रामराज्याची सुरवात झाली!.
रामराज्यात शूद्र अतीशुद्रानां,महिलांना शिक्षण घेण्याचा ,ज्ञान व धन,संपत्ती संचय करण्याची बंदी होती.त्यामुळेच शंभूक मारल्या गेला,कारण त्याने शिक्षण व ज्ञान घेतल्यामुळे ब्राह्मणाचा मुलगा मेला होता.म्हणूनच मागासवर्गीय समाजाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता. भारत स्वतंत्र होऊन ७२ वर्ष होत आहेत तरी ग्रामीण भागातील मागासवर्गीय समाजाला स्वतंत्र पणे जगण्यास मनाई केली जाते.सुवर्ण समाजाने त्यांच्या शेतात काम करण्यास सांगितले असता मागासवर्गीय समाजाच्या तरुणाने विरोध केल्यामुळे आठ दहा सुवर्ण तरुणांनी त्याला केवळ मारहाण केली नाही तर त्यांचे हात पाय मोडून काढले व त्यांची मोबाईल वर शूटिंग करून सोशल मीडियावर शेयर करण्याचे धाडस केले. गुजरात मध्ये एक मागासवर्गीय समाजाच्या तरुणांनी मोलमजुरी करून घोडी विकत घेतली आणि त्यावर तो बसुन गावांत जात होता ते गांवातील सुवर्ण समाजाला सहन झाले नाही त्यांनी त्याला घोडी सह मारून टाकल्याची बातमी सोशल मीडियावर देशभरात फिरत आहे,एकूण देशभरातील मागासवर्गीय समाजावर होणारे अन्याय,अत्याचार हल्ले व हत्याकांड त्यांची कायदेशीर नोंद घेऊन गुन्हे दाखल करणारा
ऑट्रोसिटी कायदाच रद्द करण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला म्हणजेच भारतीय संविधाना नुसार मागासवर्गीय समाजाची कवचकुंडले काढून घेतल्या गेली. त्यामुळे येत्या काळात राम राज्यात जे घडत होते तेच आता घडत आहे म्हणजेच रामराज्याची सुरुवात झाली!.
जगात भारत एकमेव असा देश आहे,जिथे जीवंत माणसा पेक्षा मेलेल्या माणसा वर जास्त प्रेम केल्या जाते.जिवंत पणी त्यांचे सन्मान पूर्वक आदर तिथ करण्यास वेळ नसतो,पण जेव्हा ती व्यक्ति मृत्यु पावते. त्यानंतर भटा ब्राम्हणाच्या सांगण्या वरील त्यांची खुप भक्तिभावाने फोटो लावून सेवा केली जाते,त्याच पद्धतीने या देशातील नागरिकाचे आहे, रामायण आणि महाभारत हे दोन महान कथानक, या दोन महानाट्यतील पात्र दर पांच वर्षांनी बदलत असतात. रामराज्य येणार आणि कंसराजा बनणार असे जनतेला आश्वासन दिल्या जाते.पण रामाने कधीच राज्य केले नाही. कंसाने भिती पोटी बहिण रुखमणी सह राज्यातील कोणत्याही समाजातील जन्म झालेल्या मुलाला जिवंत ठेवले नाही. त्यानुसारच या देशाची जनता ही दर पांच वर्षांनी आपली भूमिका बदलत असते. राजकारणी लोक पक्ष बदलला कि विचारधारा बदलतात. पण व्यवहार आणि व्यवसाय बदलत नाही.देशात साठ वर्ष काँग्रेसने राज्य केले.तेव्हा विरोधी पक्ष कशी भूमिका घेऊन जनतेला सरकार विरोधात उतरविण्याचे काम करीत होती. पण त्यांच्या जनांदोलनात पाहिजे तो दम नव्हता.जनता जास्त मनावर घेत नव्हती तेव्हा त्यांनी रामायणातील राम बाहेर काढला आणि महाभारत घडविले.त्याला थोडे यश प्राप्त झाले.२ चे ८९, ८९चे १२०,१२० चे .१४५ याघडीला १४५चे ३२० खासदार रामायण महाभारता घडविल्यामुळे आले आहेत.ते धर्म,अधर्माच्या लढाईतील कृष्णलीला भागवत गीता नुसार निर्णय घेतात.काळा धन,भ्रष्टाचार, दहशतवादी संपविण्या करीता त्यांनी पांचशे,हजारच्या नोटबंद करून जनतेला रामायण महाभारताची आठवण करून दिली.गेल्या काही दिवसात ती सोशल मिडिया वर फिरत आहे.प्रत्येक घराघरात माणसाला पैसे काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले.आपलेच स्वकष्टाचे पैसे काढताना खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा राजकीय लोकांनी रांगेचा फायदा ही प्रसिद्ध महाभारता नुसार घेतला.त्यांचे ते अनुभव बेशरम पणे जनतेला कोणी किती आणि कसे पैसे काढले ते सांगतात गांधारी मी माझ्या शंभर कौरवांना ATM च्या रांगेत उभे करून प्रत्येकी "दोन हजार प्रमाणे" एकुण दोन लाख रुपये काढले. "कुंती" अगं हे तर काहीच नाही. माझ्या पांडवांनी तर द्रौपदी बरोबर लग्न दाखवून एका लग्नाला "अडीच लाख" या प्रमाणे एकुण "साडे बारा लाख" काढले...आहेस कुठे?. हे आहे महाभारत.आज प्रत्येक भारतीय यांचाच नक्की विचार करीत असेल की आपलेच पैसे कसे काढावे.हेच का ते रामराज्य.
महाभारतात हजारो निरपराध बालकाचा बळी घेणारा कंस आणि गोद्रा हत्याकांडा सह संपूर्ण गुजरात राज्यात निरपराध लोकांचा बळी घेऊन देशाच्या प्रधान सेवक झालेला नरेंद्र मोदी यांची तुलना होऊ शकते काय?. महाभारत घडवून सत्ता परिवर्तन झाले.रामाने कधी राज्य केले नाही तरी राम वनवासातून आल्यावर राम राज्य येईल त्यावेळेस जनतेला वाटत होते तसेच भारतीय नागरिकांना काँग्रेसचे राज्य गेल्या अच्छे दिन येतील या आशा होत्या त्या किती पूर्ण झाल्या यांचा वाचकांनी विचार करावा.
धर्म अधर्माच्या लढाईत मनुवादी भाजपा नेहमी दुतोंडी असते.सत्तेवर नसतांना गोवंश हत्याला कडाडून विरोध करत होती.पण सत्तेवर आल्यावर भारत देश जगातील इतर देशा पेक्षा बीफ एक्सपोर्ट करणारा नंबर एकचा देश कसा काय झाला?. पाकिस्तान जेव्हा जेव्हा भारताच्या सीमेवरील जवानावर हल्ले करीत होते, तेव्हा तेव्हा सत्ताधारी लोकांचा डरपोक म्हणुन उल्लेख करीत होते. आमच्या हाती सत्ता द्या एका तासात पाकिस्तान जगाच्या नकाशा वरून नष्ट करू असे ५६ इंच छाती फुगवुन सांगत होते.आता सत्ता धारी होऊन किती दिवस झाले.?.काय घडले रामायण आठवत नाही.विदेशात जेव्हा सर्व देशाचे पंतप्रधान एकमेकांना भेटून मनमोहन सिंह आणि नवाज शरीफ हात मिळवीत होते.तेव्हा ते नालायक होते.मोदी जेव्हा नवाज शरीफच्या जन्म दिनाचा केक,बिर्याणी खाण्यासाठी न बोलविता पाहुणे म्हणुन जातात ते कोणत्या धर्मात बसते?. हे रामायण आहे की महाभारतात ?.
भारतात सर्वात मोठी सार्वजनिक सेवा म्हणजे भारतीय रेल्वे सेवा,२००४ ते २०१४.रेल्वे भाडे केवळ एक रुपया वाढले तर देशभरात भाजपाने चक्क जाम करून दाखविला.आता सत्तेवर आल्यावर चार वर्षात सत्तर टक्के रेल्वे भाडे वाढविल्याचे बोलले जाते.हे माहित असूनही जनता आंधळी आणि सरकार बहिरे झाले आहे.दोघाची तोंड बंद आहेत.भाजपा विरोधी पक्षात एफ डी आय,जी एस टी, आधार कार्ड,मनरेगा,कोयला खान लिलाव सारख्या अनेक योजनेला प्रचंड विरोध करून जन आंदोलन करीत होती.आता मात्र त्याचं योजन किती महत्वपूर्ण आहेत यांचे गुणगान करीत आहेत.हेच काय ते एकवचनी राम भक्त ?.
दिल्लीच्या निर्भया नांवाच्या एका ब्राम्हण मुलीवर बलात्कार झाला म्हणुन देशभरात तीन महिने जन आंदोलन करीत होती.आता भाजपा प्रणित राज्य सरकारच्या मध्ये प्रदेशात दररोज बारा आणि दिल्ली नऊ बलात्कार होत असतांना देशभक्त रामभक्त डोळे,कान आणि तोंड बंद करून शांत बसले आहेत. हेच का कृष्णाची पवित्र भागवत गिता आदर्श मानणारी भाजपा.
अंतर राष्ट्रीय बाजार भावाने सर्वच देशाला पेट्रोल कच्चा तेल प्रति बैरल भावाने विकले जाते.काँग्रेस सरकारच्या मनमोहन सिंह यांनी १२५ ते १४० डालर प्रति बैरल तेल खरीदी करून देशात ७० ते ७५ रुपये लिटर पेट्रोल विकल्या जात होते ते आजच्या सत्ताधाऱ्यांनी बैलगाडी मोर्चा कडून विरोध केला होता. आताचे सरकार ४० ते ५० डालर प्रति बैरल कच्चे तेल खरीदी करून देशात ७० रुपये प्रती लिटर पेट्रोल विकल्या जात आहे.या मुळे अंतर राष्ट्रीय पातळीवर सरकार कोणत्या विचारांचे आहे ते त्यांच्या देशातील जनतेशी किती प्रामाणिक आहे.यांची नोंद जागतिक पातळीवर जरूर घेतल्या जात असेल.तेव्हा विदेशी पत्रकार ,साहित्यिक अभ्यासक यह राम कोण था?.और रामराज्य क्या है?..क्या इसी तरहा देशवाशी के साथ व्यवहार चालता था!
मनुवादी विचारांच्या भाजपा प्रणित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कोणता ही घोटाळा केल्यास जनतेने त्याला माफ करावे. म्हणजे शिवराज सिहं चा व्यापम व खान घोटाळा, वसुंधरा राजेंचा ललित मोदी घोटाळा, रमण सिंह यांचा पस्तीस हजार करोड़चा अन्न वितरण घोटाला झाला तरी त्यांच्या कडून कोणी राजीनामा मांगीतला नाही. काँग्रेस मधील कोणी ही घोटाळा केल्यास दुसऱ्या दिवसा पासुन राजीनामा मांगण्याची मोहीम चालविल्या जात होती.हाच फरक राम राज्यात होता काय?.रामायण महाभारताचा कोणता आदर्श आज भारतीयांना घेतला आहे.तरुणांना नोकरी देणार,धनगर, मराठा समाजाला आरक्षण देणार,शेतकऱ्यांना हमीभाव देणार हे सांगुण केंद्र व राज्य सरकारने रामराज्याची सुरुवात झाली केली आहे.

सागर रामभाऊ तायडे.भांडूप,मुंबई-९९२०४०३८५९.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा