे कमीजसे सफेद कैसी ! याच विचारात असतो.तो कसा सुखी आहे, ती कशी मस्त जगते, त्याच आयुष्य आरामशीर आहे, माझ्याकडे हे का नाही, या अपेक्षेने, तुलनेने दु:खी होत राहतो. तारक मेहता का उलटा चष्मा संपूर्ण कुटुंब एकत्र बसुन पाहत असते. पोपटलालचे पात्र किती गंमतीशीर आहे. समजा,एखाद्याचे लग्न होत नाही, तेव्हा तो किती परेशान असतो, उठता-बसताना, जेवताना, झोपताना एकच ध्यास असतो, लग्न-लग्न-लग्न! नकळत हाच विचार, चिंता बनुन, त्याच्या आत्म्याला डाचु लागतो, त्याच्या दुःखाचं कारण बनतं, मग हास्य गायब होतं, चित्त थार्‍यावर राहत नाही, चिडचिड वाढते. स्वप्नप्राप्तीकडे रोज वाटचाल करायची पण मनावर जखम न होवु देता!, ह्याला म्हणतात, सुखी जीवन! म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.

माणसाचा स्वभाव आहे जे मिळते त्यात तो समाधान मानत नाही.जे मिळत नाही त्यांची नेहमी अपेक्षा करत असतो. तेव्हा तो समाधानी नसतो पण जेव्हा मिळतो तेव्हा समाधानी असतो काय?. आणि समजा, एके दिवशी लग्न झालेच, प्रत्येकाचे होतच असते, मग अचानक आयुष्यातले थ्रील खतम! पुन्हा सप्पक आयुष्य सुरु, जॉब लागु दे, जॉब लागु दे म्हणुन तळमळलो, आणि जॉब लागला, आता थोड्याच वर्षात त्या जॉबचा कंटाळा यायला लागतो, एक प्रकारचा रिक्तपणा येतो.आयुष्य कशासाठी? जीवनाचा निर्भेळ आनंद घेण्यासाठी, मनाच्या आकाशात हे उत्तर जेव्हा गवसेल, तेव्हा नैराश्य, उदासीनता जवळपास फटकणार पण नाहीत!.तेव्हा सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
 सेवा करणार्‍याला आत्मिक समाधान मिळते. बघा! किती मजेशीर आहे हे,अगरबत्ती स्वतः हवेत विरुन जाते, पण वातावरणात एक प्रसन्न सुगंध पसरवते,दिव्याची वात स्वतः नष्ट होते, पण तेजाने घर उजळुन टाकते.काहीतरी बनण्यासाठी, काहीतरी प्राप्त करण्यासाठी आपण सकाळ संध्याकाळ धावत असतो, पण खरे समाधान कुठे आहे?
आपल्यात असलेल्या गुणांचा, शक्तीचा वापर आजुबाजुच्यांना, नातेवाईकांना, मित्रांना, अगदी अनोळखी लोकांना सुखी, आनंदी बनवण्यासाठी प्रयत्न करणार्‍यांचं जीवन खरं सार्थ झाले असं म्हणता येईल. म्हणूनच सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवा.
सकारत्मक विचारांची ऊर्जा आणि नकारात्मक विचारांची ऊर्जा कशी निर्माण होते यांची माहिती मला रविंद्र सूर्यवंशी यांनी कणकवली ते मुंबई बाय रोडने प्रवास करतांना सांगितली. त्यांचा परिणाम कुटुंबावर समाजावर कसा होतो. यांची गांभीर्याने चर्चा केली. तेव्हा पासुन माझ्यात खुप बदल झाला. एक तर नकारात्मक विचार करणे,लिहणे सोडून दिले.म्हणूनच प्रत्येकाने सकारात्मक विचाराने मन प्रसन्न ठेवावे.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.भांडुप मुंबई

" खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!."

" खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!." 


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज त्यांच्या संघर्षाला कधीच विसरत नाही.विसरू शकत नाही.याची आठवण दरवर्षी सहा डिसेंबर महापरीनिर्वाण दिनी चैत्यभूमी परिसर दादरच्या शिवाजी पार्क वरील गर्दी पाहिल्यावर होतो.ते निष्ठावंत भक्त आहेत की शिष्य हे ठरविता येत नाही.
 लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या निकाला नंतर या समाजाच्या सर्व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना मिळाल्या मतदारसंघातील मतदानाचा अभ्यास केल्यास " खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!." हे म्हणणे शंभर टक्के असत्य वाटते.पण सहा डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने होणारी गर्दी पाहिल्यावर डोळ्याने दिसते ते सत्य की निवडणुकीत मतदान पेटीत,ई व्ही एम मशीन मधून बाहेर पडलेले सत्य मान्य करावे हा मोठा गंभीर विषय आहे.
सत्य व असत्याचा इतिहास वाचला तर गांधी आंबेडकर यांच्यातील शाब्दिक संघर्ष आठवतो.गांधीजी मोठया अहंकाराने सांगत होते, डॉ आंबेडकर समाजाचा उद्धार आणि काय सेवा करू शकतील ते तर कायम सुटा बुटात राहतात. यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी जे उत्तर दिले ते मिस्टर गांधी तुमच्या या वर्णव्यवस्थेने हजारो वर्षे माझ्या समाजाला नागडे राहण्यास मजबूर केले होते.परंतु मी लवकरात लवकर त्यांना माझ्या सारखे सुटाबुटात राहणारे बनवेल.मिस्टर गांधी तेव्हा तुम्हाला मानणारा सर्व समाज त्यांना पाहून मनातल्या मनात जळत राहील. हे सत्य आहे देशात कोणत्याही नेत्यांच्या स्मृतिदिनी एवढी गर्दी होत नाही. जे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी होते.त्यांची गिनीज बुकात नोंदणी झाली पाहिजे. यादेशातील वृत्तपत्र व वृत्तवाहिन्या भांडवलदारांच्या व ब्राह्मणांच्या ताब्यात असल्यामुळे ते सत्य दाखवू शकत नाही. त्यांची अपेक्षा हा कष्टकरी असंघटित समाज ठेवत नाही.तरी तो म्हणतो नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला ही भिमाची पुण्याई अंगठी सोन्याची बोटाला. हे गाणे तरुणांच्या ओठावर कायम प्रेरणा देत राहते.
 महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी व शिवाजी पार्क वर होणारी गर्दी केवळ मोफत भोजन घेऊन समाधानी होत नाही.
जेवणाच्या पैशात अनेक पुस्तके विकत घेऊन जातात.
आणि एक नवीन ऊर्जा घेऊन जातात.पुस्तक वाचूनच ते म्हणतात खाण्यासाठी आम्ही जगत नाही,तर जगण्यासाठी आम्ही खातो.म्हणून ते म्हणतात खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!.
भारत हा विविध जाती धर्माचा देश आहे,त्यांच्या रीती रिवाज,परंपरा संपूर्ण वेगवेगळ्या आहेत,तरी ते सर्व लोक एकत्र गोविंद्याने राहतात.यांचे सर्व श्रेय केवळ या देशाच्या राज्य घटनेला जाते, जिथे भारतीय संविधान लागु आहे तिथे कोणता ही गंभीरप्रसंग निर्माण झाला तर संविधान योग्य मार्गदर्शन करते,पण आंबेडकरी चळवळीतील समाज, कार्यकर्ते आणि नेत्यांना कठीण प्रसंगी संविधान का लागु होत नाही.हा मोठा प्रश्न देशातील इतर समाज समोर आहे.सहा डिसेंबर म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिन दरवर्षी लाखो लोक या महापुरुषांच्या चरणी वंदन करण्यासाठी येतात. त्यात दरवर्षी मोठया संख्येने भर पडते.खरच हे लोक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानां मानणारे असतील काय?. हे फक्त मूर्तीच्या पुतळ्याला पाया पडण्यासाठी येत नाही तर क्रांतिकारी विचारांची प्रेरणा घेण्यासाठी येतात.खेड्यात पाड्यात राहणार हा असंघटित मजूर जरी असला तरी स्वतःची ओळख निर्माण करून राहतो.
आंबेडकरी चळवळ म्हणजे कष्टकरी वंचित शोषितांचा एक बुलंद आवाज. पण वंचित,शोषित म्हणजे महाराचे बौद्ध झालेले लोक,समाज नाही. तर बहुसंख्य असंघटित कामगार मजुर हे सर्व मागासवर्गीय जाती जमाती, भटके आणि आदिवाशी हे सर्व शोषिता मध्ये मोडतात, या सर्व बहुजन मागासवर्गीय समाजाचे नेतृत्व आंबेडकरी चळवळीच्या नेत्यांनी केले पाहिजे अशी अनेकांची अपेक्षा असते, या सर्वांना सोबत घेतल्या शिवाय ही चळ्वळी कधीच पुढे जाऊ शकणार नाही. म्हणून आंबेडकरी चळवळ जोमाने वाढलीच पाहिजे.पण संविधान मान्य नसणारे लोक कार्यकर्ते आणि नेते चळवळीचे नेतृत्व करणार असतील तर?. कुपनच शेत खाते असे म्हणावे लागते.समाजाला शत्रु कडून कमी आणि नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्या कडून जास्त धोका निर्माण होत आहे. म्हणूनच कार्यकर्ता प्रशिक्षित प्रामाणिक असावा. तर आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या संस्था, संघटना आणि पक्ष मजबूत करू शकतो.अन्यता दरवर्षी लाखोंच्या संख्येने लोक येत राहतील व व्यक्तिगत प्रेरणा घेत राहतील.पण सामाजिक,राजकीय क्रांतिकारी परिवर्तन होणार नाही. असे समजण्याचे कारण नाही आताच तरुण जागृत होत आहे. तो गांभीर्याने विचार करायला लागला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाला दादर येथे होणारी प्रचंड गर्दी पाहून सर्व विरोधकांचे डोळे फिरतात.तीच गर्दी राजकीय दृष्ट्या जागृत झाली तर राज्याचे नव्हे देशाचे राजकीय गणित बदली करू शकते. दादरच्या चैत्यभूमी वर येणारा हा बहुसंख्येने मागासवर्गीय असंघटित कामगार,मजूर शेतमजूर असतो.इथे तो भिमसैनिक, भीम अनुयायी, म्हणूनच नतमस्तक होतो, पण कामगार,कर्मचारी अधिकारी म्हणून जिथे जिथे नोकरी करत असतो तिथे तिथे तो याचं बाबासाहेबांच्या विचारधारेचा खून करणाऱ्या संघटनेचा,युनियन चा अधिकृत सभासद असतो,तो त्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी वार्षिक वर्गणी,देणगी न मागता देत असतो.हे चित्र बदलण्याची गरज आजच्या परिस्थितीत आहे हे आम्ही स्वतंत्र मजदूर युनियन च्या बॅनर खाली बदल घडविण्याचे आवाहन स्वीकारले आहे तरुणांनी त्यात सहभागी झाले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची त्यावेळी राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी का होती?. त्यात सतर टक्के असंघटीत कष्टकरी मजूर, शेतमजूर, कामगार होता.त्यांचा नेत्यावर विश्वास होता.पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद, अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली.हे आजचा तरुण गांभीर्याने पाहत आहे.
आंबेडकरी विचारांची एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहे. देशातील तमाम कामगार, कर्मचारी आणि अधिकारी यांनी इतरांच्या दबावाखाली  काम न करता स्वतंत्र मजदूर युनियनच्या नेतृत्वाखाली काम केल्यास सत्ताधाऱ्यावर आणि प्रशासकीय व्यवस्थेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून समाजाच्या अनेक मूलभूत गरजा सहज सोडवू शकतात.म्हणूनच देशातील ९३ % असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन होणे आवश्यक आहे.?.१९२७ ते १९५६ पर्यंत मागासवर्गीय शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. व स्वाभिमानी राहील.
 असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता, बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. रिपब्लिकन विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसतील तर रिपाई रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठूच शकत नाही. 
लोकशाहीचे बंधन मान्य नसणारे कार्यकर्ते लगेच पन्नास शंभर लोक सोबत घेऊन पक्ष संघटना काढत राहिले म्हणजे काय होईल?. म्हणून सर्व गल्लीबोळातील तरुणांनी प्रथम आपल्या विभागातील स्वार्थी,अहंकारी कार्यकर्ते संपविण्याची जबाबदारी घ्यावी.आणि आपल्या परीसरातील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच आंबेडकरी चळवळीचा नेेता असेल.अन्यता दरवर्षी लाखो लोक भावनिक दृष्ट्या गर्दी करून  खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबा तुझ्यामुळे!. म्हणत राहतील. विचारधारेशी बेईमानी करत राहतील. हे थांबण्यासाठी तरुणांनी संघटित झाले पाहिजे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी क्रांतिकारी विचारांच्या चळवळीला गतीमान करण्याचे काम तरुणच करतील.तीच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाला आदरांजली, श्रद्धांजली आणि अभिवादन असेल.

सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९,

शनिवार, २३ नोव्हेंबर, २०१९

 बिनभांडवली "राज" कारण?.


 शिक्षण घेण्यासाठी पहिला डोनेशन भरावे लागते त्याशिवाय प्रवेश मिळत नाही,म्हणूनच कष्टकरी कामगार मजूर म्हणतात शिक्षण घेणे किती महाग झाले,एखादा माणूस बिमार पडला तर त्यांला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी प्रथम डिपाजित भरावे लागते तेव्हाच डॉक्टर हात लाऊन इलाज करतात.त्यावेळी अनेक प्रकारच्या टेस्ट सांगितल्या जातात त्या केल्या शिवाय तडजोड नाही.तेव्हा प्रत्येक माणूस हॉस्पिटल खर्च किती महाग झाला ही खंत व्यक्त करतो. रोजगार मिळत नाही.कष्टाची बारा बारा तास काम करून ही किमान वेतन मिळत नाही. त्याविरोधात बोलण्याची कोणतीही सोय नाही.आवाज उचलला तर कामावरून काढल्या जाते.मालकांचे किंवा ठेकेदारांचे अनेक पक्षाशी आर्थिक हितसंबंध असतात.पक्षाचे कार्यकर्ते नेते अशा भानगडीत लक्ष देत नाही.मग महागाई विरोधात कोण लढणार ?. भ्रष्टाचारा विरोधात कोण लढणार व किती लढणार हे आता राज्यातील व केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे कामकाज पाहिल्यावर भारतीय नागरिकांना समजले असेल.आजचे सत्ताधारी राजकीय पक्षनेते कालचे विरोधीपक्ष नेते होते त्यांनी बेरोजगारी,भ्रष्टाचार, महागाई विरोधात देशभरात किती रान पेटविले होते याची आठवण करा आणि शांत बसा.
राजकीय सत्ता स्पर्धेत उतरायचे असेल तर बिनभांडवली "राज" कारण करता आले पाहिजे. विचारधारा नसली तरी चालेल पण उपद्रव मूल्य दाखविण्याची हिंमत पाहिजे.त्यासाठी बिनडोक तरुण मुलाची फौज पाहिजे, त्यांना प्रथम तोडफोड करून हिरो बनवायचे मग त्यांच्या नावाखाली तडजोड करून हप्ते सुरू म्हणजेच बिनभांडवली "राज" कारण?. यशस्वी होतांना दिसत आहे, सत्ता,नाही की विरोधी पक्ष नाही तरी राज्यात बिनभांडवली "राज" कारणाची दहशतवादी पक्ष संघटना म्हणून मान्यत आहे.मराठी माणसांना न्याय हक्क देण्यासाठी उत्तर भारतीय टॅक्सी वाल्यांना मारहाण केली,मात्र एकाही सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या मालकाच्या कानाखाली मारली नाही.एकाही बिल्डरच्या कामावर जाऊन कामगार कोण आहेत त्याची चौकशी केली नाही.गुजर मारवाडी व्यापाऱ्यांनी दुकानांवर दक्षिण भारतीय हॉटेल मालकांनी मराठीत पाटी लावली नाही म्हणून,पेट्रोल पंप वर,टोलनाक्यावर तोडफोड झाली.त्यामुळे मराठी माणसांना विशेष तरुणांना न्याय हक्क अधिकार रोजगार मिळाला असेलच. 
मराठी हृद्य सम्राटा साठी एक तरूण तडपदार अत्यंत हुशार सर्वांचा लाडका मुलगा एकदा गाड्या फोडताना पोलिसांनी पकडला.तुरूंगात पोलिसांनी रक्ताचा एक ही थेंब बाहेर येणार नाही याची दक्षता घेऊन चांगला चोप दिला आणि रीतसर केस बनवली. त्यामुळे कोर्टाची केसवारी दरमहा सुरू झाली.   आईवडिलांनी वाटेल ते काम करून मुलांना इंग्रजी मेडियम मध्ये शिक्षण दिले.नोकरी शोधात असतांना पोरगा  मराठी हृद्य सम्राटाचा मनसे सैनिक झाला.आणि करिअर गेलं,वर्ष वाया गेलं,जामीन नाही,जवळ पैसे नाहीत, आईबाप खंगले,तो तर आयुष्यातूनच उठला.असे एक नाही हजारो मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक म्हणून भरडल्या गेले,त्यांची कुठे ही मोजमाफ नाही.कारण त्याला कोणीतरी कुणाच्या तरी विरोधात भडकवले होते.  आणि तो पेटून उठला होता प्रचंड उर्जा घेऊन भडकला होता. त्यांचे आयुष्य जरी बरबाद झाले असले, तरी पण त्याच्यामुळे बिनभांडवली "राज" कारण करणाऱ्या नेत्याची मोठी प्रगती झाली.हे सर्व समाजाचे नागरिक विसरले आहेत.
बिनभांडवली "राज" कारण करण्यासाठी विशेष गुणवंता लागते.
तरुणांना नकारत्मक विचारांची नशा दिली कि तो नशेतच पेटून उठतो.ज्या प्रमाणे दारू विक्रेत्या दारूची नशा गुणदोषांचे मूल्य मापन न करता विकतात.तरुण परिणामाची परवा न करता पितात.त्याच प्रमाणे बिनभांडवली "राज" कारण करणारे नेते नकारत्मक विचारांची नशा मुलांना देत राहतात.दारूची नशा चार,आठ तासांनी उतरते.पण द्वेषाची नशा चढतच राहते.मग एक दिवस दारू विकणारा बंगला बांधतो.त्याच पद्धतीने बिनभांडवली "राज" कारण करणारा नेता कोहिनुर बांधून,किंवा सेंटर हॉटेल खरीदी करून काही दिवसात तिची विक्री करतो आणि किती करोड उत्पन्न मिळवतो. नंतर मान्यताप्राप्त 
राजकीय नेता होतो.  
मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक मात्र दारू पिणाऱ्या भिकाऱ्या पेक्षा भिकारी होतो.तर छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कोणीही देव- देवता यांची नावे सर्रास घेऊन 
मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या  तरुणांना त्यांच्या नावाने भडकावले जाते.मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचा तरुण मनसे सैनिक कधीच विचार करत नाही.ज्याने भडकावले त्याचा मुलगा असतो?. स्टडीरूममधे.आणि जे भडकले ते मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जातात कस्टडी रूममध्ये.ज्यांनी भडकवले त्यांचा मुलगा अभ्यास करतोय आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते खडी फोडायचा अभ्यास करतात.
बिनभांडवली "राज" कारणी नेत्याचा पोरगा परदेशात शिकायला जातो.   आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक जे भडकले ते देशी प्यायला जातात.भडकवणाऱ्यांचा मुलगा फाड-फाड इंग्लिश बोलतो
आणि मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाचे तरुण मनसे सैनिक बघून घेतो, तंगडंच काढतो,नादाला लागू नको, वावर गेला तरी पावर नाय गेली पाहिजे, असं बोलतो.कुठे गेली लाज,लोक लज्जा, कुठे गेला आत्मसन्मान.
छत्रपती शिवाजी महाराजांचे,डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेता.पण स्वाभिमान मात्र गहाण टाकलाय.दुसऱ्याचे पाय चाटण्यापेक्षा स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. दुसऱ्याला मोठं करण्यापेक्षा स्वतः अभ्यास करून मोठं व्हावं.दुसऱ्याच्या झाडाला पाणी घालण्यापेक्षा स्वतःचं रोपटं लावावे त्याची काळजी घेतली तर त्याचंही मोठं झाड होईल.त्याला गोड फळे येतील.तेंज तुम्हाला खायाला मिळणार नसले तरी तुमचे नातू मात्र हक्काने खातील.हे मागासवर्गीय ओबीसी, मराठा समाजाच्या तरुण मनसे सैनिकांना कधी कळणार म्हणूनच त्यांनी हे बिनभांडवली "राज" कारण समजून घावे.
आम्ही २१व्या शतकात स्मार्ट फोन,एंटर नेट,वाय फ्राय कॉम्प्युटर चा वापर करून ही उपास,नवस,पायीपद यात्रेला महत्व देऊन वाद घालणे,भांडण करणे, मारामारी करत असू तर हीच गोष्ट मनाला खटकनारी आहे.
या लोकांचं ऐकण्यापेक्षा स्वतःच्या आई वडिलांचे ऐका.नोकरी,व्यवसाय,धंदा,शिक्षण,घर,संसार इकडे लक्ष द्या.....
मनसे,राष्ट्रवादी,कॉँग्रेस,भा ज पा ,शिवसेना पक्षात गेलेल्या मागासवर्गीय ओबीसी,मराठा समाजाच्या तरुणांनो ते राजकीय पक्ष म्हंणून सत्तेसाठी कधी युती आघाडी करू शकतात.आपले काय?.
पंजाबी गुजराती मारवाड्यांची मुले राजकीय पक्षा पासून लांब राहून CA,CMS,BMS, BBA,MBA ची ज्या मेहनतीने तयारी करतात.त्या पद्धतीने मराठी मुल तयारी करीत नाही.ती काय करतात?.दक्षीण भारतातील मुले IT, IIT, Medical ची तयारी करतात.त्यांच्यापेक्षा अधीक मेहनत आमची महाराष्ट्रातील मुले ...ऊत्तर भारतातील मुले UPSC, railway ची तयारी करतात.
शिर्डी पदयात्रा,दहीहंडी,गणपती,नवरात्रीची सर्वशक्ती लावून तयारी करतात,वेळ अन वय निघून गेल्यावर आई बाबावर खापर फोडतात. ब्राम्हणांच्या सांगण्यावरून हे सर्व देवाची यात्रा,पूजा केली त्यांना मात्र कोणताच दोष देत नाही करतात.ज्या वयात चांगले अधिकारी होण्यासाठी शिक्षण घेण्याची जी वेळ असते.तेव्हा आमचा तरुण कुठल्यातरी मंडळाचा अध्यक्ष,पक्षाचा तालुकाध्यक्ष,युवाध्यक्ष,शाखाध्यक्ष किंवा कार्यकर्ता असतो आणी नंतर बेरोजगार.तुम्ही मेलात तरी कोणाला फरक पडत नाहीत.म्हणूनच जगा फक्त तुमच्या आई-बापासाठी,समाजाच्या हितासाठी चळवळीत काम केल्यास कायम लक्षात राहाल.आणि समाज तुमच्या मागे कधी कुठेही उभा राहील.सुखा दुखात सहभागी होणाऱ्या मित्रांसाठी कायम जागरूक रहा प्रेम जिव्हाळा हा मतलबा पुरता नसावा.कायम मैत्रीभावना वाढणारा असावा.दोन समाजात कायम तेढ निर्माण करून स्वतचे अस्तित्व टिकविणारा बिनभांडवली "राज" कारण करणारा नेता ओळख आणि सावध व्हा.शिक्षण,आरोग्य आणि रोजगारात होणारा खासगी मालकांचा भ्रष्टाचार यांना का कधीच दिसत नाही.त्या विरोधात त्यांच्या कानाखाली मारण्याची आरोळी का दिल्या जात नाही. कारण त्यांच्या भरोशावरच तर बिनभांडवली "राज" कारण चालते.हे तरुणांनी विसरू नये.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
 वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी शिक्षणात बदल?
भारतीय शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल जाणवत आहेत. अभ्यासक्रमात बदल होत असल्यामुळे आजची शिक्षण प्रणाली विज्ञानाच्या कक्षा मोडून चमत्काराच्या कक्षा वाढवत आहे.म्हणूनच आजच विद्यार्थी वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी तयार आहेत असे लिहाले किंवा म्हटले तर चूक ठरणार नाही.
भारतात देवा देवीकांच्या जन्म मृत्यूच्या गोष्टी कथा प्राथमिक शिक्षण घेतांना सांगितल्या व शिकविल्या जातात.त्याचं बरोबर त्यांनी अफाट चमत्कार करून कसे देवाला प्रसन्न केले हे आवर्जून सांगितल्या जाते. गणेशोत्सवात दररोज होणारी आरती व नवरात्रीच्या देवीच्या आरती बहुसंख्य मुलामुलींना तोंडपाठ असतात. पण त्यांचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न ते कधी करीत नाही. रामानंद सागर यांनी रामायण, महाभारत टीव्हीवर आणल्या पासुन तर विद्यार्थी शिक्षकांनाच उलट सुलट प्रश्न विचारतात. त्यात इंग्रजी माध्यमाच्या स्कुल मध्ये थोडे विज्ञान थोडे सांस्कृतिक म्हणून जनरल नॉलेज म्हणून रामायण महाभारतातील पात्रराची वेशभूषा व ठराविक डॉयलाग बोलण्याची स्पर्धा घेतली जाते.कळत न कळत वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी मुलांवर विद्यार्थी दसे पासुन संस्कार केले जातात.
    सोशल मीडियावर अनेक विद्यार्थ्यांना आपले कला, कौशल्य आणि धाडस दाखविण्याची संधी मिळत आहे.  वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी मुलांवर विद्यार्थी दसे पासून सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवा प्रश्न विचारू नये ही शिकवण दिली जाते.परंतु आजच्या तरुणांकडे स्मार्टफोन इंटरनेट असल्यामुळे सर्वच विद्यार्थी सर्वच ऐकून घेतलीच असे नाही.काही विद्यार्थी उलट सुलट प्रश्न विचारण्याची हिंमत करतात.ती ठरावीक जातीचेच असतात.त्यामुळे विचारल्या प्रश्नावर चर्चा होत नाही.तर प्रश्न विचारणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जातीची हिंमत कशी झाली असे विचारण्याची?. यावरच समाजातील देशातील वातावरण तापविल्या जाते.असा घटना देशात घडविल्या जात आहेत.
    एक हुशार विद्यार्थी व शिक्षक यांच्यात रामायण की कहाणी ही पोस्ट खुप फिरते आहे. आजचा विद्यार्थी हा स्मार्टफोन, कॉम्प्युटर, गुगल, यूट्यूब वर पाहिजे ते शोधणारा आहे.त्यामुळे शिक्षकांनी सांगितले तर चुपचाप ऐकून घेणारा नाही.त्याला जे पटल नाही तर प्रश्न विचारण्याचे धाडस करतोच.तर विद्यार्थी व शिक्षक यांच्यात झालेला प्रश्न उत्तर कसा घडतो वाचा.शिक्षक मुलांनो श्री रामचंद्रजी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी सर मला काही सांगायचे आहे.शिक्षक > बोल पप्पू ,पप्पू > रामचंद्र जी ने समुद्रात पुल बनविण्याचा निर्णय चुकीचा होता.शिक्षक तो कसा काय?.पप्पू > सर रामचंद्र जी कडे हनुमान होते.ते उड्डाण भरून लंकेत जाऊ शकत होते. मग पुल बांधण्याची गरज नव्हती.शिक्षक हनुमान उड्डाण घेऊ शकत होते बाकी वानर उडू शकत नव्हते. शिक्षक > फक्त हनुमान उडू शकत होते.बाकी वानर उडू शकत नव्हते.पप्पू > गुरुजी ते हनुमानाच्या पाठीवर बसुन जाऊ शकले असते.जर हनुमान पुरा पहाड हातावर उचलून आणू शकतात तर ?.शिक्षक > देवाच्या चमत्कार लिला वर प्रश्न विचारत नसतात नालायका. पप्पू >गुरुजी त्यांच्या कडे आणखी एक उपाय होता.गुरुजी > रागाने लाल होऊन काय?. पप्पू > गुरुजी हनुमान आपला आकार पाहिजे तेवढा लहान व मोठा करीत होते.जसा मगराच्या तोंडातुन लहान होऊन बाहेर निघाले होते व सूर्याला गिळण्यासाठी मोठे झाले होते.तसेच ते आपला आकार समुद्राच्या लांबी व खोली एवढा बनवुन घेऊ शकले असते. त्यांच्या पाठीवरून बाकी वानर व रामचंद्रजी लंकेत जाऊ शकले असते. गुरुजी आणखी एक गोष्ट विचारू?. शिक्षक >विचार. पप्पू >गुरुजी ऐकले आहे की समुद्रावर पुल बनवितांना वानर सेनेने दगडावर राम नांव लिहले होते?. त्यामुळे सर्व दगड पाण्यावर तरंगत होते म्हणे?. गुरुजी > हा ते सत्य आहे.पप्पू >गुरुजी मग वानर सेनेला वाचणे लिहणे कोणी शिकविले होते?. गुरुजी> हरामखोर,नालायक देवाच्या गोष्टीवर अविश्वास दाखवितो?. बंद कर तुझी बकवास व मुर्गा बनुन वर्गाच्या बाहेर उभा रहा.पप्पू > ठीक है गुरुजी, वर्षानुवर्षे आम्ही वर्गाच्याच काय गांवच्या बाहेर उभे आहोत. वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी 
आम्ही हजारो वर्षे त्याग,बलिदान दिले आहे.त्याला आम्ही कधीच अन्याय,अत्याचार म्हटले नाही. त्याला तुम्ही सांगितल्या प्रमाणे पूर्वाश्रमीचे पाप मान्य केले आहे. कधी विचारले काय?.पाप म्हणजे काय?.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे.विज्ञानाच्या चौकटीत ते घेतले तर तो श्रद्धा व अंधश्रद्धा,आणि ज्ञान व अज्ञान यातील फरक समजु शकतो. मग त्याला नेहमी प्रश्न पडतात.
गावागावात शाळेच्या कामासाठी गावकरी एकत्र येऊन मदत करीत नाही.ते म्हणतात ते सरकारी काम आहे आपले नाही.पण मंदिर बांधण्यासाठी सर्व जातीधर्माचे लोक एकत्र येऊन सढळ हस्ते मदत करतात.त्यात त्यांची चढावळ लागते.धर्मानुसार त्याचा आर्थिक फायदा कोणाला होतो. तिथे कोणी अधिकार सांगितला तर काय होते?.सुशिक्षित पदवीधर सामाजिक कार्यकर्ते यांचे उत्तर मागत आहेत. मागासवर्गीय समाजाची शिक्षणामुळे प्रगती झाली, देव दर्शन, उपवास पकडून नवस फेडला म्हणून नाही.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला रोखण्यासाठी मराठ्यासह सर्वाना आरक्षण पाहिजे. त्यासाठी आज देशभरात ब्राम्हणी प्रिंट,चॅनल मीडिया जाती जातीत भांडणे लावत आहे.धर्मा नुसार सर्व हिंदू आहेत.मग मंदिराच्या उत्पन्ना वर सर्वच समान अधिकार का नाही?. राज्य व केंद्रातील सरकार यावर ठोस निर्णय का घेऊ शकत नाही?. शाळा,कॉलेज काढले तर मुलामुलींना लहान पणापासून अज्ञान व विज्ञान कळेल,आज पर्यत धर्माने सांगितले ते मुलामुलींनी ऐकले तेच शाळा कॉलेज मध्ये शिकविल्या गेले.रावणाला दहा तोंड होती,पण तो आईच्या पोटातुन कसा बाहेर आला यांचे शाळा कॉलेज मध्ये उत्तर मिळत नाही.पुढे असे सांगितल्या जाते रावण महापंडित होता!. मग आज पर्यत एकही पंडितांच्या मुलाचे नांव रावण का नाही?. शाळा कॉलेज मध्ये मुलामुलींना गणेशोत्सव साजरा करण्यात येतो त्यात नियमितपणे आरती म्हटली जाते.बुद्ध हा विष्णुचा अवतार आहे.मग कोणत्या शाळा कॉलेज, व हिंदूंच्या मंदिरात बुद्ध मूर्ती का नाही लावल्या जात नाही?.कोणत्याही भटा ब्राम्हणाने स्वतःचा मुलाचे किंवा इतर हिंदू धर्मातील लोकांच्या मुलाचे नांव गौतम ,सिद्धार्थ,तथागत का ठेवले नाही. वाल्मिकी ऋषी सर्वात श्रेष्ठ होते त्यांनी रामायण/महाभारत लिहले.मग कोणीच हिंदू धर्मातील आपल्या मुलांचे नांव वाल्मिकी का ठेवत नाही.असे प्रश्न सोडविण्यासाठी राज्यसत्ता हाती पाहिजे.राजसत्ता राजाच्या हाती असते. किंवा लोकशाहीच्या मार्गाने सत्ता मिळविता येते. तर हे प्रश्न सोडवण्यासाठी समतावादी व्यवस्था पाहिजे.ती होऊ नये म्हणूनच आता शिक्षण वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी दिले जाते.
    ब्राम्हण किती ही उच्च शिक्षित असु द्या.तो कोणत्याही मोठया पदावर विराजमान झाला तरी आपली ब्राम्हणवादी,  असमानतावादी भूमिका जबाबदारी कधीच विसरत नाही. आपण हिंदू म्हटले की सर्व जाती पाती विसरून त्यांच्या आदेशाचे पालन करतो. पण शाळा, कॉलेज आणि मंदिर, व धर्म आणि अधिकार यातील फरक आपल्याला कळत नाही.मग स्मार्टफोन, कॉम्प्युटर, नेटवर्क, गुगल यूट्यूब यासाठी 3G,4G पाहिजे हे कसे कळते ?. हा अज्ञान व विज्ञान यातील फरक आहे.म्हणूनच सर्व भारतीय नागरिकांनी गांभीर्याने विचार करून मुुलांना
शिक्षण द्यावे. जर शिक्षणच विषमतावादी वर्णव्यवस्थाच्या सत्तेसाठी दिल्या जात असेल तर ?. आपण काय केले पाहिजे?.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,

सोमवार, ६ मे, २०१९

जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत

जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत 
 जेट एअरवेज कंपनी बंद पडली व वीस हजार कामगार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या एका दिवसात गेल्या या बातमीमुळे अनेकांना धक्का बसला. तिथे युनियन होती की नाही माहिती नाही. पण विमानतळावर संघटित कामगारांची व असंघटित कंत्राटी कामगारांची एकमेव युनियन भारतीय कामगार सेना ही आहे. ह्या युनियनची प्रचंड दहशत आत बाहेर आहे.मोठं मोठया कंपन्या एकदिवसात बंद पडत नाही. एक दोन वर्षांपासून तिच्या आर्थिक परिस्थितीचा ताळेबंद संचालक मंडळाच्या वतीने एम डी सादर करत राहतो.त्यात काटकसरीने वागण्याचे सूचना दिल्या जातात. कास्टकटिंग सुरू केली जाते. देशात अनेक कंपन्या जागतिक बाजारपेठेतुन गायब झाल्या. प्रत्येकाची वेगवेगळी कारण आहेत.काहींना विज्ञानाच्या विकसित तंत्रज्ञानाचा मार खावा लागला. तर काहींना प्रगतीचे वारे कोणत्या दिशेने वाहत आहेत यांचा अंदाज आला नाही. किंवा त्यांनी निसर्गाच्या काळानुसार बदलत्या उद्योग धंद्याचा स्वीकार केला नाही.म्हणूनच ते बाहेर फेकल्या गेले.
१९९८ मध्ये कोडक Kodak कंपनीत १,७०,००० कर्मचारी काम करीत होते,ती कंपनी जगातील सर्वात जास्त ८५ टक्के फोटो पेपर बनवून विकत होती.ती सर्वात जास्त लोकप्रिय होती.या लक्षवेधी कंपनीला काही वर्षांनंतर Digital photography या विकसित तंत्रज्ञानाने कोडक  कंपनीला बाजारातून बाहेर काढून टाकलं.kodak कंपनीचं अक्षरशहा दिवाळं निघालं सर्व कामगार रस्त्यावर आले. HMT ( घड्याळ ) BAJAJ (स्कुटर) DYNORA (टीव्ही) MURPHY (रेडिओ) NOKIA (मोबाईल) RAJDOOT (बाईक) AMBASDOR (कारया सर्व कंपन्यांच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती तरी सुद्धा त्या बाजारातून बाहेर फेकल्या गेल्या.कारण?. ह्या कंपन्या वेळे नुसार बदलल्या नाहीत. कोणालाच अंदाज नसेल कि येणाऱ्या १० वर्षाच्या काळात जग पूर्णतः बदलून जाईल आणि आज चालणारे ७० ते ९०% उद्योगधंदे बंद होतील.चौथ्या औद्योगिक क्रांतीचे आपल्याला स्वागतच करावे लागेल.
डिजिटल मार्केटिंग,हाडवेयर,सॉफ्टवेअर कॉम्प्युटर  तंत्रज्ञानाचा बाजारपेठेवर मोठा प्रभाव पडला आहे. अनेक कामगार कर्मचाऱ्यांची कामे एक कुशल ऑपरेटर बसल्या जागी करू शकतो. त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे उबेर.
उबेर फक्त एक software कंपनी आहे.त्याची स्वत:ची एकही कार नाही.तरीही ती जगातील सर्वांत मोठी Taxi company आहे. Airbnb जगातील सर्वांत मोठी Hotel Company असुनही तीचं स्वत:चं असं एकपण होटेल नाही. Paytm,Ola cabs,oyo rooms यांसारखी खुप उदाहरणं आहेेेत.
जागतिक करणने जग झपाट्याने बदलत आहे. भारतात मात्र शाप दिल्याने शत्रूला अतिरेकी मारतात. आणि सत्यनारायण महापूजा घातल्याने संकट दूर होतात.उच्चशिक्षित लोक पदव्या घेऊन वकील, प्राध्यापक डॉक्टर होत असतांना त्यांच्यावर ही गंडांतर येत आहे.भारतातील कोर्टाच्या बाहेर पहा जशी सकाळी नाक्यावर नाका कामगारांची फौज उभी असते तशीच वकिलांची फौज कोर्टाच्या आवारात उभी असते.त्या आवारात कोणत्याही माणूस आला तर हे वकील लोक त्यांच्या मागे धावतात. 
विदेशात विशेष यु एस मध्ये वकिलांना कोणत्याही प्रकारची कामे नाही. कारण IBM Watson नावाचं software क्षणार्धात legal Advice देऊन टाकतं. येणाऱ्या काळात १० वर्षांनंतर US मधील ९० टक्के वकिल बेरोजगार  होतील. जे १० टक्के वाचतील ते फक्त super Specialist राहतील. Watson Software माणसाच्या तुलनेत Cancer चं Diagnosis ४ पट जास्त Accuracy नं करतो.२०३० पर्यंत Computer माणसांपेक्षा जास्त Intelligent होणार आहेत.२०१९ पर्यंत Driverless Cars रस्त्यावर उतरलेल्या असतील.२०२० पर्यंत एका असामान्य आविष्काराने जगाला बदलून टाकायला सुरूवात केलेली असेल.येत्या १० वर्षाच्या काळात जगातील रस्त्यावरील किमान ९० टक्के Cars गायब झालेल्या असतील.ज्या वाचतील त्या एकतर Electric Cars असतील नाहीतर Hybrid... Petrol ची खपत ९० टक्के कमी होऊन जाईल. सर्व अरब देश कंगाल झालेले असतील.आपण Uber सारख्या एका Software नं कार मागवायची की Driverless Car क्षणार्धात आपल्या दारात उभी राहिल.Car Driverless असल्या कारणे ९० टक्के Accidents होणं बंद होईल.Car Insurance नावाचा धंदा बंद पडेल.ड्रायव्हर सारखा रोजगार जगात राहणार नाही.शहरात रस्त्यावरील ९० टक्के Cars गायब झाल्या तर Traffic आणि Parking सारखी समस्या आपोआप मिटतील.मागच्या ५ ते १० वर्षात अशी कोणतीही जागा नव्हती की तिथं PCO नव्हता.तो PCO बंद झाला नंतर PCO वाल्यांनी फोनचा रिचार्ज विकायला सुरुवात केली.आता तर रिचार्ज पण आँनलाईन झालाय. तुम्ही कधी लक्ष केंद्रित केलं का?.जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.
आज काल बाजारात सर्वाधिक दिसणारं तिसरं दूकान फक्त मोबाईल फोनचं आहे.Sale, services, recharge, accessories, repair, maintenance ची आता तर Paytmनं व्यवहार  होतात. रेल्वे तिकीटाचं फोनवर बुकींग तर पैशांची देवाण घेवाण मोबाईल मार्फत. Currency Note च्या जागेवर पहिल्यांदा Plastic मनीने घेतली होती आता तर Digital Transaction मध्ये रूपांतर झालं.जग फार वेगात बदलत आहे.डोळे,कान,नाक उघडे ठेवा नाहीतर मागं राहाल. वेळे नुसार वेळोवेळी बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न करा.यासाठी प्रत्येक माणसानं वेळेनुसार व्यापार आणि स्वभाव बदलत राहायला हवं.वेळेनुसार चालत रहा आणि यशस्वी बना. आता येणाऱ्या काळासाठी अपडेट असणं व त्याबरोबरच जनरेशन गॅप लक्षात घेऊन जुने विचार मोडीत काढून Upgrade असणं गरजेचं आहे. जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत. यांचा विचार सर्व संघटित व असंघटित कामगारांनी केला पाहिजे.
कामगार कर्मचाऱ्यांनी संघटित होऊन स्वतःच्या स्वरक्षणासाठी संघटना, युनियन बनविली पाहिजे. आणि स्वतःच नेतृत्व केले पाहिजे.दुसऱ्यांच्या भरोसा वर राहाल तर तुमच्यावर गिरणी कामगार व जेट एअरवेज कामगारा सारखी परिस्थिती आल्या शिवाय राहणार नाही.
भारतीय कामगार कायद्यानुसार कायमस्वरूपी कामे करण्यासाठी कंत्राटी पद्धतीने कामगार ठेऊ नये तर त्याजागी कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी साठी 1975 ते 1990 पर्यंत राष्ट्रीय पातळीवर ट्रेंड युनियने कायदेशीर लढाई लढत असतांना कायमस्वरूपी कामगारांची नेमणूक करण्यात यावी असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.त्याला पळवाट काढून भांडवलदार व त्यांच्या प्रणित कामगार ट्रेंड युनियन ने ठेकेदारी अधिनियम कायद्याला जन्मा दिला.त्याला कंत्राटी कामगारांच्या भल्यासाठी असा दिशाभूल करणारा प्रचार करण्यात आला.सरकारी, निमसरकारी किंवा खाजगी कारखाने,कंपनीचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कामगारांची जबाबदारी राहील असे सांगून सर्वांनीच आपली मुख्य जबाबदारी टाळली.त्यांचे समर्थन करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने 2001 साली दिला होता. या निर्णया विरोधात राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी जायाला पाहिजे होते पण 12 राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन व एक अंतर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन सि एफ टी यु आय यांनी या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागीतली नाही. या मागचे खरे कारण काय असेल तर बहुसंख्य मागासवर्गीय कामगारांचे जाती व्यवस्था नुसार कायमस्वरूपी आर्थिक शोषण होत राहावे. याचे वैचारिक समर्थन होय.यामुळे प्रत्येक वेळी सरकारी, निमसरकारी खाजगी कारखान्यात कंपन्यांच्या आत चालणारे कायमस्वरूपी काम प्रत्येक वर्षी ठेकेदार बदली केल्या मुळे कामगार ही बदलावा लागतो. त्यामुळेच ठेकेदारी पद्धतीने काम करणारा कोणत्याही कामगार कोणत्याही सरकारी निमसरकारी खाजगी कारखान्यात,कंपनीत कायमस्वरूपी कामगार राहू शकत नाही. युनियन बनवु शकत नाही हा देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाच्या कामगारांवर अन्याय करणारा निर्णय झाला होता.जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत
या विरोधात स्वतंत्र मजदूर युनियन बहुजन मागासवर्गीय समाजातील कामगारात प्रबोधन करून जनजागृती करीत आहे.जे मागासवर्गीय बहुजन समाजातील कामगार या जातीव्यवस्था समर्थन करणाऱ्या ट्रेंड युनियन चे वार्षिक सभासद आहेत त्यांनी या घटनेचा गांभीर्याने विचार करून आपण कोणाचे व कोणत्या विचारधारेचे समर्थन करतो ते ठरवावे.
सरकारी निमसरकारी व खाजगी कारखान्यात,कंपनीत स्थानिक कामगारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे ठेकेदार बदली झाला तरी कामगारांना कामावरून कमी करू नये अशी राज्य व केंद्र सरकारने सुरवातीला भूमिका घेतली होती. त्यावेळी भूमिपुत्रांना प्रथम प्राधान्य असे जनआंदोलन देशभरात उभे राहिले होते. त्यातूनच अनेक राज्यात प्रादेशिक राजकीय पक्षाचा जन्म झाला.पुढे राजकिय सत्ताधारी भांडवलदारांच्या फंडिंगवर निवडणूक लढवुन निवडून येत असल्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या प्रणित कामगार संघटना, ट्रेंड युनियन सत्ताधाऱ्यांच्या किंवा सरकारच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात न जातात केवळ रस्त्यावरील आंदोलने करून कामगारांची दिशाभूल व फसवणूक करीत आले आहेत.मग संघटीत कामगारांची हि व्यवस्था असेल तर असंघटीतांची काय ?.जेट एअरवेज  कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.
राष्ट्रीय मिल मजदूर संघ ही इंटक प्रणित गिरणी कामगारांची युनियन होती.त्यांच्या पक्षाचे अनेक राज्यात व केंद्रात सरकार होते तरी मुंबई व देशातील गिरण्या बंद झाल्या व त्यांच्या जमिनीवर टोलेजंग टॉवर उभे राहून लाखो गिरणी कामगार उध्वस्त झाला.म्हणूनच बहुसंख्य कामगार ट्रेंड युनियन इंटक व राष्ट्रीय पक्षा पासुन दूर गेला.त्यांचे आत्मचिंतन संघटीत असंघटीत कामगारानी केले पाहिजे. नाहीतर जेट एअरवेज कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत 
 स्वतंत्र मजदूर युनियन गेल्या बारा वर्षा पासुन बहुजन समाजातील मागासवर्गीय कामगारांना सांगत आहे.आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 12 व 13 फेब्रुवारी 1938 साली रेल्वे गँग मन कामगारांच्या कामगार परिषद समोर सांगितले होते की मागासवर्गीय समाजाच्या कामगारांनी स्वतःची ट्रेंड युनियन लवकरात लवकर स्थापन करून तिला स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु ) या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन शी संलग्नता स्विकारावी असे सर्व क्षेत्रातील मागासवर्गीय कामगारांना आवाहन केले होते. आज पर्यंत लाखोच्या संख्येने मागासवर्गीय कामगार, कर्मचारी अधिकारी जातीव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियनला वार्षिक वर्गणी देऊन आर्थिक दृष्ट्या मजबूत करतात.ते संघटीत कामगारांना असंघटित कामगार करणाऱ्या कंत्राटी कामगार कायद्याचे समर्थन करून पुन्हा जाती व्यवस्था स्थापना करण्यासाठी मदत करतात असे लिहले व म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.कामगारांचे अनेक समस्या आज जशाच्या तसा आहेत त्या सोडविण्यासाठी ट्रेंड युनियनने सनदशीर मार्गाने लढण्याची तयारी करण्या ऐवजी अयोध्या मध्ये राम मंदिर बांधकाम करण्यासाठी आंदोलन उभारण्यासाठी ट्रेंड युनियन संघटनानां पक्षांना आर्थिक मदत करतात.पण सामाजिक सुरक्षितता कायद्याच्या अंमलबजावणी साठी कोणत्याही प्रकारची जनजागृती करण्यावर भर देत नाही.
रेल्वे स्टेशनवर काम करणारा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, मेल एक्सप्रेस च्या डब्यात पाणी भरणारा कामगार, कारखान्यात काम करणारा इतर कामगार हा मोठया प्रमाणात कंत्राटी कामगार भरल्या जात आहे.त्यावर राष्ट्रीय पातळीवरील ट्रेंड युनियन यांनी ज्या शक्तीने लढले पाहिजे होते त्या शक्तीने लढत नाही.गांधीवादी,गोवळकरवादी समाजवादी,मार्क्सवादी कम्युनिस्टांच्या लाल बावटा वाल्या ट्रेंड युनियन मागासवर्गीय कामगारांना खूप प्रामाणिक वाटतात. पण आम्हाला हे समजत नाहीये कि जातीव्यवस्था समर्थक कामगार चळवळीचे नेतृत्व करणारे नेते मागासवर्गीय कामगारांची गेट बाहेरची जात नष्ट करण्यासाठी काय करतात?.देशातील सर्वात जास्त कम्युनिस्ट चळवळी कामगारांच्या जोरावर चालतात. खालचे काम करणारे खास करुन त्या कामगारां पैकी बहुतांशी कामगार कर्मचारी हे मागासवर्गीय असतात. खरं तर मागासवर्गीयांना शंभर टक्के न्याय देण्याचं खरं काम बाबासाहेबांनी केलं. तर मग बाबासाहेबांच्या निळ्या झेंड्याच्या कामगार संघटना, युनियन कडे मागासवर्गीय कामगार मोठया संख्येने का जात नाही?. हा प्रश्न स्वताला आंबेडकरवादी म्हणून घेणाऱ्या कामगार,कर्मचारी अधिकारी यांना का पडत नाही. संघटित कामगारांना त्यांच्या मुलामुलींना असंघटित कामगार बनविण्यात कामगार संघटना युनियन आणि त्यांच्या महासंघाची मोठी भूमिका आहे हे समजून घेतले पाहिजे.जेट एअरवेज  कामगार कर्मचारी जात्यात गेले आणि आम्ही सुपात आहोत.जेट एअरवेज कामगार एक जाती धर्माचे नव्हते तरी त्यांचा बळी भांडवलशाही ब्राह्मणशाहीच्या यंत्रणेने घेतला.यावर आज दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. परिस्थिती बदलली तर जाहीर चर्चा सुरू होईल.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप मुंबई 9920403859,
 

Attachments area