रविवार, १८ डिसेंबर, २०२२

अज्ञानाला सज्ञान बनविणारे संत गाडगेबाबा

 अज्ञानाला सज्ञान बनविणारे संत गाडगेबाबा



      उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना स्वच्छतेचे महत्व कळत नाही.ते साफसफाई करण्यासाठी त्यांना असंघटीत मागासवर्गीय समाजाचे कामगार लागतात.पण जेव्हा त्यांना न्याय,हक्क आणि अधिकार देण्याची वेळ येते तेव्हा हीच मंडळी त्यांना सन्मानाची वागणूक देत नाहीत.असा उच्चशिक्षित कर्मचारी अधिकाऱ्यांना अज्ञानाला सज्ञान करणारे गाडगेबाबा आज ही प्रेरणादायी असायला पाहिजेत.कोविड २०१९,२०२० च्या महामारीत ज्यांनी जीवाची बाजीलावून स्वच्छता ठेवली.त्यांच्या जीवतोड कामगिरीवर विशेष स्वच्छतेचे पुरस्कार मिळविले.त्यासाठी विशेष निधी मिळविला. त्या नंतर २०२१,२०२२ ला याचं कामगारांना  कामावरून कमी करण्यात आले.ए सी कार्यालयात बसणाऱ्या अधिकारी वर्गांना या स्वच्छतेचे व ते ठेवणाऱ्या कामगारांचे महत्व कधी कळणार?.समाज प्रबोधन करण्या करीता शिक्षणाची गरज नसते.समाजसेवा हे सुशिक्षित माणसाचे काम नाही.ते फक्त नोकरी करून पैसा कसा कमाविण्यासाठीच असते हे अनेकदा सिद्ध झाले आहे. आणि त्यासाठी त्यांना किती खोटे बोलण्याचे कैशल्य आत्मसात करावे लागते.ते गरिबांना समजू शकत नाही.मग हेच उच्चशिक्षित गाडगेबाबाना कसे समजून घेतील.
      भारत कृषिप्रधान देश आहे या देशातील कृषिचे मालक असणारे शेतकरी.आर्थिक शोषण होते म्हणूनच जास्त आत्महत्या करतात.कारण ते सुशिक्षित नाही लिहण्या वाचन्या पुरते त्याचे शिक्षण असते.म्हणुन त्याला ऐनवेळी कृषि उत्पन्न बाजार समितीतील अडते व व्यापारी लुटतात. त्याच्या शेतातील उत्पादित मालाचा भाव पडतात. त्याच वेळी सुशिक्षित बँक अधिकारी आपले कैशल्य दाखवतात. त्यात कोणत्या ही धर्माची माणस मागे नसतात. का होते असे?. हा मोठा प्रश्न आहे.म्हणून संत गाडगेबाबा यांची आठवण येते.गाडगेबाबाचे शिक्षण आणि त्यांची समाज प्रबोधन करण्याची पद्धत म्हणजे किर्तन पाहिली तर ते उच्च शिक्षित वाटतात.पण ते उच्च शिक्षित नव्हते असे आजच्या तरुणांना सांगून पटणार नाही.
      सरकारच्या ग्राम स्वछता अभियानाच्या जाहिराती वर्षा तुन दोन वेळा येतात.एक जयंती दिनी दूसरी स्मुर्ती दिनी तेव्हाच सरकारला गाडगेबाबाची आठवण येते.गाडगेबाबाचे तत्वज्ञान मानव मुक्ति करणारे होते ते आजही सर्व समाजाला चिंता मुक्त करणारे आहे.ते समजुन घेण्यास सुशिक्षित समाज कमी पडतो.आज प्रत्येकजन आपला कुटुंबा पुरता विचार करतो.घर,परिसर,गांव स्वछ ठेवा हा मंत्र त्याकाळी गाडगेबाबानी सांगितला होता.आज कोणता ही सुशिक्षित माणूस असा विचार करीत नाही.पण गाड्गेबाबानी दहाकलमी कार्यक्रम राबविला तो किती लोकांना माहित आहे?. 
काय म्हणतात संत गाडगेबाबा १) भूकेलेल्यांना - अन्न,२) तहानलेल्याना - पाणी, ३) उघड्या नागड्या ना - वस्त्र,कपडा, ४) गरीब मुलामुलींना - शिक्षणासाठी मदत, ५) बेघरांना - आसरा, ६) बिमार लोकांना - औषधोपचार, ७) बेकारांना - रोजगार, ८) मुक्या प्राण्यांना - अभय, ९) गरीब मुलीमुलाचे - लग्न, १०) गोरगरीबना - शिक्षण, हा त्यांनी खेड्या पाड्यात राबविला.हेच कोणताही माणूस कुठे ही कधी ही जात,धर्म,प्रांत न पाहता राबवू शकतो.
      गाडगेबाबा यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६- मुत्यु २० डिंसेंबर १९५६ झाला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६ डिसेंबरच्या महापरी निर्वाणाने त्यांना खूप दुख झाले होते त्यांनी अन्नत्याग केला होता असे म्हणतात.संत गाडगेबाबा विज्ञानवादी होते.म्हणूनच ते  खेड्यापाड्यातील गावागावात मंदिरासमोर भजन करीत आणि विचारत बापो हो "ईश्वर देव कशात आहे?." देवा बाबत लोकात असणारी श्रद्धा,अंधश्रद्धा,अज्ञान,अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने समाज प्रबोधन करणारे कार्य करीत होते. "तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी " असे सांगत दीन,दुबळे,अनाथ,अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.देवळात जाऊ नका,मूर्तिपूजा करू नका,सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका,पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की,चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका.अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली.ते ओबीसी समाजातील होते.पण त्यांना त्यांच्या समाजाने किंवा ओबीसीनी कधीच स्वीकारले नाही. त्यांचे तत्वज्ञान जाती धर्मासाठी कधीच नव्हते.ते खरे प्रबोधन करणारे संत होते.त्यांचा वैचारिक वारसा ओबीसी समाजाने ठेवला असता तर देशातील मंदिरे वसान पडली असती.आणि तीन टक्के समाज घरोघरी भिक्षा मागत फिरला असता.त्यांची हक्काची रोजगार हमी कायमची बंद पडली असती.हा ऐतिहासिक वैचारिक वारसा ओबीसी समाज कधी स्वीकारणार?. 
      माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिक ठिकाणी धर्मशाळा,अनाथालये,आश्रम आणि विद्यालये सुरू केली होती.तेव्हा ते शिक्षण सम्राट होऊ शकले असते. पण त्यांनी रंजले-गांजले, दीन-दुबळे,अपंग-अनाथ यांच्यात देव शोधला. या खऱ्याखुऱ्या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच,एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.
      दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले,अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही.कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे,मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष नेहमी असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी जिवापाड प्रयत्न केले.हा आदर्श आज कोणताही समाज घ्याला तयार नाही.ज्यांनी घेतला त्यांचा आज सर्वच ठिकाणी दबदबा (वैचारिक) आहे.
   गाडगेबाबाना डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुरु मानत तेव्हा त्यांनी सांगितले मी कुणाचा गुरु नाही आणि माझा कोणी चेला नाही.१४ फेबुवारी १९४९ ला गाडगे बाबांची प्रकृती ठीक नव्हती.महानंदसामी नावाच्या त्यांच्या चाहत्याने मुंबईत आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना गाडगेबाबांची माहिती दिली. बाबासाहेब तेव्हा भारताचे कायदेमंत्री होते. (डॉ.बाबासाहेब आंबेडकर २०/११/१९४७ ते ३१/०३/१९४९ कायदेमंत्री होते ) आणी त्यांना संध्याकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. गाडगेबाबांचा निरोप मिळताच त्यानी सर्व कामे बाजूला ठेवली. आणि दोन घोंगड्या विकत घेऊन ते महानंदसामीसह रुग्णालयात गेले. कोणाकडून काही न घेणार्‍या गाडगेबाबांनी बाबासाहेबांकडून दोन घोंगड्या स्वीकारल्या. आणि म्हणाले डॉ.तुम्ही कशाला आले? मी एक फकीर. तुमचे एक एक मिनिट महत्त्वाचे आहेत. तुमचा किती मोठा अधिकार आहे. तेव्हा बाबासाहेब म्हणाले "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा. उद्या खुर्ची गेल्यावर मला कोणी विचारणार नाही. तुमचा अधिकार मोठा आहे." या प्रसंगी बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू होते. कारण असा प्रसंग पुन्हा जीवनात येणार नाही हे दोघेही जाणत होते.तेव्हा पासून बाबासाहेबाला मानणारा समाज प्रत्येक ठिकाणी गाडगेबाबाचा आदर्श गुरु म्हणुन उल्लेख करू लागला.कोणते ही कार्यक्रम असो भाषणाची सुरवात बाबासाहेबाच्या आदर्श गुरुच्या विचाराला आणि प्रतिमेला वंदन केल्या शिवाय पुढे भाषण करीत नाही.हि पद्धत बहुजन आंबेडकरी चळवळीत निर्माण झाली आहे.त्यामुळे बाबासाहेबाच्या फोटो बरोबर गाडगेबाबाचा फोटो घराघरात असतो.उलट गाडगे बाबाच्या समाजाने आज ही बाबांना स्वीकारले नाही.९० टक्के लोकाच्या घरात गाडगेबाबाचा फोटो नसतो.लग्न कार्य किंवा कोणताही कार्यक्रमात त्याच्या नांवाचा उल्लेख नसतो.फोटोचा प्रश्नच नाही.म्हणजे ज्यासामाजातील एक संत सर्व समाजा करिता एवढा आदर्श निर्माण करतो त्याचा आदर्श त्याच्या समाजाने न घेणे हि खूप दुर्दव्य म्हणावे लागेल.काही संघटना जनजागृतीसाठी प्रयत्नशील आहेत.पण हिंदुत्वाची चौकट मान्य करूनच.गाडगेबाबा सारख समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. त्याचा उल्लेख टाळून संघटना संस्था चालवितात. त्यामुळेच त्यांना आताच्या केंद्र व राज्य सरकारने सर्वोच्य न्यायालया मार्फत लगाम लावला. 
      गाडगेबाबा आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत.तसाच प्रयत्न त्याच्या समाजातील संघटना नी करायला पाहिजे. ओबीसीना निवडणुकीत उभे राहण्याच्या अधिकारांचे आरक्षण नसेल.तर त्यांनी मतदान का करावे?. असे प्रश्न विचारण्याची त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे बहुजन समाजाच्या चळवळीत आदर्श संत म्हणून कायम आहेत आणि राहतील.ओबीसीनी त्यांचा वैचारिक वारसा स्वीकारावा आणि त्यांना २० डिसेंबर स्मृतिदिनी खरी मानवंदना द्यावी.आम्ही जीवावर उद्धार होऊन असे प्रबोधन करणारे लिहत असतो.सत्य असत्याची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन आहे असे तथागतांनी व महामानवानी आम्हाला सांगितले आहे.समाजाच्या हिताचे व कल्याणाचे विचार परखडपणे निर्भीडपणे निपक्षपातीपणे लिहणे,बोलणे मांडणे म्हणजेच प्रबोधन असते. संत महापुरुषांच्या जयंती दिनी,स्मृतिदिनी मी ते दरवर्षी करीत असतो त्यातून त्यांच्या क्रांतिकारी विचारांना प्रतिमेला त्रिवार अभिवादन असते.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

कष्टकरी कामगारचं क्रांती घडवितात.

 कष्टकरी कामगारचं क्रांती घडवितात.



          भारताचा नव्हे जगाचा इतिहास तपासून पहा कष्टकरी कामगार मजुरच सामाजिक राजकीय क्रांति घडवितात,तथागत बुद्धा पासुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर  पर्यंत आपण त्यांच्या मानव कल्याण आणि विकासा करीता केलेला संघर्ष,त्याग यांचे ऐतिहासिक दाखले देतो,पण त्यांच्या आदर्श घेत नाही.असंघटीत कष्टकरी समाजाचे आपले सर्वच नेते एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाहीत. फुले,शाहू आंबेडकरी विचारांचे असल्याचे सांगतात.सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारांला मानणारे एकत्र आल्यासच सत्ता प्राप्त होऊ शकते.भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या समविचारी पक्षांना एकत्र आणतात आणि सत्ता हस्तगत करतात.यांना मतदान करणारा बहुसंख्य हा असंघटीत कष्टकरी कामगार मजूर,  शेतमजूरचं असतो.डॉ.बाबासाहेबांनी सांगितले होते.शासन कर्ती जमात बना आणि शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करा.यांचा अर्थ नगरसेवक,आमदार, खासदार बना असा नव्हता तर ग्रामसेवका पासून ते तहसीलदार,जिल्हाधिकारी पोलीस अधिकारी,सचिवालयात निर्णय घेणाऱ्या मोख्याच्या जागी बसा असा होता. त्यासाठी तुमची वैचारिक मांडणी असणारी ट्रेड युनियन असली पाहिजे.जे तुमचे अन्याय अत्याचारा पासून कायमस्वरूपी स्वरक्षण करेल.कामगार संघटना युनियन खुप आहेत.पण त्या त्यांच्या विचारांच्या वर्ण जातीव्यवस्थेच्या समर्थना नुसार ३६५ दिवस चालणाऱ्या कायमस्वरूपी कामाला कंत्राटी कामगार कामावर लावतात.त्यांना समान काम समान न्याय हे समतावादी विचार मान्य असले असते तर त्यांनी कंत्राटी कामगार कायदे निर्माण होऊच दिले नसते.आणि यंत्रणा उभी राहू दिली नसती. सनदशीर मार्गाने न्यायालयात आणि रस्त्यावर मैदानात उतरून जीवतोड संघर्ष केला असता.तो होतांना फारसा दिसला नाही.म्हणूनच बहुसंख्य कष्टकरी असंघटीत कामगार,मजूर,शेतमजूर देशोधडीला लागून दिशाहीन झाला आहे.त्यांना योग्य दिशेने घेऊन जाण्याचे काम स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस.पाटील साहेब यांच्या कुशल,त्यागी तत्वनिष्ट नेतृत्वाखाली यशस्वीपणे २२ राज्यात घौडदौड करीत आहे.  

         बहुजन समाजात प्रचंड वैचारिक प्रमाणात जागृती आली आहे. परंतु राजकीय,कामगार चळवळ ठोस पर्याय मिळत नाही.कामगार,कर्मचारी अधिकारी म्हणून कार्यालयात विभागलेले असतात.आणि वसाहतीत घरात मतदार म्हणून विभागलेले असतात. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावे लागते.त्याचा परिणाम कायमस्वरूपी समाज भोगतो. बहुजन कामगार सत्ता आणण्यासाठी बहुजन कर्मचारी अधिकारी कार्यालयात संघटित व असंघटित कष्टकरी कामगार मजूर,शेतमजूर वस्तीत संघटीत झाला पाहिजे. यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन  (ILU) केंद्रात दिल्लीला व राज्यात मुंबई,नागपूर मध्ये प्रचंड मोर्चेबांधणी करत असते.आपली शक्ती रैली द्वारे दाखवून देत आहे.त्याला आता चार दिवस राहिलेले आहेत.२१ डिसेंबर २०२२ ला विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा काढत आहे.महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी पदोन्नती मधील आरक्षणा सह खुल्या प्रवर्गातून देणे डिसेंबर २०१७ पासून बंद करून बहुजन कर्मचारी हे मराठा विरूध्द बौध्द हा वाद लाऊन दिला.उलट या दोन कर्मचारी मधील वाद हा आरक्षण संबंधी आहे.बहुजनाचे राजकीय पक्ष हा वाद मिटवू शकत नाही जरी बहुजन ८५ टक्के असले तरी.यावर एकच मार्ग आहे तो म्हणजे छोट्या शेतकरी व शेतमजूर व असंघटित कामगारांचे महाराष्ट्र व्यापी संघटन उभे करणे.हे संघटन छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झाली पाहिजे.

      बाबासाहेबांनी कामगारांना जास्त अभ्यासू असले पाहिजे असे म्हटले होते. बहुजन समाजातील मागासवर्गीयाचे कर्मचारी अधिकारी देशभरात ७ टक्के संघटित व ९३ टक्के असंघटित कष्टकरी कामगार, मजूर,शेतमजूर आहेत.घटना कलम १९ ने कामगारांना संघटित होण्याचा अधिकार दिला आहे. सोसायटी कायदा १८६० नुसार सरकारी कर्मचारी व एन.जी.ओ.संघटित होतात. तर ट्रेड युनियन कायदा १९२६ नुसार औधोगिक कर्मचारी व असंघटित कामगार संघटित होतात.हेच कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाना न समजल्या मुळे ते वेल्फेअर आणि अशोसियन मध्ये सहभागी होऊन स्वताचे व येणाऱ्या तरुण पिढीचे न भरून येणारे नुकसान करीत आहे.ते संकट दूर करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस.पाटील साहेब यांच्या कुशल,त्यागी तत्वनिष्ट नेतृत्वाखाली २१ डिसेंबर २०२२ ला विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा काढत आहे.त्यात संघटीत असंघटीत कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कष्टकरी कामगारचं क्रांती घडवितात हे सिद्ध करून दाखवावे.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर आवाहन केले आहे. 

सागर रामभाऊ तायडे ९९२२०४०३८५९,

अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

मिलिंद कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?.

 मिलिंद कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?.



          डॉ.बाबासाहेबांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना,मेख्याच्या जागा मिळवा, त्यासाठी शिक्षण असले पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे नागसेन वनात मिलिंद महाविद्यालय काढले होते. त्यावेळी नागसेन वनात लक्षवेधी सूचना फलक लावले होते,त्यावर लिहले होते या परिसरातील प्रत्येक विद्यार्थी हा राजा मिलिंद सारखा असावा तर त्याला शिकविणारा प्रत्येक शिक्षक हा भन्ते नागसेन सारखा असला पाहिजे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिऊन त्यांना अन्याय अत्याचारा विरोधात डरकाळी फोडली पाहिजे. असे शिक्षक व विद्यार्थी १९८० नंतर बाहेर पडले दिसत नाहीत.वाघिणीचे दूध पिऊन विद्यार्थी खूप बाहेर पडले आहेत पण त्यांनी स्वतःची नोकरी बायको,गाडी, बंगला प्लॉट आणि पदोन्नती यांचाच विचार केलेला दिसतो म्हणून ते धार्मिक शैक्षणिक व राजकीय चळवळीत दिसत नाही. उच्चशिक्षित उच्च पदस्थ असल्यामुळे ते या चळवळीत नसतील पण कर्मचारी अधिकारी म्हणून त्यांचा सहभाग कामगार चळवळीत अपेक्षित असतो.इथे ही ते आंबेडकरी विचारांच्या ट्रेंड युनियनशी जोडले नाहीत,पण मनुवादी गोळवलकरवादी, गांधीवादी,मार्क्सवादी विचारांच्या ट्रेंड युनियनशी जोडले गेले आहेत. ते त्यांना इमाने इतबारे वार्षिक वर्गणी देऊन सढळ हस्ते आर्थिक देणगी देतात.यांचे दुःख माझ्या सारख्या कामगार नेत्याला पत्रकार साहित्यिक म्हणूनच जास्त होत आहे.म्हणूनच मी जाहीरपणे विचारतो मिलिंद कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?.
     शिक्षणात नोकरीत आरक्षणा सह सर्व सोयीसवलती मिळवण्यासाठी संघर्ष करणारा असंघटित कामगार,शेतमजूर निळ्या झेंड्याखाली संघटित नसला तरी एका दिवसासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी आंदोलनात सहभागी होत असतो.आणि सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी राहणारा नोकरी करणारा कोणत्याही जन आंदोलनात स्वतः सहभागी होत नाही,किंवा आपल्या बायको मुलामुलींना आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगत नाही.मात्र सरकारने दिलेल्या सर्व आरक्षणच्या सोयी सवलतीचा लाभ न चुकता घेतात.
      दिनांक २५ मे २००४ ची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन जेष्ठता यादीमध्ये वरच्या क्रमांकावर असलेल्या ज्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिनांक २९ डिसेंबर २०१७ पासून खुल्या प्रवर्गातील पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात आले.तरी वरच्या क्रमांकाचे मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विध्यार्थाचे कर्मचारी अधिकारी झालेले अजून ही मनुवादी गोळवलकरवादी,गांधीवादी,मार्क्सवादी विचारांच्या ट्रेंड युनियन मधून बाहेर पदलेले दिसत नाहीत.त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ७ मे २०२१ हा सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक २८ जानेवारी २०२२ च्या निर्णयानुसार तात्काळ प्रभावाने रद्ध करण्यात यावा.अपर्याप्त प्रतीनिधीत्वाबाबत संवर्गनिहाय आकडेवारी लक्षात घेऊन राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जाती,विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी अधिकारी पूर्वलक्षमी प्रभावाने ३३ टक्के पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे.यामागण्यांसाठी त्यागी ध्येयनिष्ठ कुशल प्रशासकीय अनुभवी आदरणीय जे.एस.पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या कुशल नेतृत्वाखाली बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांचा प्रचंड मोर्चा "स्वतंत्र मजदूर युनियन" व सर्व सलंग्न संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
     मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी विचारांचे कर्मचारी अधिकारी यांनी मनुवादी गोळवलकरवादी,गांधीवादी,मार्क्सवादी विचारांच्या ट्रेंड युनियन मधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवावे.आणि ते शक्य नसेल तर त्यांनी त्या संघटना मधून बाहेर न पडता.पदोन्नतीसाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या आणि रस्त्यावर मैदानात उतरून संघर्ष करणाऱ्या स्वतंत्र मजदूर युनियन ला योग्य मदत करावी.आम्ही या आंदोलनात मोठ्या प्रमाणत संघटिता सोबत असंघटीत कामगारांना उतरून यशस्वी संखाबळ दाखवू शकतो.त्यासाठी कर्मचारी अधिकारी यांनी दोन किंवा चार असंघटीत कामगारांचे रेल्वे गाडीभाडे त्यांच्या जेवणासाठी येणाऱ्या खर्चासाठी सढळ हस्ते मदत करावी.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर आवाहन या लेख द्वारे केले आहे.
       विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने शाळा,कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन सुरक्षित नोकरी करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन आणि शासन कर्ती जमात म्हणून शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव ठेवण्यासाठी ट्रेड युनियनच्या माध्यमातून संघटीत राहिले पाहिजे.त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील स्वतंत्र मजदूर युनियन शी संलग्नता स्वीकारली पाहिजे.तसे न केल्यास मनुवादी विचारांच्या संघटना पद्धतशीरपणे सर्व मागासवर्गीय समाजाचे आरक्षण संपवित आहेत. त्याविरोधात एकमेव आंबेडकरी विचारांचे स्वाभिमानी लोक वैचारीक संघर्ष करू शकतात.म्हणूनच स्वतंत्र मजदूर युनियन सनदशीर मार्गाने न्यायालयात व मैदानात संघर्ष करीत आहे. 
      मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?. हे शोधण्यासाठी ही गोष्ट जरूर वाचावी.एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटले.ते सर्वजण आपापल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत होते आणि भरपूर पैसेही कमावत होते. एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवले.प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर, प्रोफेसरानी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारले.हळुहळू गप्पा रंगल्या आणि प्रत्येकांने जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करून बरेच काही सांगितले.शेवटी सर्वजण एका मुद्दयाशी सहमत झाले की,जरी आपण आर्थिक स्थितीने कितीही मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होते.आणि मग ते अचानक किचनमध्ये गेले आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणाले की,मी तुम्हा सर्वांसाठी कीटली मधे कॉफी आणली आहे तुम्ही किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी एक एक रिकामा कप घेऊन या.सर्वजण किचनमध्ये गेले. तिथे अनेक प्रकारचे कप होते.आपल्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने कप घेतले.प्रत्येकाने निवडलेले कप पाहून प्रोफेसर त्यांना म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी कप निवडताना जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे म्हणून निवडला असे दिसत आहे.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षही दिले नाही.आज आंबेडकरी विचारांची संघटना,पक्ष,तुम्हाला गरीब वाटतात.त्याच प्रमाणे आपण वेगवेगळ्या श्रीमंतांच्या संघटना,पक्षात काम करतांना दिसता.हे यातुन स्पष्टपणे दिसत आहे.
     साहजिकच आपण जेव्हा एकीकडे स्वतःसाठी उच्च दर्जाच्या वस्तू बाबत इच्छा मनात ठेवतो,तेव्हा दुसरीकडे हीच इच्छा बऱ्याचवेळी आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असतात.वास्तविक पाहता हे तर निश्चित आहे की,कप कोणताही घेतला असता तरी कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाव्हता.कप तर केवळ एक माध्यम आहे की, ज्याच्या मधुन तुम्ही कॉफी पिणार आहात.तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती, कपाची निवडण्याची नाही.तरीही सर्वांनी महागातले महागच कप निवडले. आणि आपला कप निवडल्या नंतरही तुम्ही दुसऱ्‍यांच्या कपाकडेच बघत आहात.सर्वांनी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती,ती एकच राहिली असती! हेच सर्वात महत्त्वाचे.आंबेडकरी चळवळीतील पूर्वीचे अशिक्षित लोक आर्थिकदृष्ट्या गरीब असून ही चळवळ मजबूत होती.आजचे सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी राहणारे लोक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहेत,पण चळवळ गरीब व दिशाहीन झाली आहे.
   मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विद्यार्थांचे जीवन हे कॉफीसारखेच झाले आहे. त्यांच्याकडे नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.म्हणून ते चांगल्या कॉफीची चिंता करतात.पण भारी कपाची नाही.जगात सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असते.तर सुखी माणस ते असतात जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामाजिक बांधिलकी म्हणून चळवळीसाठी उपयोग करतात.चळवळ जिवत व मजबूत राहिली तर तुमच्या येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल असेल.अन्यता मागचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.म्हणूनच मिलिंद कॉलेज,आंबेडकरी कॉलेज मधील माजी विद्यार्थी आजचे कर्मचारी अधिकारी यांनी क्रांतिकारी विचारांची आंबेडकरी कामगार चळवळ मजबूत करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सीताबर्डी नागपूर ४४००१२,खाते क्रमांक ६०२७८३८५२०३,आय एफ एस सी कोड MAHB0000005,या बँक खात्यात सढळ हस्ते मदत करावी.त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी आवाहन केले आहे. 
सागर रामभाऊ तायडे-९९२०४०३८५९. 
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

असंघटित कंत्राटी कामगारांची दैना थांबविण्यासाठी

 असंघटित कंत्राटी कामगारांची दैना थांबविण्यासाठी 



देशातील प्रत्येक राज्यातील सरकारी निमसरकारी खात्यात व कंपनीत मोठेया प्रमाणात असंघटीत कंत्राटी कामगारांची भारती सुरु आहे.त्यामुळेच त्यांचे मुक्तपणे आर्थिकदृष्ट्या सामाजिक दुष्ट्या शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे.कारण मोठ्या संख्येने असलेला हा कामगार असंघटीत आहे.म्हणूनच तो आज पर्यत दिशाहीन झाला आहे.त्याची शिक्षा त्याने कोरोना काळात कशी भोगली हे कळली असेलच अशी अपेक्षा आहे. मजदूूूरांना कामगारांना जात,धर्म,प्रांत आणि भाषा नसते तो फक्त कष्टकरी मजदूर,कामगार असतो.असे म्हणणे खुप सोपी व सुंदर असते. त्यामुळेच त्यांचे शोषण करणे सोपी असते.शोषण करण्यासाठी ब्राम्हणशाही,भांडवलशाही असलीच पाहिजे असे काही नाही.जाती जातीत प्रांता प्रांतात तसे ठेकेदार तयार करून ठेवले आहेत.तेच या मजदूरांना खेड्या पड्यातून शहरात काम करण्यासाठी आणतात.तेच निवडणुकीत मतदारसंघात यांचं मजदूरांना पैसे देऊन मतदान केंद्रावर घेऊन जातात व मतदान करण्यासाठी फक्त आर्थिक दृष्ट्या तयार करतात.मतदान करण्याचा तारखेच्या संध्याकाळ पर्यंत हे त्या पक्ष नेत्यांचे,उमेदवारांचे मायबाप उद्धार करते असतात.मतदान संपले की हे गरीब,लाचार मजदूर कामगार असतात.आज त्यांना सर्व मजदूर म्हणून ओळखतात.आता ते हिंदू नाहीत,त्यामुळे त्यांचे दुख आपले नाही.त्यासाठी कोणत्याही हिंदू नेत्यांचा कंट फुटत नाही.कोरोना महामारीने या मजदूरांना आपली काय लायकी आहे हे त्यांना खेड्या पड्यातून शहरात आणणाऱ्या ठेकेदारांनी बिल्डरांनी दाखवून दिली होती. रात्रौ रात्र त्यांनी माणुसकी विकून खाल्ली आणि मजदूरांना राहत्या जागा खाली करण्यास भाग पाडले. लॉक डाऊन सुरू झाला, बाहेर गांवी जाणाऱ्या रेल्वे गाड्या,बस एसटी सर्व वाहतूक बंद आहे.बाहेर पडून जीव धोक्यात घालून घेऊ नका.असा सल्ला एकाही ठेकेदारांनी बिल्डरांनी दिला नाही.सर्वानी आपली जबाबदारी,सामाजिक बांधिलकी टाळली होती. 
          ज्यांच्या श्रमावर यांच्या इमारती उभ्या राहतात,त्यांचातुन यांचा मोठा आर्थिक विकास होतो.तेव्हाच हे बिल्डर ठेकेदार म्हणून नांव लौकिक मिळवतात. त्यांनीच गोरगरीब कष्टकरी मजदूरांचा लॉक डाऊनमध्ये बळी घेतला,म्हणून सर्च बिल्डर ठेकेदारांवर मजदूरांची हत्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता.देशभरातील मजदूर या राज्यांतून त्या राज्यात पायी चालत प्रवास करीत होता.त्यात कितीकांचा बळी गेला यांचा अंदाजच लागु शकला नाही.त्यांची रीतसर नोंद घेतल्या गेली नाही.या गांवातुन त्या गांवात,या शहरातून त्या शहारात कामासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःहून गेले नाहीत,तर यांच्या मागे यांच्या श्रमावर जगणारे छोटे छोटे लेबर सप्लाय करणारे मुकादम,फोरमन असतात ज्यांना मजदूरांच्या मागे पन्नास शंभर रुपये मिळतात.हेच बिल्डर मोठे ठेकेदारांना मजदूर पुरतात त्यांची कुठेही रीतसर नोंद होत नाही. यांची कायदेशीर नोंद होण्यासाठी कायदे आहेत पण अंमलबजावणी करण्याची कोणीच तसदी घेत नाही.कारण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते नेते,पदाधिकारी आणि हितचिंतक हेच बिल्डर ठेकेदार,शासकीय ठेकेदार आहेत.प्रशासकीय अधिकारी वर्ग प्रत्येक बांधकामाची परवानगी देतांनाच किती कुशल मनुष्यबळ मजदूर आहेत,यांची सेफ्टी ट्रेंनिग,मेडिकल फिट प्रमाणपत्र,पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण माहिती घेतल्या शिवाय काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येत नाही.मग मुंबईत २३ मार्चला जो मजदूरांचा लोंढा बाहेर पडला त्यावर महाराष्ट्र सरकार व कामगार मंत्रालय, कामगार आयुक्तालयाचा बिल्डर ठेकेदारावर नियंत्रण नसल्याचा सबल पुरावा आहे.म्हणूनच आज पर्यत देशात कुठे ही बिल्डर ठेकेदारावर कोणती ही कारवाई झाली नाही.पोलिसांनी,वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी कोणत्या राज्यात जाणाऱ्या मजदूरांना कुठे काम करीत होता?.किती दिवसा पासून होता?. बिल्डरांचे,ठेकेदारानाचे नांव कोणीच विचारले नाही.याबाबत एकही संघटीत कामगारांची राष्ट्रीय ट्रेड युनियन असंघटीत कामगारांच्या मदती साठी पुढे आली नाही.याला ही बहुसंख्य असंघटीत कामगार मजदूर जबाबदार आहेत.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.
        लाखो,करोडोच्या संख्येने असलेला हा मजदूर मतदार म्हणून कोणाला निवडून देतो.त्या पक्षाचे सरकार नेमकं कुणाचं आणि कुणासाठी असते हे ही आदरणीय नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे करून दाखविले आहे.सरकार असते ते फक्त पैसावाल्याचे,सत्तेची ताकद असलेल्या लोकांचे आणि त्यांच्यासाठीच ते काम करते.शहरातील उच्च इमारती ज्या हातानी बांधल्या सजविल्या त्याच इमारतीच्या प्लॉट मध्ये हे उच्चवर्णीय वर्गीय आज सुरक्षितपणे राहत आहेत, हीच माणस तुमच्या जगण्याच्या सर्व सोयी सुविधा आहेत. हे कोट्यवधी असंघटित कामगार देशाचा आर्थिक विकास करणारे आहेत.हे संघटीत झाले तर देशात राजकीय सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात.हक्क हे फक्त लढून आणि लढूनच मिळत असतात.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.यासठी स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार म्हणून विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा आदरणीय जे.एस,पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडीयम नागपूर येथून निघणार आहे.त्यात सर्व क्षेत्रातील असंघटित कंत्राटी कामगारांची दैना थांबविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.येणारा भविष्यकाळ त्यांच्या हाती असणार हे सर्व कामगारांनी लक्षात ठेवावे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

गुरुवार, १ डिसेंबर, २०२२

सामाजिक बांधिलकी पासून तटस्थता नको

 सामाजिक बांधिलकी पासून तटस्थता नको



       विद्यार्थी दशे पासून जागरूक दक्ष नागरिक बनून नोकरी तुन सेवा निवृतीपार्यंत वयाच्या एका एका टप्प्यावर माणसाला सामाजिक बांधिलकी म्हणून आपुलकी किंवा त्यापासून तटस्थता मनात निर्माण होत जाते. सुरवातीला लहानपणाचे मित्र,नंतर तरुणाईतील मित्र त्यांनतर कामावरील कार्यालायातील मित्र असे आयुष्यभर माणसांचे,नातेवाईकांचे, मित्रमैत्रिणींचे अनुभव घेऊन प्रत्येक माणसात प्रगल्भता आलेली असते किंवा ती नैसर्गिक पणे येते.प्रत्येक माणसांचा प्रत्येक गोष्टीकडे,घटनेकडे,प्रसंगाकडे बघण्याचा दृष्टीकोन कालानुरूप बदलत असतातचांगली वाईट घटना घडुन गेलेल्या प्रसंगाचे अवलोकन केले जाते.आणि हे खरंच का घडलले ? मग कशामुळे घडले? यांची समीक्षात्मक मांडणी केली तर निष्कर्षाप्रत माणस पोचतात.जर त्यांची योग्य दक्षता घेऊन मांडणी केली तर माणसांत बदल घडवून आणता येतो.जीवनात योग्य वेळी आपली चूक मान्य केली. तर विचार करण्याची क्षमता वाढते. माफ करण्याची वृत्ती वाढते.सामाजिक बांधिलकी पासून तटस्थता दूर होत असते. 
         माणसांना साध्या साध्या गोष्टींवरून येणारा राग नियंत्रणात ठेवता येतो. मनःशांती मिळायला सुरुवात होते. नंतर कशाचेही काही वाटेनासे होते. आता हे चांगले का वाईट हे घडत असणाऱ्या गोष्टी ठरवत असतात. येणारा प्रत्येक प्रसंग किंवा घटना मनाला किती लावून घ्यायची ह्याचे जणू काही प्रात्यक्षिकच प्रत्येक माणसांना वेगवेगळ्याप्रकारे मिळत असते.प्रत्येक घटनेकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे.तरच कोणत्याही घटनेकडे तटस्थपणे बघता येते. आपली ह्यामध्ये काय भूमिका आहे ? ती महत्वाची आहे का ? आपल्या मताची गरज आहे का ? हे सगळे समजून घेता येते. त्याची उत्तरे मिळत राहतात. जी उत्तरे मिळतात त्याने आपल्याला त्रयस्थपणे वागता येते.आणि  सामाजिक बांधिलकी पासून तटस्थता दाखवता येते.किंवा सामाजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी स्वीकारता येते.
         काही माणसांना भावनिकदृष्ट्या वारंवार डोळ्यात येणारे पाणी थोपवण्याची कला अवगत झालेली असते. सरकारी कार्यालयातील शासन प्रशासनातील कर्मचारी अधिकारी यांना कशाचे सोयरे सुतक नसते.आपल्याला यातुन काही तरी टक्के मिळालेच पाहिजे हा त्यांचा हक्क असल्याचे त्यांना वाटते.म्हणूनच ते आपले कोण परके कोण? किंवा जी आहेत ती खरंच आपली आहेत का? किंवा मग जी होती ती आपली होती का? याचा गांभीर्याने विचार करत नाही.या वृत्तीमुळेच नात्यातील सरकारी नोकरी करणारे ज्यांच्यासाठी डोळ्यात पाणी येत होत ती माणसे आता दुरावलेली असतात. त्यांना सामाजिक बांधिलकीशी काही घेणेदेणे नसते म्हणूनच ते सामाजिक बांधिलकी पासून तटस्थता ठेऊन. आपल्याला हवी तशी माणसे वागतच नाहीत हे समजायला लागतं. मग अपेक्षांचं ओझ हळूहळू कमी होत जात आणि एक काळा नंतर आपोआपच तयार झालेलं नांत म्हणजे सेवा निवृत्तीचा काळ हा आलेला एकटेपणा जास्त सुंदर नसतो. कुणाचेही बंधन नाही, अपेक्षा नाहीत आणि त्यामुळे होणारे दुःख नाही. त्यामुळे वागण्यातला ओलावा आपोआपच कमी होतो. बोलणे कमी होते. कर्तव्य भावनेने काही गोष्टी केल्या जातात. पण त्यातील गुंतवणूक कमी होते त्यामुळे मनात तटस्थता निर्माण होत जाते.त्यालाच आपण सामाजिक बांधिलकी पासून तटस्थता असे म्हणतो.
         निसर्गाने सुरवात पासून दिलेला गोतावळा नोकरीत असतांना व्यवस्थित न संबाळल्यामुळे आपल्या आजुबाजुचा गोतावळा सेवा निवृत्ती नंतर आपोआप कमी होतो. आपले आपण उरत जातो आणि जग जास्त सुंदर वाटत नाही.आपणच एकटे पडतो.हा एकटेपणा खाण्यासाठी उठतो. जग जास्त सुंदर असते,तेव्हा आपण त्याला पाहत नाही. खरं म्हणजे ते सुंदर होतच पण आपण दुसऱ्याच्या नजरेतून बघत होतो. ही आलेली तटस्थता जगायला शिकवते. आजपर्यंत केलेल्या गोष्टी किंवा राहून गेलेल्या गोष्टी करायची एक इच्छाशक्ती निर्माण होते.पण तेव्हा कोणी साथ देत नाही.सेवा निवृत्ती नंतर कुणाकडून कसलीही अपेक्षा नसते,कोण काय म्हणेल ह्याची भीती नसते.आपण कुणाला बांधील नसतो.आपल्या कर्तव्यातून सामाजिक बांधिलकी पासून आपण मोकळे होऊ शकत नाही पण दूर राहून ती करू शकतो हे आता अनुभवायला लागते.ज्या गोष्टींमध्ये विनाकारण गुंतून पडत होतो त्या गोष्टी किती फोल होत्या हे आता सेवा निवृत्ती नंतर कळते.त्यामुळे आपली सामाजिक बांधिलकी होती कि नाही.याचे आत्मपरीक्षण प्रत्येकांनी केले पाहिजे.नागपूर जिल्ह्यातील वाडी नगर पंचायत मध्ये मुख्य लेखापाल सेवा निवृत्त झाल्यानंतर रोजंदारीवर सफाई कामकरणाऱ्या महिलांनी त्यांचा सत्कार केला.याला म्हणतात सामाजिक बांधिलकी.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.   

(खालील छायाचित्र  वाडी नगर पंचायत नागपूर जिल्ह्यात मुख्य लेखापाल सेवा निवृत्त झाल्यानंतर 
रोजंदारीवर सफाई कामकरणाऱ्या महिलांनी त्यांचा सत्कार केला.याला म्हणतात सामाजिक बांधिलकी.)

महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!.

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरीनिर्वाण दिनानिमित्याने विशेष लेख 

महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!. 


             विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!. ६ डिसेंबर २०२२ ला 66 वर्ष पूर्ण होत असताना.जिवंत पाणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती, त्याही पेक्षा जास्त आज भीती त्यांच्या विचारांच्या लोकांकडून मनुवाद्याना वाटत आहे.तरी हा मागासवर्गीय समाज पूर्ण पणे आंबेडकरी विचार स्विकारत नाही.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या क्रांतिकारी घोषणा,प्रतिज्ञा म्हणजेच त्यांनी दिलेला कोणता ही मंत्र आज समाजात पूर्णपणे रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत असतांना ही भिती कायम आहे.त्यामुळे आम्ही बाबासाहेबांना मानणारे लोक खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे ही राहलो असे म्हणता येत नाही.म्हणूनच ६६ वर्षा नंतर ही खरी श्रद्धांजली आदरांजली अर्पण करणारा भिमसैनिक,भिम अनुयायी शिष्य दिसत नाही.तर जत्रेतील हवसे,गवसे,नवसे मोठ्या प्रमाणात दिसतात.त्यांचे आत्मचिंतन परीक्षण निपक्षपाती करणारे असे विचारवंत,साहित्यिक सत्य शोधन करणारे लेखक निर्भीडपणे आणि निडरपणे लिहणारे पुढे येत नाही.मी दरवर्षी त्या प्रमाणे लिहण्याचा प्रयत्न करत असतो. 
       बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती, नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होते. मातृसंस्थाचे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे त्याकडे पाहतात.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्म समभावच्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात.त्यामुळे आम्ही "बुद्ध आणि त्याचा धम्म" हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.त्यामुळेच महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!.असे मी जाहीर आवाहन करणारे लिहतो.
          डॉ.बाबासाहेबांनी जीवन भर जो संघर्ष केला.आणि त्यांनी आपल्याला जो जो महत्वाचा संदेश दिला त्यातून आपण काय घेतले हे कोणीच सांगत नाही.बाबासाहेबांनी कोणते असे क्षेत्र सोडले नाही,ज्यात त्यांनी आपला ठसा कायमस्वरूपी कोरून ठेवला आहे.त्यांना मानणारे अनुयायी आपसात शत्रू बनून गटबाजी करून भांडत राहतात.त्यामुळेच कोणत्याही क्षेत्रात आपण यशस्वी होतांना दिसत नाही. एका बाजूला आम्ही मनुवाद्यांना शत्रू म्हणून लांब ठेवणार कि मित्र म्हणून जवळ करणार?. त्यांच्या आर्थिक मदतीवर किंवा सामाजिक सलोख्यावर आम्ही राजकीय लढाई कशी लढणार?. मोठे नेते कार्यकर्ते,पत्रकार,विचारवंत साहित्यिक योग्य मदत सहकार्य घेऊन सुरक्षित नोकरी करून, प्लॉट,टॉवर, बांगला असा सुरक्षित ठिकाणी राहतील,पण खेडया पडयातील व शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या समाजाचे काय?. यांनी बाबासाहेबांचे प्रामाणिक शिष्य किंवा भक्त म्हणून शासन कर्ती जमात बन्या करीता मतदार म्हणून कोणाला मतदान करावे?. हा प्रश्न कायम निकालात निघाला.आपल्या समाजातील शत्रू पक्षात असलेल्या मित्राला कि मित्र पक्षातील शत्रूला?. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरी निर्वाण दिना निमित्याने लाखोच्या संख्येने जत्रेत येणार कि त्यांच्या क्रांतिकारी विचारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार ?. एक ना धड भारा भर चिंद्या करणाऱ्या गट बाजांना कधी यांचे मुख्य उद्दिष्ट कोणते?.यांचे राजकीय उद्धिष्ट कोणते?. हे जाहीरपणे विचारणार आहोत कि नाही?. यांचा विचार कोण आणि कधी करणार?.शत्रू सहा सात वर्षात राज्यातील केंद्रातील राजकीय सत्ता हातात घेऊन संविधानाने दिलेले सर्व मूलभूत अधिकार नष्ट करीत असतांना आम्ही फक्त एक दिवसाचे शक्ती प्रदर्शन करून पुन्हा पुन्हा गटबाजीत गुंग राहणार आहोत काय ?. आजच्या परिस्थितीत आंबेडकरी विचारांच्या पक्षाला सुवर्ण संधी देऊन त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेल्या सर्व मागासवर्गीय समाजाला विश्वास देऊन राजकिय सत्ता परिवर्तनास सज्ज झाले पाहिजे.
           डॉ.बाबासाहेब आंबेडकरानीं असंघटीत अशिक्षित शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित शोषित समाजाची काय अवस्था असेल?.या चिंतेने ते सतत तळमळत होते.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्या साठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला. इंग्लंड,कोलंबिया सारख्या साता समुद्राच्या पलीकडे परदेशात उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद ,संघटना,व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही. कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.आजचे नेते एका आमदार,खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती धम्मभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमी च्या वापराची झाल्यामुळेच भारतीय राज्य घटनेच्या शिल्पकारांचे संविधान आमच्या समाजाच्या संस्था,संघटनांना का लागू होत नाही.एक घटना,एक नियम,एक नेता, एक झेंडा का लागू होत नाही.ज्यांचे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद निवडून येण्याची औकात नाही तो संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरवतो त्यांना प्रथम धडा शिकविला पाहिजे.समाजात ते होत नसल्यामुळेच चमचे,दलाल,अडते कंत्राटी नेते निर्माण होत आहेत. 
           त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे मागासवर्गीय शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद्धा) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.पण बदल होत हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मनुस्मृती जाळली, महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश महणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान केले होते.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले होते,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली.पिढीत शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविला.आणि आज खरेच मागासवर्गीय शोषित समाजात जास्तीचाच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाली.विविध पक्षाच्या सेल आणि होलसेलचे कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.
        माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही "बुद्ध आणि त्याचा धम्म" वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली.आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये. तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे . याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता "सर्वधर्मसमभाव "ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.
           बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो. शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला, काल्पनिकतेला,कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला आहे हे सिद्ध होतांना दिसत आहे.याचा गांभीर्याने ६६ व्या महापरीनिर्वाणदिनी विचार झाला पाहिजे.म्हणूनच महापरीनिर्वाण दिनीची जत्रा नको,खरी आदरांजली हवी!. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम.

जयभीम!. जयभारत !!.
आयु.सागर रामभाऊ तायडे.९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!

 शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!



 तथागत गौतम बुद्ध यांच्या काळात राजा प्रसेनजित म्हणून राजा होऊन गेला. या राजाचा आवडता हत्ती अचानक एका पायाने लंगडू लागला.त्यामुळे राजा प्रसेनजित फार दुःखी झाला,कष्टी झाला. ही गोष्ट ज्यावेळेस तथागत गौतम बुद्धांना कळाली. ते स्वतः होऊन राजवाड्यावर गेले. हत्तीचा पाय पाहिला तर कोठेही कोणत्याही प्रकारची जखम नाही. तदनंतर त्यांनी त्या हत्तीच्या माहुताला बोलावले. त्याच्या हातात दोरी दिली.माहुत पुढे आणि त्याच्या पाठीमागे हत्ती लंगडत चालत होता. काही वेळानंतर गौतम बुद्धांनी त्या माहुताच्या हातातील दोरी आपल्या हाती घेतली.तथागत गौतम बुद्ध पुढे आणि पाठीमागून लंगडत चाललेला हत्ती अचानक सरळ चालू लागला. हे दृष्य पाहिल्यानंतर राजा प्रसेनजित आनंदीत झाला.हर्षित झाला.आनंदाच्या भरात त्यांनी तथागत बुद्धांच्या पायावर लोळण घेतली.त्यावेळेस तथागत गौतम बुद्ध म्हणाले,मी कोणत्याही प्रकारचा अद्भुत चमत्कार घडवून आणलेला नसून या हत्तीचा माहूत एका पायाने लंगडा होता. त्यामुळे हत्ती त्याचे अनुकरण करत होता.बंधूंनो,ज्या समाजाचा नेता माहुत हा विचाराने लंगडा आणि कर्माने विकृत असेल तर त्याचा समाज सुद्धा त्याचेच अनुकरण करत असतो.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ महापरीनिर्वाण दिनी लाखो लोक दरवषी चैत्यभूमी दादरला येतात.ते खऱ्या अर्थाने श्रद्धांजली आदरांजली अर्पण करून अभिवादन करतात काय?.लाखो लोकांचे नेतृत्व कोण करतो.हत्ती सारखा अवाढव्य असलेला हा समाज कोणत्या माहुताच्या मागे लंगडत जात आहे.याचा विचारा कधी करणार?. 
    १९७२ दलित पँथरचा काळ होता. दलितांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाची सीमा नव्हती कुठे नां कुठे बलात्कार,सामूहिक बलात्कार,सामुदायिक हल्ले अन्याय अत्याचार नियमित पणे होत होते.मुंबईत राहणारे नेते पत्रकार परिषद घेऊन निषेध नोंदवून ईशारा,धमक्या देत होते.पण काही लोक पंथरचे छावे असे होते कि रात्री दोन वाजता गावात जाऊन तोडफोड करून धडा शिकवत होते.त्यांचे नांवे शेवट पर्यंत कुठे प्रसिद्ध झाले नव्हते.त्यातच त्यांची सुरक्षित नोकरी गेली.म्हणूनच तेव्हा पंथरची एक घोषणा होती. "कल करे आज,आज करे सो अभी" म्हणजेच शेळी होऊन शंभर दिवस जगण्या पेक्षा!.एक दिवस पंथर,वाघ सिंह बनून जागा.आता आजची परिस्थितीती काय आहे.एक ना धड भारा भर चिंद्या.सर्वच वाघ शेळ्या बनून मनुवाद्याचा मासाहार बनत नाही काय ?.
    बाबासाहेबांनी सांगितले होते खेडे सोडा,शहर गाठा.गांवात राहिल्यास पाटलांच्या मर्जीने काम करून मजुरी घ्यावी लागेल.आणि शहरात गेल्यावर तुमची मजुरी तुम्ही ठरवणार.म्हणूनच आज शहराचा सिमेंट कॉन्कॅरेट चा विकास सर्वांना दिसतो.पण तो बनविणारा असंघटीत कष्टकरी मजूर,कामगार कोणाला दिसत नाही.बाबासाहेबाचा जयजय कार करणारा हा समाज मजूर,कामगार म्हणून संघटीत होतांना दिसत नाही.म्हणूनच बाबासाहेब सांगत होते तुम्ही केवळ तुमच्या समाजाला शहाणे आणि जागृत करण्याचे काम करा.त्यांच्या आर्थिक शोषणाचे रूपांतर नंतर लाचारीत होणार नाही ते शहरात कोणते ही काम करून स्वाभिमानी बनून जगतील.असे त्यांना अपेक्षित असलेले बदल कुठे ही दिसत नाही.गावातील लाचार मजूर आज शहरात झोपडपट्टीत राहत आहे.तो आंबेडकरी समाजाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो.पण तो कामगार म्हणूनच पुन्हा लाचार झालेला दिसत आहे.त्यांच्या खांद्यावर निळा कमी आणि लाल,हिरवा,भगवा जास्त दिसत आहे.
        महापुरुषांच्या ६६ व्या महापरीनिर्वाण दिनाला काय समजतो.स्वताच्या आईवडिलाने दुखद निधन आपण चार पांच वर्षात विसरून जातो.पण बाबासाहेब आंबेडकर ६६ वर्षा नंतर ही विसरता येत नाही.यांचे कारण त्यांनी सामाजिक,शैक्षणिक संस्कृती धार्मिक,आणि विशेष कामगार चळवळ, राजकीय चळवळ मध्ये लक्षवेधी कार्य करून ठेवले आहे.ते पूर्णपणे यशस्वी करण्यासाठी एकसंघ बनले पाहिजे.म्हणून आपण केवळ बौद्ध समाजच घडवण्याबाबत इथून पुढे पुढाकार घेतला पाहिजे.कारण आपली अवस्था अशी झालेली आहे की, आपण स्वतःच इथे कोणत्याही क्षेत्रात स्थिर उभे नाही आहोत आणि निघालोय दुसऱ्यांना सावरायला अशा अवस्थेत आपण दुसऱ्यांना तरी कसे सावरणार आहोत ?. प्रत्येकवेळी आपण आपली लढाई एकटे लढलेलो आहोत.ओबीसी मागासवर्गीय बहुजनांना जागे करण्यासाठी आपल्याला जेवढे प्रयत्न करायचे होते,ते सगळे करून झाले आहेत. तरीही त्यांना त्याच गोष्टीत धन्यता वाटत असेल तर, तुम्ही त्यांच्यावर सक्ती करू शकत नाही.त्यापेक्षा आपण आपल्या तरुण पिढीकडे लक्ष्य देऊन,त्यांना प्रशिक्षित कार्यकर्ता बनवूया करु या.व त्यांना व्यसनाधीन होण्यापासून वाचवूयात.तरचे शेळी होऊन जगण्यापेक्षा वाघ बनून जगतील.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

रविवार, २७ नोव्हेंबर, २०२२

संविधान मानणारे जागृत आहेत काय ?

 

२६ नोव्हेंबर १९५० चे 
संविधान ७२ वर्षाचे झाले.त्यानिमित्याने विशेष लेख 
संविधान मानणारे जागृत आहेत काय ?


         डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिखित भारतीय संविधान आता कुठे लोकांना कळायला लागले.काही लोक फक्त भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार म्हणून जय जय कार करीत होते.त्यांनी ते कधी वाचाले नाही.त्यांची अंमलबजावणी केली नाही.आता केंद्र सरकार ते संपवायला निघाले तेव्हा त्याच भारतीय संविधानाचा गौरव दिन भव्य स्वरुपात देशभर साजरा करायला लागले.तरी त्यात कुठे ही गल्ली ते दिल्लीत एकमत दिसत नाही..फुले,शाहू आंबेडकर विचारधारा मानणारे आणि जाणणारे लोक,समाज मोठा उत्सव साजरा करणारे आहेत. काही संस्था संघटना जनजागृती,प्रबोधन करण्यासाठी एकत्र येऊन भव्य गौरव यात्रा,रैली काढत आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेला एक प्रश्न विचारला होता.मुठभर लोकांकडे अमाफ धन संपती आहे,तर असंख्य जनता दारिद्याच्या खोल खाईत जगत आहेत.२६ नोव्हेंबर १९५० ला आपण एका नव्या जीवनात प्रवेश करीत आहोत.आज २०२२ ला संविधान ७२ वर्षाचे झाले. पण विषमता कमी होण्या ऐवजी अमाफ वाढली.ती पण लोकशाहीच्या चौकटीत राहून सनदशीर मार्गाने त्याला संपुर्ण देश लबाडी, फसवणूक झाल्याचे मान्य करते. आणि न्यायलयात सुध्दा हेच लबाडी,फसवणूक!.देशाचा राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल मनुस्मुर्ती नुसार वागत आहेत.राष्ट्रपती पंतप्रधानाच्या व राज्यपाल मुख्यमंत्र्याच्या पाया पडतो.कोणत्या नियमानुसार?. मनुस्मुर्ती कि संविधान?.  राष्ट्रपती व 
राज्यपालांनी संविधानातील कलमांचे कदाचित थेट उल्लंघन केले नसेल, पण त्यांनी डॉ.आंबेडकरांना अभिप्रेत संविधानिक नीतिमत्तेचा ( Constitutional Morality ) खून केला मात्र हे नक्की. 
        महाराष्ट्र राज्यात रात्री राष्ट्रपती राजवट मागे घेतात. आणि अंधारात जमवजमव करून  जवळपास अंधारातच सरकारला शपथ दिली.ज्याची महाराष्ट्राच्या जनतेला जराही कल्पना नव्हती. हे सगळं राज्यपालांनी केले. हा सरळ सरळ संविधानिक नीतिमत्तेचा खून राज्यपालांनी केला.हा इतिहास लिहला गेला.ज्या संविधानाचे गोडवे आम्ही गातो त्यांचे दररोज एक एक पान नष्ट करण्याचे काम आर एस एस प्रणित केंद्र व राज्ये सरकारे करीत आहेत. आणि संविधान मानणारे त्यावर टीका टिपणी करीत आहेत.त्यामुळे संविधान मानणारे खरेचं जागृत आहेत काय हा प्रश्न निर्माण होतो. 
      संविधान न मानणाऱ्यानी साम,दम,भेद,नीती वापरून निवडणुका जिंकल्या.ज्या बहुजनाची संख्या ८५ टक्के आहे. ते मात्र कुठेच संविधानानुसार वागत नाही.त्यातील व्यक्तिगत मतभेद,स्वार्थ कमी होतांना दिसत नाही.सर्व शिक्षण,जुगाड जमावण्याची कला, तडजोड करण्याचे विशेष कला,कौशल्य असतांना बहुजन समाजातील लोक स्वतःला वंचित समजतात.म्हणजेच ८५ टक्के माणसांचा सांगाडा व संविधानाचा सांगाडा दिसत आहे. म्हणूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणतात "माझ्या मतानुसार लोकशाही यशस्वी होण्यासाठी 'संविधानिक नीतितत्त्वां' चे पालन करणे हि चौथी शर्थ आहे. आपल्या संविधानात ज्या कायदेशीर तरतुदी आहेत. त्या संविधानाचा एक सांगाडा मात्र आहेत हे आपण विसरूनच जातो. संविधानिक नीतीतत्वांमुळेच संविधानाला जिवंतपणा प्राप्त झालेला आहे. हाच लोकशाहीचा गाभा आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे भाषण - " संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठीच्या आवश्यक शर्ती " २२ डिसेंबर १९५२,पुणे जिल्हा न्यायालय,पुणे.
         सकल मराठा क्रांती मोर्चा,एक मराठा लाख मराठा.कोपर्डी बलात्कार करणाऱ्यांना जाहीर फाशी द्या!.याघटनेला राष्ट्रीय मुद्धा बनवुन मराठा समाज आरक्षण मांगणी साठी लाखो  लोकांचा मोर्चा प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून मुकसंघ शक्ती दाखवली
.पण 
त्यांचा परिणाम राज्य व केंद्र सरकारवर काडीचा ही झाला नव्हता.
 असे आम्ही समजत होतो.
 पण इतर सर्व समाजा समोर आव्हान निर्माण झाले होते. सर्व समाजातील सुशिक्षित,अशिक्षित अज्ञानी,अडाणी लोकांसमोर मात्र हे का होऊ शकत नाही.हा मोठा प्रश्न पडला होता.यामागे कोणती प्रचंड शक्ती आहे, की जे लाखो करोडो लोकांनी मोर्चे काढल्यावर न घाबरता, दखल पण घेत नव्हती.तर ते आहे या देशाचे "संविधान" !. ज्यांना संविधान मान्य नाही ते ही मोर्चे काढतात.ज्यांना संविधान माहित आहे.ते पण मोर्चे काढत आहेत.तेच संविधान किती वर्षाचे झाले हे त्या सर्वांना माहित नाही.ज्यांनी संविधान कधीच वाचले,आणि त्यानुसार कधी आचरण केले नाही.ते लोक ही संविधान समर्थन मोर्चे काढत आहेत.काही हुकूमशहा संविधाना नुसार पाचशे,हजारच्या नोट बंद करण्याचे धाडस देशात प्रथमच केल्याचे सांगत आहेत.त्यांना ही संविधान किती वर्षाचे झाले हेच त्यांना माहित नाही.असे म्हणल्यास चूक ठरणार नाही.असो.

         एखादया घरात बाळाचा जन्म झाला.कि सर्वांनाच खूप आनंद होतो मग दररोज त्याचे गोडगोड कौतुक होते,घरातील मोठी माणस त्याला आईबाबा,काका,मामा,आबा आजी,नाना नानी असे शिकवितात.मग ते बाळ दिवसा दिवसाने मोठे होते आणि शिकते.त्यावर आपल्या धर्माचे संस्कार होतात.शाळेत गेल्यावर त्याला भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत,सर्वांशी मी बंधुभावाने वागेल असे शिकविले जाते.शाळेतूनबाहेर पडल्यावर त्याला देशातील जाती धर्म त्याचे रिती रिवाज याचे ही शिक्षण आपोआप मिळते.तोच मग भारताचा जबाबदार नागरिक होतो.हाच इतिहास भारतीय संविधान बनविताना बाबासाहेबांनी डोळ्या समोर ठेवला होता.संविधान लिहताना त्यांनी अनुभवलेले सर्व दररोजचे अपमानास्पद,तिरस्काराचे जीवन पाहले होते.म्हणुन त्यांनी पिण्याचे पाणी,चूल पेटविण्यासाठी लागणारे सरपण,शिक्षण घेताना वर्गातील वागणूक,मेल्या नंतर पुरणे, जाळण्यासाठी लागणारी जागा,जमीन याचा सर्व सविस्तर आढावा भारतीय संविधानात लिहून बाबासाहेबानी भारतीय नागरिकांना दिला आहे.घटनाकारांनी संविधानात कोणत्याही जातीला,धर्माला,प्रांताला,प्राधान्य दिले नाही.कोणाचाही राग मनात ठेऊन संविधानात येऊ दिला नाही.पण दुर्दव्य भारतीय नागरिकाचे त्यांनी सत्तर वर्षात हे संविधान वाचले नाही. भारतीय नागरिकांनी सोडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानणाऱ्या त्यांच्या अनुयायांनी तरी वाचले असेल असे वाटत नाही.जर वाचले असते तर आज तो समाज जेवढा विभागला गेला आहे तेवढा विभागला गेला नसता.२६ नोव्हेंबर १९४९ जन्मलेले ते संविधान बाळ आज ७२ वर्षाचे झाले.त्याची सर्व ठिकाणी योग्य तो मानसन्मान देऊन त्याची पूजा अर्चा झाली पाहिजे. म्हणून राज्यांना केंद्र सरकारला आदेश काढावा लागला. त्याचा किती परिणाम भारतीय नागरिकावर होतो.लाखो करोडो लोकांचे मोर्चे पाहिल्यावर जाणवते.
         भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० साली अंमलात आलेले असली तरी भारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.१९३५ सालच्या या कायद्यान्वये भारताच्या अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला होता. ब्रिटिश पंतप्रधान क्लेमेंट अटली यांच्या शिष्टमंडळाच्या स्वतंत्र भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यासाठी एका मसुदा समितीच्या स्थापने विषयीच्या कल्पनेस भारतीय स्वातंत्र्य लढयातील नेत्यांनी सहमती दर्शविली होती. १९४६ च्या उन्हाळ्यात या समितीची स्थापना झाली व तिची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ रोजी सच्चिदानंद सिन्हा यांच्या अध्यक्षते खाली पुणे येथे पार पडली होती.१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारतास स्वातंत्र्य मिळाल्यावर अल्पकाळ या समितीने भारताचे प्रतिनिधी स्वरुपात काम केले होते.
           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली २५ ऑगस्ट १९४७ रोजी संविधान समितीची स्थापन झाली. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारला गेला. यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस "भारतीय संविधान दिन" म्हणून फक्त कागदावर साजरा केला जातो.संविधान दिनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि भारतीय संविधान ठेवून त्यांची शाळा कॉलेज,शासकीय,प्रशासकीय कार्यालयात गेल्या ५८ वर्ष म्हणजे २००८ प्रर्यंत साजरा केला जात नव्हता.२६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन,२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन,१५ आगष्ट स्वतंत्र दिन हे फक्त सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा घालण्यासाठी सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस असी ८५ टक्के भारतीयांच्या मनावर बिबवण्याचे काम वर्णव्यवस्थेचे समर्थन करणारी अलिखित यंत्रणा काम करते हा धोका डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी तेव्हाच ओळखला होता. म्हणूनच बाबासाहेबांनी संविधान सभेतील शेवटचे भाषणात ठामपणे सांगितले होते.भारत हा विषमतावादी मनुस्मृतीचे समर्थन करणाऱ्या लोकांचा देश होता.तो सहजासहजी भारतीय संविधान स्वीकारणारा नाही.माझ्या मते,संविधान कितीही चांगले असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर अप्रामाणिक असतील तर ते वाईट ठरल्या शिवाय राहणार नाहीत. तसेच संविधान कितीही वाईट असो, ते राबविण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, ते जर प्रामाणिक असतील तर ते चांगले ठरल्याशिवाय राहणार नाही. संविधानाचा अंमल हा संपूर्णत: संविधानाच्या स्वरुपावर अवलंबून नसतो. संविधान हे केवळ राज्याचे काही विभाग,जसे की कायदे मंडळ,कार्यकारी मंडळ,आणि न्यायपालिका निर्माण करुन देते. राज्याच्या या विभागांचे कार्य लोक आणि लोकांनी स्वत:च्या आकांक्षा आणि राजकारणा साठी साधन म्हणून निर्माण केलेले राजकीय पक्ष यावर अवलंबून राहणार आहे. राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर ते राज्यघटना,संविधानाची अंमलबजावणी होऊ देणार नाहीत.
          भारतात केवळ बाह्य स्वरुपात नव्हे,तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल,तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की,आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.याच अर्थ हा की,क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे.याचा अर्थ कायदेभंग,असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता, त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते. परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.असे आत्मविश्वासाने बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितले होते.
बाबासाहेब पुढे असे सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये, की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही. परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत. आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये.
           आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे.राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल,तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे,जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो.स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय, स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणी साठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काहीं जवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. 
         २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.हे बाबासाहेबांचे शब्द आज देशात जासेचे तसेच अंमलात येताना दिसत आहेत. म्हणूनच देशातील जनतेेेने पाचशे,हजारच्या नोटा बंदीची शिक्षा भोगली आहे. ज्यांनां लोकशाहीने लोकांच्या मतदानाने लोकांसाठी लोकउपयोगी निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले.ते लोकप्रतिनिधी भांडवलदाराच्या रक्षणा करीता गोरगरीबाचा बळी देत आहे. म्हणजे लोकशाही ने दिलेल्या संविधाना नुसार नाही.तर हुकूमशाही च्या मार्गाने चाललेला मार्गक्रम आहे.
         हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?. सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वा शिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये.या स्वातंत्र्यामुळे,कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले,तर त्यासाठी आपल्या शिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. 
          काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बले ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.हे बाबासाहेबांनी संविधान सभेत शेवटचे भाषण आहे. सविधान दिनाचा हा २६ नोव्हेंबर १९४९ ते २६ नोव्हेंबर २०२२ ला ७२  वर्षाचा प्रवास भारतीय नागरिकांनी न वाचताच पार केला.त्यामुळेच आज देशात अदुष्य युद्धाची परिस्थिती दिसत आहे.त्याला ८५ टक्के बहुजन समाज विशेष आंबेडकर विचाराला मानणारा समाज मोठ्या प्रमाणात दोषी आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही, बाबासाहेबांनी जे जे सावधानतेचे इशारे दिले होते त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करणारा समाज बाबासाहेबाचा कसा काय असू शकतो ?. लाख मराठा,बहुजन पर्व,संविधान समर्थन,इतर बऱ्याच समाजाला माहित तरी आहे काय?. संविधान लिहण्याला किती वर्ष झाले?. ७२  वर्षात त्यांची किती अमंलबजावणी झाली?.म्हणुन भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचलेच पाहिजे.तरच तो गर्वाने सांगेल मी एक भारतीय आहे. नरेंद्र मोदी व देवेन्द्र फडणवीस केंद्रात व राज्यात जो खेळ खेळत आहेत.ते कोणाच्या हिताचे आहे.संविधान समर्थक कोण व विरोधक कोण?. विचार भारतीय नागरिकांना करायचा आहे.
(संदर्भ:डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
आपला- 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई -९९२०४०३८५९ 

महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ

 महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिना निमित्याने विशेष लेख

महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ 



     भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना असंघटीत कामगारांना संघटित करण्याची प्रेरणा देणारे आणि भारतात महिलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास सतत प्रेरणा देणारे ज्योतीराव गोविंदराव फुले म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले,ग्रामीण भागात आजही जोतीराव ज्योतीराव नाही तर ज्योतिबाच म्हटल्या जाते. भटा ब्राम्हणांनी मराठा मागासवर्गीय समाजात एक म्हण पेरून ठेवली आहे.ती म्हणजे "हाले डुले महात्मा फुले" माथाडी कामगारात विशेष कोल्हापूर,सांगली,सातारा, पुणे,नगर जिल्ह्यातील कामगार मंडळी या म्हणीचा जास्त शब्द प्रयोग करतात. महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते हे त्यांना महात्मा फुले यांचा ऐतिहासिक इतिहास जास्त माहीत नाही.म्हणूनच ते असे म्हणतात.

         जोतीराव गोविंदराव फुले (जन्म ११ एप्रिल १८२७ - मृत्यू २८ नोव्हेंबर १८९०), महात्मा फुले नावाने लोकप्रिय होते. क्रांतिकारी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते, थोरविचारवंत,जातिविरोधी  समाजसुधारक आणि सिद्धास्त लेखक  होते.जातिव्यवस्थेचे निर्मूलन,स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्यासाठी संघर्ष करणारे नेते होते.त्यांनी अनेक क्षेत्रांमध्ये संघर्ष करून ऐतिहासिक कार्य निर्माण करून ठेवले आहे.त्यांना जाऊन २८ नोव्हेबर २०२२ ला १३२ वर्ष पूर्ण होणार आहेत.तरी ही स्री पुरुषातील शिक्षण,आचरण,संस्कार,कर्तव्य आणि जबाबदारीतील विषमता पाहून त्यांची आठवण झाल्या शिवाय राहत नाही. ज्यांनी सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांचा जीवन संघर्ष वाचला त्यांनाच त्यांची आठवण येते.ज्यांनी ते वाचले नाही त्यांना काहीच फरक पडत नाही.कोणता ही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे,योद्धा आणि समाजक्रांतिकारक होते.विषमता,असमानता अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमी लढणारा माणूस त्यावेळी सनातनी भटा ब्राम्हणांच्या हिट लिस्टवर होता. त्यामुळे त्यांना जागोजागी संकटाचा सामना करावा लागे.यावर त्यांनी बुद्धीचातुर्याने मात केली.आजच्या सारखी जीवघेणी नीतिमत्ता नसलेले हिंसाचारी लोक तेव्हा नव्हते,असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यावेळची परिस्थीती आम्ही वाचली आहे. पण आज लोकशाही असूनही प्रशासकीय व्यवस्थेतील मनुवादी किती हिंसक प्रवृतीचे आहेत.हे मागासवर्गीय समाजाच्या तरुणांना कशी वागणूक देतात.ते सोशल मीडियावर पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मग ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन मुलीची शाळा काढून किती मोठा संघर्ष केला असेल यांची कल्पनाच केल्या जात नाही. आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही महापुरुष,महात्मे शोधून ही सापडणार नाहीत.काही शिक्षण सम्राट आहेत पण त्यांच्या कडून कोणताही आदर्श घेण्याच्या लायकीचे ते नाहीत.

           महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते. त्याच बरोबर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक जोतीराव फुले खूप लोकांना माहिती नाहीत.जोतीरावांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामं म्हणजे कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा होय.जोतीरावांच्या उद्योगपती,कार्यकारी संचालक,अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. ख्यातनाम विचारवंत डॉ.रामचंद्र गुहा यांनी जोतीरावांना आधुनिक भारताचे "शिल्पकार" मानलेले आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर त्यांना गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे. १९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे.त्याच बरोबर ज्योतीराव फुले उत्तम बिल्डर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक होते हे आम्ही कधी वाचलेच नव्हते.पण हरी नरके सारख्या बुद्धिजीवी विचारवंतांनी त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा अभ्यास करून जगा समोर मांडला परंतु त्यावर व्यापक चर्चा होतांना दिसत नाही. ज्योतीराव फुले यांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची कामे वस्तु आजही लक्षवेधी आहेत पण त्यांची पाहिजे त्या प्रकारे दाखल घेतल्या जात नाही.कात्रजचा बोगदा,येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा कोणी बांधला?. कधी बांधला ?.या बाबत कोणी विचारत नाही.कारण या वर चर्चा सुरू झाल्यास आजच्या तरुणांना एक प्रेरणादायी सत्य इतिहास समोर येईल या भीतीने त्यावर चर्चाच होत नाही.म्हणूनच महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते.

           डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानायचेच अनेकांना आज भी काळजाला झोबंते.त्यामुळे बाबासाहेब फुलेनां गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आज ही फुलेंच्या विचारांशी प्रामाणिक राहुन उठता बसता त्यांच्या विचारला प्रतिमांना त्रिवार प्रणाम करतो.बाकी माळी ओबीसी समाजाच्या घरात महात्मा फुले सावित्रीबाई फुलेचा फोटो दिसणार नाही.आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचे घरा घरातच नव्हे तर प्रत्येक शुभ कार्याला पत्रिकेवर महात्मा फुले,सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो असतात. आज देशात "मूह मे राम बगल मे सूरी" या रीतीने गांधीवादी,सावरकरवादी आणि मनुवादी वागतांना दिसतात. ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्य निर्मिती, स्त्री-पुरुष समता,जातीनिर्मुलन,संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे ऐतिहासिक काम करून ठेवले म्हणून आज त्यांची फळ आपण मुक्तपणे खातो.म्हणूनच महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते.

     जोतीराव आयुष्यभर विनावेतन आणि विना मानधन पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्ते राहिले.त्यांनी स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून समाजकार्य केलं. ते 'पुणे कमर्शियल आणि कॉट्रॅक्टींग कंपनी'चे [Pune commercial & contracting Company] कार्यकारी संचालक होते. एक अव्वल दर्जाचे यशस्वी उद्योगपती, व्यापारी आणि नामवंत शेतकरी म्हणून जोतिरावांचा नावलौकिक होता. या कंपनीने धरणं,कालवे,बोगदे,पूल,इमारती,कापडगिरण्या,राजवाडे, रस्ते आदींची भव्य आणि देखणी बांधकामं केली. जोतीरावांच्या उद्योगपती,कार्यकारी संचालक,अर्थतज्ज्ञ आणि शेअर मार्केटविषयक योगदानाकडे जाणकारांचं अद्याप पुरेसं लक्ष गेलेलं नाही. जोतीराव हे स्वत:च्या तेलानं जळणारे सामाजिक कार्यकर्ते होते. वर्गणीवर समाजकार्य करण्याची प्रथा तोवर निर्माण झालेली नव्हती. स्वकष्टार्जित संपत्ती खर्चून त्यांनी समाजकार्य केले‘बिल्डर’ हा शब्द आज वेगळ्या अर्थानं प्रचलित झालेला आहे. त्याला ‘आदर्श’ रूप प्राप्त झाल्यानं तो वापरताना काळजी घ्यावी लागते. जोतीराव हे मूलत: एक ‘नेशन बिल्डर’ होते. त्यांच्या कंपनीचे भागीदार असलेले वा सत्यशोधक समाजाचे सदस्य असलेले अनेक मान्यवर बांधकाम क्षेत्रावर आपली मोहर उमटवून गेले आहेत. मुंबई महानगरपालिकेची मुख्य इमारत, भायखळा पूल आणि परळचे रेल्वे वर्कशॉप, मुंबईतील अनेक कापडगिरण्या, भंडारदरा जलाशय, बडोद्याचा सयाजीराव गायकवाडांचा लक्ष्मीविलास राजवाडा, आदींची बांधकामे सत्यशोधकांनी केलेली आहेत. राजू बाबाजी वंजारी यांनी मुंबईतील टाइम्स ऑफ इंडियाची इमारत, सोलापूरची लक्ष्मी विष्णू मिल आणि लक्ष्मीदास खिमजी यांच्या मुंबईतील कापड गिरण्या बांधल्या. हे सर्वजण जोतीरावांचे निकटचे स्नेही आणि जोतीरावांच्या कंपनीचे भागीदारही होते. त्यांनी सत्यशोधक चळवळीला फार मोठे योगदान दिलेलं आहे. 

      महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे त्याला मागासवर्गीय समाजाने खऱ्या अर्थाने साथ दिल्यास केंद्रात फुले शाहु आंबेडकर विचारांचे सरकार स्थापन होऊ शकते.मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर भारतात या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ठेवली आहे. पण काही मागासवर्गीय समाजातील गुलामांनी त्याला सुरुंग लावला होता.शत्रू पक्षाच्या विचारधारेच्या नेत्यांना केवळ आर्थिक लाभा करीता संघटनेत सहभागी करून घेतल्यामुळे क्रांतिकारी विचारांचे कॅडर बेस संघटन मागे पडले आणि लीडर बेस लोक पुढे आले त्यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला.त्यांचे फळ आज उत्तर भारतीय जनता भोगत आहे.व्यक्ती पेक्षा संघटन मोठे असते संघटने पेक्षा विचारधारा मोठी असते.फुले शाहु आंबेडकर विचार हे सर्वान पेक्षा मोठे आहेत. क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले आहेत.त्यांची विचारांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर क्रांतिकारी परिवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही.आज देशात जी परिस्थिती आहे.तिचा गांभीर्याने विचार करण्यासाठी महापुरुषांची क्रांतिकारी विचारधाराच यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकते. महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिना निमित्त सर्व मागासवर्गीय समाजाने आपआपल्या समाजाच्या संघटनेचे वैचारिक आत्मचिंतन करून परीक्षण करणे आवश्यक आहे.आपण कामगार,कर्मचारी अधिकारी,विद्यार्थी, शिक्षक,प्राध्यापक,वकील,इंजिनियर,डॉक्टर,व्यवस्थापक,पत्रकार,साहित्यिक,संपादक आणि शेतकरी शेतमजूर व्यापारी म्हणून कोणत्या विचारधारेच्या पक्ष संघटना,संस्था,संघटना ट्रेड युनियनचे साधे सभासद आणि किर्याशील सभासद आहात.यांचे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा फुले,राजर्षी शाहूमहाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक गुरु शिष्याच्या नात्याचा आपल्या डोळ्या समोर कोणता आदर्श आहे. गुरु शिष्याच्या महात्मा ज्योतीराव फुले यांच्या १३२ व्या स्मृतिदिना निमित्त त्यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करावे असे जाहीर आवाहन करीत आहे.महात्मा फुले क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत आणि सनातनी भटा ब्राम्हणांचे कर्दनकाळ होते.अशा क्रांतिकारी समाज परिवर्तन करणाऱ्या महात्मांच्या विचारांना व प्रतिमेला कोटी कोटी प्रणाम.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई,

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.