"श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा" तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर संपन्न
भारतीय कामगार शिक्षण संस्था मुंबई संस्थापित दतोपंत ठेंगडी राष्ट्रीय कामगार शिक्षण व विकास बोर्ड,श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार आणि सत्यशोधक कामगार संघटनेच्या संयुक्त विदयामानाने तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यात असंघटित क्षेत्राकरीता सामाजिक सुरक्षा व कल्याणकारी योजना या विषयावर कामगार संघटना प्रतिनिधीचे १२ मार्च ते १४ मार्च २०२० रोजी श्रमिक शिक्षण भवन कॉम्प्स कुर्ला पश्चिम मुंबई येथे संपन्न झाले.सदर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्रीमती सविता पावसकर मॅडम समुपदेशक बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आला. या प्रसंगी त्यांनी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना,प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना,अटल पेन्शन योजना यावर मार्गदर्शन केले.मान झेड ए बागवान उपसंचालक प्रशिक्षण यांनी "श्रमिक शिक्षा,विकास की दीक्षा" यावर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.तीन दिवशीय प्रशिक्षण शिबिरात प्रमुख वक्त्यांनी आपले विचार प्रगट केले. त्यात सर्वश्री अश्विन काकटकर साहेब अतिरिक्त श्रम आयुक्त मुंबई विभाग यांनी इमारत बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी मंडळ,नांव नोंदणी, कार्यपद्धती व लाभ यांची सविस्तर माहिती प्रशिक्षणार्थीनां दिली,यानंतर मान जी बी गावडे सर संचालक आंबेकर श्रम प्रशिक्षण संस्था यांनी कामगार व कामगारांच्या संघटनेची कार्यपद्धत यावर मार्गदर्शन केले.मान परेश चिटणीस यांनी संघ कार्यपद्धती चे महत्व आणि मान सुरेश जिरीमाळी यांनी संवाद कौशल्य व कामगार संघटना यावर आपले विचार मांडले,मॅडम ज्ञानेश्वरी सोनावणे, यांनी एच आय व्ही व एड्स यावर मार्गदर्शन केले.शेवटच्या दिवशी १४ मार्चला सांगता समारोह प्रमुख पाहुणे मान एन डी राठोड सेवा निवृत्त उप आयुक्त श्रम विभाग यांच्या हस्ते २८ प्रशिक्षणार्थीनां प्रमाण पत्र देऊन गौरविण्यात आले. प्रशिक्षण शिबिरांचे मुख्य प्रभारी मान रमेश मडावीप्रशिक्षण अधिकारी यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन श्रीमती अस्मिता देशमुख यांनी केले.
(सागर तायडे यांस कडून)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा