स्मार्ट मोबाईल मुळे सत्य लपविता आले नाही,
अमेरिकेत देव नाही,ना मठ नाही,पण पाऊस मात्र वेळेवर आहे व भरपूर आहे.गेल्या 200 वर्षात दुष्काळ नाही.कुठले होमहवन नाही,ना कसली वारी नाही. कसले अभिषेक नाही,ना अनुष्ठानं नाही.हरिनाम सप्ताह नाही,ना पारायणे नाहीत.अमेरिकेत लोकसंख्या नियंत्रणात आहे.अन्नधान्य विपूल आहे.सुखसोयी विपूल आहेत,कशाचीच कमतरता नाही.माणशी 2876 वृक्ष आहेत.भारतात फक्त माणशी 28 झाडे आहेत. आपल्याकडे वृक्षवल्ली आम्हां सोयरे असे म्हटल्या जाते.पण एकही भारतीय झाड लावत नाही.विशेष उच्चशिक्षित सुरक्षित नोकरी करणारा त्या झाडाला जपत सुद्धा नाहीत. अमेरिकेत घरासमोर हिरवळ नाही असं एक ही घर किंवा बंगला दिसणार नाही.त्यांनी स्मार्ट मोबाईल वापर करून निसर्गाने दिलेल सत्य लपविले नाही. त्यामुळेच त्यांनी जग जवळ आणले आहे.
भारतात बहुसंख्ये लोकांच्या दारात झाड नाही. तर हिरवळ कुठली असणार ?. स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष झाली.पण राज्य व केंद्र सरकार साधं पिण्याच शुद्ध पाणी देवू शकत नाही.श्रीमंतासाठी स्वीमिंग पूलात स्वच्छ पाणी उपलब्ध आहे.बाकी सर्वच देवाच्या भरोशावर आणि सरकारच्या मर्जीवर अवलंबून आहे.अमेरिकेचे क्षेत्रफळ भारता पेक्षा तिप्पट आहे. आणि लोकसंख्या आहे 31 कोटी. तर भारताची लोकसंख्या आहे 135 कोटी.35 कोटीची 135 कोटी झाली. फक्त 80 वर्षात. एवढीच जबरदस्त प्रगती आहे. इथे हजारो जाती,सतराशे साठ धर्म.कुणाचाच मेळ कुणाला नाही.प्रत्येकजण म्हणतो आमचाच देव खरा.आणि तरी योग्य वेळी सर्वच म्हणतात "गर्वसे कहो हम हिंदू है!." आणि देवाच्या आरत्या आता स्मार्ट मोबाईलवर लावल्या जात आहेत.
एक मुलगा सांभाळ करने कठीण झाले.तरी एकएकाला 4-5 लेकरं. कुत्र्यावाणी रस्त्यावर भटकत आहेत,ना शिक्षण,ना संस्कार.ना आचार,ना शिस्त, सगळं बिनधास्त.आणी मस्त.आताच पिण्यास पाणी नाही. तर पुढे काय?. कुणालाही पर्यावरणाची फिकर नाही.निसर्गाची चाड नाही.नुसतेच भरतात कुंभमेळे आणि जत्रा व यात्रा,जमात व धर्माचे मेळे होत आहेत. तेहतीस कोटी देवाचे नांव घेऊन प्रार्थना केल्या जात आहेत.ईश्वराशिवाय कुणी महान नाही.हे ऐकुण ऐकुण हजारो वर्ष झाली.दरवर्षी तेच.शेतकरी पाऊस पडला तरी आत्महत्या करतो. नाही पडला तरी आत्महत्या करतो.पाऊस पडलाच तर पिकाला भाव नाही.सगळंयाना आरक्षण पाहीजे म्हणता म्हणता आरक्षण शंभर टक्के होण्याची वेळ आली. तरीही काही मिळनार नाही.वित्तमंत्री सितारामन यांनी संसदेत जाहीरपणे सांगीतले होते.देशातील 1 लाख 60 हजार कंपन्या बंद झाल्या,सहाकोटी लोक बेरोजगार झाले. नोकरयांच नाही.तर आरक्षण घेवून काय चाटायचे. आता नोक-याच बंद होत आहेत.आहे त्या नोकरांनाच पगार देण्याची ताकद नाही.मॅचच फिक्स असेल.तर खेळायचेच कशाला.जनता दिशाहीन झाली आहे.स्वप्न राखेत मिसळली आहेत.संविधान नावांला उरले आहे.प्रचंड महागाई ने जनता मरणप्राय झाली आहे. तरी सरकार डिझेल पेट्रोलचे दर वाढवतच आहे. अनेक आजारामुळे दवाखाना कुटूंबाचे दिवाळं काढत आहे. जनतेला लुटण्यासाठी लुबाडण्यासाठी सरकार सहीत असंख्य गिधाडे सरसावली आहेत.चिंता व ताणतणावाने अर्धा भारता मधुमेह ग्रस्त झाला आहे. तीस टक्के लोकांना रक्तदाब आहे. शेतात काम करायला मजूर नाही.अंगमेहनतीला माणुस नाही. सगळे बिनकामाची माणसं आहेत.गावा गावात स्मार्ट मोबाईलमुळे जग जवळ येत आहे.
नवरा साहेब व बायको मॅडम झाल्या आहेत. स्वयंपाकाला बाई,भांडी व धुण्याला बाई.तरी मॅडमची सतत पाठ व कंबर दुखते आहे.आणि साहेबांना टेकल्याशिवाय बसता येत नाही.कुंभ मेळ्यात दहा हजार सुशिक्षित व उच्चशिक्षित लोकांनी साधूची दिक्षा घेतली होती त्यातील काही राज्यात आमदार खासदार झाले आहेत. उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सर्वांना माहिती आहेत,अनेक घोर तपश्या केलेल्या साध्वी मंदिरात देवाची पूजा अर्चना यज्ञ मंत्रोचार करून काही मिळत नाही म्हणून विधानसभा लोकसभा सभागृहात उपस्थित राहून वेतन,भत्ता,रेल्वे, विमान प्रवासा सह इतर सवलती घेत आहेत.आणि अनेक तरुणांना नोकरी नाही म्हणून आता रस्त्यावर बेरोजगार असल्यामुळे भटकत आहेत. कुटुंबापासून विरक्त झाले आहेत.लग्नाचे वय टळून गेले आहे. बायका मिळत नाहीत.गांवागावांत किमान चाळीस पन्नास पोरं पोरी बिन लग्नाची आहेत.भयंकर विदारक परिस्थिती आहे.स्मार्ट मोबाईलवर मैत्री जुळते आणि सत्य माहीत झाल्यावर तुटते त्यामुळे जग जवळ येत आहे.
बाजारात फळे स्पे मारून पिकवून विकत आहेत. मराठी शाळा बंद पडल्या आहेत. मुलांना धड इंग्रजी येत नाही.आणि मराठी येत नाही.मराठी इंग्लिश मिक्स बोलत आहेत.टिव्ही वरच्या मालिका फालतू झाल्या आहेत.महिला गुन्हेगारी वृत्तीच् या जास्त दाखवलया जात आहेत.मुलं लहान पणा पासूनच हिसंक होत आहेत.13 व्या वर्षीच मुलंमुली पळून जात आहेत. सरकारने कायदा काढला होता,१८ वर्षा नंतर लग्न झाले पाहिजे.आता त्यात बदल करून मुलामुलीचे लग्नाचे वय २१ वर्षे केले.मुलमुली १४/१५ वर्षाची झाली की लग्ना नंतर जे करायला पाहिजे ते सर्व अगोदर करून मोकळे होत आहेत.त्यामुळे आईवडील भावांना जातीची खानदानची इज्जत गेल्याचे वाटून खून करण्यात येत आहे.कायदे अनेक आहेत पण अंमलबजावणी प्रभावीपणे नाही. कारण स्मार्ट मोबाईल मुळे सत्य लपवित येत नाही,तरी जग जवळ आले आहे.
दारू कितीही महाग केली तरी त्यासाठी रांगा लागत आहेत.ती घेणे प्रतिष्ठेची झाली आहे.आणि प्रार्थना स्थळे बहुजन समाजाला लुटीची ठिकाणं झाली आहेत. वृद्धाआश्रमाची संख्या झपाट्याने वाढत आहेत.तो एक मोठा व्यवसाय होवू पहात आहे.आईला बाळासाठी वेळ नाही.पाळणाघरे वाढत आहेत. लेका-सुनांना सासुसासरे नकोत.वृद्धाश्रम,अनाथालये वाढत आहेत. माणसं पदोपदी खोटं बोलत आहेत.खोटं बोलणच खरं मानलं जात आहे.चोरांना लबाडांना प्रतिष्ठा मिळत आहे. सज्जनांना वेड्यात काढले जात आहे.लोकशाही समता बंधुता स्वातंत्र्य हे फक्त वाट्सअपचे संदेशा पुरतीच मर्यादित झाली आहे.चांगले वागण्याचे करोडो मेसेज रोज फिरत आहेत. प्रत्येक जण चांगलं वागा म्हणत आहे.तरी आज काही सुना राॅकेल टाकुन जाळल्या जात आहेत.तर काही सुना सासु सासऱ्यांना घराबाहेर काढत आहेत.समाज व समाजातील वरिष्ठ नागरिक मजा पाहत आहेत.समाजाची भिती राहिल्या नसल्यामुळे लोकलज्जा राहिली नाही.देशाचा प्रथम नागरिक राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,लोकसभा सभापती, राज्याचा प्रथम नागरिक राज्यपाल आपले कर्तव्य अधिकार विसरून गुलामासारखे वागताना दिसत आहे.स्मार्ट मोबाईल मुळे सत्य लपविता आले नाही.ते जनतेला समजत आहे.त्याविरोधात कोणी बोलू शकत नाही. त्यामुळेच एकंदरीत भारत विस्फोटाच्या व उद्रेकाचा ज्वालामुखी बनत आहे.भारत मानवी वस्तीसाठी धोकादायक होत चालला आहे.वेळीच सावरलो नाही.तर आपल्या वारसांचे जीवन प्रचंड संकटाच्या गराड्यात सापडनार आहे. हे मात्र नक्की. स्मार्ट मोबाईल मुळे जग जवळ आले आहे तर नातेवाहिक दूर जात आहेत.
सागर रामभाऊ तायडे ९९२०४०३८५९,भांडूप,मुंबई.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा