पत्रकार संपादक गांडू झालेत काय?.
३ जानेवारी २०२४ हा दिवस ऐतिहासिक होता.कारण भारताच्या प्रधानमंत्री यांनी शेवटची पत्रकार परिषद घेतली होती त्याला तब्बल दहा वर्षं पूर्ण झाले.आपल्या देशातील कट्टर हिंदूंना दरवर्षी प्रत्येक महिन्यात कोणता सण उत्सव साजरा करावे यांचे दिनदर्शिका दिलेले असते.इंग्रजी कॅलेंडर पेक्षा हिंदू काल गणना नुसार आपले महीने हिंदू कलगणनेत विक्रम संवत् आणि शालिवाहन शके या दोन कलागणना महत्त्वाच्या आहेत.एरव्ही आपण इंग्रजी कॅलेंडरनुसार गोष्टी करतो, पण अनेक हिंदू सणवार हे या कालगणांनुसारच साजरे केले जातात. शालिवाहनाने शकांवर मिळवलेल्या विजयाचं प्रतीक म्हणून शालिवाहन शक ही नवीन कालगणना तत्कालीन मराठी मु लखात सुरू झाल्याचं म्हटलं जातं.असो आपण भारतीय झालो तेव्हा पासून ज्या तारखेला जी लक्षवेधी घटना घडली तिची आठवण म्हणून आपण ती दरवर्षी प्रेरणा मिळावी यासाठी लक्षात ठेवतो.ती रीतिरिवाज परंपरा यात बसत नाही. ती ऐतिहासीक घटना म्हणून तिची नोंद झाली असते तो दिवस वर्धापन दिन असतो,किंवा जन्मदिन असतो.म्हणून ती आपणास प्रेरणादायी असते.
भारताचे एक जगप्रसिद्ध अर्थ तज्ञ म्हणून ज्यांना ओळखले जात होते. ते या भारत देशाचे प्रधानमंत्री झाले होते.ते कधीच मन की बात करीत नव्हते. ते जाहीरपणे जन की बात करण्यासाठी निवडक शंभर पत्रकार संपादक आणि चॅनल मीडिया यांच्या समोर बसून प्रश्न उत्तरे करीत होते.त्यांना मनुवादी मानसिकता असलेल्या पत्रकार संपादकांनी राजकीय नेत्याच्या तोंडी "मौनी बाबा" हे वाक्य घालून प्रचंड बदनाम केले होते.त्याच मौनी बाबानी म्हणजेच डॉ.मनमोहनसिंग यांनी आपल्या प्रधानमंत्री कारकिर्दीतली ११७ वी आणि शेवटची पत्रकार परिषद तब्बल १०० पत्रकारांना तोंड देत ३ जानेवारी २०१४ रोजी घेतली होती.२०१४ नंतर झालेल्या पंतप्रधान झालेल्या ५६ इंच छातीच्या विश्वगुरूंनी दहा वर्षात एकही पत्रकार परिषद न घेण्याचा विश्वविक्रम करून दाखवला.आधुनिक जगात कुठेही हे घडलेलं नाही.तरी त्या विरोधात एका ही पत्रकाराने संपादकाने चॅनल मीडिया संपादक वृतनिवेदक अंकर जाहीरपणे विचारण्याची हिंमत केली नाही. म्हणूनच मी लिहतो की पत्रकार संपादक गांडू झालेत काय?.निर्भीड,निर्भय,निपक्षपाती पत्रकारिता करणाऱ्या पत्रकार संपादकांची जाहीर माफी असावी
शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांनी ते धाडस केले ते नांव जग जाहीर आहेत त्यात रविश कुमार,निखिल वागळे,निरगुडकर,अशी अनेक नांवे आहेत. त्यांना संपविण्याचे काम झाले पण ते संपले नाही. बाकी हा देश वैचारिकदृष्ट्या इतका कंगाल कसा झाला आहे की सरासरी ११.७ पत्रकार परिषदा दरवर्षी म्हणजेच महिन्याला १ पत्रकार परिषद घेणाऱ्याला मौनी बाबा म्हणून हीनवत होता.या चरित्र हीन राजकीय नेत्यांना प्रसिद्धी देत होता. तोच चॅनल,प्रिंट मीडिया १२० महिन्यात एकाही जाहीर पत्रकार परिषद न घेणाऱ्या आणि एकाही पत्रकाराला एकही उत्तर न देणार्याला 'विश्वगुरू' म्हणतो?.शोध पत्रकारिता करणाऱ्या या देशातील मिडीया हे सहन करून चोवीस तास विश्वगुरूला चॅनलवर दाखवतो हा तर वैचारिक दारिद्र्याचा,आणि लाचारी,मिंधेगिरीचा कळस म्हणावा लागेल.
पत्रकार संपादकचा मेंदू गाढव झाला.त्यांनी मतदार व नागरिकांना ही गाढव बनविले अशीच आजची देशाची परिस्थिती आहे.ते आपण एका गोष्टी द्वारे समजून घेऊ या.एकदा एका सिंहाला भूक लागली आणि तो कोल्ह्याला म्हणाला - माझ्यासाठी काही शिकार शोध,नाहीतर मी तुला खाईन.कोल्हा गाढवाकडे गेला आणि म्हणाला,माझ्याबरोबर सिंहाजवळ चल कारण सिंहाला तुला जंगलाचा राजा बनवायचे आहे.गाढवाला ते खरे वाटले तो सिंहाकडे गेला. गाढवाला पाहताच भुकेल्या सिंहाने त्याच्यावर हल्ला केला आणि त्याचे कान कापला, (२०१४) हल्ला होताच गाढव कसा तरी पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हा गाढव कोल्ह्याला म्हणाला - तू माझी फसवणूक केलीस,सिंहाने मला मारण्याचा प्रयत्न केला आणि तू म्हणत होतास की तो मला जंगलाचा राजा बनवेल.कोल्हा म्हणाला - फालतू बोलू नकोस.त्याने तुझे कान कापले जेणेकरून तुझ्या डोक्यावर मुकुट सहज घालता येईल,समजून घे!. सिंहाकडे परत जाऊया.गाढवाला हे आवडले म्हणून तो पुन्हा कोल्ह्याबरोबर गेला.सिंहाने पुन्हा गाढवावर हल्ला केला आणि यावेळी त्याची शेपूट कापली.गाढव पुन्हा कोल्ह्याला बोलून पळून गेला - तू माझ्याशी खोटे बोललास - यावेळी सिंहाने माझी शेपूट देखील कापली.कोल्हा म्हणाला - सिंहाने तुझी शेपटी कापली आहे जेणेकरून तुला सिंहासनावर आरामात बसता येईल,(२०१९) चला पुन्हा त्याच्याकडे जाऊया.कोल्ह्याने गाढवाला पुन्हा परत यायला लावले.यावेळी गाढवाला पकडून मारण्यात सिंहाला यश आले.सिंह कोल्ह्याला म्हणाला - जा,त्याची कातडी काढा आणि त्याचा मेंदू, फुफ्फुस आणि हृदय माझ्याकडे आणा आणि उरलेला भाग तू खा.
कोल्ह्याने गाढवाची कातडी काढून गाढवाचा मेंदू खाल्ला आणि फक्त फुफ्फुसे आणि हृदय सिंहाकडे नेले.सिंहाला राग आला आणि त्याने विचारले - त्याचा मेंदू कुठे गेला?
कोल्ह्याने उत्तर दिले - महाराज ! त्यात अजिबात मेंदू नव्हता.जर त्याचा मेंदू असेल तर कान आणि शेपूट कापूनही तो तुमच्याकडे परत येईल का? सिंह म्हणाला - हो तु पूर्ण सत्य सांगत आहेस.
भारतातील शेकड़ों वर्ष गुलामगिरीत ढकलून आणि तमाम बहुजनांना संपवण्याचे षड्यंत्र वारंवार रचल्यानंतरही आजही त्याच मनुवादी बदमाशांवर विश्वास ठेवणाऱ्या आणि हिंदुत्ववाद्यांच्या गप्पा मारणाऱ्या प्रत्येक बहुजन गाढवाची म्हणजे मतदार,पत्रकार संपादकाची ही सत्य परिस्थितीवर आधारित गोष्ट आहे.
मराठा बहुजन समाज (शूद्र) असूनही स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी सुवर्ण समाज (अंधभक्त) म्हणविणाऱ्या माणसांचा मेंदू हा गाढवा सारखा झाला.छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक,स्वराज्य निर्माण करण्यासाठी संपूर्ण जीवन संघर्ष आणि मृत्यू,राजर्षी महाराज यांनी दिलेले शिक्षण,रोजगार यातील आरक्षण यातील संघर्ष आज ही कायम सुरू आहे. कॉँग्रेसला मौनी बाबाला चॅनल,प्रिंट मिडियाच्या पत्रकार संपादकानी मतदारा समोर बदनाम केले.पेट्रोल,डिजेल महागाई,बेरोजगारी,भ्रष्टाचार,शे तकरी हमी भाव,शेतकरी आत्महत्या शिक्षणाचे, आरोग्याचे खासगीकरण देशाच्या मालकी हककच्या उत्पन्न देणाऱ्या सरकारी कंपन्या खाजगी भांडवलदाराला कवडी मोलाने विकल्या यांचे एकूण काय झाले असे विचारले तर २०१४ ला मतदारांचा कान आणि २०१९ ला शेपटी कायमची कापल्या गेली आहे.राष्ट्रपती उपराष्ट्रपती सभापती हेच गुलामा सारखे वागत असतील तर न्याय कोणाच्या दरबारात मागायचा हे सर्वच सत्य असून ही चॅनल,प्रिंट मिडियाचे पत्रकार संपादक मतदारांना २०२४ ला शेपन्न इंच छातीच्या चौकीदार,फकिरास हुकूमशाला राजमुकुट,सिंहासन दे ण्याचे सांगत असतील तर ???. शोध पत्रकारिता करणारे पत्रकार संपादक गांडू झालेत काय?.असे जाहीरपणे विचारावे लागेल.
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा