मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

सुतार समाजाने ओबीसींचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.

 सुतार समाजाने ओबीसींचे नेतृत्व करणे गरजेचे आहे.


    ओबीसी सुतार समाजाची लोकसंख्या 45 ते 50 लाख असल्याचे मला सोशल मीडियावर समजले परंतु,एकही समाज संघटना किंवा ओबीसी सुतार समाज नेतृत्व ओबीसी, संविधान आणि जनगणना या महत्वाच्या विषयावर ओबीसी सुतार समाजात हजारोंच्या संख्येने समाज एकत्रित करून समाज जागृती करण्यासाठी धजावत नाहीत हि समाजात सत्य परिस्थिती आहे त्यामुळे सुतार समाजात खऱ्या अर्थाने ओबीसी, संविधान आणि जनगणना या बाबतीत समाज जागृती निर्माण होत नाही.ओबीसी सुतार समाजात सामाजिक कार्य करण्यासाठी अनेक राज्यस्तरीय नामकरणाचा साज चढवलेल्या सामाजिक संघटना समाजात कार्यरत आहेत आणि यांचे राज्यभरात तालुका ते राज्यपातळीवर जबाबदार पदाधिकारी कार्यरत आहेत यांच्या मधुनच एक जबाबदार राज्यस्तरीय अध्यक्ष या पदाची निर्मिती केली जाते सोबतच असंख्य पदांची निर्मिती करून वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळ्या विभागाचे पदाधिकारी नियुक्त करतात अशा पध्दतीने एखादी संघटना निर्माण करून भविष्यात याच समाज संघटनेच्या माध्यमातून अगोदर जिल्हा स्तरावर नेतृत्व म्हणुन उदय होतो नंतर हळुहळु हाच समाज नेतृत्व म्हणून राज्यभरात राज्यस्तरीय समाज नेतृत्व म्हणुन समाजात उदयास येतो नावारूपाला येतो.
     देशातील प्रत्येक मतदार संघात ५२ टक्के ओबीसी लोकसंख्या असल्यामुळे कोणत्या जातीचा,पक्षाचा उमेदवार निवडून द्यावा हे ओबीसी समाज ठरवू शकतो.म्हणजेच तो देशातील सर्वात मोठा किंग मेकर असायला पाहिजे. हे अधिकार त्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिले आहे त्याचा उपयोग समाज जागृती निर्माण करण्यासाठी सामाजिक क्षेत्रात समाज नेत्यांनी समाजहितासाठी करणे गरजेचे असते.विश्‍वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील एक मोठा समुह आहे. पण त्यातील काही लोक स्वत:ला ब्राम्हण समजत असतील तर त्यांनी ओबीसी म्हणून घेऊ नये आणि ओबीसीची फसवणूक करू नये. देशात ५२ टक्के ओबीसी आहेत यांची जनगणना कधी झाली होती. त्यात ३,७४३ जाती होत्या त्यांना शिक्षण व नोकरीत २७ टक्के आरक्षण होते. महाराष्ट्रात आरक्षण १९ टक्के होते.ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवून ११ लाख ओबीसी लोकप्रतिनिधी संपविले गेले.देशातील प्रत्येक मतदार संघात ५२ टक्के ओबीसी लोकसंख्या असल्यामुळे कोणत्या जातीचा,पक्षाचा उमेदवार निवडून द्यावा हे ओबीसी समाज ठरवू शकतो.म्हणजेच तो देशातील सर्वात मोठा किंग मेकर असायला पाहिजे. हे अधिकार त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात दिले आहे. त्याअगोदर छत्रपती शिवाजी महाराज यांनी याच ओबीसीना मावळे म्हणून संघटीत केले होते. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ब्राम्हणेतर आणि शाहू महाराजांनीही ओबीसींना स्थान दिले होते. 
   आरक्षण एससी, एसटीलाच आहे.आंबेडकरी विचारांचे लोकच जास्त आंदोलने करतात.कारण त्यांना जास्त फायदा मिळतो हे ओबीसींना जास्त सांगितले जाते. ते शंभर टक्के सत्य आहे असे समजणारे ओबीसी सर्वच राजकीय आरक्षण काढल्यावरही शांत आहेत.इतरांना त्याचा फायदा मिळत नाही असे समजणार्‍यांनी आरक्षणा जातीची संख्या आणि टक्केवारी समजून घ्यावी.विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात समाजकार्य करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था,संघटना कार्यरत आहेत आणी या सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेशी जोडलेले असंख सामाजिक पदाधिकारी आहेत.या विश्‍वकर्मीय सामाजिक संघटना व संस्थेच्या माध्यमातून समाज नेतृत्व आणी युवा नेतृत्व उदयास येतात किंवा निर्माण होतात.पण त्यांना वैचारिक वारसा नसल्यामुळे त्यांचा वापर प्रत्येक आंदोलनात होत आला आहे. हे त्यांनी समजून घेतले पाहिजे. त्यासाठी विश्‍वकर्मीय सुतार समाजात वैचारिक निर्भीड, निष्पक्षपणे लिहणारे पत्रकार,साहित्यिक,विचारवंत तयार झाले पाहिजे.मी या विषयी कायम तोडक्या मोडक्या शब्दात लिहत असतो.काही लोक मला दिडशहाणे म्हणत असतील तरी मी त्यांना शहाण्यासारखे लिहण्याचे समाजात आवाहन नेहमीच करतो.
      समाजाने एकत्र बसून चर्चा,संवाद,वादविवाद केल्यास त्यातून सामाजिक क्षेत्रात विविध प्रकारचे सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात आणी या सामाजिक कार्यक्रमात वैचारिक सामाजिक बांधिलकी जाणणारे असंख्य कार्यकर्ते तयार होतात, सामाजिक कार्यकर्ते घडविले जातात. ओबीसी विश्‍वकर्मीय सुतार समाज हा ओबीसी प्रवर्गातील मोठा घटक असताना सुतार सामाजिक क्षेत्रातील नेतेमंडळी आणी युवा नेतृत्व तसेच सामाजिक कार्यकर्तेही ओबीसी बद्दल समाजात समाज जागृती निर्माण करण्यासाठी अपेक्षित असे जमिनीवर उतरताना दिसत नाहीत. ही मोठी सुतार समाजाची शोकांतिका म्हणावी लागेल.विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक संघटना व सामाजिक संस्थांची सामाजिक जबाबदारी ही सर्वव्यापी राज्यव्यापी होऊ शकते.नव्हे विस्तारित आहेच.ओबीसी सुतार समाजात सामाजिक संघटना व सामाजिक संस्थेचे जाळे हे राज्यभरात तालुका पातळी ते थेट राज्यस्तरीय पदाधिकारी कार्यरत आहेत.पण नेमकी दिशा नसल्यामुळे ते दिशाहीन दिसतात. सुतार सामाजिक क्षेत्रात ओबीसी बद्दल,ओबीसी आरक्षण आणि इतर ओबीसी बद्दल समाजात समाज जागृती निर्माण होत नसल्याने विश्‍वकर्मीय सुतार समाजात ओबीसी,संविधान आणि जनगणना बद्दल माहितीचा अभाव जाणवतो. 
   सुतार समाजात ओबीसी बद्दल समाजाला माहिती व्हावी ओबीसी बद्दल,जनगणनेच्या बाबतीत तसेच ओबीसी आरक्षण इत्यादी बद्दल जमिनीवर उतरून समाज जागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे.जेणेकरून ओबीसी सुतार समाजात ओबीसी बद्दल जागरुकता निर्माण होईल आणि ओबीसी संविधाना बद्दल तरूण पिढीला माहिती होईल.समाजात तरुण पिढीला ओबीसी बद्दल,आरक्षण आणि जनगणनेच्या बाबतीत तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जनतेला जे ओबीसी म्हणून संवैधानिक अधिकार बहाल केले आहेत त्या बद्दल माहिती होईल त्याचा परिणाम सुतार समाजात जागरुकता निर्माण होईल. विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रातील समाज नेतेमंडळी आणी युवा नेतृत्व मंडळी यांनी ओबीसी बद्दल समाज जागृती निर्माण करण्यासाठी समाज जागरूकता अभियान राबवणे गरजेचे आहे काळाची गरज आहे. 
    त्यासाठी गरज भासल्यास आपापल्या सामाजिक संघटना आणी सामाजिक संस्थेच्या असंख्य सामाजिक पदाधिकारी वर्गाचे व असंख्य कार्यकर्त्याचे सहकार्य घ्यावे,मदत घ्यावी. सामाजिक संघटना व सामाजिक संस्था या राज्यभरात विस्तारीत असल्याने हजारोंच्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा जोडलेले आहेत. त्यामुळे सामाजिक संघटना व सामाजिक संस्था आणि समाज नेतेमंडळी आणी युवा नेतृत्व मंडळी यांच्यासह तमाम पदाधिकारी व तमाम कार्यकर्ते यांच्या पुढाकाराने आणी नेतेमंडळी आणि युवा नेतृत्व यांच्या धडाकेबाज नेतृत्वाखाली विश्‍वकर्मीय सुतार समाजात ओबीसी, आरक्षण आणी जनगणनेच्या बाबतीत रस्त्यावर उतरून ओबीसी सुतार समाजात जमिनीवर समाज जागृती कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे व अपेक्षित आहे.
    सुतार सामाजिक क्षेत्रातील राजकीय पदाधिकारी मान्यवरांच्या नेतृत्वाखाली सुद्धा ओबीसी समाज जागृती निर्माण करण्यासाठी भलामोठा हातभार लागू शकतो, कारण राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी म्हटल्यावर त्यांचा समाज जनसंपर्क,जनतेशी संपर्क जास्त प्रमाणात असतो त्याचा निश्चितच उपयोग हा ओबीसी बद्दल जनजागृती करण्यासाठी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात होऊ शकतो.याव्यतिरिक्त विश्‍वकर्मीय सुतार सामाजिक क्षेत्रात अनेक दिग्गज, अनेक धुरंधर,मातब्बर,जेष्ठ आणी श्रेष्ठ अनुभवी लोक आहेत. समाजात अनेक मान्यवर सामाजिक प्रतिष्ठा, सामाजिक क्षेत्रातील मानसन्मान,सामाजिक क्षेत्रातील विविध प्रकारचे सामाजिक सन्माननजक पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले समाजरत्न, समाज भुषण आहेत. त्यांच्या सामाजिक क्षेत्रातील समाजकार्याचा ,अनुभवाचा उपयोग सुद्धा सामाजिक क्षेत्रात ओबीसी,संविधान आणि जनगणना या बाबतीत समाज जागृती करण्यासाठी निश्चित होऊ शकतो यासाठी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात प्रयत्न करणे गरजेचे आहे.
 जय ओबीसी जय विश्वकर्मा जय संविधान 
प्रमोद सुर्यवंशी चिखली मातृतीर्थ बुलडाणा ८६०५५६९५२१
     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा