कौरव पांडवांच्या लढाईत आपला मुख्य शत्रू कोण?
भारतीय राजकारणात आपला मुख्य शत्रू कोण ?!.हेच ओळखणे अशक्य झाले आहे.सत्तेचा लाभ घेण्यासाठी कोण कधी एकत्र येतील हे समजणे कठीण आहे.मुंबईतील महानगरपालिका निवडणूक जगाचे लक्ष वेधून ठेवत आहे.कलानगरचे स्वयं घोषीत हिंदू हृदय सम्राट आणि राष्ट्रीय हिंदुत्ववादी मनुवादी होलसेल ठेकेदार यांची रेशमी धाग्याने मागासवर्गीय समाजाला बांधून ठेवनारी पंचवीस वर्षाची युती मराठी माणसाला दाखविण्या करीता तुटली असली तरी आतुन ती पूर्ण एकजीव आहे.हे मतदारांनी विसरू नये.बहुजनांच्या मागासवर्गीयांच्या बाजुने कधीच कौरव पांडव लढले नाही.ते फक्त त्यांच्या फायद्या करीता जनते समोर भांडण्याचे नाटक करतात.बाकी सर्व वाटून खातात.म्हणुन मागासवर्गीय मतदारांनी कौरव पांडवांची जात पाहून मतदान करावे.हे एकाच जातीचे आणि धर्माचे आहेत.ते हिंदू कधीच नव्हते.ते फक्त ब्राम्हण आहेत.आणि ब्रम्हणच राहतील.
राजकारणात जात धर्म नसते. विचारधारा असते.त्यानुसार समाजाच्या आर्थिक नाड्या हाती घेऊन समाजात जाऊन समाज प्रबोधन,जागृती करण्याचा पहिला नियम आहे.आपला वैचारिक शत्रु कोण?.शत्रूच माहित नसेल तर लढाई कोणा बरोबर लढणार?. काँग्रेस, भाजपा आणि कम्युनिस्ट कधीच वैचारिक शत्रु नव्हते आणि नाही.सर्व पक्षात वैचारिक वर्चस्व ब्राम्हणाच्या हाती राहून बहुजन मागासवर्गीय समाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम हे पक्ष संघटना करतात.काँग्रेस चा सर्वात मोठा नेता ब्रॉरिस्टर मोहनचंद करमचंद गांधी महात्मा झाल्यावर मारल्या गेला त्याला कोणा कोणाची साथ होती?.हे राम वाले आता खुलेआम नथुरामचा जयजयकार करतात.या मागील सत्य वैचारिक शक्ती कोणती ते समजून घ्या.ती जर नसती तर आज देशात मनुवादी हिंदुत्ववादी कौरव पांडवांची उत्पत्ती झालीच नसती.म्हणून या तिन्ही राष्ट्रीय पक्ष संघटनेचा वैचारिक पाया एकच आहे पण काम करण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे.हे महात्मा ज्योतीराव फुले आणि डॉ बाबासाहेबांनी वेळोवेळी सिद्ध करून दाखविले.म्हणून कोणत्या पक्षात संघटनेत आपला शत्रु आहे.हे या देशातील बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला समजत नाही.म्हणुन कामगार क्षेत्रातील बलाढ्य राष्ट्रीय संघटना,भांडवलदारांच्या विरोधी लढतांना दिसतात पण मनुवादी हिंदुत्ववादी
ब्राम्हणवादा विरोधात लढतांना दिसत नाही.महात्मा फुले आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते देशाचे दोनच शत्रू आहेत.एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही हे सर्वच क्षेत्रात हातात हात आणि गळ्यात गळा घालून काम करून सत्तेवर नियंत्रण ठेवतात.राज्य आणि केंद्रातील मंत्रीमंडळातील नांवावर काळजीपूर्वक नजर टाका व कोणत्या जातीचे वर्चस्व आहे ते पहा.म्हणजे कौरव पांडवांच्या सत्ता संघर्षात आपण बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कोण आहोत?.
बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय या तिन्ही पक्ष संघटनेत आहेत.कोणत्या जातीतील नेत्याचा व्यक्तिगत आर्थिक विकास होऊन कल्याण झाले.पण त्या त्या समाजाचे काय?.
त्याला तर हा नेता आणि त्यांचा पक्ष संघटना सतत वापर करून मूर्ख बनविते.
म्हणुन देशात सार्वजनिक उधोगधंद्याचे खासगीकरण औधोगिकरण, जागतिकीकरण मोठया प्रमाणत झाले आहे.कारण शोषण करणारे आणि शोषणकरू देणारे बहुसंख्य एकाच पक्षात आणि संघटनेत काम करतात.
सरकारची नीती,सत्ताधारी पक्षाची नीती आणि विरोधी पक्षाची नीती एकच आहे.बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय कामगार कर्मचारी यांनी सरकारची नीती आणि सत्ताधारी यांची मतदार म्हणुन शत्रुच्या विरोधात जनआंदोलन सोबत निवडणूकीत एकझुठ दाखविली असती.तर मनुवादी हिंदुत्ववादी शक्ती मोठया संख्येने निवडून आली नसती.मराठी माणसा च्या न्याय हक्क साठी लढणार शिवसेना आणि मराठी हृदय सम्राटानी मराठी माणसाच्या काम धंदा आणि नोकरी करीता काय केले?.मुंबईतील सर्व स्टेशन रोडसह रोडवरील जागा उत्तर भारतीयांना काम धंद्या करीता सात बारा कोणी दिला.मराठी माणसाला रेशनकार्ड,गुमस्ता,आदिवास दाखला सहज मिळत नाही.मग उत्तर भारतीय आणि इतर राज्यातील माणसानां ते सहज कसे मिळते?.त्यांना कोणतीच गोष्ट अशक्य नाही.कारण मुंबई महानगरपालिका फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करूनच कामकाज करते.त्यात मराठी माणुस कमी पडतो.गेल्या पन्नास वर्षा पासुन मराठी माणसाचे आणि भाषेचे ठेकेदार असली शिवसेना काम धंदा नोकरी देण्यास कमी पडली?. नाही त्यांनी गणपती,दहीहंडी आणि पायी पालकी पदयात्रा सारखे लक्षवेधी उत्सवी उधोगधंदे मराठी तरुणांना देण्यास प्रेरणादायी करून ठेवले.हेच तिचे जगाच्या औधोगिक आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची ओळख जागतिक पातळीवर नेली.हेच तिचे मराठी माणसा करीता ऐतिहासिक काम आहे.छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आराध्य दैवत असेल तर राष्ट्रमाता जिजाऊ च्या चरित्र हरण करणाऱ्यांना त्यांनी काय शिक्षा दिली हे मराठी माणूस म्हणुन प्रश्न विचारण्याचा हक्क मुंबईतील मतदाराला असला पाहिजे.कारण सत्ता केवळ लुटण्यासाठी नसते तर विकास आणि कल्याण करण्यासाठी असते.कौरव पांडवांच्या या सत्ता संघर्षात मराठी माणसाला मतदाराला काय मिळाले?.
डॉ बाबासाहेब आंबेडकर दोनवेळा लोकसभा निवडनूकीला उभे राहीले आणि दोन्हीही वेळा पराजित झाले. बाबू जगजिवनराम 8 वेळा लोकसभेला उभे राहीले आणि आठही वेळेस निवडून आले. इतकेच काय कायम केंद्रीय मंत्रीमंडळात राहिले.दोघेही मागासवर्गीय बहुजनांचे नेते पण आज आपण उपेक्षित ,वंचित भटक्या,आदिवासी,मागासवर्गीय बहुजनांचे प्रेरणा स्थान म्हणून बाबासाहेबांना मानतो. बाबु जगजिवनराम यांना नाही.आंबेडकरवाद लाचारी शिकवत नाही. म्हणून हारुनही बाबासाहेब घरा घरात विराजमान आहेत. बाबू जगजिवनरामांचा फोटो काँग्रेस कार्यालयात ही नाही. तर त्यांच्या किंवा इतर समाजाच्या घरात फोटो आणि कोणता ही विचार नाही.म्हणुन तुम्ही सत्तेपेक्षा जनतेशी नातं जोडले पाहीजे.विचारधारेशी प्रामाणिक असले पाहिजे.
महापुरुषांच्या क्रांतिकारी विचाराचे सैनिक झालेच नाही.जे स्वतःला वैचारिक सैनिक समजतात ते रक्षक नाही तर भक्षक झाले आहेत.क्रांतिकारी विचाराचे रक्षक लढून मरतील पण सिद्धांताची रक्षा करतील.समझोता तडजोड कधीच करणार नाहीत.म्हणजे जे समझोता तडजोड करतात ते महापुरुषाचे लायक औलाद नाही तर नालायक औलाद आहे हे सिद्ध होते.महापुरुषांच्या महात्मा क्रांतिकारी विचारांचे देशात कौरव पांडवांचा इतिहास जिवंत होतो.हाच मोठा पराभव आहे.
भारतीय लोकशाहीत भांडवलशाही ब्राम्हणशाही डोके वर काढते हे मतदारांना गुलाम बनविणारे तंत्र आहे.म्हणुन मतदारांनी कौरव पांडवांच्या लढाईत आपला खरा शत्रु कोण ?.हे प्रथम ओळखले पाहिजे.आणि मतदान केले पाहिजे.राणीच्या पोटी राजा जन्म येण्याचे दिवस संपले असले तरी नगरसेवक,आमदार,खासदार यांच्या पोटी किंवा त्यांच्याच घरातील माणसाचा पहिला हक्क त्यांच्या मतदारसंघात असेल तर तिथे पक्ष संघटना काम करीत नाही.तर घराणे काम करते तेच सर्व निर्णय घेत असेल निवडणूक कसा करता घेतात.कौरव पांडवालाच सत्ता देयाची असेल तर मतदारांनी जागृत होऊन मतदान करावे.आणि कौरव पांडवा दोन्ही आपले शत्रु आहेत.हे प्रथम लक्षात घेऊन मतदान करावे.तरच लोकशाही जिवंत राहील.
आपला
सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई,९९२०४०३८५९.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा