कष्टकरी कामगारचं क्रांती घडवितात.
भारताचा नव्हे जगाचा इतिहास तपासून पहा कष्टकरी कामगार मजुरच सामाजिक राजकीय क्रांति घडवितात,तथागत बुद्धा पासुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर पर्यंत आपण त्यांच्या मानव कल्याण आणि विकासा करीता केलेला संघर्ष,त्याग यांचे ऐतिहासिक दाखले देतो,पण त्यांच्या आदर्श घेत नाही.असंघटीत कष्टकरी समाजाचे आपले सर्वच नेते एकमेकांचे तोंड सुद्धा बघत नाहीत. फुले,शाहू आंबेडकरी विचारांचे असल्याचे सांगतात.सर्व फुले शाहू आंबेडकरी विचारांला मानणारे एकत्र आल्यासच सत्ता प्राप्त होऊ शकते.भाजप आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष आपल्या समविचारी पक्षांना एकत्र आणतात आणि सत्ता हस्तगत करतात.यांना मतदान करणारा बहुसंख्य हा असंघटीत कष्टकरी कामगार मजूर, शेतमजूरचं असतो.डॉ.बाबासाहेबां
बहुजन समाजात प्रचंड वैचारिक प्रमाणात जागृती आली आहे. परंतु राजकीय,कामगार चळवळ ठोस पर्याय मिळत नाही.कामगार,कर्मचारी अधिकारी म्हणून कार्यालयात विभागलेले असतात.आणि वसाहतीत घरात मतदार म्हणून विभागलेले असतात. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी पराभव पत्करावे लागते.त्याचा परिणाम कायमस्वरूपी समाज भोगतो. बहुजन कामगार सत्ता आणण्यासाठी बहुजन कर्मचारी अधिकारी कार्यालयात संघटित व असंघटित कष्टकरी कामगार मजूर,शेतमजूर वस्तीत संघटीत झाला पाहिजे. यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) केंद्रात दिल्लीला व राज्यात मुंबई,नागपूर मध्ये प्रचंड मोर्चेबांधणी करत असते.आपली शक्ती रैली द्वारे दाखवून देत आहे.त्याला आता चार दिवस राहिलेले आहेत.२१ डिसेंबर २०२२ ला विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा काढत आहे.महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी पदोन्नती मधील आरक्षणा सह खुल्या प्रवर्गातून देणे डिसेंबर २०१७ पासून बंद करून बहुजन कर्मचारी हे मराठा विरूध्द बौध्द हा वाद लाऊन दिला.उलट या दोन कर्मचारी मधील वाद हा आरक्षण संबंधी आहे.बहुजनाचे राजकीय पक्ष हा वाद मिटवू शकत नाही जरी बहुजन ८५ टक्के असले तरी.यावर एकच मार्ग आहे तो म्हणजे छोट्या शेतकरी व शेतमजूर व असंघटित कामगारांचे महाराष्ट्र व्यापी संघटन उभे करणे.हे संघटन छत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज,महात्मा फुले,रावबहादुर नारायण मेंघाजी लोखंडे आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त झाली पाहिजे.
बाबासाहेबांनी कामगारांना जास्त अभ्यासू असले पाहिजे असे म्हटले होते. बहुजन समाजातील मागासवर्गीयाचे कर्मचारी अधिकारी देशभरात ७ टक्के संघटित व ९३ टक्के असंघटित कष्टकरी कामगार, मजूर,शेतमजूर आहेत.घटना कलम १९ ने कामगारांना संघटित होण्याचा अधिकार दिला आहे. सोसायटी कायदा १८६० नुसार सरकारी कर्मचारी व एन.जी.ओ.संघटित होतात. तर ट्रेड युनियन कायदा १९२६ नुसार औधोगिक कर्मचारी व असंघटित कामगार संघटित होतात.हेच कामगार कर्मचारी अधिकारी वर्गाना न समजल्या मुळे ते वेल्फेअर आणि अशोसियन मध्ये सहभागी होऊन स्वताचे व येणाऱ्या तरुण पिढीचे न भरून येणारे नुकसान करीत आहे.ते संकट दूर करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन राष्ट्रीय अध्यक्ष जे.एस.पाटील साहेब यांच्या कुशल,त्यागी तत्वनिष्ट नेतृत्वाखाली २१ डिसेंबर २०२२ ला विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा काढत आहे.त्यात संघटीत असंघटीत कामगारांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि कष्टकरी कामगारचं क्रांती घडवितात हे सिद्ध करून दाखवावे.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर आवाहन केले आहे.
सागर रामभाऊ तायडे ९९२२०४०३८५९,
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा