गोष्ट सासूच्या अज्ञानाची आणि सुनेच्या विज्ञानाची
गुरुवार, २९ सप्टेंबर, २०२२
गोष्ट सासूच्या अज्ञानाची आणि सुनेच्या विज्ञानाची
अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.
अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.
वर्णव्यवस्था निर्माण करणाऱ्या समाजाला बुद्धाच्या काळा पासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळा पर्यंत थारा नव्हता.तरी ते तीन टक्के शेंडी वाल्यांनी समाजात कटकारस्थान,षंढयंत्र निर्माण करून सत्ताधारी वर्गाच्या राजाच्या विरोधात असंतोष निर्माण करून समाजात दंगली घडविल्या आहेत.त्यात बहुसंख्य लोकांचा रोजगार देणारे उद्योग बुडविला जातो. हीच परंपरा वेगवेगळ्या राज्यात राबविली जाते.त्यासाठी अण्णाजी पंत निर्माण केले जातात. महारष्ट्रात असा अण्णाजी पंत निर्माण झाला आहे.म्हणूनच हा अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचे मित्र की शत्रु ?.असा प्रश्न पडतो.
अण्णाजी पंत-फडणवीस महाराष्ट्राचा सत्ताधारी झाल्या नंतर या उद्योगांनी महाराष्ट्र सोडला रायगडमधील बल्क ड्रग पार्क,महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र,नागपूर इथलं राष्ट्रीय कामगार शिक्षण मंडळ,जहाज तोडणी उद्योग,पालघरमधील सागरी पोलीस अकादमी,एअर इंडिया मुख्यालय,ट्रेडमार्क पेटंट कार्यालय असे अनेक उद्योग आणि कार्यालयं राज्याबाहेर गेली आहेत.एखादा उद्योग,कार्यालय राज्यातून स्थलांतरित होणं म्हणजे भूमीपुत्रांच्या रोजगारावर गदा येण्यासारखंच आहे. आधीच महागाई आणि बेरोजगारीनं जनता त्रासलीय त्यात उद्योग स्थलांतरित होत राहिले तर याचा थेट परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतो.हिंदुत्वाचा मुखवटा धरण करून मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन सांगणारे अण्णाजी पंत-देवेंद्र फडणवीस रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र केली.ज्या प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मराठा सरदारांना अण्णाजी पंतानी फितूर केले त्याच पद्धतीने मराठी हिंदू हृद्य सम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या शिवसेना मधील मराठा आमदारांना इडी इन्कमटॅक्सची भिती दाखवून फितूर केले. मुंबई ते सुरत प्रवास करतांना हिंदुत्वासाठी हा मुख्य मुद्धा होता.सुरत ते गुवाहाटी प्रवास करतांना मुद्धा आमदार निधी कडे वळला,गुवाहाटी ते गोवा प्रवासात मुद्धा पन्नास खोके सर्व ओके कडे वळला.अण्णाजी पंत माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असणार हे जवळ जवळ निश्चित असतांना गोवा ते मुंबई राजभवन प्रवासात काही तरी वेगळे घडले दिल्लीश्वरांनी मी पुन्हा येईन म्हणणाऱ्यांना एक नंबर वरून दोन नंबर वर राहण्यास सांगितले.आणि धोबी का कुत्ता घरका ना घटका झाला.असे चित्र निर्माण केले गेले.पण सत्य चित्र तसे नाही,तर एकनाथाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सर्व मराठी माणसांची महाराष्ट्राची शिकार हे आण्णाजी पंत देवेंद्र फडणवीस करीत आहेत.हे पुन्हा पुन्हा सिद्ध होत आहे.त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे वीस दिवसात महा राष्ट्रातून गुजरात मध्ये गेलेला वेदांता-फॉकस्कॉन प्रकल्प होय.
कोणतीही पूर्व सूचना न देता आदरणीय नरेंद्र मोदींनी २४ मार्च २०२१ देशात सुरु झालेला लॉक डाऊन नंतर चा इतिहास डोळ्या समोर आणा.असंघटीत कामगारांची झालेली दैना विसरू नका.जगात सर्वत्र कोरोनाने हाहाकार माजवला होता. जगात ज्या ज्या देशात कोरोना आहे त्या देशातील सत्ताधारी पक्ष,विरोधी पक्ष,नागरिक,डॉक्टर,परिचारिका,
ओबीसी चळवळ ही मागासवर्गीय भारताची राष्ट्रीय चळवळ आहे.(आंबेडकरी)
ओबीसी चळवळ ही मागासवर्गीय भारताची राष्ट्रीय चळवळ आहे.(आंबेडकरी)
वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू
वृत्तपत्रांची विचारसरणी आणि अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू
मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली???.
मराठी हिंदू ह्र्दय सम्राटाची दहशत कोणी संपली???.
खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील जन्म २२ सप्टेंबर १३५ व्या जयंतीनिमित्त
खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील
कर्मवीर भाऊराव पाटील जन्म २२ सप्टेंबर १८८७; कुंभोज,जिल्हा कोल्हापूर, महाराष्ट्र येथे झाला.ते मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली.भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते.आणि त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग घेतला होता. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय.लहानपणा पासूनच भाऊराव बंडखोर वृत्तीचे होते. अन्याय अत्याचाराची त्यांना प्रचंड चीड होती.अस्पृश्यता पाळणाऱ्या बद्दल त्यांच्या मनात प्रचंड राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता.त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला होता.पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर,भाऊसाहेब कुदळे,नानासाहेब येडेकर आदि मंडळीं बरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले होते. याच संस्थेमार्फत सर्व जाती धर्मांच्या मुलांसाठी एक वस्तीगृह त्यांनी सुरू केले होते. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले.पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले.याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला होता.त्यामुळे त्यात त्यांनी समाजात परिवर्तन घडविण्या साठी प्रथम शिक्षण संस्थाची सुरवात केली.त्याच्या कार्याला डॉ नागनाथअण्णा नायकवडी यांनी एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची प्रथम देणगी देऊन मोलाचे सहकार्य केले.आणि इतिहास लिहला गेला.
मागासवर्गीय समाजाच्या मुलामुलीला शिक्षण घेण्या साठी साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला होता. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली होती. २५ फेब्रुवारी,इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे "श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस" असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली.जून १६,इ.स.१९३५रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी 'सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज' सुरू केले.करवीर नगरीत सत्यशोधक समाजाचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी आपल्या संस्थानात प्रजेचा कायापालट घडवून आणण्यासाठी सत्यशोधक चळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले होते. कर्मवीर अण्णा तर राजर्षी शाहू महाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यात सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला. सत्यशोधक समाजाच्या विचाराने भारावलेली एक पिढी त्यांनी घडविली.जेव्हा सातारा जिल्ह्यात सत्यशोधक समाजाने लोक जागृतीसाठी जलसे काढले तेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठी मागेपुढेही पाहिले नाही.सन १९१९ साली सातारा जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधिवेशन घेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी एक खास संस्था काढण्याची कल्पना मांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात त्यास मान्यता मिळाली. अशा रितीने रयत शिक्षण संस्थेचे बीज सत्यशोधक समाजाच्या विचारपीठावर रोवले गेले. वृक्षाखाली गौतम बुध्दांना ज्ञान प्राप्त झाले.बहुजन हिताय ! बहुजन सुखाय !! हे गौतम बुध्दांचे संदेश आहे म्हणून संस्थचे बोधिचिन्ह वटवृक्ष आहे.
देशातील भाऊरावांनी देशातले "कमवा आणि शिका" या पद्धतीने चालणारे पहिले 'फ्री अन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल' सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले 'महाराजा सयाजीराव हायस्कूल.' यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात 'छत्रपती शिवाजी कॉलेज' ची, तर १९५४ साली कराड येथे '(संत )सदगुरू गाडगे महाराज कॉलेज' ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने 'आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन' सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापने मागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे कर्मवीर भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा ज्योतीराव फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा ज्योतीराव फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. "प्रत्येक गावात शाळा"; 'बहुजन समाजातील शिक्षक' व शिक्षक प्रशिक्षण - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.हाच आदर्श मराठा समाजा ने कायम डोळ्या समोर ठेवला असतात तर आज राज्यात मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. कारण आज राज्यात नव्हे तर देशात शाळा महाविद्यालय जरी मराठा समाजाच्या असल्या तरी त्याची शिक्षण देणारी यंत्रणा भटा ब्राम्हणाच्या हाती आहेत. त्यांना बहुजन हिताय बहुजन सुखाय नको आहे.
महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला.तसेच केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले.पुणे विद्यापीठाने त्यांचा १९५९ मध्ये सन्माननीय डी.लिट.ही पदवी दिली होती.हा ऐतिहासिक इतिहास बहुजन समाजातील लोक विशेष मराठा समाजातील तरुण वाचत नाही.म्हणून त्यांना सांगावे वाटते जो इतिहास वाचतो तोच इतिहास घडविण्यासाठी झटतो. मागासवर्गीय समाजाची शिक्षण आणि नोकरीतील प्रगती पाहून त्याचे आरक्षण बंद करण्या करिता नाना प्रकारे जनांदोलन उभारल्या जाते.त्यांनी मागासवर्गीय समाजात सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बदल घडविण्या साठी फुले,शाहू,आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा ऐतिहासिक त्याग आणि संघर्ष आहे हे कोणी विसरू नये. खरे शिक्षण सम्राट कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या २२ सप्टेंबर जयंती असते.पण मुंबईसह राज्यातील मराठी वृतपत्र कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती दिनाची साधी दखल घेत नाही.यांची खंत वाटते.म्हणजे किती मराठी पत्रकार संपादक कोणत्या संताची महापुरुषांची दाखल घेवावी या बाबत दक्ष आहेत हे दिसून येते हा लेख जयंतीनिमित्त दरवर्षी लिहतो असतो. त्यांची दखल काही वृतपत्र घेऊन लेख प्रसिद्ध करतात.त्यांचे हार्दिक अभिनंदन.जे करीत नाही त्यांचं बद्दल खंत वाटते. इतिहास लपविला म्हणजे तो खोटा ठरत नाही किंवा त्याचे महत्व कमी होत नाही.मंदिरावर लिहणारे पत्रकार,साहित्यिक,विचारवंत खूप आहेत.पण शाळा कॉलेजची आजची परिस्थिती तिची दिशा आणि दशा यावर लिहतांना फारसे कोणी दिसत नाही.म्हणूनच आजच्या परिस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील यांचे शिक्षण क्षेत्रांतील कार्य अजरामर आहे. आणि राहणार आहे. आजच्या शिक्षण क्षेत्रातील संस्था संचालकांनी,प्राध्यापक,शिक्षक यांनी प्रेरणा घेऊन प्रबोधन करावे. कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या क्रांतिकारी विचारांतून आजच्या विध्यार्थांना प्रेरणा मिळू शकते आणि तेच देशाचे सुजान नागरिक घडू शकतात. अशा खऱ्या शिक्षण सम्राटांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांना व प्रतिमेला त्रिवार अभिवादन, वाचकांना हार्दिक शुभेच्छा.
बुधवार, २८ सप्टेंबर, २०२२
गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवा.
गणपती बाटवणाऱ्या महारांना धडा शिकवा.




.jpg)


