श्रमिक बेघरांना प्रधानमंत्री आवास योजना लागू करण्याची मागणी
मुंबई दिनांक(9 मार्च)-शहराचे नाले सफाई,रस्ते सफाईचे काम,फुले-खेळणी,फुगे विक्रेते एकंदरीत शहराची सेवा करणारे हे श्रमिक नाल्याच्या बाजूला,पदपथावर,सिग्नलच्या बाजूला,पुलाखाली राहणारे बेघरानी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे घर अधिकाराची मागणी केली.
श्रमिक बेघरांना मुंबई महानगरपालिका पाण्याचा अधिकार नाकारतेय पण ओ.सी.नसलेल्या इमारतींना मानवतेच्या आधारे पाणी अधिकार देतेय,ही मुंबईमहापालिकेची विषमतेची वागणूक श्रमिकां प्रति दिसून येत असल्याचे आरोप सीपीडी संस्थेचे जगदीश पाटणकर यांनी केला.
गेल्या 35 वर्षांपासून पार्ला पश्चिम रेल्वे स्टेशन रुळांजवळ राहणारे सुनीता गाडे यांनी सांगितले की,रेल्वे रुळ रुंदीकरना मुले रेल्वेने आम्हाला बाहेर हाकलून लावले त्यामुळे बाहेर रस्त्यावर राहत असल्याने बीएमसी नेहमी सामानाचे तोडमोड करते.नेहमी होणाऱ्या या तोडामोडी मुळे आमचे पूर्वीचे वास्तवाचे कागदपत्र गहाळ केली जातात.मग आम्ही कोणते कागदपत्र दाखवावेत?
तसेच,हनुमान नगर पार्ला येथे राहणारे भरती सुपय्या यांनी त्यांचा नवऱ्याचे प्रेत ही दोन मिनिटं थांबू दिले नाही,नेहमीच बीएमसी ची गाडी येऊन सामानाचे नुकसान करतात,येथे राहूच नका,असा दम मारतात.
आम्ही ही माणसे आहोत,आम्ही देखील या शहराचे-भारताचे नागरिक आहोत.आज आम्ही कचरा उचलून पोट भरत असलो तरी शहराच्या सफाईचेच काम करीत आहोत.
आज झालेल्या श्रमिक बेघरांच्या मागणीपत्र पत्रकार परिषदे मध्ये सेंटर फॉर प्रोमोटिंग डेमोक्रॅसी या संस्थेच्या वतीने श्रमिक बेघर कुठे आणि कश्या पध्दतीने राहतात - काम करतात,याचे फोटो प्रदर्शन द्वारे शहराच्या सेवेमध्ये कश्या पध्दतीने योगदान देत असल्याचे दाखवून दिले.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने बीएमसी ने शहरी बेघरांकरिता 125 निवारे बांधने बंधनकारक होते मात्र आतापर्यंत फक्त 23 निवारे चालविले जात आहेत म्हणजेच सरकारे सुद्धा संवेनशून्य असल्याचे मत सिताराम शेलार यांनी स्पष्ट केले.
श्रमिक बेघरांनी आपल्या मागणीपत्रा मध्ये 1)प्रधानमंत्री आवास योजनेतून घर अधिकार मिळावा, 2)बीएमसी द्वारा नेहमी होणारी तोडमोड थांबविण्यात यावी व मुलांचे शालेय वह्या पुस्तके,जेवणाचे सामान जप्त करू नये, 3)पाणी अधिकार मिळावा,शहरी नागरी आजीविका मिशनच्या गाईडलाइन नुसार बेघरांकरिता शेलतर(निवारे) 125 बनविण्यात यावेत, 4))भिकारी म्हणून पोलिसां द्वारा होणारी कारवाई थांबविण्यात यावी,5)पुढील वर्षी 2021 या वर्षी होणाऱ्या राष्ट्रीय जनगणने मध्ये बेघरां करीत विशेष मोहीम राबविण्यात यावी.आदी प्रकारच्या मागण्या शहरी श्रमिकांनी प्रसारमाध्यमांद्वारे सरकार पर्यंत पोचविण्याचे विनंतीवजा आवाहन केले.
या बेघरांच्या मूलभूत अधिकारांच्या मागणी पत्रासाठी सीपीडी संस्थेचे सिताराम शेलार,जगदीश पाटणकर,योगेश बोले,पूजा कांबळे,तसेच आकार मुंबईच्या शारदा आरोनदेकर,युवाचे अमृतलाल बेतवाला,यांनी सुद्धा मते मांडली.
अधिक माहिती करीता संपर्क
जगदीश पाटणकर 9029597241
======================================================================================
५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज नागपूर येथे संपन्नझाली.५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला.
स्वतंत्र मजदूर युनियनच्या राज्य कार्यकारिणीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि. ८ मार्च रोजी ३१४, निलकमल काम्प्लेक्स, महाजन मार्केट, सिताबर्डी, नागपूर येथे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जे. एस. पाटील साहेब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेमध्ये सर्व संलग्न संघटनांच्या मागील वर्षाच्या कार्याचा आढावा घेण्यात येऊन ५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्य़ात मे २०२० पर्यंत संलग्न युनियनच्या शाखा आणि आय एल यु जिल्हा कमिटी निर्माण करण्याचाही संकल्प करण्यात आला.
या महत्त्वपूर्ण सभेला राज्य अध्यक्ष मा. सागर तायडे, सरचिटणीस मा. डि. एम. खैरे, उपाध्यक्ष मा. विकास गौर, प्रसिद्धि सचिव मा. एन. बी. जारोंडे, संघटन सचिव मा. गणेश उके,सुनील तेलतुंबडे,अध्यक्ष शिक्षक संघटना, प्रफुल्लता लोणारे,अंगणवाडी संघटना यांचे सह संलग्न संघटनांचे पदाधिकारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
आपली ओळख कामगार,कर्मचारी आणि अधिकारी म्हणून फक्त कार्यालयात आहे. बाहेर पडल्यावर आपण कोण आहेत?. ते सांगण्यासाठी युनियनच्या माध्यमातून काम करा, जेथे जो कामगार,कर्मचारी अधिकारी भेटलं त्याला कोणत्या युनियन चे सभासद आहेत हे विचारा मग त्याला डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या कामगार चळवळी बाबतची भूमिका समजावून सांगा,असे सागर तायडे यांनी सांगितले. तर कामगार संघटना स्थापन करा,तीला गतिमान करा, आपली समस्या सोडविण्यासाठी, आपले नेतृत्व तयार करा,विचारधारेच्या आधारे संघटना चालवली तर समस्या निर्माण होणार नाहीत, चुकीच्या विचारधारे सोबत मागासवर्गीय कामगार अधिकृतपणे जोडला गेला असल्यामुळे त्यांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत, फॅशनेबल कार्य करणाऱ्यांची संख्या वाढत आहे, म्हणून आपल्याला विचारधारेला समर्पित कार्यकर्ता तयार करावा लागेल,तरच ५ लाख मेंबरशिप चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकते असे मान जे एस पाटील साहेब राष्ट्रीय अध्यक्ष स्वतंत्र मजदूर युनियन (आय एल यु) यांनी सांगितले,सर्व संलग्न संघटना,युनियनच्या अध्यक्ष सचिवांनी सभेला उपस्थिती दाखविली होती. सभेचे सूत्रसंचालन गणेश उके यांनी तर गौतम पाटील यांनी आभार मानतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा