शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले

क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले

भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना असंघटीत कामगारांना संघटित करण्याची प्रेरणा देणारे आणि भारतात महिलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास सतत प्रेरणा देणारे ज्योतीराव गोविंदराव फुले म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले,ग्रामीण भागात आजही जोतीराव ज्योतीराव नाही तर ज्योतिबाच म्हटल्या जाते. भटा ब्राम्हणांनी मराठा मागासवर्गीय समाजात एक म्हण पेरून ठेवली आहे.ती म्हणजे "हाले डुले महात्मा फुले"  माथाडी कामगारात विशेष कोल्हापूर,सांगली,सातारा, पुणे,नगर जिल्ह्यातील कामगार मंडळी या म्हणीचा जास्त शब्द प्रयोग करतात. त्यांना महात्मा फुले यांचा ऐतिहासिक इतिहास जास्त माहीत नाही.म्हणूनच ते असे म्हणतात.
जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या नऊ वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होते.विषमता,असमानता अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमी लढणारा माणूस त्यावेळी सना तनी भटा ब्राम्हणांच्या हिट लिस्टवर होता.त्यामुळे त्यांना जागोजागी संकटाचा सामना करावा लागे.यावर त्याने बुद्धीचातुर्याने मात केली.आजच्या सारखी जीवघेणी नीतिमत्ता नसलेले हिंसाचारी लोक तेव्हा नव्हते असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यावेळची परिस्थीती आम्ही वाचली आहे पण आज लोकशाही असूनही प्रशासकीय व्यवस्थेतील मनुवादी किती हिंसक पण मागासवर्गीय समाजाच्या तरुणांना वागणूक देतात.ते सोशल मीडियावर पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मग ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन मुलीची शाळा काढून किती मोठा संघर्ष केला असेल यांची कल्पनाच केल्या जात नाही. 
आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही महापुरुष,महात्मे शोधून ही सापडणार नाहीत.काही शिक्षण सम्राट आहेत पण त्यांच्या कडून कोणताही आदर्श घेण्याच्या लायकीचे ते नाहीत.त्याच बरोबर ज्योतीराव फुले उत्तम बिल्डर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक होते हे आम्ही कधी वाचलेच नव्हते.पण हरी नरके सारख्या बुद्धिजीवी विचारवंतांनी त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा अभ्यास करून जागा समोर मांडला परंतु त्यावर व्यापक चर्चा होतांना दिसत नाही.
ज्योतीराव फुले यांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची
 कामे वस्तु आजही लक्षवेधी आहेत पण त्यांची पाहिजे त्या प्रकारे दाखल घेतल्या जात नाही.कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा कोणी बांधला?. कधी बांधला ?.या बाबत कोणी विचारत नाही.कारण या वर चर्चा सुरू झाल्यास आजच्या तरुणांना एक प्रेरणादायी सत्य इतिहास समोर येईल या भीतीने वर चर्चाच होत नाही. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानायचेच अनेकांना आज भी काळजाला झोबंते.त्यामुळे बाबासाहेब फुलेनां गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आज ही फुलेंच्या विचारांशी प्रामाणिक राहुन उठता बसता त्यांच्या विचारला प्रतिमांना त्रिवार प्रणाम करतो.
१९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे. "मूह मे राम बगल मे सूरी " या रीतीने गांधीवादी, सावरकरवादी आणि मनुवादी वागतांना दिसतात.
ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे ऐतिहासिक काम करून ठेवले म्हणून आज त्यांची फळ आपण मुक्तपणे खातो.
महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे त्याला मागासवर्गीय समाजाने खऱ्या अर्थाने साथ दिल्यास केंद्रात फुले शाहु आंबेडकर विचारांचे सरकार स्थापन होऊ शकते.
मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर भारतात या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ठेवली आहे.पण काही मागासवर्गीय समाजातील गुलामांनी त्याला सुरुंग लावला होता.शत्रू पक्षाच्या विचारधारेच्या नेत्यांना केवळ आर्थिक लाभा करीता संघटनेत सहभागी करून घेतल्यामुळे क्रांतिकारी विचारांचे कॅडर बेस संघटन मागे पडले आणि लीडर बेस लोक पुढे आले त्यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला.त्यांचे फळ आज उत्तर भारतीय जनता भोगत आहे.व्यक्ती पेक्षा संघटन मोठे असते संघटने पेक्षा विचारधारा मोठी असते.फुले शाहु आंबेडकर विचार हे सर्वान पेक्षा मोठे आहेत. क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले आहेत.त्यांची विचारांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर क्रांतिकारी परिवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही.आज देशात जी परिस्थिती आहे.तिचा गांभीर्याने विचार करण्यासाठी महापुरुषांची क्रांतिकारी विचारधारच यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकते.महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व मागासवर्गीय समाजाने आपआपल्या समाजाच्या संघटनेचे वैचारिक आत्मचिंतन करून परीक्षण करणे आवश्यक आहे.हीच त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजा कडून अपेक्षा महात्मा ज्योतीराव फुले यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा!.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई

आंबेडकरी चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला ?


 आंबेडकरी चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला ?


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १२७ वर्ष पूर्ण होत असताना.जिवंत पाणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा आज भीती त्यांच्या विचारांच्या लोकांकडून यांना वाटत आहे.तरी हा मागासवर्गीय समाज पूर्ण पणे आंबेडकरी विचार स्विकारत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या क्रांतिकारी घोषणा,प्रतिज्ञा म्हणजेच त्यांनी दिलेला कोणता ही मंत्र आज समाजात पूर्णपणे रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे ही राहलो असे म्हणता येत नाही.
बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती, नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होते. मातृसंस्थाचे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे पाहतात.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभावच्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात.त्यामुळे आम्ही " बुद्ध आणि त्याचा धम्म " हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.
एका बाजूला आम्ही भाजपच्या नरेंद्र,देवेंद्र यांना त्यांच्या विचारधारेला सतत विरोध करीत राहणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच हस्ते भिम जयंतीचे भिम महोत्सव किंवा भिम शाहिरी जलसा, राष्ट्रर्निर्माते विचार मोहत्सव साजरा करणार,यातुन आम्ही काय बोध घ्यावा?.त्यांना शत्रू म्हणून लांब ठेवणार कि मित्र म्हणून जवळ करणार?.त्यांच्या आर्थिक मदतीवर किंवा सामाजिक सलोख्यावर आम्ही राजकीय लढाई कशी लढणार?. मोठे नेते कार्यकर्ते, पत्रकार, विचारवंत साहित्यिक योग्य मदत सहकार्य घेऊन सुरक्षित नोकरी करून, प्लॉट,टॉवर, बांगला असा सुरक्षित ठिकाणी राहतील,पण खेडया पडयातील व शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या समाजाचे काय?. यांनी बाबासाहेबांचे प्रामाणिक शिष्य किंवा भक्त म्हणून शासन कर्ती जमात बन्या करीता मतदार म्हणून कोणाला मतदान करावे?. हा प्रश्न कायम निकालात निघाला.आपल्या समाजातील शत्रू पक्षात असलेल्या मित्राला कि मित्र पक्षातील शत्रूला?. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती मोठया उत्सवात साजरी करणाऱ्या प्रतिष्ठान,फाऊंडेशन,मंडळ,संस्था,संघटना यांचे मुख्य उद्दिष्ट कोणते?.यांचे राजकीय उद्धिष्ट कोणते?.यांचा विचार कोण आणि कधी करणार?.शत्रू चार वर्षात राज्यातील केंद्रातील राजकीय सत्ता हातात घेऊन संविधानाने दिलेले सर्व मूलभूत अधिकार नष्ट करीत असतांना आम्ही फक्त एक दिवसाचे शक्ती प्रदर्शन करून पुन्हा पुन्हा गटबाजीत गुंग आहोत.आजच्या परिस्थितीत आंबेडकरी विचारांच्या पक्षाला सुवर्ण संधी त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेल्या सर्व मागासवर्गीय समाजाला विश्वास देऊन राजकिय सत्ता परिवर्तनास सज्ज झाले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं असंघटीत अशिक्षित दलित शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित दलित शोषित समाजाची काय अवस्था असेल?.या चिंतेने ते सतत तळमळत होते.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्या साठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला.इंग्लंड,कोलंबिया सारख्या साता समुद्राच्या पलीकडे परदेशात उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद ,संघटना,व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही. कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.आजचे नेते एका आमदार,खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती धम्मभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमी च्या वापराची [व्यापाराची ] त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे मागासवर्गीय शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद्धा) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.पण बदल होत हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मनुस्मृती जाळली, महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश महणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले ,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली.दलित शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविला.आणि आज खरेच मागासवर्गीय शोषित समाजात जास्तीचाच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाली.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.
माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही "बुद्ध आणि त्याचा धम्म " वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली.आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये. तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे . याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता "सर्वधर्मसमभाव "ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.
बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो. शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला, काल्पनिकतेला,कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला आहे.याचा गांभीर्याने १२७ व्या जयंती दिनी विचार झाला पाहिजे.भिमजयंती दिनाच्या सर्व हार्दिक मंगल कामना!.

जयभीम!. जयभारत !!.
आयु सागर रामभाऊ तायडे.मोब -९९२०४०३८५९ 

भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.

भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.
बाबासाहेबांचे नांव घेणे बंद करा किंवा त्यांच्या विचारांची अंमल बजावणी करा.म्हणजेच भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमा नुसार बदलत राहतो.त्यानुसार मानव प्राणी सुद्धा बदलत राहतात.वेळ,काळ आणि संकट कधीच सांगुन येत नाही.म्हणुन वेळचे आणि काळाचे नियोजन करून संकट टाळता येतात.उन्हाळ्यात आणि पाऊसाळ्यात कोणत्याही मोठ्या उत्सवाचे नियोजन कोणी करीत नाही..म्हणुन आता ग्रामीण भागातही मोठमोठे हॉल, सभागृह बांधण्यात आले आहेत.१९५६ पूर्वी सर्व समाजा करीता हे हॉल सभागृह उपलब्ध नव्हती.पण आता समाजाने बदलेलच पाहिजे.आम्ही खेडे सोडुन शहरात आलो,शेणाने सारवणाऱ्या गवताच्या झोपडीतुन सिमेंट काँक्रेटच्या चकचकीत लादी स्टाईलच्या घरात आज राहतो. हा बदल एकदिवसात नाही घडला.खूप कष्टाची कामे करून आणि झोपडी वाचविण्या साठी संघर्ष करून आता स्वतःच्या घरात राहत आहोत.तेव्हा झोपडी आणि झोपडपट्टी वाचविण्या साठी आम्ही निळा व पंचशील झेंडा लावला होता.सोबत बुद्ध विहार आणि जयभिम चबुतरा पण बांधला होता.आता आम्ही बदललो तेव्हा विहार व चबुतरा पण बदलला पाहिजे होता.झोपडपट्टी वाचविण्या साठी बुद्ध विहार होती.म्हणुन आम्ही नियमित एकत्र येत होतो.बसत होतो,चर्चा करून कार्यक्रम घेत होतो.आता त्यांची गरज वाटत नाही.कारण झोपडीसह पिण्याच्या पाण्याचे मीटर, लाईट मीटर नांवावर झाली आहेत.आता तुटण्याची भिती नाही.म्हणुन एकत्र बसण्याची गरज राहली नाही.
आताच्या घडीला प्रत्येक नगरात बुद्ध विहार आहेत. पण ती स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजकीय स्पर्धेमुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली बंद आहेत.कारण बाबासाहेब सर्वांचा एकच असला तरी प्रत्येकाचा आर्थिक पोशिंदा वेगळा वेगळा आहे.म्हणुन एकत्र बसल्यास एकच बुद्ध एकच बाबासाहेब स्विकारावा लागेल.बावीस प्रतिज्ञा नाही पाळता आल्या तर कमीत कमी पंचशील तर पाळावेच लागेल.ते शक्य होत नसल्यामुळे कार्यकर्ते नेते बुद्धविहारा ऐवजी नाक्यावरील बियरबार मध्ये बसण्यास तयार आहेत. आणि विशेष म्हणजे पिणारे खाणारे एकत्र बसू शकतात. सुशिक्षित आणि सुरक्षित नोकरी करणारे यांची इथे गरज नाही.ते असंघटीत समाजाला चालत नाही.कारण ते पित नाही.किंवा तोडपाणी करून खाऊ पिऊ घालत नाही.ते सर्वा कडून सारखी वर्गणी काढण्याची अपेक्षा करतात.
जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो.हीच एकजूट निवडणूका मध्ये का दाखवीत नाही?.भरपूर नाही तरी यथा शक्ती खुप पैसा गोळा करतो, पण तो लायटिंग, डेकोरेशन, ब्रेक डांस, कव्वाली वर खर्च करतो.आम्ही किती मोठी जयंती साजरी केली यांचा तोरा मिळवितो.पण नगरातील बुद्ध विहार बांधकाम दुरुस्ती साठी नगरसेवक,आमदार की राजकीय दलालांच्या पाया पडतात.विभागात बुद्ध विहार खूप आहेत,पण मालकी हक्क आणि देखभालीसाठी न मिटणारी भांडण आहेत.त्यातुन चैत्यभूमी, दीक्षाभूमी, पीपल्स सोसायटी, आंबेडकर भवन सारखी ऐतिहासिक वास्तू संस्था सुटले नाही.मग विभागात नगरात नवीन बुद्ध विहार किंवा मंदिर बांधण्या पेक्षा विभागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी,गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी संस्था निर्माण करून तिच्यात दरवर्षी गुंतवणूक वाढवा तीच खरी आंबेडकरी विचारांची चळवळ असेल.आणि जयंतीनिमित्त जशी एकजूट दाखविल्या जाते तशीच एकजूट निवडणूका मध्ये दाखविली तर नगरसेवक, आमदार व खासदार आपला येऊ शकतो.
आता राज्यात व केंद्रात आर एस एस प्रणित सरकारे आहेत.त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणारा प्रसिद्ध क्रूरकर्मा प्रधानसेवक संविधानिक कोणतेही संकेत न पळता धडाधड निर्णय घेत आहे.जे निर्णय त्याला घेता येत नाही ते सरळ सुप्रीम कोर्टा द्वारे राबविले जात आहेत.त्यांच्याशी राजकीय टक्कर देण्यासाठी आपल्या कडे कोणता राजकीय पक्ष आहे.महाराष्ट्रात सर्व नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचा स्वतःचा मतदार संघ आहे काय?.एकही नेत्यांचा मतदारसंघा नाही.म्हणूनच राज्यातील किती मतदारसंघात आपण आमदार निवडून आणू शकतो?.यांचा गांभीर्याने विचार कोणी करीत नाही.वार्डात निवडून न येणारा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहतो केवळ पैसे कमविणे हाच मेन उद्देश असेल तर समाजाने त्याला आपली जागा दाखविली पाहिजे की नाही?.असे लोक पक्ष संघटनेत काम करण्यापेक्षा स्वसंघटना कडून राजकीय दलाली करतात त्यांना चोप दिल्या शिवाय आपण शत्रूला नामोहरम करू शकत नाही. राष्ट्रीय पातळीवर एकमेव पक्ष कोण असेल तर तो बहुजन समाज पक्ष त्यांच्या नेतृत्वाचे काही ध्येय धोरण चुकले होते ते दुरुस्त करून त्यात सुधारणा करून राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना उभी राहू शकते आणि दोन राष्ट्रीय पक्षांना आव्हान देऊ शकते.करीता बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की बहुजन समाजातील लोकांचे काय?. कार्यकर्ते,नेते बुद्ध फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वैचारिक वारसा सांगतात आणि शत्रु पेक्षा मित्रा सोबत लढतात आणि व्यक्तीगत व वैचारिक संबंध कायमस्वरूपी तुटतील असे वागतात,आणि राजकीय दुष्टचक्रात फसतात.
आताच्या घडीला मनुवादी मानसिकता असलेला पक्ष सर्व आघाडी वर मात करीत आहे.केवळ जन आंदोलन करून त्यांना रोखणे अशक्य आहे.म्हणूनच प्रत्येक मतदारसंघात समान विचारांच्या मित्र संस्था, संघटना आणि पक्षांना एकत्र येऊन एकास एक पर्याय दिल्यास शत्रूला आपण शह देऊ शकतो. करीता विचारांची जयंती साजरी करण्यात यावी. नाच गाणे ब्रेकड्रॉन्स बंद करण्यात यावे.पूर्णपणे बंद करा असे म्हणणार नाही.कारण ज्या परिस्थितीत असंघटीत कामगार,मजुरी करून जगतो त्यांच्या कडे पाहिल्यास लोकांना त्यांची एवढी संघ शक्ती जयंती साजरी करण्यासाठी कुठून येते हा मोठा प्रश्न पडतो.नेहमी तिरस्कार करणारे लोक आंबेडकरी चळवळीतील भिम जयंती साजरी करण्याचा जोश पाहून प्रचंड अस्वस्थता वाढते असते.आंबेडकरी समाज जोश मध्ये होश गमावून बसतो हे आता पर्यंत च्या निवडणूकात आपण पाहिले आहे.येत्या काळात स्वाभिमानाने जगायचे असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.आणि विचारांची देवाणघेवाण करून राजकीय परिवर्तन घडवा नाही तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही.२०१९ ला आर एस एस प्रणित भाजपा केंद्रात सत्तेवर आल्यास गंभीर परिणामास तयार राहा.त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्याकडे कोणता ठोस कार्यक्रम योजना आहे?.व्यक्ती पूजा मूर्ती पूजा करून आपण जयंती साजरी करत असाल तर क्रांतिकारी विचारांचे काय?.तो जर पराजित होत असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग आहे की नाही?.यांचे प्रत्येक भिम सैनिकांनी आत्मचिंतन करावे हेच १२७ व्या भिम जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतांना नम्र विनंती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक विचारांना कोटी कोटी प्रणाम व सर्व जागृत वाचकांना हार्दिक शुभेच्छा
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

समाजाचा गद्दार नेता आणि अधिकारी ?.

समाजाचा गद्दार नेता आणि अधिकारी ?.
बहुजन समाजात विविध जाती,पोटजाती आहेत प्रत्येक जात स्वतःला इतर पेक्षा मोठी समजते त्यांचाच फायदा आज पर्यंत काँग्रेस आणि भाजपा ने घेतला आहे.त्यांनी प्रत्येक जातीत एक गद्दार नेता आणि एक अधिकारी निर्माण केला.सर्व समाज शैक्षणिक, साहजिक आणि आर्थिक दृष्टया सारखा असतांना एकच नेता राजकीय दृष्ट्या मोठा कसा होतो.ही खरी ग्यानबाची मेख आहे.त्यांची प्रगती कशी होत जाते.यांचा सर्वच बहुजन समाजाने विचार करण्याची गरज आहे.रेल्वे स्टेशनवर चहा विकणारा नरेन्द्र भाई मोदी देशाचा पंतप्रधान होण्यास किती वर्ष लागली याचा विचार करा.त्या करिता कोणा कोणाची सेवा,हुजरे गिरी आणि कुराडीचा दांडा बनुन (समाजाला)वटवृक्षाला तोडावे लागले त्यांचा हिशेब कारायलालयास खरा इतिहास समोर येईल. जो आपल्या विचार धारे च्या विरोधात काम करणाऱ्या संस्था,संघटना,पक्षात म्हणजे शत्रू गटात कार्य करतो.त्यांच्या मोठे पणाचा समाजाला काय फायदा?. नरेंद्र मोदी जन्माने ओबीसी आहेत.पण विचाराने मनुवादी असल्यामुळे ते ओबीसी च्या स्वाभिमानी योजना राबवु शकत नाही.
>ओ बी सी, आदिवासी,दलित म्हणजे फक्त बौद्ध, किंवा महार नाही.तर चांभार,मातंग कोणत्या ही समाजातील नेता आणि अधिकारी जो आपल्या विचार धारेच्या विरोधी गटात कार्य करतो,तो कितीही मोठा झाला तरी त्याचा स्वतःच्या समाजाला काही फायदा होत नाही.कारण त्याच्या मोठेपणाचा संदर्भ हा त्या विरोधी राजकीय किंवा समाजातील कार्याच्या संदर्भात मोजण्यात येतो असतो.त्यामुळे त्याच्या मोठेपणाचा फायदा झालाच तर त्याच्या विरोधी वर्गाला होत असतो.आणि स्वतःच्या समाजाचा तोटा होत असतो.तरुणमुलांनी पुढाऱ्यांच्या,नेत्याच्या किंवा डाॅन लोकांच्या (दादा, भाई)  मागे फालतू फिरून आपला वेळ वाया घालवू नये.अनेक भागांत वेगवेगळ्या टोपणनावाने पुढारी, नेते व भाई  आहेत.उदा: नाना, दादा, भाऊ, भाई, तात्या, काका, दादासाहेब, इत्यादी.अशी अनेक तरुण मुले प्रत्येक पुढाऱ्याच्या,नेत्याच्या व डाॅनच्या मागे आपला कामधंदा, व्यवसाय, करिअर सोडून रात्रीच्या एका दारुच्या बाटलीसाठी आणि चिकन बिर्यानी साठी काही तरुण मुल फिरताना दिसतात.नेत्याचे आणि अधिकाऱ्याचे नेहमीच साटेलोटे असते.त्याशिवाय दोघेही मोठे होत नसतात. ऐन तरुणपणातला वेळ अक्षरशा वाया घालवतात तरूण वयातील मुलांना एक दिवसही वेळ घालवणे परवडणारे नाही.जेव्हा आपल्या आयुष्यातील हा वेळ वाया जातो.,तेव्हा आपले वय वाढत जाते, लग्नाचे वय झाले तेव्हा मुलगा काय नोकरी,धंदा करतो त्यांचे महिना इनकम किती असे प्रश्न विचारे जातात तेव्हा आई वडील,मामा,काका,भाऊ कोणीच उत्तर देण्याची हिंमत करीत नाही.तेव्हा तरुण मुलांना गेलेल्या दिवसातील आपण केलेली कामे आठवतात.तरुण मुलांची अवस्था घरका ना घाटका झालेली असते.
> बहुजन समाजातील अनेक तरुण वेगवेगळ्या पक्षात कार्यकर्ता म्हणून किती ही दिवस नेत्यांच्या मागे फिरले तरी त्यांच्या हाती काय आले?.बसपा ते बामसेफ किती सुशिक्षित तरुण बरबाद झाले?.यांचा हिशेब नाही,जेव्हा तुम्ही अडचणीत असाल तेव्हा कुठलाच नेता त्याचा पक्ष तुमच्या मागे उभा रहात नाही. पहिल्यांदा पैसा कमवा घरच्यांना वेळ द्या घरातल्या कामात हातभार लावा तुमच्या जवळ पैसा असेल तरच दुनिया तुम्हाला सलाम करेल. नेते पुढारी भाई लोक तुमच्या मांडिला मांडी लावून बसतील नाही तर असं राहिलात तर त्यांच्या दरवाजा जवळच बसावं लागेल आणि त्यांच्या गाडीत कुठे मागे जागा मिळेल तिथे बसावे लागेल.नेता पुढारी दादा रूबाबात चालतो तो फक्त आणि फक्त आपल्या सारख्या कार्यकर्त्याच्याच जिवावर  म्हणुन वेळीच सावध व्हा. तुमचा वापर संपला की तुम्हाला बरोबर खड्याप्रमाणे बाजुला केले जाते.एकदा वेळ गेली की पुन्हा काहीही करता येणार नाही.आपले लक्ष नेहमी आपल्या विकासाकडे केंद्रीत करा. म्हणुन स्वत:चा उद्योग मोठा करा. स्वत:ची केबीन आलिशान सिंहासने बनवा,तुमच्या उद्योगात काम करणारे लोक तूमचे मावळे समजा, तूम्ही तूमच्या उद्योगाचे छत्रपती व्हा. तुम्ही तुमच्या विभागात सामाजिक,शैक्षणिक उपक्रम राबवा एक चांगले समाजसेवक म्हणुन यशस्वी व्हाल.तेव्हा तुमची इज्जत, नाव हे एका नेत्यापेक्षाही मोठ्या आदराने घेतले जाईल. तुम्ही उद्योगात यशस्वी झाल्यानंतर उद्या एखाद्या सामाजिक कामाचीही सुरुवात करु शकता व पूढे जाऊन उद्योग व सामाजिक कार्य या दोन्हीही महत्वकांक्षा पूर्ण करू शकता.
> एक लक्षात ठेवा, मोठ्या झाडाखाली दुसरे छोटे झाड कधीही मोठे होत नाही हा निसर्गाचा नियम आहे.तेव्हा दुसऱ्याला मोठे करण्यापेक्षा स्वत: मोठे व्हा. कोणत्याही नेत्याच्या मागे फिऱू नका.वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी ५ रूपयांना असतो, तोच रात्री रद्दीत ५ रूपये किलोने विकला जातो.म्हणुन जीवनात वेळेला महत्व द्या आणि स्वत:चा व समाजाचा विकास करा. एक विचार करा आपण जर यांना आणि त्यांना मोठे करतो तर आपण का मोठे होणार नाही?. सिद्धार्थ राजपुत्र होता तेव्हा त्याला सुरा, मदिरा व अप्सरा प्रकारचे अनेक व्यसने लागावी म्हणुन किती प्रयत्न झाला पण राजपुत्र सिद्धार्थ ने ते सर्व प्रयत्न उलट करून
> ठेवले त्यांनी सुरवात पासुन सत्य शोधण्याचे व मांडण्याचे काम केले.त्यासाठी त्यांनी अनेक ऋषी ज्ञानी पंडिता कडून ज्ञान घेण्याची जिध्द ठेवली.आजच्या तरुणांनी त्यांच्या सारखा आदेश ठेवला पाहिजे.सर्वच समाजात आज ज्ञानी पंडित खूप झाले आहेत.पण त्यांचे विचार आणि आचरण यात तुफान फरक आहे.त्याच पद्धतीने समाजात कार्यकर्ते,नेते व अधिकारी खूप झालेत. पण सामाजिक जबाबदारी म्हणुन किती प्रामाणिक आहेत.जे असतील ते समाजात आदर्श ठरतात.त्यांना त्यांच्या गांवात मानसन्मान मिळतो.ते सदैव सर्व प्रकारचे सहकार्य करण्यास तयार असतात.त्यांचा आदर्श तरुणांनी घ्यावा.आपण आपल्या परिसरातील नेत्यांना आणि अधिकऱ्यांना ओळखत असतो.ते सामाजिक जबाबदारी किती प्रामाणिक पणे राबवितात यांचा योग्य त्या पद्धतीने विचार करा त्यांना समाजात किती व कसा वापर आहे हे तापसुन त्यांचा मानसन्मान कि वस्त्रहरण करण्याची तयारी आपल्या विभागातील तरुणांचीच असली पाहिजे.दुसऱ्या विभागातुन तरुण येतील आणि आपल्या विभागातील नेत्यावर,अधिकाऱ्यावर कारवाई करतील ही अपेक्षा ठेवणे चूक ठरेल.ह्याची गांभीर्याने दाखल आपण घेत नसल्यामुळे समाजात गद्दार नेते आणि अधिकारी मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत.तेव्हा तरुणांनो उठा जागे व्हा!. अन्यता पुढील पिढी तुम्हाला माफ करणार नाही.सोशल मीडियावर अनेक तरुणाच्या छोट्या पण महत्वपूर्ण मताचे हे संकलन आहे.यात अनेकांच्या पोस्ट मधील संदर्भ घेतला आहे.
> सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859.

राजकीय पक्षाचे उत्पन्न आणि खर्च ???.


भारत कृषिप्रधान देश आहे. सत्तर टक्के लोक शेतीवर अवलंबून असतात.शेती शी संबंधित अनेक लोकांचा रोजगार आहे.मग तो भाजीपाला विकणारा असो कि कीटक नाशक औषध,बिबियाने विकणारा असो.की शेतीकरण्यासाठी 
लागणारे साहित्य किंवा गुजर मारवाड्याचे,वाण्याचे किराणा दुकान,या सर्वांना वाणसामान-किराण्याचा हिशोब ठेवावा लागतो.खरेदी आणि विक्री यातुन मिळणारे उत्पन्न त्यातुन कामगाराचा पगार,जागेचे भाडेे,लाईट,पाणी बिल एकूण सर्व खर्च केल्यावर उरलेली रक्कम म्हणजे निवळ नफा.त्यालाच ग्रामीण भागात जमा खर्च ताळेबंद पत्रक आणि सरकार शासकीय भाषेत उत्पनाचे विवरण पत्र म्हणतात..हे भारतात राहणाऱ्या प्रत्येक व्यवसाय धंदा,नोकरी करणाऱ्या नागरिकांना दरवर्षी सादर करणे आवश्यक आहे.मग यातून राजकीय नेते आणि त्यांचे पक्ष कशे सुटतात?. राजकीय लोकांना भांडवलदाराची प्रचार प्रसार माध्यमं प्रिंट मीडिया,चॅनल मीडिया कशी मोठी करतात.त्यांचा एकूण खर्च कोण करतो याचा विचार सर्व सामान्य माणुस करूच शकत नाही. भांडवलदार आणि राजकीय लोकांचे कसे साटेलोटे असते त्याचा हिशेब पाहू.
भारतात ७०००० वृत्तपत्र आहेत.त्यात ४०००० चालू आहेत किंवा जाहिराती देण्याच्या लायकीचे आहेत अस समजा.पहिल्या पानावर पूर्ण पानभर जाहिरात द्यायला कुणाचे दर लाख रुपये तर कुणाचे ६० लाख रुपये आहेत. सरासरी दहा लाख धरले आणि दहा दिवस जाहिरात दिली तर किती झाले ?.एक कोटी रुपये , ४०००० पेपरचे चाळीस हजार कोटी. चॅनल मीडिया म्हणजे टी व्ही च्या भारतात सगळ्या मिळून ८८० वाहिन्या आहेत.१० सेकंद जाहिरात द्यायला सरासरी खर्च एक लाख रुपये.रोज १५ मिनिट एकूण जाहिरात दाखवली तर रोजचा खर्च ९० लाख रुपये आणि अशी महिनाभर जाहिरात केली तर एक महिन्याचा खर्च २७ कोटी रुपये.अश्या फक्त ७०० वाहिन्या धरल्या तर होतात १८९०० कोटी रुपये.एका एफएम रेडियोवर जाहिरात करायला सगळ्या दिवसाचे मिळून पन्नास हजार धरले आणि महिनाभर जाहिराती केल्या तर झाले १५ लाख रुपये. अश्या १००० रेडियो वाहिन्या धरल्या तर १५० कोटी रुपये.एक हेलिकॉप्टर भाड्याने घेतल तर तासाला भाड आहे दीड लाख रुपये.२५ हेलिकॉप्टर महिनाभर रोज फक्त दहा तास वापरली तर भाडे झाल किती ? ११२ कोटी रुपये.खाजगी जेट विमानच भाड आणि रोजचा खर्च विचारूच नका.इमेज बिल्डींग कंपनी , कॉम्पुटर प्रोग्राम्स , थ्रीडी सभा , वेगवेगळ्या मिरवणुका खर्च अजून हिशोबात घेतलेले नाहीतच.बाकी फेसबुक पेजेस चा खर्च आणि फुटकळ खर्च वेगळा.ढोबळ खर्च किती आहे ?.६०००० कोटी रुपये. साठ हजार कोटी रुपये फक्त.“ अब कि बार मोदी सरकार “ , माननीय प्रधानमंत्री मोदिजींच्या लोकसभेच्या निवडणूक प्रचाराच्या खर्चाचा आकडा मी तसा दबकत मांडलाय.(संदर्भ सोशल मीडिया)
आता पुढला हिशोब.करपात्र देणग्या घेत असल्यामुळे वार्षिक विवरणपत्र दाखल करतात सगळे राजकीय पक्ष.भाजपच्या २०१३-१४ आणि २०१४-१५ ह्या आर्थिक वर्षात निव्वळ नफा काय आहे ?. उलाढाल काय आहे ते तपासून पहा अतिशय चारित्र्यवान आणि देशभक्त लोकांचा पक्ष सगळा हिशोब चोख आणि पारदर्शक ठेवत असेलच. हा ६०००० कोटींचा खर्च जर ताळेबंदमध्ये आला असेल तर आपली काहीच हरकत नाहीये. जर आला नसेल तर मग मात्र,अच्छे दिन कुणाचे आलेत ? कुणी गुंतवणूक केली होती आणि कोण व्याजासहित वसूल करतय सगळ समजून घ्या. 
भारतातील शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगार हाच मोठ्या संख्येने मतदार आहे.तोच मतदान करणे आपला जन्मसिध्द अधिकार आहे असे समजुन मतदान करतो.त्याला शोषण मुक्त अच्छे दिन येणार या भरोशावर त्याने मोदींच्या सर्व सोम्या, गोम्या उमेदवारांना त्यांनी मतदान केले.त्यामुळे भाजपाचे शेपन्न इंच छातीचे मोदी सरकार बनले त्याला आता दोन वर्ष झाले तरी गोरगरिबांच्या खात्यात विदेशी काळा पैसा अजुन जमा झाला नाही.जुलै आगस्ट महिना वार्षिक आर्थिक 
विवरण पत्र भरण्याचा असतो.नोकरी करणाऱ्या प्रत्येक कामगार कर्मचाऱ्यांच्या पगारात राज्याचा टॅक्स आणि केंद्राचा इंकॉमटक्स पगारातून कापला जातो.
पण शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगार मजुरांना नियमित रोजगार नाही.त्यांना कोणती ही सामाजिक सुरक्षा नाही.त्यांचे शोषण तर सर्व बाजुने मुक्त पणे होते.त्यात राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी नेहमीच आघाडी वर असतात.शेतकऱ्यांचा शेतातील माल कृषिबाजार समितीत आला की अडते,व्यापारी आणि अधिकारी मालाची किंमत पडणार तेव्हा उत्पादन खर्च वजा करून किंमत ठरविण्याचा कायदा का लागु होत नाही?.हा मोठा प्रश्न देशातील बहुसंख्य  शेतकरी,शेतमजूर व असंघटीत कामगारांना पडत नाही.तो पर्यंत या देशात भांडवलदार आणि राजकीय पक्षातील नेत्याचे आर्थिक उत्पन्नाचे खरे विवरण पत्र सादर होणार नाही.तो पर्यंत आपण भारत माता की जय हो !!.गो माता की जय हो करीत राहणार.भांडवलदार आणि राजकीय पक्ष कोणत्याही विचारधारेचा
असला तरी तो शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कामगारांचे शोषण करीतच राहणार आहे.त्या शोषणातून होणारी आर्थिक लूट प्रिंट मीडिया,चॅनल मीडियावर  जाहिराती द्वारे उधळत राहणार आहे.शेतकरी,शेतमजूर,असंघटीत कामगार मजुरांना अच्छे दिनाचे स्वप्न दाखविण्या करीता. म्हणुन जागृत भारतीय नागरिकानो चावडी वर बसुन हे राजकीय पक्षाचे व  प्रत्येक नेत्याचे आर्थिक उत्पन्नाचे  विवरण पत्र काय असते ते सार्वजनिक ठिकाणी चर्चेला घ्या आणि उघडा डोळे नि पहा निट काय चालले हे????.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई-९९२०४०३८५९.

असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?


असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?
भारतात विविध जाती धर्माची माणस राहतात.त्यांचे संसार खूप वेगळे आहेत.त्यात सर्वात मोठा धर्म म्हणजे हिंदू धर्म त्यात त्यांचे मनुस्मुर्ती ने लावलेले सर्व अलिखित कायदे भारतातील बहुसंख्य जाती जमातीचे लोक प्रामाणिकपणे पार पडतात.जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व धार्मिक विध्या ह्या ब्राम्हणा कडून करून घेतल्यास पाहिजे.ते हजारो वर्षापासून चालू असलेली परंपरा कोणीच नाकारण्याची हिंमत करीत नाही.तर अशा समाजात जेव्हा गोरगरीब माणसाला मग तो कोणत्याही जातीचा असो.त्याला ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न केल्यास सामुदाहिक पणे मारल्या जाते.तेव्हा हि मारलेली माणस इतर लोकांच्या मानगुटीवर भूत बनून बसतात.मग त्यांचा बंदोबस्त मांत्रिक,बाबा,महाराज,किंवा ब्राम्हण भरपूर दक्षिणा घेऊन करतात.देशात प्रत्येक गांवात असा घटना घडतात.अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाची संख्या मोठी आहे.त्याही पेक्षा अन्याय अत्याचाराचे बळी जाणाऱ्या समाजाची संख्या देशभरात खूपच मोठी आहे.मग प्रवित्र हिंदू धर्माच्या संस्कारानुसार मागासवर्गीय जातीजमातीचे हे बळी जाणाऱ्या माणसाचे आत्मे असंतुष्ट असतात.मग ते भूत बनून शांत का बसतात?.हा प्रश्न मला खूप दिवसा पासून सतावित आहे.म्हणून आज हा लेखप्रपंच.देशात सर्वच गांवातील भूत हे सगळी कडे पिंपळाच्या किंवा वडाच्या ​
झाडाखाली का आढळत असतात.​भारतात काश्मिर ते कन्याकुमारी व गुजरात ते गोहाटी कोठे ही जा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीच भुते असतात असे लोकं सांगतात, म्हणतात. भारतात वनस्पतींच्या लाखो प्रजाती आहेत मग
सगळी भुते , हडळी, प्रेतात्मे, पिशाच्चे पिंपळाच्याच झाडाखाली/वर का आढळत असावेत?.कारण हिंदू धर्म मानणाऱ्या मानवा करिता मनुस्मुर्ती कारणीभूत आहे.देशातील मानव जातीत जेवढ्या जाती पडतील तेवढ्या निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी माणसा माणसात विषमता निर्माण करून ठेवली.आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा,व भिती कायम माणसाच्या मनावर ठेवली.यालाच प्राचीनकाळी तथागत गौतम बुद्ध यांनी स्वत प्रयोग करून कायमची मूठमाती दिली.पण त्यातून आजही भारतातील बहुसंख्य लोक मुक्त नाहीत.
प्राचीन काळी गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणुन !
भारतात पिंपळाच्या झाडाचे महत्व प्रचंड वाढले.याला शास्त्रीय कारण असे की पिंपळ वातावरणात आँक्सिजन जास्त सोडतो.जुन्या काळी लोक योगविद्या,ध्यानधरनेसाठी पिंपळाखाली बसून अध्यात्मिक चर्चा करीत असत .आजही लोक गावात पारावर जमतात तेथे पिंपळाचेच झाड असते. एवढेच नव्हे तर बोधगया येथील २५०० वर्षापुर्वीचे झाड अजुनही लोकांनी जपुन ठेवले आहे. अशा रीतीने पिंपळाचे झाड बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रसाराचे ठिकाण बनले.याचा काही कर्मठ मनुवाद्यांनी याचा खुपच धसका घेतला आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार 
रोखण्यासाठी,त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली भुत अस​तात अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. म्हणुन आजही सामान्य माणसाचा असा समज असतो की पिंपळाच्या झाडाखाली भुते असतात.विज्ञान अज्ञान,अंधश्रद्धा,भिती दूर करते.हे  
लक्षात ठेवा
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' हा पिंपळाच्या पानावरच दिला जातो.*भारताचा राष्ट्रीय वृक्ष सुद्धा पिंपळ आहे.अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी राजघाटावर
"पिंपळ'वृक्षाचे रोपण केले.हे कशाचे लक्षण आहे​?.​
आत्मा आहे कि नाही या बाबत तथागत गौतम बुद्ध आणि ब्राम्हण पंडित यात झालेला संवाद लक्ष देऊन वाचा. बुध्दांना एका पंडितने विचारले की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.बुध्द म्हणाले , तुम्हाला असे कुणी सांगितले की मी असे बोललो?.पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही .मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का?.पंडीत म्हणाला नाही.मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का?.पंडित म्हणाला-  नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चेतून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?. तथागत म्हणाले मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो १)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा. माणूस डोळ्यान बघतो,कानान आवाज ऐकतो,नाकान वास घेतो,जीभेन चव घेतो,आणि त्वचेन स्पर्श जाणतो .या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.पंडित विचारतो - कसे ?.पाणी डोळ्याने दिसते पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?.तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?.पंडित म्हणाला नाही.याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?.पंडित म्हणाला नाही .हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही ,आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?.पंडित म्हणाले नाही .तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?.पंडित- नाही.तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?​.​पंडित- नाही.मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?. पंडित -नाही.मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही.आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही.त्याचा उपयोग नाही.ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला.तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?.तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?.पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?पंडित -आत्मा शरीर सोडतो.का सोडतो आत्मा शरीर ?कंटाळा आला म्हणून ?.पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर. तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,पंडितजी -तथागत बरोबर आहे तुमच .पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?....तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड ,भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता .बरोबर ?.पंडित - बरोबर .मग मला सांगा वात कधी विझते?.पंडित -तेल संपत तेंव्हा .तथागत -आणखी ?.पंडित -तेल आहे पण वात संपते तेंव्हा.तथागत-आणखी ?.पंडितजी काहीच बोलले नाहीत.तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला ,पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा .आणि जीव म्हणजे आग (उर्जा ).सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती) २) आप -द्रवरुप पदार्थ (पाणी ,स्नीग्ध तेल ) ३) वायु - वारा.४) तेज -उर्जा, उष्णता या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनणे थांबते .यालाच म्हणतात माणूस मरणे .आणि सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसाने कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो.अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे.संतुष्ट असंतुष्ट आत्मे मेलेल्या माणसात नसतात तर जिवंत माणसात असतात त्यामुळेच ते नितीमतेने न वागता अधर्माने वागून मानव जातीत समाजात तणाव निर्माण करतात.त्यातुन मुक्त व्हा त्यातच सर्वांचे मंगल आहे.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप,मुबई-९९२०४०३८५९.

राजकारणातील वेगळा विदर्भ ?.


रडा हमेशा ऋतु नुसार रंग बदलतो असे म्हणतात,पण त्यांचे विश्व रिकार्ड भारतातील राजकीय नेत्यांनी तोडले, विचार सरणी कोणती ही असो राजकीय नेता हा नेहमी सरडया सारखा रंग बदलनारा असतो, नव्हे सत्ता मिलविण्या करीता आणि टिकविण्या करीता त्याला आपली जात,धर्म,विचार आदर्श बाजूला ठेवून प्रसंगानिरूप त्याला वागावे लागते. यांचे उदाहरण आपण नेहमी ऐंकतो पण काल महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहण्यास मिळाले.राज्याचे मुख्यमंत्री व विदर्भाच्या मागणीचे खंदे समर्थक मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज ' विदर्भ निर्मितीचा कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच नसुन अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे जे  विधान केले आहे हे अत्यंत दुर्दैवी असुन त्यांनी विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. यानिमित्ताने सत्ता माणसाला कशी लाचार व हतबल करते त्याचे हे ताजे उदाहरण आहे. 
विदर्भ आंदोलनात संयुक्त दौरे करतांना प्रत्येक सभेत " विदर्भाचा विकास आता पॅकेज जाहीर करून किंवा विदर्भाच्या आमदाराला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून होणार नाही तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य करूनच होईल " असे छातीठोकपणे सांगणारा हा त्यावेळचा तडपदा र विरोधी नेता देवेंद्र फडणवीस संधी मिळताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळा झाला. खुप दिवसांनी विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले व आता हा माणूस विदर्भाला न्याय मिळवून देईल या आशेवर वैदर्भीय लोकांनी गेली 20 महिने वाट पाहिली पण आज "विदर्भ निर्माण करणे केन्द्र सरकारच्या अखत्यारीत आहे."राज्याचा तो अधिकार नाही " असे विधान करून आपण काही वेगळे राजकीय नेते नाही. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, त्यामुळे विदर्भातील तमाम नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. 
आमदार देवेन्द्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असतांना, एक तडफदार, स्वच्छ चारित्र्याचे ,नितिमत्तेचे पुरस्कार करणारे, विषयाची जाण असणारे, बांधिलकी म्हणुन अभ्यास असलेले एक सुजाण नेता म्हणुन विदर्भवाशियाच्या मनात स्थान होते,त्यांचे जे स्वच्छ चित्र होते, त्यांच्या वर जो विश्वास होता, त्यालाच आता तडा गेला आहे.सेनापतीच जेव्हा शत्रुशी हातमिळवणी करतो तेव्हा स्वाभिमानी जनतेवर जसे आभाळ कोसळते तशी वैदर्भीय जनतेची अवस्था झाली आहे. 
भाजपाने 1996 मधेच विदर्भ राज्याचा भुवनेश्वर येथील अधिवेशनात स्पष्ट ठराव केला होता, पण 2000 मधे मागणी नव्हती अशा छत्तीसगड सह तिन राज्यांची निर्मिती केली. पण विदर्भ निर्माण केला नाही कारण दिले की शिवसेनेचा विरोध आहे व ते आमचे सहयोगी आहेत. भाजपाने विदर्भ राज्याची निर्मिती करावी या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा केला, आंदोलने केलीत. कॉंगेसचा वाटेल तसा उद्धार केला. आम्हाला एकहाती सत्ता द्या आम्हीच विदर्भाची निर्मिती करू त्यात कुठेही बेईमानी होणार नाही असे म्हणणारे आता एकदम घुमजाव करीत आहेत त्याचे दुखः वाटते. नितीन गडकरी साहेबां विषयी काय बोलावे तेच समजत नाही. " मी मर्दाचा बच्चा आहे, शब्दांचा पक्का आहे " असे बेंबीच्या देठापासून गर्जना करणारा मर्द तर आता विदर्भाचे नावही काढत नाही. 
राज्याची निर्मिती करणे हा केन्द्र सरकारचा अधिकार आहे हे फडणविसांना यापूर्वी माहित नव्हते काय ?.भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना विदर्भाची निर्मिती करणे हा आमच्या घोषणापत्रात आहे व त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेच  सर्वत्र सांगत फिरलेत.मग मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी विदर्भा विषयीची भुमिका कां स्पष्ट केली नाही?.यानिमित्ताने मा. देवेंद्र फडणवीस विदर्भ व महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख बनवित असुन एकतर त्यांनी केन्द्रीय नेतृत्वाकडे विदर्भ राज्याची निर्मिती करावी म्हणून मागणी करावी किंवा विदर्भाचा मुद्दा आता शक्य नाही असे जाहिर करावे.पण विदर्भातील जनतेची फसवणूक करू नये अशी साधारण अपेक्षा आहे. 
"पावर के लिए कितना बदल गया इंसान "  अशी देवेंद्र फडणवीस यांची गत झाली आहे. " बेच दे अपनी जुंबा ,अपनी अना, अपना जमिर ,फिर तेरे हाथोमे सोनेके निवाले होंगे फिर ना कोई गुरूद्वारा, कोई मस्जिद ना कोई शिवाले होंगे सिर्फ तु होंगा और तेरे चाहनेवाले होंगे " असे देवेंद्र साठीच एका शायर ने हा शेर लिहीला असावा असे वाटते. 
जनता भोळी जरूर असते पण खुळी नक्कीच नसते. जनता दरबारात सर्व माफ असते पण विश्वासघात कधीही सहन केल्या जात नाही आणि त्याची प्रचिती भाजपाला नक्की येईल .
विदर्भ हा कायमच चर्चेचा विषय आहे.काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले.आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) - 9.2% आहे, आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2%.
झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले. आता झारखंड चा विकास दर 11.1% आहे, आणि बिहार चा फक्त 4.7%
उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले. आता उत्तराखंड चा विकास दर 8.8% आहे, आणि उत्तरप्रदेश चा 4.6% .तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8% आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5%.तर आता तुम्हीच सांगा कि, विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% वीज तयार होते.विदर्भात महाराष्ट्राच्या 70% खनिज आहे.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% कापूस उत्पादन होते.विदर्भात तर 80% जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे.विदर्भात तर 54% वनसंपदा आहे.विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन, कापूस, डाळ, तूर, तांदूळ, संत्री महाराष्ट्राला देतो.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे.विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे.विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे.तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल.
कृपया तुम्हीच विचार करा.आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे.फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता.राजकीय फायद्या करीता वेळो वेळी विदर्भातील नेत्यांना पुढे करून म्हणून राजकारण केले.म्हणुन विदर्भातील जनतेने आता पक्षा वर विश्वास न ठेवता. उमेदवारा वर विश्वास ठेऊन मतदान करावे आणि गांवागांवात जनजागृती करने आवश्यक आहे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा फ़क्त राजकीय लोकांचा विषय असता कामा नये, हा सर्वांचा विषय झाला पाहिजे आणि हा विषय सर्वाना पाठवा आणि विदर्भा विषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या, आणि अभिमानाने म्हणा जय विदर्भ.
विदर्भाला विरोध करणारे मुंबई ठाण्यात राहून विरोध करतात,त्यांना विदर्भातील शेतकरी शेतमजुर आणि असंघटित कामगारांची काय परिस्थिति आहे हे कसे समजेल?.विदर्भ राज्य झाल्यास यांचे काय नुकसान होईल.यांना आज जो मुक्तपणे कामगार मजुर उपलब्ध होतो तो होणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाची आज ज्या पद्धतने लूटमार करण्याची दादागिरी आहे ती बंद होईल,म्हणुन ते इंडियात राहून विरोध करतात तो मोडून काढण्या करीता जय भवानी!. जय शिवाजी!!. सोबत जय विदर्भ!!!. म्हणावे लागेल.तर विदर्भा ला न्याय मिळेल करीता राजकारणातील वेगळा विदर्भ दिसेल.(संदर्भ:- वृतपत्रातील आणि सोशल मिडिया वरील अनेक मान्यवराच्या लेखाचे हे संकलन आहे)
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई 9920403859,