सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

असंघटित कंत्राटी कामगारांची दैना थांबविण्यासाठी

 असंघटित कंत्राटी कामगारांची दैना थांबविण्यासाठी 



देशातील प्रत्येक राज्यातील सरकारी निमसरकारी खात्यात व कंपनीत मोठेया प्रमाणात असंघटीत कंत्राटी कामगारांची भारती सुरु आहे.त्यामुळेच त्यांचे मुक्तपणे आर्थिकदृष्ट्या सामाजिक दुष्ट्या शोषण मोठ्या प्रमाणात होत आहे.कारण मोठ्या संख्येने असलेला हा कामगार असंघटीत आहे.म्हणूनच तो आज पर्यत दिशाहीन झाला आहे.त्याची शिक्षा त्याने कोरोना काळात कशी भोगली हे कळली असेलच अशी अपेक्षा आहे. मजदूूूरांना कामगारांना जात,धर्म,प्रांत आणि भाषा नसते तो फक्त कष्टकरी मजदूर,कामगार असतो.असे म्हणणे खुप सोपी व सुंदर असते. त्यामुळेच त्यांचे शोषण करणे सोपी असते.शोषण करण्यासाठी ब्राम्हणशाही,भांडवलशाही असलीच पाहिजे असे काही नाही.जाती जातीत प्रांता प्रांतात तसे ठेकेदार तयार करून ठेवले आहेत.तेच या मजदूरांना खेड्या पड्यातून शहरात काम करण्यासाठी आणतात.तेच निवडणुकीत मतदारसंघात यांचं मजदूरांना पैसे देऊन मतदान केंद्रावर घेऊन जातात व मतदान करण्यासाठी फक्त आर्थिक दृष्ट्या तयार करतात.मतदान करण्याचा तारखेच्या संध्याकाळ पर्यंत हे त्या पक्ष नेत्यांचे,उमेदवारांचे मायबाप उद्धार करते असतात.मतदान संपले की हे गरीब,लाचार मजदूर कामगार असतात.आज त्यांना सर्व मजदूर म्हणून ओळखतात.आता ते हिंदू नाहीत,त्यामुळे त्यांचे दुख आपले नाही.त्यासाठी कोणत्याही हिंदू नेत्यांचा कंट फुटत नाही.कोरोना महामारीने या मजदूरांना आपली काय लायकी आहे हे त्यांना खेड्या पड्यातून शहरात आणणाऱ्या ठेकेदारांनी बिल्डरांनी दाखवून दिली होती. रात्रौ रात्र त्यांनी माणुसकी विकून खाल्ली आणि मजदूरांना राहत्या जागा खाली करण्यास भाग पाडले. लॉक डाऊन सुरू झाला, बाहेर गांवी जाणाऱ्या रेल्वे गाड्या,बस एसटी सर्व वाहतूक बंद आहे.बाहेर पडून जीव धोक्यात घालून घेऊ नका.असा सल्ला एकाही ठेकेदारांनी बिल्डरांनी दिला नाही.सर्वानी आपली जबाबदारी,सामाजिक बांधिलकी टाळली होती. 
          ज्यांच्या श्रमावर यांच्या इमारती उभ्या राहतात,त्यांचातुन यांचा मोठा आर्थिक विकास होतो.तेव्हाच हे बिल्डर ठेकेदार म्हणून नांव लौकिक मिळवतात. त्यांनीच गोरगरीब कष्टकरी मजदूरांचा लॉक डाऊनमध्ये बळी घेतला,म्हणून सर्च बिल्डर ठेकेदारांवर मजदूरांची हत्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता.देशभरातील मजदूर या राज्यांतून त्या राज्यात पायी चालत प्रवास करीत होता.त्यात कितीकांचा बळी गेला यांचा अंदाजच लागु शकला नाही.त्यांची रीतसर नोंद घेतल्या गेली नाही.या गांवातुन त्या गांवात,या शहरातून त्या शहारात कामासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी स्वतःहून गेले नाहीत,तर यांच्या मागे यांच्या श्रमावर जगणारे छोटे छोटे लेबर सप्लाय करणारे मुकादम,फोरमन असतात ज्यांना मजदूरांच्या मागे पन्नास शंभर रुपये मिळतात.हेच बिल्डर मोठे ठेकेदारांना मजदूर पुरतात त्यांची कुठेही रीतसर नोंद होत नाही. यांची कायदेशीर नोंद होण्यासाठी कायदे आहेत पण अंमलबजावणी करण्याची कोणीच तसदी घेत नाही.कारण सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते नेते,पदाधिकारी आणि हितचिंतक हेच बिल्डर ठेकेदार,शासकीय ठेकेदार आहेत.प्रशासकीय अधिकारी वर्ग प्रत्येक बांधकामाची परवानगी देतांनाच किती कुशल मनुष्यबळ मजदूर आहेत,यांची सेफ्टी ट्रेंनिग,मेडिकल फिट प्रमाणपत्र,पोलीस व्हेरिफिकेशन पूर्ण माहिती घेतल्या शिवाय काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येत नाही.मग मुंबईत २३ मार्चला जो मजदूरांचा लोंढा बाहेर पडला त्यावर महाराष्ट्र सरकार व कामगार मंत्रालय, कामगार आयुक्तालयाचा बिल्डर ठेकेदारावर नियंत्रण नसल्याचा सबल पुरावा आहे.म्हणूनच आज पर्यत देशात कुठे ही बिल्डर ठेकेदारावर कोणती ही कारवाई झाली नाही.पोलिसांनी,वृत्तपत्रांनी आणि वृत्तवाहिन्यांनी कोणत्या राज्यात जाणाऱ्या मजदूरांना कुठे काम करीत होता?.किती दिवसा पासून होता?. बिल्डरांचे,ठेकेदारानाचे नांव कोणीच विचारले नाही.याबाबत एकही संघटीत कामगारांची राष्ट्रीय ट्रेड युनियन असंघटीत कामगारांच्या मदती साठी पुढे आली नाही.याला ही बहुसंख्य असंघटीत कामगार मजदूर जबाबदार आहेत.असे लिहले तर चुकीचे ठरणार नाही.
        लाखो,करोडोच्या संख्येने असलेला हा मजदूर मतदार म्हणून कोणाला निवडून देतो.त्या पक्षाचे सरकार नेमकं कुणाचं आणि कुणासाठी असते हे ही आदरणीय नरेंद्र मोदी यांनी स्पष्टपणे करून दाखविले आहे.सरकार असते ते फक्त पैसावाल्याचे,सत्तेची ताकद असलेल्या लोकांचे आणि त्यांच्यासाठीच ते काम करते.शहरातील उच्च इमारती ज्या हातानी बांधल्या सजविल्या त्याच इमारतीच्या प्लॉट मध्ये हे उच्चवर्णीय वर्गीय आज सुरक्षितपणे राहत आहेत, हीच माणस तुमच्या जगण्याच्या सर्व सोयी सुविधा आहेत. हे कोट्यवधी असंघटित कामगार देशाचा आर्थिक विकास करणारे आहेत.हे संघटीत झाले तर देशात राजकीय सामाजिक क्रांती घडवून आणू शकतात.हक्क हे फक्त लढून आणि लढूनच मिळत असतात.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते.यासठी स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र प्रदेश च्या वतीने अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार म्हणून विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर प्रचंड मोर्चा आदरणीय जे.एस,पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या नेतृत्वाखाली बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ दुपारी १२ वाजता यशवंत स्टेडीयम नागपूर येथून निघणार आहे.त्यात सर्व क्षेत्रातील असंघटित कंत्राटी कामगारांची दैना थांबविण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.येणारा भविष्यकाळ त्यांच्या हाती असणार हे सर्व कामगारांनी लक्षात ठेवावे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा