सोमवार, १२ डिसेंबर, २०२२

मिलिंद कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?.

 मिलिंद कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?.



          डॉ.बाबासाहेबांनी सांगितले होते शासन कर्ती जमात बना,मेख्याच्या जागा मिळवा, त्यासाठी शिक्षण असले पाहिजे त्यासाठी बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे नागसेन वनात मिलिंद महाविद्यालय काढले होते. त्यावेळी नागसेन वनात लक्षवेधी सूचना फलक लावले होते,त्यावर लिहले होते या परिसरातील प्रत्येक विद्यार्थी हा राजा मिलिंद सारखा असावा तर त्याला शिकविणारा प्रत्येक शिक्षक हा भन्ते नागसेन सारखा असला पाहिजे.शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते पिऊन त्यांना अन्याय अत्याचारा विरोधात डरकाळी फोडली पाहिजे. असे शिक्षक व विद्यार्थी १९८० नंतर बाहेर पडले दिसत नाहीत.वाघिणीचे दूध पिऊन विद्यार्थी खूप बाहेर पडले आहेत पण त्यांनी स्वतःची नोकरी बायको,गाडी, बंगला प्लॉट आणि पदोन्नती यांचाच विचार केलेला दिसतो म्हणून ते धार्मिक शैक्षणिक व राजकीय चळवळीत दिसत नाही. उच्चशिक्षित उच्च पदस्थ असल्यामुळे ते या चळवळीत नसतील पण कर्मचारी अधिकारी म्हणून त्यांचा सहभाग कामगार चळवळीत अपेक्षित असतो.इथे ही ते आंबेडकरी विचारांच्या ट्रेंड युनियनशी जोडले नाहीत,पण मनुवादी गोळवलकरवादी, गांधीवादी,मार्क्सवादी विचारांच्या ट्रेंड युनियनशी जोडले गेले आहेत. ते त्यांना इमाने इतबारे वार्षिक वर्गणी देऊन सढळ हस्ते आर्थिक देणगी देतात.यांचे दुःख माझ्या सारख्या कामगार नेत्याला पत्रकार साहित्यिक म्हणूनच जास्त होत आहे.म्हणूनच मी जाहीरपणे विचारतो मिलिंद कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?.
     शिक्षणात नोकरीत आरक्षणा सह सर्व सोयीसवलती मिळवण्यासाठी संघर्ष करणारा असंघटित कामगार,शेतमजूर निळ्या झेंड्याखाली संघटित नसला तरी एका दिवसासाठी नेहमीच रस्त्यावर उतरून संघर्ष करण्यासाठी आंदोलनात सहभागी होत असतो.आणि सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी राहणारा नोकरी करणारा कोणत्याही जन आंदोलनात स्वतः सहभागी होत नाही,किंवा आपल्या बायको मुलामुलींना आंदोलनात सहभागी होण्यासाठी सांगत नाही.मात्र सरकारने दिलेल्या सर्व आरक्षणच्या सोयी सवलतीचा लाभ न चुकता घेतात.
      दिनांक २५ मे २००४ ची सेवाज्येष्ठता लक्षात घेऊन जेष्ठता यादीमध्ये वरच्या क्रमांकावर असलेल्या ज्या मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना दिनांक २९ डिसेंबर २०१७ पासून खुल्या प्रवर्गातील पदोन्नती पासून वंचित ठेवण्यात आले.तरी वरच्या क्रमांकाचे मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विध्यार्थाचे कर्मचारी अधिकारी झालेले अजून ही मनुवादी गोळवलकरवादी,गांधीवादी,मार्क्सवादी विचारांच्या ट्रेंड युनियन मधून बाहेर पदलेले दिसत नाहीत.त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक ७ मे २०२१ हा सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक २८ जानेवारी २०२२ च्या निर्णयानुसार तात्काळ प्रभावाने रद्ध करण्यात यावा.अपर्याप्त प्रतीनिधीत्वाबाबत संवर्गनिहाय आकडेवारी लक्षात घेऊन राज्यातील अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती, विमुक्त भटक्या जाती,विशेष मागास प्रवर्गातील कर्मचारी अधिकारी पूर्वलक्षमी प्रभावाने ३३ टक्के पदोन्नती मधील आरक्षण लागू करावे.यामागण्यांसाठी त्यागी ध्येयनिष्ठ कुशल प्रशासकीय अनुभवी आदरणीय जे.एस.पाटील राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन यांच्या कुशल नेतृत्वाखाली बुधवार दिनांक २१ डिसेंबर २०२२ रोजी विधानसभेच्या नागपूर हिवाळी अधिवेशनावर राज्यातील सर्व मागासवर्गीय कर्मचारी अधिकारी यांचा प्रचंड मोर्चा "स्वतंत्र मजदूर युनियन" व सर्व सलंग्न संघटनाच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
     मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी विचारांचे कर्मचारी अधिकारी यांनी मनुवादी गोळवलकरवादी,गांधीवादी,मार्क्सवादी विचारांच्या ट्रेंड युनियन मधून बाहेर पडण्याचे धाडस दाखवावे.आणि ते शक्य नसेल तर त्यांनी त्या संघटना मधून बाहेर न पडता.पदोन्नतीसाठी सनदशीर मार्गाने लढणाऱ्या आणि रस्त्यावर मैदानात उतरून संघर्ष करणाऱ्या स्वतंत्र मजदूर युनियन ला योग्य मदत करावी.आम्ही या आंदोलनात मोठ्या प्रमाणत संघटिता सोबत असंघटीत कामगारांना उतरून यशस्वी संखाबळ दाखवू शकतो.त्यासाठी कर्मचारी अधिकारी यांनी दोन किंवा चार असंघटीत कामगारांचे रेल्वे गाडीभाडे त्यांच्या जेवणासाठी येणाऱ्या खर्चासाठी सढळ हस्ते मदत करावी.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर आवाहन या लेख द्वारे केले आहे.
       विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने शाळा,कॉलेज मध्ये शिक्षण घेऊन सुरक्षित नोकरी करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेऊन आणि शासन कर्ती जमात म्हणून शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव ठेवण्यासाठी ट्रेड युनियनच्या माध्यमातून संघटीत राहिले पाहिजे.त्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील स्वतंत्र मजदूर युनियन शी संलग्नता स्वीकारली पाहिजे.तसे न केल्यास मनुवादी विचारांच्या संघटना पद्धतशीरपणे सर्व मागासवर्गीय समाजाचे आरक्षण संपवित आहेत. त्याविरोधात एकमेव आंबेडकरी विचारांचे स्वाभिमानी लोक वैचारीक संघर्ष करू शकतात.म्हणूनच स्वतंत्र मजदूर युनियन सनदशीर मार्गाने न्यायालयात व मैदानात संघर्ष करीत आहे. 
      मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विद्यार्थी आंबेडकरी चळवळीत कुठे आहेत?. हे शोधण्यासाठी ही गोष्ट जरूर वाचावी.एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर एकमेकांना भेटले.ते सर्वजण आपापल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत होते आणि भरपूर पैसेही कमावत होते. एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवले.प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर, प्रोफेसरानी सर्वांचे स्वागत केले आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारले.हळुहळू गप्पा रंगल्या आणि प्रत्येकांने जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करून बरेच काही सांगितले.शेवटी सर्वजण एका मुद्दयाशी सहमत झाले की,जरी आपण आर्थिक स्थितीने कितीही मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत होते.आणि मग ते अचानक किचनमध्ये गेले आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणाले की,मी तुम्हा सर्वांसाठी कीटली मधे कॉफी आणली आहे तुम्ही किचनमध्ये जाऊन स्वतःसाठी एक एक रिकामा कप घेऊन या.सर्वजण किचनमध्ये गेले. तिथे अनेक प्रकारचे कप होते.आपल्या आवडीप्रमाणे प्रत्येकाने कप घेतले.प्रत्येकाने निवडलेले कप पाहून प्रोफेसर त्यांना म्हणाले की, "तुम्ही सर्वांनी कप निवडताना जो कप किंमतीने महाग आहे तोच चांगला आहे म्हणून निवडला असे दिसत आहे.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्षही दिले नाही.आज आंबेडकरी विचारांची संघटना,पक्ष,तुम्हाला गरीब वाटतात.त्याच प्रमाणे आपण वेगवेगळ्या श्रीमंतांच्या संघटना,पक्षात काम करतांना दिसता.हे यातुन स्पष्टपणे दिसत आहे.
     साहजिकच आपण जेव्हा एकीकडे स्वतःसाठी उच्च दर्जाच्या वस्तू बाबत इच्छा मनात ठेवतो,तेव्हा दुसरीकडे हीच इच्छा बऱ्याचवेळी आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असतात.वास्तविक पाहता हे तर निश्चित आहे की,कप कोणताही घेतला असता तरी कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताही बदल होणार नाव्हता.कप तर केवळ एक माध्यम आहे की, ज्याच्या मधुन तुम्ही कॉफी पिणार आहात.तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती, कपाची निवडण्याची नाही.तरीही सर्वांनी महागातले महागच कप निवडले. आणि आपला कप निवडल्या नंतरही तुम्ही दुसऱ्‍यांच्या कपाकडेच बघत आहात.सर्वांनी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती,ती एकच राहिली असती! हेच सर्वात महत्त्वाचे.आंबेडकरी चळवळीतील पूर्वीचे अशिक्षित लोक आर्थिकदृष्ट्या गरीब असून ही चळवळ मजबूत होती.आजचे सुशिक्षित सुरक्षित ठिकाणी राहणारे लोक आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आहेत,पण चळवळ गरीब व दिशाहीन झाली आहे.
   मिलिंद कॉलेज,आंबेडकर कॉलेज मधील माजी विद्यार्थांचे जीवन हे कॉफीसारखेच झाले आहे. त्यांच्याकडे नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व वरवरचे कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.म्हणून ते चांगल्या कॉफीची चिंता करतात.पण भारी कपाची नाही.जगात सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असते.तर सुखी माणस ते असतात जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा सामाजिक बांधिलकी म्हणून चळवळीसाठी उपयोग करतात.चळवळ जिवत व मजबूत राहिली तर तुमच्या येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्ज्वल असेल.अन्यता मागचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत.म्हणूनच मिलिंद कॉलेज,आंबेडकरी कॉलेज मधील माजी विद्यार्थी आजचे कर्मचारी अधिकारी यांनी क्रांतिकारी विचारांची आंबेडकरी कामगार चळवळ मजबूत करण्यासाठी स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सीताबर्डी नागपूर ४४००१२,खाते क्रमांक ६०२७८३८५२०३,आय एफ एस सी कोड MAHB0000005,या बँक खात्यात सढळ हस्ते मदत करावी.त्याचा स्क्रीन शॉट पाठवावा.असे सागर रामभाऊ तायडे अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य यांनी आवाहन केले आहे. 
सागर रामभाऊ तायडे-९९२०४०३८५९. 
अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा