असंघटीत मुंबईकरांची संकटावर संघटित पणे मात
भारताची औधोगिक राजधानी मुंबई विविध जाती धर्माच्या आणि उद्योग धंद्याने नटलेली सजलेली आहे,आणि ही विविध क्षेत्रातील असंघटीत कष्टकरी कामगार,मजुरांच्या हातावरच चालते,बोलते आणि धावते!.
मुंबईवर अनेकदा अनेक संकट आली, पण ती कोणासाठी कधीच थांबली नाही.मुंबईत जो तो आपली ठरलेली कामे ठरलेल्या वेळात करण्याचा प्रत्यन करत असतोच रेल्वे लोकल बंद आहे किंवा बेस्टची बस बंद आहे म्हणुन हातावर हात बांधून बसत नाही.मुंबई एकदा नाही अनेकदा वेगवेगळ्या भागात तुंबली म्हणुन पूर्ण मुंबई तुंबली असे नाही झाले.तिची सोडवणूक करण्यासाठी कोण पुढे येतात?.महानगरपालिका कर्मचारी त्यात कायमस्वरूपी नोकरी करणारे किती आणि ठेकेदाराकडे काम करणारे असंघटीत कामगार किती यांची नोंद कधी कोणी चॅनल,प्रिंट मीडियाने घेतली?.मुंबईतील गटारे तुंबल्यावर ती साफ करणारे मजूर कामगार कोण असतात.काही ठिकाणी मशीन ने गटारी साफ केल्या जातात.पण पूर्ण गाळ,घाण कचरा निघतो का?.बिल मात्र पूर्ण पणे मंजूर होते.अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच के ई एम हॉस्पिटलमध्ये पावसाचं पाणी घुसलंय असे सांगितल्या जाते.पण पाणी का तुंबले हे सांगितल्या जात नाही.कारण मुंबईत ब्रिटिशकालीन सांडपाण्याची जी व्यवस्था होती.ती आज ही त्याच अवस्थेत आहे.त्यात मोठं मोठी टॉवर उभी केल्या गेलीत पण त्यांचे मल निसरण आणि सांडपाणी कसे विसर्जित केल्या जाईल यांची व्यवस्था कागदावर आहे पण प्रत्येक्षात नाही.गगनचुंबी इमारत बांधताना सांडपाण्याची व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्याचा आर्थिक लाभ सर्वच पालिका कर्मचारी, अधिकारी आणि राजकीय सत्ताधारी यांनी घेतला आहे.आणि घेत राहतील कारण मुंबई हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी सर्वान साठी आहे.
मुंबई नेहमी वेगवेगळ्या नांवाने कामाने ओळखल्या जाते. पावसाने एका झटक्यात सगळ्यांना 'मुंबईकर' बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही.भिजणारी माणसच, मदत मागणारी माणसच आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसच. कोणी संघटीत आणि कोणी असंघटीत नाही.
गेल्या दोन दिवसांचा पाऊस हा २६ जुलै २००५ ची आठवण करून देणारा होता.मात्र मुंबईकरांना अनेक संकटाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे काल लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसले नाही. जे २६ जुलै २००५ मध्ये दिसले होते.पाऊसामुळे मुंबईतील लोकांचे बेहाल झाले. त्याच्या अडचणीना मात्र सीमा नव्हती. पण असल्या संकटांना स्वताच्या व नागरीकांच्या विश्वासावर मात करण्याचा आत्मविश्वास प्रत्येक मुंबईकरात होता.
२६ जुलै २००५ पावसात मी कुर्ला ते भांडुप असा प्रवास रेल्वे च्या लाईन मधुन केला होता.तेव्हा माझा एक मित्र बहिरे सोबत होता त्याला म्हटले माझा मागे ये ते त्याने ऐकले नाही आणि लाईन सोडून गटार ओलांडून जाण्यासाठी पाय टाकला तसा तो कंबर एवढ्या पाण्यात पडला आम्ही सावध होतो म्हणुन त्याला ताबडतोब काढले त्यांची आठवण तो नेहमी सर्वाना सांगतो मी सागर मुळे पडलो आणि सागर मुळेच वाचलो नाहीतर गटार मध्ये वाहून गेलो असतो.रेल्वे लाईन मध्ये लोक जात होती कोणी येत होती,सर्व चालत रेल्वे स्टेशन पार करीत होती..त्यावेळी पाण्यातुन जाणारे लोक एकमेकांना सहारा देऊन मानवी साखळीच तयार केली होती.ती साखळीच धीर देणारी होती.रत्यावर चालणारे ट्राफीक मध्ये अडकलेले सर्वच भेदरले होते तरीही ते एकमेकांचा आत्मविश्वास वाढविणारी साथ देत होती.मुंबईत अनेक ठिकाणी सखोल भाग असल्यामुळे तिथे जास्त पाणी सांचले होते.
२६ जुलै मुसळधार पाऊस आणि समुद्रराला भरती हे एकच वेळी झाल्याने हे सार काही तासात अचानक झाल्यामुळे सरकार व महानगर पालिकेच अस्तित्व त्यावेळी कुठेही जाणवले नव्हते. जाणवत होती ती नागरीकांची जिवंत धडपड.जी आताही कालच्या पाऊसात जाणवली.पण प्रश्न पडतो या अशा संकटातुन आपण कीती व काय शिकतो?. सरकार आणि महानगरपालिका प्रशासन अधिकारी या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणत्याही योजना आखत नाही,उलट असा प्रसंगी तातडीची सेवा देण्याच्या नांवाखाली ठेकेदारांची असंघटीत मजूर कामगार लावुन कसा मलिदा खाता येईल यांचे नियोजन मात्र व्यवस्थीत करून ठेवतात.संकटात धाऊन जाणारे गटप्रमुख,शाखा प्रमुख,विभागप्रमुख आणि बाळ सैनिक आता नगरसेवक, आमदार, खासदार सत्ताधारी झाल्यावर मराठी माणसाच्या आणि मुंबईकारांच्या मदतीला धावतांना कुठेच दिसले नाही.मात्र असंघटीत मुंबईकरांनी संकटावर संघटित पणे मात केली.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा