सोमवार, २३ मार्च, २०२०

श्रमिक बेघरांना प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्याची मागणी

श्रमिक बेघरांना प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्याची मागणी
मुंबई  दिनांक(9 मार्च)-शहराचे नाले सफाई,रस्ते सफाईचे काम,फुले-खेळणी,फुगे विक्रेते एकंदरीत शहराची सेवा करणारे हे श्रमिक नाल्याच्या बाजूला,पदपथावर,सिग्नलच्या बाजूला,पुलाखाली राहणारे बेघरानी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घर अधिकाराची मागणी केली. 
  श्रमिक बेघरांना मुंबई महानगरपालिका पाण्याचा अधिकार नाकारतेय पण ओ.सी.नसलेल्या इमारतींना मानवतेच्या आधारे पाणी अधिकार देतेय,ही मुंबईमहापालिकेची विषमतेची वागणूक श्रमिकां प्रति दिसून येत असल्याचे आरोप सीपीडी संस्थेचे जगदीश पाटणकर यांनी केला.
    गेल्या 35 वर्षांपासून पार्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रुळांजवळ राहणारे सुनीता गाडे यांनी सांगितले की,रेल्वे रुळ रुंदीकरना मुले रेल्वेने आम्हाला बाहेर हाकलून लावले त्यामुळे बाहेर रस्त्यावर राहत असल्याने बीएमसी नेहमी सामानाचे तोडमोड करते.नेहमी होणाऱ्या या तोडामोडी मुळे आमचे पूर्वीचे वास्तवाचे कागदपत्र गहाळ केली जातात.मग आम्ही कोणते कागदपत्र दाखवावेत?
  तसेच,हनुमान नगर पार्ला येथे राहणारे भरती सुपय्या यांनी त्यांचा नवऱ्याचे प्रेत ही दोन मिनिटं थांबू दिले नाही,नेहमीच बीएमसी ची गाडी येऊन सामानाचे नुकसान करतात,येथे राहूच नका,असा दम मारतात.
आम्ही ही माणसे आहोत,आम्ही देखील या शहराचे-भारताचे नागरिक आहोत.आज आम्ही कचरा उचलून  पोट भरत असलो तरी शहराच्या सफाईचेच काम करीत आहोत.
   आज झालेल्या श्रमिक बेघरांच्या मागणीपत्र पत्रकार परिषदे मध्ये सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमोक्रॅसी या संस्थेच्या वतीने श्रमिक बेघर कुठे आणि कश्या पध्दतीने राहतात - काम करतात,याचे फोटो प्रदर्शन द्वारे शहराच्या सेवेमध्ये कश्या पध्दतीने योगदान देत असल्याचे दाखवून दिले. 
     सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बीएमसी ने शहरी बेघरांकरिता 125 निवारे बांधने बंधनकारक होते मात्र आतापर्यंत फक्त 23 निवारे चालविले जात आहेत म्हणजेच सरकारे सुद्धा संवेनशून्य असल्याचे मत सिताराम शेलार यांनी स्पष्ट केले.
      श्रमिक बेघरांनी आपल्या मागणीपत्रा मध्ये 1)प्रधानमंत्री आवास योजनेतून घर अधिकार मिळावा, 2)बीएमसी द्वारा नेहमी होणारी तोडमोड थांबविण्यात यावी व मुलांचे शालेय वह्या पुस्तके,जेवणाचे सामान जप्त करू नये, 3)पाणी अधिकार मिळावा,शहरी नागरी आजीविका मिशनच्या गाईडलाइन नुसार बेघरांकरिता शेलतर(निवारे) 125 बनविण्यात यावेत, 4))भिकारी म्हणून  पोलिसां द्वारा होणारी कारवाई थांबविण्यात यावी,5)पुढील वर्षी 2021 या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय जनगणने मध्ये बेघरां करीत विशेष मोहीम राबविण्यात यावी.आदी प्रकारच्या मागण्या शहरी श्रमिकांनी प्रसारमाध्यमांद्वारे सरकार पर्यंत पोचविण्याचे विनंतीवजा आवाहन केले.
   या बेघरांच्या मूलभूत अधिकारांच्या मागणी पत्रासाठी सीपीडी संस्थेचे सिताराम शेलार,जगदीश पाटणकर,योगेश बोले,पूजा कांबळे,तसेच आकार मुंबईच्या शारदा आरोनदेकर,युवाचे अमृतलाल बेतवाला,यांनी सुद्धा मते मांडली.
अधिक माहिती करीता संपर्क 
जगदीश पाटणकर 9029597241
======================================================================================
५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज नागपूर येथे संपन्नझाली.५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. ८ मार्च रोजी ३१४, निलकमल काम्प्लेक्स, महाजन मार्केट, सिताबर्डी, नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस. पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
   या सभेमध्ये सर्व संलग्न संघटनांच्या मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येऊन ५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्य़ात मे २०२० पर्यंत संलग्न युनियनच्या शाखा आणि आय एल यु जिल्हा कमिटी निर्माण करण्याचाही संकल्प करण्यात आला.
   या महत्त्वपूर्ण सभेला राज्य अध्यक्ष मा. सागर तायडे, सरचिटणीस मा. डि. एम. खैरे, उपाध्यक्ष मा. विकास गौर, प्रसिद्धि सचिव मा. एन. बी. जारोंडे, संघटन सचिव मा. गणेश उके,सुनील तेलतुंबडे,अध्यक्ष शिक्षक संघटना, प्रफुल्लता लोणारे,अंगणवाडी संघटना यांचे सह संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 
आपली ओळख कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून फक्त कार्यालयात आहे. बाहेर पडल्यावर आपण कोण आहेत?. ते सांगण्यासाठी युनियनच्या माध्यमातून काम करा, जेथे जो कामगार,कर्मचारी अधिकारी भेटलं त्याला कोणत्या युनियन चे सभासद आहेत हे विचारा मग त्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार चळवळी बाबतची भूमिका समजावून सांगा,असे सागर तायडे यांनी सांगितले. तर कामगार संघटना स्थापन करा,तीला गतिमान करा, आपली समस्या सोडविण्यासाठी, आपले नेतृत्व तयार करा,विचारधारेच्या आधारे संघटना चालवली तर समस्या निर्माण होणार नाहीत, चुकीच्या विचारधारे सोबत मागासवर्गीय कामगार अधिकृतपणे जोडला गेला असल्यामुळे त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, फॅशनेबल कार्य करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, म्हणून आपल्याला विचारधारेला समर्पित कार्यकर्ता तयार करावा लागेल,तरच ५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकते असे मान जे एस पाटील साहेब राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांनी सांगितले,सर्व संलग्न संघटना,युनियनच्या अध्यक्ष सचिवांनी सभेला उपस्थिती दाखविली होती. सभेचे सूत्रसंचालन गणेश उके यांनी तर गौतम पाटील यांनी आभार मानतो.

कांशीरामजी यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख. कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई!.

कांशीरामजी यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त विशेष लेख.
कांशी तेरी नेक कमाई,तुने सोती कोम जगाई!.
बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाचे राष्ट्रीय पातळीवर समर्थ नेतृत्व करेल असे एक ही व्यक्ती राजकीय पातळीवर नाही.हा सर्व बहुजन समाज विविध पक्षात स्वार्थासाठी विभागला आहे,कोणती ही एक ठोस विचारधारा न मानणारा हा बहुजन समाज आज पुन्हा पुन्हा विखुरलल्या जात आहे. आणि त्यांच्यात प्रचंड असंतोष आहे.राज्यात व केंद्रात त्या त्या समाजांचे प्रतिनिधित्व आहे,पण ते स्वाभिमानी नाही,लाचार,गुलामगिरी पत्कारलेल वैचारिक दृष्ट्या अपंगत्व असलेलं आहे. मान्यवर कांशीराम यांचा बसपा हा राष्ट्रीय पातळीवर तिसऱ्या,चौथ्या क्रमांकावरचा पक्ष होता.बहन मायावती यांच्या कार्यपद्धतीमुळे सर्वच राज्यात तो आता दखल पात्र राहिला नाही.त्यांचे वैचारिक आत्मपरीक्षण,समीक्षा मान्यवर कांशीरामजी यांच्या ८६ व्या जयंतीनिमित्त आजच्या काळात होणे आवश्यकता आहे.
      आज भारतात बहुसंख्य बहुजन समाजातील सर्व जाती मध्ये राजकीय स्पर्धा निर्माण झाली.ते निर्माण करणारे मान्यवर कांशीरामजी यांनी मागासवर्गीय समाजात प्रबोधन केले म्हणून झाली.त्यासाठी ते भारताच्या काश्मीर ते कन्याकुमारी पर्यत गावागावात फिरले. असा माणूस ज्याने ४००० हजार किलोमीटर सायकल चालवुन फुले,शाहू, आंबेडकरांचे विचारांचे प्रबोधन करून आंदोलन उभे करून यशस्वी राजकारण केले.व देशातल्या विमान आणि हेलिकॉप्टर मध्ये फिरून राजकारण करणाऱ्या नेत्यांना निवडणुकाद्वारे आपली ओळख निर्माण करून दाखविली, बहुजन समाजात आत्मविश्वास निर्माण केला. त्यामुळेच एक जोश पूर्ण घोषणा तयार झाली होती. "कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई" मात्र आज या घोषणेचा अर्थ आणि सत्यपरिस्थिती पूर्ण बदलली आहे. बहुजन समाजातील जाणकार, राजकारणी काय म्हणतात "कांशी तेरी नेक कमाई,किस किसने बेच के खाई" मान्यवर कांशीराम यांनी खूप मेहनत करून मागासवर्गीय समाजाला बहुजन समाज म्हणुन संघटित केले त्यासाठी त्यांनी क्रांतिकारी घोषणा दिल्या. त्यामुळे समाजात प्रचंड प्रबोधन झाले.त्या त्या घोषणा सत्ता मिळविण्याच्या स्पर्धेत अर्थपूर्ण बदलल्या त्या घोषणा मुळे बहुजन समाजात जनजागृती झाली.त्याच घोषणांचा आज प्रत्येक मतदारसंघात बहुजन समाज म्हणजे आपला बिकाऊ गुलाम मतदार आहे. असा समज वरिष्ठ पक्ष नेतृत्वाला झाला आहे.जिसकी सांख्य भारी उतनी उसकी भागेदारी म्हणायचे आणि ज्याचा पैसे भारी त्याला उमेदवारी देऊन मतदार संख्येच्या हिशेबाने रुपये रोख घ्याचे,हा धंदा झाल्यामुळे बहुजन समाज पक्षा पासुन विचारधारे पासुन दूर गेला आहे.तीनशे पस्तीस दिवस कॅडर बेस कार्यकर्ते म्हणून काम करणारे मात्र निवडणूकीच्या काळात पक्षाने दिलेल्या उमेदवारांना प्रत्येक कामाचा पैसा मागतात प्रत्येक बूथ वर बसणारा पुलिंग प्रतिनिधी मोबदला मिळत नसेल तर बसत नाही, कॅडर बेस कार्यकर्ते म्हणतात ते आमचे काम नाही, ते उमेदवाराने व्यवस्था केली पाहिजे.यांचा परिणाम सेक्टर,बूथ पातळीवर झाला.त्याचं मुळे जाती तोडो,समाज जोडो, सर्व जातीचा वैचारिक भाईचारा संपला, आता स्वार्थासाठी युती आघाडी होत आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर ते मायावती व्हाया मान्यवर कांशीराम यांची ही चळवळ १९३२ ते २००७ पर्यंत जनजागृती व संघर्ष करून सर्व राजकीय गणिते मोडून पूर्ण बहुमताने उतर प्रदेशात निवडून आली आणि देशात एक नवा इतिहास लिहला गेला होता.तो केवळ मान्यवर कांशीराम यांच्या वैचारिक संघटना कौशल्यामुळे होता.जी बसपा देशातील बहुजन समाजाला सांगत होती " बाबा तेरा मिशन अदूर बी एस पी करेगी पुरा !." ती बसपा २०१२ च्या विधान सभा आणि लोकसभा निवडणुकीत चारीमुंड्य चीत झाली होती. त्यामुळे देशातील बहुजन समाज प्रचंड दुःखी झाला होता. आज ही दुःखी आहे.कारण मान्यवर कांशीराम यांनी आपल्या जीवनभर चमचा युगाचा धिक्कार केला. सत्ता आल्यावर कसे चमचे तयार होतात त्याचा वापर समाजाला तोडणाऱ्या हत्यार म्हणून कसा सारखा होतो हे मायावतीच्या कार्यकाळात दिसून आला.त्यासाठी आपण प्रथम कांशीरामजीची हत्यार आणि चमचा ही मांडणी समजून घेणे जरुरी आहे.
 डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी पुणे करारावर प्रतिकीर्या देताना सांगितले होते कि संयुक्त मतदार संघ म्हणजे एक गलिच्छ उपनगर ज्या नगराचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार उच्च वर्णीय लोकांना आहे.आणि त्याचा समाजाचा सत्यानाश करण्यासाठी वापर करने म्हणजेच कांशीरामजीच्या शब्दात चमचा.(आजचे राष्ट्रपती) चमचा हा घराघरात वापरल्या जाणारे हत्यार आहे.जे स्वत कोणतेही काम करू शकत नाही.पुणे करारा नंतर राजकारण्यांनी असेच चमचे मागासवर्गीय, असंघटित, कष्टकरी शोषित पीडित,आदिवाशी आणि अल्पसंख्याक समाजात निर्माण केले.चमचा चा वापर नेहमी आपल्या फायद्या साठीच होतो.त्यामुळे तो कोणाचे नुकसान स्वत करीत नाही कोणाच्या सांगण्या वरून करतो.
    कांशीराम यांच्या बसपा ची बहुजन हिताय बहुजन सुखाय घोषणा जेव्हा मायावतीने सर्वजण हिताय केली तेव्हा सत्ता आल्यावर चमचा आणि हत्यार कसे वापल्या जाते हे दिसून आले.मायावती सत्ता चालविण्यास, समाजाच्या आणि राज्याच्या हिताचे निर्णय घेण्यास समर्थ होत्या.उतर प्रदेशात स्मारक आणि स्वताच्या प्रतिमा लावण्यास राज्य शासनाचा निर्णय असल्या मुळे सुप्रीम कोर्ट भी मायावतीला रोखू शकले नाही.पण मायावतीने राज्यात कांशीराम आणि मायावतीचे पुतळे उभे करण्या पेक्षा बहुजन समाजातील मुलामुलींना शिक्षण,रोजगार यावर भर दिला असतात तर आजचे चित्र वेगळे असते केवळ अनेक विद्यालयाला महाविद्यालयाला महापुरुषाच्या नांवे देऊन वैचारिक समाज क्रांती होत नाही. जिल्ह्याचे नांव सर्व महापुरुष संत महामाताच्या नांवे केले. त्यामुळे मागासवर्गीय समाजात विशेष चमार समाजात काय बदल झाला?. आज चमार समाजांचे पक्षात काय स्थान आहे?. ठाकूर, बनिया,ब्राह्मणांचे वर्चस्व प्रत्येक मतदारसंघात आहे.
हे कांशीरामजीचे तत्वज्ञान मायावतीने केवळ सत्ता मिळवण्यासाठी मातीमोल करून ठेवले. हे आता सर्वच कॅडर बेस, बामसेफचे उच्चशिक्षित अधिकारी खाजगीत म्हणतात. त्यामुळे चमचा युग काय करू शकते २०१२ च्या निवडणुकीने बहुजन समाजाला दाखवून दिले. 
 मुझे पढे लिखे लोगोने धोका दिया असे.डॉ बाबासाहेब आंबेडकर खेदाने मत व्यक्त केले होते.पण त्याच पढे लिखे लोकांना संघटीत करून कांशीरामजी यांनी बामसेफ संघटना बनविली आणि त्याच्या कडून सक्तीने आर्थिक मदत मिळविली त्यातूनच त्यांनी डीएस फोर DS4 दलित शोषित समाज संघर्ष समिती द्वारे समाजात जनजागृती केली.त्याची सुरुवात ही सायकलवरून झाली. ते कार्यकर्त्यानां सांगत सायकल ही माझ्या साठी एकमात्र साधन आहे.ते केवळ साधनच नाही तर बहुजन मिशनचे सर्वात महत्वाचे साधन आहे.यावरच त्यांनी भारत भर सायकल यात्रा काढली.आज कार्यकर्त्यांच्या नेत्यांच्या घरी दोन तीन चारचाकी गाड्या आहेत तरी जिल्हाभर फिरण्याची तयारी नाही.
 कांशीराम जी यांनी आपल्या पन्नास वर्षात बहुजन समाजात जनजागृतीसाठी चाळीस दिवसात चार हजार किलोमीटर सायकलवरून यात्रा केली.देशातील नव्हे तर जगातील कोणत्याही समाज सुधारक,राजकिय नेत्याने असे धाडस केले नाही. कांशीराम जी यांनी पहिली सायकल यात्रा पेरियार ई व्ही रामास्वामी नायकर यांच्या जयंती दिनी म्हणजे सतरा सप्टेंबर १९८८ ला कन्याकुमारी वरून सुरवात केली होती.दुसरी कोहिमा,तिसरी कारगिल,चौथी पुरी,पांचवी पोरबंदर वरून काढली आणि २७ मार्च १९८९ दिल्ली विशाल रैलीत बदल करून बहुजन समाजाची शक्ती दाखवून दिली.  
  कांशीराम जी ने रात्र दिवस मेहनत करून वाढविलेली बसपा मायावतीने चमच्या लोकांच्या सल्ल्याने देश भरातील कॅडर बेस कार्यकर्ते संपवले.मायावतीचे सर्व निर्णय अचूक असतील तर चाळीस मंत्री भष्टाचार कसे करू शकतात हा प्रश्न आज ही विचारात घेतल्या जात नाही. यांची समीक्षा बैठक होत नाही.आमदार,मंत्रीमंडळ, कैबिनेटचे सर्व निर्णय जर मायावती घेत असतील तर पक्ष संघटनेत चमचे कसे निर्माण होतात.कांशीरामजीने मायावतीवर जो विश्वास दाखविला त्याला तडा गेला आहे.मिशनरी कार्यकर्त्यांना चमचा समजून पक्षातुन बेदखल करून बसपाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे.काही चमच्यांना त्याच्या समाजाच्या विरोधात उभे केले जाते.तर मिशनरी कार्यकर्त्यांना त्यांच्या समाजाच्या हिता साठी उभे केले जाते.चमचा आपल्या समाजाच्या नेत्याला कमजोर बनवितो तर मिशनरी कार्यकर्ता आपल्या समाजातील सच्या नेत्याला मजबूत बनवितो.कांशीरामजीची संघटन कौशल्य आणि मायावतीचे संघटन कौशल्य यातील फरक आज प्रत्येक राज्यात दिसून येत आहे.गरीब प्रामाणिक,वक्तृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व करणाऱ्या कार्यकर्त्यांची आज पक्षाला गरज नाही.फॅन्टर,चिटर आणि फंडिंग जमा करून देणाऱ्यांनी बसपा कमकुवत करून ठेवली.
   राज्याचा विचार केला तर लक्ष्मीपुत्र विलास गरुड यांनी एका ही तालुक्यात, जिल्ह्यात नेतृत्व निर्माण होऊ दिले नाही.एकाही विधानसभा, लोकसभा मतदारसंघात उमेदवार हक्क सांगेल असा नेता निर्माण होऊ दिला नाही. मुलगा तरुण झाला,सुशिक्षित झाला म्हणून आईवडीलानां घराच्या बाहेर काढत नाही,वेळोवेळी त्यांचा मानसन्मान ठेऊन सल्ला घेतच असतोनां. पक्षात माजी अध्यक्ष झाला तर नवीन अध्यक्षांनी त्याला सोबत ठेऊ नये त्याला कोणत्याही कार्यात सहभागी होऊ देऊ नये ही पद्धत आज खुद्द गरुड बाबत वापरली जात आहे. म्हणजे निसर्गाचा नियम आहे,जे पेरले तेच उगवते. जे विचारधारा मानणारे कॅडर बेस कार्यकर्ते असतात ते कोणत्याही परिस्थितीत दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही. आणि गेले तर जास्त दिवस टिकू शकत नाही. एक वेळ पक्ष बदलला तर त्यांना समाजात काम करता येत नाही. मग ते सामाजिक,धार्मिक शैक्षणिक सांस्कृतिक कार्या कडे वळतात.तिथे ही त्यांना सारखा वैचारिक संघर्ष करावा लागतो.(उत्तम उदाहरण किरण मोहिते नाशिक)
बहुजनांच्या म्हणजे मागासवर्गीय,ओबीसी,आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाच्या कोणत्याही मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पक्ष व पक्षांचे कार्यकर्ते जनांदोलन करून न्याय मिळवून देण्यासाठी काम करत नसतील तर त्यांना निवडणूकीत मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. महापुरुषांच्या नांवावर मत मागायचे तर त्यांनी ज्या असंघटित कष्टकरी मागासवर्गीय,ओबीसी, आदिवासी आणि अल्पसंख्याक समाजाला सहा मूलभूत अधिकार मिळवून दिले अन्न, वस्त्र,निवारा, शिक्षण, रोजगार आणि आरोग्य त्याबाबत पक्षाच्या वतीने कोणतेच काम होत नाही. राज्य व केंद्रांच्या अनेक योजना या बहुजन समाजाला मिळत नाहीत. उच्चवर्णीय सरकारी अधिकारी आणि उच्चवर्णीय शासन मान्यता असलेले ठेकेदार या बहुजन समाजाचे मुक्त शोषण करतांना दिसतात.त्यातही राजकीय चमच्याची रोजीरोटी यांचे आर्थिक शोषण करूनच चालते.त्यावर महापुरुषांच्या विचारांचा वारसा सांगणारा पक्ष कोणत्याही ठोस कृती कार्यक्रम राबवीत नसेल तर त्याला मतदान मागण्याचा काय अधिकार आहे. न बिकनेवाला समाज बनविण्यासाठी न बिकनेवाला कार्यकर्ता,नेता आणि उमेदवारी. पक्षाला बनवावी लागेल. तरच मायावती बहुजन समाजाला जागृत करण्यासाठी देशभरात मान्यवर कांशीराम जी सारख्या यात्रा काढू शकतील. आज देशात भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. मायावती यांनी कांशीरामजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केलेल्या कार्यपद्धतीने काम सुरू केल्यास  बहुजन समाज पक्षाला नवीन उभारी मिळू शकते.
त्यामुळे "कांशी तेरी नेक कमाई तुने सोती कोम जगाई"  ही घोषण मान्यवर कांशीराम (१५ मार्च १९३४) यांच्या ८६ व्या जयंती दिनी बहुजन समाजाला विसरता येणार नाही 
सागर रामभाऊ तायडे,भांडूप मुंबई - ९९२०४०३८५९
Email:- srt1961@gmail.com

कोरोनाचा प्रतिकार विज्ञानाच्या चौकटीत राहून करा.

कोरोनाचा प्रतिकार विज्ञानाच्या चौकटीत राहून करा.
भारत हा कृषिप्रधान देश आहे,आणि तेहतीस कोटी देवाचे देवीचे जागृत भव्यदिव्य देवास्थाने,मंदिरे भूतलावर आहेत. सर्व भारतीय नागरिकांच्या मन, मेंदू व शरीरावर बटू वामनाने हजारो वर्षांपासून वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता ही रिमोट बटू वामनाच्या वारसदारांच्या हातात आहे. परंतु चायनाच्या कोरोना विषाणूने ने सर्व रिमोटच्या सेलची बॅटरी निकामी करून ठेवली.
कोरोना व्हायरसचा इलाज फक्त विज्ञानाद्वारे होऊ शकतो इतर कुठल्याही धर्माच्या विधी,प्रार्थणा,भजन,भक्ती,होम,यज्ञ नमाज, वंदना याद्वारे कुठलाही इलाज होत नाही. यांची खात्री आता तरी भारतीय संस्कृतीचे नित्यनेमाने पालन करणाऱ्या लोकांना झाले असेल अशी अपेक्षा आहे. देवाच बोलावणे आल्याशिवाय मृत्यु येत नाही असं म्हणनारे या रोगाबाबत सावधगिरी बाळगतांना दिसतात.सावधगिरीचा  उपाय म्हणून गर्दीत जाणे टाळत आहेत. म्हणजे मृत्यु जवळ पाहीला की देवापेक्षा विज्ञानावर विश्वास ठेवून ताबडतोब मोठ्या हॉस्पिटलच्या आय सी यु मध्ये दाखल केल्या जाते. 
जगातील मानवाची संपूर्ण सुरक्षा ही जय जवान, जय किसान, जय विज्ञान यांच्या हाती आहे आणि हे शंभर टक्के हेच सत्य आहे.
हे कोणत्याही देशाच्या नागरिकांची व सरकारची नाकारण्याची हिंमत नाही.म्हणूनच स्कूल-कॉलेज बंद,माल-गोदाम बंद,देश-विदेश येणे,जाणे बंद,मन्दिर-मस्जिद-काबा बंद,भगवान,ईश्वर-अल्लाह चे दरवाजे बंद, एका "कोरोना वायरस" ची भयानक भीती माणसाच्या मनात डोक्यात घुसली. त्यामुळे भिऊ नको मी तुझा पाठीशी आहे म्हणणारे तंत्र-मंत्र वाले चुप झालेत.होम,हवन-यज्ञ करणारे चुप झालेत,शनि-राहु-केतु उतरवणारे बाबा चिडीचुप झाले. महंत,पंडे-पुजारी चुप झाले.काझी,मौलवी-मौलाना चुप झाले.चर्च चे पादरी,फादर चुप झाले.तेहतीस कोटी देवी-देवता ज्यांच्या ताब्यात असतात ते तीन टक्के वाले सुध्दा चिडी चुप झाले. त्यांचा धंदा बंद झाला.तरी त्यांनी हिंमत होत नाही.भक्तांना आवाहन करण्याची बाकीच्या वेळी दक्षिणा मिळाल्यावर देवाला खुश करणारे मंत्र कोरोनावर चालणार नाही यांची त्यांना खात्री आहे.म्हणूनच सर सलामत तर पगडी हजार. विज्ञानाच्या समोर सर्व शरणार्थी झाले.
 भारतात दरवर्षी शेतकरी आत्महत्या करतात, त्यांची दखल पाहिजे त्या प्रमाणात घेतली जात नाही. कॉंगोमध्ये एड्स आढळला,मलेशिया मध्ये निपाह सापडला,मेक्सिकोमध्ये स्वाईन फ्ल्यू आढळला, आफ्रिकेत इबोला सापडला, हॉंगकॉंगमध्ये डेंगु आढळला,आता चीनमध्ये कोरोना सापडला.निसर्गाची ताकद आणी मानवाची कुवत कमी पडते,विज्ञानाने जग जवळ आले होते आता त्याने विषाणूचा शोध घेतला, तो एकाचवेळी किती लोकांचा बळी घेऊ शकतो यांचा अंदाज करता येते नाही. म्हणूनच स्वतःची सुरक्षा करून कुटुंबातील लोकांची काळजी घ्या.
एका कोरोना व्हायरसने १५० करोडचा चीन घरातच बंदिस्त झाला. रस्ते विरान झाले चीनचे अध्यक्ष भुमीगत झाले.
एक अत्यंत सूक्ष्म जंतू.१५० कोटींचा चीन चीडीचूप झाला. अगदी अदृश्य अशा एका जंतू ने चीनची दानादान उडवली .
अख्ख जग एका क्षणात झोपावयाची ताकद निसर्गात आहे. आणी मानव मात्र अहंकाराने एकमेकांना संपवन्याची धारणा ठेवतो. करोना ने थोडाही जातीभेद,वर्णभेद,धर्मभेद किंवा प्रांत भेद केला नाही.सगळ्यावर सारखे प्रेम दाखवत घरातच डांबले आहे.
    मानव मात्र हे माझे ते माझे. मी वरच्या कुळाचा वरच्या जातीचा वरच्या धर्माचा असा अहंकार मिरवत फिरत असतो.ही शेखी करोना ने एका क्षणात उतरवली. गेल्या काही वर्षात जरा जास्तच खुमखुमी व जास्तच ताठा असलेला चीनचा तानाशहा अक्षरश: पळून गेला. 
मरणाच्या भीतीने आपल्याच वीस हजार लोकांना ठार मारण्याची भाषा करु लागला.जगातील कोणताही जीव हा निसर्गापुढे अगदीच कस्पटा समान आहे.करोनाने एकच संदेश दिला आहे स्वयम प्रकाशित व्हा,स्वतःच्या सवयी बदलला,स्वछतेचे नियम पाळा,निरोगी रहा व जगा आणि इतरांनाही जगू द्या.
टाटा हॉस्पिटल मुंबई यांनी दिलेल्या सूचना पाळा चीन मधून जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरस पासून संरक्षणासाठी घ्यावयाची काळजी. 
1)कोरोना विषाणू चा आकार मोठा आहे 400-500 मायक्रो,त्यामुळे कोणत्याही साध्या मास्क मुळे संरक्षण होऊ शकते, खर्चिक मास्क घेण्याची आवश्यकता नाही.
2) विषाणू चे वजन जास्त असल्यामुळे तो हवेत तरंगत नाही, खाली पडतो, त्यामुळे त्याचा संसर्ग हवेतून होत नाही
3) कपड्यांवर पडलेला विषाणू नऊ तास राहतो, केवळ स्वच्छ कपडे धुवून वाळवल्यास विषाणू मरतो.
4) हातावर पडलेला विषाणू दहा मिनिटे जगतो, स्वच्छ साबणाने हात धुणे किंवा hand sanitizer वापरणे हे प्रतिबंध करण्यास पुरेसे आहे
5) थंड अन्न आणि icecream खाणे टाळा.
6) कोमट पाण्यात मीठ टाकून गुळण्या केल्यास विषाणू घशातच मारला जातो, फुफुसात संसर्ग होत नाही.
7) 26 ते 27 डिग्री तापमानात विषाणू टिकाव धरू शकत नाही, त्यामुळे उष्ण प्रदेशात विषाणू जगू शकत नाही
8) गर्दीच्या ठिकाणी जाऊच नका.
9) भारतीय जीवनशैलीचा वापर करा म्हणजे हात जोडून नमस्कार करा.
10) प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी रोज सूर्यनमस्कार सारखा व्यायाम करावा.
11) वाचून शेअर करा म्हणजे इतर मित्रांना व नातेवाईकांना सावध करा म्हणजे निदान त्यांच्या मार्फत कोरोना तुमच्या पर्यंत पोहोचणार नाही.देशसेवे साठी नेहमीच प्रामाणिकपणे सेवा देणारे उद्योगपती टाटा यांच्या टाटा हॉस्पिटलने हा संदेश दिला आहे. इतर उद्योगपती लोक संकटात असले की आर्थिक शोषण कसे करता येईल यांचा विचार करतात. 
कोरोना रोखण्यासाठी जगातील सर्व सरकारे मोठ्या प्रमाण सुरक्षा व्यवस्था ठेवण्यासाठी जाहिरात बाजीवर खर्च करीत आहेत. तरी ही जगातील मानवाची संपूर्ण सुरक्षा ही जय जवान, जय किसान, जय विज्ञान यांच्या हाती आहे आणि हे शंभर टक्के हेच सत्य आहे. कोरोनाचा प्रतिकार विज्ञानाच्या चौकटीत राहून करा,हीच प्रत्येक भारतीय नागरिकांना विनंती,
सागर रामभाऊ तायडे,९९२०४०३८५९,भांडुप मुंबई,

   (छायाचित्र दगडाला मास्क लावणारे भारतातील महान मेरीटधारी लोक)
Attachments area

"श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा" तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न


"श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा"  तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न 
भारतीय कामगार शिक्षण संस्था मुंबई संस्थापित दतोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड,श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार आणि सत्यशोधक कामगार संघटनेच्या संयुक्त विदयामानाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात असंघटित क्षेत्राकरीता सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना या विषयावर कामगार संघटना प्रतिनिधीचे १२ मार्च ते १४ मार्च २०२० रोजी श्रमिक शिक्षण भवन कॉम्प्स कुर्ला पश्चिम मुंबई येथे संपन्न झाले.सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्रीमती सविता पावसकर मॅडम समुपदेशक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना,अटल पेन्शन योजना यावर मार्गदर्शन केले.मान झेड ए बागवान उपसंचालक प्रशिक्षण यांनी "श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा" यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिरात प्रमुख वक्त्यांनी आपले विचार प्रगट केले. त्यात सर्वश्री अश्विन काकटकर साहेब अतिरिक्त श्रम आयुक्त मुंबई विभाग यांनी इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळ,नांव नोंदणी, कार्यपद्धती व लाभ यांची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थीनां दिली,यानंतर मान जी बी गावडे सर संचालक आंबेकर श्रम प्रशिक्षण संस्था यांनी कामगार व कामगारांच्या संघटनेची कार्यपद्धत यावर मार्गदर्शन केले.मान परेश चिटणीस यांनी संघ कार्यपद्धती चे महत्व आणि मान सुरेश जिरीमाळी यांनी संवाद कौशल्य व कामगार संघटना यावर आपले विचार मांडले,मॅडम ज्ञानेश्वरी सोनावणे, यांनी एच आय व्ही व एड्स यावर मार्गदर्शन केले.शेवटच्या दिवशी १४ मार्चला सांगता समारोह प्रमुख पाहुणे मान एन डी राठोड सेवा निवृत्त उप आयुक्त श्रम विभाग यांच्या हस्ते २८ प्रशिक्षणार्थीनां प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांचे मुख्य प्रभारी मान रमेश मडावीप्रशिक्षण अधिकारी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती अस्मिता देशमुख यांनी केले.

(सागर तायडे यांस कडून)
 
 

शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी,

शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी,
शहराच्या गल्लीबोळात झाडू मारून,गटार नाले साफ सफाई करणारा कामगार चार दिवस आजारी पडला तर कोणालाही दुःख होणार नाही.परंतु चार दिवसात रस्त्यावर कचरा गोळा झाला, गटार नाले तुंबले तर गल्लीबोळातील थोर समाजसेवक जागे होऊन तोंडी,लेखी शेकडो तक्रारी करतील.म्हणून कामगार बंधुभगीनीनों तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यावी.
आपणास स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळविण्यात येते की काही दिवसांपूर्वी चीन या देशात हाहाकार माजवणारऱ्या कोरोना ( COVID 19) ह्या विषाणूने हजारो नागरीकांचे बळी घेतले असून त्याचा फैलाव झपाटय़ाने जगभर होत आहे. परिणामी सर्व देशांनी त्यांच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा व या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी कंबर कसली आहे. ह्या विषाणूने आता आपल्या भारत देशातही फैलाव सुरू केला आहे. आपल्या देशात या आजाराचे बळी गेल्याची माहिती अद्याप तरी शासनामार्फत जाहीर जरी करण्यात आली नसली तरी देश पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. आपण सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका यामध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहात. आपण नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून अहोरात्र झटत आहात. आपण ही सेवा करत असताना आपल्या शरिराची सुरक्षा पण करणे गरजेचे आहे. तरी आपणास आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात येत आहेत.तरी आपण त्या तंतोतंत पाळाव्यात हिच अपेक्षा.
 १)आपणास स्वच्छतेच्या कामासाठी दिलेले मास्क, हातमोजे तसेच गमशूज यांचा वापर करावा. 
 २)आपण काम करताना आपले शरिर व्यवस्थित झाकले जाईल असा गणवेश धारण करावा. 
 ३)विशेषतः खाजगी तसेच सरकारी रुग्णालयातील तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीतील घनकचरा उचलताना सदर कचऱ्यावर रासायनिक द्रव्यांची फवारणी केली असल्याची खात्री करून तो उचलावा. 
 ४)आपले स्वच्छतेचे काम पूर्ण होईपर्यंत मास्क, हातमोजे, गमशूज आणि गणवेश काढण्याचा प्रयत्न करू नये.
 ५)आपले काम संपल्यानंतर ताबोडतोब स्नान करावे. त्यासाठी चांगल्याप्रतीचा साबण अथवा शाम्पू वापरावा.
६) अनोळखी माणसाशी हस्तांदोलन करू नका,
७) उच्चभ्रू सोसायटी मधील व्यक्ती कडून कोणतेही वस्तू बक्षीस म्हणून स्वीकारू नका.
 ८)शासनाने प्रारित केलेल्या सूचनांचे पालन करावे.
 ९)कोणत्याही धार्मिक संघटना अथवा प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या अवैज्ञानिक गोष्टींना प्राधान्य तसेच प्रसिद्धी देऊ नये व त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करु नये. 
 १०)सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका तसेच ते प्रसारित पण करू नका.
 ११)वैद्यकीय अधिकारी यांनी ह्या आजाराबद्दल सांगितलेली सदृश्य लक्षणे स्वतःमध्ये तसेच आपल्या आजूबाजूच्या इतर कोणामध्ये आढळून आल्यास सरकारी दवाखाने अथवा खाजगी दवाखान्यातच निदान करून घ्यावे.
 १२)स्वत: काळजी घ्या आणि आपल्या सेवेतून नागरिकांचीही काळजी घ्या.
म्हणूनच शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी, सर्वांनी मिळून एक लढा कोरोना सोबत लढूया अन् देश वाचवूया.
 जय हिंद! जय भारत!! जय कामगार!!! 

निलेश नादावडेकर 9892847838
 कार्यालय सचिव व प्रसिद्धी प्रमुख 
 स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटी
संलग्न: स्वतंत्र मजदूर युनियन,

माणुसकीची मूल्य जपणारा कलेक्टर

माणुसकीची मूल्य जपणारा कलेक्टर 
जातीच्या नांवाने शिक्षणात सवलत घेऊन उच्चशिक्षित होऊन उच्चपदस्थ नोकरी मिळाल्यावर खालच्या जातीच्या लोकांना पूर्णपणे विसरणाऱ्यां ग्रामसेवक, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यासाठी प्रेरणा देणारी घटना नुकतीच घडली ती सोशल मीडियावर फिरते पण वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतली पाहिजे होती.कारण कष्टकरी गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या व्यक्तीचे व अधिकारांचे फारसं कौतुक केलेलं काही लोकांना चालत नाही,गोरगरिबांना सारख्या तशील, जिल्हा कार्यालयात चकरा मारायला लावणे हा ज्यांना अधिकार दिला आहे असे समजणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही घटना दुःखद असेल पण गोरगरिबांना न्याय देणारी आहे.
अल्पसंख्याक समाजांचे अब्दुल अजीम (IAS अधिकारी) राज्य -तेलंगाना,जिल्हा-भुपलपल्ली,ठिकाण-जिल्हा मुख्यालय कलेक्टरची गाडी कार्यालयाकडे येते,कलेक्टर साहेब गाडीतून उतरून ऑफिसमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढतात.त्याच पायऱ्यावर एक म्हातारी हात जोडून बसलेली दिसते.कलेक्टर साहेब थांबतात, शिपायाला विचारतात.त्याच्याकडे काही माहिती नसते.
कलेक्टर स्वतःहा त्या म्हातारी शेजारी पायऱ्यावर बसतात.
आज्जीला विचारतात काय अडचण आहे,आज्जी सांगते दोन वर्षांपासूनची पेंशन भेटली नाही.साहेब कागदपत्र मागतात,आज्जी सगळे कागदपत्र साहेबांच्या हातात ठेवते.
आणि सोबत तिला झालेला सगळा त्रास विनंती वजा तक्रार स्वरूपात सांगते.
बाबू लोकांनी किती त्रास दिला किती चकरा मारल्या याचा सगळा लेखाजोखाच मांडती.कलेक्टर साहेब आज्जीचे सगळे कागदपत्र व्यवस्थित चेक करतात आणि आज्जीला सांगतात इथेच थांबा तुमचं काम आजच होईल.
कलेक्टर साहेब सबंधित अधिकाऱ्याला तात्काळ हजर राहण्याचे आदेश देतात.तो अधिकारी कलेक्टर साहेबांच्या जवळ त्या पायऱ्यांवर उपस्थित राहतो.त्याच पायऱ्यांवर त्या म्हातारीच्या दोन वर्षांपासूनचा रखडत असलेला पेंशनचा प्रश्न सुटतो.शेवटी कुठल्या पदावर कोण व्यक्ती आहे यापेक्षा त्या पदावरील ती व्यक्ती किती संवेदनशील आहे हे महत्वाचं आहे.लोकांच्या दुःखाची जाण असणाऱ्या, माणुसकीची मूल्य जपणाऱ्या कलेक्टर अब्दुल अजीम साहेबांना सलाम,देशातील बहुसंख्य ओबीसी, मागासवर्गीय अधिकारी या अब्दुल अजीम साहेबांकडून प्रेरणा घेतील ही अपेक्षा,
Attachments area

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड​ चवदार तळे ​

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड
​ चवदार तळे ​
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना देव करून त्यांचा फक्त जयजयकार करण्याचे काम भटा ब्राम्हणांनी चालविले आहे.त्यात मराठा व महार बौद्ध समाज अलगत अडकत चालला आहे.या दोन्ही महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारला आणि कार्यप्रणालीला मूठमाती देऊन जातीजातीत बंदिस्त करण्याचे काम वस्ती पातळीवर जोरात सुरू आहे. चवदार तळे महाडच्या सत्याग्रहातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावुन उभे राहिलेले सहकारी गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे,सुरबा नाना टिपणीस, प्रधान बंधु, संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर बी मोरे,शिवराम जाधव,सी ना शिवतरकर, पा न राजभोज,एन टी जाधव हे मुख्य सहकारी होते.यांना ही त्यांच्या जाती बांधवांनी संघटनांनी बहिस्कृत केले होते.त्यावेळी दर्याखोऱ्यातील सर्व जाती पातीच्या मावळ्यांना एकत्र करून रायगड ते महाड चवदार सत्याग्रहाची किती झळ पोहचली होती.शिवरायांच्या रयतेच्या राज्यात जातीव्यवस्था तीव्र नव्हती.नंतरच्या काळात पेशव्यांनी शुद्रा अतिशूद्रांचे जिने हराम केले.त्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नव्हते.म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.हा चवदार तळ्याचा इतिहास नव्याने सांगण्याचे काम विचारांचा जागर व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या किर्याशील कार्यकर्त्यानी संकल्प जाहीर केला आहे.१९ मार्च १९२७ ला महाड मध्ये काय घडले होते त्यात कोण कोण सहभागी जाते.त्यांची आठवण म्हणून २०१८ पासुन रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित बहुजन समाजासाठी सत्याग्रह केला. यंदा या सत्याग्रहाला ९३ वर्ष पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी लाखो लोक महाडला दर्शनासाठी येतात आणि जातात. यावर्षी कोरोना मुळे त्याला काही बंधने आली आहेत.लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.
महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. बाबासाहेब त्या वेळी सांगत होते चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही काही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जायांचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जायांचे नाही. तर इतरां प्रमाणे आम्ही ही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्या करीताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. असे अंगावर शहारे आणणारे उद्धगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले होते. त्याला २० मार्च २०१८ ला ९३ वर्षे पूर्ण होत आहेत.पण त्या महाड रण संग्राम सत्याग्रहचा  आंबेडकर अनुयायीनी कोणता आदर्श घेतला?. यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करण्याची तयारी आंबेडकरी चळवळीतील नेत्यात आणि अनुयायात नाही.म्हणूनच १९ मार्च २०१८ पासुन रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.२० मार्चला लाखो लोक दरवर्षी येतात, पण १९ मार्चला काय झाले होते यांची माहिती घेत नाही.आपणांस माहिती आहे काय?. १९ मार्च १९२७ रात्री पाचाड व महाडला काय घडले?.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचा जाहीरपणे खुन करणे हा आंबेडकर अनुयायीचा जन्म सिद्ध अधिकार आहे असेच ते वागतात.१४ एप्रिल १८९१ ते ०६ डिसेंबर १९५६ या काळात जे जे ऐतिहासिक कार्य डॉ भिमराव आंबेडकर यांच्या हातून घडले.त्या त्या दिवसाला आंबेडकरी अनुयायी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन जाहीर पणे क्रांतिकारी विचाराचा त्याच ठिकाणी खून करून तो उत्सव म्हणुन खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात.कारण तो दिवस त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो.कारण त्याच दिवसी गल्लीबोळातील नेत्याचा ८x१० चा बॅनर, होडींग आणि १०x १२ चा स्टेज बांधून जनतेला आपली शक्ती दाखविण्याची सुवर्ण संधी मानतात.ती गमवायला कोणीच तयार नाही.या दिवसाचे त्या काळाचे महत्व आज त्यांच्या साठी काय आहे. हे त्यांना कोणी विचारण्याचे, सांगण्याचे धाडस कुणी ही करू नये.आम्हाला आंबेडकर अनुयायी,भक्ता एवढे तुम्हाला त्याचे महत्व कळणार नाही. आमच्या रक्तात आंबेडकरी चळवळ असते.जन्मताच आम्ही आंबेडकरवादी असतो.२० मार्चला लाखो लोक महाडला जातात आणि काय करतात?.२० मार्च १९२७ चे गांभीर्य कोणत्या गटाच्या नेत्याकडे असते.किंवा नगरा नगरातील मंडळ ,महिला मंडळाकडे असतो?.मनसे, राष्ट्रवादी यांच्या दादा,भाऊ,नाना,काका यांच्या कडून बस घेऊन महाड चवदार तळ्याला जाऊन दर्शन,भोजन करणारे सत्याग्रहा चा अर्थ जाणतात काय?.त्यातुन त्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षातून कोणती प्रेरणा घेतली?.
महाराष्टातील खेड्या पाड्यातील गांवकुसा बाहेर राहणारी महार फक्त महार माणस महाडला पाणी पिण्यासाठी जाणार नव्हते.तरी बाबासाहेबांनी महाराना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला. आणि महाडचे चवदार तळे अजरामर झाले.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे.महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज २० मार्च २०२० ला ९३ वर्ष पूर्ण होत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आजच्याच दिवसी २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजाती साठी खुले केले.केवळ महार जाती साठी चवदार तळे नव्हते.डॉ बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराने चवदार तळाच्या पाण्याला हात लावताच आग लागली. ती महाड मध्ये सुरु झालेली आग राज्यातून देशभर पसरली.ते क्रांतिकारी वैचारिक संघटन कैशल्य आज कोणत्याही नेत्या कडे नाही.त्या ऐतिहासिक घटनेला ९३ वर्ष पूर्ण होत असले तरी नेहमी सारखे कार्यकार्माचे आयोजन महाडला सर्वच गटा कडून करण्यात येईल प्रत्येक कोणा कोपरयात एका एका गटाचा स्टेज असणारच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले.बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर समाजात सर्वच माणसे सारखी.अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला? बाबासाहेबांच्या मते, राजकीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचनेतील नीतीच्या पायावर उभे राहण्यासारखे आहे. परंतु घुबडाला सूर्यप्रकाश सहन होत नाही.त्याप्रमाणे सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जाती श्रेष्ठता मिरवायला मिळते त्यांच्या जातीभेदावर कुऱ्हाड पडलेली पाहून साहजिकच त्यांचा संताप तीव्र होतो.आज ही खेड्या पाड्यातील वातावरण त्याची साक्ष देते.त्यातून आंबेडकरी चळवळीचे नेते अनुयायी काही शिकायला तयार नाहीत.
आज देशात जातीभेदाचा जो काही प्रकार अनुभवयास मिळत आहे. तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. जातीपातीच्या या विषारी झाडाला केवळ उच्चवर्णीयां कडूनच खतपाणी घातले जाते, असे म्हणणे चुकीचे ठरेल.जोपर्यंत एका समाजाकडून दुसऱ्या समाजात रोटी-बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत समताधिष्ठ समाजाची निर्मिती अशक्य आहे, असे बाबासाहेबांनी सांगितलेले असताना ही अनेक वेळा बौद्ध आणि नवबौद्ध समाजातील लोकांचा विवाहाच्या वेळी जातीलाच अग्रक्रम असतो. महाडच्या रणसंग्राम भूमीच्या संपूर्ण कोकणात मातृसंस्था आणि पंचायत यातील गावकी भावकी च्या कथा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्माच्या चैकाटीत न सुटणाऱ्या आहेत. एकीकडे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वेळ येताच जाती-पातीला खतपाणी घालायला लावणारी कामे करायची अशी दुटप्पी भूमिका बाबासाहेबांना मानणाऱ्या सुशिक्षित वर्गाने सोडून द्यायला हवी.त्या पेक्षा खेड्यातील अज्ञानी अशिक्षित असंघटीत माणूस आंबेडकरी चळवळी करिता लाख मोलाचा ठरतो. आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या समाजाने स्वतःचे आत्मपरिक्षण करून बाबासाहेबांनी केलेल्या महाडच्या रणसंग्रामतून योग्य बोध घ्यावा. 
आज महाड चवदार तळे म्हणजे पिकनिक झाली आहे.हे आंबेडकरी चळवळीतील जागृत अनुयायी यांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे, म्हणुन महाड रण संग्राम आजच्या तरुणांना आदर्श वाटत नाही,पिकनिक पॉईंट झाला आहे.​म्हणूनच शिवराय ते भिमराय समता मार्च १९ मार्च २०१८ पासुन रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.मराठी साहित्य संमेलनात क्रांतिकारी विचार मांडून वैचारिक खळबळ निर्माण करणारे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सकाळ समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे, प्रा.अंजली मायदेव कर्वे इन्स्टिट्यूट पुणे,फारूक अहमद सुराज्य सेना प्रामुख्याने उपस्थित सुरुवात झाली होती.१९ मार्च १९२७ च्या सत्याग्रहात ज्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांचे नातु पणतू पण सहभागी होते.त्यात उल्का महाजन,मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस,श्रीप्रकाश अधिकारी, आरिफ करंबेळकर, सुभाष वारे, युवराज मोहिते,अनिता पगारे,ललित बाबर,सुरेश सावंत,अविनाश कदम,भूषण सिसोदे,नागेश जाधव,कालीदास रोटे प्रदिप शिंदे,चंद्रकांत गमरे,संजय जाधव महाड पंचायत समितीचे सदस्य आणि सागर तायडे असे विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.आणि एक नवी वैचारिक चर्चा घडविण्याचा प्रयत्न केला होता. दरवर्षी आपण सहभागी होऊ शकत नसलो तरी यावर व्यापक चर्चा घडवुन शिवराय ते भिमराय समता कशी प्रस्थापित करता येईल यांचा विचार करूया. कोणती ही दळणवळणाची साधन नसतांना ज्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेऊन यशस्वी संघर्ष केला त्या सत्यगृहींना कोटी कोटी प्रणाम!!!.