गुरुवार, ७ नोव्हेंबर, २०२४

 क्रांतिकारी आंबेडकरी विचारांचा प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा!.



असंघटीत कामगार सर्वात जास्त कोणत्या जाती धर्माचे आहेतहे जग जाहीर आहे.पण त्याच बरोबर संघटीत कामगार आणि कर्मचारी कोणत्या जाती धर्माचे आहेत, यांची राज्य,केंद्र सरकार कडे रीतसर नोंद आहे.कामगार असंघटीत असो अथवा संघटित कामगार यांनीच जगात सामाजिक, राजकीय क्रांत्या घडविल्या हा इतिहास आहे.मग जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही असे म्हटल्या जाते हे शंभर टक्के सत्य आहे. मानवाला दुःख मुक्त करण्याचा संदेश देणारे जगात पाहिले मानव महापुरुष, महासंत तथागत गौतम बुद्ध होत,त्यांनी अडीच वर्षा पूर्वी सांगितले होते,गुलामला माणसा सारखे वागवा. सावकार, शेतकरी,राजे,महाराज्यांनी गुलामाला माणसा सारखी वागवणुक दिली. त्यामुळे त्यांच्या वार्षिक उत्पन्नात प्रचंड भर पडली आणि बदल घडला,त्याच प्रमाणे भारतीय कामगार संघटनेचा इतिहास महात्मा फुलेचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या पासून सुरू होतो.त्यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन या कामगार संघटनेची स्थापना १८८४ मध्ये केली म्हणून त्यांना कामगार चळवळीचे जनक आम्ही म्हणतो.कारण त्यांनी गिरण्यातील कारखान्यातील असंघटीत कामगार कर्मचाऱ्यांना देशात प्रथम संघटित केले.आणि संघर्ष करून अनेक अधिकार मिळवुन दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३४ ला स्वतंत्र मजदूर युनियनची Independent Labour Union,(ILU).स्थापना केली, हे सर्व क्षेत्रातील संघटित असंघटीत कामगारांचे राष्ट्रीय फेडरेशन असेल.असी त्यांची संकल्पना होती,१९३४ ते १९३६ पर्यंत त्यांनी अतिशय दुर्लक्षित अज्ञानी,असंघटीत सफाई कामगार, दगड फोडणारे खाण कामगार, कोळसा खाणीत काम करणारे कामगार यांची खाणीत जाऊन पाहणी केली, मुंबईतील सफाई कामगार कर्मचारी यांची १९३७ साली म्युनिसिपल कामगार संघ ही ट्रेड युनियन स्थापन केली.
मुंबई ही भारताची औधोगिक आणि आर्थिक राजधानी आहे.म्युनिसिपल कामगार संघ मुंबईतुन राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका मध्ये मागासवर्गीय समाजाची आंबेडकरी विचारधारा असणारी ट्रेंड युनियन असायला पाहिजे होती.देशभरातील सर्व महानगरपालिका,नगरपालिकेतील कामगार कर्मचारी हे आय एल यु चे सभासद होऊन आय एल यु हे देशव्यापी आंबेडकरी विचारधारेचे ट्रेंड युनियन महासंघ असता.पण तसा प्रयत्न झाला नाही असे म्हणता येत नाही,प्रयत्न झाला पण तो एक खांबी नेतृत्वात झाला.ज्या क्षेत्रातील जो तज्ञ असेल त्यांनीच त्याचे नेतृत्व केले पाहिजे.केवळ तज्ञ असुन चालत नाही,त्यात कुशल वक्तृत्व कौशल्य,संघटन कौशल्य आणि सर्वांना सोबत घेऊन अचूक निर्णय घेण्याचे कौशल्य आवश्यक असते.परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या कोणत्याही संस्था,संघटना,पक्षात लोकशाही नुसार सभासद नोंदणी होऊन तिमाही,सहामाही,वार्षिक बैठका होत नाहीत,त्यांचे रीतसर रिकार्ड ठेऊन त्रिवार्षिक, पंचवार्षिक निवडणूका होत नाही.एकच नेता धार्मिक,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात नेतृत्व करतो,तोच नेता त्यांच्याशी प्रामाणिक,लाचारी पत्कारून चमचागिरी करीत असतो त्यालाच कार्यकर्ता पदसिद्ध पदाधिकारी बनतो.तो संस्था,संघटना आणि पक्ष वाढीसाठी काहीच करू शकत नाही,तो फक्त साहेबाला खुश ठेऊ शकतो.कुशल संघटक,कुशल वक्ता आणि कुशल नेतृत्व असणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांचे प्रवेशद्वार बंद असते. कौशल्य, गुणवत्ता दाखवुन नेतृत्व मिळाल्यास संस्था, संघटना आणि पक्ष मोठे होतात.जिल्ह्यात राज्यात दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेता निर्माण होणार नाही यांची काळजी घेणारे नेते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूळ संस्था, संघटना आणि पक्ष वाढविण्यासाठी असमर्थ ठरले म्हणून त्यांनी स्वतःच्या संस्था, संघटना आणि पक्ष काढून स्वतःच संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष झाले.त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक आणि राजकीय संस्था, संघटना आणि पक्षात लोकशाही मार्गाने सभासद होऊन काम करून निवडणूका घेण्यासाठी भाग पाडावे त्याकरिता निःपक्षपाती,निस्वार्थी,निर्भीड पणे विचारधारे वर प्रामाणिक पणे काम केल्यास सर्वच समाजाचा राज्याचा देशाचा विकास आणि कल्याण निश्चितच झाला असता. 
आम्हाला बाबासाहेबांचे शब्द कधीच आठवत नाही. बाबासाहेब म्हणतात मी जेवढी गरिबी अनुभवली असेल, तेवढी देशातील कोणत्याच नेत्याने अनुभवली नसेल, मी गरिब असून कधीही गरिबीचे कारण सांगून माझा स्वाभीमान व माझे आंदोलन कमी होऊ दिले नाही, ऐवढी गरिबी असूनही मी कधीही पैशासाठी, पदासाठी विकलो गेलो नाही आणि तेच ध्येय प्रत्येक कामगार कर्मचारी यांनी डोळ्यासमोर ठेवून काम केल्यास.सत्ता कोणाची ही असो प्रशासन आपलेच असेल.आणि आपल्या रक्ताच्या माणसासांठीच काम करेल.
असा कामगार कर्मचारी आणि अधिकारी निर्माण झाला पाहिजे. हेच कामगार,कर्मचारी आणि अधिकारी वर्गांचे ट्रेंड युनियन जाळे आर एस एस ने देशभर नव्हे जगभर निर्माण केले. आज ग्रामपंचायत ते सचिवालय पर्यंत त्यांचेच कामगार कर्मचारी अधिकारी कसे काम करतात त्यांचे अनेक उदाहरण दररोज वृतपत्रात नियमित वाचायला मिळतात. मागासवर्गीय समाजावर अन्याय अत्याचार करणारे आरोपी गावात,शहरात मोकाट फिरतात पोलिस अधिकारी कारवाई करण्यास असमर्थ का असतात?. कारण कायद्या पेक्षा बाहेरील शक्ती मोठी असते.तिच्या दडपणाखाली कामगार,कर्मचारी,अधिकारीवर्ग काम करतो.म्हणुन त्यांचे स्वरक्षण करणारी यंत्रणा म्हणजे शासन प्रशासन असते.त्यांच्यावर ज्या विचारधारेच्या युनियनचे प्राबल्य आणि नेतृत्व असते.त्यांच्या दडपणाखाली हे सर्व प्रशासन काम करते.
मागासवर्गीय कामगार कर्मचारी विचाराने एकत्र आल्यास काय होऊ शकते त्यांचे हे उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत कामगार कर्मचारी संघटना. ही ३९ वर्षापूर्वी स्थापन झाली आहे, त्यांनीच देशव्यापी विद्युत फेडरेशन २००० ला बनविले.त्यांच्याच प्रयत्नाने स्वतंत्र मजदूर युनियन २००३ ला नव्याने स्थापना झाली.आज महाराष्ट्रातील असंघटित कामगारांना सोबत घेवून स्वतंत्र मजदूर युनियन देशभरात बावीस राज्यात आणि सतरा क्षेत्रात आदरणीय जे एस पाटील यांच्या त्यागी कुशल नेतृत्वाखाली लक्षवेधी वाटचाल करीत आहे. 
आरक्षण पदोन्नती आणि नवीन भरती ह्यात मागासवर्गीय समाजाच्या कामगार कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून दूर ठेवण्यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी कामगार कर्मचारी अधिकारी यांच्या शिक्षणाकरिता १९५६ ला एक संस्था स्थापन केली होती. त्यात विषय ठेवले होते राजकारण, अर्थकारण,बजेट व कामगार क्षेत्र,यावरून बाबासाहेब कामगार क्षेत्राला किती महत्व देत होते हे कळून येते. आम्हाला जो इतिहास घडवावयाचा आहे तो सर्व क्षेत्रातील कामगार कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन घडवावा लागेल. 
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही इंजिनियर रमेश रंगारी आणि जे एस पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाली होती.या कर्मचारी संघटनेच्या आपल्या २२ पतसंस्था आहेत.स्वतंत्र मजदूर युनियनचा प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षक  असला पाहिजे.त्यांनी कामगार कर्मचारी यांना आय एल यु चे धेय्य धोरणे कार्यप्रणाली समजावून सांगितली पाहिजे. आज अनेक संघटनेचे कार्यकर्ते,वरिष्ठ इंजीनिअर व अधिकारी संघटनेचे कार्यकर्ते स्वताच्या संघटना युनियनचे ध्येय धोरणे समजून सांगण्यास असमर्थ आहेत.म्हणूनच ते इंटक,आयटक,सिटू,भारतीय मजदूर संघाच्या नेतृत्वाखाली काम करतात. त्या पदवीधरांना स्वार्थासाठी ट्रेड युनियनच्या विचारांशी काही देणेघेणे नाही. पदोन्नती मधील आरक्षणाचा गंभीर प्रश्न असतांना आजच्या घडीला अडीच तीन लाख कर्मचारी अधिकारी पदोन्नती आरक्षणाला विरोध करणाऱ्या संघटना युनियनचे सभासद व आर्थिक देणगीदार आहेत.त्या आर्थिक बळावर ते सर्वोच्य न्यायालयात दिवसाला पंचवीस लाख रुपये घेणारा वकील उभा करीत आहेत.त्यांच्या वकीला समोर आपल्या वकिलाना जास्त वेळ बोलण्याची संधी न्यायमूर्ती देत नाही.तिथे ही उच्चवर्णीय समाजाची विषमतावादी व्यवस्था योग्य त्या पद्धतीने काम करते.याची जाणीव बहुसंख्य आरक्षण लाभार्थी मागासवर्गीय कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्गांना नाही.ते अजूनही वेगवेगळ्या संघटना युनियन मध्ये विभागलेले आहेत.काय फरक आहे विषमतावादी आणि समतावादी विचारांच्या ट्रेड युनियन मध्ये हे समजून घेणे आजच्या परिस्थितीत अतिशय आवश्यक आहे.
कामगार कायदा १९२६ व सोसायटी कायदा १८६० जो सरकारी कर्मचारी अधिकारी यांना माहिती असला पाहिजे.कामगार क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या संघटना व त्यांची देशपातळीवरील सभासद संख्या आणि त्या संघटनेचे राजकिय स्वरूप. स्वतंत्र मजदूर युनियन व राष्ट्रीयपातळीवरील ट्रेड युनियन,संघटनेमधील फरक.
स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) शी संलग्न असलेल्या संघटित व असंघटित कामगार कर्मचारी संघटना आणि त्यांची सभासद संख्या.तिच्या वाढीसाठी उपाय योजना.  नगरपालिका व जिल्हापरिषद येथे असलेल्या संघटनेतील आपल्या कामगारांना क्रांतिकारी आंबेडकरी विचारांच्या संघटनेचा पर्याय उपलब्द करून देण्यासाठी जनसंपर्क जनजागृती देण्यावर भर असला पाहिजे.असलेल्या संघटनांना आय.एल.यु शी संलग्न करून घेण्यासाठी वैचारिक प्रबोधन.असंघटित कामगारांच्या अडचणी व त्यावर उपाय. बाबासाहेबांचे कामगारापुढे दिलेले मनमाड व दिल्ली येथील भाषणाचे सार समजावून सांगून यातून जे कामगार कर्मचारी अधिकारी कार्यकर्ते म्हणून तयार होतील त्यांचे विभागीय पातळीवर एक दिवसाचे प्रशिक्षण शिबीर घेतल्या गेल्यास संघटनेकडे प्रशिक्षित कार्यकर्ता नेता नेतृत्व करण्यास सक्षम होईल.
उच्चशिक्षित उच्चपदस्थ अधिकारी सेवा निवृत्तीनंतर काय करतात?.आर एस एस वर टिका करने सोपी आहे, पण त्यांच्या विचारांचा प्रशिक्षित वाहक तयार करून घरदार कुटुंब सोडून पूर्णवेळ समाजात काम करणारा स्वयंसेवक आपण पाहत नाही.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता सैनिक दलाची संकल्पना त्यांनी शंभर टक्के अमलात आणली. आपण मात्र चर्चाच करतो. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांची राष्ट्रीय पातळीवरील ट्रेड युनियन स्वतंत्र मजदूर युनियन मान्यताप्राप्त करण्यासाठी आदरणीय जे.एस.पाटील निवृत्तीनंतर ही पायाला भिंगरी बधून देशभर संघटन बांधणीसाठी फिरत आहेत. लॉक डाऊन सारखी परिस्थिती असतांना ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मिटिंगा घेतल्या.शासन कर्ती जमात बनण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रशिक्षित कार्यकर्ता नेता हवा होता. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना त्यागी जिद्दी अभ्यासू कार्यकर्त्याची नेत्याची गरज होती.ती पूर्ण करण्याची जबाबदारी जे एस पाटील साहेब स्वतंत्र मजदूर युनियनच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहेत.देशातील सर्व मागासवर्गीय कामगार कर्मचारी अधिकारी यांनी प्रामाणिकपणे सहकार्य केल्यास २०२२/२३ ला शंभर टक्के आपण यशस्वी झाल्या शिवाय राहणार नाही. म्हणूनच शासन करती जमात बनायचे असेल तर प्रशिक्षित कार्यकर्ता व नेताची आवश्यकता आहे.
सागर रामभाऊ तायडे९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य

कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट

 कुठे थांबायचे नक्की झालं तो संतुष्ट



    कौन बनेगा करोडपती हा बौद्धिक,मनोरंजनाचा कार्यक्रम मला अतिशय आवडतो. आपल्या बुद्धीत भर पडते.जेंव्हा जेंव्हा माझं उत्तर बरोबर येतं तेव्हा मला खूप आनंद होतो.परवाच्या भागात फास्टेस्ट फिंगर मध्ये अव्वल ठरलेले नीरज सक्सेना हाॅट सीटवर आले.एकदम शांत रीतीने बसले.किंचाळत,डान्स करत,रडत,हात उंचावत, अमिताभला जोरात मिठी मारत यातलं त्यांनी काहीही केलं नाही.ओळख सांगायची तर ते सायंटिस्ट आहेत.पीएचडी आहेत व कोलकत्यातील एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत.अतिशय प्रसन्न,साधं व्यक्तिमत्त्व.डाॅ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसोबत काम करायला मिळालं हे जीवनातील भाग्य ते समजतात. त्यांनी सांगितलं की प्रथम मी माझाच विचार करत होतो परंतु कलामांच्या सान्निध्यात राहून मी माझ्याबरोबर दुसऱ्यांचा व राष्ट्राचा विचार करू लागलो. 
    नीरजजी खेळू लागले. एकदा ऑडियन्स पोल घेतलं परंतु दुगुनास्त्रमुळे त्यांना ती लाईफ लाईन पुन्हा मिळाली.सर्व प्रश्नांची उत्तरं त्यांनी सफाईदारपणे दिली.त्यांच्या बुद्धीमत्तेची चुणूक पाहून थक्क व्हायला झालं.तीन लाख वीस हजार जिंकून,बोनस तेवढीच रक्कम मिळविली मग ब्रेक झाला. ब्रेक नंतर अमिताभ बोलू लागले.चलिए डाॅक्टरसाब अब आप के सामने आ रहा है ग्यारह वा प्रश्न..ए रहा प्रश्न..इतक्यात नीरजजी म्हणाले..सर मैं क्विट करना चाहता हूँ.. अमिताभ बच्चन यांना आश्चर्य वाटले. इतकं चांगलं खेळणारे,तीन लाईफ लाईन जीवित असताना.करोड रुपये सहज जिंकतील असं असताना खेळ सोडत आहेत का?विचारलं..आज तक ऐसा कभी हुआ नही. 
नीरजजी शांतपणे म्हणाले.माझ्या शिवाय आणखी खेळाडू वाट पहात आहेत व ते माझ्या पेक्षा लहान आहेत.त्यांनाही संधी मिळाली पाहिजे तसं तर मला खूप पैसे मिळाले आहेत.मला वाटतं "जो प्राप्त है पर्याप्त है." अधिक की आशा नही है.अमिताभ बच्चन अवाक् झाले.सर्वत्र शांतता पसरली.एक सेकंद स्तब्धता होती.नंतर सर्वांनी खूप वेळ उभं राहून टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक केलं.अमिताभ म्हणाले..खूप काही शिकायला मिळालं. नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आज पहायला मिळाली.खरं तर एवढी संधी समोर असताना केवळ दुसऱ्यांना संधी मिळावी व जे मिळालं तेवढं खूप आहे असा विचार करणारी पहिलीच व्यक्ती माझ्या पाहण्यात आली.मनातून मी त्यांना नमस्कार केला. 
   आज जगात केवळ पैसा कमविण्यासाठी माणूस धडपडत आहे. कितीही पैसा कमवला तरी समाधान नाही.हाव कमी होत नाही.कमीच पडतो.या पैशा मागे लागून घर,झोप,न नाती,प्रेम,मैत्री या साऱ्या गोष्टींना तो मुकत आहे. पैशाचा हव्यास संपत नाही.अशा वेळी डॉ.नीरज सक्सेना सारखी देव माणसं येतात व बोध देऊन जातात. या कलियुगात अशा समाधानी,अल्पसंतुष्ट माणसांचं दर्शन दुर्लभ झालेलं आहे.त्यांनी खेळ सोडल्यानंतर एक मुलगी हाॅट सीट वर येऊन बोलू लागली.तीन मुली झाल्या म्हणून वडिलांनी आई सहित आम्हाला बाहेर काढलं.आम्ही एका आश्रमात राहतो. 
    मी विचार केला की नीरजजींनी खेळ सोडला नसता तर शेवटचा दिवस असल्याने कुणालाही संधी मिळाली नसती.आज त्यांच्या त्यागाने एक गरीब मुलीला चार पैसे मिळण्याची संधी प्राप्त झाली.जगात इस्टेटीतला एक पैसा सोडायची तयारी नसते. त्यासाठी भांडणे.खून खराबा होताना आपण पाहतो.स्वार्थ बोकाळलाय सर्वत्र.परंतु हे उदाहरण अपवाद आहे.देव माणसात असतो.ते नीरजजी सारख्या दुऱ्याचा, देशाचा विचार करणाऱ्या माणसात.मी आयुष्यात कधीच या थोर माणसाला विसरणार नाही. आज माझ्या आवडीच्या विषयावर म्हणजेच अनोख्या व्यक्तिमत्त्वाविषयी लिहायला मिळालं याचा आनंद आहे. 
   गरज भागली की माणसानं थांबावं व दुसऱ्यांना संधी द्यावी.स्वार्थाचा त्याग करावा.सर्व सुखी होतील.हा धडा शिकायला मिळाला.मला नेहमीच अशा व्यक्तिंविषयी आदर वाटतो व समाजाच्या उन्नतीसाठी परखडपणे लिहावं लागतं.काही लोक खूप अभ्यासपूर्ण लक्षवेधी प्रेरणादायी लिहतात पण नांव टाकायला घाबरतात.लोक काय म्हणतील.हीच भीती मनात असते.त्या लोकांचे लेख मला नेहमी आवडतात त्यांना मी संकलनात ठेवतो.एकमेकाशी जुळले की प्रसिद्धीला देतो.लेख प्रसिद्ध झाल्यावर अनेक लोक मनतात माझ्या मनातील आपण अक्षरक्षा मांडले.सायंटिस्ट पी.एच.डी असलेले  डॉ.नीरज सक्सेना असा निर्णय घेऊ शकतात.
  राज्य व केंद्र शासन प्रशासकीय सेवेतील उच्च पदावरील अधिकारी सेवा निवृत झालेवर संतुष्ट राहत नाही.किंवा राजकारणात सक्रिय असलेले नेते साठ,सत्तर,एन्शी झाले तरी आमदार खासदार की च्या चार,पांच टर्म पूर्ण झाल्या तरी कुठे थांबायला तयारच नसतात.त्यामुळेच अनेक पक्षाचा नवीन जन्म होतो.त्यामुळेच समाजात असंतुष्ट लोकांची वेगवेगळी जमात तयार होते. त्यातून एकाच कुटुंबातील वेगवेगळे पक्ष,संघटना, संस्था निर्माण होऊन देशाचा राज्याचा जिल्ह्याचा तालुक्याचा विकास होण्या ऐवजी भकास होण्यासाठी संघर्ष आणि स्पर्धा लागते. म्हणूनच प्रत्येक क्षेत्रातील समजदार सुसंस्कारित मानसांनी कुठे थांबावे हे नक्की केले पाहिजे आणि संतुष्ट राहिले पाहिजे. 
संकलन :- सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

प्रकाश आंबेडकरांना "परिस" का म्हणतात ?.

 प्रकाश आंबेडकरांना "परिस" का म्हणतात ?.



परिस ही संकल्पना लोखंडांचं सोन करणारी आहे.लोखंडाला जर परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचे सोने होते असा समज आहे.राजकारणात निवडून येण्यासाठी गडगंज पैसा आणि समाजात नावलौकिक असला पाहिजे तद्वतच निवडून येण्यासाठी जातीची भरभक्कम मते असली पाहिजे अर्थात तुमची जात संख्येने मोठी पाहिजे असा समज रुढ झाला आहे.आणि म्हणूनच मग छोट्या छोट्या जातीचे आणि परिस्थितीने गरीब असलेले लाखो होतकरू निवडणुकीच्या रिंगणातुन बाद झालेले आहेत हे लोकशाहीच्या ७२ वर्षाच्या अनुभवाने सिद्ध केले आहे...!! 
   अशा परिस्थितीत १९९२-९३ साली नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणुक लागली,त्या निवडणुकीत भारिप ने आदिवासी समाजातील भिमराव केराम या गरीब तरुणाला निवडणुकीत ऊभे केले,त्याच्या साठी आठवडी बाजारातून वर्गणी गोळा केली आणि भिमराव केराम या गरीब आदिवासी तरुणाला आमदार म्हणून निवडून आणले,आदिवासी समाजातील गरीब तरुणाच्या जीवनाचं,कुटुंबाचं सोनं झालं.
 अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू मतदारसंघातून अतिशय छोट्या कोळी समाजाचे डॉ.डी.एम.भांडे यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,आणि त्यांना १९९९ साली आमदार म्हणून निवडून आणले, ते २००० सालच्या विलासराव देशमुख मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री होते,त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 १९९९ साली महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघातून "बारी" या छोट्याशा जातीचे परिस्थितीने अतिशय गरीब असलेले रामदास बोडखे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडणुक खर्चासाठी पैसा दिला,मते दिली आणि निवडून आणले ते विलासराव देशमुख मंत्रीमंडळात रोजगार हमी राज्यमंत्री म्हणून मंत्री होते,त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
   अकोला जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील माळी समाजाचे बळीराम सिरस्कार अतिशय गरीब कुटुंबातील त्यांना भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले तथा दोन वेळा बाळापूर मतदार संघाचे आमदार बनविले,बळीराम सिरस्कार यांच्या जीवनाचे,आणि कुटुंबाचे सोने झाले...!! 
अकोला जिल्हा परिषदमध्ये मुस्लिम समाजातील "कासार" या छोट्याशा जातीतील अतिशय गरीब कुटुंबातील सौ.साबिया अंजुम सौदागर या महिलेला भारिप बहूजन महासंघाने अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष पदी विराजमान केले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 जळगांव जामोद येथील वृत्तपत्र विकणारा गरीब बौद्ध तरुण संजय पारवे याला भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली नगरसेवक म्हणून निवडून आणले आणि जळगांव नगरपरिषदेचे उपाध्यक्ष बनविले,त्याची राजकीय पत निर्माण झाली,तो नेता म्हणून ऊभा राहिला त्याच्या जीवनाचे सोने झाले...!! 
  भटक्या विमुक्त जाती समुहातील "वडार"समाजाच्या सौ.अनिता अव्वलवार यांना भारिप बहूजन महासंघाने मुर्तिजापूर नगर परिषदेच्या अध्यक्षा बनविले आणि त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
अतिशय गरीब कुटुंबातील भटक्या विमुक्त जमाती मधील "पाथरवट" समाजाच्या सौ. कविताताई ढाळे यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली निवडून आणले आणि पातुर पंचायत समिती उपसभापती बनविले त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 अकोला जिल्हा परिषद मध्ये अतिशय छोट्या तेली समाजाचे बालमुकुंद भिरड यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली,निवडून आणले आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले,त्यांची राजकीय पत निर्माण झाली,त्यांची नेता म्हणून ओळख निर्माण झाली, त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
 अतिशय गरीब, बौद्ध समाजातील प्रतिभाताई भोजने यांना भारिप बहूजन महासंघाने उमेदवारी दिली, निवडून आणले आणि अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष बनविले, त्यांच्या जीवनाचे सोने झाले...!! 
वरील उदाहरणे ही प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत,गेली चाळीस वर्षे प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर हे अशाप्रकारे अनेक प्रयोग करीत आहेत आणि अतिशय छोट्या छोट्या जात समुहाचे,गरीब कुटुंबातील लोकप्रतिनिधी निवडून आणतं आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष,उपाध्यक्ष,सभापती,पंचायत समिती सभापती,उपसभापती, सरपंच अशी विविध राजकीय पद ऊपभोगायला मिळतं आहेत.आणि त्यांच्या जीवनाचं सोनं होतं आहे म्हणून आशावादी जनता, छोट्या छोट्या जात समुहातील ओबीसी तरुण तथा आदिवासी,भटके विमुक्त प्रकाश आंबेडकर यांना परिस या उपाधीने संबोधतात...!! 
जे राजकीय पद आणि प्रतिष्ठा याची कल्पना सुद्धा केली नव्हती,ती श्रीमंतांची,आणि जातदांडग्यांची मक्तेदारी आहे असे वाटतं होते ते पद आणि ती प्रतिष्ठा प्राप्त होतं असेल तर ती बाब कल्पनातीत असते आणि म्हणूनच मग गरीब,होतकरु छोट्या छोट्या जात समुहातील भटके विमुक्त,आदिवासी,मायक्रो ओबीसी प्रकाश आंबेडकर यांना परिस समजतात आणि परिस म्हणूनच त्यांच्याकडे बघतात...!!. 
    २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अनेक समाजाच्या कार्यकर्त्यांना वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी जातदांडगे,धनदांडगे राजकीय घराणेशाहीची  कोणाचीच भीती न बाळगता जातीचा उल्लेख करून मागासवर्गीय ओबीसी मराठा, आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या लढाऊ गरीब प्रामाणिक कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली आहे.त्यांना निवडून द्यावे की जात दांडगे,धन दांडगे राजकीय घराणेशाहीचे उमेदवार निवडून द्यावे याचा गांभीर्याने विचार सर्वच मागासवर्गीय ओबीसी,गरीब मराठा,आदिवाशी,भटक्या विमुकत्या सह मुस्लिम समाजाने करावा.गेली साठ सत्तर वर्ष कॉग्रेसने सर्व समाजाला कसा कसा न्याय दिला. त्याचा आपल्याला अनुभव आला आहेच.त्यानंतर भाजपाने २०१४ नंतर सर्व समाजाला कोणता वेग वेगळा न्याय दिला यांचा ही अनुभव आपण घेत आहात.
   सापनाथ आणि नागनाथ यांची कोणते ध्येय उदिस्ट धोरणे वेग वेगळी आहेत.याचा ही गांभीर्याने विचार मतदारांनी करावा आणि आपल्या मताची किंमत मीठ मिरची,मटन दारू किंवा हजार पांचशे नाही तर येणाऱ्या पिढीचा विकास की भकास लिहणारा असेल.म्हणून कोण निवडून येईल आणि कोण पडेल याचा विचार न करता कोणाच्या मतदानाने इतिहास लिहला जाईल त्यांना मतदान करा.आपली ही मतदार म्हणून  राजकीय पत निर्माण झाली पाहिजे. आपण ज्यांना मतदान केले त्यांची ही नेता म्हणून ओळख निर्माण झाली पाहिजे.आपल्या क्रांतिकारी विचारांच्या पक्षांचे नेत्याचे आणि आपल्या जीवनाचे सोने झाल्या शिवाय राहणार नाही.हाच आदर्श डोळ्यासमोर ठेवावा आणि सत्ते शिवाय परिवर्तन बुद्ध,फुले,आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम यांनी घडवून दाखवला.निवडणूककडे केवळ हार जीत म्हणून पाहू नका. एक समाजाचे मिशन म्हणून पहा.आपला संघर्ष एका निवडणुकी पुरता मर्यादित नाही तो कायम स्वरूपी अन्याय अत्याचारांच्या विरोधात संघर्ष करण्याचा आहे हे विसरू नाक.आणि आपल्याच विचारांच्या पक्षाच्या नेत्याच्या उमेदवारांना मतदान करा.आपण आपली संख्या मतदानात दाखवली तर भविष्य काळात स्वाभिमानने जगत येईल.अन्यता गुलाम लाचार म्हणून जगावे लागेल.हे लक्षात घ्यावे.अन्य पक्षातील तमाम सर्व मागासवर्गीय,ओबीसी मराठा, आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मतदारांनी यावेळी त्या-त्या नेत्यांना नम्रपणे सांगावे,दादा,भाऊ,अण्णा,काका,साहेब आजवर आम्ही तुमच्या सोबत होतो.आज ज्यानं आम्हाला माणूस बनवलं त्याचा नातू हाक देतोय.माफ करा आम्हाला आता यावेळी त्यांच्या शब्दाला किंमत म्हणून त्यांच्या सोबत गेलेच पाहिजे,भले तो कुठेही नेऊ दे.पण त्याने रात्रदीवस संघर्ष करून प्रस्थापित पक्षांच्या जातदांडगे,धनदांडगे राजकीय घराणेशाहीच्या समोर वंचित बहुजन आघडी ही शक्ति उभी केली.त्यात आम्ही सहभागी झालोच पाहिजे.कारण आजचे आमचे हे आयुष्य,हे जीवन त्याच्या आजोबाची देणं आहे. आमच्या आयुष्याला आकार देता देता त्यांच्या घराची राख रांगोळी झालीय. त्याच्या आजोबानं त्यांच्या नातवंडांचा विचार केला असता तर ताट इस्त्रीची कपडे घालून आज दिमाखात फिरलो नसतो.मी ऊपाशी राहू नये म्हणून ज्यानं पावाचा तुकडा खाऊन दिवस काढले. एवढा त्याग कष्ट जिद्ध माझ्या जन्मदात्यानही केला नाही. त्या महापुरुषाचा नातू आम्हाला साद घालतोय.त्यांच्या सोबत उभे राहणे यांचे कर्तव्य आहे. माझ्या बाप आजोबा बाबासाहेबांच्या मागे जीवदेण्यासाठी उभा होता म्हणूनच आज आम्ही ताट मानने खेड्या गांवात शहरात उभे आहोत.(जयदीप,प्रा.जोगेंद्र कवाडे,आठवले सुरेखा कुंभारे,डॉ.मिलिंद माने,कुठे उभे आहेत हे डोळेउघडे ठेऊन पहा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संविधान चौकात नागपुरात पुष्पहार अर्पण केल्यावर जय श्रीराम घोषणा दिल्यावर यांनी काय केले. त्यावेळी नाही आणि नंतर ही काहीच बोलू शकले नाही यांचे कारण काय ???. लाचारी गुलामगिरी )
 आजवर आम्ही दारू पियून मटन बिर्याणी आणि हजार पांचशे रुपये घेऊन तुमच्या प्रचारासाठी जीवाचं रान केले. तुम्ही आम्हाला जे जे दिले तेवढं करण्याचा आम्ही प्रयत्न करत आलोय. आता थोडं ज्यानं माणूसपण दिलं त्याच्या नातवासाठी थोडं करु द्या. नाहीतर इतिहासात आमची गद्दार,कृतघ्न म्हणून नोंद होईल.त्या महापुरुषा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची ही संधी गमावली तर येणारी पिढी आम्हाला माफ करणार नाही. सर्व मागासवर्गीय,ओबीसी मराठा,आदिवाशी,भटक्या,इतर नगण्य जातीसह अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मतदारांनी थोडंसं संवेदनशील व्हावे आणि पहा मतदान केल्याने काय होते.आपल्या ही जीवनाचा परिस झाल्या शिवाय राहणार नाही. एकच वेळ विचारकरून दारू पियून मटन बिर्याणी खाऊन आणि हजार पांचशे रुपये घेऊन मतदान मात्र आपल्याच विचारांच्या पक्षाच्या नेत्याच्या उमेदवारांना मतदान करा.माझे विचार पटत नसतील तरी येणाऱ्या युवा पिढीच्या भविष्यासाठी वेळीच निर्णय घेऊन मतदान करायचा निर्णय घ्या.व इतरांना ही सांगा. 
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई 

शुक्रवार, १९ जानेवारी, २०२४

राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची!

 राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची!

राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची! संतहो,आम्ही जरी हे जन्मण्याचे पाप केले.लागली नाही आम्हाला लूत रोगी ईश्वराची जे उद्या होणार त्याचा आज मी आहे पुरावा.घे भविष्या नोंद माझ्या बोलक्या हस्ताक्षराची सुरेश भटांच्या ह्या ओळी आज ही नामांतरच्या संघर्षाची आठवण देतात. म्हणूनच नामांतराचे बाळकडू कसे विसरणार?. आंबेडकर चळवळीतील बहुसंख्य तरुण कार्यकर्त्यापुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. नामांतर चळवळीतील सर्वात आक्रमक नेता व त्याचा राजकीय गट आज पेशवाई समर्थक भाजपाचा सत्ताधारी समर्थक झाला आहे. त्यामुळे नामांतर चळवळीत पचविलेले बाळकडू कसे विसरणार?. ज्या बाळकडू ने मराठवाड्यात दलितांच्या घरादाराची राख रांगोळी करून हजारो निरपराध निष्पाप लोकांचा बळी घेतला.त्याचा तो इतिहास आम्ही कसा विसरावा हा मोठा प्रश्न सर्वच समाजाला पडला पाहिजे.जी १६ वर्ष आम्ही रात्र दिवस संघर्ष करण्यात घालविली ती कशी विसरावी त्या सोळा वर्षाच्या नामांतर आंदोलनाच्या इतिहासाचे वय ४६ वर्षाचे झाले.त्या नामांतरामुळे खेड्या पड्यात पोचलेली शिवसेना पेशवाईच्या वैचारिक गुलामांनी कशी मुळासकट संपवली तिचा निकाल १० जानेवारीला राहुल नार्वेकर यांनी दिला.शिवसेना प्रमुखांचे बाळकडू पिऊन मोठे झालेले हे राहुल नार्वेकर आहेत. आताच्या घडीला राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाचे राजकारणी आहेत. ते महाराष्ट्र विधानसभेचे १७ वे अध्यक्ष आहेत. भारतामध्ये विधानसभा अध्यक्ष या पदावर बसणारे ते देशातील सर्वांत तरुण व्यक्ती आहेत.असा अनेक गावगुंड तरूणांना बाळ ठाकरे यांनी शिवसैनिक बनवून गोरगरिबांची घरेदारे पेटविण्याचे प्रशिक्षण देऊन कायदा सुव्यवस्था मोडून काढली होती.त्याबळावरच ते सतत महाराष्ट्र पेटविण्याची भाषा करीत होते. त्यांचे बाळकडू पिणाऱ्या शिवसैनिकांनी त्यांची मान्यताप्राप्त शिवसेना मनुवादी पेशव्यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस अनाधिकृत ठरविली. जे बाळ ठाकरे भारतीय संविधानाने दिलेली लोकशाही मानत नव्हते म्हणूनच निवडणूक आयोगाने सहा वर्षासाठी बाळ ठाकरे यांचे भारतीय नागरिकत्व काडून घेतले होते.आम्हाला या ठिकाणी त्यांची आठवण करण्याची गरज का भासते?. कारण मराठवाडा पेटविण्यात त्यांचे योगदान न विसरणारे आहे.म्हणूनच लिहतो राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची!. 

   भारतीय इतिहासात अनेक आंदोलनाचा इतिहास हा प्रेरणादायी आहे.तर काही इतिहास दुखदायी असतो. तो विसरता येत नाही.२७ जुलै १९७८ मध्ये महाराष्ट्र राज्य विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचे नांव देण्याचा ठराव पारित झाला. हा आनंद आंबेडकरी अनुयायी आनंदोत्सव साजरा करीत असतानांच भारतीय जातीव्यवस्थेचीमुळे घट असणाऱ्या माणसाच्या डोक्यातील सैतान जागा झाला.सरकारच्या निर्णयाला त्याने जातीचा रंग दिला.आणि दलितांच्या घरांची राखरांगोळी करण्यास सुरवात केली.ते गावगुंड जात दांडगे धन दांडगे १६ वर्ष ही घरादारासह जिवंत माणसाच्या रक्ताची होळी खेळत राहिले.आम्ही मांगत राहिलो. नामांतराचा लढा हा केवळ विद्यापीठाची पाटी बदलणारा नव्हता,तर तो समता, स्वातंत्र्य,बंधुभाव पुढे नेणारा लढा होता.म्हणूनच नामांतर झालेच नाही झाला तो नामविस्तार!.

   बाबासाहेबांना अभिप्रेत असलेली सामाजिक मूल्ये रुजली नाहीत हे आजचे आपले समाजवास्तव आहे. नामांतराची घोषणा जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी केली तेव्हा त्यांनी म्हटले होते,नामांतराचा उत्सव नामांतरवाद्यांनी जल्लोषात साजरा करू नये.त्याच वेळी नामांतरास नामविस्तार म्हणण्याचा फसवा शब्दच्छलही करण्यात आला होता. पुरोगामी म्हणविणारा महाराष्ट्र जातीय मानसिकतेतून मुक्त झालाच नाही. हे नामांतराचा १६ वर्षाचा संघर्ष आणि भिमा कोरेगांव १८१८ च्या संघर्षाला २०० वर्ष पूर्ण झाल्या नंतर २०१८ ला घडविलेल्या संघर्षातून सिद्ध झाले आहे.तीच पिल्लावर आज डोकेवर काढत आहे.म्हणूनच हे सत्य आहे की राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची!.खैरलांजी,खर्डा,सोनईसारखे अनेक लक्षवेधी माणुसकीला लाजविणारे अत्याचार दलित समाजावर होत राहिले.नामांतरासाठी ‘लढा’ द्यावा लागला हे वास्तव आणि नामांतर झाल्यानंतर त्याचे श्रेय घेणाऱ्यांची राजकीय स्पर्धा,ही दोन्ही कारणे नामांतराचा हेतू निष्प्रभ करत आहेत? या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी, लढा का व कसा द्यावा लागला,यांची माहिती किती लोकांना आहे?.

  मराठवाडा विद्यापीठाच्या स्थापनेसाठी २७ एप्रिल १९५७ साली शासनाने जी पळणीटकर समिती स्थापन केली होती त्या समितीने शासनाला स्वतंत्र विद्यापीठाची शिफारस करताना विद्यापीठासाठी ज्या नावांची शिफारस केली होती त्या नावांमध्ये औरंगाबाद,पैठण,प्रतिष्ठान,दौलताबाद,देवगिरी,अजिंठा,शालिवाहन,सातवाहन या स्थलवाचक नावांचा समावेश होता.याबरोबरच दोन महान महत्वपूर्ण व्यक्तींचीही नावे होती.एक होते छत्रपती शिवाजी महाराजांचे व दुसरे नांव होते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे.पण अखेर सर्व नावे मागे पडून विद्यापीठासाठी प्रदेशवाचक ‘मराठवाडा’ हे नाव स्वीकारले गेले. महाराष्ट्रात पुढे महात्मा फुले,पंजाबराव देशमुखांच्या नावाने विद्यापीठे निघाली. कोल्हापूरला शिवाजी महाराजांच्या नावाने विद्यापीठ स्थापन झाले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ आले. परंतु १९७७ चा नामांतर लढा सुरू होई पर्यंत महाराष्ट्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने विद्यापीठ सुरू करून बाबासाहेबांचे उचित स्मारक उभारावे असे ना शासनाला वाटले ना लोकांना सुचले.या पार्शवभूमीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या चवदार तळ्यावर केलेल्या सत्याग्रहास २० मार्च १९७७ रोजी ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दलित संघटना (काँग्रेस प्रणित रिपाई) एकत्र आल्या असता,महाड सत्याग्रहाचा सुवर्ण महोत्सव व बाबासाहेबांनी १९५० साली औरंगाबादेत मिलिंद महाविद्यालय उभारून मराठवाडय़ात उच्च शिक्षणाची रोवलेली मुहूर्तमेढ लक्षात घेता बाबासाहेबांचे नाव विद्यापीठास देण्यात यावे,अशी मागणी काही संघटनांनी केली.नामांतराच्या मागणीस त्या वेळी युक्रांद,युवक काँग्रेस,अ.भा.वि.प,जनता युवक आघाडी,समाजवादी,क्रांतिदल,एस.एफ.आय,पुरोगामी युवक संघटना आदी विद्यार्थी संघटनांचा पाठिंबा होता.विद्यापीठाच्या कार्यकारिणीने नामांतराचा ठराव संमत केला होता. जनता पक्ष,शेकापनेही नामांतरचा पुरस्कार करणारे ठराव संमत केले होते. पण याच वेळी दुसरीकडे स्वत:स गांधीवादी,समाजवादी,दलितांचे पाठीराखे म्हणविणाऱ्यांनी म्हणजे गोविंदभाई श्राफ च्या संस्था,संघटना यांनी आणि त्याला साथ मिळाली मुंबई ठाण्याबाहेर नसणारी शिवसेना यांनी मराठवाडय़ाच्या अस्मितेच्या नावाखाली नामांतरास विरोध सुरू केला होता.पण त्यांचा विरोध मराठवाडय़ात हिंस्र उत्पात माजवेल असे मात्र वाटले नव्हते.कारण शिवसेना मुंबई ठाण्या पलीकडे कुठे ही नव्हती यांची शरद पवार यांना खात्री होती.

म्हणूनच २७ जुलै १९७८ रोजी तत्कालीन पुलोदचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी नामांतराचा ठराव विधिमंडळाच्या उभय सभागृहांत एकमताने संमत करून घेतल्यावर मराठवाडय़ात जो दलित विरोधी आगडोंब उसळला तो माणुसकीचा बळी घेणाराच ठरला होता.त्याचा प्रमुख शिवसेना बाळकडू होता.ज्यांचा विद्यापीठाशी दूरान्वयाने संबंध नव्हता अशा खेडय़ापाडय़ांतील दलितांचे रक्त सांडण्यात आले. सरकारी मालमत्तेचा विध्वंस करण्यात आला.पोलिसांना लक्ष्य करण्यात आले.दलित समाज स्वाभिमानाने जगतो,शिक्षण घेतो,गावकीची कामे नाकारतो याची जी सल सवर्ण मराठा,मागासवर्गीय समाजाच्या मनात दडून होती,त्याचा स्फोट विधिमंडळातील ठरावानंतर अक्राळविक्राळपणे बाहेर आला.जय प्रमाणे आज मनोज जरांगे पाटील आरक्षण मागतो त्यामागील कट कारस्थान हेच आहे हे आता लपून राहिले नाही.

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान,व्यासंगी असतील,त्यांचे मराठवाडा प्रेमही वादातीत असेल, हैदराबाद संस्थान भारतात विलीन व्हावे म्हणून त्यांनी निजामाविरुद्ध कडक भूमिकाही घेतलेली असेल,तरीही त्यांच्यासारख्या एका पूर्वाश्रमीच्या महाराचे नांव विद्यापीठास देणे हे सनातनी मानसिकतेला सहन होत नव्हते आणि म्हणून त्यांनी नामांतरास हिंस्र विरोध केला हे नाकारता येत नाही. नामांतराचा लढा म्हणूनच दलितविरोधी मानसिकता बदलण्याचा लढा होता. १९७७ ते १९९४ पर्यंत सलग १७ वर्षे लढून परिवर्तनवादी चळवळीने हा लढा जिंकला असे म्हणता येत नाही. १४ जानेवारी १९९४ रोजी विद्यापीठास बाबासाहेबांचे नाव जोडले गेले,पण म्हणून महाराष्ट्रातील दलितविरोधी मानसिकता बदलली,असे काही आजही म्हणता येत नाही.
  संतांची भूमी म्हणविणाऱ्या मराठवाडय़ात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सामाजिक समतेचे मूल्य कितपत रुजले याची कसोटी पाहणाराच नामांतराचा लढा होता व या कसोटीत मराठवाडाच नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्र नापास झाला. पण त्याच वेळी महाराष्ट्रात नी मराठवाडय़ात पुरोगामी दलितेतर संस्था,संघटना,पक्षातील मित्रांनी नामांतराची बाजू घेऊन परिवर्तनवादी चळवळीस बळ दिले.एस.एम.जोशी,नानासाहेब गोरे, ग.प्र.प्रधान,कॉ.शरद पाटील,बापूसाहेब काळदाते,डॉ.बाबा आढाव,डॉ.कुमार सप्तर्षी, प्रा.बापूराव जगताप,म.य.दळवी,डॉ.अरुण लिमये,अशा किती तरी दलितेतर मंडळींनी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी स्वकीयांचा रोष पत्करून नामांतराचा लढा पुढे नेला हा इतिहास विसरता येत नाही.
   नामांतर चळवळीचा वापर दलित पुढाऱ्यांनी आपले सवतेसुभे उभारण्यासाठीही करून घेतला हे सत्य ही नाकारता येत नाही. नामांतर होऊन २७ वर्षे झाली तरीही दलित नेते नामांतराच्या बाहेर पडून दलित समाजाच्या कोणत्याही मूलभूत समस्याला, प्रश्नांना हात घालतांना दिसत नाहीत. दलितांच्या रोजीरोटीचे प्रश्न उग्र होत आहेत.पण या प्रश्नांवर आवाज न उठविता दलित नेते चारी दिशांना चार तोंडे करून नामांतर एके नामांतर करीतच १४ जानेवारीला दरवर्षी औरंगाबाद विद्यापीठ प्रवेशद्वारासमोर आपापले सर्कसचे तंबू ठोकून नामांतराचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा हलकट खेळ खेळत असतात. याला काय म्हणावे समजत नाही? नामांतरानंतर दलित चळवळीची पुढील दिशा काय असावी याचे चिंतन दलित चळवळीने केलेच नाही.म्हणून आंबेडकरी चळवळीची आज दुर्दशा झाली आहे.आंबेडकरी चळवळीला मार्गदर्शन करण्याची जबाबदारी ज्या मध्यमवर्गीय बुद्धीजीवी विचारवंत,पत्रकार,संपादक,लेखक-साहित्यिकांवर असते.ते सत्य मांडण्याची हिंमत दाखवत नाहीत.त्यांच्यापैकी बरेच जण गटबाज पुढाऱ्यांची भडवेगिरी करण्यात धन्यता मानतात,सोबत भाजप- सेना अथवा काँग्रेसचे कधी छुपेपणाने,तर कधी उघडपणे गुणगान करण्यातच धन्यता मानीत असतात.
   शिक्षणात नोकरीत आरक्षण घेणारा लाभार्थी आंबेडकरी विचारांच्या ट्रेड युनियन पासून चारहात लांब आहे.म्हणूनच त्यांचे पदोन्नतीतील आरक्षण गेले तरी तो पाहिजे त्या प्रमाणत जागृत होऊन मनुवादी विचारांच्या ट्रेड युनियन मधून बाहेर पडला नाही. आरक्षणामुळे मध्यमवर्गीय झालेला पांढरपेशा वर्ग तर इतका आत्ममग्न झाला आहे,की काही अपवाद वगळता मागे राहिलेल्या आपल्या बांधवांसाठी संस्था,संघटना,पक्ष, बांधणी करून जीवन समृद्ध करावे,रचनात्मक प्रकल्प योजनाबद्ध निर्माण करून राबवावेत याची जाणीव त्याला राहिलेली दिसत नाही.
धम्म परिषदेतून पांढरेशुभ्र वस्त्र परिधान करून सहभागी होणारे निवडणुकीत मात्र क्षुद्र स्वार्थाला बळी पडून प्रस्थापित राजकीय पक्षांना मते देतात तेव्हा बाबासाहेबांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन चळवळ उभी तरी कशी रहाणार? यांचे गांभीर्याने आत्मचिंतन करीत नाही,नामांतराची लढाई जिंकल्यानंतर दलित चळवळ नवे प्रश्न, नव्या आव्हानाना मुळीच भिडलीच नाही.जो-तो खोटे मानापमान,प्रतिष्ठा,कमालीचे क्षुद्र अहंकार व अप्पलपोटय़ा स्वार्थात बुडून गेला.

   महाराष्ट्रात खेडोपाडी जो जातीयवाद घट्ट होत चालला आहे तो पाहता दलित-दलितेतर संवाद वाढण्याची गरज प्रकर्षांने जाणवते आहे. ग्रामीण भागात दलित समाजावर अत्याचार झाल्यावर ७० च्या दशकात समाजवादी,गांधीवादी आणि  डाव्या पक्ष-संघटनांचे कार्यकर्ते तिथे धावून जात असत.पण हे आता ते पूर्ण थंडावून,उलट खेडोपाडी जातवर्चस्ववादी संघटनांचा उदय झाल्यामुळे दलित-दलितेतर दुरावा वाढत चालला आहे. सामाजिक सामंजस्य वाढविण्यासाठी म्हणूनच दलित-दलितेतरांचा सहभाग असणारे उपक्रम खेडोपाडी नव्या जोमाने राबविले जाणे आवश्यक होऊन बसले आहे. उदा.असंघटित कष्टकरी कामगार,मजुर,भूमिहीन शेतमजूर यांची नांव नोंदणी अभियान,आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे,असंघटीत कष्टकरी मजुरांच्या मुलामुलींना शिक्षण घेण्यासाठी शिशुवृती,वसतिगृह या प्रश्नावर,समस्यावर आताचे स्व्यमघोषित नेते तोंड उगडत नाही.पुतळा विटंबना,हत्याकांड,रेल्वे स्टेशनचे नामांतर यापलीकडे त्यांचा अभ्यासच नाही.

   डॉ.आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,शाहू महाराज,महात्मा फुले संत गाडगेबाबा आदी संत महापुरुषांची जयंती दलित-दलितेतरानी एकत्र येऊन साजरी करणे,दलित, शोषित,पीडित वर्गाच्या सामाजिक,आर्थिक प्रश्नांवर जातपात विरहित वर्गलढे उभारणे असे लक्षवेधी सामाजिक परिवर्तनाचे आणि समाजप्रबोधन करणारे उपक्रम राबविने काळाची गरज आहे.जो पर्यंत ते राबविले जाणार नाहीत,तो पर्यंत महाराष्ट्रात सामाजिक सुसंवाद साधला जाणार नाही.मनुवादी विचारांच्या संस्था संघटना पक्ष वाढत जाणार हे उघड आहे.म्हणूनच राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची! असे लिहून सांगावे लागत आहे.

  नामांतरा नंतर सामाजिक परिवर्तनाची अपेक्षित चळवळपुढे गेली नाही हे खरे असले तरी नामांतरानंतर विद्यापीठाची गुणात्मक उंची वाढली हे नाकारता येत नाही. नामांतर झाले तर हे बौद्धांचे,दलितांचे विद्यापीठ होणार,अभ्यासक्रम बुद्ध धर्माधिष्ठित होणार, दलितांनाच इथे नोकऱ्या लागणार,सर्वात नीचपणा लोकसत्ता दैनिकाचे संपादक माधव गडकरी यांनी केला होता. खरी वैचारिक फुट पडणारी आग त्यांनी लावली होती. सुवर्ण मराठा समाजातील तरुण या विध्यापीठातून पदवीधर झाला तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असणारे प्रमाणपत्र घरातील दर्शनी भागत लावावे लागेल.हा प्रचार एका मान्यताप्राप्त दैनिकाच्या मनुवादी विचारांच्या संपादकाने केल्यामुळे कॉंग्रेस मधील मराठा समाजाचे बहुसंख्य तरुण मुले शिवसेनेकडे गेले त्यांनी बाळकडू पिऊन ते ग्रामीण भागात आक्रमक झाले.त्यामुळेच मुंबई ठाण्यापुरती असलेली शिवसेना खेड्यापाड्यातील गावा गावात गेली.त्यामुळेच ती आज सत्ते जवळ गेली.हा इतिहास नामांतर चळवळीतुन तालुका जिल्ह्याचे नेते झालेले नेते.आज स्वताला संस्थापक राष्ट्रीय नेते म्हणून विसरले असतील.तसेच समाज पण विसरला असेल तरी इतिहास हा इतिहास असतो.तो सोयीनुसार विसरलो म्हणून खोटा ठरत नाही.  

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ औरंगाबाद असे नामांतर झाल्यास अन्य महाविद्यालये विद्यापीठाशी संलग्नता तोडणार,विद्यापीठाचा शैक्षणिक दर्जा ढासळणार असा जो अपप्रचार करण्यात येत होता तो आज शंभर टक्के खोटा ठरून नामांतरा नंतर या विद्यापीठाचा भौतिक विकास झाला,शैक्षणिक दर्जा वाढला.मुंबई-पुणे विद्यापीठानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ‘ए-ग्रेड’ मिळविला. पण तरीही नामांतराचे पुढचे पाऊल हे मानसिक परिवर्तनास चालना देणाऱ्या चळवळी गतिमान करणे हेच असावे, याविषयी दुमत नसावे.नामांतरामुळे जे नेते झाले तेच रिपाई पूर्वीच्या गटबाज नेत्या पेक्षा जास्त समाजासाठी चळवळी करिता नालायक धोकादायक बनले असे लिहले तर चूक ठरणार नाही,आजच्या नेत्यांनी खासदार की,आमदारकी करिता कोणा सोबत युती आघाडी केली म्हणुन आम्ही बाळकडूची कामगिरी विसरू शकत नाही. त्यामुळे आजच्या तरुणा पुढे मोठा प्रश्न आहे.नामांतर तर झालेच नाही,झाला तो नामविस्तार!.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव घेऊन जयजयकार करणाऱ्यांनी याचा गांभियाने विचार करून आंदोलन करण्याची मर्यादा लक्षात घेऊन मतदारसंघ आणि संविधानाच्या चौकटीत राहून वैचारिक पातळीवर पक्ष किंवा संघटना बांधणी करावी.तरच भविष्यात स्वाभिमानाने जगता येईल.अन्यत राख सांभाळून ठेवा राख झालेल्या घराची.संपली नाही लढाई यार हो नामांतराची!हे म्हणावे लागेल.

सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई,9920403858,

अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना,स्वतंत्र मजदूर युनियन महाराष्ट्र राज्य 

अधर्माच्या राजकारणात धर्माचा बळी जात आहे.

 अधर्माच्या राजकारणात धर्माचा बळी जात आहे.  



      कृषिप्रधान देशात आज शेतीला महत्व कमी झाले असून शिक्षण,आरोग्य,रोजगार क्षेत्रात उघड उधड दरोडेखोरी सुरू झाली आहे.त्याविरोधात कुठेच न्याय मांगण्याची व्यवस्था देशात राहिली नाही. जिथे राजकीय पक्षाने दिलेले उमेदवार लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्यावर आमदार बनतात. ते पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या गटात जातात.त्यांना न्याय देतांना न्यायालय तारीख वर तारीख देते. शेवटी न्यायमूर्ती विधानसभा अध्यक्ष यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे हे सांगतात.तेव्हा मूळपक्षच अनाधिकृत ठरविला जातो.ज्या पक्षाच्या प्रमुखांच्या सहीने उमेदवार निवडणूक अधिकाऱ्यांना उमेदवारी अर्ज भरून देतो. तो पक्ष आणि त्यांचा ए बी फॉर्म वर सही करणारा नेता बोगस असत्य ठरविला जातो!. याला न्याय देणारा निर्णय म्हणावे काय?.धर्माच्या रितीरिवाजाचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या धर्माचे ठेकेदार असलेल्या राष्ट्रीय पक्षा कडून देशात  अधर्माच्या राजकारणात धर्माचा बळी जात आहे.
   भारत देशात राम मंदिराच्या मुद्द्यावर ज्यांनी राम रथ यात्रा काढली,करसेवा केली. त्या रामभक्तांचे केंद्रात व राज्यात सरकारे आहेत. त्यामुळेच अन्न वस्त्र,निवारा शिक्षण,आरोग्य,रोजगार यामुलभूत समस्या देशाच्या नागरिकांच्या राहिल्या नाहीत. म्हणूनच देशात सध्या राम मंदिर उद्घाटन सोहळा सर्व वयातील तरुण,तरुणी महिला,पुरुष जेष्ट नागरिक यांच्या हातांना अक्षीदा, कलश,झेंडूची फुले डोक्यावर घेऊन राम भक्त घरोघरी गल्ली बोळात फिरत आहेत.अक्षता आल्या आज घरी,२२ जानेवारीला संध्याकाळी दिवाळी साजरी करा. दिवे लावून असे घरोघरी सांगितले जात आहे.सांगणारे बहुसंख्येने मराठा ओबीसी बांधव आहेत.हे विशेष लक्ष वेधी आहे.की जेणेकरून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या दिवशी मतदान करताना त्यांचे डोके रामभक्त उमेदवारा समोर बधिर व शरीर बेशुद्ध असले पाहिजे! अशा प्रकारे देशात आर एस एस प्रणित भाजप सरकार नव्हे तर मोदी सरकारचे सरकारी कर्मचारी अधिकारी युद्धपातळीवर काम करीत आहेत.  
  शिक्षण,आरोग्य,रोजगार यामुलभूत समस्या देशाच्या नागरिकांच्या राहिल्या नाहीत.त्यामुळे डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ज्याप्रमाणे म्हटले आहे की शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो प्राशन करील तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही त्यामुळे प्रथम माणसाचे खच्चीकरण हे त्याच्या शिक्षणातून लहानपणीच करून घेतल्या जात आहे. दुसरी गोष्ट आरोग्याच्या दृष्टीने येणाऱ्या रोगावर प्रभावी औषध इलाज शोधून काढण्यापेक्षा त्या रोगाचा लोकांना रामबाण उपाय राम मंदिरात उपलब्ध करण्याचा जीवतोड प्रयत्न केल्या जात आहे आणि रोजगारा संदर्भात जर बघितले गेले तर प्रस्थापित राजकारणी उच्च सुशिक्षित,पदव्युत्तर  झालेल्या संघटित कर्मचारी अधिकारी वर्गाची लोकांची जर दखल घेतल्या जात नसेल,तर आठवी दहावी बारावी नापास असलेल्या असंघटित मजूर,शेतमजूर, कामगारांची आजच्या प्रस्थापित राजकारण्यांच्या नजरेत काय किंमत असेल ही गांभीर्याने विचार करायला लावणारी गोष्ट आहे.
   सध्या भारतीय राजकारण हे आर एस एस च्या मुठीत ठेवण्यासाठी वंचितांच्या व शोषितांच्या भावी पिढ्यांची लूट करणारे डयंत्र प्रभावीपणे यशस्वी करण्यासाठी संयुक्तपणे अयोध्या आणि रामाचा पुरेपूर वापर होत आहे.त्यामुळे देशात पडझड झालेल्या शाळा कॉलेजच्या इमारतींकडे शासनकर्त्यांचे लक्ष नाही, सरकारी दवाखान्यांतील गैरसोय दूर व्हावी ही इच्छा नाही. त्यासाठी भारतातील ग्रामीण भागात राहून शिक्षण आणि आरोग्याचा अनुभव घ्यावा लागेल. शिक्षण असून ही रोजगारा नाही याचा विचार केला तर सरकारी सार्वजनिक उद्योग धंद्याचे खाजगीकरण आणि कंत्राटीकरण याचे सरकारला काही घेणे देणे नाही.बहुसंख्य मागासवर्गीय गर्व से कहो हम हिंदू है म्हणण्यात गर्क आहेत. म्हणूनच सर्व राम भरोसे बहुसंख्य हिंदू आहेत. 
    राम मंदिराला कोणाचा विरोध नाही,सर्वोच्च न्यायालयात निर्णय झाल्यानंतर तिथे राममंदिर झालंच पाहिजे.पण राममंदिर हा आस्थेचा विषय आहे, राजकारणाचा नाही.कुणी राजकारण करत असेल,तर अशा राजकारणाला विरोध होणारंच.नव्हे झालाच पाहिजे त्यासाठी काही प्रश्न आहेत.त्यांची उत्तरे कोणा कडून मिळतील?. राम मंदिर पूर्ण बांधकाम झाले नाही. मंदिराचा कळस पूर्ण होण्यासाठी एक दीड वर्ष लागतील.रामनवमी एप्रिल मध्ये आहे. प्राणप्रतिष्ठेसाठी हिंदु धर्माप्रमाणे रामनवमी हा सर्वात योग्य मुहूर्त असतांना ही घाई कशासाठी केली जात आहे ? पण लोकसभेची आचारसंहितेनंतर ठराविक जणांना त्यावेळेस स्वहस्ते प्राणप्रतिष्ठा करणे जमणार नाही.म्हणून हा घाट घातला गेला हे स्पष्ट पणे दिसत आहे. पौष महिन्यात शुभ कार्य करत नाहीत. असे हिंदु धर्मीय मानतात. मग २२ जानेवारी २०२४ ही तारीख पौष महिन्यात येत नाही का? धर्म,आस्था जपायची की राजकीय सोय बघायची?.म्हणूनच अधर्माच्या राजकारणात धर्माचा बळी जात आहे. 
    राम मंदिराच्या गर्भगृहात जाणारे पाच जण पंतप्रधान,राज्यपाल,मुख्यमंत्री,मुख्य पुजारी आणि संघप्रमुख.पहिले तीन घटनात्मक पदावर आहेत.  मुख्यपुजारी धार्मिक विधींसाठी संघप्रमुख कशासाठी? त्यांना कुठला घटनात्मक दर्जा आहे?.घटनात्मक दृष्टीकोनातून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती उपस्थित राहिले पाहिजेत हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे ना?. त्यांना का दूर ठेवण्यात आले. जात आडवी येते हे सत्य सांगता येत नाही.अशा परिस्थितीत राम मंदिर उद्घाटन सोहळा हा केवळ विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या राजकीय सोयीनुसार होतंय ना? म्हणूनच आम्ही लिहतो धर्म आणि राजकारण यांची गल्लत का केली जात आहे. 
   राम आणि राममंदिर हा तमाम हिंदुचा धार्मिक आस्थेचा विषय आहे. कुणी राजकीय फायद्यासाठी त्याचा वापर करत असेल तर या असल्या राजकारणाला विरोध होणार आहे यात शंका नाहीच. हिंदु धर्मात सर्व पीठांच्या शंकराचार्याना अनन्यसाधारण महत्व आणि सन्मान असतांना एकही शंकराचार्य त्यावेळेस गर्भगृहात का आमंत्रित नाही?.राममंदिर उद्घाटन हे धार्मिक अधिकार असलेल्या व्यक्तींकडून झाले पाहिजे होते.विशिष्ट राजकीय पक्षाच्या नेतृत्वाखाली नाही.हे कट्टरपंथी हिंदूंचे स्पष्ट मत आहे.म्हणूनच गर्व से कहो हम हिंदू है म्हणणारे मराठा,ओबीसी कुठेही दिसत नाही.बहुसंख्य मराठा ओबीसी मागासवर्गीय समाजाने भविष्यातील येणाऱ्या पिढीचा गांभीर्याने विचार करा.कारण अधर्माच्या राजकारणात धर्माचा बळी जात आहे.मनूस्मृती नुसार कोण हिंदू आहेत,भारतातील वर्ण व जाती,उपजाती व्यवस्था कशी आहे.कोण ब्राह्मण, वैश्य क्षत्रिय,आणि शूद्र,अशूद्र,आर्य अनार्य हे अलिखित आचारसंहिता प्रत्येक मराठा ओबीसी मागासवर्गीय पत्रकार संपादकांनी समजून घेणे आवश्यक आहे. तेच बहुसंख्य हिंदूंचे अज्ञान दूर करू शकतात. चॅनल मीडिया प्रिंट मीडिया मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकांची ही जबाबदारी आहे.आज तुम्ही सुरक्षित असाल पण उद्या तुमच्या मुलामुलींचा बळी जाणार नाही. यासाठी रामायण महाभारतातील वर्ण संघर्ष आणि आजचा भारतातील संघर्ष लक्षात घेऊन. अधर्माच्या राजकारणात धर्माचा बळी कोण जाईल याचा गांभीर्याने विचार करावा.  
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई. 

राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांचे सर्वात मोठे आंदोलन.

 राज्यातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांचे सर्वात मोठे आंदोलन.

दि.२६ फेब्रुवारी रोजी स्वतंत्र मजदूर युनियनच्यावतीने मुंबईच्या आझाद मैदानावर राज्यव्यापी विशाल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. हे महाराष्ट्राच्या इतिहासात मागासवर्गीय कर्मचारी व अधिकारी यांनी केलेले सर्वात मोठे आंदोलन ठरले. १० हजार मागासवर्गीय कर्मचारी या विशाल रॅलीत सहभागी झाले. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री नाम. मदन येरावार यांनी मुख्यमंत्री यांचे वतीने निवेदन स्वीकारले व मुख्यमंत्री यांचे ज सोबत तातडीने बैठकीचे आयोजन करण्याचे लेखी आश्वासन दिले. नाम.मदन येरावार यांना शासनाचे २९ डिसेंबर २०१७ व ११ ऑक्टोबर २०१८ चे परिपत्रक कसे आरक्षण व संविधान विरोधी आहे याची जाणिव करुन देण्यात आली. यावेळी ११ ऑक्टोबर २०१८ चे परिपत्रक जारी करणारे शासनाचे सहसचिव टि.वा.करपते हे उपस्थित होते. त्यांची संघटनेच्या शिष्टमंडळाने बोलती बंद केली. शिष्टमंडळात सागर तायडे, संजय घोडके, एन.बी.जारोंडे, डी.एम.खैरे,प्रशांत रामटेके यांचा सहभाग होता.मा.जे.एस.पाटील साहेब यांच्या कुशल नेतृत्वाखाली देशातील मागासवर्गीय कामगार कर्मचारी व अधिकारी वर्ग मोठ्या संख्येने संघटित होत आहे.
आज देशात प्रत्येक विचारांच्या संस्था, संघटना आणि पक्ष आहेत.त्या केवळ निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायीयांच्या प्रामाणिकपणे, नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध काम केल्यामुळे स्वाभिमानाने उभ्या आहेत, त्यांच्या लक्षवेधी योजना,त्यांची अंमलबजावणी प्रभावी पणे होत आहे. म्हणूनच ते त्या समाजाच्या लक्षवेधी वास्तू निर्माण करून आजच्या युवा पिढीला प्रेरणा देत आहेत. त्यातील स्वतंत्र मजदूर युनियन ही एक राष्ट्रीय ट्रेंड युनियन आहे.तिने नागपुरात सहा मजली भव्य प्रशिक्षण केंद्र उभे केले आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवाचा जयजयकार करणारा मागासवर्गीय समाज अन्याय अत्याचार व अभिवादन करण्यासाठी भावनिक दृष्ट्या एकत्र येऊन देशातील इतर समाजाचे लक्षवेधण्याचे ऐतिहासिक काम करतो.पण तो निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी नाही, तो मोठ्या प्रमाणात फक्त भक्त झाला आहे.तर आरक्षणाचा लाभधारक सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी म्हणून कोणत्याही चौकटीत बसत नाही.
मागासवर्गीय समाज अज्ञानी,असुशिक्षित असंघटित असह्य होता तेव्हा त्यांचे प्रबोधन करून संघटना बांधण्याचे काम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केले.तेव्हा त्यांच्या सोबत निश्चयाने, निष्ठेने आणि निमूटपणे कार्य करणारे प्रामाणिक कार्यकर्ते होते.घाण काम करणे सोडा,लाचारी जीवन सोडा कष्टाचे काम करून स्वाभिमानाने जगणे स्वीकारा.त्यासाठी खेडे सोडा शहर गाठा हा संदेश बाबासाहेबांनी दिला होता, त्यांची अंमलबजावणी ज्या लोकांनी केली ते आज शहरात सुखाने स्वाभिमानाने जगत आहेत.15 ऑगस्ट 1934 ला शहरात साफ सफाईचे काम करणाऱ्या मजुरांसाठी म्युनिसिपल कामगार संघ नांवाची संघटना युनियन स्थापन केली होती.तिचा 1941ला ब्रिटिशांनी देशातील आदर्श कामगार संघटना म्हणुन गौरव केला होता.ती कामगार संघटना युनियन आज मागासवर्गीय बहुजन समाजातील कामगार कर्मचारी यांची सर्वात मोठी ट्रेंड युनियन म्हणून मान्यताप्राप्त असायला पाहिजे होती.केवळ मुंबई महानगरपालिका नव्हे तर देशातील सर्व नगरपालिका, महानगरपालिका मध्ये तेव्हा ही मागासवर्गीय समाजाची संख्या लक्षवेधी होती आणि आज भी लक्षवेधी आहे.मग मागासवर्गीय समाजातील कामगार कर्मचारी क्रांतिकारी आंबेडकरी विचारधारे वर विश्वास ठेवत का नाही.किंवा त्यांचा स्वार्थ,अहंकार आडवा आला.म्हणूनच तो आपल्या समाजातील कामगार कर्मचाऱ्यांच्या वैचारिक शत्रु असलेल्या विचारधारेच्या युनियनला वार्षिक सभासद वर्गणी देऊन आथिर्क दुष्ट्या मजबूत बनवतो.आणि अन्याय,अत्याचार झाला की त्यांना दोषी ठरवितात.
मागासवर्गीय समाजात एकाग्रता चित्राने काम करणारा एकही कार्यकर्ता,नेता आज वीस,पंचवीस वर्षांत दिसला नाही. कौन्सिलच्या किंवा म्युनिसिपालटीच्या एका जागे करिता १०० अर्ज तयार असतात. पण एकच काम एका मार्गाने, एकाच ध्येयाने करणारा एकही कार्यकर्ता,नेता अजून माझ्यापुढे आलेला नाही. शिक्षण, सामाजिक आणि आर्थिक अडचणी हे प्रश्न महत्वाचे आहेत.ही कामे करण्यास प्रसिद्धीची अपेक्षा न करता काम करणारी माणसे पाहिजेत.जो तो प्रसिद्धीच्या मागे धावत आहे. त्यामुळे पाहिजे तसे काम होत नाही. तात्पुरत्या कामाने महत्त्वाचे प्रश्न सुटत नाही. त्याकरिता अहोरात्र झटले पाहिजे. त्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्ता पाहिजे,त्यातुनच नेता निर्माण झाला पाहिजे.वारसा हक्काने मिळाल्या नेतृत्वात अनुभव गुणवत्ता, संघटन कौशल्य नसतो.म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर सांगत होते की यापुढे भारतात राणीच्या पोटी राजा जन्म घेणार नाही तर तो मतदानाच्या पेटीतुन निर्माण होईल.मतदान करणारे,जर मटन, दारू आणि पैसे घेऊन मतदान करणारे असतील तर त्यांना न्याय,हक्क व सन्मान मांगण्याचा कोणत्याही अधिकार राहणार नाही.
तीन टक्के ब्राम्हण समाजाने आपल्या समाजावर अन्याय केला आहे. त्यांनी आपल्याला छळले आहे, हे सत्य आहे. पण त्यांची कामाची पद्धत इतकी चांगली आहे की, त्यांनी मिळवलेली सत्ता ते कायम टिकवून धरु शकतात. कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता मूळ पायाला किंवा धोरणाला घट्ट चिकटून काम करीत राहणारे ध्येयवादी कार्यकर्ते त्याच्यांत निपजतात. त्यात खरे निष्ठावंत शिष्य, सैनिक आणि अनुयायी असतात.स्वतंत्र मजदूर युनियन च्या माध्यमातून जे एस पाटील यांच्या नेतृत्वाखाली संघटित असंघटित कामगार कर्मचारी अधिकारी घडत आहेत.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारधारेवर विश्वास ठेऊन आयु जे एस पाटिल यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र मजदूर युनियन (ILU) आज सतरा क्षेत्रात व बावीस राज्यात लक्षवेधी काम करीत आहे. म्हणूनच देशातील  महानगरपालिका नगरपालिका,नगरपरिषदा मधील कामगारांनी विचार करावा की आपण कोणाचे निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी आहोत?.आपआपल्या नगरात गेल्यावर आपण कट्टर फुले,शाहु,आंबेडकरवादी असतो.मग कामाच्या ठिकाणी नोकरीत असतांना आपण कोणाचे निष्ठावंत शिष्य,सैनिक आणि अनुयायी असतो?. म्हणूनच मागासवर्गीय समाजाने स्वतंत्र महानगरपालिका कामगार युनियन मध्ये सहभागी होऊन आपले संघटन वाढविले पाहिजे तरच बहुजनांचे प्रश्न शासनावर दबाव टाकून मार्गी लागू शकतात असे बाबासाहेबांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन,हे एक असे कामगार संघटन आहे,जे मागील ३८ वर्षापासून सतत महाराष्ट्रात कार्यरत आहे.या संघटनेच्या २३ जिल्ह्यात कर्मचारी पतसंस्था व त्यांचे कार्यालय आहे.संघटनेचे कर्मचारी कल्याण मंडळ आहे.मुख्य कार्यालय नागपूर बर्डी येथील महाजन मार्केट मध्ये आहे.या संघटनेने ३ कोटी चे नागपूरला आंबेडकर प्रशिक्षण केंद्र उभे आहे. या संघटनेला एम.एस.ई.बी.बेकवर्ड क्लास सिनियर इंजीनिअर एंड ऑफिसर्स असोसिएशन ही मदत करीत आहे.या संघटनेने ऑल इंडिया इंडिपेंडंट विद्युत एम्लाईज फेडरेशन ची स्थापना केली व व देशव्यापी फुले आंबेडकरवादी स्वतंत्र मजदूर युनियनची स्थापना केली.त्याला MRMVKS  व AIIVEF या संघटना संलग्न आहेत. व ही युनियन असंघटित कामगारांना घेवून देशव्यापी कार्य करीत आहे. MRMVKS चे ऊर्जा श्रमिक हे साप्ताहिक निरंतर चालू आहे.व दर वर्षी क्रांती ऊर्जा या नांवाने एक डायरी प्रकाशित होते. व दर दोन वर्षानंतर संघटनेचे अधिवेशन होवून त्यात आंबेडकरवादी विचारवंताचे लेख असलेली स्मरणिका प्रकाशित केल्या जाते.हे देशव्यापी संघटन पुढे नेण्याकरिता संघटनेने इंजी.रमेश रंगारी लिखीत १) आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता २) बहुजन कामगार चळवळीची आवश्यकता व स्वतंत्र मजदूर युनियन ३) बहुजन राष्ट्र ही पुस्तके प्रकाशित केली.हे देशव्यापी संघटन पुढे नेण्याकरिता संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे.एस.पाटील, सत्यशोधक कामगार संघटनेचे मा.सागर तायडे, प्रसिध्दी प्रमुख मा.एन.बी.जारोंडे,रेल्वेचे विकास गौर सह अनेक 
चेहरा नसलेले प्रशिक्षित कार्यकर्ते,नेते पदाधिकारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचारांचे निष्ठावंत शिष्य, सैनिक आणि अनुयायी घडविण्यासाठी झटत आहेत.आपण ही त्यात सहभागी होऊन आपण कोण आहोत फक्त भक्त की शिष्य हे ठरवावे लागेल.कामगार कर्मचारी आणि अधिकारी वर्ग संघटित झाला.तर असंघटित कामगार मोठया संख्येने तुमच्या सोबत येणार मग राज्यातील नव्हे तर देशातील मागासवर्गीय कर्मचारी व अधिका-यांचे सर्वात मोठे आंदोलन उभे राहिल.आणि शासन करणाऱ्या यंत्रणेवर नियंत्रण ठेवेल.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 1941 साली सांगितले होते ते आपण विसरतो.व स्वतःलाच वंचित करून घेतो.हे आता थांबविले पाहिजे त्याशिवाय तुम्ही कोणत्याही मोठे आंदोलन यशस्वी करू शकत नाही.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई 9920403859,

बहुजन रत्न लोकनायक भीमसैनिक नको किंगमेकर हवा.

 बहुजन रत्न लोकनायक भीमसैनिक नको किंगमेकर हवा.

आंबेडकरी चळवळीत बातम्या देणारे पेपर खूप आहेत.त्यांना आपण शुद्ध मराठीत वृत्त देणारे पत्र म्हणजे वृतपत्र म्हणतो.पण बहुजन समाजाची योग्य दखल घेऊन त्यावर वैचारिक लढा उभारून सडेतोड उतर देणारे  दैनिक एकच आहे जनतेचा महानायक स्वबळावर गेली दहा वर्ष नियमितपणे वाचकाच्या हातात असते ते दशकपूर्ती वर्षात पदार्पण करीत आहे त्यांचा आनंद होत असताना.लोकनायकच्या शब्दात शहाणपण,विचारात निष्ठा, वर्तनात चारित्र्य या मानाच्या पानावरील ब्रिदवाक्यमुळे चळवळीतील कार्यकर्ते,नेते याची दररोज चे जगण्याची साधन आणि पद्धत जवळून पाहता आली.मग त्यात कोणत्याही चळवळीला यशस्वी होण्यासाठी  तिला वर्तमानपत्राची आवश्यकता असे.ज्या चळवळीचे वर्तमानपत्र नसेल तिची अवस्था पंख तुटलेल्या पक्षाप्रमाणे होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य सांगून धंदा करणारे बाळ वयातून तरुण पणात पदार्पण करीत आहे. आंबेडकरी चळवळ मात्र आज ही पंख तुटलेल्या पक्षा प्रमाणे होती त्यापेक्षा दिशाहीन झाली आहे. म्हणून बहुजन रत्न लोकनायक भिमसैनिक नको किंगमेकरच्या भूमिकेत हवा.हीच वर्धापनदिना निमित्य हार्दिक शुभेच्छा देताना अपेक्षा लाखो वाचक करतात. 

 बहुजनरत्न लोकनायक च्या सुरवातीला माझ्या सारख्याची कोणतीही ओळख नव्हती ती मुंबईसह राज्यात आणि गुजरात मध्ये ओळख निर्माण झाली ते बहुजनरत्न लोकनायक मुळे बातम्या लेख लिहण्याची सतत प्रेरणा लोकनायक नी दिली.आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करणारे अनेक लेख मी लिहले त्यामुळे मी ज्या असंघटीत कष्टकरी कामगारांच्या न्याय,हक्क व प्रतिष्ठे साठी झटणारी सत्यशोधक कामगार संघटनाचे काम करतो ती संघटना राज्यभर पोचण्यास मोठा हातभार लाभला. त्याचा मला व्यक्तिगत आनंद होत आहे.कारण तो होणारा आनंद आज पर्यंत मोजता आला नाही.म्हणून बहुजन रत्न लोकनायक भिमसैनिक नको किंगमेकर हवा.
आंबेडकरी चळवळी तील कार्यकर्ते,नेते अन्याय अत्याचार आणि पुतळा विटंबना झाल्या नंतर कामाला लागतात.तीच खरी चळवळ चालू होते.त्यातून राजकीय स्पर्धा लागते हे दररोज बहुजनरत्न लोकनायक वाचल्या वर कळते त्यातून अनेक कार्यकर्ते नेते नांवा रुपाला आले.त्यांचे वस्रहरण करण्याचे कार्य यापुढे बहुजनरत्न लोकनायक ने करायला पाहिजे.हीच पुढील वाटचालीला मनापासून हार्दिक मंगल कामना! बहुजनरत्न लोकनायक असाच प्रगती करीत राहो.संपादक आणि सर्व संपादक मंडळातील सहकारी आणि जागरूक वाचकांना वर्धापनदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.आणि मनपूर्वक हार्दिक अभिनंदन  
आपला 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप-मुंबई -९९२०४०३८५९.  

अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर?.

 अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर?.



   अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर ते राज्यघटना,संविधानाची अंमलबजावणी होऊ देणार नाहीत.यांचा अनुभव आता शेतकरी,कामगार,सेवानिवृत सैनिक,सुशिक्षित तरुण,बेरोजगार तरुण,जिल्हा परिषद शिक्षक,विना अनुदानीत बी एड,झालेले शिक्षक,आरोग्य सेवा देणारे डॉक्टर,कामगार,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,क्रीडा क्षेत्रातील खेळाडू सर्वानीच भारतीय नागरिक म्हणून अनुभव घेतला असेल यात शंका नाही.त्यामुळे महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,शिक्षण,आरोग्य हा काही एका जातीचा धर्माचा प्रश्न नाही. एका व्यक्तीचा नव्हे तर देशाचा प्रश्न हा आहे.त्यासाठी जन आंदोलन करणारे सर्वच मोदी सरकारच्या दुष्टिने आंदोलजीवी झाले होते.त्यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला कामगारांनी त्यांच्या राष्ट्रीय महासंघानी साथ दिली नाही.केंद्र सरकारच्या प्रत्येक जन आंदोलनात एकमेकांना मनापासून पाठीबा दिला नाही.शब्दीक पाठिबा दिल होता.त्याचे परिणाम आता सर्वच नागरिक भोगत आहेत.यापुढे सर्वधर्मसमभाव बोलतांना विचार करून बोलावे लागेल.
   आज भारतीय हिंदू मोदीच्या चरणी अर्पन झाला आहे.हा कमालीचा स्थितिशील असणारा,टिकून राहण्याचा लोकविलक्षण चिवटपणा,दाखविणारा आणि लोकसंख्येत ८५ टक्के असणारा हिंदुसमाज मनाने आधुनिक व गतिमान कसा करावा,हा आज स्वताला सेक्युलॅरिझम समजणाऱ्या लोकां समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.हा दीर्घकाळ चालणारा खरा अटीतटीचा लढा आहे. एवढा चिवट असलेला हिंदुसमाज मनाने कमालीचा असहिष्णू व तितकाच कमालीचा क्रूर असूनही उदारमतवादी व सहिष्णू म्हणून ओळखला जातो. तोंडाने सर्वधर्मी समानता आणि आत्म्याचे अद्वैत सांगणाऱ्या या समाजाने दोन हजार वर्षे काही कोटी शूद्र,अति शूद्र आदिवासींना संस्कृतीच्या कक्षेच्या आत गुलाम करून टाकले होते.स्त्रियांची गुलामी हा पुन्हा वेगळाच भाग आहे. लक्षवेधी रुपये खर्चून मीनाक्षीसुंदरम आणि वेरूळची देवालये निर्माण करणाऱ्यांनी समाजात वरिष्ठ वर्गाच्या उपभोगासाठी दासी,बटकी आणि वेश्या मिळून जगातील सर्वात मोठा समूह निर्माण केला होता ! उदार हिंदूसंस्कृतीत इंग्रजांनी कायद्याने बंद करीपर्यंत म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत माणसांच्या खरेदीविक्रीचे बाजार गुरांच्या आठवडी बाजाराप्रमाणे भरत होते.तसेच आता शहराच्या नाक्या नाक्यावर चौकात श्रम विकणारे बाजार भरत असतात.एकेक पुण्यश्लोक राजा केवळ धर्मप्रेमाखातर पाचपाचशे मुली देवळांना देवदासी म्हणून नजर करीत असे ! शत्रूंची बायका-मुले पकडून गुलाम करावी, ही प्रथाही भारतात होती.हिंदुसमाजात हे सर्व काही होते,याबद्दल मी हिंदुसमाजाला फार दोषी धरत नाही; कारण हेच चित्र मध्ययुगातील ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे आहे.मी आपल्याच धर्मातील मेंदूतील ब्लॅक (Block) काढण्याचा प्राथमिक प्रयत्न करीत आहे.तो या निमित्याने लिहून सांगण्याचा प्रयत्न करतो.असो...
   भारतात केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल,तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.याच अर्थ हा की,क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे.याचा अर्थ कायदेभंग,असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता,त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते.परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.असे आत्मविश्वासाने बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितले होते.
    बाबासाहेब पुढे असे सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये,की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे,कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही,इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. 
     समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही लोका जवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र,सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे,प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.हे बाबासाहेबांचे शब्द आज देशात जसेचे तसेच अंमलात येताना दिसत आहेत.लोकशाहीने लोकांच्या मतदानाने लोकांसाठी लोकउपयोगी निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले.ते लोकप्रतिनिधी भांडवलदाराच्या रक्षणा करीता गोरगरीबाचा बळी देत आहे. म्हणजे लोकशाही ने दिलेल्या संविधाना नुसार नाही. तर हुकूमशाहीच्या मार्गाने चाललेले मार्गक्रम आहे.
     देशात म्हणजे आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय?. जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल.ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करु इच्छितो, ती घटना अशी- “काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.” ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?. 
   सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वा शिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे,कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्या शिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बले ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.हे बाबासाहेबांनी संविधान सभेत शेवटचे भाषण आहे. सविधान दिनाचा हा २६ नोव्हेंबर १९४९ ते २६ नोव्हेंबर २०23 ला ७४ वर्षाचा प्रवास भारतीय नागरिकांनी न वाचताच पार केला आहे.त्यामुळेच आज देशात अदुष्य युद्धाची परिस्थिती दिसत आहे.त्याला ८५ टक्के बहुजन समाज विशेष आंबेडकर विचाराला मानणारा समाज मोठ्या प्रमाणात दोषी आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही,बाबासाहेबांनी जे जे सावधानतेचे इशारे दिले होते त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करणारा समाज बाबासाहेबाचा कसा काय असू शकतो?.एक मराठा लाख मराठा,बहुजन पर्व,संविधान समर्थन,इतर बऱ्याच समाजाला माहित तरी आहे काय?. संविधान लिहण्याला किती वर्ष झाले?. ७४ वर्षात त्यांची किती अमंलबजावणी झाली?.म्हणुन भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचलेच पाहिजे.तरच तो गर्वाने सांगेल मी एक भारतीय आहे.तेव्हा तो मनुस्मृतीची आठवण करणार नाही.अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक करणार नाहीत.
   मंडल आयोग मजूर होताच राम रथ यात्रा निघाली आणि सर्व ओबीसी रथ यात्रेला निघाला होता.मराठा समाजाला एक डिसेंबरला आरक्षण मिळणार जल्लोष करण्याचे सांगितले जाते, तेव्हाच २५ नोव्हेंबर ला राम मंदिर दर्शनासाठी प्रोग्राम जाहीर होते आणि सर्व मराठा समाज अयोध्यात मोठ्या संख्येने सहभागी होतो.म्हणजेच न्यायप्रविष्ठ मुद्यावर मनुवाद्यांची उपदव्यमूल्य दाखवुन कायदा सुव्यवस्था मोडण्याचे काम सुरु होते.म्हणजे यांचा देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जसे स्वातंत्र दिनाच्या पुर्वसंध्येला दहशतवादी काश्मिरात बॉम्बस्फोट घडवुन इशारा देतात तसेच हे मनुस्मृती मानणारे मनुवादी देशद्रोही बरोबर २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या आधल्या दिवशीच राडा घालायचे ठरवीत असतात. मुळातच या मनुवाद्यांना समता, बंधुता, न्याय, मुलभुत अधिकार याबद्दल खुपच तिरस्कार असतो. मग त्याचेच प्रतिक असलेले दिवस निवडुन हे त्या दिवशीच दंगे घडवुन आणतात. म्हणुन तर ६ डिसेंबरलाच डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीच बाबरी मशीद पाडली. आताही २६ जानेवारी च्या अगोदर २२ जानेवारीला राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा भारतीय २६ जानेवारी,१९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. त्याच दिनालाच देशात अशांतता घडवुन आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणूनच मनुस्मृती आणि संविधान किती वर्षाचे झाले प्रश्न उभा राहतो. मनुस्मृती मानणारे संविधान दिन चिरायू व्हो असे म्हणणार नाहीत.मनुस्मृतीचा विजय असो असे म्हणण्याची धाडस ही करणार नाही.पण अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थककरून मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांना मूर्ख बनविण्याचा व्यवस्थीत नियोजन करीत राहतील त्याला भारतीय जनता किती दिवस बळी पडतात हाच मोठा प्रश्न आहे.
आपला एक भारतीय नागरिक
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई -९९२०४०३८५९,

सोमवार, ८ जानेवारी, २०२४

देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त.

 देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त.




भारत हा कृषिप्रधान देश होता.त्यामुळेच एक घोषणा केली जात होती "जय जवान जय किसान" पूर्वी सरकार आणि समाज असा थेट सामना असे.शेपन्न इंच छाती असणारे आदरणीय नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर सरकार आणि समाज यांच्यामध्ये "देशभक्त व अंधभक्त" नावाची एक विचित्र अशी स्वयंघोषित फौज उभी झाली आणि ती सरकारची बाजू घेऊन आंदोलनजीवी विरोधात पोलिसा अगोदर लढण्यास सज्ज असते.
भारत सरकार राहिले नाही.तर मोदी सरकार म्हणून सर्वच प्रशासकीय अधिकारी गुलामा सारखे वागतांना दिसतात. त्यांना जागरूक नागरिकानी विचारले की तुम्ही भारत सरकारची नोकरी करता की भाजपा खासदार नरेंद्र मोदी लोकप्रतिनिधी म्हणून देशाचे प्रधानमंत्री म्हणून पांच वर्षासाठी देशाची सेवा करणार आहेत.त्या मोदी सरकारचे तुम्ही नोकर आहात काय ?. गावागावात विकास रथ घेऊन फिरणाऱ्या अधिकारी वर्गाला असे प्रश्न विचारल्यावर अनेक ठिकाणी ही देशभक्त व अंधभक्त जणू सरकार ही या फौजेची खाजगी मालमत्ता आहे अशा पद्धतीने नागरिका सोबत लढाई करीत होतीया देशभक्त व अंधभक्तांचा समज असा आहे की आपल्या शिवाय इतर समाजाचा सरकारवर काही अधिकार नाही किंवा सरकार म्हणजे काय ते फक्त आपल्यालाच कळतं,इतरांना नाही.यामुळेच देशात देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त असा संघर्ष उभा राहील आहे.मणीपुर हिंसाचारात जळत असतांना,माता भगिनींनीची नग्न धिंड काढत असतांना मात्र देशभक्त देशद्रोही अंधभक्त कुठे ही पेटून उठतांना दिसले नाही.यांची मानसिकता गाय ला माता म्हणते,मातीला माता मानते.पण जिवंत महिलांना माता मानत नाही. भारत देशात अनेक सरकारे आली आणि गेली परंतु असे कधीचं झाले नव्हते.
रे तर सरकारकडून मिळणारे पेट्रोल,डिजेल,गॅस सिलिंडर शिक्षण,आरोग्य,रोजगार, महागाई, सांस्कृतिक,कला क्रीडा सर्व प्रकारच्या सुविधा सवलती,ही इतर समाजाला जशी अनुभवावी लागतात,तशीच या फौजेतील देशद्रोही अंधभक्तांना देखील अनुभवावी लागतात.ही फौज सर्वच   समाजातील एक हिस्सा आहे, पण सरकारची बाजू मांडण्यासाठी हे अंधभक्त समाजापासून स्वताचे वेगळं अस्तित्व दाखवत असतात,आणि हिरिरीनं इतरांपेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाशी लोकलज्जा सोडून दादागिरीने पंगा घेत असतात.कारण पोलिस व प्रशासन त्यांच्या बाजूने मजबूरीने उभे असते.तिथे त्यांना सिनेमातील बाजीराव सिंघम पोलीस अधिकारी भेटत नाही.त्यामुळेच या देशद्रोही अंधभक्त फौजेला माज आला आहे म्हणूनच ते सरकारवर टीका करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहतात त्यांना विरोध केलेला खपत नाही.
  सरकारची अशी असरकारी फौज असणं हे मनुवादी मानसिकता असणारे वे राजकारण आहे.हे किती   चांगलं आणि किती वाईट हे येणारा काळ निश्चित   ठरवणारा असेल. तेव्हा वेळ गेलेली असेल हे मात्र   निश्चित.पण यामुळे सर्वच समाजात एक मोठी दरी निर्माण झाली असल्याचे सत्य चित्र समाजात स्पष्टपणे दिसत आहे.आणि लोकांमध्ये आपापसात एक विचित्र कटुता निर्माण झाली आहे.आता प्रश्न असा पडतो की ही कटुता देशाला पुढं नेमक कुठे घेऊन जाणार आहे?.  भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार हे काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, ते सत्तेत नसेल तेव्हा आजच्या या देशद्रोही अंधभक्त फौजेचं काय होणार? 
  मराठा ओबीसी बेबीच्या देठा पासुन बोबळत होता "गर्वसे कहो हम हिंदू है" आणि बच्चा बच्चा राम का मंदिर के काम का.आता श्रीराम मंदिर तयार झाले  आहे.त्याच्या एकूण व्यवस्थापनात समिती,कमिटीत   कुठेच मराठा,ओबीसी औषधला सुद्धा नाही. त्यांचे दुःख आम्हाला होत आहे म्हणूनच आम्ही लिहत आहोत.कारण आमच्या धडावर आमचे डोके आहे त्यातील मेंदू आमच्या सद्विवेकबुद्धीला पटले तर स्वीकारतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यात आहे.मराठा ओबीसी नां वाटत होते की प्रभू श्रीराम यांचे मंदिर झाले की आमच्या शिक्षण आरोग्य,रोजगार,कला क्रीडा,सांस्कृतिक समस्या कायमस्वरूपी दूर होतील.येणाऱ्या काळात तुम्ही मराठा ओबीसी कुठे असणार याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. 
   मराठा ओबीसीला यातला धोका दिसत नव्हता. 'आपलं सरकार' आले असे कुणा एका समाजाला त्यातील एका गटाला वाटणे आणि त्या गटाने इतर समाजाशी दुश्मनी स्वीकारणं आणि इतरांना सरकारबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाकारणे.सतराशे साठ जाती आणि धर्म संविधानामुळे गुण्या गोविंदाणे आनंदाने नांदत असतांना त्यांना आम्हाला आवडेल असंच बोला असे आग्रही राहणे या विकृतीनं एकसंघ देश ही भावना बाजूला पडते आहे.राज्य व केंद्र सरकारच्या एकूण कारभरा विरोधात व समाज व्यवस्थेबद्दल आता नगरिकानी समाजात सत्य परिस्थितीची अशी विश्लेषक चर्चा किंवा संवाद होतांना टीका बिलकुल झालीच नाही पाहिजे ही मानसिकता देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्तांची झाली आहे.त्याला चॅनल मीडिया प्रिंट मीडिया संपादक,पत्रकार घाबरत असतील तर कोणत्याही समस्याची चर्चाच होणार नाही.
देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्तांनी चाळीस पैशांचे चियर लीडर सारखे पत्रकार,संपादक खरीदी करून ठेवले आहेत.भारतात १४ वर्षांपूर्वी आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाले.त्यात एक मजेशीर प्रकार होता.खेळाडूने चौकार,षटकार मारला की मैदानाबाहेरील छोट्याश्या स्टेजवर तोकड्या कपड्यातील परदेशी मुली नाचू लागायच्या.त्यामुळे क्रिकेट शौकीन हवसे नवसे गवसे त्या मुलीकडे पाहून जोर जोरात शिटी वाजऊन जल्लोष करतात.त्या मुलीना क्रिकेटचे काही ज्ञान होते किंवा खेळाडूंची माहिती होती असे काहीही नसतांना त्या जीवतोडून पांच मिनिट संपूर्ण शरीर हलवित असतात.फक्त इशारा झाल्यावर नाचून लोकांचं लक्ष वेधून घेणे एवढंच त्यांचं काम आणि चियर लीडर हीचं त्या मुलींची ओळख असते.तशीच पत्रकार संपादक आणि अंकर यांची झाली आहे.देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त काही करत असतांना ही पत्रकार संपादक काहीच बोलत नाही. नको त्या विषयावर मात्र खुपवेळ चर्चा घडवून आणतात.चोवीस तास तेच दाखवतात. असाच प्रकार २०१४ पासून भारतीय राजकारणात पण सुरू झाला.जशा मैदानातील चियर लीडर मुली तोकड्या कपड्यात नाचू लागतात तशी "तोकड्या बुद्धीची" काही देशद्रोही अंधभक्त मंडळी कोणत्याही सरकारी मूर्खपणावर नाचू लागतात.त्यांच्या दृष्टीने तो मास्टर स्ट्रोक असतो.  
      देशात केंद्र सरकारने जे काही लक्षवेधी निर्णय घेतले. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे नोटबंदी, जी एस टी,लॉक डाऊन असो, की थाळ्या वाजवणे असो, देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त रुपी चियर लीडर तोकड्या बुद्धीने नाचायला नेहमीच तयार असता.आणि वर गेल्या ७५ वर्षांत असा मास्टर स्ट्रोक कोणी मारलाच नव्हता असे बेबीच्या देठा पासून ओरडून ओरडून सांगतात.सत्तेत सरकार कोणतेही असो ते चुकले की जनतेला त्या सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार असतो. त्या प्रश्नाची सरकारनेच उत्तरे दिली पाहिजे.मध्यस्ती व्यक्ती,किंवा संघटना यांनी लोकांना शिव्या देणे ट्रोल करणे याला काही अर्थ नाही.त्यामुळे काय योग्य व काय योग्य नाही याचा सदसदविवेक बुद्धीने विचार करून प्रत्येक नागरिकाने विचार करावा फक्त आपण त्या पक्षाचे कार्यकर्ता,पदाधिकारी आहोत म्हणून आपल्या पक्षाने जे धोरण आखले,निर्णय घेतले ते सर्वच योग्य आहेत व त्याला लोकांनी विरोध केला म्हणुन शिव्या देणे, देशद्रोही,धर्मद्रोही ठरवणे अशी मनुवादी मानसिकतावाली वृत्ती सोडून द्यायला पाहिजे.भारतीय संविधानाने सरकारला विरोध करण्याचा लोकांना अधिकार आहे हे मान्य करायला पाहिजे.आणि आपण मतदार म्हणून ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनी देखील निर्भीडपणे बिनधास्तपणे विचारले पाहिजे.या देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त  मंडळींना न घाबरता आपला सरकारवर टिका करण्याचा अधिकार टिकवून ठेवण्यासाठी सतत  जागरूक राहिले पाहिजे.किंवा जे ही धाडस करतात त्यांना तन,मन,धनाने योग्य ते सहकार्य मदत केली पाहिजे. तेच होत नसल्यामुळे देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त शिरजोर झाले आहेत.त्यामुळे कोण्या एका समाजाचे नुकसान होणार नाही तर संपूर्ण देशवाशी नागरिकांचे न भरून येणारे नुकसान होईल ही प्रत्येक नगरिकानी,मतदारांनी अंधभक्तांनी लक्षात घ्यावे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.