शुक्रवार, १३ एप्रिल, २०१८

रिपब्लिकन ​पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.

रिपब्लिकन ​पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ?.
आजच्या तरुणांना रिपब्लिकन पक्ष कोणाचा आहे असे विचारले तर काय उत्तर मिळेल?.ते ऐकण्याची तयारी कोणाचीच नसणार, कारण त्यांच्या आजू बाजूच्या नगरातील विभागातील कार्यकर्ते नेते दररोज सकाळी कुठे भेटतात आणि संध्याकाळी काय करतात. त्यांचे उधोगधंदे व उत्पन्नाची साधन व मार्ग कोणते यांची पूर्ण कल्पना विभागातील समाजाच्या लोकांना असते.त्यांनी जर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी तत्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न केला तर लोक त्यांच्या कडे तिरक्या नजरेने पाहतात.कारण क्रांतिकारी विचाराचे आचार कुठेच दिसत नाही.दलाली,गुलामगिरी आणि लाचारी नसानसात भरलेली माणस जेव्हा स्वाभिमानाची गोष्ट करतात तेव्हा जवळची लोकच त्यांच्या कडे संशयाने पाहतात.ते तसे जगण्यासाठीच एकाच नगरात एकाच गटाशी प्रामाणिक राहत नाही,तथागत बुद्ध वाचनालय काढतील पण त्यावर बुद्ध आंबेडकर यांच्या फोटो पेक्षा राष्ट्रवादी नेत्याच्या भाऊ,वहिनी,आईचा फोटो किती महत्त्वाचा आहे हे नगरातील विभागातील लोकांना दाखवुन देतील त्याला स्वाभिमानी,आंबेडकरी विचारांचे माणस विरोध करण्याचे धाडस कधीच करणार नाहीत. मागे जरूर बोलतील पण समोर नाही.मूर्ख आहे तो त्यांच्या कशाला नादी लागावे असे म्हणूनच त्याला सोडून देतील.पुढे जयंतीला,वर्षावास समारोप, महापरिनिर्वाण दिनाला भोजन दान व बॅनर त्यांच्या कडुन मात्र न चुकता घेतील.त्यामुळे नगरात विभागात रिपब्लिकन कार्यकर्ता नेता जातीने व कार्याने ओळखला जातो.आज माझी मुले विचारतात रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट काय होते ?.ते कुठे दिसते काय ? प्रत्येक नेत्याचे समाजा बाबत काय मत आहे हे जर ऐकले तर लढावे की रडावे हाच प्रश्न पडतो.क्रांतिकारी विचाराचा शब्द रिपब्लिकन आणि बहुसंख्येने असलेला समाज म्हणजे हत्ती सारखी शक्ती तीच आपली निशाणी.कुठे आहे?.
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत नाव रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असे आहे. भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील शोषित पिडीत आदिवाशी मागासवर्गीय समाजाचा म्हणजे बहुजन समाजाचा रिपाई म्हणूनच ओळखला जातो.तसा भारतातील सर्वात मोठी संख्या असणारया समाजाचा हा राजकीय पक्ष आहे. डॉ.भिमराव आंबेडकरांनी सुरू केलेल्या शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून हा पक्ष उदयास आला.या पक्षाचे मुख्य बलस्थान महाराष्ट्र होते.शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशन या सामाजिक संघटनेने राजकारणात उतरून  निवडणुकीत भाग घेतल्यामुळे अनेक समाजाचे समीकरण बदललेले होते. त्याचमुळे त्याची राजकीय पक्षात गणती होत होती.आज तो सत्ता मिळवुन देणारा समाज म्हणूनच ओळखला जातो.
शेडूयूल्ड कास्टस फेडरेशन या सामाजिक संघटनेतून राजकीय पक्ष. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ही संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची होती.त्याच्या महापरीनिर्वाणा नंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या निष्टावंत अनुयायांनी रिपाईची स्थापन केली.पण सुरवात पासूनच या पक्षाचा संपूर्ण इतिहासच अहंकाराचा आणि फाटाफुटींनी भरलेला आहे. तेव्हा पासून आज पर्यंत दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असे या ऐतिहासिक रिपाई प्रक्रियेचे एकूणच वर्णन करता येईल.  त्यामुळेच रिपब्लिकन पक्ष त्यांच्या अंतिम उद्धिष्ठा पर्यंत पोचला नाही.भारताला आणि भारतीयांना कठीनातील कठीण प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी त्यांनी लोकशाही दिली.संविधानाची योग्य अमंलबजावणी केली तर कोणत्याही समस्या सुटू शकते.पण रिपाई ने त्याला महत्व न देता स्वार्थ व अहंकार या शब्दाला यांनी खूप महत्व दिले आहे.म्हणून आज ही यांची संपूर्ण इमारत त्यावरच उभी आहे.बाबासाहेबांनी १४ ऑक्टोबर १९५६ बौद्ध धम्माची दिक्षा देताना त्यात त्यांनी त्रिसरण,पंचशील,आणि बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या हे सर्वच कार्यकर्ते नेते विसरले आहेत म्हणून रिपाई किंवा इतर समाजिक,धार्मिक संघटना नेहमी अहंकारा पायी फुटतात असे म्हटले तर चूक ठरणार नाही.त्यांनी संविधान मान्य केले असते तर आज रिपब्लिकन समाज रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ठ गाठण्याच्या स्पर्धेत असता.  
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पक्ष म्हणून ओळखणारा रिपाई पहिल्यांदा फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्ष स्थापने नंतर एक वर्षांच्या आतच. तेव्हा ही नेतृत्व कुणी करायचे, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे -गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले.म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्या कडेच गेले.पुढे आर डी भंडारे आणि रुपवते कॉंग्रेसवासी झाले. त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचे रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातले गांभीर्यच नष्ट झाले आहे.आता पर्यंत या पक्षाची ५० हून अधिक छकले झाली आहेत, आणि अशा प्रत्येक छकलाचा एक स्वतंत्र राजकीय पक्ष झाला.रिपाई नांवा शिवाय हे स्वताचे अस्तित्व दाखऊ शकत नाही.
आंबेडकर अनुयायाची आत्मपरीक्षण करण्याची तयारी नसल्या मुळे मी बरोबर बाकी सर्व चूक हे सिद्ध करण्यात या नेत्यांनी आपली "व्यापक रिपब्लिकन पक्ष अस्तित्वात येउच शकत नाही ?" अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंबेडकरी चळवळ संपली आहे  पुस्तकरुपी निष्कर्षा नंतर त्यांनी आंबेडकरी चळवळीचे काम सोडून दिले आणि डाव्या विचाराच्या विविध गटांना जवळ करून नक्षलवादी विचाराच्या तरुणाना जाहीर पाठिंबा दिला त्यातूनच महाराष्ट्र लोकशाही आघाडी निर्माण झाली
.प्रा.जोगेंद्र कवाडें सारखा प्रामाणिक नेता खासदाराचे मागच्या दराने आमदार झाले.आणि रिपाई मधील उरला सुरला प्रामाणिकपणा संपवला.रिपब्लिकन चळवळ नावापुरती शिल्लक राहली असा धोक्याचा गंभीर इशारा देणाऱ्या बाळासाहेबांनी आंबेडकरी चळवळीच्या वाताहताची शोधून काढलेली कारणे आणि मांडलेले निष्कर्ष पाहता त्यावर सविस्तर चर्चा खूप झाली.पण ते केवळ कार्यकर्त्याच्या लेवलवर ती बुद्धीजीवी वर्गाच्या पातळीवर झाली असती तर समाजाला नेमखी दिशा देता आली असती.परंतु बहुसंख्य बुद्धीजीवी भिती पोटी सत्य मांडण्याचे धाडस करीत नाही. अनेकांनी आंबेडकरी चळवळ संपली नसल्याचे दावे केले, पण तिच्या जीवंतपणाची लक्षणे कोणती ह्याबाबत ठामपणे स्पष्टीकरण दिले नाही.आज आंबेडकरी चळवळीचे बालेकिल्ले संपूर्णपणे उध्स्त झालेले (वैचरिक पातळीवर) स्पष्ट दिसतात.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल एक पत्र १ ऑक्टोबर १९५७ रोजी 'प्रबुध्द भारत' मध्ये भारतीय जनतेला उद्देशून प्रसिद्ध झाले होते. हे पत्रच रिपब्लिकन पक्षाची घटना मानली जावी असा सर्व नेत्याचा आग्रह होता. त्यात न्याय, समता, स्वातंत्र्य आणि बंधुता हि पक्षाची ध्येय असतील, पक्षाच स्वरुप प्रादेशिक न राहता ते देशव्यापी असेल असे स्पष्ट करुन, आपल्या अनुयायांना बाबासाहेब सांगतात, 'हा पक्ष देशातील सर्व कष्टकरी मागासवर्गीय समाजातील शोषित,वंचित ,पिडीत जनतेच्या हिताचा रक्षणकर्ता असेल.अनुसूचित जाती-जमाती, बौद्ध आणि मागासवर्गीय लोकांच्या हितासाठी प्रयत्न करण्याची बांधिलकी स्विकारलेला असेल. शासनकर्ती जमात बनतांना जो पक्ष आपल कल्याण करील, त्यांच्याशी हातमिळवणी करावी. दुस-या पक्षाशी सहकार्य करतांना आपला पक्षाच्या तत्वज्ञान, ध्येय आणि उदिष्ट यांना धक्का लागणार नाही याची काळजी घ्यावी. नेता एकच असावा आणि पक्षही एकच असावा. पक्षाच चिन्ह हत्ती हे बुद्ध संस्कृती मधिल प्रतिक तर, अशोक चक्रांकित निळा झेंडा हे निशाण असे बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या पक्षाबद्दलचे मत स्पष्टपणे मांडलेले होते.हा इतिहास आजचा तरुण वाचायला तयार नाही.म्हणून तो इतिहास वाचून इतिहास घडविण्यास तयार नाही.तो दिशाहीन झाला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर ३ ऑक्टोबर १९५७ साली बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची नागपूर दिक्षा भूमीवर स्थापना झाली होती. त्यानंतरच्या सार्वत्रिक निवडणूकात पक्षाने दैदिप्यमान, नेत्रदिपक यश संपादन केले होते. त्यावेळी त्याची राजकीय शक्ती प्रभावशाली आणि सर्व समाजाचे लक्षवेधनारी होती, त्यात सतर टक्के असंघटीत कष्टकरी मजूर, शेतमजूर, कामगार होता.त्यांचा नेत्यावर विश्वास होता.पण त्यानंतरच्या काळात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचाराचा नेत्यांना विसर पडला आणि युती आघाडी वर भर देण्यात आला.त्या काळी एका मान्यताप्राप्त नेत्याचा एक मंत्र होता गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाही तर मोडून खाल्ली.बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली पोलादी, प्रभावशाली, बलाढ्य एकसंघ असलेली संघटना, रिपब्लिकन पक्षाची चळवळ सामाजिक, राजकीयदृष्ट्या सक्षम नेतृत्वा अभावी, मतभेद,अहंकार, स्वार्थी राजकीय महत्त्वकांक्षापोटी फुटत गेली. इतर राजकीय पक्षांशी तडजोड करीत.प्रत्येक गटाचे नेतृत्व बेफिकीर, दिशाहीन बनत गेले. गटा तटाच्या निच राजकारणामुळे आपल्या समाजातील अनेक लोक इतर राजकीय पक्षात कार्यरत होत गेले.या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवणारा फार मोठा बुद्धिजीवी वर्ग अलिप्त राहिला.आज आमचे काही दैनिक आहेत पण त्या दैनिकाच्या संपादकाचे आंबेडकरी चळवळी बाबत कोणत्याही विषयावर एक मत होत नाही.राजकीय नेत्या सारखे ते एकमेकाच्या जवळ बसून किमान एक कार्यक्रम बनवून समाजा समोर भूमिका मांडण्याची हिंमत दाखवत नाही.त्याच बरोबर आंबेडकरी विचारांची एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन नाही जे देशातील तमाम कामगार,कर्मचारी आणि अधिकारी यांच्या दबावाखाली काम करेल.मग देशातील ९३ % असंघटीत कामगार मजुरांचे समाज प्रबोधन कोण करेल ?.
१९२७ ते १९५६ पर्यंत मागासवर्गीय शोषित वंचित समाज जो असंघटीत कामगार शेतमजूर होता तो असुशिक्षित अज्ञानी मोठ्या प्रमाणत होता तरी तो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रत्येक जनआंदोलनात अक्षरशः आपले जीवन कुर्बान करीत होता, समाजातील असंघटीत कामगार मजुरांच्या ध्येय धोरणांशी, कार्याशी आपण जितके प्रामाणिक राहू, तितकी बाबासाहेबांची चळवळ आपल्यात जीवंत राहिल. रिपब्लिकन पक्षाच्या गटा तटांना अनेकदा भावनिकतेवर आधारित ऐक्य करावे लागले आणि ते करण्यास भाग पडणारा कोणी पदवीधर प्राध्यापक,डॉक्टर,वकील,इंजिनियर नव्हता. आंबेडकर चळवळ संपली या छोट्या पुस्तकात लेखक बाळासाहेब आंबेडकर यांनी ऐक्यासाठी उपोषण करणारे कोण आहेत आणि त्याचे शिक्षण व रोजगार काय आहे हे नांवासह दिले आहे.सर्व असंघटीत कामगार मजूर होता.हे लक्षात घ्या.आताही त्यांनाच पुढाकार घ्यावा लागेल.कारण समाजात असंघटीत कामगारंचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे.त्यांच्या पाठीवर कोण कधी हात ठेऊन आपले करेल हे सांगता येत नाही. रिपाईच्या सर्व बालेकिल्ले कुठे आहेत हे शोधावे लागेल. अहंकार, मतभेद, प्रलोभन, अमिषापायी आंबेडकरी चळवळीतील सामाजिक, राजकीय निष्ठा गौण ठरत आहे. आज आपला सामाजिक, राजकीय पाया काय आहे ?. ज्या क्रांतिकारी चळवळीला तत्वज्ञान आहे, क्रांतिकारी सामाजिक बांधिलकी असलेले कार्यकर्ते आहेत, परंतु त्याच समाजासमोर,चळवळीसमोर पर्याय नसल्याने आज अनेक प्रश्नचिन्ह आहेत.अत्याचार आणि भावनिक प्रश्नापुरती चळवळ फक्त लढते आहे.पण निकाल काय ?.संविधाना नुसार ग्रामपंचायत ते राष्ट्रपती पर्यंत निवडणुका होऊन निकाल लागतो.त्याकरिता भारतीय नागरिक म्हणून नांव नोंदणी झाली तरच मतदानाचा अधिकार असतो ,ग्रामपंचायत सदस्य ते आमदार,खासदार कोण कोणाला कसे निवडून देते हे उठता बसता भारतीय घटनेच्या शिल्पकारांचे नांव घेणाऱ्या समाजाला सांगणे मला शोभणारे नाही.   
डॉ.बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या राजकीय पक्षाची आपण काय अवस्था करुन ठेवली आहे ? पक्षाची राजकीय मान्यता, निवडणूक चिन्ह ही आपण केव्हाच गमावून बसलो आहोत. अत्याचार, अन्याय,भावनिकता आणि बाबासाहेबांच्या नावाचे भांडवल करुन अजून किती सोयीच राजकारण आपण सर्व करणार आहोत?. राजकारणात बेरीज चालते,आपण तर वजाबाकी व भागाकार करीत आहोत.आपली निर्णायक बलाढ्य शक्ती असतांना, आपण राजकारणात अदखलपात्र का ठरु लागलो ? आंबेडकरी चळवळ राजकीय, सामाजिक चळवळीचे होत असलेले पतन आंबेडकरी अनुयायांना अभिमानास्पद आहे का ? प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे प्रत्येक गटा तटाचा फायदा इतर राजकीय पक्षांना होणार असेल तर?. राजकारण कशासाठी, कोणासाठी आणि का करायचे ?.
३ ऑक्टोबर २०१७ रोजी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या स्थापनेला ६० वर्ष पुर्ण होत आहेत.काही रिपाई गटाची मान्यता रद्ध करण्यात आल्याचे आपण वाचले असेलच.कारण त्यांनी रीतसर हिसाब ठेवला नाही आणि सादर केला नाही.तीच परिस्थिती सामाजिक धार्मिक शौक्षणिक संस्था,संघटना यांची आहे.मग आता कोणता रिपाईचा गट बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचे नेतृत्व करण्यास सक्षम आहे.
राज्यात आणि देशात ​एका रिपब्लिकन गटाचे नांव सतत चर्चेत असते.ते म्हणजे नामदार खासदार रामदास आठवले देशातील एकमेव नेता ज्यांना भेटण्यास कोणतीही वेळ व जागेचे बंधन नाही.वैचारिक शत्रूच्या कळपात जरी असले तरी आपला ठसा सर्व समाजात ठेऊन आहेत.त्यांच्या सोबत जो फौजफाटा आहे तो सर्वच क्षेत्रात संघर्ष आणि नेतृत्व करण्यास तयार असतो.रामदास आठवले यांची बहुजन समाजात रिपब्लिकन नेते म्हणून ओळख समाजमान्य आणि लोकमान्य आहे. रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन अधिकृत पणे साजरा करणारा एकमेव गट असला.तरी तो रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठण्यास असमर्थ आहे.कारण त्यांच्याही गटाला संविधान किती मान्य आहे हे त्यांच्या कार्यप्रणाली आणि जाहीर सभेच्या स्टेजवरील नेत्याच्या गर्दीवरून लक्षात येते.सर्वच रिपब्लिकन गटाचे नेतृत्व करणारे एक नंबर नेतृत्व सोडल्यास राज्यात दोन,तीन चार पाच नंबर राज्याचे नेतृत्व करणारे नेते नाहीत. प्रशिक्षित कार्यकर्ते नाहीत.लेटर हेड वर जगणारे कार्यकर्ते समाजाला स्वाभिमानी बना सांगु शकत नाही. सरकारी योजनांची अभ्यासपूर्ण माहिती नाही.समाजाचा आणि जनतेला कसा लाभ मिळवुन द्यावा यावर जनांदोलन उभे न राहता स्वतःला किती कमिशन अथवा दलाली भेटलं यावर सर्व लक्ष केंद्रित असलेले कार्यकर्ते, नेते पक्षाला कोणती दिशा दाखवून पुढे नेतील. त्यामुळेच असंघटीत कष्टकरी कामगार,मजूर,शेतमजूर मोठ्या संख्येने इतर पक्ष संघटने कडे वळतो आहे.याचा सर्वच जागृत कार्यकर्ता,बुद्धीजीवी,साहित्यिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे.रिपब्लिकन विचारधारा किती हि चांगली असली तरी तिचे आचरण करणारे अनुयायी नसतील तर रिपाई रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट गाठूच शकत नाही.लोकशाहीचे बंधन मान्य नसणारे कार्यकर्ते लगेच पन्नास शंभर लोक सोबत घेऊन पक्ष संघटना काढत राहिले म्हणजे काय होईल?.म्हणून सर्व गल्लीबोळातील तरुणांनी प्रथम आपल्या विभागातील   स्वार्थी,अहंकारी कार्यकर्ते संपविण्याची जबाबदारी घ्यावी.आणि आपल्या परीसारतील आंबेडकरी समाज एकसंघ करण्याचा प्रयत्न करावा.भारताला दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने नेता निवडावा जो लोकशाही मान्य करीत असेल आणि लोकशाहीने पक्ष संघटना चालवीत असेल तोच रिपाईचा नेता असेल.रिपाईच्या वर्धापन दिना निमित्य एक संकल्प करूया आणि रिपाईला संविधान मान्य असेल.त्याची अमंलबजावनी करून रिपाई ​अहंकार मुक्त करून ​येणाऱ्या एकष्टाव्या वर्षात रिपब्लिकन रिपब्लिकन पक्षाचे अंतिम उद्धिष्ट कोणते ? ते ठरवुन काम करूया आणि ते करण्यासाठी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करून तरुणांना संधी देऊ या  
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई,९९२०४०३८५९.​

स्वाभिमानी असंघटीत नाका कामगार

स्वाभिमानी असंघटीत नाका कामगार 
नाक्यावरील असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय हक्क व प्रतिष्ठे करिता १९८२ सत्यशोधक बिगारी कामगार  संघटनेची स्थापना सिद्धार्थ नगर भांडुप येथे झाली.राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या मार्गदर्शना खाली रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी गिरण्या मिल मध्ये काम करणाऱ्या असंघटीत कामगारांना संघटित करून देशातील पहिली कामगार संघटना बांधून पहिला देशव्यापी संप घडवून आणला अशा क्रांतिकारी कामगार चळवळीच्या नेत्यांची परंपरा सत्यशोधक कामगार संघटनेला लाभली आहे.
भारतातील सर्वात मोठे क्षेत्र म्हणजे बांधकाम क्षेत्र आहे.या क्षेत्रात मोठं मोठ्या इमारती,धरण,बंगले आणि सर्वात मोठी दळण वळणा करिता लागणारे रस्ते,रोड हे नवद टक्के असंघटीत कामगार रक्ताचे पाणी करून बांधतात.त्यांना फक्त एकदिवसाची मजुरी मिळते. मात्र जे स्वतः कोणतेही काम करीत नाही त्यांना त्यातुन कायम स्वरूपी उत्पन्न मिळते.त्यात बिल्डर्स ठेकेदार, भांडवलदार आणि राज्य,केंद्र सरकारचा कायम स्वरूपी फायदा होतो. बांधकाम क्षेत्रातील असंघटीत कामगारांना या उत्पन्नातुन सामाजिक सुरक्षा मिळावी म्हणुन नारायण मेंघाजी लोखंडे यांनी १८८० ला संघर्ष केला.तोच आदर्श डोळ्या समोर ठेऊन सत्यशोधक कामगार संघटनेची स्थापना झाली आहे.राज्यात देशात संघटित कामगारांच्या राजकीय कामगार संघटना खूप आहेत.पण त्या असंघटीत कामगारांच्या प्रश्नावर प्रामाणिक पणे काम करीत नाही.केवळ राजकीय पक्षाच्या जाहीर सभा,बैठका आणि मोर्चा आंदोलन करीता त्यांचा वापर होत असतो.राजकीय पक्षाने किंवा त्यांच्या संघटित कामगार संघटनेच्या नेत्यांनी असंघटीत कामगारांच्या समस्या वर आवाज उचलला नाही.त्यामुळे बहुसंख्ये संघटित कामगार असंघटीत झाले.त्यावर आवाज उचलणारी सत्यशोधक कामगार संघटना ही देशभरातील असंघटीत कामगार मजुरांना संघटित करण्याचे काम करीत आहे.
मुंबई शहराच्या प्रत्येक नाक्यावर हजारो असंघटीत कष्टकरी कामगार सकाळी सात वाजल्या पासुन एक वाजे पर्यन्त कामाच्या शोधात उभे असतात.त्यांना  वाहतूक पोलीस,दुकानदार आणि फेरीवाले अनेक प्रकारचा त्रास देतात.हजारो नाका कामगार एकत्र उभे असतात पण दादागिरी करणाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत त्यात नव्हती पोलिस, दुकानदाराने एकाला मारलेले तर सर्वच पळून जातात. तेच कामगार संघटने मुळे आता छाती ठोक पणे उभे राहुन बोलतात असंघटीतावर कोणीही अन्याय करतो संघटिता वर कोणी ही अन्याय अत्याचार करतांना हजारदा विचार करतात.हे नाका कामगारांना समजले म्हणुन आज जिथे ते उभे राहतात तिथे ते संघटित आहेत.त्यांचे श्रेय हे सत्यशोधक कामगार संघटनेला जाते.एक काळ असा होता की नाक्यावरील कामगारा कडून काम करून घेतल्या जात होते आणि मजुरी देतांना ठरलेली मजुरी दिली जात नव्हती.अर्धे पैसे आज घ्या बाकी काम पूर्ण झाल्यावर असे करून त्यांच्या कामाचे पैसे बुडविण्याची योजना अनेक राजकीय ठेकेदार भाईगिरी करून करीत होते.काही वेळा पैसे नाही देत काय करायचे कर जा. पोलीस स्टेशनला तक्रार कर असी धमकी दयाचे. पोलीस स्टेशन ला गेल्या पोलीस अधिकारी दाखल घेत नव्हते त्या कामगारांना कोर्टात जाण्याचा सल्ला पोलिस देत होते.तेव्हा संघटनेचे कार्यकर्ते पोलिसांना सांगत होते आमची तक्रार घेऊ नका पण आम्ही आमच्या पद्धतीने पैसे वसूल करतो, नंतर आपण आमच्या विरोधात कोणाची ही तक्रार घेयाची नाही.कायदा सुव्यवस्था बिगडल्यास आम्ही जबाबदार नाही.त्यांची सर्व जबाबदारी आपली असेल.या नंतर पोलीस अधिकारी नाका कामगारांचे पैसे बुडविणाऱ्याला पोलीस गाडीत घालून आणून समोरा समोर बसवून तडजोड करून देत होते.मुंबई ठाणे जिल्ह्यातील अनेक काँग्रेस शिवसेनेच्या मान्यता प्राप्त नेते नगरसेवक,आमदार पदाधिकाऱ्या सोबत सत्यशोधक संघटनेने सनदशीर मार्गाने संघर्ष केला आहे.
सत्यशोधक कामगार संघटना ही एकमेव अशी संघटना आहे की ती कष्टकरी नाका कामगारांना न्याय,हक्क आणि प्रतिष्ठे साठी प्रामाणिक,निस्वार्थी पणे लढते. संघटना स्थापन करतांनाच संस्थापक अध्यक्ष विजय सातपुते,सागर तायडे,अंकुश भोळे यांनी सांगितले होते की नाका कामगार संघटनेचे रोपटे आम्ही लावतो त्याचा वटवृक्ष झाल्या वर त्याला लागणारे फळे खाण्यासाठी तुम्ही आम्ही नसू तर ती खाण्यासाठी अनेक पक्षाची डोम कावळे जमा होतील.ती आम्हीच या नाका कामगारांची संघटना बांधली असे भासवतील.तेेव्हा नाका कामगार संघटनेला विरोध करीत होते.तेच पुढे स्वतःला संस्थापक अध्यक्ष म्हणुन घेतील.आज ते सत्य झाले आहे अनेक नाक्यावर नाका कामगार संघटनेला विरोध करणारे महापुरुषाच्या विचार धारेशी गद्दारी करणाऱ्या चळवळीचे कार्यकर्ते स्वतःला संस्थापक म्हणायला लागले. ज्यांना नाक्यावर कडीया मिस्त्री,पेंटर,बिगारी, असा नांवाने ओळखल्या जात होते त्यांचे कधी कोणी आदराने नांव घेत नव्हते त्यांना सत्यशोधक कामगार संघटनेने स्वतःची ओळख निर्माण करून दिली म्हणुन ते आता अनेक पक्षात संघटनेत कार्यकर्ते म्हणुन काम करतात.ज्यांनी संघटनेच्या विचारधारेशी बेईमानी करून फंडिंगवाल्या MSW समाजसेवकाच्या संघटनेचे दलाल म्हणुन काम करतात.त्यांनी समाजाचा आणि नाका कामगारांचा विश्वास गमावला.त्यामुळे प्रामाणिक पणे नाका कामगारा करीता काम करणाऱ्या कार्यकर्त्याचे कष्ट वाया गेले. नाक्या नाक्यावर वर्गणी गोळा करणारे पेड वर्कर कधीच संपलेले आहेत. कारण फंडिंग असेल तर फुल समाज सेवा, फंडिंग बंद तर समाजसेवा बंद.त्यामुळे सत्यशोधक संघटनेच्या क्रांतिकारी विचाराला विरोध करून काही समाजसेवी संस्था संघटनेच्या प्रलोभनाला बळी पडून नाका कामगारात फूट पडली आहे.काही कार्यकर्ते केवळ पोट भरण्याचा उधोग करीत आहेत.त्यामुळे नाका कामगारात नाक्यावर राजकीय  पक्षाच्या आणि धंदेवाईक कामगार संघटनेचे पेव फुटले आहे.नाक्या नाक्यावर संघटना निर्माण झाल्या त्यात सर्वच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष ,केंद्रीय अध्यक्ष झाले आहेत.त्यामुळे राज्य सरकार नाका कामगारांची विशेष दाखल घेत नाही.ग्रामीण भागात बांधकाम कामगारांची नांव नोंदणी होत आहे.पण मुंबई नवीमुंबई ठाणे जिह्यात नाका कामगार नांव नोंदणी पासुन वंचित आहेत.कारण त्यांना वर्षातील नवद दिवस काम करण्याचे प्रमाणपत्र कोणीच ठेकेदार देण्यास तयार नाही.नगरविकास खात्याने महानगरपालिका नगरपरिषद यांना नाका कामगारांना नवद दिवसाचे प्रमाणपत्र देण्याचा आदेश दिला पण त्यासाठी लागणारी यंत्रणा,कर्मचारी यांची व्यवस्था कोणा कडेच नाही. त्यामुळे नाका कामगारात सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष असला पाहिजे होता तो नाही.तर नाका कामगारात संघटना आणि कार्यकर्त्या बाबत असंतोष आहे.
फंडिंगवर चालणाऱ्या संस्था, संघटना वेळोवेळी मोर्चे मेळावे आंदोलन करतात.यात भाग घेण्या करीत देशभरातील संघटित कामगारांचे मान्यताप्राप्त नेते आणि राजकीय नेत्यांना असंघटीत कामगारांना मार्गदर्शन करण्यास बोलावतात.जे नेते स्वतःच्या पक्ष संघटनेच्या बॅनर खाली असंघटीत कामगारा करीता विधानसभा, लोकसभेत आवाज काढत नाही ते असंघटीत कामगारा समोर छाती फुगून न्याय मिळवुन देण्याची भाषा करतात. पण नाका कामगारांच्या नांव नोंदणी संख्या वाढताना दिसत नाही.त्यामुळे असंघटीत कामगारांना न्याय मिळवण्यासाठी देशभरातील संघटित कामगारांच्या नेत्यांना आणि राजकीय नेत्यांना मोर्चा मेळाव्यात प्रामुख्याने बोलवल्या जाते कि आपली ओळख आणि शक्ती दाखविण्याचा करीता?.असो त्यामुळे नाका कामगार व बांधकाम कामगारात प्रचंड जनजागृती झाली पाहिजे होती. आणि नाक्या नाक्या वरील संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष जमीन दोस्त झाले पाहिजे होते.पण आज नाक्यावर तसे नाही.प्रामाणिक कुशल कामगार ठेकेदार आणि स्वाभिमानी नाका कामगार यांच्या पासुन सुरक्षित अंतर ठेऊन आहेत.ते कोणत्या ही पक्षाच्या व समाजसेवकाच्या प्रलोभनाला बळी पडत नाही.म्हणून ते दुर्लक्षित आहेत असे काही लोकांना वाटते.पण तसे नाही ते जागृत आहेत.आणि सत्यशोधक आहेत.म्हणून सत्यशोधक कामगार संघटना वीस जिल्ह्यात व तीन राज्यात कार्यरथ आहे.आणि सोबत जिल्ह्यातही इतर संस्था,संघटना यांना सोबत घेऊन महाराष्ट्र असंघटीत बांधकाम कामगार संघटना समनव्य समिती द्वारे सतत कामगार मंत्री सचिव,आयुक्त यांच्या बरोबर चर्चा करून मार्ग काढण्याच प्रयत्न करीत होती.अनेक जिल्हयात सहायक कामगार आयुक्त यांच्या कडे सनदशीर मार्गाने नांव नोंदणी सुरु आहे.असंघटीत कामगारात वैचारिक जनजागृती होणे महत्वाचे आहे. राजकीय पक्ष आणि त्यांच्या कामगार युनियन यांनी सामाजिक,शैक्षणिक आणि धार्मिक शोषण कडे जाणीव पूर्वक काना डोळा केल्यामुळे संघटित कामगार केवळ स्वतःच्या पगारवाढ आणि बोनसचा विचार करतात. त्यामुळे त्यांच्या कंपनीत खात्यात असंघटीत कामगार कंत्राटी कामगार म्हणून काम करतात.त्यांचे फळ त्यांची सुशिक्षित मुलंमुली ही भोगतात.
सर्व क्षेत्रातील असंघटीत कामगारांनी व बांधकाम धंद्यातील सर्वच असंघटीत कामगारांनी संघटित होणे गरजेचे आहे.करीता कामगारांना स्वाभिमानी बनावे लागेल.देशात ९३ टक्के असंघटीत कामगार आहेत ते १४२ प्रकारात विभागलेले आहेत. आणि विशेष हे सर्व राज्यातील मागासवर्गीय,आदिवासी भटके विमुक्ते जाती जमातीतील आहेत.यातील चाळीस टक्के लोकांनी सत्यशोधक बनल्यास म्हणजे फुले शाहु,आंबेडकर विचारधारा स्विकारली तर सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक परिवर्तना सोबत राजकीय परिवर्तन झाल्या शिवाय राहणार नाही.गरज आहे संघटीत होण्याची. राजकीय नेत्यांच्या भरोशावर असंघटीत कामगार बसल्यास तो पुन्हा पुन्हा जातीच्या चक्रव्युवात अटकल्या शिवाय राहणार नाही.असंघटीत नाका कामगारांनी स्वाभिमानी बनावे.म्हणून सत्यशोधक कामगार संघटना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) या राष्ट्रीय ट्रेंड युनियन शी संलग्न झाली आहे.देशपातळीवर ज्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहेत त्या वेगवेगळ्या वैचारिक वारसा सांगणाऱ्या राजकीय पक्षाच्या असल्या तरी त्या सर्वांचे उद्धिष्ट एकच आहे.त्या जातीव्यवस्था,वर्णव्यवस्था,हिंदुत्व मनुवाद नाकारतानां  दिसत नाही,त्यांची जनते समोर भाषा एक आणि आचरण वेगळे असते.बहुसंख्य मागासवर्गीय,बहुजन समाज समजुन घेत नाही म्हणूनच तो वर्षानं वर्ष फसल्या जातो.त्यासाठी बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टींचा स्वीकार करून अंमलबजावणी केली पाहिजे. मागासवर्गीय समाजाचे दोनच शत्रू एक भांडवशाही दुसरी ब्राम्हणशाही ही संपविण्यासाठी लोकशाही पद्धतीने देशातील कामगार कर्मचारी यांनी एक होऊन राष्ट्रीय ट्रेंड युनियन (आय एल यु) च्या नेतृत्वाखाली संघटीत होऊन राजकीय पक्षावर दबाव गट म्हणून काम करावे.असे बाबासाहेब सांगत होते.आता आपण त्यांचे किती ऐकले यांचे आत्मचिंतन कामगार कर्मचारी अधिकारी यांनी केले पाहिजे.संघटीत कामगाराचा कोणत्याही संघटनेवर पक्षावर विश्वास राहिला नाही.परंतु आम्ही काम करणे सोडले नाही.जुने कामगार जातात नवीन कामगार येतात. विचारधारा मात्र तशीच कायम प्रेरणादायी राहते 
सत्यशोधक कामगार संघटने मुळे ग्रामीण भागात मोठया प्रमाणात जनजागृती होत आहे.त्यामुळे
नोंदणीकृत कामगारांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळत आहे.ग्रामीण भागातील कामगारांना लाभ मिळत असतांना शहरी भागात बांधकाम कामगारांना नवद दिवसाचे प्रमाण पत्र मिळणे अवघड झाले आहे. असंघटीत बांधकाम कामगारांची नांव नोंदणी करण्यास सरकारी यंत्रणा उदासीन आहे.आमच्याकडे कर्मचारी नाहीत स्टेशनरी नाही कसे काम करावे प्रथम आमची समस्या सोडवा कर्मचारी वाढीसाठी निवेदन द्या,मोर्चे काढा सांगणारे अधिकारी खरच काम करण्यासाठी तयार असतील काय?.संघटीत कामगारांच्या ट्रेंड युनियन यांनी योग्य वेळी कामगार कर्मचाऱ्यांच्या निवृत्त झालेल्या जागा न भरल्यामुळे कंत्राटी कामगार भरल्या जात आहेत.आणि भरडल्या जात आहेत.असा परिस्थितीत सत्यशोधक कामगार संघटना महाराष्ट्रासह अनेक राज्यात किर्याशील आहे,इतर राज्यात जाण्यासाठी जास्त मेहनत करावी लागत नाही कारण मुंबईत असंघटीत कामगार व बांधकाम धंद्यातील बहुसंख्य कामगार हा इतर राज्यातील आहे त्याला इथे संघटनेचे महत्व समजले की तोच फुले,शाहु आंबेडकर विचारांची क्रांतिकारी सत्यशोधक संघटना आपल्या राज्यात घेऊन जात आहे.त्यामुळेच आम्ही गर्वाने सांगतो आणि लिहतो स्वाभिमानी असंघटीत नाका कामगार संघटित होत आहेत.

सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९.

असंघटीत मुंबईकरांची संकटावर संघटित पणे मात

असंघटीत मुंबईकरांची संकटावर संघटित पणे मात
भारताची औधोगिक राजधानी मुंबई विविध जाती धर्माच्या आणि उद्योग धंद्याने नटलेली सजलेली आहे,आणि ही विविध क्षेत्रातील असंघटीत कष्टकरी कामगार,मजुरांच्या हातावरच चालते,बोलते आणि धावते!.
मुंबईवर अनेकदा अनेक संकट आली, पण ती कोणासाठी कधीच थांबली नाही.मुंबईत जो तो आपली ठरलेली कामे ठरलेल्या वेळात करण्याचा प्रत्यन करत असतोच रेल्वे लोकल बंद आहे किंवा बेस्टची बस बंद आहे म्हणुन हातावर हात बांधून बसत नाही.मुंबई एकदा नाही अनेकदा वेगवेगळ्या भागात तुंबली म्हणुन पूर्ण मुंबई तुंबली असे नाही झाले.तिची सोडवणूक करण्यासाठी कोण पुढे येतात?.महानगरपालिका कर्मचारी त्यात कायमस्वरूपी नोकरी करणारे किती आणि ठेकेदाराकडे काम करणारे असंघटीत कामगार किती यांची नोंद कधी कोणी चॅनल,प्रिंट मीडियाने घेतली?.मुंबईतील गटारे तुंबल्यावर ती साफ करणारे मजूर कामगार कोण असतात.काही ठिकाणी मशीन ने गटारी साफ केल्या जातात.पण पूर्ण गाळ,घाण कचरा निघतो का?.बिल मात्र पूर्ण पणे मंजूर होते.अनेक वर्षांच्या इतिहासात प्रथमच के ई एम हॉस्पिटलमध्ये पावसाचं पाणी घुसलंय असे सांगितल्या जाते.पण पाणी का तुंबले हे सांगितल्या जात नाही.कारण मुंबईत ब्रिटिशकालीन सांडपाण्याची जी व्यवस्था होती.ती आज ही त्याच अवस्थेत आहे.त्यात मोठं मोठी टॉवर उभी केल्या गेलीत पण त्यांचे मल निसरण आणि सांडपाणी कसे विसर्जित केल्या जाईल यांची व्यवस्था कागदावर आहे पण प्रत्येक्षात नाही.गगनचुंबी इमारत बांधताना सांडपाण्याची व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष करण्याचा आर्थिक लाभ सर्वच पालिका कर्मचारी, अधिकारी आणि राजकीय सत्ताधारी यांनी घेतला आहे.आणि घेत राहतील कारण मुंबई हे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी सर्वान साठी आहे.
मुंबई नेहमी वेगवेगळ्या नांवाने कामाने ओळखल्या जाते. पावसाने एका झटक्यात सगळ्यांना 'मुंबईकर' बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.कोणी गरीब नाही कोणी श्रीमंत नाही.भिजणारी माणसच, मदत मागणारी माणसच आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसच. कोणी संघटीत आणि कोणी असंघटीत नाही.
 गेल्या दोन दिवसांचा पाऊस हा २६ जुलै २००५ ची आठवण करून देणारा होता.मात्र मुंबईकरांना अनेक संकटाचा अनुभव पाठीशी असल्यामुळे काल लोकांमध्ये भीतीचे वातावरण दिसले नाही. जे २६ जुलै २००५ मध्ये दिसले होते.पाऊसामुळे  मुंबईतील लोकांचे बेहाल झाले. त्याच्या अडचणीना मात्र सीमा नव्हती. पण असल्या संकटांना स्वताच्या व नागरीकांच्या विश्वासावर मात करण्याचा आत्मविश्वास प्रत्येक मुंबईकरात होता.
२६ जुलै २००५ पावसात मी कुर्ला ते भांडुप असा प्रवास रेल्वे च्या लाईन मधुन केला होता.तेव्हा माझा एक मित्र बहिरे सोबत होता त्याला म्हटले माझा मागे ये ते त्याने ऐकले नाही आणि लाईन सोडून गटार ओलांडून जाण्यासाठी पाय टाकला तसा तो कंबर एवढ्या पाण्यात पडला आम्ही सावध होतो म्हणुन त्याला ताबडतोब काढले त्यांची आठवण तो नेहमी सर्वाना सांगतो मी सागर मुळे पडलो आणि सागर मुळेच वाचलो नाहीतर गटार मध्ये वाहून गेलो असतो.रेल्वे लाईन मध्ये लोक जात होती कोणी येत होती,सर्व चालत रेल्वे स्टेशन पार करीत होती..त्यावेळी पाण्यातुन जाणारे लोक एकमेकांना सहारा देऊन मानवी साखळीच तयार  केली होती.ती साखळीच धीर देणारी होती.रत्यावर चालणारे ट्राफीक मध्ये अडकलेले सर्वच भेदरले होते तरीही ते एकमेकांचा आत्मविश्वास वाढविणारी साथ देत होती.मुंबईत अनेक ठिकाणी सखोल भाग असल्यामुळे तिथे जास्त पाणी सांचले होते.
२६ जुलै मुसळधार पाऊस आणि समुद्रराला भरती हे एकच वेळी झाल्याने हे सार काही तासात अचानक झाल्यामुळे सरकार व महानगर पालिकेच अस्तित्व त्यावेळी कुठेही जाणवले नव्हते. जाणवत होती ती नागरीकांची जिवंत धडपड.जी आताही कालच्या पाऊसात जाणवली.पण प्रश्न पडतो या अशा संकटातुन आपण कीती व काय शिकतो?. सरकार आणि महानगरपालिका प्रशासन अधिकारी या समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी कोणत्याही योजना आखत नाही,उलट असा प्रसंगी तातडीची सेवा देण्याच्या नांवाखाली ठेकेदारांची असंघटीत मजूर कामगार लावुन कसा मलिदा खाता येईल यांचे नियोजन मात्र व्यवस्थीत करून ठेवतात.संकटात धाऊन जाणारे गटप्रमुख,शाखा प्रमुख,विभागप्रमुख आणि बाळ सैनिक आता नगरसेवक, आमदार, खासदार सत्ताधारी झाल्यावर मराठी माणसाच्या आणि मुंबईकारांच्या मदतीला धावतांना कुठेच दिसले नाही.मात्र असंघटीत मुंबईकरांनी संकटावर संघटित पणे मात केली.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,९९२०४०३८५९.

शेतकऱ्यांचा संप आणि भुमिहीन शेतमजुर

शेतकऱ्यांचा संप आणि भुमिहीन शेतमजुर 
कसेल त्यांची शेती मग नसेच त्याचे काय हा प्रश्न आज ही कायम आहे. गांव शिवारात शेती असणारे बहुसंख्य शेतकरी शेती विकून शहरात नोकरी करिता पैसे भरून कायमस्वरूपी नोकरी स्वीकारतात. पण शेतीत काम करीत नाही.शेती करण्यासाठी मागासवर्गीय समाजातील भूमीहीन शेतमजूर काही प्रमाणात उपलब्ध आहेत, सोबत आधुनिकीकरणाची कृषीयंत्रणा टॉक्टर, पेरणीपासुन मळणी पर्यंत सर्व कृषी अवजारे शेतकऱ्यांना सरकारी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.त्यामुळे काही शेतकरी वर्षाला लाखो नाही करोडो रुपयांचे उत्पन्न घेतात.हे स्टॅम्प पेपरवर लिहून देणारे एक नाही हजारो राजकीय पक्ष संघटनेत काम करणारे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नेते कुशल शेतकरी या राज्यात नव्हे तर देशात आहेत.ते बिचारे गरीब शेतकरी कर्जाच्या बोजाने पार खचुन गेले.काही जिल्ह्यातील नांवे सोशल मीडिया मुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत.त्यात साता-यातील कर्ज घेणारे गरीब शेतकरी पहा प्रभाकर घारगे ९२ लाख.अनिल देसाई ८५ लाख.आ.मकरंद पाटील ७२लाख.संजीवराजे निंबाळकर ६७ लाख.शिवांजली राजे ४८ लाख.हिंदूराव निंबाळकर ६९ लाख.लक्ष्मण पाटील १करोड ३लाख फक्त!. यातील सात पैकी ६ जण अत्यंत सामान्य आणि गरिबांच्या पक्षाशी " राष्ट्रवादी" चे आमदार,माजी खासदार आहेत, शेतकरी आंदोलनात संपात सर्व पक्षाचे गोरगरीब जिल्हा नेते,आजी माजी आमदार,खासदार आहेत.राज्य सरकार आणि प्रशासनातील बँक अधिकारी या गोरगरीब शेतकऱ्यावर कोणतीच कारवाई करण्याची हिंमत किंवा कर्तव्यदक्षता दाखवीत नाही.म्हणून शेतकऱ्यांच्या नुसती कर्ज माफी नको!. तर सरसकट कर्जमाफी का हवी आहे हे गोरगरिब शेतकऱ्यांना समजलं पाहिजे.
जगात एकमेव देश भारत आणि राज्य महाराष्ट्र असेल. जिथे सर्व धर्मीय व पक्षीय शेतकरी सरकार विरोधात जन आंदोलन व संप करतात.सरकार म्हणजे आकाशातुन पडलेली माणस नाहीत.तर या सर्व शेतकरी कुटुंबातील दहावी बारावी नापास झालेली बहुसंख्य गावांत जीवावर उद्धार होऊन समाज सेवा करणारे आडदांड पिळदार तरुण तडपदार गावांतून तालुख्यातुन आमदार झालेले आपलेच पोर पण ते फक्त सयाजीराव आहेत.त्यांना स्वतःची बुद्धी जशी गावांत दाखविली तशी विधानसभेत दाखविता येत नाही.तिथे पक्षाचे ध्येय धोरण आणि आदेशानुसार वागावे लागते.त्यांना शेतकऱ्या बदल कितीही प्रेम व आदर असला तरी काहीच करता येत नाही.म्हणुन सर्वच पक्ष शेतकऱ्यासाठी आंदोलन करण्याचे नाटक करतात.सरकारला न्याय मागण्यांचे ढोंग आहे असे म्हटल्यास चुक ठरणार नाही.
शेतकऱ्यांना लुटणारे चोर दलाल,अडते आणि व्यापारी डोळ्यासमोर दिसतात तरी त्यांच्यावर आम्ही कोणतीच कारवाई करू शकत नाही.म्हणे सरकारने निर्णय घ्यावा अजब न्याय पद्धत आहे ही?.एक नाही हजारो शेतकऱ्यांचे दुःख आम्ही वाचली आणि डोळ्याने पाहिली, त्यातील एक लक्षवेधी घटना नारायणगाव, तालुका जुन्नर,जिल्हा पुणे.एक धोंडिबा बाबा म्हातारे शेतकरी १२०० मेथीच्या जुड्या घेऊन लिलावाला येतात.बाबांना म्हटलं काहो बाबा तुम्ही आलात दुसरं कोणी नव्हतं का ? बाबा म्हणाले भाजी काढायची होती. लोड शेडिंग असल्या मुळे पोरग दोन दिवस रात्री भाजीला पाणी भरत होता.पाणी भरताना चिखलात काच घुसली अन घेतला पाय चिरून त्याचा कराडा आला होता (म्हणजे ताप होता) अंगात.म्हणुन मी आलो.अजून लिलावाला एक तास होता. दिवाळीचे दिवस होते. बाबांना म्हटलं झाली का तयारी दिवाळीची बाबा म्हटले नाही रे अजून आजच भाजी काढली सूनबाईन बाजार लिहून दिलाय. दोन नाती आहेत त्यांना पण फटाके कपडे घ्यायचे आहेत.पोराला पायाला ट्युब घ्यायची आहे. म्हातारीला चोळी अन मला कोपरी अन पोरी येतील भाऊबीजेला त्यांची खरेदी मी विचारलं गाडी भाडे किती आहे पिंपरी कावळ वरून बाबा म्हणे ८०० रुपये आणि मजूर किती होते भाजी काढायला ९ मजूर होते १८० रुपये रोजाचे मी,म्हातारी अन सुनबाई बांधायला अन दोन्ही नाती भाजी सावलीला वहायला.म्हणजे घरचे माणस धरून १४ होते.लिलाव जवळ आले काल परवा पर्यंत भाजी प्रती १०० जुडी ११०० ते १२०० भाव होता. मी सहज अंदाज लावला की बाबांची १२०० जुडी १००० रुपये म्हणजे १० रुपये जुडी गेली तरी १२००० रुपये येतील. चला बाबांची दिवाळी मजेत जाणार.९ मजूर x १८० = १६२० मजुरी गाडीभाडे = ८०० मार्केट फी = २०० मेथी बियाणे ८० x ५० = ४००० खते = १००० औषधे = २०० ते ४०० आणि रात्रंदिवस केलेले स्वतःचे कष्ट पाणी भरणे गवत काढणे वेगळे म्हणजे एकूण खर्च = ७ ते ८००० रुपये,
बाबांचा भाजीचा "लिलाव" झाला.३ रुपये प्रती जुडी-क्षणात हिशोब झाला ३६०० रुपये.बाबांनी माझ्याकडे बघितलं.त्यांच्या आधी माझ्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या.बाबा म्हणाले शेवटी नशीब पोरा "नशीब" !!!सांगा आता घरी जाताना तो काय उत्तर देणार घरच्यांना. सरकार पैसे देतो आत्महत्या करणाऱ्यांना म्हणून हौस आलीये का त्याला अात्महत्त्या करण्याची सत्ता कोणाची हे महत्त्वाचं नाही.शेतकऱ्यांना "न्याय" मिळाला पाहिजे. बस्स, त्याच्या मागे खंबीर पणे सगळ्यांनी उभं राहील पाहिजे.ही भाकडकथा नसून "सत्यकथा" आहे. ती प्रत्येक शेतकऱ्याची "गाथा"आहे.थोतांड वाटत असल्यास एक दिवस एअर कंडिशन गाडी घेवून ग्रामिण भागातील लिलाव मार्केटला "पिकनीक" करुन या.हे शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यावर रात्रन दिवस आंदोलन करण्याचे प्रचंड ढोंग करून सत्ता परिवर्तन करणाऱ्या आजच्या सेना भाजप सरकारच्या भूमिकेची दररोज सोशल मीडियावर चिरफाड होते,त्यातील ही एक पोस्ट आहे.एकच पोस्ट हजारो लोकां पर्यंत पोचते लोक वाचतात आणि विसरून जातात.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत लिहणारे बोलणारे शेतमजुरांच्या प्रश्नावर कधी लिहतांना पाहिले काय?.
पिढीजात शेतकरी घराणे आणि पिढीजात राजकारणी घराणे आता निसर्गाच्या नियमाने बदलत आहे.त्याच प्रमाणे पिढीजात सालदारी शेतमजुरी करणारे शेतमजुरांची मुलेमुली आता शेतात नाही तर शहरात मजुरी करतात आणि भारतीय संविधानामुळे त्यांना  मूलभूत अधिकार कुठेही मिळविता येतात.अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार आता कुठेही मिळविता येतो, ते असंघटीत अज्ञानी,अशिक्षित मागासवर्गीय असले तरी आत्महत्या करीत नाही.सरकार त्यांची गावात पण नोंद घेत नाही आणि शहरात पण नोंद घेत नाही.परंतु त्यांच्या श्रमाची चोरी करणारे गावात पण आहेत आणि शहरात पण आहेत.शेतकऱ्यांना शेतमजुरांना जात धर्म नसेल तर शेतकऱ्यांची शेतमजुरांची आर्थिक कोंडी करणारे कोण आहेत?. महात्मा ज्योतिबा फुले यांनी१८८० साली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे तेच सांगितले असंघटीत शेतकरी,शेतमजुर आणि कामगारांचे दोनच शत्रु आहेत एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही. कॉग्रेसचे आघाडी सरकार गेले आणि भाजप सेनेचे युती सरकार आले. शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांना काय फरक पडला?.आर्थिक शोषण वाढलं की कमी झाले?.सरकार सरकार बोबळत बसू नका,शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारे तालुक्यातील राजकीय,सरकारी दलाल,अडते आणि व्यापारी जागोजागी ठोकून काढा. त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाची जाहीर झाडाझडती घ्या,सनदशीर मार्गाने त्यांची माहिती घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यास भाग पाडा.सरकार जाग्यावर येईल. त्याशिवाय पर्याय नाही.
सागर रामभाऊ तायडे, भांडूप, मुंबई-९९२०४०३८५९

नवरा हवा!.सासु सासरे नको?.

नवरा हवा!.सासु सासरे नको?.
घोर कलियुग आला, 
​मुलगा बापाला संपत्तीत वाटा मागतो.नाही दिला तर कोर्टात खेचतो.लोकशाहीर दादा कोंडके यांची आठवण येते.त्यांचे प्रत्येक चित्रपट आणि त्यातील गाणे समाजाचे प्रबोधन करणारे.जन जागृती करून संदेश देणारे होते. 
मातृसत्ताक व्यवस्था संपली आणि पुरुषसत्ताक व्यवस्था आली.त्यामुळे एकत्र कुटुंब व्यवस्था संपली,आणि विभक्त कुटुंब व्यवस्था आली.पूर्वी पाचभाऊ लग्न झाल्यावर भी नातवाचे लग्न होई पर्यंत एकत्र राहत होती.पण कधीच भावा भावांचे किंवा जाऊ जाऊचे,देराणी,जेठाणीचे कधी भांडण होत नव्हती. बोलचाल झाली तरी दोनतासानी सर्व विसरून सर्व कुटुंबातील लोक एकत्र येत असत अबोला कधी कोणीच धरत नसत.पुरुषांचा महिलांवर आणि महिलांचा पुरुषावर शंभर टक्के विश्वास होता.आर्थिक व्यवहारात महिला कधीच बोलत नसत.त्यामुळे महिला मध्ये आपल्या कुटुंबातील सर्व बद्दल सारखे प्रेम,आदर आणि जिव्हाळा होता.आताच्या मुली सुशिक्षित झाल्या पण कुटुंबातील नवरा सोडून कोणा बद्दल प्रेम, आदर जिव्हाळा राहिला नाही,त्याला जबाबदार
​ ​
आजच्या दूरदर्शन वाहिन्या वरील उच्चभु वर्गातील घरातील घडणाऱ्या घटना म्हणजे आजच्या सिरीयल आहेत,त्यांचा परिणाम मागासवर्गीय समाजावर मोठ्या प्रमाणात होत आहे असे म्हटल्यास चुक ठरणार नाही.
मागासवर्गीय समाजातील लोक खेडये सोडुन शहरात आले चांगली नोकरी मिळाली त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली.शिक्षण आणि विज्ञान यांच्यामुळे सर्वाचाच विकास होत असतांना काही लोक अजूनही देवा देविकाच्या उपास,तापास, नवस याला महत्व देतात.एकच वेळी विज्ञानाच्या भरपूर वापर करून फायदा घायचा आणि अज्ञान अंधश्रद्धा याला चिटकून राहायचे त्यामुळे ते खुप पुढे गेले असे म्हणता येत नाही आणि खुप मागे राहिले असे ही म्हणता येत नाही.
गांव असो अथवा शहर बहुसंख्य कुटुंबात मुलामुलीचा संसार सुखात नाही.मुला मुलीच्या लग्न झाल्यावर अनेक तक्रारी वाढत चालल्या मुळे एकत्र कुटुंब पद्धत नष्ट होत चालली आहे.मुलीला नवरा हवा पण सासु सासरे नको !.हे  एकमेव कारण अनेक कुटुंबात ठरत आहे.
मुलगी वयात आली तर मुलीचे योग्य त्यावेळात लग्न न होणे ही गंभीर समस्या निर्माण होते.मुलींच्या योग्य त्या वयात लग्न न करण्याची कारण शोधली तर मुलीचा आणि आई वडिलांचा एकत्र कुटुंब पद्धतीला असलेला विरोध आम्ही कसे सर्व पासुन वेगळे राहतो असेच मुलीने राहिले पाहिजे त्यातूनच मुलांना विचारले जाणारे प्रश्न मुलीच्या डोक्यात बसतात. यातच मग मुलीच्या भावना व तारुण्य जाळत राहते.
मुलाची योग्य तपासणी करून चौकशी करा.मुलाचे शिक्षण किती?.नोकरी कोणती करतो ,कुठे कामावर आहे का.?. किती रुपये पगार आहे का?. रहायला स्वतःचा प्लॉट आहे का?. कार आहे का?. बॅक बॅलन्स किती आहे?. मुलगा एकुलता एक आहे का?.ही माहिती मिळायलाच पाहिजे.पण सरकारी नोकरी पाहिजेच?.गांवी शेती पाहिजेच हे मात्र जास्त होते.
मग बीजनेस वाले काय करणार?.कंपनीच्या बॉसची मुलगी नाही देणार?.कारण त्याला नोकरी नसते.पण त्यांचं कंपनीत नोकरी करण्यारा सोबती मुलगीच लग्न लावून देनार कारण त्याला नोकरी असते.आई वडिलांच्या या अपेक्षा पूर्ण होत नाही.त्यामुळे मुलीचे लग्न जुळत नाही,दरवर्षी तेच मुलीच वय वाढत जाते.
तुमच्या अपेक्षा पूर्ण होईनात म्हणून मुलींच बावीसव्या वर्षी सुरू केलेलं वर संशोधन आठ दहा वर्षे चालते.अति अपेक्षा ठेवून मुलींच्या आयुष्याचे वाटोळे अनेक पालका कडून होत आहे.
आई वडिलांवर विश्वास ठेवला तर लग्न होऊ शकतात. मुलाला सुरवातीला जरी कमी पगार वाटत असला तरी लग्न झाल्यावर मुलामुलींना नवीन उमेद येते. परिस्थिती सुधारण्यासाठी दोघे मिळुन जीवतोड मेहनत करू शकतात.एकमेकांच्या साथीने आर्थिक अडचणींवर मात करू शकतात. मुलांचे आई-वडिलही त्यांच्या पाठीशी असतातच. मुला-मुलींना कुणी त्रास सहन करण्यासाठी वाऱ्यावर सोडलेले नसते, याची जाणीव मुलींच्या आई-वडिलांनाही असने आवश्यक आहे. मुलगा मुलगी समानतेच्या युगात तुम्हीही थोडे जावई व मुलीच्या पाठीशी राहिले पाहिजे.म्हणुन मुलामुलींची लग्ने योग्य वयातच झाली पाहिजेत.हा भावनांचा,तारुण्याचा विचार प्रत्येक आई वडिलांनी केला पाहिजे.आयुष्यभर पैसा येईल पण एकदा गेलेले वय व तारुण्य पुन्हा येणार नाही.
वधु वर सुचक मंडळ चालविणाऱ्या मित्रांनी सांगितले ल्या अनुभवाच्या हया कथा आहेत. एक सेवानिवृत्त झालेल्या मुलीचा बाप बायोडाटा दाखवीत होता त्याच्या मुलीच वय ३४ होते.निवृत्ती आगोदर लग्न का नाही केले.आता तुम्ही सांगा का थांबलाय होता हा बाप?. कसला वर पाहत होता हा बाप.आपल्या सारखी नोकरी वालाच मुलगा पाहिजे,जर तुम्ही अभिषेक बच्चन सारखा वर शोधत असाल तर तुमची मुलगी ऐश्वर्य रॉय हवीचनां?.
मुलीचे योग्य वेळेत लग्न नाही झाले तर तिच्या शारीरिक, मानसिक स्वभावात फरक पडतो.ती चिडखोर व बंडखोर बनते मुलगी लग्न झाल्यावर पूर्ण स्त्री बनते.मग अश्या स्रिया एकत्र कुटुंबातील सर्वाना शत्रु समजतात, छोट्या छोट्या कारण वरून वाद विविध,अबोला,भांडण होतात.त्यामुळे एकत्र कुटुंब विभक्त होते.रक्ताची नाते असले लहानाचे मोठे एकत्र झालेले भाऊ एकमेकांना शत्रु समजतात. एका स्त्री मुळेच रामायण आणि महाभारत घडले हा ऐतिहासिक इतिहास आहे.
​म्हणुन अविचारी,स्वार्थी ​
स्त्रियांना आळ घालून आपली कुटुंब व्यवस्था वाचवायची असेल तर
​ लग्न जुळवतांना ज्या प्रमाणे सर्व नातलगांना एकत्र बसून दोन कुटुंबाचे मन जुळवून सर्वांच्या साक्षीने लग्न लावले जाते.त्याच पद्धतीने नवरा बायकोत किंवा कुटुंबात वाद विवाद झाला असेल तर तेच लग्न जुळवतांना असलेल्या नातलगांनी समोरा समोर बसून चर्चा करून वाद मिटविण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे असे.न झाल्यास काय होते.​
 
​कोर्ट कचेरीत हे प्रकरणे जातात. त्यातून काहीच निष्पन होत नाही.समाजात कोणाचीच बदनामी होत नाही.होतो तो फक्त मानसिक शारीरिक आणि आर्थिक त्रास म्हणून सर्वानीच यांचा गंभीरपणे विचार केला पाहिजे.
​आई वडिलांचा त्याग आणि मुलांचे लग्न हे प्रत्येक घरात होत असे.म्हणुन 
प्रत्येक पुरूषाने हे जरूर वाचावे.पंचेचाळीशितल्या एका तरुणाच्या "पत्नीचा" आकस्मिक मृत्यु होतो.बर्‍याच लोकांनी नातलगांनी त्याला दूसर्‍या लग्नाचा सल्ला दिला. परंतु "माझ्या पत्नीने मला माझ्या मुलाच्या रुपात एक सुंदर भेट दिली आहे, त्याच्या पालन पोषणातच माझे ऊर्वरीत आयुष्य व्यतीत करेन आणि त्यातच माझ्या आयुष्याची धन्यता मानेन" असे म्हणत त्याने ते प्रकर्षाने लग्न करण्याचे टाळले.
 बघता बघता दिवस, महीने वर्षे निघून गेली. मुलगा मोठा झाला. आता पितापुत्र दोघे मिळून व्यवसाय करु लागले. मुलगा व्यवसायात तरबेज झाल्याचे पाहून याने आपली सारा व्यवसाय, संपत्ती, जमीन, जुमला सारं काही मुलाच्या नावावर केले. हे पीता महाशय आता आपल्या मित्रांच्या सोबत कधी त्यांच्या आॅफिस मध्ये, तर कधी मुलाच्या आॅफिस मध्ये असा इकडे तिकडे आपला वेळ व्यतीत करु लागले. थोडे दिवसात मुलाचेही लग्न झाले सुंदर सुन घरी आली.आता तर हे महाशय अगदी निश्चिंत झाले.बघता बघता मुलाच्या लग्नाला एक वर्ष झाले. एके दिवशी हे पीता महाशय घरी दूपारच्या जेवनास बसले. त्याचा मुलगाही दुपारच्या जेवणासाठी घरी आला होता. जेवताना यांनी आपल्या सुनेकडे दही मागितले. यावर सुनेने दही संपले आहे असे सांगितले. जेवण झाले. हे पीता महाशय हात धुवून दिवानखाण्यात सोफ्यावर बसले. मुलगा अजून जेवत होता. त्याने आपल्या बायकोकडे दही मागितले असता तीने लगेच कपाटातुन दह्याचे भांडे काढून त्याला वाढले व स्वतःलाही वाढून घेतले. जेवणानंतर मुलगा काही न बोलता आॅफिसला निघून गेला.दुसर्‍या दिवशी सकाळी मुलगा आपल्या वडीलांना म्हणाला "बाबा आज तयार व्हा आपण तुमच्या लग्नाची बोलणी करायला जाणार अहोत" पीता महाशयांना आपले काय चुकले हे समजेना. सावरत ते मुलाला म्हणाले "बाळा आता या वयात मला लग्नाची काय गरज आहे? तुला सुद्धा आजपर्यंत मी अगदी प्रेमाने, तुझ्या आईची कोणतीही कमतरता न भासू देता लहानाचा मोठा केला आहे. अर्थातच तुलाही आता दूसर्‍या आईची गरज नाही" यावर मुलगा म्हणाला "बाबा मला तुमच लग्न करायच आहे ते तुम्हाला दही वाढणारी आणण्यासाठी. ऊद्या पासून मी आणि माझी बायको भाड्याच्या घरात रहायला जातोय आणि त्याच बरोबर मी ऊद्यापासुन तुमची सारी मालमत्ता तुमचा सारा व्यवसाय तुमच्या नावावर करतोय आणि तुमच्या आॅफिसमध्ये एका सामान्य कामगारा प्रमाणे काम करणार आहे. हे असं झाल्याशिवाय एक वाटी दह्याची किंमत माझ्या बायकोला समजणार नाही."
कथा संकलित आहे परंतु समस्या अगदी गंभिर आहे आणि खरोखरच अशा संयमी आणि गंभिर मुलांची समाजास अत्यंत आवश्यकता आहे.मातापित्याचे ऊपकार कधीच फिटणार नाही
​.ज्या आई वडिलांनी ज्या अपेक्षेने मुलांचे लग्न करून दिले असते.त्याच आई वडिलांना म्हणजेच सासू सासऱ्यांना बाहेरून आलेली मुलगी अशी वागणूक देत असेल तर त्या जन्मदात्या आई वडिलांनी काय केले पाहिजे.ही आजच्या सर्व जातीच्या समाजातील कुटुंबातील गंभीर समस्या झाली आहे.कौटुंबिक न्यायालयात हजोरो केसेस चालू आहेत.वर्षांनी वर्ष तारिख वर तारीख केस चालतात.त्यात मुलामुलीचे आणि त्यांच्या कुटुंबाचे मानसिक शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या प्रचंड नुकसान होते.जे कधी भरून निघत नाही.ही समस्या एका कुटुंबाची नाही तर सर्व समाजाची आहे.धर्माची आहे.राज्याची आणि देशाची आहे. पोलीस आणि न्यायालयीन यंत्रणा खरेच न्याय देण्याचे प्रामाणिक काम करते काय?.पैसा असेल तर सर्व मिळेल.पैसा नसेल तर काय भोगावे लागते यांची माहिती घेण्यासाठी चारपाच दिवस कोर्टाच्या आवारात थांबा व पहा,
स्री पुरुष समानता च्या गप्पा मारणाऱ्या या राज्यात,देशात महिलांच्या बाजूने भरपूर कायदे आहेत.पण ते महिलांना न्याय देण्यास असमर्थ आहेत.बेचा
​रे ​
पुरुष 
महिलांच्या मानसिक त्रासामुळे व्यसनाधीन होत आहेत असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.मग ती महिला कोणी असू शकते.बायको, आई,बहिण,वाहिनी,सासु नणंद,देवरांनी,जेठानी हे सर्व पात्र आपण नियमित पणे वाहिन्यावर पाहत आहोत.कळी खुलता खुलेना.तू तिथे मी,तुज्यात जीव रंगला, काहे दिया परदेश,अधुरी ही कहाणी,सास भी बहु थी,सिरीयल मागे पडली असली तरी तिची जागा अनेक सिरीयल वेगवेगळ्या नावाने घेत आहेत. त्याची परिणाम कुटुंबा व्यवस्थेवर होत आहे.असे म्हटल्यास लिहल्यास चूक ठरणार नाही.सोशल मिडीयावर पुरुष महिलाच्या दररोजच्या वागण्यावर अनेक पोस्ट फिरत असतात.त्या लक्षवेधी असतात.
पुरुष जीवन भर संसार करण्यासाठी त्याग व संघर्ष करीत असतो. समाज काय म्हणेल या भीती पोटी सतत समझोता करीत राहतो.दुःख विसरण्यासाठी तो दररोज नशा करतो म्हणजे दारू पितो.सर्वच दुःखावर दारू हेच प्रभावी औषध आहे असे लोकांना वाटते पण आज पर्यंत कोणाचे दुःख नष्ट झाल्याचे उदाहरण नाही,पण त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊन कायमची बिमारी मागे लागल्याचे एक नाही हजारो उदाहरणे आहेत. म्हणुन प्रत्येक यशस्वी पुरुषांच्या मागे एक स्त्रीचा हात असतो,तसाच प्रत्येक व्यसनाधीन,अपयशी पुरुषांच्या मागे एका स्त्रीचाच हात असतो.म्हणुन प्रत्येक पुरुष हा स्त्रीयांचा बाप,पती,नवरा,मुलगा,भाऊ, जावई, सासरा,दीर,मामा,काका कोणी ना कोणी असतोच. म्हणुन एकत्र कुटुंबातील पुरुषांना नेहमी स्त्रीयांनी मानसन्मान दिलाच पाहिजे.तसाच पुरुषांनी स्त्रीयांना योग्य तो मानसन्मान दिला पाहिजे.हा संस्कार घरा घरातुन मुलामुलींवर झाला पाहिजे,तरच मुलगा आणि मुलगी लग्न करतांना म्हणेल मला एकत्र कुटुंबातील नवरा,किंवा बायको पाहिजे.कोणतीच मुलगी असे म्हणणार नाही नवरा हवा!.सासु सासरे नको.
​मातृसंस्था व्यवस्था आणि पुरुषसंस्था व्यवस्था म्हणजे काय?.यांची अभ्यासपूर्ण माहिती करून घेण्यासाठी होल्गा से गंगा हे ​राहुल सांकुल्यायन यांचे पुस्तक प्रत्येकांनी वाचलेच पाहिजे.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई,९९२०४०३८५९,

गद्दार आरक्षणाचे लाभार्थी

गद्दार आरक्षणाचे लाभार्थी
सरकार म्हणजे सत्ताधारी पक्ष, प्रशासन म्हणजे प्रशासकीय अधिकारी, राजकीय पक्ष सत्तेवर असतांना आणि अधिकारी पदावर असतांना दोन्ही गेंड्याच्या कातडीचे असतात.त्यांना तेव्हा खूप माज आलेला असतो.त्यात सरकारचे जावाई म्हणजे आरक्षणाचे लाभार्थी हे मोठया प्रमाणात आंबेडकरी विचारधारेशी चळवळीशी गद्दार झाले असतात. शिक्षणात व नोकरीत आरक्षण हे यांना विनामूल्य मिळाले आहे.कारण हे मिळविण्यासाठी ज्यांनी रस्त्यावर मोर्चा, आंदोलने केली ते सर्व असंघटीत, अशिक्षित अज्ञानी होते त्यांनी केवळ बाबासाहेबांवर विश्वास ठेवून जन आंदोलनात भाग घेतला. एक दिवसाची रोजीरोटी,मजुरी बुडेल याचा त्यांनी कधी विचारच केला नाही.पण आरक्षणाचे लाभार्थी एक दिवसाची रितसर रजा घेऊन कोणत्याही आंदोलनात स्वतः भाग घेत नाही की त्यांची बायको मुलामुलींना पाठवीत नाही.कारण त्यांच्या मुलांना शिक्षण,क्लास अभ्यास असतो. बायकांना मुलाचा अभ्यास घेणे व घरची कामे असतात. म्हणूनच ते कधीच जन आंदोलनात भाग घेत नाही.
आरक्षण हे केवळ राखीव जागा नसून, ते प्रशासनामधले आपले प्रतिनिधित्व निश्चित Lकरते. त्यामुळं प्रतिनिधित्व हा केवळ सद्यस्थितीत असलेल्या नोकरदारांचा प्रश्न नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचे दरवाजे बंद होणार आहेत. त्यामुळे या मोर्चासाठी संपूर्ण समाजानं एकवटण्याची आवश्यकता आहे.असे पदाधिकारी जनतेला आवाहन करतात.जनतेने आणि समाजाने मोर्चा आंदोलनात सहभागी का व्हावे?.जे आरक्षणाचे लाभार्थी आहेत तेच स्वतःच्या गांवाशी, समाजा शी बेईमान आहेत.काही अपवाद आहेत त्यांचे समाज व जनता नेहमी सन्मान करते.ग्रामसेवक ते सचिवालय पर्यत असलेल्या विविध क्षेत्रातील कर्मचारी, अधिकारी यांना समाजाच्या विकास व कल्याणकारी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतःहून कधी कोणता प्रयत्न केला काय?.ते त्यांनी जाहीर पणे सांगावे.असंघटीत कामगार, इमारत बांधकाम कामगार व इतर कामगार आपल्या समोर कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतांना दिसतात. त्यांना आपली माणस म्हणुन त्यांची कधी चौकशी केली काय ?. यासर्व मध्यम वर्गीयांच्या घरी काम करणाऱ्या घरकामगार महिलांची नांव नोंदणी स्वताहून केली काय?. मग या असंघटीत कामगार मजुरांनी यांच्या आंदोलन का  सहभागी व्हावे?.
३१ ऑक्टोबर च्या आरक्षण बचाव मोर्चात २८ संघटना,फेडरेशन,असोसिएशनचे किती लोक आरक्षणाचे लाभार्थीच्या आपल्या बायकामुलासह सहभागी झाले होते ते दिसले.आरक्षणाचे लाभार्थी पदोन्नतीतील आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द ठरविल्यामुळे प्रचंड असंतोष असला पाहिजे होता. त्यांचा तीव्र निषेध करण्यासाठी आरक्षणाच्या लाभार्थी कुटुंबांनी पेटून उठले पाहिजे होते.परंतु तसे  कुठे ही जाणवला नाही.आरक्षणाचे लाभार्थी भयभीत आहेत असे जे म्हटल्या जाते ते साफ चुकीचे आहे हे परिस्थिती नुसार दिसते. कारण यांच्या स्वतांच्या ट्रेंड युनियन आहेत काय?.तर नाही यांनी फेडरेशन, अशोसियशन बनविल्या,त्यांना ट्रेंड युनियन सारखा अधिकार नाही.
डॉ बाबासाहेबांनी १९३८ ला मनमाडच्या रेल्वे गॅंगमॅन कामगार परिषदेत सांगितले होती की मागासवर्गीय समाजाच्या कामगार,कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या ट्रेंड युनियन जेवढया लवकर बनविता येतील तेवढ्या लवकर बनवून त्या राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी म्हणजे इंडिपेडेंट लेबर युनियनशी (आय एल यु ) संलग्न कराव्यात. त्यांचे हे म्हणणे किती सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्या आरक्षणाच्या लाभार्थीनी ऐकले?. बहुतेक सरकारी नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या असोसिएशन,फेडरेशन बनविले आणि ते राष्ट्रीय ट्रेंड युनियन असलेल्या इंटक,आयटक,सिटू, बीएमएस,एचएमकेपीला अधिकृतपणे वार्षिक वर्गणी भरून मतदान करतात.तसेच देशातील सर्वात मोठे लक्षवेधी क्षेत्र रेल्वे,रेल्वेचे सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी सीआरएमएस किंवा एनआरएमएस, आरएमयु भाजपप्रणित ,काँग्रेस प्रणित आणि कम्युनिस्ट लाल बावटा प्रणित राष्ट्रीय ट्रेंड युनियन ला वार्षिक वर्गणी संघर्ष निधी देऊन मतदान करून मान्यता प्राप्त बनवितात.ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगार कर्मचाऱ्यांच्या भविष्य काळातील योजने बाबत अभ्यास करून नियोजन करतात. त्यांची नांवे वेगवेगळी असली तरी त्यांचे उद्धिष्ट एकच असते. जाती व्यवस्था, वर्ण व्यवस्था, हिंदुत्व, मनुवाद कायमस्वरूपी टिकून कसा राहील यासाठी वेगवेगळ्या मार्गाने मागासवर्गीय समाजाच्या संघटनेवर नियंत्रण ठेवणे त्यांचे नेतृत्व करणे. त्यांना भावनिक,धार्मिक कार्यक्रम देऊन गुंतवून ठेवणे. त्यातील संस्कृतीक गुलाम नेतृत्वाला राजकीय प्रतिनिधित्व देणे यालाच पुणे कराराचे फलित म्हटल्या जाते, मान्यवर कांशीराम त्यांना दलाल,चमचे म्हणतं होते.या राजकीय दलालांनी आणि आरक्षण लाभार्थीनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची क्रांतीकारी विचारधारा स्वार्थासाठी बोथट करून ठेवली.त्यांनी बाबासाहेबांनी दिलेल्या विनामूल्य आरक्षणाचा प्रामाणिक पणे लाभ घेऊन चळवळीसाठी प्रशासक,नियंत्रण म्हणून काम पाहिले असते, तर समाजात आजच्या सारखी गटबाजी निर्माण झाली नसती. स्वार्थी नेते जन्माला आलीच नसती.
तीन टक्के ब्राह्मण आर एस एस मार्फत देशातील सर्व ८५ टक्के मागासवर्गीय समाजावर नियंत्रण,प्रशासन ठेऊन विविध संस्था,संघटना पक्ष निर्माण करून देतात. आणि त्यांचे ध्येय गाठण्यासाठी योग्य वेळी त्यांना एकत्र आणतात.पण सत्ता संपत्ती हातची जाऊ देत नाही. देशभरात मागासवर्गीय समाज SC,ST, OBC,NT, VGNT,SBC,८५ टक्के असेल तर त्यातील ५२ टक्के मागासवर्गीय समाजातील लोक आरक्षणाचे लाभार्थीं आहेत.आरक्षणाचा लाभार्थी सर्व दुष्टटीने जागृत झाला असता तर शाळा, कॉलेज चालविणाऱ्या पीपल्स एज्युकेशन,रयत शिक्षण संस्था सारख्या शैक्षणिक संस्था आपल्या राज्यात नव्हे देशभरात निर्माण झाली असत्या.एक कोटी आरक्षणाचे लाभार्थी आणि त्यांच्या कुटुंबातील किमान चार लोक राजकीयदृष्ट्या जागृत होऊन रस्त्यावर उतरल्यावर काय होऊ शकते?. मागासवर्गीय समाजावर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार ३३ कोटी देवापेक्षा ही जास्त आहेत.मग आम्ही त्या महामानवास श्रेष्ठ मानत असाल तर  शिक्षण आणि नोकरी यातील आरक्षण वाचविण्यासाठी आपली राष्ट्रीय ट्रेंड युनियनशी संलग्न होऊन राष्ट्रीय संघ शक्ती निर्माण करावी लागेल.राजकिय लोकांच्या भरोष्यावर बसल्यास घरवापसी निश्चित आहे.आज जागृत झालात तरच आपल्या मुलामुलींचे भविष्य उज्वल असेल.
लक्षात घ्या आपल्याला शिक्षण व नोकरी मिळाली ते  बाबासाहेबानी दिलेल्या आरक्षणामुळे!.नोकरी लागली, तुमचे प्रोमोशन सुद्धा झाले,गाडी आली,बंगले झाले आणि तुम्ही तुमचा इतिहास विसरलात.बाबासाहेबांचा आदर्श घेणाऱ्या संघटनांना विसरलात.करण तुम्ही कर्मचारी,अधिकारी झाले,खुप पैसा कमावला म्हणून तुम्हाला समाजाची व संघटनांची गरज वाटली नाही. राष्ट्रीय ट्रेंड युनियन ची गरज वाटली नाही,ज्या राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहेत त्यांनी तुमच्या बाबत कोणती ठोस भूमिका घेतली ते जग जाहीर आहेच.
कामगार,कर्मचारी अधिकारी बंधुनो अजूनही वेळ गेलेली नाही,ज्या संघटना बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कार्य करत आहेत त्यांना योग्य मदत करा,चुकीचे असेल तर लोकशाही पध्दतीने सभासद,मतदार बनून अधिकृतपणे संघटने सोबत जोडून घ्या,ही एकजूट केवळ एक समस्या सोडवण्यासाठी नाही.तर सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय समीकरण बदलणारा दबाव गट म्हणुन कायमस्वरूपी राहली पाहिजे यासाठी एकत्र यावे आणि आरक्षणाचे लाभार्थी भयभीत नाहीत ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या स्वतंत्र मजदूर युनियन (आय,एल यु ) शी संलग्न होऊन क्रांतिकारक बदल घडवीण्यास सज्ज आहेत हे दाखवून द्यावे.
कोणत्याही एका राजकीय नेत्यांच्या मागे राहिल्यास मागासवर्गीय समाजाचे कोणतेच भले होणार नाही. राजकीय सौदेबाजी हे सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी त्यांना करावीच लागेल.पण कामगार, कर्मचारी,अधिकारी यांना कायमस्वरूपी नोकरी टिकवण्यासाठी स्वरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय विचारधारा मानणारी राष्ट्रीय ट्रेंड युनियनच हवी.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,
अध्यक्ष- स्वतंत्र मजदूर युनियन(ILU )महाराष्ट्र राज्य .

शेतकऱ्यांचा संप आणि भुमिहीन शेतमजुर

शेतकऱ्यांचा संप आणि भुमिहीन शेतमजुर 
कसेल त्यांची शेती मग नसेच त्याचे काय हा प्रश्न आज ही कायम आहे. गांव शिवारात शेती असणारे बहुसंख्य शेतकरी शेती विकून शहरात नोकरी करिता पैसे भरून कायमस्वरूपी नोकरी स्वीकारतात. पण शेतीत काम करीत नाही.शेती करण्यासाठी मागासवर्गीय समाजातील भूमीहीन शेतमजूर काही प्रमाणात उपलब्ध आहेत, सोबत आधुनिकीकरणाची कृषीयंत्रणा टॉक्टर, पेरणीपासुन मळणी पर्यंत सर्व कृषी अवजारे शेतकऱ्यांना सरकारी सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत.त्यामुळे काही शेतकरी वर्षाला लाखो नाही करोडो रुपयांचे उत्पन्न घेतात.हे स्टॅम्प पेपरवर लिहून देणारे एक नाही हजारो राजकीय पक्ष संघटनेत काम करणारे पदाधिकारी,कार्यकर्ते आणि नेते कुशल शेतकरी या राज्यात नव्हे तर देशात आहेत.ते बिचारे गरीब शेतकरी कर्जाच्या बोजाने पार खचुन गेले.काही जिल्ह्यातील नांवे सोशल मीडिया मुळे प्रसिद्धीच्या झोतात आहेत. त्यात साता-यातील कर्ज घेणारे गरीब शेतकरी पहा प्रभाकर घारगे ९२ लाख.अनिल देसाई ८५ लाख.आ.मकरंद पाटील ७२लाख. संजीवराजे निंबाळकर ६७ लाख.शिवांजली राजे ४८ लाख.हिंदूराव निंबाळकर ६९ लाख.लक्ष्मण पाटील १करोड ३लाख फक्त!. यातील सात पैकी ६ जण अत्यंत सामान्य आणि गरिबांच्या पक्षाचे " राष्ट्रवादी" चे आमदार,माजी खासदार आहेत, शेतकरी आंदोलनात संपात सर्व पक्षाचे गोरगरीब जिल्हा नेते,आजी माजी आमदार,खासदार आहेत.राज्य सरकार आणि प्रशासनातील बँक अधिकारी या गोरगरीब शेतकऱ्यावर कोणतीच कारवाई करण्याची हिंमत किंवा कर्तव्यदक्षता दाखवीत नाही.म्हणून शेतकऱ्यांच्या नुसती कर्ज माफी नको!. तर सरसकट कर्जमाफी का हवी आहे हे गोरगरिब शेतकऱ्यांना समजलं पाहिजे.शेतकरी कर्ज माफी साठी खालील गोष्टी चा विचार झाला पाहिजे.तरच शेतकऱ्यांना न्याय मिळेल.महाराष्ट्र राज्यातील सर्व खासदार,आमदार यांना कर्ज माफी देवू नये. ज्यानी निवडणूक लढवली त्याना कर्ज माफी देऊ नये. राज्यातील सर्व जिल्हापरिषद सभासद,आणि निवडणूक लढवणारे उमेदवार यांना कर्ज माफी देऊ नये. कारण त्यांनी निवडणूकी साठी किती खर्च केला हे सर्वाना माहित आहे. राज्यातील सर्व डॉक्टर, इंजिनिअर, वकील आणि प्राध्यापक याना कर्ज माफी देऊ नये.त्यांच्या नावावर जमीन असते,ती फक्त काळा पैसा पांढरा करण्यासाठी हे जग जाहीर आहे.सरकारी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक यांना सुद्धा माफी देऊ नये.त्यांच्याही नावावर जमीन असते.जे व्यापारी आहेत त्यांना ही माफी देऊ नये.कारण आज पर्यंत शेतकऱ्यांच्या नांवावर यांनी सर्वात मोठा लाभ घेतला आहे.यांची दक्षता घेतली तरच खऱ्या आणि गरजु शेतकऱ्यांना लाभ मिळेल. खरेच शेतकऱ्या बाबत कळवळा असेल तर ही हया मागण्या करा!!!
राजकीय दलाल,अडते,व्यापारी आणि नितीभ्रष्ट प्रशासकीय हे होऊ देतील?.
जगात एकमेव देश भारत आणि राज्य महाराष्ट्र असेल. जिथे सर्व धर्मीय व पक्षीय शेतकरी सरकार विरोधात जन आंदोलन व संप करतात.सरकार म्हणजे आकाशातुन पडलेली माणस नाहीत.तर या सर्व शेतकरी कुटुंबातील दहावी बारावी नापास झालेली बहुसंख्य गावांत जीवावर उद्धार होऊन समाज सेवा करणारे आडदांड पिळदार तरुण तडपदार गावांतून तालुख्यातुन आमदार झालेले आपलेच पोर पण ते फक्त सयाजीराव आहेत.त्यांना स्वतःची बुद्धी जशी गावांत दाखविली तशी विधानसभेत दाखविता येत नाही.तिथे पक्षाचे ध्येय धोरण आणि आदेशानुसार वागावे लागते.त्यांना शेतकऱ्या बदल कितीही प्रेम व आदर असला तरी काहीच करता येत नाही.म्हणुन सर्वच पक्ष शेतकऱ्यासाठी आंदोलन करण्याचे नाटक करतात.सरकारला न्याय मागण्यांचे ढोंग आहे असे म्हटल्यास चुक ठरणार नाही.
शेतकऱ्यांना लुटणारे चोर दलाल,अडते आणि व्यापारी डोळ्यासमोर दिसतात तरी त्यांच्यावर आम्ही कोणतीच कारवाई करू शकत नाही.म्हणे सरकारने निर्णय घ्यावा अजब न्याय पद्धत आहे ही?.एक नाही हजारो शेतकऱ्यांचे दुःख आम्ही वाचली आणि डोळ्याने पाहिली, त्यातील एक लक्षवेधी घटना नारायणगाव, तालुका जुन्नर,जिल्हा पुणे.एक धोंडिबा बाबा म्हातारे शेतकरी १२०० मेथीच्या जुड्या घेऊन लिलावाला येतात.बाबांना म्हटलं काहो बाबा तुम्ही आलात दुसरं कोणी नव्हतं का ? बाबा म्हणाले भाजी काढायची होती. लोड शेडिंग असल्या मुळे पोरग दोन दिवस रात्री भाजीला पाणी भरत होता.पाणी भरताना चिखलात काच घुसली अन घेतला पाय चिरून त्याचा कराडा आला होता (म्हणजे ताप होता) अंगात.म्हणुन मी आलो.अजून लिलावाला एक तास होता. दिवाळीचे दिवस होते. बाबांना म्हटलं झाली का तयारी दिवाळीची बाबा म्हटले नाही रे अजून आजच भाजी काढली सूनबाईन बाजार लिहून दिलाय. दोन नाती आहेत त्यांना पण फटाके कपडे घ्यायचे आहेत.पोराला पायाला ट्युब घ्यायची आहे. म्हातारीला चोळी अन मला कोपरी अन पोरी येतील भाऊबीजेला त्यांची खरेदी मी विचारलं गाडी भाडे किती आहे पिंपरी कावळ वरून बाबा म्हणे ८०० रुपये आणि मजूर किती होते भाजी काढायला ९ मजूर होते १८० रुपये रोजाचे मी,म्हातारी अन सुनबाई बांधायला अन दोन्ही नाती भाजी सावलीला वहायला.म्हणजे घरचे माणस धरून १४ होते.लिलाव जवळ आले काल परवा पर्यंत भाजी प्रती १०० जुडी ११०० ते १२०० भाव होता. मी सहज अंदाज लावला की बाबांची १२०० जुडी १००० रुपये म्हणजे १० रुपये जुडी गेली तरी १२००० रुपये येतील. चला बाबांची दिवाळी मजेत जाणार.९ मजूर x १८० = १६२० मजुरी गाडीभाडे = ८०० मार्केट फी = २०० मेथी बियाणे ८० x ५० = ४००० खते = १००० औषधे = २०० ते ४०० आणि रात्रंदिवस केलेले स्वतःचे कष्ट पाणी भरणे गवत काढणे वेगळे म्हणजे एकूण खर्च = ७ ते ८००० रुपये,
बाबांचा भाजीचा "लिलाव" झाला.३ रुपये प्रती जुडी-क्षणात हिशोब झाला ३६०० रुपये.बाबांनी माझ्याकडे बघितलं.त्यांच्या आधी माझ्याच डोळ्यांच्या कडा पाणावल्या.बाबा म्हणाले शेवटी नशीब पोरा "नशीब" !!!सांगा आता घरी जाताना तो काय उत्तर देणार घरच्यांना. सरकार पैसे देतो आत्महत्या करणाऱ्यांना म्हणून हौस आलीये का त्याला अात्महत्त्या करण्याची सत्ता कोणाची हे महत्त्वाचं नाही.शेतकऱ्यांना "न्याय" मिळाला पाहिजे. बस्स, त्याच्या मागे खंबीर पणे सगळ्यांनी उभं राहील पाहिजे.ही भाकडकथा नसून "सत्यकथा" आहे. ती प्रत्येक शेतकऱ्याची "गाथा"आहे.थोतांड वाटत असल्यास एक दिवस एअर कंडिशन गाडी घेवून ग्रामिण भागातील लिलाव मार्केटला "पिकनीक" करुन या.हे शेतकऱ्यांच्या गंभीर समस्यावर रात्रन दिवस आंदोलन करण्याचे प्रचंड ढोंग करून सत्ता परिवर्तन करणाऱ्या आजच्या सेना भाजप सरकारच्या भूमिकेची दररोज सोशल मीडियावर चिरफाड होते,त्यातील ही एक पोस्ट आहे.एकच पोस्ट हजारो लोकां पर्यंत पोचते लोक वाचतात आणि विसरून जातात.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतत लिहणारे बोलणारे शेतमजुरांच्या प्रश्नावर कधी लिहतांना पाहिले काय?.
पिढीजात शेतकरी घराणे आणि पिढीजात राजकारणी घराणे आता निसर्गाच्या नियमाने बदलत आहे.त्याच प्रमाणे पिढीजात सालदारी शेतमजुरी करणारे शेतमजुरांची मुलेमुली आता शेतात नाही तर शहरात मजुरी करतात आणि भारतीय संविधानामुळे त्यांना  मूलभूत अधिकार कुठेही मिळविता येतात.अन्न, वस्त्र,निवारा,शिक्षण,आरोग्य आणि रोजगार आता कुठेही मिळविता येतो, ते असंघटीत अज्ञानी,अशिक्षित मागासवर्गीय असले तरी आत्महत्या करीत नाही.सरकार त्यांची गावात पण नोंद घेत नाही आणि शहरात पण नोंद घेत नाही.परंतु त्यांच्या श्रमाची चोरी करणारे गावात पण आहेत आणि शहरात पण आहेत.शेतकऱ्यांना शेतमजुरांना जात धर्म नसेल तर शेतकऱ्यांची शेतमजुरांची आर्थिक कोंडी करणारे कोण आहेत?. महात्मा ज्योतिबा फुले यांनी१८८० साली आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 फेब्रुवारी १९३८ ला मनमाड येथे तेच सांगितले असंघटीत शेतकरी,शेतमजुर आणि कामगारांचे दोनच शत्रु आहेत एक भांडवलशाही दुसरी ब्राम्हणशाही. कॉग्रेसचे आघाडी सरकार गेले आणि भाजप सेनेचे युती सरकार आले. शेतकरी आणि भूमिहीन शेतमजुरांना काय फरक पडला?.आर्थिक शोषण वाढलं की कमी झाले?.सरकार सरकार बोबळत बसू नका,शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करणारे तालुक्यातील राजकीय,सरकारी दलाल,अडते आणि व्यापारी जागोजागी ठोकून काढा. त्यांच्या एकूण वार्षिक उत्पन्नाची जाहीर झाडाझडती घ्या,सनदशीर मार्गाने त्यांची माहिती घ्या आणि त्यांच्यावर कारवाई करण्यास स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यास भाग पाडा.म्हणजे सरकार जाग्यावर येईल. त्याशिवाय पर्याय नाही.
सागर रामभाऊ तायडे, भांडूप, मुंबई-९९२०४०३८५९