७६ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्य आत्मचिंतन परीक्षण करणारा विशेष लेख
स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?.
भारत स्वातंत्र्य होऊन ७६ वर्ष पूर्ण झालीत.७७ वर्षात पदार्पण करीत आहोत.प्रबुद्ध भारताचा हिंदुस्थान बनविण्यासाठी स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशात मणिपूर,हरियाणा राजस्थान मध्ये प्रचंड असंतोष,अस्वस्थाता आहे.महाराष्ट्रात आमदार अपात्र असल्यामुळे सरकार अपात्र असतांना लोकशाहीचा बळी देऊन शासन प्रशासन सुरु आहे. अनेक वर्षांचे जम्मू काश्मीर 370 व 35 ए कलमा मुळे सर्व गंभीर प्रश्न मागे पडले होते. राम मंदिर शिला पूजन मुळे सर्व संकट दूर झालीत. राम मंदिर,इ व्ही एम मशीन बाबत निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्ट निर्भीड, निःपक्षपाती निर्णय न घेतल्याचा इतिहास लिहला गेला. प्रशासकीय यंत्रणा,पोलीस न्यायालय कुठेही प्रामाणिकपणे संविधानाच्या चौकटीत कार्यरथ दिसत नाही. एका बाजूला आपल्याला स्वातंत्र्य आहे.तर दुसऱ्या बाजूला प्रचंड विषमतावादी समाज व्यवस्था जे सांगते ते मान्य करा नाहीतर भर चौकात दहावीस लोक मॉब किलिंग स्मार्टफोन मोबाईलवर व्हिडीओ करून आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून देत आहेत.त्यांना कोणाची भीती वाटत नाही. त्यामुळेच स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना मनात एक नाही तर हजारो प्रश्न उभे राहतात. स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?. आणि हया स्वातंत्र्य दिनाच्या शेवटच्या हार्दिक शुभेच्छा?. असतील असे स्पष्ट पणे दिसत आहे.आपण व आपला देश खरोखरच स्वातंत्र्य झाला आहे काय?. की गोरे गेले आणि काळे शेंडीवाले आले. १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वीचे दिवस आता २०२२ नंतरच्या दिवसात किती फरक पडला?. तरी स्वातंत्र्य दिनाच्या शेवटच्या हार्दिक शुभेच्छा.व स्वातंत्र्य दिन चिरायू हो.
आज देशातील खेड्यापाड्यात शेतकरी शेतमजुरांच्या हाती महागडा स्मार्टफोन मोबाईल आहे.पण त्याला चार्जिंग करण्यासाठी चोवीस तास वीज नाही. तरी ऑन लाईन शिक्षण सुरू आहे. मोठ्यांना मोठं मोठी घरे आहेत,गरिबांना इंदिरा निवास,रमाई निवास आणि पंतप्रधान आवास योजनेची पक्की घरे आहेत,तरी चारीबाजूने पावसाच्या पाण्यात रास्ते, कुठे आहेत दिसत नाही.देशात अनेक राज्यात पावसाच्या पाण्यामुळे पूरजन्य परिस्थिती आहे.देशात अनेक उद्योग धंदे बंद असल्यामुळे बेरोजगारी उपासमारीचे संकट कोरोनापेक्षा जास्त प्रमाणात आहे. त्यावर रामबाण उपाय म्हणून राम मंदिरांचा शीला पूजन आनंदात साजरा करण्यात आला. त्यामुळेच भारताचा हिंदुस्थान महासत्ता झाली शिवाय राहणार नाही. जगावर राज्य करण्यासाठी रामरक्षा,हनुमान चालीसा, लक्ष्मण रेषा जगाच्या सर्व भाषेत इंग्रजी सह मनुस्मृती तत्वज्ञाना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
भारत माझा देश आहे.सर्व भारतीय माझे बांधव आहेत. सर्वांशी मी गुण्यागोविंदाने वागेल ही प्राथमिक,माध्यमिक शाळा कॉलेज मध्ये शिकवली जाणारी प्रतिज्ञा शाळा कॉलेजच्या आत बाहेर आचरणात आणण्याची आवश्यकता राहणार नाही. हेच विद्यार्थी जेव्हा उच्चशिक्षित होऊन अधिकारी कर्मचारी बनतात तेव्हा आर्टिकल 15 कलमाचे खुलेआम उल्हघन करतांना दिसतात. नैसर्गिक संकटात भारतीय नागरिकांत ती कधी कधीच दिसते ती म्हणजे माणुसकी. आज पूरग्रस्त भागात तीच माणुसकी कामाला येतांना दिसत आहे. म्हणून खूप माणसांची जीवित हानी टळली. पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे गेल्या काही दिवसात प्रचंड हाहा कार उडाला आहे.पुरात अडकलेल्या लोकांना सुखरूप काढण्याचे काम लष्करांचे जवान, नौदल, आणि एन डी आर एफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य केल्याची नोंद झाली आहे. कोरोना मुळे नवसाला पावणारे जागृत देव व देवी स्वतःच्या घरांना वाचवू शकले नाही.ते कुलूप बंद करून शांत बसले होते हा अनुभव सर्वांनी घेतला आहे. कोरोनाच्या महामारीत हिंदूंची मंदिरे, मुस्लिमांच्या मशिदी,ख्रिश्चनांच्या चर्च, सर्व धर्मियांची देव देवता आणि प्रार्थना स्थळे देवांच्या सुरक्षेतेसाठी भक्तांना बंद करण्यात आले होते हे विसरणारे भक्त आज ही आहेत.सर्व नागरिकांनी आपापल्या उपासना पद्धतीने कोरोना संकट निवारणासाठी घरातच प्रार्थना कराव्या लागल्या होत्या.पण कोणते ही देव जागृत देवी धावून आले नव्हते.पण तेच गणवेशातील पोलीस, सुरक्षा दले, सैन्य आणी डॉक्टर,नर्स,पालिका कामगार, कर्मचारी तुमच्या आमच्या सारखेच माणसच धावून आली होती.हे आम्त्याही कायमस्मुवरूपी लक्षात ठेवले पाहिजे होते. जाती धर्माचा गर्व करण्यापेक्षा माणुसकीचा गर्व करा.असा भारतीय संविधानाने दिलेला संदेश आम्ही कायमस्वरूपी लक्षात ठेवला पाहिजे.भारत माझा देश आहे. व सगळे भारतीय माझे बांधव हीच भावना नेहमी मनात असायला पाहीजे.ती घरात दारात किंवा कार्यालयात आचरणात दिसली पाहिजे.तरच भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू हो.असे गर्वाने सांगता येईल.आणि ७६ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देता येतील.
भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला. आज भारतीय नागरिक प्रजेची सत्ता आहे हे गर्वाने सांगु शकत नाही. राजे महाराजे,भांडवलदार,सावकार यांचे संस्थान संपून जनतेने जनते मधून लोकप्रतिनिधी निवडून जनतेच्या भल्यासाठी काम करणारी यंत्रणा म्हणजे प्रजासत्ता अशी घटनाकारांनी सांगितले होते. जनतेला खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक करणार नाही अशी यंत्रणा म्हणजे लोकशाहीचे चार खांब न्यायपालिका (judiciary) प्रशासकीय यंत्रणा,कार्यकारी मंडळ,अधिकारी वर्ग (Executive),विधिमंडळ.संसद,विधा नसभा (Legislature), प्रसार मध्यम (Media) हया आज तरी पूर्णपणे कोसळलेल्या दिसतात.आज स्वातंत्र्य म्हणजे काय?. आजच्या पिढीला विचारले तर खा पिया मजा करा फुल एन्जॉय करा कोणीच कोणाला विचारू शकत नाही,हेच खरे स्वातंत्र्य आहे.म्हणूनच आजची मुलंमुली आईवडील,काका,मामा यांचा आदरयुक्त आदर्श ठेवतांना दिसत नाही.कोणालाच कोणाचे बंधन नाही. कोणी कसे ही सैराट वागू देण्याची परवानगी म्हणजे स्वातंत्र्य आहे. कुटुंबातील एकत्र राहण्याची एकमेकांना आधार देणारी एकत्रित कुटुंब पद्धत पूर्णपणे मोडून पडली,जसे कुटुंबातील सर्व सभासद वेगवेगळ्या पद्धतीने आपले जीवन जगतात. तशीच पध्दत नगरानगरात, वॉर्डात, तालुक्यात होत आहे. त्यामुळे कुटुंबात एकमत नाही चारभाऊ चार पक्षात आणि आईवडील वृध्दाश्रमात म्हणे सर्वांना स्वातंत्र्य मिळाले आहे. हीच परिस्थिती देशाची झाली आहे.
राजकीय पक्षांना पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. ते जे ७६ वर्षात झाले नाही ते त्यांनी नऊ वर्ष पूर्ण सत्ता प्रस्थापित केल्या नंतर नव्या वर्षी करून दाखविले. ते सरकार भारतीय मतदारांनी निवडून दिलेलं सरकार आहे की EVM मशीन ने निवडून दिलेलं सरकार आहे. यावर निर्भीड निःपक्षपाती धर्मनिरपेक्ष भारतीय संविधानाच्या चौकटीत चौकशी होऊच शकत नाही. त्यामुळेच अनेक प्रामाणिक कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी वर्गाने सेवा करण्यास नकार दिला व घरी बसने पसंत केले. या देशातील न्यायाधीशांना पत्रकार परिषदेत आपले दुःख व्यक्त करावे लागते. त्यांच्या बाजूने निर्णय दिला नाही तर आत्महत्या,अपघात किंवा हृदय विकाराचा तीव्र वेदनामुळे मूर्त्यु अटळ आहे. तर सर्व सामान्य असंघटित कष्टकरी शेतकरी, शेतमजुरांना, कामगारांना किती अन्याय,अत्याचार सहन करावे लागत असतील यांचा विचार स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्षी आपण नागरिक म्हणून करणार आहोत की नाही?.
आरक्षणामुळे देशाचे वाटोळे झाले असे सांगणारी प्रभावशाली यंत्रणा विचारधारा या देशात आहे.एका बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे गुणवत्ता मोजणारी यंत्रणा व माणसं सर्व मोख्याच्या ठिकाणी बसली असतांना आरक्षण घेणाऱ्यामुळे देशाचे वाटोळे कसे झाले?. विषमतावादी विचारधारा मानणारे अधिकारी, कर्मचारी निर्णयघेणारी यंत्रणा यांची असतांना सरकारी कंपन्या उत्पन्न देणारे उपक्रम कोणी विकले?. कोणी ?. कोणाला?. किती दिवसासाठी?. कोणत्या कारणासाठी खासगी करण्यात आले ?.यांची साधी चर्चा, बातमी मुख्यपानावर हेडलाईन कोणत्याही वृत्तपत्रांची होत नाही. कोणत्याही वृत्तवाहिन्यांनी त्यावर रोखठोक चर्चा घडवून सत्य शोध पत्रकारिता केली नाही. त्यामुळेच त्यांना कोणत्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात?.
भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचा संदेश लाल किल्ला दिल्ली येथून दिला जातात. आता तो आपला राहिला काय?. स्वतंत्र्य चळवळीची ऐतिहासिक वास्तू लालकिल्ला या बाबत आजच्या पिढीला आम्ही काय माहिती देणार आहोत?. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतांना मला असे प्रश्न माझ्या मुलांचा, मुलींचा त्यांचा दुसरीत शिकणारा मुलगा विचारतो स्वातंत्र्य दिन का साजरा करतात?. झेंडा वंदन करावे आणि चॉकलेट खावे, सार्वजनिक सुट्टीचा आनंद घ्यावा,चाळीत सोसायटीच्या आवारात सत्यनारायण महापूजा ठेवावी.स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्यात.झाला स्वातंत्र्य दिन?. स्वातंत्र्य संग्रामावर चार शब्द बोलले पाहिजे.हा संग्राम कोणा विरोधात का करावा लागला हा इतिहास सांगितला नाही तर पुढच्या वर्षी स्वातंत्र्य दिन का साजरा करण्याची आवश्यकता राहणार नाही.स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?. कारण तो स्वातंत्र्य दिन असेल काय ?.गेल्या वर्षी घर घर तिरंगा अभियान देश भर राबविल्या गेले होते.या वर्षी मोबाईलवर तिरंगा सेल्फी राबविण्यात येत आहे.त्याचे प्रमाण पत्र देण्यात येईल ते घरात दर्शनी भागात लावल्याने.म्हणजेच स्वातंत्र्य दिन चिरायू होईल काय ?.
सागर रामभाऊ तायडे,9920403859,भांडुप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा