सोमवार, २३ मार्च, २०२०

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम

वधू वर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम 
भारतात धर्म रिती रिवाजाचे पालन करून समाजात राहावे लागते.ज्याने समाजाचे रिती रिवाज नाकारले त्यांची त्यांचे जवळचे नातलग सर्व संबधं तोडून टाकतात, गांव सोडून शहरात आलेले लोक सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे असतात,आणि ते चाळ, बिल्डिंगच्या प्लॉट,बंगला, किंवा सरकारी निवास स्थानात राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाची नातलागची गरज वाटत नाही. कामावरील,कार्यालयातील सहकारी व राहतात त्याठिकाना वरील रहिवासी जवळचे नातलग मित्र मंडळी होत असतात. ते सुखा दुःखात सहभागी होत असतात,त्यामुळे बहुसंख्य लोक जात लपवून राहतात, हिंदू म्हणून सर्वच जातीचे लोक एकत्र सर्वच सण साजरे करतात.खरा प्रश्न उभा राहतो तो मुत्यू झाल्यावर किंवा लग्न करतांना इथे जात लपवता येत नाही, हिंदू धर्माच्या रिती रिवाजा नुसार नवरा मरो किंवा नवरी मरो ब्राम्हणाला दक्षिणा द्यावीच लागते.तसेच धर्मा नुसार बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,इथेच जात लपवून राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीची खरी गोची होते,इथेच समाज आणि नातलगातील आपले स्थान दिसून येते.लोक नालायक आहेत आपणच शहाणे आहोत.असा समज काही लोकांचा असतो.त्यामुळेच त्या लोकांना समाजात वधू वर सूचक मंडळाची गरज भासू लागते, हा चांगला उत्पन्न देणारा धंदा आहे.आणि वरून सामाजिक जबाबदारी म्हणून समाजसेवा आहे. लग्न जुळवून देण्याचे आमचे काम आहे. मुलामुलींवर जाती धर्मानुसार धार्मिक संस्कार, रितीरिवाज, एकत्र कुटुंबात राहण्याची मानसिकता याबाबत पुढे मुलामुलींच्या कुटुंबात कलह,तक्रारी भांडण तंटा कोणतीही घटना घडली तर आमची वधू वर सूचक मंडळांची जबाबदारी नाही हे सांगितले जाते.
प्रादेशिक जिल्हावाद त्यानुसार परंपरा त्यानंतर मुलगी वरील व मुलांवरील संस्कार एकत्र राहूच देत नाही, कारण आर्थिक मुबलता असल्यामुळे सर्व सेवा करणारे उपलब्द असतात. मग मुलीने सासरी घरातील कामे आणि सेवा करणे अशक्य असते.त्यामुळे मुलीला सासूसासरे चालत नाही,मुलीचे आईवडील मुलाच्या आईवडीलाला समजून घेत नाही, कोणालाच कोणाची म्हणजे नातलग समाजाची भीती नसल्यामुळे सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यांना तडजोड किंवा घटस्फोट करावाच लागतो.यातूनच वृध्दाश्रमाची निर्मिती होत आहे. यातुन कोणताच समाज आणि जात धर्म सुटलेला नाही.
हिंदू धर्मात 6600 जाती आहेत.एका जातीचा दुसऱ्या जातीत बेटी व्यवहार होत नाही.मात्र लग्न आणि मुत्यूच्या सर्व प्रकारच्या विधी करण्यास ब्राम्हण असने बंधनकारक आहे.हिंदू धर्मातील कोणत्याही शहरात राहणाऱ्या उच्च शिक्षित माणसांची आजची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. उच्च शिक्षित तरुण पिढी का घडत नाही? काही अज्ञानी अंधश्रद्धा मानणाऱ्या पालकांमुळे मानवधर्माची माहीती पुढील पिढीला पोहचत नाही. युवक युवतींना स्वत:च्या जाती धर्माची माहीती मिळविण्याची इच्छा शक्ती नाही.हिंदू धर्मातील तरुण पिढी परंपरा,रिती रिवाजा नुसार अज्ञान,अंधश्रद्धा यात सहभागी होतात.ते भीतीमुळे आईवडील,आजोबा, पणजोबा यांनी पालन केलेल्या परंपरा,रितीरिवाज डॉक्टर, वकील,इंजिनिअर, प्राध्यापक, शास्त्रज्ञन,विमान चालविणारा,पायलेट,रेल्वे इंजिन चालविणारा डॉयवर,चारचाकी चालवणार डॉयवर,कॉम्प्युटर सोफ्टवेअर हार्डवेअर इंजिनिअर कोणीही नाकारण्याची हिंमत करीत नाही. त्यामुळे काही प्रमाणात ते त्या त्या धर्माचे नऊ,दहा दिवस पालन करतात,नंतर जे करायचे ते करतातच. काही लोक हिंदू धर्मावर नेहमी टिका करतात पण हिंदू धर्मातील हजारो जाती,पोटजाती आरक्षनाच्या सवलती मुळे शिक्षण घेऊन सुशिक्षित झाल्या,त्यांच्या आर्थिक,सामाजिक,सांस्कृतिक आणि राजकिय परिस्थितीत परिवर्तन झाले.हे मान्य करीत नाही.विज्ञानाने किती ही झपाट्याने प्रगती केली तरी ते मान्य न करणारा बाप स्वतःच्या मुलीचे आंतरजातीय विवाह केला म्हणून शांत पणे तिचा खून करून जेलमध्ये जातो. शिक्षण घेतांनास मुलीने मनपसंत मुलाशी लग्न केले म्हणून घराण्याची इज्जत गेली म्हणणारा बाप मुलीचा खून करतो तेव्हा घराण्याची इज्जत जात नाही काय?.

बहुसंख्य लोक हिंदूंच्या देवा धिकांच्या मोहमाया तुन मुक्त झाले नाही, अर्ध्या पेक्षा जास्त युवकांना स्वत:ची जात नीट कळली नाही.ते फक्त गर्वसे कहो हम हिंदू है म्हणतात. कारण घरातील आणि परिसरातील वातावरण त्यांना योग्य मार्गाने जाऊ देत नाही.राजकारणाच्या स्पर्धेत सामाजिक, धार्मिक मार्ग दिशाहीन झाले आहेत. मानवधर्माचा प्रचार करायला लोकांना राजकीय आशीर्वाद लागतो. सर्वधर्मसमभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदु धर्माचा उदो उदो करत जाती जातीचा गणेशोत्सव,नवरात्रत्सोव, जत्रा,भंडारे मोठ्या उत्सवात साजरे होतात.मागासवर्गीय समाजातील लोकांना स्वजातीची अस्तित्वच नाही,ते हिंदू म्हणून जगतात,त्यांच्या समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबा देत नाहीत.ते शिर्डी, तिरुपती, बालाजीला हजारो रुपयॆ देवून नवस करतील.मग असा लोकांच्या मुलामुलींचे लग्न समाजातील आणि नात्यातील लोक का म्हणुन करत नाही?.
हिंदू सर्व समाज कुलदेवता, ग्रामदेवतेच्या देवळात, शेंगाव,शिर्डीला जातात. तेव्हा विचार करा की यांच्या घरात कोणते संस्कार असतात. मग यांच्या मुलामुलीला लग्न करतांना वधु वर सूचक मंडळाचा पर्याय का निवडावा लागतो.वधु वर सूचक मंडळाने जुळविलेली लग्न दोनतीन वर्षात वेगळे होतात,फारशी टिकल्याची उदाहरण दिसत नाही.जी टिकतात त्यांचे आई किंवा वडील वृद्धाश्रमात असतात. मी अनेक वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांच्या मुलाची चौकशी केली तर हे सत्य बाहेर येते.पण त्यावर कोणीच कोणती कारवाई करीत नाही.कारण समाज आणि नातलगात न राहणारी मंडळी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवते,राज्यात मुबलक वधुवर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम खोलली जात आहेत.त्यांच्या मागील ही कारण आहेत.वृद्धाश्रम बंद करण्या करीता सुनेने सासू, सासऱ्यांना संभाळण्या करीता मुलीवर संस्कार असणे आणि समाजाचे नातलगाचे दडपण असणे खूप गरजेचे आहे.म्हणुन सून करतांना मुलीचे शिक्षणा पेक्षा घरातील एकत्र कुटुंब राहण्याचे संस्कार महत्वाचे आहे, ते पहा उद्याच्या भविष्या करीता 
सागर रामभाऊ तायडे,
9920403859,भांडुप,मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा