मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

हिंदूसाठी महागाई कुठे आहे?.

 हिंदूसाठी महागाई कुठे आहे?.



    सत्य हे सत्यच असत ते सहा महिने,वर्ष भर,पाच वर्ष लपवून ठेवले तरी ते सत्यच राहते.उलट असत्य गांवभर देशभर,परदेशात हजारो,करोडो तोंडातुन फिरले तरी ते असत्य असते. बुद्ध पंचशिलेचे पालन करण्यास सांगतात.ते जगातील कटू सत्य हेच आहे की, माणसं त्यांचे खूप कमी प्रमाणात आचरणार आणतात.पंचशिलेचे पालन केल्यास जगात शांतता निर्माण होते तेव्हाच आपण समाजात व देशातील वातावरणात,दळणवळणात परिवर्तन घडवून आणण्यासाठी तयारी करू शकतो. भारतात गर्वसे कहो हम हिंदू है म्हणणारे खूप संस्था संघटना आहेत.त्या समाजात देशात शांतता निर्माण होण्यासाठी कोणते काम करतात?.आज प्रत्येक राज्यात काय घडत आहे आणि काय घडविल्या जात आहे.यांचा आपण भारतीय नागरिक म्हणून विचार करणार आहोत काय?.किंवा आपली जात,गांव,तालुका, जिल्हा राज्याची परिस्थिती विसरून हिंदू म्हणून काय करणार आहोत. 
     २०१४ पासून आज पर्यंत आपण त्यांचा अनुभव घेत असाल.देशात दहशतीचे वातावरण कायमस्वरूपी राहावे असेच शिक्षण प्रशिक्षण संस्कार आर एस एस प्रणीत भाजपा सरकार आणि त्यांचे प्रशासन भारतीय नागरिकांना देत आहेत.यातूनच आपले,समाजाचे देशाचे न भरून येणारे नुकसान होत आहे.कोरोना थाळी वाजवून,दिवा बत्ती करून गेला नाही.२०१४ पूर्वी महागाई,भष्ट्राचार,बेरोजगारी,अतिरेकी हल्ले,शेतकरी आत्महत्या,आंदोलनजीवी,देशद्रोही राजकीय जात दांडगे,धन दांडगे,किती मोठ्या संख्येने होते.आज कुठे दिसतात का?.प्रत्येक माणसाला हे प्रश्न पडले पाहिजेत. प्रत्येक माणूस हा कामगार कर्मचारी अधिकारी आहे.पण कोणी संघटीत क्षेत्रात असतो तर कोणी असंघटीत क्षेत्रात असतो.त्याचा रोजगार किती पटीने वाढला.की कमी झाला. प्रत्येकाच्या वैचारिक संघटना आहेत.त्यांना  वैचारिक वारसा असतो.स्वतंत्रपणे विचार करून माणूस जगू अथवा राहू शकत नाही.मग आपण कोणत्या संस्था,संघटना किंवा पक्षाचे सभासद नसलो तरी कुटुंबात,परिसरात,तालुक्यात,जिल्ह्यात राज्यात आणि देशात नागरिक म्हणून आपली नोंद झालेली असते. मी कोण आहे हे ठरविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.त्यासाठी त्यांनी देशाचे संविधान कायदे कानून वाचले पाहिजे. म्हणजेच नागरिक म्हणून माझा अधिकार माझी जबाबदारी काय आहे ते त्याला माहिती असायला पाहिजे.
    देशातील प्रत्येक राज्यातील राजकीय पक्षांचे आमदार खासदार वेगवेगळ्या पक्षातून एकाच पक्षात का येत आहेत.हे प्रत्येक नागरिकांना माहिती आहे.त्याने आपल्या जीवनमानात कोणताही बदल घडणार नाही किंवा घडविला जाणार नाही.पण जीवना आवश्यक वस्तू त्यांना दररोज लागणार आहेत.त्या त्यांना रोख पैसे देऊन घ्याव्या लागतात. त्या घेतांना किंवा देतांना जात धर्म विचारला जात नाही.देशात कोणी काय केले याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही.
200 रुपये मध्ये सर्व चॅनेल दाखवून काँग्रेसने गोरगरीब हिंदू समाजाला लुटले होते.आता मोदीजी 499 रुपयेला सर्व चॅनेल दाखवून हिंदू समाजाच्या लोकांना वाचवले आहे. मुस्लिम,ख्रिचन,बौद्ध,शिखआदिवाशी,पारशी,जैन, मारवाडी,मराठा,ओबीसी इतर मागासवर्गीय हे हिंदू नाहीत.त्यांच्याकडून हे घेतले जातात.जे कट्टरपंथीय हिंदू आहेत त्या जनतेची होत असलेली लूट थांबवली आहे. 350 रुपये मध्ये गॅस देऊन काँग्रेसने  गोरगरीब हिंदू समाजाला लुटले होते.मोदींनी तोच गॅस 1150 रुपयांना करून आमची लूट थांबवली.2 ते 3 रुपये प्रति युनिट वीज देऊन काँग्रेसने गोरगरीब हिंदू समाजाला लुटले होते.आता मोदींजीनी 9 ते 11 रुपये प्रति युनिट वीज दर करून आमची लूट थांबवली.पूर्वी लाईफ टाईम्स इकॉमिंग कौलिंग फ्री देऊन काँग्रेसने गोरगरीब हिंदू समाजाला लुटले होते. मोदीजीनी कमीत कमी 170 रुपये महिन्याचा रिचार्ज करून आमची लूट थांबवली.पूर्वी 60 रुपये पेट्रोल आणि 48 रुपये डिझेल देऊन काँग्रेसने गोरगरीब हिंदू समाजाला लुटले होते.आता 105 रुपये पेट्रोल आणि 96 रुपये च्यापुढे डिझेल करून मोदींनी आमची लूट थांबवली.
    पूर्वी शेतकऱ्यांना 72 हजार कोटींची कर्जमाफी देऊन काँग्रेसने देशातील हिंदू शेतकऱ्यांना  लुटले होते.मोदीजीनी हिंदूच्या बड्या उद्योगपतींनाच 12 लाख कोटींची कर्जमाफी करून देशाला लुटनाऱ्या पासून वाचवले.इतर समाजाचा शेतकरी मेला तरी चालेल पण कट्टरपंथीय हिंदू उद्योगपती वाचला पाहिजे.भारतीय संविधानात तशी परवानगी नाही.म्हणूनच मनुवादी मनुस्मृती नुसार मोदी देशातील हिंदूंना रामराज्यातील सर्व सुख सोयी अठरा अठरा तास काम करून मिळवून देत आहेत.काँग्रेसने देशाचा जीडीपी 8.5 टक्क्या पर्यंत आणून देशाला लुटले होते.मोदिजीनी तोच जीडीपी 3 टक्के पर्यंत खाली आणत देशाची लूट थांबवली.काँग्रेसने देश लुटून रिजर्व बँकेत 300 टन सोने आणि 9 लाख कोटी रुपये आपत्कालीन निधी म्हणून जमा करून ठेवला होता.नरेंद्र मोदींनी सर्व सोने गहाण टाकत, आणि सर्व आपत्कालीन निधी उपसून घेत, देश लुटण्यापासून वाचवला आहे.
    मोदीजीनी सर्व सरकारी कंपन्या विकून,रोजगार संपवून देश लुटण्यापासून वाचवला आहे.अशाप्रकारे गेल्या 9 वर्षात, 24 तासांतील जगण्याचा प्रत्येक क्षण मोदींनी हिंदू धर्मातील प्रत्येक जातीला गर्वाने सांगण्यासारखा करून ठेवलेला आहे.सामान्य जनतेने नेमके काय करायचे? २ कोटी नोकऱ्या,परदेशातून आलेला काळा पैसा, त्यातून प्रत्येक हिंदूंच्या खात्यात मिळालेले १५ लाख, ६० रुपयांनी मिळणारे पेट्रोल, ४०० रुपयाला मिळणारा गॅस,१०० स्मार्ट सिटी,बुलेट ट्रेन आणि सगळीकडे होत असलेला विकास बघीतल्या मुळे भारतातील माफ करा हिंदुस्थान मधील हिंदू प्रचंड आनंदात जगतो आहे,आणि भविष्यात येणाऱ्या युवा पिढीला कट्टरपंथी हिंदू कसा असावा हा प्रेरणादायी आदर्श इतिहास लिहून ठेवतो आहे.महाराष्ट्रात नव्हे देशात मराठा बहुसंख्य मागासवर्गीय,ओबीसी यांनी गर्वसे कहो हम हिंदू है.लिहलेली पट्टी डोक्यावर बांधून घेतली पाहिजे किंवा खांद्यावर,गळ्यात घालून गर्वाने फिरले पाहिजे कारण हे सर्वच हिंदू आहेत.आणि हिंदूसाठी महागाई कुठे आहे?.शिक्षण,आरोग्य,रोजगार,अन्न,वस्त्र निवारा या शुल्क मूलभूत गरजा कडे हिंदुनी संपूर्ण दुर्लक्ष केले पाहिजे.तुम्ही धर्मासाठी जगले पाहिजे धर्माच्या रक्षणासाठी मेले पाहिजे.त्यामुळे तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल असे साधू संत,महाराज आज जाहीर पणे सांगत आहेत. राजकारणी नेत्यांनी सांगितले असते.तर लोकांचा विश्वास बसला नसता.पण अनेक वर्ष तप केलेले साधू,संत महाराज सांगतात म्हणूनच हिंदुनी विश्वास ठेवला पाहिजे. म्हणूनच हिंदूसाठी महागाई कुठे आहे?.शिक्षण,आरोग्य,रोजगार,अन्न,वस्त्र निवारा या शुल्क मूलभूत गरजा कडे हिंदुनी संपूर्ण दुर्लक्ष केले पाहिजे.तरच भविष्यकाळात मनुवादी विचारांचे रामराज्य निर्माण होईल.मग जात धर्म नसेल फक्त आणि फक्त वर्ण व्यवस्था असेल.तेच आजच्या बहुसंख्य हिंदूंना हवी आहे. त्याला माझा सारखे दीड शाहणे उगाच नांव ठेवतात.राज्यात देशात हिंदूसाठी महागाई कुठे आहे?. 
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.

आमचा वंश,आमची धर्म,आमची संस्कृती आणि आमचा नाग लोकोत्सव!

 आमचा वंश,आमची धर्म,आमची संस्कृती आणि आमचा नाग लोकोत्सव!

   प्राचीन तथागत महामानव गौतम बुध्दांच्या मुर्तीमागे फडी काढलेल्या नागाचे शिल्प दिसते. विशेषतः अनेक तोंडाचाही नाग दाखवला आहे. यामध्ये सात तोंडाचा म्हणजेच फडीचा नाग बुध्दांच्या डोक्यावरील बाजूस दिसतो. जेव्हा सिध्दार्थ गौतम दुःखाचा शोध घेण्यासाठी ध्यान साधनेला जंगलात बसले होते, तेव्हा सात नागलोकांनी त्यांचे संरक्षण करण्यासाठी पहारा दिला होता,असा इतिहास सांगितला जातो.प्राचीन काळी मनुष्यप्राणी आजच्या धर्म,पंथ,जातीत विभागायच्या अगोदर त्यांची ओळख पशु व प्राण्यांच्या वर्तवणुकीतून निश्‍चित केली जात होती. त्यास वंश म्हटले जात. शाक्य कुलवंतस गौतम बुध्द यांच्या घराण्याला हत्तीकुळातील किंवा हत्तीवाणातील म्हटले जात होते. म्हणूनच त्यांच्या घराण्यात हत्तीला सर्वोच्च मान दिला जात होता. जेथे शाक्यांची पवित्र वारसास्थळे,स्मूतिस्थळे होती तेथे हत्तीची मुर्ती दिसते.काही इतिहासकारांच्या मते, बुध्दांच्या डोक्यावर नाग शिल्प असल्याने ते नागवंशीय होते.पण त्यांच्या राजवाड्यात पांढर्‍या हत्तीचे शिल्प रेखाटले होते. ते घराणे हत्तीची आदरपुर्ती पूजा करत होते.बुध्दांची आई महामाया यांच्या मुर्तीच्या डोक्यावर नाग शिल्प नाही,पण दोन हत्ती दिसतात. बुध्दांच्या डोक्यावर नाग शिल्प असणे हे अपवाद असू शकतो.बुध्दवंशातील हे हत्ती की नागवंशातील हा मुद्दा कायम वादातीत राहणार आहे.
      ज्या वारसा स्थळे,स्मृतिस्थळात व्यक्ती मुर्तीच्या डोक्यावर नाग हे शिल्प दाखविण्याच्या मागचे कारण म्हणजे ती व्यक्ती नाग समाजातील असल्याची ओळख दर्शवते.ती व्यक्ती म्हणजेच नागलोकांचे संरक्षण,दैवत होते.म्हणूनच नागलोक त्यांना वंदन करणेसाठी त्यांच्या पवित्र स्थळांना भेटी देत असत.तिर्थाटणे करत असत.कोल्हापुरात अंबाबाईचे वारसास्थळ/स्मृतिस्थळ आहे.तिच्या मुर्तीवर नागाचे शिल्प आहे.यावरून अंबाबाई नागवंशीय आहे हे स्पष्ट होते. म्हणजेच अंबाबाई ही कोणी देव नाही.वीरमाता आहे. म्हणूनच नागलोकांनी उपकारप्रित्यर्थ तिचे स्तृतिस्थळ/वारसास्थळ उभारले. आज अंबाबाईवरून जैन व बौध्दांच्यामध्ये श्रेयवाद आहे. मनुष्याला विविध पशु व प्राण्याची ओळख दिली गेली ती ओळख पुढे ती धर्म,पंथ व जाती विभागल्यानंतरही ओळख पुसली गेली नाही. म्हणूनच जैन धर्मातील मंदिरामध्येही व्यक्ती मुर्तीच्या डोक्यावर नाग हे शिल्प दिसते. विविध धर्म,पंथ व जातीत विभागलेल्या मूळनिवासी व्यक्ती डोक्यावर नाग दिसतो. पुर्वीचे नागवंशीय असलेला महार समाज ज्या ठिकाणी राहतो तिथवर महाराष्ट्र. म्हणजेच महाराष्ट्राची सीमा मानली जाते. तसे जम्बुद्विप भारताची सीमा हे नागवंशीयांच्या वस्ती ठिकाणावरून ओळखली जाते. परकीय आर्य हे गायवंशीय म्हणून ओळखले जातात. म्हणूनच त्यांना गाय प्राणी पूज्यनिय असावी. जे आपल्याला प्रिय ते दुसर्‍यालाही प्रिय असले पाहिजे, अशा मानसिकतेचा मनुष्य असतो. कदाचित परकीय आर्य नेहमीच ऐनकेन प्रकारे गाईला इथल्या मूळनिवासींच्या माथी मारताना दिसतो. गाईच्या पोटात 33 कोटी देव असल्याची कथा परकीय आर्यांनी रचली. देवताळे बहुजनातील पुरूषसह व महिला गाईचा मुत्र हे द्रव्य तिर्थ म्हणून पितात. गाईचेच मुत्र का? ज्या गाईचा जन्म बैलामुळेही झाला असताना त्याचे मुत्र का चालत नाही? या पृथ्वीतलावर मनुष्य हे स्वतःचाही मुत्र प्राशन करणारे आहेत. पृथ्वीवरील मनुष्यासह प्रत्येक पशु व प्राण्यांच्या मुत्रामध्ये औषधी गुणधर्म आहे. जे कुणाच्या तरी विशिष्ट आजारावर जालीम ठरलेले आहे. सांगण्याचे तात्पर्य की, गाय कुळातील परकीय आर्यानी आपली गाय इतरांना स्वीकारायला लावली असल्याचे दिसून येईल.
     मूळनिवसींना आपल्याा नागवंशीय नागलोकांच्या शौर्याचा जाज्ज्वल इतिहास समजून घेवून नागलोकांची संस्कृती स्वीकारली पाहिजे. नागलोकांचा इतिहास परकीय आर्यांच्या रामायण,महाभारत ग्रंथातूनही सांगितला आहे.रामायणातील राजा रावणाचा पुत्र मेघनाथ याची पत्नी सुलोचना ही नागराजा वसू याची मुलगी असल्याचा उल्लेख आहे. महाभारत ग्रंथातील भीमाला त्याचे सावत्र बंधू कौरव बेशुध्द करून पाण्यात फेकतात तेव्हा नागलोक भीमाला वाचवतात.जेव्हा कौरव बंधू पाच पांडवाना जमीन देण्यास नकार देतात,तेव्हा पांडव इंद्रप्रस्थ जमीनीचे मालक असलेल्या नागलोकांच्या जमीनीवर कब्जा करतात.तेव्हा नागलोक व पांडवामध्ये युध्द झाले होते. कौरव व पांडवाच्या युध्द हे अंतर्गत वाद असल्याने परकीयांनी भावाच्या भांडणात पडू नये असे कर्णाने नागलोकांना सांगितल्याचाही उल्लेख महाभारत ग्रंथात आढळतो. ईशान्य भारतातील जी प्रदेश आहेत त्यातील अनेक प्रदेश स्वतंत्र भारतात नव्हती. मणिपूर,सिक्कीम ही स्वतंत्र राष्ट्रे होती. नंतर भारतात विलिन झाली आहेत. या राज्यातही नागवंशीय समाज आहे. नागालँड (नागवस्ती) नावाचे स्वतंत्र राज्यच ईशान्य भारतात आहे. महाराष्ट्राचे दोन टोक आहेत. त्यातील एक कोल्हापूर व  दुसरे टोक नागपूर. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानी नागपूर हे नागवस्तीचे ठिकाण आहे म्हणूनच त्या ठिकाणी 1956 ला आपल्या धम्म दीक्षाचा कार्यक्रम घेतला. नागपूरप्रमाणे कोल्हापूरची राजधानी ही नागभूमी होती. नागभूमीमध्ये कोल्हापूर येत होते. ‘करवीर महात्म’ या प्राचीन ग्रंथात त्याचे उल्लेख आहेत. आजच्या पन्हाळ्याचे मूळ नाव पन्हघालय होते. ‘पन्ह’ म्हणजे नाग आणि ‘आलय’ म्हणजे वस्ती किंवा भूमी. म्हणजेच नागभूमी. हिच नागभूमी राजधानी होती. दुसर्‍या शतकात राजा भोज व नंतर राजा शीलाहार यानी नागभूमीत किल्ला बांधला. त्या किल्ल्याचे नावच ‘नागकिल्ला’ आहे. त्यालाच आज ‘पन्हाळा किल्ला’ म्हणून ओळखला जातो. किल्ल्याची देखरेख नागलोक करत असल्याचे करवीर महात्ममध्ये उल्लेख आहे. कोल्हापुरात अनेक ठिकाणी बौध्द संस्कृतीची ओळख असलेल्या लेणी व गुहा आहेत. नागठाणे सारखी गावांची नावे ही नाग लोकांची वस्ती असल्याचा पुरावे देतात. प्रसिध्द ब्राम्हण लेखक-इतिहासकार वि का राजवाडे यानीही महाराष्ट्रात नागवंशीयांची सर्वाधिक वस्ती असल्याचे म्हटले आहे. अजंठा व वेरूळमधील बौध्द लेण्या सातवाहन राजानी बांधल्या. सातवाहन घराण्याचे 23 बौध्द राजा होवून गेल्याचे सांगितले जाते. हे सर्व राजे नागवंशीय बौध्द होते. 
      नागलोकांची आणखीन महत्वाची एक ओळख म्हणजे त्यांच्या नावापुढे किंवा मागे नाग हा शब्द जोडला आहे. ‘नाग’ या शब्दाचा अपभ्रंश होवून ‘नाक’ असाही शब्द प्रचलित झाला. पण ‘नाक’ म्हणजेच ‘नाग’ हे ध्यानात घेतले पाहिजे. नागलोक हे अत्यंत कर्तृत्वान व शौर्यवान असल्याचे ब्रिटीश काळातही पहावयास मिळाले आहे. 21 सप्टेंबर 1810 रोजी फ्रेंचच्या लढाईत शौर्य गाजवलेल्या धोंडनाक पुंडनाक या नागवंशीय शूरास चांदीचे पदक देवून गौरवले होते. 13 जानेवारी 1897 ला ‘व्हिजीयंट’ या ब्रिटीशांच्या जहाजावर गल्फ ऑफ कच्छ हे भूशीर पार करताना शत्रूंच्या चार जहाजांनी हल्ला केला होता. तेव्हा हवालदार मंदनाक एसनाक यानी तो हल्ला परतावून लावण्याचा पराक्रम केला होता. त्यांच्या पराक्रमाबद्दल ब्रिटीशांनी त्यांचा चांदीचे पदक देवून उचित सन्मान केला होता. तत्पुर्वी छ.शिवाजी महाराज यांच्या रियासतमध्ये नागलोकांनी (आजचे महार जातीचे लोक) त्यांच्या किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेल्या चौक्यांची जबाबदारी चोखपणे सांभाळली होती. चौकीचा प्रमुख रामनाक होता. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यानीही शुद्र पुर्वीचे नागवंशीय असल्याचे सांगितले आहे. नागवंशीयांच्या शौर्याचा अलिकडचा इतिहास म्हणजे 1 जानेवारी 1818 रोजीचा. ज्या परकीयांनी मूळनिवसींना गुलाम करून त्यांच्या गळ्यात लोटकं व ढुंगणाला खराटा बांधण्याइतपत घृणास्पद अमानवी जुलून, अत्याचार केला, त्या परकीय आर्यवंशीय पेशव्यांच्या विरोधात 500 नागवंशीय शूर सैनिकांनी (हे शूर नंतर हिंदू धर्मातील महार जातीत आढळतात) परकीय ब्रिटीशांची बाजू घेतली आणि भीमा कोरेगाव येथे 28 हजार पेशवा सैनिकांचा पराभव करून पुण्यातील विषमतावादी परकीय आर्यांची सत्ता उलथून टाकली. विजयाप्रित्यर्थ ब्रिटीशांनी सन 1923 ला भीमा कोरेगावात 75 फूट उंच विजयस्तंभ उभारला. त्या स्तंभावर विजयी नागलोक शूर सैनिकांची नाव कोरली आहेत. 
     सम्राट अशोक मौर्य यानी उभारलेले बौध्दांचे राज्य सम्राट अशोकांचे आठवे वंशज बृहद्रथ मौर्य यांचा खून करून परकीय आर्य शृंगवंशीय पुष्पमित्र शृंगाने ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याने जम्बुद्विप भारतमुक्त बौध्द करण्याची मोहिम चालवली. त्यासाठी भिक्खूंची मुंडकी छाटणार्‍यांना भरघोस इनाम जाहीर केले. शृंगाने आपल्या धर्माचे शंकराचार्य पीठ उभारले. मनुस्मृती आणली. चातुर्वर्ण्यव्यवस्थेवर शिक्कामोर्तब केले. परिणामी नागवंशीय शृंगाच्या आजच्या नामांतरित झालेल्या हिंदू धर्मातील सुमारे साडे सहा हजार जातीत विभागले गेले. त्यातील एक जात म्हणजे महार. सम्राट अशोक काळात महार जातीचा कुठेच उल्लेख सापडत नाही. बौध्द काळात राजा मातंग होवून गेला. आज-कालचे काही लेखक त्या मातंग राजाला आजच्या मातंग/मांग जातीला जोडून तो राजा मांग/मातंग होता म्हणून आजही मातंग/मांग समाज आहे असे लिहितात. पण ते अक्षम्य चुकीचे आहे. 12 व्या शतकाच्या दरम्यान एक संत मातंग होवून गेले. त्या संताचे अनुयायी म्हणजेच आजचे मातंग. हा सांगितलेला इतिहास सत्य वाटतो. बौध्द काळातील राजांची नावे आजही बौध्द आपल्या वंशजांना देताना दिसतात. कदाचित बौध्द काळातील मातंग राजाचे नाव संत मातंगच्या आई वडीलांनी दिले असावे. तेव्हा महार समाजासह बहुजनातील इतर समाजानी जातीला चिटकवून राहू नये. जातीचा अभिमान बाळगता कामा नये. इतर अस्पृश्य जाती, भटके, भटके विमुक्त, ओबीसी, एसबीसी प्रमाणे महार जात ही देखील बाटलेली जात आहे. महार जातीवरही न पुसून येणारा गुलामाचा शिक्का बसलेला आहे. महार जातीच्या लोकांनी कितीजरी कर्तृत्व व शौर्य गाजवले तरी हिंदू धर्मातील उच्च जातीचे लोक त्याना कसलाच मान-सन्मान देणार नाहीत. उच्च जातीत घेणार नाहीत. ‘तुम्ही आमचे गुलाम आहात’ असेच म्हणणार. हे त्याचे म्हणणे काहीच गैर नाही. डॉ.बाबासाहेब गुलाम जातींच्या वस्ती नष्ट झाल्या पाहिजेत या मताचे होते. दि. 3 जानेवारी 1940 रोजी सातारा जिल्हयातील मेढे या गावी बाबासाहेबांची सभा झाली. त्या सभेत म्हणाले, ‘गावोगावचे महारवाडे आपण नष्ट करून टाकले पाहिजेत. प्रत्येक महारवाडा हा माणसांचा कोंडवाडा व गुलामवाडा होय.महार वतन व महारवाडा या दोन गोष्टी सनातन गुलामगिरीच्या द्योतक आहेत. त्या नष्ट झाल्याच पाहिजेत. स्पृश्यांनी या गोष्टी नष्ट करण्यास कितीही आडकाठी केली तरी त्या गोष्टी नवीन स्वराज्यात मी नष्ट केल्याशिवाय राहणार नाही.’ बाबासाहेबांना महार जातीचा अभिमान वाटत नव्हता. 12 जानेवारी 1936 रोजी पुण्यात झालेल्या कार्यक्रमातील भाषणात बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे म्हणतात, ‘मला स्वतःला महार जातीचा विशेष अभिमान वाटत नाही. मी केवळ त्या जातीत जन्मलो आणि माझ्या शिक्षणाचा व ज्ञानाचा फायदा आपल्या अज्ञ बांधवांना द्यावा म्हणून त्या जातीत प्रथम कार्याला सुरवात केली.’ म्हणून त्यानी तत्पुर्वी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथे नामांतरित हिंदू धर्म सोडण्याची घोषणा करताना म्हणाले, ‘मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही.’ याचा समान अर्थ असा ‘मी महार म्हणून जन्माला आलो असलो, तरी महार म्हणून मरणार नाही.’ बाबासाहेबांनी आपले बोल खरे करून दाखवले. सन 1956 ला त्यानी बौध्द धम्माची दीक्षा घेवून आपली मूळओखळ नागवंशीय असल्याचे कायमस्वरूपी रजिस्टर केली.
      तेव्हा केवळ महारानीच नव्हे तर मांग,संत मातंग समाज,चांभार,चर्मकार,संत रोहिदास समाज,भंगी,संत म्हेत्तर समाज,ढोर,वीर ककय्या समाज, सर्व भटके जाती,जमाती समुह, आदिवासी जाती,जमाती समुह,कुणबी,लोहार,सुतार,कुंभार,लोणार,सोनार,कासार,धनगर, सनगर,न्हावी,शिंपी,परिट,धोबी,कोष्टी,कोळी,साळी,माळी,तेली,वाणी,तांबोळी या जातीतील लोकांनी आपण नागवंशीय आहोत हे ध्यानात घेतले पाहिजे. कामावरून जाती पाडल्या हे ध्यानात घेतले पाहिजे. नाग समाजाचा इतिहास शौर्याचा, कर्तृत्वाचा व स्वाभिमानाचा, देणेवालाचा आहे. जातीचा इतिहास अवमानकारक, दुराभिमानाचा, मागनेवालाचा आहे. जात ओलांडू नये असा दंडकच केला. त्यामुळे बहुजनांची प्रगती कुंटली. भारतीय संविधानातील कलम 15 मुळे धर्मातील मनुस्मृतीने लादलेली जातीवरील बंधने उठली गेली असली, तरी या जातीचे लोक हे मूळचे नागवंशीय आहेत हे ज्या काळात जाती नव्हत्या त्यावरून स्पष्ट होते. नागलोकांची स्वतंत्र द्विप होती. संस्कृती स्वतंत्र होती. राहणीमानी सुसंस्कृत होती. बुध्दांच्या धम्मामुळे निसर्गाला मानणारे व विज्ञानवादी उपासक होते. उत्सव/सण वेगळे होते. या उत्सवांपैकी पाच राजांचा नागलोक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात होता. ते पाच नागराजे म्हणजेच राजा अनंतनाग, राज वासुकीनाग, राजा तक्षकनाग, राजा करकोटकनाग व राजा ऐरावतनाग हे होय. या पाच नागराजानी नागवंशीय मूळनिवासींबरोबरच इतर प्रजेचे शत्रूपासून संरक्षण केले, त्यांच्यासाठी विविध योजना राबविल्या. धर्मनिरपेक्ष धोरण राबविले. म्हणूनच त्या पाच राजांचा नाग लोकोत्सव  जम्बुद्विप भारतात साजरा होत होता. काही भागात विशेषतः महाराष्ट्रातील नागलोक या उत्सवाचा उल्लेख नागपंचमी म्हणून करत. आजही नागपंचमी उत्सवाच्या मंगलदिनी आपल्या दारात नागलोकांचे वाण असलेल्या नागाचे चिखल मातीने शिल्प काढून त्याची आदरपुर्ती पूजा करतात. बहुजन महिला पाच दिवस रात्रभर प्रबोधनात्मक गाणी म्हणत, झिम्मा-फुगडी इतर खेळ खेळतात, झाडाला दोर बांधून पाळणा करून झोके घेतात, नागपंचमीला सुजाता खीरसह, पुरण पोळी केली जाते. नागपंचमी उत्सव ब्राम्हण करत नव्हते. विरोध करत होते. म्हणूनच नागाच्या शिल्पाजवळ शेेंडी व जाणवेधारी ब्राम्हणाचे विडनात्मक शिल्प करून तो बिडी फुकत असल्याचे दृश्य दाखवण्याची परंपरा आजही जपली जाते. 
       नागराजा लोकोत्सव म्हणजेच नागपंचमी उत्सवाचा इतिहास मनुवाद्यांनी सापाशी जोडून बरोबर नाग लोकोत्सव दिवशीच सुरू केला.‘शेतात राहणारा साप हा प्राणी शेतकर्‍यांचा मित्र आहे,’ असे सांगून नागपंचमी उत्सव हा मौसमी ऋतुमध्ये येत असल्याने शेतकरी श्रावण पौर्णिमाच्या पंचमी दिनी नागपंचमीला नाग पूजा करतो अशी अख्यायिका रंगवली गेली. नाग दूध पितो असे सांगून नाग शिल्पावर दूग्धाभिषेककाची परंपरा सुरू केली. पण कोणताच साप गाई, म्हैशीचे दूध पित नाही. ते दूध त्याना विष ठरते. हा इतिहास अत्यंत चुकीचा आहे. नागलोक हे सापाची नव्हे, तर त्या लोकराजे पाच नागराजाच्या माध्यमातून नागलोकांचा उत्सव होत असल्याचा सत्य इतिहास आहे. परकीय आर्यांनी नाग लोकोत्सवाला पर्याय म्हणूनच गणपती उत्सव पुढे आणल्याचे वाटते. नागलोक नागाचे शिल्प करतात, तिकडे गणपतीचे शिल्प. नाग शिल्पाची मिरवणूक काढली जाते. येथे गणपतीची मिरवणूक काढली जाते. नागलोक उत्सव पाच दिवस साजरा केला जात होता. गणपती उत्सवही पाच दिवसचा केला आहे. नागवंशीय महिला जो आनंद घेतात तोच आनंद गणपती उत्सवात महिला बाहेर येवून गाणी म्हणणे, महिलांचे खेळ खेळतात. गणपती उत्सवातही खीर व पुरणपोळी केली जाते. आज जरी बहुजन गणपती उत्सव करत असले तरी हेच नागलोक गणपती उत्सव करू लागल्याने गणपतीची विटंबना होवू लागली, ब्राम्हणांचा गणपतीदेव बाटला गेला म्हणून गणपती मुर्ती पाण्यात टाकण्याची प्रथा सुरू केल्याचे सांगितले जाते. सद्या बहुजन जितकेही सण साजरे करतात ते ब्राह्मणी धर्मातील आहेत. त्यांनी त्याचे मूळ सणच विसरले आहेत, किंबहुना पर्याय सण आणून त्याना विसरणे भाग पाडले आहे.  नागालाही गद्दार केले. आजही एक म्हण आहे सापाला दूध पाजू नये. तो त्या दूधाचे उपकार मानत नाही. तो दूध पाजणार्‍यांवरच उलटतो. संक्षिप्तामध्ये गद्दार असतो. म्हणजे ते सापाला नव्हे तर नागवंशीयांना म्हटले आहे. जर नागलोकांना आसरा दिला, मदत केली तर ते त्यांच्या लढण्याची बळ येईल आणि पुन्हा ते आपले वैभव प्राप्त करतील हेच सापाला दूध पाजू नये यातून सांगण्याचा प्रयत्न झाला आहे. 
      आता बदलण्याचे संविधान-लोकशाहीने अधिकार दिले आहेत. आपला वंश, आपला धर्म आणि आपली संस्कृती जपली पाहिजे. त्यासाठी आपल्या धर्मातील पारंपारिक उत्सव/सण साजरे केले पाहिजेत. देव ही भ्रामक कल्पना आहे. जे कोणी उध्दार केला तो आई-बापाच्या पोटी जन्म घेतलेल्या मानवानीच. अलिकडचे उदाहरण म्हणून छ.शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर ही महामानव समोर आहेत. तरीही लोक गद्दारासारखी वागतात. डॉ.बाबासाहेबांनी जे करू नका म्हणून सांगितले तेच करतात. ब्राह्मणी सण साजरे करतात. पुढील महिन्यात गणपती उत्सव साजरा करतील. त्यानंतर नवरात्र करतील, मग दसरा, नंतर दिवाळी साजरा करतील. पण आपल्या बौध्द नाग संस्कृतीचे सण साजरे करणार नाहीत. हे उद्या सोमवार दि.21 ऑगस्ट रोजी दिसून येईल. बहुजन ब्राम्हणी धर्मातील संस्कृतीप्रमाणे नागपंचमी करतील पण बौध्द संस्कृतीप्रमाणे नाग लोकोत्सव साजरा करणार नाहीत. कदाचित नागवंशातील डीएनए बदलला असला पाहिजे.आज बाबासाहेब आंबेडकर असते तर त्याना वेड लागण्याची वेळ आली असती. इतकी लोक कृतघ्न आहेत. करा गणपती उत्सव, जावा नाग मंदिरात दूध नासवायला.  नागपंचमी साजरी करायला... पण आपण कुणाची नागपंचमी करतो त्याचा तरी इतिहास वाचा किंवा आम्ही सांगितल्याप्रमाणे वागा. कृती करा.
देवदास बानकर ९२२५८०६९९०,
संपादक दैनिक मुक्तनायक (कोल्हापूर) 

आगरी समाजाच्या निलाब्जने एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) पदवी मिळवुन इतिहास घडविला.

 आगरी समाजाच्या निलाब्जने एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) पदवी मिळवुन इतिहास घडविला.

आगरी समाजात रामदासी बैठकीची मोठी परंपरा आहे.त्यात एखाद्या आगरी समजाच्या तरुणाने शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे हे समजून शिक्षण घेतले आणि त्यात त्याने डॉ.डी वाय पाटील विद्यापीठ पुणे येथील एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) पदवी मिळवुन इतिहास घडविला अशी नोंद झाली पाहिजे. निलाब्ज कुणाल भोईर हा असा तरुण आहे ज्याने वडिलाचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन शिक्षण घेतले.त्यांच्या कष्टाचे ते फळ म्हणजेच एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) पदवी आहे.कुणाल भोईर यांच्या निलाब्ज चे अभिनंदन करतांना कुणाल भोईर यांच्या संस्कार व विचारात  निलाब्जची वाढ झाली,यामध्ये कष्ट,पाठबळ, व मुलानी बघितलेला वडीलांचा उदारपणा,कष्ट,परिवर्तन व पुरोगामी विचारांची कास धरलेली वडीलांची वाट या सर्व उत्तम गुणात निलाब्ज ची वाढ झाली, त्यामुळे त्यांचे गुणही त्याच्यात आहेत.तो कायम यशस्वी होईल व निलाब्जने एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) पदवी मिळवुन समाजात प्रतिष्ठा निर्माण करुन भोईर घराण्या बरोबरच राज्य व देशाचे नाव उज्वल केले.                       
कुणाल भोईर यांच्या छत्रछायेखाली वंचित घटकांतील अनेक मुलमुली यशाचं शिखर गाठण्यासाठी अतोनात प्रयत्न करीत आहेत. आणि त्यांच्या आर्थिक पाठबळामुळे अनेकांनी यश मिळविले आहे. त्यात स्वताच्या मुलांने एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) हि पदवी मिळवुन आपली मान स्वाभिमानानी उंचावली आहे. निलाब्जने एम.ए.सी.बायो टेक्नॉलॉजी (मास्टर) पदवी मिळवुन इतिहास घडविला. त्याबद्दल राज्य भरात कवी गायक कलावंत यांच्या वतीने हार्दिक अभिनंदनाच वर्षाव होत आहे. सागर तायडे पत्रकार साहित्यिक,कामगार नेते यांनी ही निलाब्ज व कुणाल भोईर यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या आहेत.कुणाल भोईर हे तथागत गौतम बुद्धाच्या धम्माचे महा उपासक धम्मोधर म्हणून ओळखले जातात.आगरी समाज ओबीसी समाजातील एक प्रमुख घटक आहे.कुणाल भोईर हे एक यशस्वी उद्योजक व उद्योपती दानशूर व्यक्तिगत म्हणून प्रसिद्ध आहे.त्यांच्या मुलाचे व उद्योगाचे नांव हे निलाब्ज हे ऐतिहासिक तथागत गौतम बुद्धाच्या विचारांचे प्रतिक म्हणून ठेवले आहे.ते निसर्गरम्य सफाळे जिल्हा पालघर येथे राहतात.त्यांच्या इमारतीचे नांव संविधान भवन आहे आणि त्यांच्या कुटुंबात बुद्धाच्या प्रतिमेसह विचारांचे आचरण जागोजागी प्रेरणादायी व लक्षवेधी आहे. म्हणूनच निलाब्ज व कुणाल भोईर यांचे हार्दिक अभिनंदन कौतुकास पात्र आहे.
सागर रामभाऊ तायडे यांसकडून    

सुतार समाजाने ओबीसींचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.

 सुतार समाजाने ओबीसींचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.


    ओबीसी सुतार समाजाची लोकसंख्या 45 ते 50 लाख असल्याचे मला सोशल मीडियावर समजले परंतु,एकही समाज संघटना किंवा ओबीसी सुतार समाज नेतृत्व ओबीसी, संविधान आणि जनगणना या महत्वाच्या विषयावर ओबीसी सुतार समाजात हजारोंच्या संख्येने समाज एकत्रित करून समाज जागृती करण्यासाठी धजावत नाहीत हि समाजात सत्य परिस्थिती आहे त्यामुळे सुतार समाजात खऱ्या अर्थाने ओबीसी, संविधान आणि जनगणना या बाबतीत समाज जागृती निर्माण होत नाही.ओबीसी सुतार समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी अनेक राज्यस्तरीय नामकरणाचा साज चढवलेल्या सामाजिक संघटना समाजात कार्यरत आहेत आणि यांचे राज्यभरात तालुका ते राज्यपातळीवर जबाबदार पदाधिकारी कार्यरत आहेत यांच्या मधुनच एक जबाबदार राज्यस्तरीय अध्यक्ष या पदाची निर्मिती केली जाते सोबतच असंख्य पदांची निर्मिती करून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी नियुक्त करतात अशा पध्दतीने एखादी संघटना निर्माण करून भविष्यात याच समाज संघटनेच्या माध्यमातून अगोदर जिल्हा स्तरावर नेतृत्व म्हणुन उदय होतो नंतर हळुहळु हाच समाज नेतृत्व म्हणून राज्यभरात राज्यस्तरीय समाज नेतृत्व म्हणुन समाजात उदयास येतो नावारूपाला येतो.
     देशातील प्रत्येक मतदार संघात ५२ टक्के ओबीसी लोकसंख्या असल्यामुळे कोणत्या जातीचा,पक्षाचा उमेदवार निवडून द्यावा हे ओबीसी समाज ठरवू शकतो.म्हणजेच तो देशातील सर्वात मोठा किंग मेकर असायला पाहिजे. हे अधिकार त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिले आहे त्याचा उपयोग समाज जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात समाज नेत्यांनी समाजहितासाठी करणे गरजेचे असते.विश्‍वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील एक मोठा समुह आहे. पण त्यातील काही लोक स्वत:ला ब्राम्हण समजत असतील तर त्यांनी ओबीसी म्हणून घेऊ नये आणि ओबीसीची फसवणूक करू नये. देशात ५२ टक्के ओबीसी आहेत यांची जनगणना कधी झाली होती. त्यात ३,७४३ जाती होत्या त्यांना शिक्षण व नोकरीत २७ टक्के आरक्षण होते. महाराष्ट्रात आरक्षण १९ टक्के होते.ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवून ११ लाख ओबीसी लोकप्रतिनिधी संपविले गेले.देशातील प्रत्येक मतदार संघात ५२ टक्के ओबीसी लोकसंख्या असल्यामुळे कोणत्या जातीचा,पक्षाचा उमेदवार निवडून द्यावा हे ओबीसी समाज ठरवू शकतो.म्हणजेच तो देशातील सर्वात मोठा किंग मेकर असायला पाहिजे. हे अधिकार त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिले आहे. त्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच ओबीसीना मावळे म्हणून संघटीत केले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राम्हणेतर आणि शाहू महाराजांनीही ओबीसींना स्थान दिले होते. 
   आरक्षण एससी, एसटीलाच आहे.आंबेडकरी विचारांचे लोकच जास्त आंदोलने करतात.कारण त्यांना जास्त फायदा मिळतो हे ओबीसींना जास्त सांगितले जाते. ते शंभर टक्के सत्य आहे असे समजणारे ओबीसी सर्वच राजकीय आरक्षण काढल्यावरही शांत आहेत.इतरांना त्याचा फायदा मिळत नाही असे समजणार्‍यांनी आरक्षणा जातीची संख्या आणि टक्केवारी समजून घ्यावी.विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात समाजकार्य करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था,संघटना कार्यरत आहेत आणी या सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेशी जोडलेले असंख सामाजिक पदाधिकारी आहेत.या विश्‍वकर्मीय सामाजिक संघटना व संस्थेच्या माध्यमातून समाज नेतृत्व आणी युवा नेतृत्व उदयास येतात किंवा निर्माण होतात.पण त्यांना वैचारिक वारसा नसल्यामुळे त्यांचा वापर प्रत्येक आंदोलनात होत आला आहे. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी विश्‍वकर्मीय सुतार समाजात वैचारिक निर्भीड, निष्पक्षपणे लिहणारे पत्रकार,साहित्यिक,विचारवंत तयार झाले पाहिजे.मी या विषयी कायम तोडक्या मोडक्या शब्दात लिहत असतो.काही लोक मला दिडशहाणे म्हणत असतील तरी मी त्यांना शहाण्यासारखे लिहण्याचे समाजात आवाहन नेहमीच करतो.
      समाजाने एकत्र बसून चर्चा,संवाद,वादविवाद केल्यास त्यातून सामाजिक क्षेत्रात विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणी या सामाजिक कार्यक्रमात वैचारिक सामाजिक बांधिलकी जाणणारे असंख्य कार्यकर्ते तयार होतात, सामाजिक कार्यकर्ते घडविले जातात. ओबीसी विश्‍वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा घटक असताना सुतार सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी आणी युवा नेतृत्व तसेच सामाजिक कार्यकर्तेही ओबीसी बद्दल समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी अपेक्षित असे जमिनीवर उतरताना दिसत नाहीत. ही मोठी सुतार समाजाची शोकांतिका म्हणावी लागेल.विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक संघटना व सामाजिक संस्थांची सामाजिक जबाबदारी ही सर्वव्यापी राज्यव्यापी होऊ शकते.नव्हे विस्तारित आहेच.ओबीसी सुतार समाजात सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेचे जाळे हे राज्यभरात तालुका पातळी ते थेट राज्यस्तरीय पदाधिकारी कार्यरत आहेत.पण नेमकी दिशा नसल्यामुळे ते दिशाहीन दिसतात. सुतार सामाजिक क्षेत्रात ओबीसी बद्दल,ओबीसी आरक्षण आणि इतर ओबीसी बद्दल समाजात समाज जागृती निर्माण होत नसल्याने विश्‍वकर्मीय सुतार समाजात ओबीसी,संविधान आणि जनगणना बद्दल माहितीचा अभाव जाणवतो. 
   सुतार समाजात ओबीसी बद्दल समाजाला माहिती व्हावी ओबीसी बद्दल,जनगणनेच्या बाबतीत तसेच ओबीसी आरक्षण इत्यादी बद्दल जमिनीवर उतरून समाज जागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे.जेणेकरून ओबीसी सुतार समाजात ओबीसी बद्दल जागरुकता निर्माण होईल आणि ओबीसी संविधाना बद्दल तरूण पिढीला माहिती होईल.समाजात तरुण पिढीला ओबीसी बद्दल,आरक्षण आणि जनगणनेच्या बाबतीत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला जे ओबीसी म्हणून संवैधानिक अधिकार बहाल केले आहेत त्या बद्दल माहिती होईल त्याचा परिणाम सुतार समाजात जागरुकता निर्माण होईल. विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रातील समाज नेतेमंडळी आणी युवा नेतृत्व मंडळी यांनी ओबीसी बद्दल समाज जागृती निर्माण करण्यासाठी समाज जागरूकता अभियान राबवणे गरजेचे आहे काळाची गरज आहे. 
    त्यासाठी गरज भासल्यास आपापल्या सामाजिक संघटना आणी सामाजिक संस्थेच्या असंख्य सामाजिक पदाधिकारी वर्गाचे व असंख्य कार्यकर्त्याचे सहकार्य घ्यावे,मदत घ्यावी. सामाजिक संघटना व सामाजिक संस्था या राज्यभरात विस्तारीत असल्याने हजारोंच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा जोडलेले आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना व सामाजिक संस्था आणि समाज नेतेमंडळी आणी युवा नेतृत्व मंडळी यांच्यासह तमाम पदाधिकारी व तमाम कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आणी नेतेमंडळी आणि युवा नेतृत्व यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली विश्‍वकर्मीय सुतार समाजात ओबीसी, आरक्षण आणी जनगणनेच्या बाबतीत रस्त्यावर उतरून ओबीसी सुतार समाजात जमिनीवर समाज जागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे व अपेक्षित आहे.
    सुतार सामाजिक क्षेत्रातील राजकीय पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली सुद्धा ओबीसी समाज जागृती निर्माण करण्यासाठी भलामोठा हातभार लागू शकतो, कारण राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी म्हटल्यावर त्यांचा समाज जनसंपर्क,जनतेशी संपर्क जास्त प्रमाणात असतो त्याचा निश्चितच उपयोग हा ओबीसी बद्दल जनजागृती करण्यासाठी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात होऊ शकतो.याव्यतिरिक्त विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात अनेक दिग्गज, अनेक धुरंधर,मातब्बर,जेष्ठ आणी श्रेष्ठ अनुभवी लोक आहेत. समाजात अनेक मान्यवर सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक क्षेत्रातील मानसन्मान,सामाजिक क्षेत्रातील विविध प्रकारचे सामाजिक सन्माननजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले समाजरत्न, समाज भुषण आहेत. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील समाजकार्याचा ,अनुभवाचा उपयोग सुद्धा सामाजिक क्षेत्रात ओबीसी,संविधान आणि जनगणना या बाबतीत समाज जागृती करण्यासाठी निश्चित होऊ शकतो यासाठी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 जय ओबीसी जय विश्वकर्मा जय संविधान 
प्रमोद सुर्यवंशी चिखली मातृतीर्थ बुलडाणा ८६०५५६९५२१
     

शुक्रवार, १८ ऑगस्ट, २०२३

घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?.सागर तायडे.

 घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?.सागर तायडे.



तुम्ही बौद्ध आहात काय?. तुम्ही स्वताला बौद्ध समजता पण आचरण कसे करता. बुद्धाच्या पाय पडून पुजा केली पाहिजे की प्रचांग प्रणाम?. किती लोकांना यातील फरक माहिती आहे. म्हणूनच आज मी आपल्या समोर घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा हे सांगण्यासाठी उभा आहे.वर्षावास २०२३ राहुल बुद्ध विहार,राहुल नगर वाशीनाका आर सी एफ मार्ग चेंबूर येथे २८ व्या दिवशी सागर तायडे धम्म प्रचारक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तेव्हा ते बोलत होते.
   घरात बसून बुद्ध उत्सव साजरा केला तर त्रिसरण,पंचशील यांचा अर्थ समजून घेता येईल.आणि त्यांचे आचरण घरातुन सुरू झाले तर तुम्ही कुठेही गेला तर ते संस्कार आपण विसरुच शकत नाही. हे संस्कार नसल्यामुळेच बुद्ध विहारे परिवर्तनांचे केंद्र झाले नाही. कारण विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.दुःख आहे,त्याला कारण आहे त्यांचे निवारण करण्यासाठी उपाय सुद्धा आहे.त्यासाठी बुध्दांनी दाखविलेल्या मानवमुक्तीच्या मार्गाने आपणांस जावे लागेल. सात दिवस घरात बुद्ध उत्सव साजरा केला तर अनेक समस्यांचे निवारण करता येते. कसे ते समजून घेणे महत्वाचे असते. यानिमित्ताने मित्रमंडळी हितचिंतक नातलगांना आपल्या घरी बोलवा त्यांनी घरातील वातावरण पाहिल्यावर हमखास कुटुंबातील व्यक्तीची चौकशी केल्या शिवाय राहणार नाहीत.मग मुलामुलींचे,शिक्षण,नोकरी,आणि लग्न यांची माहिती विचारल्या शिवाय घरी आलेला माणूस शांतपणे जाऊच शकत नाही.हीच बुद्धांच्या विचारांची शक्ती आचरणातून दिसते. तीच सर्वश्रेष्ठ आचरण इतरांस प्रेरणादायी व लक्षवेधी ठरते. बुद्ध उत्सव घरात साजरा करणे निश्चितच हे एक लहान वाटणारे पण महान कार्य आहे. ह्यातून बौद्ध उपासक प्रेरणा घेऊन आपल्या घरी दररोज वंदना घेऊन आपल्या मुलांवर,नातूनातवांवर संस्कार करतील की आपण बौद्ध आहोत. बौद्धांच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे.त्याने त्यांना धम्माचे संघांचे महत्व पाटल्या शिवाय राहणार नाही. जगातील एकशे चाळीस देशात सम्राट अशोक कालीन बुद्ध उत्सव घरात साजरा केला जातो.त्यामुळे त्या देशातील धम्म उपासकांची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. आपले आपल्या जिल्ह्यातील गांवचे काय?. बाबासाहेबांनी सांगितले होते खेडे सोडा,शहर गाठा.गावात लाचारीने मिळणारी भाकरी,आणि शहरातील स्वाभिमानाने मिळविलेली कष्टाची भाकरी फरक पडला की नाही.
   जगातील बुद्ध धम्माचे उपासक हेच आचरण करत आहे.पण ते आपणास कळत नाही, कोणी सांगत असेल तर त्यावर आपण विश्वास ठेवत नाही.वंदना घेत नाहीत.अनेक लोक बौद्ध तत्वज्ञानाचा लाभ घेतात पण बुद्धाला वंदन करत नाहीत. आपले तसे नाही. संपूर्ण विश्व सुखी व्हावे हे आपले उद्दिष्ट आहे.ज्यामुळे सर्व सुखी होतील.पण घरात आपण शुद्ध बुद्ध नसलो तर बाहेर आपली ओळख काय करून ठेवली यांचे आत्मचिंतन करण्यासाठी घरा घरात सम्राट अशोक कालीन बुद्ध उत्सव घरात साजरा केला पाहिजे.कोल्हापुच्या सिद्धार्थ नगर मधून आयु देवदास बानकर यांनी आठ वर्षापूर्वी सुरवात केली होती.गेल्या वर्षी तो घरा घरात बुद्ध उत्सव १८ जिल्ह्यात साजरा केला गेला.आता त्याचा जस जसा प्रचार व प्रचार होईल तस तसे धम्म उपासक उपासिका तो घरा घरात उत्सव साजरा करतील असे धम्म प्रचारक सागर रामभाऊ तायडे यांनी सांगितले.
वर्षावास २०२३ राहुल बुद्ध विहार राहुल नगर वाशीनाका आर सी एफ मार्ग चेंबूर येथे २८ व्या दिवशी रात्री ८ वाजता शाहीर कालिदास रोटे यांनी बुद्ध भिम गीते सदर केली,तर रात्री ८.३० वाजता घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?.या विषयावर धम्म प्रचारक मान आयु.सागर रामभाऊ तायडे यांचे व्याख्यान झाले.यावेळी सागर तायडे यांनी सर्व धम्म उपासिकांना घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?. यांची रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी धम्म उपासक विलास साळवे, हिरामण खंडागळे,अरूण पलघमोल,दिलीप इंगळे, लक्ष्मण साळवे,शाहीर कालीदास रोटे,त्रिंबक पलघमोल,भानुदास साळवे, रवि वानखेडे,धम्म उपासिका शिला इंगळे, सारजाबाई मगर,कृष्णाबाई ससाणे,प्रमिला अढांगळे,कमल खंडागळे, शिला राजगुरू,वंदना पलघमोल,कमल सुर्यनारायण,सिताबाई शिंदे,धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कालिदास रोटे ७९७७१०१८१५,चेंबूर यांसकडून 

समता फाउंडेशन मुंबईचा मदतीचा हात, पूरग्रस्त विद्यार्थ्यांनां स्पोर्टस् ड्रेसचे वाटप.

 समता फाउंडेशन मुंबईचा मदतीचा हात,

पूरग्रस्त विद्यार्थ्यांनां स्पोर्टस् ड्रेसचे वाटप.




प्रतिनिधी जळगांव जामोद :- २२ जुलै २०२३ च्या ढगफुटीने जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले.त्यात विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला वह्या, पुस्तके, दप्तर ,कपडे पुराच्या  पाण्यात वाहून व भिजवून गेल्यामुळे न भरून येणारे नुकसान झाले.यांची जाणीव ठेवणाऱ्या संस्थानी पुढे येऊन अशा विद्यार्थ्यांना वह्या,पुस्तकं, दप्तरं, कपडे उपलब्ध करून देण्याची गरज असते. त्यांची जाणीव ठेवून श्री सागर रामभाऊ तायडे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून आपल्या मातृभूमी गाडेगांव खुर्द ता.जळगांव जामोद येथे  लहानाचे मोठे झाले, त्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतचे शिक्षण घेतले त्या गावात गेली चाळीस वर्षात असा पूर कधीच आला नव्हता. त्या प्रचंड ढगफुटीमुळे गावात २२ जुलैला महापूर आला त्यामुळे अनेकांचे घर पाण्याखाली गेले. घरातील सर्व संसार उपयोगी जीवनावश्यक वस्तू गाळात खराब झाल्या.गाडेगांव खुर्दातील परिस्थितीची बातमी जेव्हा कानावर पडली तेव्हा तात्काळ गावातील श्री रोशन महादेव तायडे पुतण्या याला सांगून मुख्याध्यापक शिक्षक,ग्रामपंचायत सदस्य यांच्याशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेऊन मुख्य गरज काय आहे ह्याची पडताळणी केल्या नंतर जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील 230 विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्टस् ड्रेसचे वाटप समता फाऊंडेशन मुंबई अध्यक्ष ऍड प्रमोद सागर तायडे व प्रमुख मार्गदर्शक सागर रामभाऊ तायडे ह्याच्या वतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
७७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट रोजी २३० विद्यार्थ्यांना स्पोर्टस् ड्रेसचे वाटप करण्यात आले, यावेळी जेष्ठ बंधू आंबेडकरी चळवळीचे रिपब्लिकन नेते मान. पी.एस.तायडे,महादेव तायडे बौद्धाचार्य,सागर तायडे,  दादाराव तायडे,प्रशांत तायडे,मुख्याध्यापिका श्रीमती आशा ईश्वरे मॅडम,श्री गजानन काकडे तालुका संपर्क प्रमुख शिक्षक सेना,सर्व शिक्षक वॄंद,ग्रामपंचायत सदस्य,तंटामुक्ती समिती,शाळा व्यवस्थापन समिती यांच्या हस्ते गणवेष वाटप करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमाला गाडेगाव खुर्द सरपंच सौ.रुपलीताई संजय भारसाकळे, उपसरपंच श्री.दत्ताभाऊ विठ्ठलराव खुपसे,ग्रामपंचायत सदस्य सर्व श्री.प्रविण रोजतकार,ललिताबाई सावळे,गजानन पांडे,राहुल फाडे,गणेश बावस्कर,अशोक बावस्कर,आकोला खुर्द सरपंच सौ.ताईबाई वसंतराव बोदडे,तंटामुक्ती समितीचे बाळूभाऊ शिवशंकर कराळे,श्री अॅड.शिवकुमार खुपसे,निलेश खुपसे,समाधान गायकवाड,या मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे माजी विद्यार्थी आणि आजचे प्रसिद्ध पत्रकार साहित्यिक, कामगार नेते सागर रामभाऊ तायडे यांचे सर्व शिक्षक वर्गाने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.
    श्रीमती आशा ईश्वरे मुख्याध्यापिका,श्री.विठ्ठल के वाघमारे,सौ.वैशाली एस हिस्सल, श्री.गजानन काकडे, सौ.वैशाली हिस्सल मॅडम, श्री.संदीप जी सोळंके,श्री.पंकज आर जगताप, श्री.गंगाप्रसाद जी बक्कावाड,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.मोहन महादेव डाबेराव, उपाध्यक्ष श्री.धम्मपाल उदेभान तायडे,सन्मानीय सदस्य श्री.अशोक श्रीकृष्ण बावस्कर,श्री.राजेंद्र शेषराव चोपडे, मोहन ओंकार वानखडे,अर्जुन साखराजी तायडे, तेजराव गणपत इंगळे,प्रदीप देविदास तायडे,विजय रामकृष्णा तायडे, भिमराव वासुदेव सावळे, वसंता बोदडे,ओंकार हेलोडे, विश्वनाथ मानकर,विजय हळे,राजू हरणे,भागवत मुंडे,भिमराव वामन तायडे,उत्तम कैलास तायडे,सुनील सदाशिव तायडे,मधुकर शिरसाट, गणेश वाडेकर,राजेश चंदनगोळे, रामकृष्णा हिंगणकर,पंकज ठाकूर, प्रल्हाद वाघ,भागवत लाहुडकर, गोपाल रमेश खुपसे, लक्ष्मण घोपे, बाळूभाऊ घोंगे,कल्पना भगवान सावळे,अनिता रमेश खुपसे सह जागरूक गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.      गजानन काकडे सर, पंकज जगताप सर,अर्जुन वामन तायडे,प्रदीप देविदास तायडे,मंगेश रामकृष्णा तायडे आणि रोशन महादेव तायडे यांनी नांदुरा येथे दुकानात जाऊन जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील 230 विद्यार्थ्यांना शालेयस्पोर्टस् ड्रेस मिळविण्यासाठी तीन दिवस विशेष मेहनत घेतली.त्याबद्ल प्रशांत सागर तायडे यांनी त्यांचे विशेष आभार मानले.पंकज आर जगताप सर यांनी कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री  गजानन काकडे सर यांनी केले.
रोशन महादेव तायडे ८२६५०२०६७२ गाडेगांव खुर्द यांसकडून.

स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?.

 ७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य आत्मचिंतन परीक्षण करणारा विशेष लेख 

स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?. 



भारत स्वातंत्र्य होऊन ७६ वर्ष पूर्ण झालीत.७७ वर्षात पदार्पण करीत आहोत.प्रबुद्ध भारताचा हिंदुस्थान बनविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशात मणिपूर,हरियाणा राजस्थान मध्ये प्रचंड असंतोष,अस्वस्थाता आहे.महाराष्ट्रात आमदार अपात्र असल्यामुळे सरकार अपात्र असतांना लोकशाहीचा बळी देऊन शासन प्रशासन सुरु आहे. अनेक वर्षांचे जम्मू काश्मीर 370 व 35 ए कलमा मुळे सर्व गंभीर प्रश्न मागे पडले होते. राम मंदिर शिला पूजन मुळे सर्व संकट दूर झालीत. राम मंदिर,इ व्ही एम मशीन बाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट निर्भीड, निःपक्षपाती निर्णय न घेतल्याचा इतिहास लिहला गेला. प्रशासकीय यंत्रणा,पोलीस न्यायालय कुठेही प्रामाणिकपणे संविधानाच्या चौकटीत कार्यरथ दिसत नाही. एका बाजूला आपल्याला स्वातंत्र्य आहे.तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विषमतावादी समाज व्यवस्था जे सांगते ते मान्य करा नाहीतर भर चौकात दहावीस लोक मॉब किलिंग स्मार्टफोन मोबाईलवर व्हिडीओ करून आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून देत आहेत.त्यांना कोणाची भीती वाटत नाही. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना मनात एक नाही तर हजारो प्रश्न उभे राहतात. स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?. आणि हया स्वातंत्र्य दिनाच्या शेवटच्या हार्दिक शुभेच्छा?. असतील असे स्पष्ट पणे दिसत आहे.आपण व आपला देश खरोखरच स्वातंत्र्य झाला आहे काय?. की गोरे गेले आणि काळे शेंडीवाले आले. १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वीचे दिवस आता २०२२ नंतरच्या दिवसात किती फरक पडला?. तरी स्वातंत्र्य दिनाच्या शेवटच्या हार्दिक शुभेच्छा.व स्वातंत्र्य दिन चिरायू हो. 
    आज देशातील खेड्यापाड्यात शेतकरी शेतमजुरांच्या हाती महागडा स्मार्टफोन मोबाईल आहे.पण त्याला चार्जिंग करण्यासाठी चोवीस तास वीज नाही. तरी ऑन लाईन शिक्षण सुरू आहे. मोठ्यांना मोठं मोठी घरे आहेत,गरिबांना इंदिरा निवास,रमाई निवास आणि पंतप्रधान आवास योजनेची पक्की घरे आहेत,तरी चारीबाजूने पावसाच्या पाण्यात रास्ते, कुठे आहेत दिसत नाही.देशात अनेक राज्यात पावसाच्या पाण्यामुळे पूरजन्य परिस्थिती आहे.देशात अनेक उद्योग धंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी उपासमारीचे संकट कोरोनापेक्षा जास्त प्रमाणात आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणून राम मंदिरांचा शीला पूजन आनंदात साजरा करण्यात आला. त्यामुळेच भारताचा हिंदुस्थान महासत्ता झाली शिवाय राहणार नाही. जगावर राज्य करण्यासाठी रामरक्षा,हनुमान चालीसा, लक्ष्मण रेषा जगाच्या सर्व भाषेत इंग्रजी सह मनुस्मृती तत्वज्ञाना उपलब्ध करून देण्यात येत आहे. 
    भारत माझा देश आहे.सर्व भारतीय माझे बांधव आहेत. सर्वांशी मी गुण्यागोविंदाने वागेल ही प्राथमिक,माध्यमिक शाळा कॉलेज मध्ये शिकवली जाणारी प्रतिज्ञा शाळा कॉलेजच्या आत बाहेर आचरणात आणण्याची आवश्यकता राहणार नाही. हेच विद्यार्थी जेव्हा उच्चशिक्षित होऊन अधिकारी कर्मचारी बनतात तेव्हा आर्टिकल 15 कलमाचे खुलेआम उल्हघन करतांना दिसतात. नैसर्गिक संकटात भारतीय नागरिकांत ती कधी कधीच दिसते ती म्हणजे माणुसकी. आज पूरग्रस्त भागात तीच माणुसकी कामाला येतांना दिसत आहे. म्हणून खूप माणसांची जीवित हानी टळली. पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसात प्रचंड हाहा कार उडाला आहे.पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप काढण्याचे काम लष्करांचे जवान, नौदल, आणि एन डी आर एफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य केल्याची नोंद झाली आहे. कोरोना मुळे नवसाला पावणारे जागृत देव व देवी स्वतःच्या घरांना वाचवू शकले नाही.ते कुलूप बंद करून शांत बसले होते हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. कोरोनाच्या महामारीत हिंदूंची मंदिरे, मुस्लिमांच्या मशिदी,ख्रिश्चनांच्या चर्च, सर्व धर्मियांची देव देवता आणि प्रार्थना स्थळे देवांच्या सुरक्षेतेसाठी भक्तांना बंद करण्यात आले होते हे विसरणारे भक्त आज ही आहेत.सर्व नागरिकांनी आपापल्या उपासना पद्धतीने कोरोना संकट निवारणासाठी घरातच प्रार्थना कराव्या लागल्या होत्या.पण कोणते ही देव जागृत देवी धावून आले नव्हते.पण तेच गणवेशातील पोलीस, सुरक्षा दले, सैन्य आणी डॉक्टर,नर्स,पालिका कामगार,  कर्मचारी तुमच्या आमच्या सारखेच माणसच धावून आली होती.हे आम्त्याही कायमस्मुवरूपी लक्षात ठेवले पाहिजे होते. जाती धर्माचा गर्व करण्यापेक्षा माणुसकीचा गर्व करा.असा भारतीय संविधानाने दिलेला संदेश आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे.भारत माझा देश आहे. व सगळे भारतीय माझे बांधव हीच भावना नेहमी मनात असायला पाहीजे.ती घरात दारात किंवा कार्यालयात आचरणात दिसली पाहिजे.तरच भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो.असे गर्वाने सांगता येईल.आणि ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देता येतील.
    भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकत नाही. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून लोकप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते. जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका (judiciary)  प्रशासकीय यंत्रणा,कार्यकारी मंडळ,अधिकारी वर्ग (Executive),विधिमंडळ.संसद,विधानसभा (Legislature), प्रसार मध्यम (Media) हया आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात.आज स्वातंत्र्य म्हणजे काय?. आजच्या पिढीला विचारले तर खा पिया मजा करा फुल एन्जॉय करा कोणीच कोणाला विचारू शकत नाही,हेच खरे स्वातंत्र्य आहे.म्हणूनच आजची मुलंमुली आईवडील,काका,मामा यांचा आदरयुक्त आदर्श ठेवतांना दिसत नाही.कोणालाच कोणाचे बंधन नाही. कोणी कसे ही सैराट वागू देण्याची परवानगी म्हणजे स्वातंत्र्य आहे. कुटुंबातील एकत्र राहण्याची एकमेकांना आधार देणारी एकत्रित कुटुंब पद्धत पूर्णपणे मोडून पडली,जसे कुटुंबातील सर्व सभासद वेगवेगळ्या पद्धतीने आपले जीवन जगतात. तशीच पध्दत नगरानगरात, वॉर्डात, तालुक्यात होत आहे. त्यामुळे कुटुंबात एकमत नाही चारभाऊ चार पक्षात आणि आईवडील वृध्दाश्रमात म्हणे सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हीच परिस्थिती देशाची झाली आहे. 
    राजकीय पक्षांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. ते जे ७६ वर्षात झाले नाही ते त्यांनी नऊ वर्ष पूर्ण सत्ता प्रस्थापित केल्या नंतर नव्या वर्षी करून दाखविले. ते सरकार भारतीय मतदारांनी निवडून दिलेलं सरकार आहे की EVM मशीन ने निवडून दिलेलं सरकार आहे. यावर निर्भीड निःपक्षपाती धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या चौकटीत चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळेच अनेक प्रामाणिक कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने सेवा करण्यास नकार दिला व घरी बसने पसंत केले. या देशातील न्यायाधीशांना पत्रकार परिषदेत आपले दुःख व्यक्त करावे लागते. त्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही तर आत्महत्या,अपघात किंवा हृदय विकाराचा तीव्र वेदनामुळे मूर्त्यु अटळ आहे. तर सर्व सामान्य असंघटित कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना, कामगारांना किती अन्याय,अत्याचार सहन करावे लागत असतील यांचा विचार स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्षी आपण नागरिक म्हणून करणार आहोत की नाही?.
    आरक्षणामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगणारी प्रभावशाली यंत्रणा विचारधारा या देशात आहे.एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे गुणवत्ता मोजणारी यंत्रणा व माणसं सर्व मोख्याच्या ठिकाणी बसली असतांना आरक्षण घेणाऱ्यामुळे देशाचे वाटोळे कसे झाले?. विषमतावादी विचारधारा मानणारे अधिकारी, कर्मचारी निर्णयघेणारी यंत्रणा यांची असतांना सरकारी कंपन्या उत्पन्न देणारे उपक्रम कोणी विकले?. कोणी ?. कोणाला?. किती दिवसासाठी?. कोणत्या कारणासाठी खासगी करण्यात आले ?.यांची साधी चर्चा, बातमी मुख्यपानावर हेडलाईन कोणत्याही वृत्तपत्रांची होत नाही. कोणत्याही वृत्तवाहिन्यांनी त्यावर रोखठोक चर्चा घडवून सत्य शोध पत्रकारिता केली नाही. त्यामुळेच त्यांना कोणत्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात?.
    भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचा संदेश लाल किल्ला दिल्ली येथून दिला जातात. आता तो आपला राहिला काय?. स्वतंत्र्य चळवळीची ऐतिहासिक वास्तू लालकिल्ला या बाबत आजच्या पिढीला आम्ही काय माहिती देणार आहोत?. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना मला असे प्रश्न माझ्या मुलांचा, मुलींचा त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा विचारतो स्वातंत्र्य दिन का साजरा करतात?. झेंडा वंदन करावे आणि चॉकलेट खावे, सार्वजनिक सुट्टीचा आनंद घ्यावा,चाळीत सोसायटीच्या आवारात सत्यनारायण महापूजा ठेवावी.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात.झाला स्वातंत्र्य दिन?. स्वातंत्र्य संग्रामावर चार शब्द बोलले पाहिजे.हा संग्राम कोणा विरोधात का करावा लागला हा इतिहास सांगितला नाही तर पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिन का साजरा करण्याची आवश्यकता राहणार नाही.स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?. कारण तो स्वातंत्र्य दिन असेल काय ?.गेल्या वर्षी घर घर तिरंगा अभियान देश भर राबविल्या गेले होते.या वर्षी मोबाईलवर तिरंगा सेल्फी राबविण्यात येत आहे.त्याचे प्रमाण पत्र देण्यात येईल ते घरात दर्शनी भागात लावल्याने.म्हणजेच स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?. 
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई.