शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे?.
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,जे ते
पिईल
तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.असे डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते.ज्यादेशात
तथागत गौतम बुद्ध आहेत त्याच देशात विज्ञान आहे.जिथे विज्ञान आहे तिथे शिक्षण आहे.ज्यादेशात शिक्षण संस्था काढण्यापेक्षा देवाची भव्यदिव्य मंदिर निर्माण करण्यावर भर दिला जातो त्या देशात शिक्षणाला काय महत्व असणार?.हे भारतात दिसणारे हे सत्य आहे.त्यांचे वर्णन खालील प्रमाणे केले जाते.दहावी आणि बारावीचे
निकाल नुकतेच
जाहीर झालेत
.युवकांचा म्हणजेच विद्यार्थ्यांचा भविष्याची सुरवात येथूनच होते.म्हणुन
चांगल्या मार्कने पास झालेल्या पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्यांना टेक्नीकलमध्ये प्रवेश भेटतो व ते डॉक्टर किंवा इंजिनिअर होतात.केवळ मार्क भेटले म्हणजे डॉक्टर, इंजिनिअर होता येत नाही. त्यासाठी आईबापाची आर्थिक परिस्थिती मजबूत पाहिजे.किंवा मोठ्या माणसाचा आशीर्वाद पाहिजे, तरच ते यशस्वी होतात.मग भरमसाठ पैसा कमवितात.
पैसा कमविणे हाच त्यांचा उद्धेश असतो.त्याकरिता ते कोणत्याही थराला जाऊ शकतात.
दहावी आणि बारावी
त
चांगले मार्कने पास झालेला पण दुसरा नंबरने पास झालेला विद्यार्थी यु पी एस सी,एम पी एस सी (UPSC,MPSC) परीक्षा देणार व सरकार मध्ये प्रशासकीय अधिकारी (Administrator) बनतात आणि वरच्या डॉक्टर, इंजिनिअर, वकील, प्राध्यापक,शिक्षक यांच्यावर नियंत्रण ठेवतात
.
दहावी आणि बारावी
त
.काठावर पास होणारे विद्यार्थी म्हणजे तिसऱ्या नंबरचे विद्यार्थी आर्ट म्हणजे कला क्षेत्रात जातात.सुरवात पासुनच त्यांच्या आंगी खुप कला कौशल्य असते.
त्यामुळे त्यांना कुठेच प्रवेश भेटत नाही म्हणून नगरातील भांडणात भाग घेतात,भांडणे कसा मुळे होतात?. नळाच्या पाण्यामुळे, गटार तुंबल्यामुळे, साचलेल्या कचऱ्यामुळे मग हे भांडण जागेवर मिटविण्यास पुढाकार घेणारे किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर पुढाकार घेतल्यास आपोआप कार्यकर्ते समाजसेवक बनतात. राजकीय पक्षाचे दरवाजे आपोआप उघडली जातात,मग राजकारणात गेल्यामुळे वरील दोघांवर नियंत्रण ठेवतात. काही विद्यार्थी अभ्यासात कमजोर असतात,पण तोडफोड,मारामारी करण्यात पटाईत असतात. त्यामुळे नापास झालेले शाळेतून बेदखल झालेले असतात. पण त्यांच्या नावांची चर्चा दादागिरी,गुंडगिरी करणाऱ्या भाई लोकात आपोआप होते.मग ते अंडरवल्डमध्ये खेचले जातात आणि वरील तिन्ही वर्गाच्या लोकांना नियंत्रित करतात.आणि ज्यांनी कधी शाळेचं तोंड पण पाहिलेलं नसतं ते मुले लग्न झाल्यावर अपयशी झाल्यावर स्वामी,साधू,बाबा बनतात.आणि वरील चारी वर्गाचे लोक त्याच्या पाया पडतात.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत मुली मोठ्या संख्येने पास होतात.ही अज्ञानावर विज्ञानाने केली प्रगती आहे.ही आनंदाची बाब असली तरी यातील किती टक्के मुली दहावीनंतर अकरावीला आणि बारावीनंतर एफ. वाय. ला प्रवेश घेतात हे वास्तव तपासण्याची गरज आहे.मुलींना पदवीपर्यंतचे शिक्षण सरकार मोफत देते असे म्हणतात, म्हणजे फक्त शैक्षणिक शुल्क (Tution Fee) माफ असाच अर्थ आहे ना?. आणि सध्या शिक्षणाच्या एकुण खर्चात शैक्षणिक शुल्काचे (tution fee) प्रमाण अत्यल्प असते आणि इतर खर्च भरमसाठ असतात जे माफ नसतात. एकुणच शिक्षण मोफतचा हाच अर्थ इतर ठिकाणी ही आहे. मुलींची सुरक्षा हा ग्रामीण भागातील पालकांच्या मनातील महत्वाचा मुद्दा असतो. महिला अत्याचाराची एक घटना मागे राहिलेल्या हजारजणींच्या मनमोकळ्या सार्वजनिक वावरावर
जगण्यावर
बंधने आणते. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मुलींसाठी सुरक्षित वसतीगृह जर उपलब्ध झाले तर अनेक पालक आपल्या मुलींना घरी बसवणार नाहीत. शिक्षणावरील सरकारी खर्च वाढला पाहिजे तो यासाठी.पण शिक्षणाचा कोणताही सबंध नसलेली देवी सरस्वती प्रत्येक शाळा,कॉलेजमध्ये विराजमान आहे.ती या मुलीचे रक्षण करण्यास असमर्थ आहे.तरी
शिक्षण संस्था,शिक्षक
तिचाच उदोउदो
करतात.
.
दहावी बारावीनंतर घरी बसणाऱ्या मुली नेमक्या कुठल्या समाज घटकातील असतात हे वास्तव तपासले तर कुणालाही भारतीय समाजव्यवस्थेतील आणखी एका विषमतेचे म्हणजेच जातीच्या प्रश्नाचे गांभीर्य समजु शकेल. दहावीपर्यंत च्या प्रवासातही गळणाऱ्या अनेक मुली हया मागासवर्गीय बहुजन जातीजमातीतीलच असतात. त्याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही.खेड्या पाड्यातील सोडा शहरातील झोपडपट्टीतील दहावी ,बारावी शिकणाऱ्या मुलीचे प्रमाण पाहिल्यास जन्मजात उच्चनिचतेचे तत्वज्ञान अजुनही आपल्या समाजात कसे जिवंत काम करते ते स्पष्ट दिसेल.फक्त त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट असला पाहिजे.
देशात राज्यात महिलांना सरस्वती,शारदा,लक्ष्मी मंदिरात पूजा,अर्चा उपास व्रत यातच गुंतवून ठेवण्याचे काम चॅनेल मीडिया प्रिंट मीडिया करीत असतांना. "सावित्रीच्या लेकींची लढाई, तीन पावले पुढे आणि दोन पावले मागे" अशीच देशभर सुरू आहे. मुलींना जे काही मिळते ते घ्यावे आणि उरलेल्यासाठी लढाव लागेल!. सावित्रीबाई फुले आणि फातिमा शेख यांनी सुरु केलेली स्त्री शिक्षणाची सन्मानाची लढाई पुढे गेलीच पाहिजे. आणि ती पुढे जाईलच.
नुकतेच दहावी आणि बारावी
त
वर्षभर मेहनत घेऊन परीक्षा दिल्यानंतर अनेकांना यात यश तर अनेकांना अपयश
आले
.
काहीना
अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळालेले
.
त्यामुळे
मित्र-मैत्रिण
खूप आनंदा
असतात
.
तर
काही
अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळालेले
.
त्यामुळे
हिरमुसलेले असतात.अनेक पालक तर पास झाल्याचा आनंद मानण्याऐवजी मुलाला कमी गुण मिळाल्याचा राग काढतात. परिणामी मुलांमध्ये नैराश्य येतं. केवळ दहावी आणि बारावी म्हणजे सर्व काही नाही, हे लक्षात घ्या. त्यानंतरही करिअरच्या विविध मोठ्या संधी उपलब्ध असतात. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पुढील गोष्टींचा विचार केला तर तुमचं नैराश्य नक्कीच दूर होईल व तुम्ही नवीन उत्साहाने करिअरसाठी पुन्हा सज्ज व्हाल.आपल्या मुलांना शाळेत पाच दहा टक्के मार्क्स कमी मिळाले तरी चालतील पण त्यांना पोहणे,सायकलींग,जुडो ,कराटे
,क्रिकेट,
कबड्डी
,
फुटबँल
,
खो-खो
खेळण्यात तरबेज करा.त्यांच्या अंगीकृत कलागुणाला प्राधान्य द्या.शिक्षणा बरोबर वृतपत्र
वाचन,समाजात
,
नातेवाईकां
मध्ये मिसळून वागणे सुखादुखाशी समरस होण्यासाठी मनाची तयारी असणे खूप महत्वाचे आहे.
मुलांना फक्त मार्कवंत नका बनवू गुणवंत बनवा
.
जीवनाचा आनंद तुम्हीही घ्या आणि त्यांनाही आनंद घ्यायला शिकवा.
आजचे राज्यकर्ते किती प्रामाणिक आणि सुशिक्षित आहेत.ते डोळ्यासमोरून घाला.
त्याच पद्धतीने दरोडेखोर आणि व्यापारी डॉक्टर यातील गुणवंतात्मक तुलना करा.देशातील सर्व भ्रष्टाचारांची प्रकरण पहा कोणी केले?.उच्च शिक्षित कि कमी शिकलेल्या लोकांनी?. शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे पण कोणते शिक्षण ?.समाजहित,देशहित,सर्वधर्मसमभा व,समता,स्वत्रंता
,स्वाभिमानी
,बंधुभाव ज्या शिक्षणात नसेल तर ते शिक्षण काय कामाचे ???.
सागर रामभाऊ तायडे,भांडूप,मुंबई.९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा