घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?.सागर तायडे.
तुम्ही बौद्ध आहात काय?. तुम्ही स्वताला बौद्ध समजता पण आचरण कसे करता. बुद्धाच्या पाय पडून पुजा केली पाहिजे की प्रचांग प्रणाम?. किती लोकांना यातील फरक माहिती आहे. म्हणूनच आज मी आपल्या समोर घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा हे सांगण्यासाठी उभा आहे.वर्षावास २०२३ राहुल बुद्ध विहार,राहुल नगर वाशीनाका आर सी एफ मार्ग चेंबूर येथे २८ व्या दिवशी सागर तायडे धम्म प्रचारक यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.तेव्हा ते बोलत होते.
घरात बसून बुद्ध उत्सव साजरा केला तर त्रिसरण,पंचशील यांचा अर्थ समजून घेता येईल.आणि त्यांचे आचरण घरातुन सुरू झाले तर तुम्ही कुठेही गेला तर ते संस्कार आपण विसरुच शकत नाही. हे संस्कार नसल्यामुळेच बुद्ध विहारे परिवर्तनांचे केंद्र झाले नाही. कारण विहिरीत नाही तर पोहऱ्यात कुठून येणार.दुःख आहे,त्याला कारण आहे त्यांचे निवारण करण्यासाठी उपाय सुद्धा आहे.त्यासाठी बुध्दांनी दाखविलेल्या मानवमुक्तीच्या मार्गाने आपणांस जावे लागेल. सात दिवस घरात बुद्ध उत्सव साजरा केला तर अनेक समस्यांचे निवारण करता येते. कसे ते समजून घेणे महत्वाचे असते. यानिमित्ताने मित्रमंडळी हितचिंतक नातलगांना आपल्या घरी बोलवा त्यांनी घरातील वातावरण पाहिल्यावर हमखास कुटुंबातील व्यक्तीची चौकशी केल्या शिवाय राहणार नाहीत.मग मुलामुलींचे,शिक्षण,नोकरी,आणि लग्न यांची माहिती विचारल्या शिवाय घरी आलेला माणूस शांतपणे जाऊच शकत नाही.हीच बुद्धांच्या विचारांची शक्ती आचरणातून दिसते. तीच सर्वश्रेष्ठ आचरण इतरांस प्रेरणादायी व लक्षवेधी ठरते. बुद्ध उत्सव घरात साजरा करणे निश्चितच हे एक लहान वाटणारे पण महान कार्य आहे. ह्यातून बौद्ध उपासक प्रेरणा घेऊन आपल्या घरी दररोज वंदना घेऊन आपल्या मुलांवर,नातूनातवांवर संस्कार करतील की आपण बौद्ध आहोत. बौद्धांच्या आचारसंहितेचे पालन केले पाहिजे.त्याने त्यांना धम्माचे संघांचे महत्व पाटल्या शिवाय राहणार नाही. जगातील एकशे चाळीस देशात सम्राट अशोक कालीन बुद्ध उत्सव घरात साजरा केला जातो.त्यामुळे त्या देशातील धम्म उपासकांची सर्वच क्षेत्रात प्रगती होत आहे. आपले आपल्या जिल्ह्यातील गांवचे काय?. बाबासाहेबांनी सांगितले होते खेडे सोडा,शहर गाठा.गावात लाचारीने मिळणारी भाकरी,आणि शहरातील स्वाभिमानाने मिळविलेली कष्टाची भाकरी फरक पडला की नाही.
जगातील बुद्ध धम्माचे उपासक हेच आचरण करत आहे.पण ते आपणास कळत नाही, कोणी सांगत असेल तर त्यावर आपण विश्वास ठेवत नाही.वंदना घेत नाहीत.अनेक लोक बौद्ध तत्वज्ञानाचा लाभ घेतात पण बुद्धाला वंदन करत नाहीत. आपले तसे नाही. संपूर्ण विश्व सुखी व्हावे हे आपले उद्दिष्ट आहे.ज्यामुळे सर्व सुखी होतील.पण घरात आपण शुद्ध बुद्ध नसलो तर बाहेर आपली ओळख काय करून ठेवली यांचे आत्मचिंतन करण्यासाठी घरा घरात सम्राट अशोक कालीन बुद्ध उत्सव घरात साजरा केला पाहिजे.कोल्हापुच्या सिद्धार्थ नगर मधून आयु देवदास बानकर यांनी आठ वर्षापूर्वी सुरवात केली होती.गेल्या वर्षी तो घरा घरात बुद्ध उत्सव १८ जिल्ह्यात साजरा केला गेला.आता त्याचा जस जसा प्रचार व प्रचार होईल तस तसे धम्म उपासक उपासिका तो घरा घरात उत्सव साजरा करतील असे धम्म प्रचारक सागर रामभाऊ तायडे यांनी सांगितले.
वर्षावास २०२३ राहुल बुद्ध विहार राहुल नगर वाशीनाका आर सी एफ मार्ग चेंबूर येथे २८ व्या दिवशी रात्री ८ वाजता शाहीर कालिदास रोटे यांनी बुद्ध भिम गीते सदर केली,तर रात्री ८.३० वाजता घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?.या विषयावर धम्म प्रचारक मान आयु.सागर रामभाऊ तायडे यांचे व्याख्यान झाले.यावेळी सागर तायडे यांनी सर्व धम्म उपासिकांना घरात बुद्ध उत्सव का साजरा करावा?. यांची रूपरेषा समजावून सांगितली. यावेळी धम्म उपासक विलास साळवे, हिरामण खंडागळे,अरूण पलघरमोल,दिलीप इंगळे, लक्ष्मण साळवे,शाहीर कालीदास रोटे,त्रिंबक पलघरमोल,भानुदास साळवे, रवि वानखेडे,धम्म उपासिका शिला इंगळे, सारजाबाई मगर,कृष्णाबाई ससाणे,प्रमिला अढांगळे,कमल खंडागळे, शिला राजगुरू,वंदना पलघरमोल,कमल सुर्यनारायण,सिताबाई शिंदे,धम्म उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कालिदास रोटे ७९७७१०१८१५,चेंबूर यांसकडून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा