अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर?.
अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक असतील तर ते राज्यघटना,संविधानाची अंमलबजावणी होऊ देणार नाहीत.यांचा अनुभव आता शेतकरी,कामगार,सेवानिवृत सैनिक,सुशिक्षित तरुण,बेरोजगार तरुण,जिल्हा परिषद शिक्षक,विना अनुदानीत बी एड,झालेले शिक्षक,आरोग्य सेवा देणारे डॉक्टर,कामगार,अंगणवाडी सेविका,आशा वर्कर,क्रीडा क्षेत्रातील खेळाडू सर्वानीच भारतीय नागरिक म्हणून अनुभव घेतला असेल यात शंका नाही.त्यामुळे महागाई,भ्रष्टाचार,बेरोजगारी,शि क्षण,आरोग्य हा काही एका जातीचा धर्माचा प्रश्न नाही. एका व्यक्तीचा नव्हे तर देशाचा प्रश्न हा आहे.त्यासाठी जन आंदोलन करणारे सर्वच मोदी सरकारच्या दुष्टिने आंदोलनजीवी झाले होते.त्यावेळी शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाला कामगारांनी त्यांच्या राष्ट्रीय महासंघानी साथ दिली नाही.केंद्र सरकारच्या प्रत्येक जन आंदोलनात एकमेकांना मनापासून पाठीबा दिला नाही.शब्दीक पाठिबा दिल होता.त्याचे परिणाम आता सर्वच नागरिक भोगत आहेत.यापुढे सर्वधर्मसमभाव बोलतांना विचार करून बोलावे लागेल.
आज भारतीय हिंदू मोदीच्या चरणी अर्पन झाला आहे.हा कमालीचा स्थितिशील असणारा,टिकून राहण्याचा लोकविलक्षण चिवटपणा,दाखविणारा आणि लोकसंख्येत ८५ टक्के असणारा हिंदुसमाज मनाने आधुनिक व गतिमान कसा करावा,हा आज स्वताला सेक्युलॅरिझम समजणाऱ्या लोकां समोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.हा दीर्घकाळ चालणारा खरा अटीतटीचा लढा आहे. एवढा चिवट असलेला हिंदुसमाज मनाने कमालीचा असहिष्णू व तितकाच कमालीचा क्रूर असूनही उदारमतवादी व सहिष्णू म्हणून ओळखला जातो. तोंडाने सर्वधर्मी समानता आणि आत्म्याचे अद्वैत सांगणाऱ्या या समाजाने दोन हजार वर्षे काही कोटी शूद्र,अति शूद्र आदिवासींना संस्कृतीच्या कक्षेच्या आत गुलाम करून टाकले होते.स्त्रियांची गुलामी हा पुन्हा वेगळाच भाग आहे. लक्षवेधी रुपये खर्चून मीनाक्षीसुंदरम आणि वेरूळची देवालये निर्माण करणाऱ्यांनी समाजात वरिष्ठ वर्गाच्या उपभोगासाठी दासी,बटकी आणि वेश्या मिळून जगातील सर्वात मोठा समूह निर्माण केला होता ! उदार हिंदूसंस्कृतीत इंग्रजांनी कायद्याने बंद करीपर्यंत म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत माणसांच्या खरेदीविक्रीचे बाजार गुरांच्या आठवडी बाजाराप्रमाणे भरत होते.तसेच आता शहराच्या नाक्या नाक्यावर चौकात श्रम विकणारे बाजार भरत असतात.एकेक पुण्यश्लोक राजा केवळ धर्मप्रेमाखातर पाचपाचशे मुली देवळांना देवदासी म्हणून नजर करीत असे ! शत्रूंची बायका-मुले पकडून गुलाम करावी, ही प्रथाही भारतात होती.हिंदुसमाजात हे सर्व काही होते,याबद्दल मी हिंदुसमाजाला फार दोषी धरत नाही; कारण हेच चित्र मध्ययुगातील ख्रिश्चनांचे व मुसलमानांचे आहे.मी आपल्याच धर्मातील मेंदूतील ब्लॅक (Block) काढण्याचा प्राथमिक प्रयत्न करीत आहे.तो या निमित्याने लिहून सांगण्याचा प्रयत्न करतो.असो...
भारतात केवळ बाह्य स्वरुपात नव्हे, तर प्रत्यक्षात लोकशाही अस्तित्वात यावी अशी जर आपली इच्छा असेल,तर त्यासाठी आपण काय करायला हवे? माझ्या मते पहिली गोष्ट जी केलीच पाहिजे ती अशी की, आपल्या सामाजिक आणि आर्थिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आपण संवैधानिक मार्गांचीच कास धरली पाहिजे.याच अर्थ हा की,क्रांतीचा रक्तरंजित मार्ग आपण पूर्णत: दूर सारला पाहिजे.याचा अर्थ कायदेभंग,असहकार आणि सत्याग्रह या मार्गांना आपण दूर ठेवले पाहिजे. आर्थिक आणि सामाजिक उद्दिष्टपूर्तीसाठी संवैधानिक मार्गासारखा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता,त्यावेळी असंवैधानिक मार्गाचा अवलंब करण्याचे समर्थन मोठ्या प्रमाणात केले जात होते.परंतु जेव्हा संवैधानिक मार्ग उपलब्ध आहेत तेव्हा या असंवैधानिक मार्गांचे समर्थन होऊ शकत नाही. हे मार्ग इतर काही नसून अराजकतेचे व्याकरण आहे आणि जितक्या लवकर आपण त्यांना दूर सारु तेवढे ते आपल्या हिताचे होईल.असे आत्मविश्वासाने बाबासाहेबांनी शेवटच्या भाषणात सांगितले होते.
बाबासाहेब पुढे असे सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये,की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे,कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही,इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय.
बाबासाहेब पुढे असे सांगतात दुसरी महत्वाची गोष्ट, जिचे पालन केले पाहिजे ती अशी की, लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणाऱ्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते, “लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या चरणी अर्पण करता कामा नये.तसेच त्याच्यावर इतका विश्वास ठेवू नये,की जेणे करुन त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उदध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.” संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी व्यतित केलेल्या महापुरुषांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात काहीच गैर नाही.परंतु कृतज्ञता व्यक्त करण्यालाही मर्यादा असल्या पाहिजेत.आयरीश देशभक्त डॅनियल ओकॉनेल यांनी समर्पकपणे म्हटल्याप्रमाणे, “कोणताही माणूस स्वाभिमानाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही, कोणतीही स्त्री स्वत:च्या शीलाचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही आणि कोणताही देश स्वत:च्या स्वातंत्र्याचा बळी देऊन कृतज्ञता व्यक्त करु शकत नाही.” इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे,कारण भारतात भक्ती किंवा जिला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो, किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही,इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.तिसरी गोष्ट आपण केली पाहिजे ती अशी, की केवळ राजकीय लोकशाहीवर आपण समाधान मानता कामा नये. आपल्या राजकीय लोकशाहीचे आपण एका सामाजिक लोकशाहीत सुद्धा परिवर्तन करायलाच हवे. राजकीय लोकशाहीच्या मुळाशी सामाजिक लोकशाहीचा आधार नसेल, तर ती अधिक काळ टिकू शकणार नाही.सामाजिक लोकशाही म्हणजे काय? तो एक जीवन मार्ग आहे, जो स्वातंत्र्य, समता आणि बंधुता यांना जीवनतत्वे म्हणून मान्यता देतो. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ह्या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात, ते या अर्थाने की, त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणे म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय.
समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय; स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाहीत, त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलिस यंत्रणेची गरज भासेल. भारतीय समाजात दोन बाबींचा पूर्णत: अभाव आहे ही वस्तुस्थिती मान्य करुनच आपण सुरुवात केली पाहिजे. त्यापैकी एक समता आहे. सामाजिक क्षेत्रात आपला समाज हा श्रेणीबद्ध विषमतेच्या तत्वावर आधारित आहे. याचा अर्थ काही लोक वरच्या स्तरावर असतात तर बाकीचे निष्कृष्ट अवस्थेत असतात. आर्थिक क्षेत्रात आपल्या समाजात काही लोका जवळ गडगंज संपत्ती आहे, तर अनेक लोक घृणास्पद दारिद्र्यात जगतात. २६ जानेवारी १९५० ला आपण एका विसंगतीयुक्त जीवनात प्रवेश करणार आहोत, राजकारणात आपल्याकडे समता राहील परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमता राहील. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्त्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र,सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे,प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्त्व आपण नाकारत राहणार आहोत. अशा परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपण जर ती अधिक काळपर्यंत नाकारत राहिलो, तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्याशिवाय राहणार नाही. ही विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकीय लोकशाही संरचना उदध्वस्त करतील.हे बाबासाहेबांचे शब्द आज देशात जसेचे तसेच अंमलात येताना दिसत आहेत.लोकशाहीने लोकांच्या मतदानाने लोकांसाठी लोकउपयोगी निर्णय घेण्याचे अधिकार बहाल केले.ते लोकप्रतिनिधी भांडवलदाराच्या रक्षणा करीता गोरगरीबाचा बळी देत आहे. म्हणजे लोकशाही ने दिलेल्या संविधाना नुसार नाही. तर हुकूमशाहीच्या मार्गाने चाललेले मार्गक्रम आहे.
देशात म्हणजे आपल्यात उणीव असलेली दुसरी बाब म्हणजे बंधुत्वाचे तत्त्व मान्य करणे होय. बंधुत्व म्हणजे काय?. जर भारतीय लोक एक असतील तर सर्व भारतीयांमध्ये बंधुत्वाची समान भावना असणे हे होय. हे तत्व सामाजिक जीवनाला एकता आणि एकजिनसीपणा प्राप्त करुन देते. ही बाब प्राप्त करणे कठीण आहे. ती किती कठीण आहे, हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेविषयी जेम्स ब्राईसने त्याच्या अमेरिकन कॉमनवेल्थ या खंडात सांगितलेल्या गोष्टीवरुन कळून येईल.ब्राईसच्याच शब्दात मी उद्धृत करु इच्छितो, ती घटना अशी- “काही वर्षापूर्वी अमेरिकन प्रोटेस्टंट एपिस्कोपल चर्चच्या त्रैवार्षिक अधिवेशनात सामुदायिक प्रार्थनेत फेरबदल करण्याचा प्रसंग आला. प्रार्थना लहान वाक्यांची करुन त्यात सर्व लोकांसाठी असेल्या प्रार्थनेचा समावेश करणे योग्य होईल असा विचार करण्यात आला आणि न्यू इंग्लंडच्या प्रमुख धर्मोपदेशकाने पुढील शब्द सुचविले, “हे प्रभो, आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे.” उत्स्फूर्तपणे ते त्या दिवशी मान्य करण्यात आले. या वाक्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा विचार करण्यात आला. धर्मोपदेशकांव्यतिरिक्त इतर अनेकांनी ‘राष्ट्र’ या शब्दावर आक्षेप घेतले. त्यांच्या मते या शब्दामुळे संपूर्ण राष्ट्राचे ऐक्य प्रत्यक्षात नसले तरी स्पष्टपणे सूचित होते. त्यामुळे तो शब्द गाळण्यात आला आणि “हे प्रभो, संयुक्त राज्यांना आशीर्वाद दे.” या शब्दांचा स्वीकार करण्यात आला.” ही घटना घडली त्यावेळी अमेरिकेतील लोकांमध्ये एकत्वाची भावना इतकी कमी होती की, आपण एक राष्ट्र आहोत असे अमेरिकेच्या लोकांना वाटत नव्हते. जर अमेरिकेच्या लोकांमध्ये आपण राष्ट्र आहोत ही भावना निर्माण होऊ शकली नाही तर भारतीयांनी आपण एक राष्ट्र आहोत हे समजणे किती कठीण आहे हे कळून येईल. मला ते दिवस आठवतात जेव्हा राजकारणाने प्रेरित लोकांना ‘भारतीय लोक’ या शब्दाची चीड येत असे. भारतीय राष्ट्र म्हणणे ते पसंत करत असत. मी या मताचा आहे की आपण एक राष्ट्र आहोत यावर विश्वास ठेवणे म्हणजे जे अस्तित्वात नाही ते अस्तित्वात आहे असा समज बाळगण्यासारखे होईल. हजारो जातींमध्ये विभागलेल्या लोकांचे राष्ट्र कसे बनू शकेल?.
सामाजिक आणि मानसिकदृष्ट्या अजूनही आम्ही एक राष्ट्र नाही याची आम्हाला जेवढ्या लवकर जाणीव होईल तेवढे ते आमच्या हिताचे ठरेल. त्यांनतरच एक राष्ट्र होण्याच्या गरजेचा आम्ही गांभीर्याने विचार करु शकू. या ध्येयाप्रत पोहोचणे अतिशय कठीण आहे. अमेरिकेत जातीची समस्या नाही. भारतात जाती आहेत. जाती या राष्ट्रविरोधी आहेत. पहिली गोष्ट त्या समाजजीवनात विभागणी करतात. त्या राष्ट्रविरोधी आहेत कारण त्या जाती-जातीमध्ये मत्सर व तिरस्काराची भावना निर्माण करतात. आम्हाला वास्तवात जर राष्ट्र व्हायचे असेल तर या सर्व अडथळ्यांवर आम्ही मात केलीच पाहिजे. राष्ट्र निर्मिती नंतरच बंधुत्व वास्तवात पाहावयास मिळेल. बंधुत्वा शिवाय असलेली समता आणि स्वातंत्र्य म्हणजे रंगाच्या वरवरच्या थरांसारखा केवळ बाह्य देखावा असेल.स्वातंत्र्य ही आनंदाची बाब आहे याबद्दल शंका नाही. परंतु या स्वातंत्र्याने आपल्यावर फार मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत याचा आपण विसर पडू देता कामा नये. या स्वातंत्र्यामुळे,कोणत्याही वाईट गोष्टीसाठी आपल्याला आता इंग्रजांवर दोषारोपण करता येणार नाही. यापुढे जर काही वाईट घडले, तर त्यासाठी आपल्या शिवाय इतर कुणालाही दोषी धरता येणार नाही. अनुचित घटना घडण्याचा मोठा धोका आहे. काळ वेगाने बदलतो आहे. आपले लोकसुद्धा, नवनवीन विचारप्रणालींचा मागोवा घेत आहेत. लोकांच्या राज्याचा आता त्यांना कंटाळा येऊ लागला आहे. आता त्यांना लोकांसाठी राज्य हवे आहे. आणि राज्य लोकांचे व लोकांनी निवडलेले आहे किंवा नाही याची चिंता ते करणार नाहीत. ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते जर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बले ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.हे बाबासाहेबांनी संविधान सभेत शेवटचे भाषण आहे. सविधान दिनाचा हा २६ नोव्हेंबर १९४९ ते २६ नोव्हेंबर २०23 ला ७४ वर्षाचा प्रवास भारतीय नागरिकांनी न वाचताच पार केला आहे.त्यामुळेच आज देशात अदुष्य युद्धाची परिस्थिती दिसत आहे.त्याला ८५ टक्के बहुजन समाज विशेष आंबेडकर विचाराला मानणारा समाज मोठ्या प्रमाणात दोषी आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही,बाबासाहेबांनी जे जे सावधानतेचे इशारे दिले होते त्याकडे पूर्णपणे डोळेझाक करणारा समाज बाबासाहेबाचा कसा काय असू शकतो?.एक मराठा लाख मराठा,बहुजन पर्व,संविधान समर्थन,इतर बऱ्याच समाजाला माहित तरी आहे काय?. संविधान लिहण्याला किती वर्ष झाले?. ७४ वर्षात त्यांची किती अमंलबजावणी झाली?.म्हणुन भारतातील प्रत्येक नागरिकांनी संविधान वाचलेच पाहिजे.तरच तो गर्वाने सांगेल मी एक भारतीय आहे.तेव्हा तो मनुस्मृतीची आठवण करणार नाही.अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थक करणार नाहीत.
मंडल आयोग मजूर होताच राम रथ यात्रा निघाली आणि सर्व ओबीसी रथ यात्रेला निघाला होता.मराठा समाजाला एक डिसेंबरला आरक्षण मिळणार जल्लोष करण्याचे सांगितले जाते, तेव्हाच २५ नोव्हेंबर ला राम मंदिर दर्शनासाठी प्रोग्राम जाहीर होते आणि सर्व मराठा समाज अयोध्यात मोठ्या संख्येने सहभागी होतो.म्हणजेच न्यायप्रविष्ठ मुद्यावर मनुवाद्यांची उपदव्यमूल्य दाखवुन कायदा सुव्यवस्था मोडण्याचे काम सुरु होते.म्हणजे यांचा देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न सुरु आहे. जसे स्वातंत्र दिनाच्या पुर्वसंध्येला दहशतवादी काश्मिरात बॉम्बस्फोट घडवुन इशारा देतात तसेच हे मनुस्मृती मानणारे मनुवादी देशद्रोही बरोबर २६ नोव्हेंबर या संविधान दिनाच्या आधल्या दिवशीच राडा घालायचे ठरवीत असतात. मुळातच या मनुवाद्यांना समता, बंधुता, न्याय, मुलभुत अधिकार याबद्दल खुपच तिरस्कार असतो. मग त्याचेच प्रतिक असलेले दिवस निवडुन हे त्या दिवशीच दंगे घडवुन आणतात. म्हणुन तर ६ डिसेंबरलाच डॉ आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनीच बाबरी मशीद पाडली. आताही २६ जानेवारी च्या अगोदर २२ जानेवारीला राम मंदिरात प्राण प्रतिष्ठा भारतीय २६ जानेवारी,१९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. त्याच दिनालाच देशात अशांतता घडवुन आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. म्हणूनच मनुस्मृती आणि संविधान किती वर्षाचे झाले प्रश्न उभा राहतो. मनुस्मृती मानणारे संविधान दिन चिरायू व्हो असे म्हणणार नाहीत.मनुस्मृतीचा विजय असो असे म्हणण्याची धाडस ही करणार नाही.पण अधिकारी कर्मचारी आणि राजकीय नेतेच जर मनुस्मुर्ती समर्थककरून मराठा,मागासवर्गीय बहुजन समाजातील लोकांना मूर्ख बनविण्याचा व्यवस्थीत नियोजन करीत राहतील त्याला भारतीय जनता किती दिवस बळी पडतात हाच मोठा प्रश्न आहे.
आपला एक भारतीय नागरिक
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई -९९२०४०३८५९,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा