शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी,
शहराच्या गल्लीबोळात झाडू मारून,गटार नाले साफ सफाई करणारा कामगार चार दिवस आजारी पडला तर कोणालाही दुःख होणार नाही.परंतु चार दिवसात रस्त्यावर कचरा गोळा झाला, गटार नाले तुंबले तर गल्लीबोळातील थोर समाजसेवक जागे होऊन तोंडी,लेखी शेकडो तक्रारी करतील.म्हणून कामगार बंधुभगीनीनों तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही स्वतः घ्यावी.
आपणास स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कळविण्यात येते की काही दिवसांपूर्वी चीन या देशात हाहाकार माजवणारऱ्या कोरोना ( COVID 19) ह्या विषाणूने हजारो नागरीकांचे बळी घेतले असून त्याचा फैलाव झपाटय़ाने जगभर होत आहे. परिणामी सर्व देशांनी त्यांच्या नागरिकांना वैद्यकीय सेवा व या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी कंबर कसली आहे. ह्या विषाणूने आता आपल्या भारत देशातही फैलाव सुरू केला आहे. आपल्या देशात या आजाराचे बळी गेल्याची माहिती अद्याप तरी शासनामार्फत जाहीर जरी करण्यात आली नसली तरी देश पातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. आपण सर्व महाराष्ट्रातील ग्रामपंचायत ते महानगरपालिका यामध्ये सफाई कामगार म्हणून काम करत आहात. आपण नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये म्हणून अहोरात्र झटत आहात. आपण ही सेवा करत असताना आपल्या शरिराची सुरक्षा पण करणे गरजेचे आहे. तरी आपणास आपल्या आरोग्याच्या दृष्टीने स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने काही महत्त्वपूर्ण सूचना करण्यात येत आहेत.तरी आपण त्या तंतोतंत पाळाव्यात हिच अपेक्षा.
१)आपणास स्वच्छतेच्या कामासाठी दिलेले मास्क, हातमोजे तसेच गमशूज यांचा वापर करावा.
२)आपण काम करताना आपले शरिर व्यवस्थित झाकले जाईल असा गणवेश धारण करावा.
३)विशेषतः खाजगी तसेच सरकारी रुग्णालयातील तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या इमारतीतील घनकचरा उचलताना सदर कचऱ्यावर रासायनिक द्रव्यांची फवारणी केली असल्याची खात्री करून तो उचलावा.
४)आपले स्वच्छतेचे काम पूर्ण होईपर्यंत मास्क, हातमोजे, गमशूज आणि गणवेश काढण्याचा प्रयत्न करू नये.
५)आपले काम संपल्यानंतर ताबोडतोब स्नान करावे. त्यासाठी चांगल्याप्रतीचा साबण अथवा शाम्पू वापरावा.
६) अनोळखी माणसाशी हस्तांदोलन करू नका,
७) उच्चभ्रू सोसायटी मधील व्यक्ती कडून कोणतेही वस्तू बक्षीस म्हणून स्वीकारू नका.
८)शासनाने प्रारित केलेल्या सूचनांचे पालन करावे.
९)कोणत्याही धार्मिक संघटना अथवा प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या अवैज्ञानिक गोष्टींना प्राधान्य तसेच प्रसिद्धी देऊ नये व त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करु नये.
१०)सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका तसेच ते प्रसारित पण करू नका.
११)वैद्यकीय अधिकारी यांनी ह्या आजाराबद्दल सांगितलेली सदृश्य लक्षणे स्वतःमध्ये तसेच आपल्या आजूबाजूच्या इतर कोणामध्ये आढळून आल्यास सरकारी दवाखाने अथवा खाजगी दवाखान्यातच निदान करून घ्यावे.
१२)स्वत: काळजी घ्या आणि आपल्या सेवेतून नागरिकांचीही काळजी घ्या.
म्हणूनच शहराची स्वच्छता करणाऱ्या कामगारांनी स्वतःची काळजी घ्यावी, सर्वांनी मिळून एक लढा कोरोना सोबत लढूया अन् देश वाचवूया.
जय हिंद! जय भारत!! जय कामगार!!!
निलेश नादावडेकर 9892847838
कार्यालय सचिव व प्रसिद्धी प्रमुख
स्वतंत्र म्युनिसिपल कामगार युनियन महाराष्ट्र राज्य कमिटी
संलग्न: स्वतंत्र मजदूर युनियन,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा