शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता गॅरेंटी देते काय?.

श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता गॅरेंटी देते काय?.
भगवान श्रीकृष्ण यांनी सांगितलेली गीता हिंदू साठी सर्वश्रेष्ठ आहे.व्यास मुनीने किंवा इतर कोणी म्हणजे रामानंद सागर यांनी निर्माण केलेले रामायण या महाभारत यातील धर्म आणि अधर्मचा संघर्ष हा आपल्या सोई नुसार जात,पोटजात,वर्ण,गोत्र पाहुन बदलत असतो.हेच मुख्य गीताचे रहस्य आहे."बच्चा बच्चा राम का जन्मभूमी के काम का!." हा नारा तेव्हा खूप घराघरात गेला होता.तो आता लोकसभा 2014 ते उत्तरप्रदेश विधानसभा 2017 मध्ये संपूर्णपणे यशस्वी झालेला दिसत आहे.आपला देश अज्ञानातून विज्ञाना कडे झपाटल्या सारखा गेला.त्यांचा उपभोग सर्वच घेतांना दिसतात.तरी त्यांची त्यांना ग्रारंटी वाटत नाही त्याकरिता त्यांना सत्यनारायण महापूजा घालावी लागतेच.भटा ब्राम्हणाला दक्षिणा आणि भोजन दान दिल्यास शंभर टक्के संकट टळून मोठा आर्थिक लाभ होतोच.हे भटांच्या मंत्राची ग्रारंटी आहे.
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेन्द्र फडणवीस हे तर लहानपणापासून मंत्र तंत्र शिकलेले आहेत.विद्यार्थी दसेपासून त्यांचा प्रचंड अभ्यास आहे.म्हणुन ते विरोधी पक्षाचे नेते होते.अभ्यासपुर्ण मांडणी करून राज्यकर्ताला कोंडीत पकडत असत.आणि जनतेच्या मनावर मोहिनी घालून त्यावर कबजा करीत होते.तेव्हा ते लवकरात लवकर मुख्यमंत्री झाले पाहिजे असे जनतेला वाटत होतो.आता ते मुख्यमंत्री झाले तेव्हा जे सरकार आणि राज्यकर्त्यानां विचारतात तेच जनतेला विचारतात.ग्रारंटी देता का?.धर्माने अधर्मला विचारे तेव्हा जनता खूप आनंद होती.आता जागा बदलली.धर्माच्या जागी अधर्म आला.धर्म चारीबाजूने विकलांग होऊन पडला.हे महान ग्रंथ गीताचे ज्ञान आहे.
देशातील जनता आता श्रीकृष्णाची गीता विसरले.आता भागवतच्या नरेंद्र,देवेंद्र यांची गीता दररोज अनुभवतात.शेतकरी शेतीची मशागत करून जेव्हा बीज पेरतो तेव्हा ते उगवेल याची त्याला शंभर टक्के गॅरंटी हमी असते.म्हणुनच 
रात्र दिवस शेतात मेहनत घेतो.निसर्गाच्या नियमा नुसार पाऊस पडेल यांची त्याला खात्री असते.त्यामुळेच पीक चांगले येईल याची त्याला हमी गॅरंटी असते.पण पोटऱ्या मांडयावर आलेल्या पिकावर रोग पडणार नाही याची गॅरंटी नसते.हाताशी आलेले पीक अवकाळी, गारपिट यांच्या तडाख्यातुन वाचुन पदरी पडेल याची गॅरंटी नसते.राजकारनातील दलाल,भडवे, अडते कृषी उत्पन्न बाजारात शिरल्यामुळे काय भाव देतील याची गॅरंटी नसते.कारण अधर्मा पेक्षा धर्म सांगणारे जास्त खतरनाक निघतात.तेव्हा शेतकरी आत्महत्या रोखण्याची हमी घेवुनच सत्तेत आलेल्या भागवताचा नरेंद्र,देवेन्द्र सर्वच विसरलेला असतो. कारण आता तो अधर्माने धर्माला बाद करून राज्य करण्यासाठी सज्ज असतो.तो आणि त्यांची मातृसंस्था या अगोदर काय काय बोलली ते सत्तेवर आल्या वर सर्वच विसरते हेच महान श्रीकृष्णा ची महान गीता सांगते.
देशात भ्रष्टाचार हा मागासवर्गीय समाजाला मोख्याच्या जागा दिल्यामुळे होत.असा जावई शोध त्यांनी लावला होता.मागासवर्गीय समाजाला शिक्षण, नोकरी, उधोग धंद्यात सवलती दिल्या मुळे गुणवत्ता ढासळली,भ्रष्टाचार वाढून उग्रवादी संघटनात वाढ झाली.असा त्यांचा निष्कर्ष होता.तेव्हा ते सर्व हिंदू आहेत हेच त्यांना मान्य नव्हतं. पण त्यांची मत मिळाल्या शिवाय आपण सत्ताधारी होऊ शकत नाही.हे जेव्हा त्यांना कळले वर्ण व्यवस्थेची समर्थन करणारी श्रीकृष्णा ची गीता त्यांनी बाजूला केली.आणि भागवतांची गीता बाहेर काढून संविधान समीक्षा करण्यासाठी हिंदूंनी एकत्र आले पाहिजे.असे कथा,निर्माण केल्या व देशात सर्व प्रकारची प्रचार प्रसार यंत्रणा ताब्यात घेऊन विकासाचा पाढा लावला.अच्छे दिनाचे गाजर दाखवुन सर्वानाच कायमचे लाचार बनविले.महागाई किती आहे.ती कशी बंद करणार यांच्यावर त्यांचे जाहीर भाषण जनतेनी पुन्हा पुन्हा ऐकली आणि पाहिली पाहिजे.
नोटबंदीमुळे देशात प्रचंड उलट पालट होईल.भ्रष्टाचार, अतिलेखी संघटनेचे कमरड मोडुन त्या नेसत नाबूत होतील यांची ग्रारंटी त्यांना होती.नोटबंदीनंतरही भ्रष्टाचार थांबला.आणि सीमेवर अतिरेकी कारवाया पूर्णपणे थांबल्या आता सीमेवर एक भी जवान शाहिद होतांना दिसत नाही.त्यांच्यावर व्यापक चर्चा आता चॅनल मिडिया,प्रिंट मिडिया करीत नाही.कारण भागवतांची गीता योग्य काम करीत आहे.
मुख्यमंत्री साहेब विरोधात असताना कर्जमाफी मागणी तुम्ही केली होती.सोयाबीनला ₹6000 व कापसाला ₹8000 भाव मागत होता.आत्महत्या बाबत सरकारवर मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करायला निघाला होता.सत्तेवर आल्यावर विसर पडतोय काय?. शेतकऱ्याच्या शिवारावर पाणी, दिवसा 12 तास विज पुरवा शेतीमालाला,भाजीपाल्याला उत्पन खर्च्याच्या दुप्पट हमी भाव द्या.हे तुमीच जनतेच्या वतीने सरकार मांगत होता.जनतेत जाऊन त्यांचे महान प्रबोधन करीत होता.आता त्यांची आठवण कशी होत नाही.कारण हे श्रीकृष्णाच्या गीतेने सांगितले आहे.आपल्या फायद्या करीता कुणाची फसवणूक केली. वध केला तर तो वर्ण व्यवस्था टिकविण्या साठी.अधर्म होत नाही. गुन्हा होत नाही.बस्स झाल नरेंद देवेन्द्र जी शेतकऱ्यांना बिलकुल कर्जमाफी देऊ नका.विजय मल्ल्या,सहारा,अदानी,अंबानी सारखे अनेक गरीब उधोगपती देशात आहेत.ते जगले पाहिजे.ते जगले तर तुमची मातृसंस्था,संघटना जगेल. त्यांचे तेवढे कर्ज माफ करा.करोडो लोक तुम्हा दुवा देतील.त्यांना ग्रारंटी होती तुमी त्यांना योग्य न्याय द्याल.चला न्याय तुम्हालाच घ्या.पण पाण्याच्या बाटलीला ₹20 देणारे,₹52  दुध ,2₹ टोमॅटो,घेणारे नाक मुरडतात ₹100 चा साॅस सहज घेतात, कांदा स्वस्त पाहीजे.शेतकरी मेलातरी चालेल. त्याचाच माल घेऊन बाबा रामदेव योग सोडुन प्रकीया करून अब्जो रू कमतोय सरकार निर्ल्लजपणे कवडीमोल दराने जमीन देते.त्याला दिलेल्या जमिनीच्या किंमतीत कर्जमाफी देता आली असती.विजय मल्याच्या कर्जमाफीला तर्क नाही....बॅकेंच्या बुडीतकर्जत.शेतीकर्ज किती %.अरूधती बाईला उध्धोगपतीनां कर्जमाफी...देतात विरोध का केला नाही.कारण ते बाई संविधाना मुळे बँक अधिकारी झालीच नाही.वर्णव्यवस्थेचे समर्थन करणाऱ्या गीते नुसार हया बाई इथे बसल्या असत्या काय?.
शेतकऱ्यांना कर्जमाफी नको.शेतमालाला हमी भाव हवा!शेतकरी सुखाने जगेल याची हमी शेतकरीच घेणार!.शेतकर्‍यांच्या मुलाला शिक्षणा मध्ये आरक्षण मिळेल याची हमी देतात का?.शेतकर्‍यांच्या मुलाला नौकरी मध्ये आरक्षण मिळेल याची हमी देतात का..
कर्ज माफी देवून शेतकर्याच्या मालाला हमी भाव ध्या हीच हमी फडणवीस साहेब,माल्ल्याची हमी कोणी घेतली?.घेतली असेल तर त्यांचावर कोणती कारवाई झाली.आणि त्याने पलायन कसे केले?.याचे पण उत्तर द्या.
फडणवीस साहेब जरा आठवून बघा ना ?.विरोधी पक्षात होते.तेव्हा कलम 302 चा  गुन्हा नोंदवण्याची मागणी करीत होता.आता शेतकऱ्यांनी आत्महत्त्या केल्यावर तुमच्यावर सदोश मनुष्य वधाचे 302 कलमाखाली गुन्हे का दाखल  होवू नयेत ?. का श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता फक्त तुम्हालाच लागु आहे काय? मग श्रीकृष्णाची आणि भागवतांची गीता गॅरेंटी देते काय?
.

कौरव पांडवांच्या लढाईत आपला मुख्य शत्रू कोण?

कौरव पांडवांच्या लढाईत आपला मुख्य शत्रू कोण?
भारतीय राजकारणात आपला मुख्य शत्रू कोण ?!.हेच ओळखणे अशक्य झाले आहे.सत्तेचा लाभ घेण्यासाठी कोण कधी एकत्र येतील हे समजणे कठीण आहे.मुंबईतील महानगरपालिका निवडणूक जगाचे लक्ष वेधून ठेवत आहे.कलानगरचे स्वयं घोषीत हिंदू हृदय सम्राट आणि राष्ट्रीय हिंदुत्ववादी मनुवादी होलसेल ठेकेदार यांची रेशमी धाग्याने मागासवर्गीय समाजाला बांधून ठेवनारी पंचवीस वर्षाची युती मराठी माणसाला दाखविण्या करीता तुटली असली तरी आतुन ती पूर्ण एकजीव आहे.हे मतदारांनी विसरू नये.बहुजनांच्या मागासवर्गीयांच्या बाजुने कधीच कौरव पांडव लढले नाही.ते फक्त त्यांच्या फायद्या करीता जनते समोर भांडण्याचे नाटक करतात.बाकी सर्व वाटून खातात.म्हणुन मागासवर्गीय मतदारांनी कौरव पांडवांची जात पाहून मतदान करावे.हे एकाच जातीचे आणि धर्माचे आहेत.ते हिंदू कधीच नव्हते.ते फक्त ब्राम्हण आहेत.आणि ब्रम्हणच राहतील.
राजकारणात जात धर्म नसते. विचारधारा असते.त्यानुसार समाजाच्या आर्थिक नाड्या हाती घेऊन समाजात जाऊन समाज प्रबोधन,जागृती करण्याचा पहिला नियम आहे.आपला वैचारिक शत्रु कोण?.शत्रूच माहित नसेल तर लढाई कोणा बरोबर लढणार?. काँग्रेस, भाजपा आणि कम्युनिस्ट कधीच वैचारिक शत्रु नव्हते आणि नाही.सर्व पक्षात वैचारिक वर्चस्व ब्राम्हणाच्या हाती राहून बहुजन मागासवर्गीय समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पक्ष संघटना करतात.काँग्रेस चा सर्वात मोठा नेता ब्रॉरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी महात्मा झाल्यावर मारल्या गेला त्याला कोणा कोणाची साथ होती?.हे राम वाले आता खुलेआम नथुरामचा जयजयकार करतात.या मागील सत्य वैचारिक शक्ती कोणती ते समजून घ्या.ती जर नसती तर आज देशात मनुवादी हिंदुत्ववादी कौरव पांडवांची उत्पत्ती झालीच नसती.म्हणून या तिन्ही राष्ट्रीय पक्ष संघटनेचा वैचारिक पाया एकच आहे पण काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे.हे महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ बाबासाहेबांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले.म्हणून कोणत्या पक्षात संघटनेत आपला शत्रु आहे.हे या देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला समजत नाही.म्हणुन कामगार क्षेत्रातील बलाढ्य राष्ट्रीय संघटना,भांडवलदारांच्या विरोधी लढतांना दिसतात पण मनुवादी हिंदुत्ववादी 
ब्राम्हणवादा विरोधात लढतांना दिसत नाही.महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते देशाचे दोनच शत्रू आहेत.एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही हे सर्वच क्षेत्रात हातात हात आणि गळ्यात गळा घालून काम करून सत्तेवर नियंत्रण ठेवतात.राज्य आणि केंद्रातील मंत्रीमंडळातील नांवावर काळजीपूर्वक नजर टाका व कोणत्या जातीचे वर्चस्व आहे ते पहा.म्हणजे कौरव पांडवांच्या सत्ता संघर्षात आपण बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कोण आहोत?.
बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय या तिन्ही पक्ष संघटनेत आहेत.कोणत्या जातीतील नेत्याचा व्यक्तिगत आर्थिक विकास होऊन कल्याण झाले.पण त्या त्या समाजाचे काय?.
त्याला तर हा नेता आणि त्यांचा पक्ष संघटना सतत वापर करून मूर्ख बनविते.
म्हणुन देशात सार्वजनिक उधोगधंद्याचे खासगीकरण औधोगिकरण, जागतिकीकरण मोठया प्रमाणत झाले आहे.कारण शोषण करणारे आणि शोषणकरू देणारे बहुसंख्य एकाच पक्षात आणि संघटनेत काम करतात.
सरकारची नीती,सत्ताधारी पक्षाची नीती आणि विरोधी पक्षाची नीती एकच आहे.बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी सरकारची नीती आणि सत्ताधारी यांची मतदार म्हणुन शत्रुच्या विरोधात जनआंदोलन सोबत निवडणूकीत एकझुठ दाखविली असती.तर मनुवादी हिंदुत्ववादी शक्ती मोठया संख्येने निवडून आली नसती.मराठी माणसा च्या न्याय हक्क साठी लढणार  शिवसेना आणि  मराठी हृदय सम्राटानी मराठी माणसाच्या काम धंदा आणि नोकरी करीता काय केले?.मुंबईतील सर्व स्टेशन रोडसह रोडवरील जागा उत्तर भारतीयांना काम धंद्या करीता सात बारा कोणी दिला.मराठी माणसाला रेशनकार्ड,गुमस्ता,आदिवास दाखला सहज मिळत नाही.मग उत्तर भारतीय आणि इतर राज्यातील माणसानां ते सहज कसे मिळते?.त्यांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही.कारण मुंबई महानगरपालिका फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करूनच कामकाज करते.त्यात मराठी माणुस कमी पडतो.गेल्या  पन्नास वर्षा पासुन मराठी माणसाचे आणि भाषेचे ठेकेदार असली शिवसेना काम धंदा नोकरी देण्यास कमी पडली?. नाही त्यांनी गणपती,दहीहंडी आणि पायी पालकी पदयात्रा सारखे लक्षवेधी उत्सवी उधोगधंदे मराठी तरुणांना देण्यास प्रेरणादायी करून ठेवले.हेच तिचे जगाच्या औधोगिक आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख जागतिक पातळीवर नेली.हेच तिचे मराठी माणसा करीता ऐतिहासिक काम आहे.छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आराध्य दैवत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ च्या चरित्र हरण करणाऱ्यांना त्यांनी काय शिक्षा दिली हे मराठी माणूस म्हणुन प्रश्न विचारण्याचा हक्क मुंबईतील मतदाराला असला पाहिजे.कारण सत्ता केवळ लुटण्यासाठी नसते तर विकास आणि कल्याण करण्यासाठी असते.कौरव पांडवांच्या या सत्ता संघर्षात मराठी माणसाला मतदाराला काय मिळाले?.
डॉ बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा लोकसभा निवडनूकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा पराजित झाले. बाबू जगजिवनराम 8 वेळा लोकसभेला उभे राहीले आणि आठही वेळेस निवडून आले. इतकेच काय कायम केंद्रीय मंत्रीमंडळात राहिले.दोघेही मागासवर्गीय बहुजनांचे नेते पण आज आपण उपेक्षित ,वंचित भटक्या,आदिवासी,मागासवर्गीय बहुजनांचे प्रेरणा स्थान म्हणून बाबासाहेबांना मानतो. बाबु जगजिवनराम यांना नाही.आंबेडकरवाद लाचारी शिकवत नाही. म्हणून हारुनही बाबासाहेब घरा घरात विराजमान आहेत. बाबू जगजिवनरामांचा फोटो काँग्रेस कार्यालयात ही नाही. तर त्यांच्या किंवा इतर समाजाच्या घरात फोटो आणि कोणता ही विचार नाही.म्हणुन तुम्ही सत्तेपेक्षा जनतेशी नातं जोडले पाहीजे.विचारधारेशी प्रामाणिक असले पाहिजे.
महापुरुषांच्या क्रांतिकारी विचाराचे सैनिक झालेच नाही.जे स्वतःला वैचारिक सैनिक समजतात ते रक्षक नाही तर भक्षक झाले आहेत.क्रांतिकारी विचाराचे रक्षक लढून मरतील पण सिद्धांताची रक्षा करतील.समझोता तडजोड कधीच करणार नाहीत.म्हणजे जे समझोता तडजोड करतात ते महापुरुषाचे लायक औलाद नाही तर नालायक औलाद आहे हे सिद्ध होते.महापुरुषांच्या महात्मा क्रांतिकारी विचारांचे देशात कौरव पांडवांचा इतिहास जिवंत होतो.हाच मोठा पराभव आहे.
भारतीय लोकशाहीत भांडवलशाही ब्राम्हणशाही डोके वर काढते हे मतदारांना गुलाम बनविणारे तंत्र आहे.म्हणुन मतदारांनी कौरव पांडवांच्या लढाईत आपला खरा शत्रु कोण ?.हे प्रथम ओळखले पाहिजे.आणि मतदान केले पाहिजे.राणीच्या पोटी राजा जन्म येण्याचे दिवस संपले असले तरी नगरसेवक,आमदार,खासदार यांच्या पोटी किंवा त्यांच्याच घरातील माणसाचा पहिला हक्क त्यांच्या मतदारसंघात असेल तर तिथे पक्ष संघटना काम करीत नाही.तर घराणे काम करते तेच सर्व निर्णय घेत असेल निवडणूक कसा करता घेतात.कौरव पांडवालाच सत्ता देयाची असेल तर मतदारांनी जागृत होऊन मतदान करावे.आणि कौरव पांडवा दोन्ही आपले शत्रु आहेत.हे प्रथम लक्षात घेऊन मतदान करावे.तरच लोकशाही जिवंत राहील.
आपला 
सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई,९९२०४०३८५९.

रामराज्यात कंसराजा.

रामराज्यात कंसराजा.
जगात भारत एकमेव असा देश आहे,जिथे  जीवंत माणसा पेक्षा मेलेल्या माणसा वर जास्त प्रेम केल्या जाते.जिवंत पणी त्यांचे सन्मान पूर्वक आदर तिथ करण्यास वेळ नसतो,पण जेव्हा ती व्यक्ति मृत्यु पावते. त्यानंतर भटा ब्राम्हणाच्या सांगण्या वरील त्यांची खुप भक्तिभावाने फोटो लावून सेवा केली जाते,त्याच पद्धतीने या देशातील नागरिकाचे आहे, रामायण आणि महाभारत हे दोन महान कथानक, या दोन महानाट्यतील पात्र दर पांच वर्षांनी बदलत असतात.रामराज्य येणार आणि कंसराजा बनणार असे जनतेला आश्वासन दिल्या गेले.पण रामाने कधीच राज्य केले नाही. कंसाने भिती पोटी बहिण रुखमणी सह कोणाच्या ही जन्म झालेल्या मुलाला जीवनात ठेवले नाही.त्यानुसारच या देशाची जनता ही दर पांच वर्षांनी आपली भूमिका बदलत असते.राजकारणी लोक पक्ष बदलला किती विचारधारा बदलतात.पण व्यवहार आणि व्यवसाय बदलत नाही.देशात साठ वर्ष काँग्रेसने राज्य केले.तेव्हा विरोधी पक्ष कशी भूमिका घेऊन जनतेला सरकार विरोधात उतरविण्याचे काम करीत होती.पण त्यांच्या जनांदोलनात पाहिजे तो दम नव्हता.जनता जास्त मनावर घेत नव्हती तेव्हा त्यांनी रामायणातील राम बाहेर काढला आणि महाभारत घडविले.त्याला थोडे यश प्राप्त झाले.२ चे ८९, ८९चे १२०,१२० चे .१४५ याघडीला १४५चे ३२० खासदार रामायण महाभारता घडविल्या मुळे आले आहेत.ते धर्म,अधर्माच्या लढाईतील कृष्णलीला भागवत गीता नुसार निर्णय घेतात.काळा धन,भ्रष्टाचार, दहशतवादी संपविण्या करीता त्यांनी पांचशे,हजारच्या नोटबंद करून जनतेला रामायण महाभारताची आठवण करून दिली.गेल्या काही दिवसात ती सोशल मिडिया वर फिरत आहे.प्रत्येक घराघरात माणसा ला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते.आपलेच स्वकष्टाचे पैसे काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे.तेव्हा रांगेतील दोन पात्र जी महाभारतात प्रसिद्ध आहेत.ते कोणी किती आणि कसे पैसे काढले ते सांगतात.
"गांधारी" मी माझ्या शंभर कौरवांना ATM च्या रांगेत उभे करून प्रत्येकी "दोन हजार प्रमाणे" एकुण  "दोन लाख  रुपये" काढले.
"कुंती" अगं हे तर काहीच नाही. माझ्या पांडवांनी तर द्रौपदी बरोबर लग्न दाखवून एका लग्नाला "अडीच लाख" या प्रमाणे एकुण "साडे बारा लाख" काढले...आहेस कुठे.हे आहे महाभारत.आज प्रत्येक भारतीय यांचाच नक्की विचार करीत असेल की आपलेच पैसे कसे काढावे.हेच का ते रामराज्य.हजारो निरपराध बालकाचा बळी घेणार कंस आणि गोद्रा सह संपूर्ण गुजरात राज्यात निरपराध लोकांचा बळी घेऊन देशाच्या प्रधान सेवक झालेला नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते काय?.वाचकांनी विचार करावा.
आदरणीय प्रधान सेवक (प्रधानमंत्रीजी) असे का घडविले ?.आपण आणि आपली भाजपा विरोधी पक्षात होती तेव्हा २०१३ ला ४५ रुपये किलो तुर डाळ झाली म्हणुन जन आंदोलन करीत होती.आता आपल्या रामराज्यात १८० ते २०० रुपये किलो विकली जात आहे.२३ जानेवारी २०१४ला नोट बदलण्यास प्रचंड विरोध करीत होती.मग ८ नोव्हेंबर २०१६ ला आपल्या सरकारने हा निर्णय कसा घेतला.काय घडले रामायण?.धर्म अधर्माच्या लढाईत मनुवादी भाजपा नेहमी दुतोंडी असते.सत्तेवर नसतांना गोवंश हत्याला कडाडून विरोध करत होती.पण सत्तेवर आल्यावर भारत देश जगातील इतर देशा पेक्षा बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर एकचा देश कसा काय झाला?.पाकिस्तान जेव्हा जेव्हा भारता च्या सीमेवरील जवानावर हल्ले करीत होता तेव्हा तेव्हा सत्ताधारी लोकांचा डरपोक म्हणुन उल्लेख करीत होते.आमच्या हाती एका तासात पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून नष्ट करू असे ५६ इंच छाती फुगवुन सांगत होते.आता सत्ता धारी होऊन किती दिवस झाले.?.काय घडले रामायण आठवत नाही.विदेशात जेव्हा सर्व देशाचे पंतप्रधान एकमेकांना भेटून मनमोहन सिंह आणि नवाजशरीफ हात मिळवीत होते.तेव्हा ते नालायक होते.मोदी जेव्हा नवाजशरीफ च्या जन्म दिनाचा केक,बिर्याणी खाण्यासाठी न बोलविता पाहुणे म्हणुन जातात ते कोणत्या धर्मात बसते?.हे रामायण महाभारतात आहे की नाही?.
भारतात सर्वात मोठी सार्वजनिक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे सेवा,२००४ ते २०१४.रेल्वे भाडे केवळ एक रुपया वाढले तर देशभरात भाजपा ने चक्क जाम करून दाखविला.आता सत्तेवर आल्यावर दोन वर्षात सत्तर टक्के रेल्वे भाडे वाढविल्याचे बोलले जाते.हे माहित असूनही जनता आंधळी आणि सरकार बहिरे झाले आहे.दोघाची तोंड बंद आहेत.भाजपा विरोधी पक्षात एफ डी आय,जी एस टी, आधार कार्ड,मनरेगा,कोयला खान लिलाव सारख्या अनेक योजनेला विरोधी भूमिका घेऊन आचरण करीत होती.आता मात्र त्याचं योजन किती महत्वपूर्ण आहेत यांचे गुणगान करीत आहेत.हेच काय ते एकवचनी राम भक्त ?.
दिल्लीच्या निर्भया नांवाच्या एका ब्राम्हण मुलीवर बलात्कार झाला.म्हणुन देशभरात तीन महिने जन आंदोलन करीत होती.आता भाजपा प्रणित राज्य सरकारच्या मध्ये प्रदेशात दररोज बारा आणि दिल्ली नऊ बलात्कार होत असतांना देशभक्त रामभक्त डोळे,कान आणि तोंड बंद करून शांत बसले आहेत. हेच का कृष्णाची पवित्र भागवत गिता आदर्श मानणारी भाजपा.अंतर राष्ट्रीय बाजार भावाने सर्वच देशाला पेट्रोल कच्चा तेल प्रति बैरल भावाने विकले जाते.काँग्रेस सरकारच्या मनमोहन सिंह यांनी १२५ ते १४० डालर प्रति बैरल तेल खरीदी करून देशात ७० ते ७५ रुपये लिटर पेट्रोल विकल्या जात होते ते आजच्या सत्ताधाऱ्यांनी बैलगाडी मोर्चा कडून विरोध केला होता. आताचे सरकार ४० ते ५० डालर प्रति बैरल कच्चे तेल खरीदी करून देशात ७० रुपये प्रती लिटर पेट्रोल विकल्या जात आहे.या मुळे अंतर राष्ट्रीय पातळीवर सरकार कोणत्या विचारांचे आहे ते त्यांच्या देशातील जनतेशी किती प्रामाणिक आहे.यांची नोंद जागतिक पातळीवर जरूर घेतल्या जात असेल.तेव्हा विदेशी पत्रकार ,साहित्यिक अभ्यासक यह राम कोण था?.और रामराज्य क्या है?..क्या इसी तरहा देश वाशी के साथ व्यवहार चालता था!
मनुवादी विचारांच्या भाजपा प्रणित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता ही घोटाळा केल्यास जनतेने त्याला माफ करावे.म्हणजे शिवराज सिहं चा व्यापम व खान घोटाळा, वसुंधरा राजेंचा ललित मोदी घोटाळा, रमण सिंह यांचा पस्तीस हजार करोड़चा अन्न वितरण घोटाला झाला तरी त्यांच्या कडून कोणी राजीनामा मांगीतला नाही. काँग्रेस मधील कोणी ही घोटाळा केल्यास दुसऱ्या दिवसा पासुन राजीनामा मांगण्याची मोहीम चालविल्या जात होती.हाच फरक रामराज्य होता काय?. रामायण महाभारताचा कोणता आदर्श 
आज भारतीयांना आहे. रामराज्यात कंस राजा बनुन राज्य करीत आहे..
सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई-९९२०४०३८५९.

मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.

मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.
सत्य हे सत्यच असते ते काही काल लपवून ,झाखुन ठेवले जाते. किंवा दहशत खाली भिती पोटी पोटात दडलेले असते, ते जास्त काल बंद करून ठेवले म्हणजे ते असत्य होत नाही, म्हणुन सविस्तर वाचण्या अगोदर वाचकाची आणि मराठा,बौध्द समाजाची जाहिर माफी मांगतो, कारण काहीना सत्य वाचणे ऐकणे जमत नाही, त्यांचा रक्तदाब लगेच वाढतो मग ते शिवीगाल, हातपाय तोडण्याची भाषा करतात,म्हणुन सत्य समजून घ्या आणि चूक असल्यास चर्चा करुण दुरुस्त करण्यास तयार रहा,ही नम्र विनंती!.
एक मराठा लाख मराठा, मराठा क्रांती मोर्चा,बहुजन क्रांती मोर्चा सांविधान सन्मान मोर्चा यांनी आपण खुप जागृत आहोत हे दाखवून दिले, आता पुढे काय?.त्यांने समाजात प्र बोधन करून काय परिवर्तन घडविलेे ?. खरच हे सर्व आपल्या विचारधारेशी प्रामाणिक आहेत काय?.लोकसभा विधान सभा निवडणुकित सर्व मोर्चा करी कोनाच्या बाजूने गेेले हा निकाल जाहीर झाल्यावर माहीत झालेच.
खैरलांजी हत्याकांड झाल्यानंतर जास्त लोक रस्त्यावरती  उतरले. तेच सेना,मनसे,भाजपा,कॉंग्रेस आणि रॉका ह्या पक्षाला मतदान करत होती?.पाथर्डी च्या वेळेस सुद्धा तेच आणि आता ऑटोसिटीच्या समर्थानासाठी तेच होत आहे.दलाल,भडवे आणि चमचे सर्वात पुढे आले आहेत.जे मनुवादी,हिंदुत्ववादी विचारधारा असलेल्या पक्षाच्या तिकीटावर निवडणुक लढले आणि आपटले हयानांच जातीचा जास्त पुळका येतो.या पेक्षा अशा लोकांनी एकच काम करावे मोर्चे बिर्चे काही काढायचे नाही. फक्त आंबेडकरी पक्षात निस्वार्थी काम करायचे, जर मोर्च्याची येवढीच खुमखुमी असेल तर त्यांनी एक काम जरुर करावे आंबेडकरी पक्षाला मतदान करा म्हणुन मोर्चे काढावे आणि आपली खरी ताकत मतपेटीत दाखवावी. हे जर जमत नसेल तर शेळी होऊन शंभर दिवस जगा!.उगाच वाघ, सिंह असल्याचा दिखाऊ पणा करू नका, त्याला कोणीच घाबरत नाही. सरकार तर बिलकुल नाही, पण समाजा समाजात तिरस्कार निर्माण होणारे काम करू नका.मोर्चा आंदोलनात ज्या प्रमाणे सर्व मतभेद विचार भेद विसरून संघटित शक्ती दाखविली,त्याच प्रमाणे मतदान पेटीत खरी संघशक्ति दाखविली असती तर काय झाले असते?. 
जनांआंदोलनात बहुसंख्येने कार्यकर्ते आणि नेते दलाली,चमकेगिरी मोठया प्रमाणात करतात. जनआंदोलनातील चमकेगिरी बंद झाली पाहिजे.सर्व ठिकाणी ती फालतुगिरी दिसते. संविधान सन्मान मोर्चा मध्ये आलेल्या अनेक स्वयंघोषित नेत्याना वारंवार संयोजक सांगत होते की स्टेज तुटण्याच्या मार्गावर आहे.कृपया खाली उतरा पण चमकुगिरी करणारे आणि स्वताला मोठे स्वयंघोषित नेते समजणारे स्टेज वरुन खाली उतरत नव्हते,अशी पोस्ट सोशल मिडियावर त्यावेळी फिरली,संविधान सन्माना करीत मोर्चे काढणारे राजशिष्टाचार मानत नसतील तर?.हिच शिस्त आपल्या लोकांना अगोदर पासून नाही, त्यामुळे जोपर्यंत पोस्टर वरील नावे आणि स्टेज वरील गर्दी कमी होणार नाही तोपर्यंत आपण आपला उद्देश् सफल करु शकणार नाही.हे ही समाजाने लक्षात ठेवले पाहिजे.चमकोगिरी करणाराना समाजाने धडा शिकवला पाहिजे.काम करणाऱ्याना स्टेज ची गरज नसते.हे लक्षात घेतलेले बरे तुमच्या कामातुन तुमचे कार्य कळत असते. स्टेज वर उभे राहुन नाही.स्टेज वर कमितकमी शंभर लोक नेते म्हणुन उभे होते.स्टेज तुटला असता तर? सर्व मीडिया नी त्यांची दाखल घेतली असती ज्यांना कोणती ही शिस्त नाही.ते देशात संविधानाचा सन्मान कसा करतील?.म्हणून मोर्चे क्रांती आणि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.
आंबेडकरी पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा?.ज्याला भारतीय संविधानातील प्रत्येक कलम पोट कलम तोंड पाठ असले पाहिजे.त्यांनी त्यांचे काटेकोर पणे पालन केले.पाहिजे.रिडल्स ते आंबेडकर भवन आम्ही लाखोंच्या संख्येने एक दिवस संघटित होऊन रोडवर मैदानात एकत्र आलो.पुढे काय झाले?.आंबेडकर भवनाच्या वेळी सर्वांनी ऍड बाळासाहेब आंबेडकरांचे नेतृत्वाखाली मोर्चा काढला कायदेशीर मार्गाने काढलेला होता की भावनिक मार्गाने काढला होता?.
मुंबई ही भारताची नव्हे जगाची औधोगिक जागतिक कीर्तीची महानगरपालिका आहे.तिची निवडणूक मोर्च्या नंतर चार महिन्याने झाली. सर्व मतभेद विसरून लाखोंचे मोर्चे काढणारे मराठे आणि बहुजन,बौद्ध कसे समोरे गेेले?. शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जागतिक कीर्तीचे स्मारक बनविन्या करीता पालिकेवर कोणाचे लोक प्रतिनिधी जास्त गेले पाहिजे होते?.कोणत्या विचारधारेची माणसं तिथे पाहिजे होती  ?.यांचे उत्तर विकाऊ समाजाच्या दिखाऊ मोर्चे करांनी दिले पाहिजे.हेच खरे समाज परिवर्तन होते काय?. त्या बाबतचे नियोजन कोणते?.
एक मराठा लाख मराठा म्हणणारा मराठ क्रांती मोर्चा हा विकाऊ समाजाचाच होता.कारण त्यांना त्यांच्या जातीतील साखर सम्राट,शिक्षण सम्राट यांनी सरकारी कायदे कानुन मोडून कसे साम्रराज्य उभे करून शेतकऱ्याची आणि विद्यार्थी पालकाची कशी लूटमार केली हे सत्य का दिसत नाही.कारण प्रत्येक निवडणूकीत यांनी त्यांना फुकट मतदान केले नाही.मताचा योग्य मोबदला घेऊनच त्यांनी मतदान केले. म्हणुन नवद टक्के मार्क भेटून ऍडमिशन का भेटले नाही?.कोणत्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळाले नाही.त्याविरोधात तेव्हा का संघटित झाले नाही.हे त्या शिक्षण सम्राटांना विचारले पाहिजे होते.त्याला आरक्षण घेणारे कसे काय जबाबदार होते,आहेत.शिक्षण संस्था मराठ्याची,शिक्षण संचालक मराठे,शिक्षक मराठे,शिक्षण मंत्री मराठे आणि विद्यार्थी पालक मराठे तरी न्याय मिळाला नाही?. खरेच या देशात संविधानाची अंमलबजावणी होते काय?. त्यांची प्रामाणिक पणे अंमलबजावणी झाल्यास कोणीच शिक्षण आणि रोजगारा पासुन वंचित राहणार नाही.म्हणुन विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडा आणि टिकाऊ पणा स्विकारा त्यात सर्वच समाजाचे भले होईल.
आंबेडकरी समाजाने बहुजन समाजाचे नेतृत्व स्विकारण्या लायक बनावे.तर इतर बहुजन समाज तुमच्या जवळ येईल.कारण रिपब्लिकन पक्षाचा कोणता ही गट असो.अथवा बसपा तुम्हांला तुमच्या पक्षाच्या नावाने नाही तर बाबासाहेबांच्या नावाने सर्वजन ओळखतात. कारण पक्षाचे अध्यक्ष वारले तरी पक्षाचा मृत्यु कधीच होत नाही.अध्यक्षामुळे पक्षाची ओळख नसून बुद्ध फुले शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीवर आधारित पक्षाची ओळख आहे.म्हणून सर्व पक्ष एकमेकांचे भाऊ भाऊ असावे.वडिलांची संपत्ती सर्व आपसात वाटून घेतात.नंतर एक मेकांना मदत करतात.जर आपला भाऊ कुठे कमी पडत असेल तर सर्व भावांनी त्याला मदत करायला हवी!. दुश्मनी नको कारण तो व्यक्ति कसाही असो पन तो त्याच्या भागातील लोकांना मदत करत आहे.आणि राहिला प्रश्न आपल्या भावाच्या विरोधात राहून आपला पक्ष त्या भागात नव्याने स्थापना करण्याचा तर नवीन पक्ष स्थापन करुन तो मजबूत करायला दहा वर्ष लागतील म्हणून अगोदरच जो पक्ष त्या ठिकाणी मजबूत आहे त्याला मदत करा.दहा वर्ष उगीचच कशाला वाया घालवायची आणि इतर पक्षानां या फुटीचा फायदा घेऊ द्यायचा,जरी तो व्यक्ति आंबेडकरी विचारांचा दुसऱ्या पक्षाचा असेल.तो वैचारिक गुलाम असेल अशोक चव्हाण आणि नरेंद्र मोदी सारखा असेल.
आपला पक्ष बाबासाहेबांच्या विचारसरणीवर आधारित आहे. राजकारणात आपण अशी तोडजोड करु तर आपले राजकारण ठिक आहे अन्यथा एकमेकांना विरोध करत प्रत्येक पंचवार्षीक निवडणूकीत आपले अपयश समाजाला अन्याय अत्याचार सहन करण्यास भाग पडेल.आपला विकास आणि कल्याण करण्यासाठी इतर पक्षाच्या कोणत्या प्रलोभनाला बळी पडू नका.आणि याचा फायदा इतर पक्षाला होईल असे वागू नका.सर्वच समाजाने विकाऊ आणि दिखाऊ पणा सोडून विचारधारेवर चालणारा समाज, संस्था,संघटना आणि पक्ष निर्माण करण्यासाठी वाचन बंद्ध व्हा.तरच पुढील इतिहास विकाऊ समाजाचा दिखाऊ मोर्चा नव्हता तर सामाजिक,राजकीय क्रांती,परिवर्तन घडविणारा मोर्चा होता.असे मराठा क्रांती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि संविधान सन्मान मोर्चा बाबत लिहल्या जाईल.  मराठा ,बहुजन आणि बौद्ध समाजातील सर्वच कार्यकर्ते नेते नालायक नाहीत.काही प्रामाणिक आहेत.त्यांना सर्व समाजाने योग्य साथ द्यावी.विभागा विभागात लोकशाही पद्धतीने निवडणूका घेऊन कार्यकर्ते नेते निवडा.आणि आम्ही खरेच संविधान प्रेमी आहोत.संविधाना चा सन्मान करणारे आहोत हे सिद्ध होईल.आणि मोर्चे क्रांती आ
णि प्रबोधन करण्यास असमर्थ ठरले ?.हे मान्य करा 
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403859,

क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले

क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले

भारतीय कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना असंघटीत कामगारांना संघटित करण्याची प्रेरणा देणारे आणि भारतात महिलांना शिक्षण घेण्यासाठी स्वतःच्या पत्नीला सावित्रीबाई यांना शिक्षण घेण्यास सतत प्रेरणा देणारे ज्योतीराव गोविंदराव फुले म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले,ग्रामीण भागात आजही जोतीराव ज्योतीराव नाही तर ज्योतिबाच म्हटल्या जाते. भटा ब्राम्हणांनी मराठा मागासवर्गीय समाजात एक म्हण पेरून ठेवली आहे.ती म्हणजे "हाले डुले महात्मा फुले"  माथाडी कामगारात विशेष कोल्हापूर,सांगली,सातारा, पुणे,नगर जिल्ह्यातील कामगार मंडळी या म्हणीचा जास्त शब्द प्रयोग करतात. त्यांना महात्मा फुले यांचा ऐतिहासिक इतिहास जास्त माहीत नाही.म्हणूनच ते असे म्हणतात.
जोतीरावांचा जन्म ११ एप्रिल १८२७ ला झाला. अवघ्या नऊ वर्षांनी या घटनेला २०० वर्षे पूर्ण होतील. त्यांना ६३ वर्षांचे आयुष्य लाभले. कोणताही महापुरूष हा त्या काळाच्या मर्यांदांनी वेढलेला असतो. फुले द्रष्टे, योद्धा आणि समाजक्रांतिकारक होते.विषमता,असमानता अन्याय अत्याचाराच्या विरोधात नेहमी लढणारा माणूस त्यावेळी सना तनी भटा ब्राम्हणांच्या हिट लिस्टवर होता.त्यामुळे त्यांना जागोजागी संकटाचा सामना करावा लागे.यावर त्याने बुद्धीचातुर्याने मात केली.आजच्या सारखी जीवघेणी नीतिमत्ता नसलेले हिंसाचारी लोक तेव्हा नव्हते असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यावेळची परिस्थीती आम्ही वाचली आहे पण आज लोकशाही असूनही प्रशासकीय व्यवस्थेतील मनुवादी किती हिंसक पण मागासवर्गीय समाजाच्या तरुणांना वागणूक देतात.ते सोशल मीडियावर पाहिल्यावर अंगावर काटा उभा राहतो. मग ज्योतीराव फुले यांनी सावित्रीबाईला शिक्षण देऊन मुलीची शाळा काढून किती मोठा संघर्ष केला असेल यांची कल्पनाच केल्या जात नाही. 
आजच्या जागतिकीकरणाच्या संघर्षशील जिवनात असे काही महापुरुष,महात्मे शोधून ही सापडणार नाहीत.काही शिक्षण सम्राट आहेत पण त्यांच्या कडून कोणताही आदर्श घेण्याच्या लायकीचे ते नाहीत.त्याच बरोबर ज्योतीराव फुले उत्तम बिल्डर उद्योगपती आणि कार्यकारी संचालक होते हे आम्ही कधी वाचलेच नव्हते.पण हरी नरके सारख्या बुद्धिजीवी विचारवंतांनी त्यांच्या या ऐतिहासिक कार्याचा अभ्यास करून जागा समोर मांडला परंतु त्यावर व्यापक चर्चा होतांना दिसत नाही.
ज्योतीराव फुले यांच्या कंपनीनं केलेली महत्त्वाची
 कामे वस्तु आजही लक्षवेधी आहेत पण त्यांची पाहिजे त्या प्रकारे दाखल घेतल्या जात नाही.कात्रजचा बोगदा, येरवड्याचा पूल आणि खडकवासला धरणाचा कालवा कोणी बांधला?. कधी बांधला ?.या बाबत कोणी विचारत नाही.कारण या वर चर्चा सुरू झाल्यास आजच्या तरुणांना एक प्रेरणादायी सत्य इतिहास समोर येईल या भीतीने वर चर्चाच होत नाही. 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्योतीराव फुलेंना गुरुस्थानी मानायचेच अनेकांना आज भी काळजाला झोबंते.त्यामुळे बाबासाहेब फुलेनां गुरूस्थानी मानायचे आणि फुले यांचा वारसा आपण कायम उराशी बाळगू असे अभिमानानं सांगायचे.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज आज ही फुलेंच्या विचारांशी प्रामाणिक राहुन उठता बसता त्यांच्या विचारला प्रतिमांना त्रिवार प्रणाम करतो.
१९३२ साली पुण्यात बोलताना महात्मा गांधी म्हणाले होते, "जोतीराव फुले देशके पहले महात्मा थे. असली महात्मा वोही थे."  स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फुल्यांना "समाज क्रांतिकारक" म्हणून गौरविले होते. तीन अगदी भिन्न वैचारिक छावण्यांमधील या नेत्यांनी फुल्यांचा गौरव केलेला आहे. "मूह मे राम बगल मे सूरी " या रीतीने गांधीवादी, सावरकरवादी आणि मनुवादी वागतांना दिसतात.
ज्योतीरावांनी सर्वांना शिक्षण,ज्ञाननिर्मिती, कौशल्यनिर्मिती, स्त्री-पुरुष समता, जातीनिर्मुलन, संसाधनांचे फेरवाटप, धर्मचिकित्सा आणि आंतरजातीय विवाह या कार्यक्रम पत्रिकेच्या आधारे आधुनिक भारताच्या पायाभरणीचे ऐतिहासिक काम करून ठेवले म्हणून आज त्यांची फळ आपण मुक्तपणे खातो.
महात्मा फुले यांच्या क्रांतिकारी विचाराचा वारसा आंबेडकरी चळवळ पुढे नेत आहे त्याला मागासवर्गीय समाजाने खऱ्या अर्थाने साथ दिल्यास केंद्रात फुले शाहु आंबेडकर विचारांचे सरकार स्थापन होऊ शकते.
मान्यवर कांशीरामजी यांनी उत्तर भारतात या महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारांची पेरणी करून ठेवली आहे.पण काही मागासवर्गीय समाजातील गुलामांनी त्याला सुरुंग लावला होता.शत्रू पक्षाच्या विचारधारेच्या नेत्यांना केवळ आर्थिक लाभा करीता संघटनेत सहभागी करून घेतल्यामुळे क्रांतिकारी विचारांचे कॅडर बेस संघटन मागे पडले आणि लीडर बेस लोक पुढे आले त्यामुळे पक्ष संघटनेवर परिणाम झाला.त्यांचे फळ आज उत्तर भारतीय जनता भोगत आहे.व्यक्ती पेक्षा संघटन मोठे असते संघटने पेक्षा विचारधारा मोठी असते.फुले शाहु आंबेडकर विचार हे सर्वान पेक्षा मोठे आहेत. क्रांतिकारी विचारांचे प्रेरणास्रोत महात्मा फुले आहेत.त्यांची विचारांची अंमलबजावणी व्यवस्थित झाली तर क्रांतिकारी परिवर्तन घडल्या शिवाय राहणार नाही.आज देशात जी परिस्थिती आहे.तिचा गांभीर्याने विचार करण्यासाठी महापुरुषांची क्रांतिकारी विचारधारच यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकते.महात्मा ज्योतीराव फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्व मागासवर्गीय समाजाने आपआपल्या समाजाच्या संघटनेचे वैचारिक आत्मचिंतन करून परीक्षण करणे आवश्यक आहे.हीच त्यांच्या जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजा कडून अपेक्षा महात्मा ज्योतीराव फुले यांच्या क्रांतिकारी विचाराला कोटी कोटी प्रणाम आणि जयंतीनिमित्त सर्व बहुजन समाजाला हार्दिक शुभेच्छा!.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई

आंबेडकरी चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला ?


 आंबेडकरी चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला ?


डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनाला १२७ वर्ष पूर्ण होत असताना.जिवंत पाणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांची भिती मनुवादी सनातनी हिंदूंना वाटत नव्हती त्याही पेक्षा आज भीती त्यांच्या विचारांच्या लोकांकडून यांना वाटत आहे.तरी हा मागासवर्गीय समाज पूर्ण पणे आंबेडकरी विचार स्विकारत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या क्रांतिकारी घोषणा,प्रतिज्ञा म्हणजेच त्यांनी दिलेला कोणता ही मंत्र आज समाजात पूर्णपणे रुजला नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.त्यामुळे आम्ही खूप पुढे गेलो असे म्हणता येत नाही.आणि खूप मागे ही राहलो असे म्हणता येत नाही.
बाबासाहेबाचा पुतळा,चबुतरा असलेल्या चौकात निळी दही हंडी आणि बुद्ध विहारा समोर गणपती, नवरात्र उत्सव आता उघडपणे मोठ्या उत्सवात साजरा होते. मातृसंस्थाचे प्रशिक्षक उपासक उपाशिका हताश पणे पाहतात.स्थानिक राजकीय कार्यकर्ते सर्वधर्मसमभावच्या राजकीय मंत्राचा मना पासून आदर करण्याचा आव आणतात.त्यामुळे आम्ही " बुद्ध आणि त्याचा धम्म " हा बाबासाहेबांनी लिहलेला महान ग्रंथ घराघरात वाचूनही त्याचे आचरण मात्र कुठे होताना दिसत नाही.त्यामुळे संपूर्ण समाज व चळवळ दिशा हीन झाली आहे.कोणाचे कोणाला दडपण भिती राहिली नाही.
एका बाजूला आम्ही भाजपच्या नरेंद्र,देवेंद्र यांना त्यांच्या विचारधारेला सतत विरोध करीत राहणार आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच हस्ते भिम जयंतीचे भिम महोत्सव किंवा भिम शाहिरी जलसा, राष्ट्रर्निर्माते विचार मोहत्सव साजरा करणार,यातुन आम्ही काय बोध घ्यावा?.त्यांना शत्रू म्हणून लांब ठेवणार कि मित्र म्हणून जवळ करणार?.त्यांच्या आर्थिक मदतीवर किंवा सामाजिक सलोख्यावर आम्ही राजकीय लढाई कशी लढणार?. मोठे नेते कार्यकर्ते, पत्रकार, विचारवंत साहित्यिक योग्य मदत सहकार्य घेऊन सुरक्षित नोकरी करून, प्लॉट,टॉवर, बांगला असा सुरक्षित ठिकाणी राहतील,पण खेडया पडयातील व शहरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या समाजाचे काय?. यांनी बाबासाहेबांचे प्रामाणिक शिष्य किंवा भक्त म्हणून शासन कर्ती जमात बन्या करीता मतदार म्हणून कोणाला मतदान करावे?. हा प्रश्न कायम निकालात निघाला.आपल्या समाजातील शत्रू पक्षात असलेल्या मित्राला कि मित्र पक्षातील शत्रूला?. बाबासाहेब आंबेडकर यांची १२७ जयंती मोठया उत्सवात साजरी करणाऱ्या प्रतिष्ठान,फाऊंडेशन,मंडळ,संस्था,संघटना यांचे मुख्य उद्दिष्ट कोणते?.यांचे राजकीय उद्धिष्ट कोणते?.यांचा विचार कोण आणि कधी करणार?.शत्रू चार वर्षात राज्यातील केंद्रातील राजकीय सत्ता हातात घेऊन संविधानाने दिलेले सर्व मूलभूत अधिकार नष्ट करीत असतांना आम्ही फक्त एक दिवसाचे शक्ती प्रदर्शन करून पुन्हा पुन्हा गटबाजीत गुंग आहोत.आजच्या परिस्थितीत आंबेडकरी विचारांच्या पक्षाला सुवर्ण संधी त्यांनी मोठ्या प्रमाणात असलेल्या सर्व मागासवर्गीय समाजाला विश्वास देऊन राजकिय सत्ता परिवर्तनास सज्ज झाले पाहिजे.
डॉ बाबासाहेब आंबेडकरानीं असंघटीत अशिक्षित दलित शोषित अस्पुष्य समाजाच्या यातना आणि वेदना स्वता भोगल्या.आपण उच्च विद्याविभूषित झाल्या नंतर ही चातुर्वण्य मानणाऱ्या चौकटीच्या समाज व्यवस्थेत आपल्याला माणूस म्हणून माणुसकीची व समानतेची वागणूक मिळत नाही.तर माझ्या गोरगरीब असंघटीत असुशिक्षित दलित शोषित समाजाची काय अवस्था असेल?.या चिंतेने ते सतत तळमळत होते.यामुळेच त्यांच्यातील विचारवंताने या समाजाच्या गुलामीच्या बेड्या तोडण्याचे व्रत हातात घेऊन क्रांतीची मशाल पेटविण्या साठी जीवनभर संघर्ष केला आणि समाजाचे प्रबोधन करून समाज संघटीत केला.इंग्लंड,कोलंबिया सारख्या साता समुद्राच्या पलीकडे परदेशात उच्च विद्याविभूषित होऊन कायदे पंडित झालेला हा विद्वान समाजाच्या न्याय,हक्क,व प्रतिष्ठे साठी रस्तावर उतरून सतत संघर्ष करीत राहिला. आणि त्याच्या संघर्षाला कायद्याचा सनदशीर मार्गाचा आधार होता.त्यांनी वैचारिक अधिष्ठान असलेला युक्तिवाद ,संघटना,व राजकीय दबाव याचा समाजा करिता एक हत्यार म्हणून वापर केला.पण त्यांनी कधी ही बेकायदेशीर कारवाया अथवा हिंसाचाराचा कधी अंगीकार केला नाही. कारण बळाचा वापर न करता त्यांनी बुद्धिचातुर्य वापरून सामाजिक क्रांतीचे ध्येय गाठले.आजचे नेते एका आमदार,खासदारकी साठी समाजाला वैचारिक शत्रूशी युती आघाडी करतात.तीच परिस्थिती धम्मभूमी दीक्षाभूमी चैत्यभूमी च्या वापराची [व्यापाराची ] त्याकाळी हिंदू धर्माच्या चातुर्वण्य व्यवस्थेमुळे मागासवर्गीय शोषित समाज मानसिक दृष्ट्या पंगु बनला होता.उच्चवर्णीयनी देव,धर्म व धर्मशास्त्राच्या जोखंडत त्याला भोला भक्त (अंधश्रद्धा) बनवून माणुसकी शून्य पशुपेक्षा ही हीन-दिन अस गुलामीच जीवन जगणे भाग पडल्या जात होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी हिंदू धर्मात सुधारणा करण्याच्या जिवापार प्रयत्न केला.पण बदल होत हे लक्षात आल्यामुळे त्यांनी मनुस्मृती जाळली, महाडच्या चवदार तळ्याचा संघर्ष म्हणजे पाण्याला आग लावली,नाशिक काळाराम मंदिर प्रवेश महणजे देवाला त्याच्या भक्ताला सुबुद्धी देण्याचे जाहीर आव्हान.चातुर्वण्य समाज व्यवसस्थेवर घणाघाती घाव घातले ,पण जेव्हा काहीच हाती लागत नाही हे लक्ष्यात आले तेव्हा बाबासाहेबांनी १९३५ला येवले येथे धर्मातराची घोषण आणि प्रतिज्ञा केली.दलित शोषित समाजाला स्वाभिमान व माणुसकी मिळवून देऊन त्याच्यात क्रांतिकारी बदल घडवून नवसमाज निर्माण करून दाखविला.आणि आज खरेच मागासवर्गीय शोषित समाजात जास्तीचाच बद्दल झाला. त्याकाळी त्याला सर्वधर्मसमभाव चा अर्थ समजत नव्हता त्यावेळी त्याची बुद्धी शेण खात होती.आज सर्व आंबेडकरी समाज वस्त्यातील बाल्लेकील्यात शेणखत काढून पोट भरणारयाची पोर खेड्यातून शहरात आले आणि स्वभिमानी झाली.विविध पक्षाचे घाणीतील कार्यकर्ते म्हणून ओळखल्या जातात.त्याचे ऐतिहासिक काम हेच कि बाबासाहेबाच्या सर्व संस्था,संघटना,पक्षात फुट पडून वाटोळे करणे.
माणसाच्या जीवनात धर्माची गरज आहे.माणसाचे मन सुसंस्कृत होण्याकरिता त्याला धर्माची आवश्यकता असते.यावर बाबासाहेबाची श्रद्धा होती .ते स्वत: अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते.म्हणून त्यांना धर्माची आवश्यकता वाटत होती.त्यामुळेच त्यांनी सर्व धर्माचा मनलावून अभ्यास केला.नुसते वाचले नाही.(जसे आज आम्ही "बुद्ध आणि त्याचा धम्म " वाचतो.) त्यानंतर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ ला म्हणजे हिंदुच्या विजया दशमीला धर्मातर करून देशात नव्हे तर जगात रक्ताचा एक थेंब न सांडता सामाजिक धार्मिक क्रांती केली.आणि १९३५ ला केलेली प्रतिज्ञा पूर्ण केली.धर्म आणि धम्म यातील ठळक फरक या देशातील चातुर्वण्य समाज व्यवस्था मानणाऱ्या ढोगी लोकांना दाखवून दिला.धर्म म्हणजे निव्वळ वर्तुनुकीचे व सामाजिक आचरणाचे नियम नव्हे तर नितीमता हे धर्माचे अधिष्ठान असले पाहिजे.धर्माने दारिद्र्याचे गोडवे गाऊ नव्हे.ईश्वराने काही लोकांना केवळ दारिद्र्यात व सर्व प्रकारच्या सुखसोई पासून वंचित राहण्यासाठी जन्माला घातले या उलट इतरांना केवळ गर्भश्रीमंतीत लोळुन आणि विशेषाधिकार वापरून गरिबांवर अधिराज्य गाजविण्यासाठी जन्मा घातले आणि घडविले अशी शिकवण कोणत्याही धर्माने देऊ नये. तर इतरांशी ते आपले बंधू आणि भगिनी आहेत असे समजून वागण्यासाठी श्रध्दा भिन्नभिन असल्या तरी प्रत्येकांने एकमेकाशी केवळ एक मनुष्य मात्र म्हणून वागावे.या साठी धर्माने आपल्या भक्तांना अनुयायांना उतेजन दिले पाहिजे जे धर्म माणसाला माणसा सारखे वागविण्याची शिकवण देत नाही तो कसला धर्मं ?.या सर्व कसोट्यांवर परिपूर्ण उतरेलेला जगातील एकमेव धर्म म्हणजे बुद्ध धर्म (धम्म) आहे . याची पूर्ण खात्री बाबासाहेबांना झाली म्हणून त्यांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला,आता त्याचे नांव घेणारे अनुयायी त्या त्यागाला परिश्रमाला राजकीय फायद्या करिता "सर्वधर्मसमभाव "ची फोडणी देण्याचा केविलवाना प्रत्यन करीत आहेत.
बुद्धाचा धम्म मानवतावादी,विज्ञानवादी असून तो याच जीवनात प्रत्यक्ष अनुभव घेण्यावर व आचरणावर भर देणारा आहे.मैत्री,करुणा व शांततेवर जोर देतो.जीवना विषयीचे स्पष्ट आणि रास्त स्पष्टीकरण देऊन सुरवात आणि शेवटही मनुष्यमात्राच्या कल्याणाचाच विचार करतो. शिल,सदाचाराची शिकवण देतो.या धर्मात धम्मात ईश्वराला, काल्पनिकतेला,कर्मकांड,व थोतांडाला अजिबात थारा नसून तो वास्तववादी व परिवर्तनशील आहे.त्यामुळेच डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी बुद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्याचे महत्व चळवळ आणि समाज यात कमी दिसते सर्वच राजकीयदृष्ट्या सर्वधर्मसमभाव चा मागे जाताना दिसतात. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आणि समाजातील बंधुभाव संपला आहे.याचा गांभीर्याने १२७ व्या जयंती दिनी विचार झाला पाहिजे.भिमजयंती दिनाच्या सर्व हार्दिक मंगल कामना!.

जयभीम!. जयभारत !!.
आयु सागर रामभाऊ तायडे.मोब -९९२०४०३८५९ 

भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.

भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.
बाबासाहेबांचे नांव घेणे बंद करा किंवा त्यांच्या विचारांची अंमल बजावणी करा.म्हणजेच भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. निसर्ग नियमा नुसार बदलत राहतो.त्यानुसार मानव प्राणी सुद्धा बदलत राहतात.वेळ,काळ आणि संकट कधीच सांगुन येत नाही.म्हणुन वेळचे आणि काळाचे नियोजन करून संकट टाळता येतात.उन्हाळ्यात आणि पाऊसाळ्यात कोणत्याही मोठ्या उत्सवाचे नियोजन कोणी करीत नाही..म्हणुन आता ग्रामीण भागातही मोठमोठे हॉल, सभागृह बांधण्यात आले आहेत.१९५६ पूर्वी सर्व समाजा करीता हे हॉल सभागृह उपलब्ध नव्हती.पण आता समाजाने बदलेलच पाहिजे.आम्ही खेडे सोडुन शहरात आलो,शेणाने सारवणाऱ्या गवताच्या झोपडीतुन सिमेंट काँक्रेटच्या चकचकीत लादी स्टाईलच्या घरात आज राहतो. हा बदल एकदिवसात नाही घडला.खूप कष्टाची कामे करून आणि झोपडी वाचविण्या साठी संघर्ष करून आता स्वतःच्या घरात राहत आहोत.तेव्हा झोपडी आणि झोपडपट्टी वाचविण्या साठी आम्ही निळा व पंचशील झेंडा लावला होता.सोबत बुद्ध विहार आणि जयभिम चबुतरा पण बांधला होता.आता आम्ही बदललो तेव्हा विहार व चबुतरा पण बदलला पाहिजे होता.झोपडपट्टी वाचविण्या साठी बुद्ध विहार होती.म्हणुन आम्ही नियमित एकत्र येत होतो.बसत होतो,चर्चा करून कार्यक्रम घेत होतो.आता त्यांची गरज वाटत नाही.कारण झोपडीसह पिण्याच्या पाण्याचे मीटर, लाईट मीटर नांवावर झाली आहेत.आता तुटण्याची भिती नाही.म्हणुन एकत्र बसण्याची गरज राहली नाही.
आताच्या घडीला प्रत्येक नगरात बुद्ध विहार आहेत. पण ती स्थानिक राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याच्या राजकीय स्पर्धेमुळे त्यांच्याच नेतृत्वाखाली बंद आहेत.कारण बाबासाहेब सर्वांचा एकच असला तरी प्रत्येकाचा आर्थिक पोशिंदा वेगळा वेगळा आहे.म्हणुन एकत्र बसल्यास एकच बुद्ध एकच बाबासाहेब स्विकारावा लागेल.बावीस प्रतिज्ञा नाही पाळता आल्या तर कमीत कमी पंचशील तर पाळावेच लागेल.ते शक्य होत नसल्यामुळे कार्यकर्ते नेते बुद्धविहारा ऐवजी नाक्यावरील बियरबार मध्ये बसण्यास तयार आहेत. आणि विशेष म्हणजे पिणारे खाणारे एकत्र बसू शकतात. सुशिक्षित आणि सुरक्षित नोकरी करणारे यांची इथे गरज नाही.ते असंघटीत समाजाला चालत नाही.कारण ते पित नाही.किंवा तोडपाणी करून खाऊ पिऊ घालत नाही.ते सर्वा कडून सारखी वर्गणी काढण्याची अपेक्षा करतात.
जयंती उत्सव साजरा करण्यासाठी आम्ही सर्व मतभेद विसरून एकत्र येतो.हीच एकजूट निवडणूका मध्ये का दाखवीत नाही?.भरपूर नाही तरी यथा शक्ती खुप पैसा गोळा करतो, पण तो लायटिंग, डेकोरेशन, ब्रेक डांस, कव्वाली वर खर्च करतो.आम्ही किती मोठी जयंती साजरी केली यांचा तोरा मिळवितो.पण नगरातील बुद्ध विहार बांधकाम दुरुस्ती साठी नगरसेवक,आमदार की राजकीय दलालांच्या पाया पडतात.विभागात बुद्ध विहार खूप आहेत,पण मालकी हक्क आणि देखभालीसाठी न मिटणारी भांडण आहेत.त्यातुन चैत्यभूमी, दीक्षाभूमी, पीपल्स सोसायटी, आंबेडकर भवन सारखी ऐतिहासिक वास्तू संस्था सुटले नाही.मग विभागात नगरात नवीन बुद्ध विहार किंवा मंदिर बांधण्या पेक्षा विभागातील मुलामुलींच्या शिक्षणासाठी,गोरगरिबांना आरोग्य सेवा देणारी संस्था निर्माण करून तिच्यात दरवर्षी गुंतवणूक वाढवा तीच खरी आंबेडकरी विचारांची चळवळ असेल.आणि जयंतीनिमित्त जशी एकजूट दाखविल्या जाते तशीच एकजूट निवडणूका मध्ये दाखविली तर नगरसेवक, आमदार व खासदार आपला येऊ शकतो.
आता राज्यात व केंद्रात आर एस एस प्रणित सरकारे आहेत.त्यांच्या विचारांची अंमलबजावणी करणारा प्रसिद्ध क्रूरकर्मा प्रधानसेवक संविधानिक कोणतेही संकेत न पळता धडाधड निर्णय घेत आहे.जे निर्णय त्याला घेता येत नाही ते सरळ सुप्रीम कोर्टा द्वारे राबविले जात आहेत.त्यांच्याशी राजकीय टक्कर देण्यासाठी आपल्या कडे कोणता राजकीय पक्ष आहे.महाराष्ट्रात सर्व नेते राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष आहेत, परंतु त्यांचा स्वतःचा मतदार संघ आहे काय?.एकही नेत्यांचा मतदारसंघा नाही.म्हणूनच राज्यातील किती मतदारसंघात आपण आमदार निवडून आणू शकतो?.यांचा गांभीर्याने विचार कोणी करीत नाही.वार्डात निवडून न येणारा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवण्याची स्वप्ने पाहतो केवळ पैसे कमविणे हाच मेन उद्देश असेल तर समाजाने त्याला आपली जागा दाखविली पाहिजे की नाही?.असे लोक पक्ष संघटनेत काम करण्यापेक्षा स्वसंघटना कडून राजकीय दलाली करतात त्यांना चोप दिल्या शिवाय आपण शत्रूला नामोहरम करू शकत नाही. राष्ट्रीय पातळीवर एकमेव पक्ष कोण असेल तर तो बहुजन समाज पक्ष त्यांच्या नेतृत्वाचे काही ध्येय धोरण चुकले होते ते दुरुस्त करून त्यात सुधारणा करून राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटना उभी राहू शकते आणि दोन राष्ट्रीय पक्षांना आव्हान देऊ शकते.करीता बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. म्हणूनच हा प्रश्न निर्माण होतो की बहुजन समाजातील लोकांचे काय?. कार्यकर्ते,नेते बुद्ध फुले शाहु आणि आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचा वैचारिक वारसा सांगतात आणि शत्रु पेक्षा मित्रा सोबत लढतात आणि व्यक्तीगत व वैचारिक संबंध कायमस्वरूपी तुटतील असे वागतात,आणि राजकीय दुष्टचक्रात फसतात.
आताच्या घडीला मनुवादी मानसिकता असलेला पक्ष सर्व आघाडी वर मात करीत आहे.केवळ जन आंदोलन करून त्यांना रोखणे अशक्य आहे.म्हणूनच प्रत्येक मतदारसंघात समान विचारांच्या मित्र संस्था, संघटना आणि पक्षांना एकत्र येऊन एकास एक पर्याय दिल्यास शत्रूला आपण शह देऊ शकतो. करीता विचारांची जयंती साजरी करण्यात यावी. नाच गाणे ब्रेकड्रॉन्स बंद करण्यात यावे.पूर्णपणे बंद करा असे म्हणणार नाही.कारण ज्या परिस्थितीत असंघटीत कामगार,मजुरी करून जगतो त्यांच्या कडे पाहिल्यास लोकांना त्यांची एवढी संघ शक्ती जयंती साजरी करण्यासाठी कुठून येते हा मोठा प्रश्न पडतो.नेहमी तिरस्कार करणारे लोक आंबेडकरी चळवळीतील भिम जयंती साजरी करण्याचा जोश पाहून प्रचंड अस्वस्थता वाढते असते.आंबेडकरी समाज जोश मध्ये होश गमावून बसतो हे आता पर्यंत च्या निवडणूकात आपण पाहिले आहे.येत्या काळात स्वाभिमानाने जगायचे असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग बंद करा!.आणि विचारांची देवाणघेवाण करून राजकीय परिवर्तन घडवा नाही तर काळ तुम्हाला कधीच माफ करणार नाही.२०१९ ला आर एस एस प्रणित भाजपा केंद्रात सत्तेवर आल्यास गंभीर परिणामास तयार राहा.त्यांच्या विरोधात लढण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्याकडे कोणता ठोस कार्यक्रम योजना आहे?.व्यक्ती पूजा मूर्ती पूजा करून आपण जयंती साजरी करत असाल तर क्रांतिकारी विचारांचे काय?.तो जर पराजित होत असेल तर भिमजयंती साजरी करण्याचे ढोंग आहे की नाही?.यांचे प्रत्येक भिम सैनिकांनी आत्मचिंतन करावे हेच १२७ व्या भिम जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतांना नम्र विनंती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारक विचारांना कोटी कोटी प्रणाम व सर्व जागृत वाचकांना हार्दिक शुभेच्छा
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई