सोमवार, ८ जानेवारी, २०२४

देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त.

 देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त.




भारत हा कृषिप्रधान देश होता.त्यामुळेच एक घोषणा केली जात होती "जय जवान जय किसान" पूर्वी सरकार आणि समाज असा थेट सामना असे.शेपन्न इंच छाती असणारे आदरणीय नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर सरकार आणि समाज यांच्यामध्ये "देशभक्त व अंधभक्त" नावाची एक विचित्र अशी स्वयंघोषित फौज उभी झाली आणि ती सरकारची बाजू घेऊन आंदोलनजीवी विरोधात पोलिसा अगोदर लढण्यास सज्ज असते.
भारत सरकार राहिले नाही.तर मोदी सरकार म्हणून सर्वच प्रशासकीय अधिकारी गुलामा सारखे वागतांना दिसतात. त्यांना जागरूक नागरिकानी विचारले की तुम्ही भारत सरकारची नोकरी करता की भाजपा खासदार नरेंद्र मोदी लोकप्रतिनिधी म्हणून देशाचे प्रधानमंत्री म्हणून पांच वर्षासाठी देशाची सेवा करणार आहेत.त्या मोदी सरकारचे तुम्ही नोकर आहात काय ?. गावागावात विकास रथ घेऊन फिरणाऱ्या अधिकारी वर्गाला असे प्रश्न विचारल्यावर अनेक ठिकाणी ही देशभक्त व अंधभक्त जणू सरकार ही या फौजेची खाजगी मालमत्ता आहे अशा पद्धतीने नागरिका सोबत लढाई करीत होतीया देशभक्त व अंधभक्तांचा समज असा आहे की आपल्या शिवाय इतर समाजाचा सरकारवर काही अधिकार नाही किंवा सरकार म्हणजे काय ते फक्त आपल्यालाच कळतं,इतरांना नाही.यामुळेच देशात देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त असा संघर्ष उभा राहील आहे.मणीपुर हिंसाचारात जळत असतांना,माता भगिनींनीची नग्न धिंड काढत असतांना मात्र देशभक्त देशद्रोही अंधभक्त कुठे ही पेटून उठतांना दिसले नाही.यांची मानसिकता गाय ला माता म्हणते,मातीला माता मानते.पण जिवंत महिलांना माता मानत नाही. भारत देशात अनेक सरकारे आली आणि गेली परंतु असे कधीचं झाले नव्हते.
रे तर सरकारकडून मिळणारे पेट्रोल,डिजेल,गॅस सिलिंडर शिक्षण,आरोग्य,रोजगार, महागाई, सांस्कृतिक,कला क्रीडा सर्व प्रकारच्या सुविधा सवलती,ही इतर समाजाला जशी अनुभवावी लागतात,तशीच या फौजेतील देशद्रोही अंधभक्तांना देखील अनुभवावी लागतात.ही फौज सर्वच   समाजातील एक हिस्सा आहे, पण सरकारची बाजू मांडण्यासाठी हे अंधभक्त समाजापासून स्वताचे वेगळं अस्तित्व दाखवत असतात,आणि हिरिरीनं इतरांपेक्षा वेगळा विचार मांडणाऱ्या समाजातील प्रत्येक घटकाशी लोकलज्जा सोडून दादागिरीने पंगा घेत असतात.कारण पोलिस व प्रशासन त्यांच्या बाजूने मजबूरीने उभे असते.तिथे त्यांना सिनेमातील बाजीराव सिंघम पोलीस अधिकारी भेटत नाही.त्यामुळेच या देशद्रोही अंधभक्त फौजेला माज आला आहे म्हणूनच ते सरकारवर टीका करणाऱ्यांच्या विरोधात उभे राहतात त्यांना विरोध केलेला खपत नाही.
  सरकारची अशी असरकारी फौज असणं हे मनुवादी मानसिकता असणारे वे राजकारण आहे.हे किती   चांगलं आणि किती वाईट हे येणारा काळ निश्चित   ठरवणारा असेल. तेव्हा वेळ गेलेली असेल हे मात्र   निश्चित.पण यामुळे सर्वच समाजात एक मोठी दरी निर्माण झाली असल्याचे सत्य चित्र समाजात स्पष्टपणे दिसत आहे.आणि लोकांमध्ये आपापसात एक विचित्र कटुता निर्माण झाली आहे.आता प्रश्न असा पडतो की ही कटुता देशाला पुढं नेमक कुठे घेऊन जाणार आहे?.  भाजपाचे नरेंद्र मोदी सरकार हे काही अमरपट्टा घेऊन आलेलं नाही, ते सत्तेत नसेल तेव्हा आजच्या या देशद्रोही अंधभक्त फौजेचं काय होणार? 
  मराठा ओबीसी बेबीच्या देठा पासुन बोबळत होता "गर्वसे कहो हम हिंदू है" आणि बच्चा बच्चा राम का मंदिर के काम का.आता श्रीराम मंदिर तयार झाले  आहे.त्याच्या एकूण व्यवस्थापनात समिती,कमिटीत   कुठेच मराठा,ओबीसी औषधला सुद्धा नाही. त्यांचे दुःख आम्हाला होत आहे म्हणूनच आम्ही लिहत आहोत.कारण आमच्या धडावर आमचे डोके आहे त्यातील मेंदू आमच्या सद्विवेकबुद्धीला पटले तर स्वीकारतो आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यात आहे.मराठा ओबीसी नां वाटत होते की प्रभू श्रीराम यांचे मंदिर झाले की आमच्या शिक्षण आरोग्य,रोजगार,कला क्रीडा,सांस्कृतिक समस्या कायमस्वरूपी दूर होतील.येणाऱ्या काळात तुम्ही मराठा ओबीसी कुठे असणार याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. 
   मराठा ओबीसीला यातला धोका दिसत नव्हता. 'आपलं सरकार' आले असे कुणा एका समाजाला त्यातील एका गटाला वाटणे आणि त्या गटाने इतर समाजाशी दुश्मनी स्वीकारणं आणि इतरांना सरकारबद्दल काही बोलण्याचा अधिकार नाकारणे.सतराशे साठ जाती आणि धर्म संविधानामुळे गुण्या गोविंदाणे आनंदाने नांदत असतांना त्यांना आम्हाला आवडेल असंच बोला असे आग्रही राहणे या विकृतीनं एकसंघ देश ही भावना बाजूला पडते आहे.राज्य व केंद्र सरकारच्या एकूण कारभरा विरोधात व समाज व्यवस्थेबद्दल आता नगरिकानी समाजात सत्य परिस्थितीची अशी विश्लेषक चर्चा किंवा संवाद होतांना टीका बिलकुल झालीच नाही पाहिजे ही मानसिकता देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्तांची झाली आहे.त्याला चॅनल मीडिया प्रिंट मीडिया संपादक,पत्रकार घाबरत असतील तर कोणत्याही समस्याची चर्चाच होणार नाही.
देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्तांनी चाळीस पैशांचे चियर लीडर सारखे पत्रकार,संपादक खरीदी करून ठेवले आहेत.भारतात १४ वर्षांपूर्वी आयपीएल क्रिकेट सामने सुरू झाले.त्यात एक मजेशीर प्रकार होता.खेळाडूने चौकार,षटकार मारला की मैदानाबाहेरील छोट्याश्या स्टेजवर तोकड्या कपड्यातील परदेशी मुली नाचू लागायच्या.त्यामुळे क्रिकेट शौकीन हवसे नवसे गवसे त्या मुलीकडे पाहून जोर जोरात शिटी वाजऊन जल्लोष करतात.त्या मुलीना क्रिकेटचे काही ज्ञान होते किंवा खेळाडूंची माहिती होती असे काहीही नसतांना त्या जीवतोडून पांच मिनिट संपूर्ण शरीर हलवित असतात.फक्त इशारा झाल्यावर नाचून लोकांचं लक्ष वेधून घेणे एवढंच त्यांचं काम आणि चियर लीडर हीचं त्या मुलींची ओळख असते.तशीच पत्रकार संपादक आणि अंकर यांची झाली आहे.देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त काही करत असतांना ही पत्रकार संपादक काहीच बोलत नाही. नको त्या विषयावर मात्र खुपवेळ चर्चा घडवून आणतात.चोवीस तास तेच दाखवतात. असाच प्रकार २०१४ पासून भारतीय राजकारणात पण सुरू झाला.जशा मैदानातील चियर लीडर मुली तोकड्या कपड्यात नाचू लागतात तशी "तोकड्या बुद्धीची" काही देशद्रोही अंधभक्त मंडळी कोणत्याही सरकारी मूर्खपणावर नाचू लागतात.त्यांच्या दृष्टीने तो मास्टर स्ट्रोक असतो.  
      देशात केंद्र सरकारने जे काही लक्षवेधी निर्णय घेतले. त्यातील उत्तम उदाहरण म्हणजे नोटबंदी, जी एस टी,लॉक डाऊन असो, की थाळ्या वाजवणे असो, देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त रुपी चियर लीडर तोकड्या बुद्धीने नाचायला नेहमीच तयार असता.आणि वर गेल्या ७५ वर्षांत असा मास्टर स्ट्रोक कोणी मारलाच नव्हता असे बेबीच्या देठा पासून ओरडून ओरडून सांगतात.सत्तेत सरकार कोणतेही असो ते चुकले की जनतेला त्या सरकारला प्रश्न विचारायचा अधिकार असतो. त्या प्रश्नाची सरकारनेच उत्तरे दिली पाहिजे.मध्यस्ती व्यक्ती,किंवा संघटना यांनी लोकांना शिव्या देणे ट्रोल करणे याला काही अर्थ नाही.त्यामुळे काय योग्य व काय योग्य नाही याचा सदसदविवेक बुद्धीने विचार करून प्रत्येक नागरिकाने विचार करावा फक्त आपण त्या पक्षाचे कार्यकर्ता,पदाधिकारी आहोत म्हणून आपल्या पक्षाने जे धोरण आखले,निर्णय घेतले ते सर्वच योग्य आहेत व त्याला लोकांनी विरोध केला म्हणुन शिव्या देणे, देशद्रोही,धर्मद्रोही ठरवणे अशी मनुवादी मानसिकतावाली वृत्ती सोडून द्यायला पाहिजे.भारतीय संविधानाने सरकारला विरोध करण्याचा लोकांना अधिकार आहे हे मान्य करायला पाहिजे.आणि आपण मतदार म्हणून ज्यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले त्यांनी देखील निर्भीडपणे बिनधास्तपणे विचारले पाहिजे.या देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त  मंडळींना न घाबरता आपला सरकारवर टिका करण्याचा अधिकार टिकवून ठेवण्यासाठी सतत  जागरूक राहिले पाहिजे.किंवा जे ही धाडस करतात त्यांना तन,मन,धनाने योग्य ते सहकार्य मदत केली पाहिजे. तेच होत नसल्यामुळे देशभक्ता विरोधात देशद्रोही अंधभक्त शिरजोर झाले आहेत.त्यामुळे कोण्या एका समाजाचे नुकसान होणार नाही तर संपूर्ण देशवाशी नागरिकांचे न भरून येणारे नुकसान होईल ही प्रत्येक नगरिकानी,मतदारांनी अंधभक्तांनी लक्षात घ्यावे.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा