पाळण्यातून पार्लमेंटमध्ये....?
भारतातील लोकशाही अवघ्या 69 व्या वर्षीच संपविण्याचा खटाटोप काही आंतरराष्ट्रीय अनधिकृत संस्था संचालित पक्ष करीत आहेत.त्यांना राजा हा राणीच्या पोटातून हवा आहे.त्याला लोकशाही मान्यता देत नाही.तर आजचा राजा हा मतदानाच्या पेटीतून जन्म येतो.त्याला ही भटा ब्राम्हणांनी धनदांडगे,जातदांडग्याच्या रूपाने राजा निवडण्याचा पर्याय निर्माण केल्यामुळे पाळण्यातून पार्लमेंटमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जगातील एक नंबरची भारतीय घटना म्हणजे संविधान आहे असे सांगितल्या जाते. त्यानुसार भारतात लोकशाही आहे.त्याचा अनेक देश आदर्श घेतात.लोकशाही म्हणजेच लोकांनी लोकांमधून निवडुन दिलेले लोकप्रतिनिधी ते या देशातील लोकांची सर्वकामे धर्मनिरपेक्ष पणे करतील त्यात सर्वांना स्वातंत्र्य,समता, बंधुता आणि सामाजिक न्याय बहाल करण्याचा अधिकार दिला होता.राजेशाही संपून लोकशाही आली.आता लोकशाही भाषा बदलून पुन्हा राजेशाहीतील सरदार,वतनदार व जहागीरदार ही मंडळी लोकशाहीच्या नांवा खाली लोकप्रतिनिधी होत आहेत.
त्यामुळेच पाळण्यातून पार्लमेंटमध्ये जाण्यामुळे लोकशाही चे दरवाजे इतरांना बंद होणार आहेत.
शाळा कॉलेज मधील शिक्षण आणि समाज व्यवस्थेतील शिक्षण खूप वेगळे आहे.शिक्षण हे सुजान नागरिक घडविण्यासाठी असले पाहिजे होते.ते आज पैसे कमविण्यासाठी गुंतवणूक झाली आहे. शिक्षण देणाऱ्या संस्था,संस्थाचालक व विद्यापीठे पैसा दिला की कोणतीही पदवी बहाल करण्यासाठी तयार आहेत.त्यामुळे समाजाचे व देशाचे भवितव्य अंधारात जाईल यांचे कोणालाही भान राहिले नाही.त्याचं पद्धतीने समाजहित व देशहितासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा, विधानपरिषद, लोकसभा, राज्यसभा येथे पाठविण्यात येणार लोकप्रतिनिधी विशिष्ट धनदांडगे, जातदांडगे घराण्यातून निवडून देण्याची पद्धत रूढ होत आहे.त्यालाच आता पाळण्यातून पार्लमेंटमध्ये म्हटल्या जात आहे.कोणता ही अनुभव नसणारी व्यक्ती उच्च शिक्षित आहे म्हणुन लोकसभेची उमेदवार होत नाही. केवळ ती त्या घराण्यातील आहे म्हणूनच ती लायक आहे ही मानसिकता म्हणजे लोकशाही नाही.जाहीर सभेत त्यांना तीन मिनिटे सलग बोलता येत नाही तो तरुण लोकसभेत कोणत्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण बोलेल?.की केवळ धनदांडग्याचे व जातदांडग्याचे प्रतिनिधित्व करेल?.यांचा मतदारांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.दादाचा पोरगा आणि साहेबांचा नातु म्हणून विचार करू नये. त्यांचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतील.
स्वयं घोषित हिंदू हृदय सम्राट यांनी मुंबई व महाराष्ट्रातील गिरणी कामगारांना शिवाजी पार्क मध्ये जाहीरपणे सांगितले होते की मुंबईतील गिरण्याची एक इंच जागा गिरणी मालकांना व सरकारला विकू देणार नाही. आणि एकही कामगारांना मराठी माणसांना बेरोजगार होऊ देणार नाही. त्यांनी लोकशाहीच्या नावाने हुकूमशाही गाजवून मुंबईत मराठी माणसाला कुठे नेहून ठेवले?.त्यांचेच बाळकडू पिऊन मोठे झालेले मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी लढणारे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नांवाचा वापर करून मराठी माणसांना फसविणारे लबाड लांडगे साडेचार वर्षात आपण पाहिले असतील. शेतकरी,कामगार,विद्यार्थी ,सैनिक आणि महागाई,भ्रष्टाचार याविरोधात सैदव्य राजीनामे खिशात घेऊन जनआंदोलन करणारे फिरणारे कोण कोण आहेत ते आपल्याला आठवतात काय?.ते मराठी माणूस व महाराष्ट्राशी किती प्रामाणिक आहेत हे मराठी माणूस म्हणून नव्हे तर एक मतदार म्हणून यांना विचारणार आहेत की नाही. की त्यांच्या पाळण्यातून निघणाऱ्या मुलांसाठी जिवाचे रान करणार ?.मुंबईतील मराठी माणसांना रोजगार नाही म्हणून उत्तर भारतीय फेरीवाले, टॅक्सीवाल्यांना मारणारे एकही उत्तर भारतीय बिल्डरला किंवा ओबेरॉय,रहेजा,लोढा, गुंडांच्या, जे कुमार,आणि सुरक्षा रक्षक ठेकेदारांना मारतांना त्यांची दुकाने कार्यालय तोडफोड झालेली पाहिले नाही. यांच्याकडे अल्पदरात काम करणारा मजूर हा संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे.मात्र तो इथे मतदार यादीत स्थानिक नागरिक म्हणून अधिकृतपणे कसा झाला?. यावर चर्चा होत नाही. तिथे ज्वलंत हिंदुत्व आडवे येते.या विषयावर ऐंशी टक्के समाजकारण करणारे ऐंशी टक्के राजकारण खेळतात व मराठी माणसाला महाराष्ट्रातील नागरिकांना मूर्ख बनवितात.तेव्हा कोणत्याही मतदार या बाबत उघड पणे बोलू शकत नाही. हीच का ती लोकशाही लोकांनी लोकांसाठी लोकांमधून निवडून देणारे लोकप्रतिनिधी की पाळण्यातून पार्लमेंटमध्ये पाठविणारी लोकशाही.
तुम्ही भारताचे सुजाण नागरिक आहात काय?.एका बाजूला जाहीरपणे सांगता आम्ही जात,धर्म मानत नाही सर्वांना समान अधिकार व समान संधी मिळाली पाहिजे.मग जातदांडगे,धनदांडगे यांच्या मुलामुलींना नातवानांच जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा उमेदवारी का दिली जाते. वीस वीस वर्षे पक्षासाठी काम करणाऱ्या गरीब प्रामाणिक कार्यकर्त्यांचा का विचार केला जात नाही. गरीब कार्यकर्ता समाजात जेवढे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम करतो तेवढा श्रीमंत नेता कार्यकर्ता काम करीत नाही. तो सर्वांच्या समोर एक दोन लाख रुपये खर्च करून दाखवितो आणि शंभर पटीने व्यापारी,बिल्डर,शासकीय ठेकेदार,शासकीय अधिकारी यांच्याकडून वसुली करतो. दिल्लीत महाराष्ट्र भवन छगन भुजबळ यांनी बांधले आणि बेहिशेबी मालमत्ता कमविली एवढे माहिती आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्व पक्षातील जातदांडगे व धनदांडगे लोकप्रतिनिधी यांची गेल्या वीस पंचवीस वर्षातील एकूण मालमत्ता यांची सनदशीर मार्गाने चौकशी केली तर किती धुतल्या तांदळा सारखे देशाशी,समाजाशी भारतीय संविधानाशी आणि धर्माशी प्रामाणिक निघतील?.यांचा विचार मतदारांनी केला पाहिजे.मतदार म्हणजे नागरिक हेच जर दारू,मटण व पैसे घेऊन मतदान करीत असतील तर त्यांना लोकशाही मार्गाने बोलण्याचा कोणत्याही अधिकार नाही. म्हणूनच एकमेव काँग्रेस मधून प्रत्येक राज्यात जातदांडगे, धनदांडगे नेते बाहेर पडले त्यांनी स्वतःचे पक्ष काढले.त्यासर्वांचे काळेधंदे बाहेर काढून त्यांचे गाठोडे बांधण्याचे काम मोदी निर्दयी पणे करू शकतो हे भाजपच्या सांस्कृतिक वैचारिक मालकाला कळले म्हणूनच ही सर्व जबाबदारी मोदी शहा यांना देण्यात आली.ती आता भस्मासूरा सारखी देशाच्या सार्वभौम घटनेलाच हात घालत आहे.म्हणूनच लोकसभेत राज्यसभेत तोंड खोलू न शकणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज मोदी यांना आहे. म्हणूनच पाळण्यातून पार्लमेंटमध्ये जाणारी सर्व जातदांडगे धनदांडगे आपल्या मुलांना पक्षा कडून उमेदवारी देण्यासाठी झटत आहेत ते शक्य नसेल तर मोदींची संपूर्ण टीम या पाळण्यातील मुलांकडे सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तयार आहेच.आता नागरिकांनी मतदारांनी ठरवायचे आहे की पाळण्यातून पार्लमेंटमध्ये जाऊ द्यावे की समाजासाठी देशासाठी वीज,रस्ते,पाणी,
रुग्णालय आणि रोजगार देणारे स्वच्छ चरित्र असणारे सामाजिक बांधीलकी असणारे गरीब प्रामाणिकपणे काम करणारे लोकप्रतिनिधी निवडून दिले पाहिजेत.पाळण्यातून पार्लमेंटमध्ये जाण्याचा हा मार्गच कायमस्वरूपी बंद केेला पाहिजे.दर पाच वर्षाने निवडणूक का घ्यावी लागते. न बदलल्यामुळे भ्रष्टाचारांची कीड लागते हुकूमशाही वाढते तीच सर्वचा सत्यानाश करते मग मतदार बंधू भगिनीनो तरुण मुलामुलींनो आपला लोकप्रतिनिधी कसा निवडणार ?.पाळण्यातून पार्लमेंटमध्ये...?????.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई,9920403859,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा