भीमा कोरेगाव संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक.
पेशवाईचा वैचारिक वारसदार गृहमंत्री,त्याचे सरकार आदेश देणार.पोलीस त्याची अंमलबजावणी करणार आणि भिम सैनिक संघर्ष करणार सध्या आपल्या देशात हेच चालू आहे.त्यात कोणालाच कोणाची सामाजिक बांधिलकी नाही.सर्वच सरकारी खाते हे खाते आहेत. सरकारी कर्मचारी अधिकारी हे राजकीय नेत्यांची गुलामी स्वीकारून देशातील नागरिकांचे आर्थिक शोषण करीत असतात.सरकार म्हणजे कोण राजकीय पक्षांचे सत्ताधारी नेते भांडवलदारांच्या फायद्यासाठी योजना,बिल बनविणार त्यांची अंमलबजावणी कर्मचारी अधिकारी पोलीस करणार. सरकारच्या धोरणाला विरोध कोण करणार?.कामगार, शेतकरी,ग्राहक म्हणजेच नागरिक आणि आम्ही भिम सैनिक मोर्चे आंदोलने करणार पोलीस त्यांच्यावर बळाचा वापर करणार,आणि आदेशाचे पालन करणार.प्रत्येक नेता आणि शासकीय कर्मचारी अधिकारी नागरिकांचे वेगवेगळा पद्धतीने आर्थिक शोषण करणार आणि सांगणार वरून सरकारचा आदेश आहे.आम्ही काय करणार?. सरकारच्या कोणत्याही खात्यात जा चिरीमिरी दिल्या शिवाय काम होत नाही. नाहीतर एक नाही अनेक चुका काढल्या जातात. मग कार्यालयात चकरा माराव्या लागतात.त्यामुळे एक तर रोजगार बुडतो आणि येण्या जाण्याचा प्रवास खर्च चहा पाणी जेवणाचा खर्च हा आलाच.तो करण्यापेक्षा चिरीमिरी देणेच सोयीस्कर परवडते.हाच सर्व नागरिकांना सरकारी खात्याचा अनुभव आला असेल.म्हणूनच सरकारी खाते हे खातेच असते.त्यांचे मालक सरकारी कर्मचारी अधिकारी असतात.
एकटा दुकटा नागरिक संघर्ष करू शकत नाही.पण एक भिम सैनिक मात्र परिणामाची पर्वा न करता संघर्ष करण्यासाठी नेहमीच उभा राहतो आणि बघता बघता हजारो भिम सैनिक त्याला गांव ते तालुका जिल्हा म्हणजेच राज्यभर समर्थन देण्यासाठी उभे राहतात.मग ते एकाची समस्या राहत नाही तर समाजाची समस्या होते.मग त्याला समाजाचे चळवळीचे आंदोलन नांव दिल्या जाते.त्यासाठी प्रत्येक खात्यातील लाभार्थीची एकजूट म्हणजेच संघटना असायला पाहिजे.आणि ती कोणत्याही राजकीय पक्षाच्या दबावाखाली नसावी.स्वतंत्र विचारांची असावी.भीमा कोरेगाव च्या विजय स्तंभा वरील जागेची, जमिनीची अशीच लढाई सुरू आहे.ती कोण्या एक आजच्या दादाभाऊ अभंग ची किंवा पूर्वीच्या सुदाम पवार ची नव्हती.पण राजकीय पक्षाच्या गटबाजी,दलाली व लाचारीमुळे ती वेळोवेळी फुटबॉल सारखी उडविला गेली आहे.१८१८ ते १९२७ पर्यंत ती कोणाला माहिती नव्हती.विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी तो शोधून काढला तेव्हा पासून त्यांना मानणारा भिमसैनिक,अनुयायी दरवर्षी हजारो च्या संख्येने भीमा कोरेगाव विजय स्तंभावर येत आहे.२०१८ नंतर
दरवर्षी आम्ही ५ /६ सहा डिसेंबर ला शिवाजी पार्क मैदानात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्ताने राज्य सरकारने व महानगरपालिकेने काय व्यवस्था केली यांची पाहणी करून चर्चा करतो.कागदावर नकाशा द्वारे दाखविलेलं जाते. त्यांची हजारो लाखों हँडबिल पोस्टर हातो हात वाटली जातात. प्रत्यक्षात ते आहे काय पाहिलं तर कुठंच काही दिसत नाही. आणि संबंधित अधिकारी यांना भेटू विचारले तर आपल्या माणसाला काम दिले आहे. तुमच्या समोर कॉल करून त्या ठेकेदाराला दम देतो.त्यांचा नंबर मांगीतला तर तो समितीच्या माणसाचा माणूस असतो किंवा कोणत्या तरी नेत्याचा अधिकाऱ्यांचा माणूस असतो.होऊन जाईल आम्ही करतो असे उत्तर ठरलेले असते.महानगरपालिका,राज्य सरकार आणि पोलिस सर्वच मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी असतात.मग एकजुठीने एक मताने कोणते ही काम होत नाही. ज्यांनी आवाज उचलला त्याला चिरीमिरी देऊन आवाज बंद केल्या जातो. यावर माझे आणि माझ्या वकील मुलाचे नेहमीच वाद विवाद होत असतात. एवढे जिगरबाज कार्यकर्ते नेते असतांना योग्य त्या प्रमाणे नियोजन का होत नाही. सर्वच अधिकारी भ्रष्ट नाही किंवा कार्यकर्ते नेते भ्रष्ट नाहीत. पण तडजोडीचे राजकारण इमानदार अधिकारी कर्मचारी कार्यकर्ते नेते यांना करावे लागते.त्यांचे उत्तम उदाहरण म्हणजे दादर परिसरात बॅनर बाजी करणाऱ्या आणि स्टॉल लावणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांचे नेत्यांचे देता येईल.अनेक स्टॉलवर एकवेळ भोजन,बिस्किट,काही साहित्य वाटून फक्त उद्घाटन करून फोटो काढल्या जातात.नंतर त्यात काहीच होत नाही. असा लोकांना एवढी बॅनरबाजी करण्याची गरज का पडते?.यासाठी यांचे उद्योग धंदे उत्पन्नाचे साधने आहेत काय?.मग यासाठी लागणारा खर्च कुठून येतो.याचे सरळ उत्तर आहे. अधिकारी आणि ठेकेदाराकडून हे बॅनरबाजी करून घेतली जाते. त्याबदल्यात कागदावर नकाशा द्वारे दाखविलेलं जाते. त्या विरोधात बोलायचे नाही.यावर्षी ६ डिसेंबर २०२३ ला सर्व बुक स्टॉल समोर रेड कारपेट टाकल्या जाईल. धूल बिलकुल उडणार नाही अनुयायांना त्रास होणार नाही असे कोणी कोणी जाहीरपणे सांगितले होते.कागदावर पण लिहून जाहीर केले होते.आम्ही ४/५ डिसेंबर ला अनेक अधिकाऱ्यांना विचारले उद्या सकाळी तुम्हाला दिसेल रात्रीच काम होऊन जाईल असे सांगितले गेले.पण ६ डिसेंबर ला कुठेच रेड कारपेट दिसले नाही. एकमेव युवक वंचित बहुजन आघाडी ने त्या विरोधात जाहीरपणे पत्रक काढून निषेध नोंदविला.बाकी अनेकानी आपसात चर्चा केल्या महापरिनिर्वाण दिनासाठी राज्य सरकारचा आणि महानगरपालिका यांचा किती निधी येतो आणि खर्च होतो.ठोस उत्तर कोणीच कोणाला देत नाही आणि विचारत नाही कारण काय?. संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक.
मी भीमा कोरेगाव ला दरवर्षी चार दिवस अगोदर जाऊन येतो.नियोजन कसे आहे. संबधित कार्यकर्ते नेते,अधिकारी यांच्या बरोबर चर्चा करून माहिती घेतो.कारण "मागितल्याने मिळत नाही आणि संघर्षा शिवाय पर्याय नाही" संघटीत होऊन संघर्ष केला तर यशस्वी होता येतो. म्हणूनच संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक संघर्ष पत्र व्यवहार करून टाळावा.नसेल तर शक्ती प्रदर्शन आवश्यक आहेच.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ (1 जानेवारी 2024) मानवंदना सोहळा नियोजनाची बैठक मान. जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.सदर बैठक हे विजय स्तंभ भीमा कोरेगाव नियोजनासाठी होती. पण अनेक कार्यकर्त्यांनी बार्टीच्या निधी बाबत आणि विद्यार्थाच्या शिशुवृतीच्या निधी वाटपा संदर्भात प्रश्न विचारून सदर बैठकीत काही कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे त्यांची भूमिका मांडली व प्रत्येक जण भूमिका मांडत असताना गोंधळ झाला व या गोंधळातच बैठक संपली.भीमा कोरेगाव संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक थांबला नाही.
कोरेगाव भीमा विजयस्तंभ हा आपल्या सर्वांसाठी आस्थेचा श्रद्धेचा प्रेरणादायी लक्षवेधी भावनिक आहे. देशभरातून लाखों लोक दरवर्षी अनेक वर्षांपासून विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगाव ला येत असतात.त्यांना कोणी आमंत्रण निमंत्रण देत नाही. त्यासाठी कोणते ही हँडबिल,पोस्टर काढल्या जात नाही.इथे पिण्याचे पाणी मिळेल काय यांची कोणी अपेक्षा सुद्धा ठेवत नाही.पिण्याचे पानी जेवण सर्व सोयीने लोक येत असतात. शासनाकडून कोणती सुविधा मिळावी अशी कोणती ही अपेक्षा न ठेवता लाखों लोक आपल्या सोयीने आणि हिंमतीने भीमा कोरेगावला येतात.२०१८ ला दोनशे वर्ष झाले म्हणून लोक आले असता १ जानेवारी २०१८ ला मनोहर भिडे यांच्या जगदंब जॉकीट घातलेल्या गांडु तरुणांनी शेतात लपून दगड फेक करून जो जीवघेणा हल्ला लोकावर केला होता. त्या नंतर ३ जानेवारी २०१८ ला महाराष्ट्र बंद पाडला होता त्यांची दखल जागतिक पातळीवरील चॅनल मिडियाने घेतली. सोशल मिडियामुळे भीमा कोरेगाव चा इतिहास घरा घरात पोचला बहुसंख्य मराठा, ओबीसी यांना हा इतिहास माहिती नव्हता.ते पण आता भीमा कोरेगाव ला मोठ्या संख्येने येत आहेत.ती संख्या बघून आता सर्वांचे डोळे फिरत आहेत.पेशवा सरकार त्यांना २०१८ झाली रोखण्यास असमर्थ ठरले म्हणूनच आता ते नवीन पद्धतीने रोखणीचे षड्यंत्र करीत आहेत.ते म्हणजे पांच सात किलोमीटर वर गाडी पार्किंग करण्याचे व्यवस्था.त्यामुळे वयोवृद्ध जेष्ट भिम सैनिक महिला या त्रासाला वैतागून येणे टाळतील अशी अपेक्षा पेशवा सरकारची आणि अधिकारी वर्गाची मानसिकता झाली आहे.त्यांच्या आदेशाचे पालन अधिकाऱ्यांना करावी लागत आहे.इतिहास वाचला की इतिहास घडविता येतो भीमा कोरेगाव हा असाच संग्राम आहे. १८१८ पेशवाईचा झालेला पराभव आज पेशवाईचा राजकीय वैचारिक वारसा सांगणाऱ्यांच्या जिवारी लागत आहे. मग ते विजय स्तंभाला निधी उपलब्ध करून देतील ही अपेक्षा चुकीची आहे.संविधान असे सांगते की एखाद्याला आधार देताना असा आधार द्यावा की,त्याला त्याची 'जाणीव' ही होऊ नये,आणि.'उणीव' ही राहू नये !.
विजयस्तंभ परिसरातून 37 वर्षाची परंपरा असलेल्या अभिवादन सभा चार वर्षांपूर्वी २०१८ ला बाहेर काढल्या व आत्ता मानवंदना रॅलीने त्रास होतो असे सांगून आंबेडकरी जनतेच्या रॅली बंद करण्याचा डाव पेशवा सरकार अधिकाऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेऊन खेळत आहे. पारंपारिक मानवंदना व अभिवादनाची सभा परंपरा मोडीत काढण्याचा आपल्याच काही बांधवांचा हाताशी धरून हा प्रयत्न केल्या जात आहे.परंतु आंबेडकरी जनतेला हे काही नवीन नाही.आपसात किती ही मतभेद असले तरी लोक मान अपमान बाजूला ठेऊन दीक्षाभूमी नागपूर,चैत्याभूमी दादर मुंबई,चवदार तळे महाड आणि विजय स्तंभ भीमा कोरेगाव ला लाखों च्या संख्येने येत असतात.व एक साथ मानवंदना देतात.कायदा सुव्यवस्था ठेवण्याच्या नांवाखाली दरवर्षी मनुवादी मानसिकता असणारे राज्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी यांना कसा त्रास देऊन रोखता येईल यांचेच नियोजन करीत असते. त्याला साथ देण्यासाठी दर पांच वर्षाने नवीन कार्यकर्ते नेते तयार केले जातात. जून अनुभवी मागे पडतात.असे मला २००७ ला भीमा कोरेगाव विजय स्तंभाची सुरवात करणारे आंबेडकरी चळवळीतील जेष्ट नेते सुदाम पवार यांनी मुलाखत देतांना सांगितले होते. विजय स्तंभाची जागा बाजूच्या शेत जमीन वरील अतिक्रमन यांच्या विरोधात सनद शिर मार्गाने पत्रव्यवहार आणि रस्त्यावरील संघर्षाची सुरवात त्यांनी केली होती.आज त्यांचे वे ९३ आहे. सणसवाडीला तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे त्यांचे निवास स्थान आणि बुद्धिस्ट मुवहमेन्ट मुव्ह मेंट सेंटर (ट्रस्ट) संचालित नालंदा बुद्ध विहार आहे.तिथे नियमितपणे धम्म शिबिर सामाजिक कार्यक्रम होत असतात.आणि हजारो लोक तिथे दरवर्षी भोजन दान घेतात.जिवावर उद्धार होऊन त्यांनी अनेक जन आंदोलन केली आहेत.त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.पण राजकीय पक्षाच्या गटबाजी,दलाली व लाचारीमुळे ती वेळोवेळी फुटबॉल सारखी उडविला जात आहे.५०० महार सैनिकांची एकजुट होऊन २८००० हजार पेशवा सैनिकांच्या विरोधात जो संघर्ष केला आणि विजय मिळविला त्याचा कोणता आदर्श भीमा कोरेगाव ला येणारे घेतात हा प्रश्न मला दरवर्षी पडतो.त्या वर मी दरवर्षी हे लिहतो.आपसातली गटबाजी "मी मोठा की तू मोठा" ही संपत नाही. म्हणूनच भीमा कोरेगाव विजय स्तंभाच्या जमिनीचा कोर्टाने दिलेला आदेश त्याची अंमलबजावणी करतांना अनेक अडचणी निर्माण केल्या जातात. डिसेंबर जानेवारीत सर्वांच्या अंगातील रक्त भीमा कोरेगाव मध्ये लढलेल्या महरांचे होते. बाकीच्या वेळी तिथे काय चालले त्यांना काही घेणे देणे नसते.म्हणूनच भीमा कोरेगाव संघर्षाचा त्रिकोण सरकार,पोलीस आणि भिम सैनिक हा थांबत नाही.भीमा कोरेगाव विजय स्तंभाला मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या प्रत्येकानी याचे आत्मचिंतन करावे हीच सर्वांना कळकळीची विनंती. भीमा कोरेगाव संघर्षातील शहिदांना मानाचा मुजरा.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडूप मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा