(भाग 2)
सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?.
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.
जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्चला जयंतीनिमित्त पहिला भाग अनेक वृत्तपत्रात प्रसिध्द झाला. जमशेदजीची १७७ वी जयंती टाटा ग्रुपच्या सर्व कंपन्यात आनंदात उत्स्फूर्तपणे साजरी झाली. टाटा ग्रुपची स्थापना शंभर वर्षा पुर्वी मुंबई येथे झाली होती.त्यांचा मुळ उद्देश हा उद्योगातुन देशसेवा करने हा होता.काही लोकांना ते आजही मान्य नाही. टाटाने पाण्याचा वापर करून वीज निर्मिती केली. त्यामुळे ते पाणी काही वर्षे रायगड जिल्ह्यातील लोक वापरत नव्हते.टाटा कंपनीचे सहा धरणे लोणावळा, वाळवण, सोमवाडी ठोकरवाडी शिरवटा आणि मुळशी पुणे जिल्ह्यात आहेत,आणि वीज निर्मिती करणारे संच भिवपुरी,खपोली,भिरा येथे रायगड जिल्ह्यात आहेत.धरणग्रस्तांच्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती टाटा कंपनीत नोकरीला आहेत.काहींच्या चौथ्या पांचव्या पिढीतील तरुण इंजिनिअर झाले आहेत.
पहिल्या टप्प्यात सर्वच अंगठा बहाद्दर होते.पण प्रशिक्षण घेऊन ते कुशल कारागीर झाले.त्यांच्या कामाची पद्धत पाहून एम टेक,बी टेक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर थक्क होत होते.कारण पुस्तकी ज्ञान आणि प्रत्येक्षात काम करून मिळविलेले ज्ञान यात निश्चितच फरक असतो.१६ ऑगस्ट १९९६ ला भिरा येथे माझी आणीबाणीच्या काळात टॉसफोर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली.१५ ऑगस्ट १९९६ ला पाईपलाईन फुटून रायगड जिल्ह्यातील ३५ हजार गांवे पाण्यात वाहून गेले होते, गाई,म्हशी,घरे मोठी आर्थिक हानी झाली होती. पंधरा दिवसासाठी पाठविले होते.तेव्हा अडीच तीन वर्षे तिथे राहून मुळशी तालुक्यातील सर्व गांवे आणि माणगांव तालुक्यातील सर्व गांवाच्या लोकांशी ओळख निर्माण झाली. मुळशी धरणात ज्यांच्या जमिनी गेल्या त्यांच्यासाठी महात्मा फुले यांनी आंदोलन केले होते, ब्रिटिशांनी टाटा कंपनीला जमीन देतांना प्रत्येक कुटुंबातील सदस्यानां कायमस्वरूपी नोकरी व गावाचे पुनर्वसनासाठी करण्याचे आश्वासन दिले होते.ते टाटा कंपनी ने पूर्ण केल्याचे सांगितले जाते. टाटा कंपनीने प्रत्येक गांवात रोड व शाळा बांधून दिल्या आहेत. पण राजकीय पक्षांच्या लोकांना टाटांच्या लोकांनी गांवात ढवळाढवळ करू नये असे वाटत होते. शाळा बांधण्या पेक्षा मंदिर बांधून द्या या मांगणीचा जोर होता.पण कंपनीच्या MSW अधिकाऱ्यांनी त्याला कधी मान्यता दिली नाही. याबाबतचे अनुभव खूप आहेत ते मी वेगळ्या पद्धतीने लिहणार आहे.
जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या ३ मार्च जयंतीनिमित्त लेख लिहावा असे खूप दिवसांपासून मनात होते, सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.असे जाहीरपणे विचारणारे लोक ते स्वीकारतील काय ही शंका मनात होती.पण टाटा ने देशासाठी देशातील गोरगरिबांसाठी काय काय केले.ते आपण पाहतो पण त्यावर चांगले चार शब्दांत कोणी लिहत नाही.
देशातील अनेक राज्यात टिस मधून समाजसेवक झालेले लोक माझा संपर्कात येतात. मी टाटा कंपनीत नोकरी करतो म्हणून नाही तर मी महात्मा ज्योतीबा फुले, रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या सत्यशोधक समाजाचे चळवळीचे असंघटित कामगारांना संघटित करून न्याय हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी काम करतो. म्हणून माझी ओळख होते. कारण टिस व निर्मला निकेतन कॉलेज ऑफ सोशल वर्क मध्ये जे BSW, MSW शिक्षण घेण्यासाठी येतात त्यांना स्थलांतरीत प्रवाशी कामगार, इमारत बांधकाम कामगार, नाका कामगार, घरकामगार कुठे काम करतात व कुठे राहतात त्यांचा सर्व्ह करून रिपोर्ट लिहण्यास सांगितल्या जाते.तेव्हा सागर तायडे व सत्यशोधक कामगार संघटना यांचा संदर्भ दिल्या जातो. तेव्हा ते मला भेटतात मग ओळख होते, की टाटा गोरगरिबांसाठी काय करते.टाटा शिक्षण, आरोग्य आणि रोजगार यांचावर भर देते.योग्य शिक्षण मिळाले तर नोकरी, अज्ञान अंधश्रद्धा समस्या राहणार नाही. गंभीर आजार झाला तर टाटा हॉस्पिटल शिवाय पर्याय नाही. इतर आजारासाठी टाटा ट्रस्टच्या माध्यमातून मोठी आर्थिक मदत गोरगरिबांना नियमितपणे दिली जाते. गोरगरिबांच्या मुलांना इलेक्ट्रिकल, वायरमन, प्लंबर,फिटर,टर्नल हे कॉर्सचे मोफत प्रशिक्षण दिल्या जाते. जेणेकरून त्यांना गांवात कुठेही रोजगार उपलब्ध होऊ शकते. गोरगरिबांच्यासाठी बिर्ला,बाटा काय करते माहीत नाही. पण असंघटित गोरगरिबांना संघटित करणारी चळवळ जाहीर पणे विचारते.सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो ?.
देशातील इतर उद्योगपती आणि टाटा यांचा देशासाठी देशातील नागरिकांसाठी काय करते हे सांगितल्या जात नाही. ते जी लूटमार करीत आहेत त्यांचे उघड समर्थन प्रिंट,चॅनल मीडिया करते.अशा उद्योगपतीमुळे देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुभाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मग टाटा ग्रुपचे मालक,संचालक,सर्व सर्वा रतन टाटा यांच्या
जगभरात ९६ कंपन्या असूनही देशातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत त्यांचे नाव का नाही?.
आपल्या देशात अनेक तरूण उद्योजक जन्म घेत आहेत व हा आपल्या देशाच्या प्रगतीत हातभार लावणारा मोठ्ठा मुद्दा आहे. म्हणुनच तर आपल्या सरकारने मेक इन इंडियाचा नारा दिला. पण याच मेक इन इंडियाचा नारा आणखी एका व्यक्तीने स्वातंत्रपुर्व काळात देऊन आपल्या उद्योग जीवनाला आरंभ केला होता. ते थोर व्यक्तिमत्व म्हणजे जमशेदजी टाटा. अर्थातच टाटा ग्रुप चे संस्थापक. आज अनेक नवे उद्योजक टाटांचा आदर्श घेऊन आपल्या धंद्याला प्रारंभ करत असतात. पण देशासाठी,देशसेवा करण्यासाठी नाही तर नागरिकांचे आर्थिक शोषण करणे आमचा जन्म सिद्ध अधिकार आहे.त्यासाठी सर्व राजकीय सत्ताधारी आमचे गुलाम आहेत.हे दाखवून देण्यासाठी.
आता या टाटा ग्रुपची धुरा आहे रतन टाटा यांच्या हाती आहे. पण या टाटा ग्रुपच्या जगभरात इतक्या प्रमाणात उद्योग धंदे असुन सुध्दा ते भारतातल्या श्रीमंत लोकांच्या यादीत येत नाहीत. इतकंच नव्हे तर ते आपल्या देशातील अब्जाधीशांच्या यादीत सुध्दा येत नाहीत. तुम्ही म्हणाल हे कसं काय शक्य आहे?. इतका मोठ्ठा उद्योगपती श्रीमंत कसा नाही?. याला काही कारणं आहेत. त्यांचेच प्रतिस्पर्धी मुकेश अंबानी मात्र भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत आपले नाव अबाधित ठेऊन आहेत.
पण लक्षवेधी आणि प्रेरणादायी घटना ही की मुकेश अंबानी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असुन सुध्दा त्यांची रिलायंन्स ग्रुप ही कंपनी भारतातील पहिल्या क्रमांकाची कंपनी नाही. तर भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी टाटा सन्स ची TCS ही आहे. टाटा कंन्सलटंन्सी सर्वीस प्रायव्हेट लि. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्ठी कंपनी असुन सुध्दा त्याचे मालक रतन टाटा देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाही आहेत.
६० टक्के मालकी सेवाभावी संस्थांकडे आहे.
टाटा ग्रुपची स्थापना शंभर वर्षा पुर्वी जमशेदजी टाटा यांनी मुंबई येथे केली. त्यांचा मुळ उद्देश हा उद्योगातुन देशसेवा करने हा होता. ते आपल्या उद्योगातुन भारताला इतर देशांप्रमाणे प्रगती पदावर घेऊन जायला इच्छुक होते. त्यांच्यानंतर जे.आर.डी. टाटा यांनी या कंपनीचे मालकत्व स्वीकारलं व १९९१ ला ही जबाबदारी रतन टाटा यांनी स्वीकारली. टाटांच्या जगभरात एकुण ९६ कंपन्या असुन २६ कंपन्यांचे शेअर्स लोकांसाठी शेअर मार्केट मध्ये उपलब्ध आहेत. म्हणजेच सामान्य लोक या २६ कंपन्यांचे शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकतात आणि या सर्व कंपन्यांची मदर कंपनी “टाटा ॲन्ड सन्स्” ही यांचे कामकाज चालवते. पण या कंपनीचे रतन टाटा हे पुर्ण मालक नाहीत. म्हणजे रतन टाटा यांच्याकडे या कंपनीचे पुर्ण मालकी ह्क्क नाहीत. या कंपनीचे ६० टक्के मालकी हक्क विविध संस्थांकडे आहेत. त्यामुळे कंपनीच्या नफ्यातील ६० टक्के हिस्सा या सेवाभावी संस्थांना जातो. या संस्थांमध्ये जे.डी. टाटा ट्रस्ट, श्री रतनजी टाटा ट्रस्ट इत्यादी संस्था कार्यरत आहेत. ज्या विविध समाज उपयोगी कामांना हातभार लावतात. या सर्व संस्थांची मालकी रतन टाटा यांच्या कडेच आहे. कारण टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट देशसेवा आहे. "मेरे बाप का सपना सब हो अपना" ही नाही.
टाटा ग्रुपचा येवढा मोठ्ठा उद्योगाचा पसारा असुन सुध्दा रतन टाटा भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती नाहीत. पण जर या संस्थांचा हिस्सा नसता तर रतन टाटा हे केवळ भारतातील नव्हे तर श्रीमंतीच्या यादीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती असते. या वर त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणतात की आपल्या उद्योगातुन देशाची प्रगती करणे हेच टाटा ग्रुपचे मुख्य उद्दिष्ट राहिले आहे. आणि तेच आम्ही निभावतो आहे. याउलट अंबानींचे उद्दिष्ट भारतीय नागरिकांचे आर्थिक पिळवणूक करून फक्त गडगंज नफा कमावने आहे.तरी अंबानीच्या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात कोणी लिहत नाही,बोलत नाही. रतन टाटा यांना पत्रकारांनी मुकेश अंबानीं बाबत एक प्रश्न विचारला असता ते म्हणतात की “अंबानी हे बिझनेसमॅन आहेत पण मी एक साधा उद्योजक आहे.” त्यांच्या या वाक्यामुळे आपल्याला कळाले असेल की पैसा म्हणजे सर्व काही नाही. उद्योग उभा करायचा असेल तर प्रथम देशाचा विचार करूनच उद्योग सुरू करावा. याचे एक मुर्तीमंत उदाहरण म्हणजे रतनजी टाटा. ते पैशाने सर्वात श्रीमंत नसतीलही कदाचीत पण मनाने सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत रतन टाटा व टाटा ग्रुपचा क्रमांक सदैव पहिला राहिल आहे. मी अनेक उद्योगपती, बिल्डर च्या मुख्य कार्यालयात जातो,तिकडे मालकासाठी, एम डी साठी वेगळी लिप्ट असते,मालक येत असेल तर कोणीच कामगार कर्मचारी समोर दिसला नाही पाहिजे,टाटाच्या बॉम्ब हाऊस मुख्य कार्यालयात तसे नाही कामगार कर्मचारी अधिकारी रांगेत उभे राहतात,त्याच वेळी रतन टाटा आले तर ते ही रांगेत उभे राहतात.कॅन्टीन मध्ये सर्व बरोबर बसून जे कामगार कर्मचारी अधिकारी खातात तेच रतन टाटा खातात. अशा अनेक लक्षवेधी घटना आहेत. की त्यांची तुलना मालक,कामगार, गरीब श्रीमंत अशी होतांना दिसते, पण जमशेदजी टाटा ते रतन टाटा पर्यत उद्योगातुन देशसेवा करने हेच उद्धिष्ट राहिले आहे.इतरांना ते जमणं शक्य नाही. ते आता देश विकून कमिशन मिळवण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यासाठी तयार आहेत मग सांगा त्यांना उद्योगातुन देशसेवा करायची आहे काय?.त्यांना जाहीर पणे विचारले पाहिजे.सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?.
सागर रामभाऊ तायडे, भांडुप मुंबई ९९२०४०३८५९,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा