माणुसकीची मूल्य जपणारा कलेक्टर
जातीच्या नांवाने शिक्षणात सवलत घेऊन उच्चशिक्षित होऊन उच्चपदस्थ नोकरी मिळाल्यावर खालच्या जातीच्या लोकांना पूर्णपणे विसरणाऱ्यां ग्रामसेवक, तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांच्यासाठी प्रेरणा देणारी घटना नुकतीच घडली ती सोशल मीडियावर फिरते पण वृत्तपत्रांनी त्यांची दखल घेतली पाहिजे होती.कारण कष्टकरी गोरगरिबांना न्याय मिळवून देणाऱ्या व्यक्तीचे व अधिकारांचे फारसं कौतुक केलेलं काही लोकांना चालत नाही,गोरगरिबांना सारख्या तशील, जिल्हा कार्यालयात चकरा मारायला लावणे हा ज्यांना अधिकार दिला आहे असे समजणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही घटना दुःखद असेल पण गोरगरिबांना न्याय देणारी आहे.
अल्पसंख्याक समाजांचे अब्दुल अजीम (IAS अधिकारी) राज्य -तेलंगाना,जिल्हा-भुपलपल्ली,ठि काण-जिल्हा मुख्यालय कलेक्टरची गाडी कार्यालयाकडे येते,कलेक्टर साहेब गाडीतून उतरून ऑफिसमध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढतात.त्याच पायऱ्यावर एक म्हातारी हात जोडून बसलेली दिसते.कलेक्टर साहेब थांबतात, शिपायाला विचारतात.त्याच्याकडे काही माहिती नसते.
कलेक्टर स्वतःहा त्या म्हातारी शेजारी पायऱ्यावर बसतात.
आज्जीला विचारतात काय अडचण आहे,आज्जी सांगते दोन वर्षांपासूनची पेंशन भेटली नाही.साहेब कागदपत्र मागतात,आज्जी सगळे कागदपत्र साहेबांच्या हातात ठेवते.
आणि सोबत तिला झालेला सगळा त्रास विनंती वजा तक्रार स्वरूपात सांगते.
बाबू लोकांनी किती त्रास दिला किती चकरा मारल्या याचा सगळा लेखाजोखाच मांडती.कलेक्टर साहेब आज्जीचे सगळे कागदपत्र व्यवस्थित चेक करतात आणि आज्जीला सांगतात इथेच थांबा तुमचं काम आजच होईल.
कलेक्टर साहेब सबंधित अधिकाऱ्याला तात्काळ हजर राहण्याचे आदेश देतात.तो अधिकारी कलेक्टर साहेबांच्या जवळ त्या पायऱ्यांवर उपस्थित राहतो.त्याच पायऱ्यांवर त्या म्हातारीच्या दोन वर्षांपासूनचा रखडत असलेला पेंशनचा प्रश्न सुटतो.शेवटी कुठल्या पदावर कोण व्यक्ती आहे यापेक्षा त्या पदावरील ती व्यक्ती किती संवेदनशील आहे हे महत्वाचं आहे.लोकांच्या दुःखाची जाण असणाऱ्या, माणुसकीची मूल्य जपणाऱ्या कलेक्टर अब्दुल अजीम साहेबांना सलाम,देशातील बहुसंख्य ओबीसी, मागासवर्गीय अधिकारी या अब्दुल अजीम साहेबांकडून प्रेरणा घेतील ही अपेक्षा,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा