सोमवार, २३ मार्च, २०२०

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड​ चवदार तळे ​

शिवराय ते भिमराय समता मार्च महाड
​ चवदार तळे ​
छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर या दोन महामानवांना देव करून त्यांचा फक्त जयजयकार करण्याचे काम भटा ब्राम्हणांनी चालविले आहे.त्यात मराठा व महार बौद्ध समाज अलगत अडकत चालला आहे.या दोन्ही महापुरुषांच्या क्रांतिकारी विचारला आणि कार्यप्रणालीला मूठमाती देऊन जातीजातीत बंदिस्त करण्याचे काम वस्ती पातळीवर जोरात सुरू आहे. चवदार तळे महाडच्या सत्याग्रहातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्याला खांदा लावुन उभे राहिलेले सहकारी गंगाधरपंत सहस्त्रबुद्धे, अनंतराव विनायकराव चित्रे,सुरबा नाना टिपणीस, प्रधान बंधु, संभाजी तुकाराम गायकवाड, सुभेदार विश्राम सवादकर, आर बी मोरे,शिवराम जाधव,सी ना शिवतरकर, पा न राजभोज,एन टी जाधव हे मुख्य सहकारी होते.यांना ही त्यांच्या जाती बांधवांनी संघटनांनी बहिस्कृत केले होते.त्यावेळी दर्याखोऱ्यातील सर्व जाती पातीच्या मावळ्यांना एकत्र करून रायगड ते महाड चवदार सत्याग्रहाची किती झळ पोहचली होती.शिवरायांच्या रयतेच्या राज्यात जातीव्यवस्था तीव्र नव्हती.नंतरच्या काळात पेशव्यांनी शुद्रा अतिशूद्रांचे जिने हराम केले.त्यात सार्वजनिक ठिकाणी पिण्याचे पाणी मिळत नव्हते.म्हणूनच महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह झाला.हा चवदार तळ्याचा इतिहास नव्याने सांगण्याचे काम विचारांचा जागर व त्यांची अंमलबजावणी करण्यासाठी विविध संस्था संघटनांच्या किर्याशील कार्यकर्त्यानी संकल्प जाहीर केला आहे.१९ मार्च १९२७ ला महाड मध्ये काय घडले होते त्यात कोण कोण सहभागी जाते.त्यांची आठवण म्हणून २०१८ पासुन रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ व २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्यावर समताधिष्ठित बहुजन समाजासाठी सत्याग्रह केला. यंदा या सत्याग्रहाला ९३ वर्ष पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने दरवर्षा प्रमाणे या ही वर्षी लाखो लोक महाडला दर्शनासाठी येतात आणि जातात. यावर्षी कोरोना मुळे त्याला काही बंधने आली आहेत.लोक एकत्र येऊ शकणार नाहीत.
महाडचा रणसंग्राम हा केवळ पाण्यासाठी नसून तो मानवी मूलभूत हक्कांसाठी होता. बाबासाहेब त्या वेळी सांगत होते चवदार तळ्याचे पाणी प्यायल्याने आम्ही काही अमर होऊ अशातला भाग नाही. आज पावेतो चवदार तळ्याचे पाणी प्यायलो नव्हतो तर तुम्ही-आम्ही काही मेले नव्हतो. चवदार तळ्यावर जायांचे ते केवळ त्या तळ्याचे पाणी पिण्याकरीता जायांचे नाही. तर इतरां प्रमाणे आम्ही ही या समाजातील माणसे आहोत हे सिद्ध करण्या करीताच त्या तळ्यावर आपणास जावयाचे आहे. असे अंगावर शहारे आणणारे उद्धगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९ मार्च १९२७ रोजी चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रह आंदोलनाच्या वेळी काढले होते. त्याला २० मार्च २०१८ ला ९३ वर्षे पूर्ण होत आहेत.पण त्या महाड रण संग्राम सत्याग्रहचा  आंबेडकर अनुयायीनी कोणता आदर्श घेतला?. यांचे आत्मचिंतन आणि परीक्षण करण्याची तयारी आंबेडकरी चळवळीतील नेत्यात आणि अनुयायात नाही.म्हणूनच १९ मार्च २०१८ पासुन रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.२० मार्चला लाखो लोक दरवर्षी येतात, पण १९ मार्चला काय झाले होते यांची माहिती घेत नाही.आपणांस माहिती आहे काय?. १९ मार्च १९२७ रात्री पाचाड व महाडला काय घडले?.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिकारी विचाराचा जाहीरपणे खुन करणे हा आंबेडकर अनुयायीचा जन्म सिद्ध अधिकार आहे असेच ते वागतात.१४ एप्रिल १८९१ ते ०६ डिसेंबर १९५६ या काळात जे जे ऐतिहासिक कार्य डॉ भिमराव आंबेडकर यांच्या हातून घडले.त्या त्या दिवसाला आंबेडकरी अनुयायी लाखोच्या संख्येने एकत्र येऊन जाहीर पणे क्रांतिकारी विचाराचा त्याच ठिकाणी खून करून तो उत्सव म्हणुन खूप मोठ्या प्रमाणात साजरा करतात.कारण तो दिवस त्याच्या साठी खूप महत्वाचा असतो.कारण त्याच दिवसी गल्लीबोळातील नेत्याचा ८x१० चा बॅनर, होडींग आणि १०x १२ चा स्टेज बांधून जनतेला आपली शक्ती दाखविण्याची सुवर्ण संधी मानतात.ती गमवायला कोणीच तयार नाही.या दिवसाचे त्या काळाचे महत्व आज त्यांच्या साठी काय आहे. हे त्यांना कोणी विचारण्याचे, सांगण्याचे धाडस कुणी ही करू नये.आम्हाला आंबेडकर अनुयायी,भक्ता एवढे तुम्हाला त्याचे महत्व कळणार नाही. आमच्या रक्तात आंबेडकरी चळवळ असते.जन्मताच आम्ही आंबेडकरवादी असतो.२० मार्चला लाखो लोक महाडला जातात आणि काय करतात?.२० मार्च १९२७ चे गांभीर्य कोणत्या गटाच्या नेत्याकडे असते.किंवा नगरा नगरातील मंडळ ,महिला मंडळाकडे असतो?.मनसे, राष्ट्रवादी यांच्या दादा,भाऊ,नाना,काका यांच्या कडून बस घेऊन महाड चवदार तळ्याला जाऊन दर्शन,भोजन करणारे सत्याग्रहा चा अर्थ जाणतात काय?.त्यातुन त्यांनी गेल्या वीस पंचवीस वर्षातून कोणती प्रेरणा घेतली?.
महाराष्टातील खेड्या पाड्यातील गांवकुसा बाहेर राहणारी महार फक्त महार माणस महाडला पाणी पिण्यासाठी जाणार नव्हते.तरी बाबासाहेबांनी महाराना पिण्याचे पाणी खुले करण्यासाठी महाडचा सत्याग्रह केला. आणि महाडचे चवदार तळे अजरामर झाले.ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सत्याग्रहामुळे.महाडच्या चवदार तळ्याच्या ऐतिहासिक सत्याग्रहाला आज २० मार्च २०२० ला ९३ वर्ष पूर्ण होत आहेत.डॉ बाबासाहेब आंबेडकरानी आजच्याच दिवसी २० मार्च १९२७ साली चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि तळ्याचे पाणी सर्व मानवजाती साठी खुले केले.केवळ महार जाती साठी चवदार तळे नव्हते.डॉ बाबासाहेबाच्या क्रांतिकारी विचाराने चवदार तळाच्या पाण्याला हात लावताच आग लागली. ती महाड मध्ये सुरु झालेली आग राज्यातून देशभर पसरली.ते क्रांतिकारी वैचारिक संघटन कैशल्य आज कोणत्याही नेत्या कडे नाही.त्या ऐतिहासिक घटनेला ९३ वर्ष पूर्ण होत असले तरी नेहमी सारखे कार्यकार्माचे आयोजन महाडला सर्वच गटा कडून करण्यात येईल प्रत्येक कोणा कोपरयात एका एका गटाचा स्टेज असणारच, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी समताधिष्ठित समाजनिर्मिती करण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न केले. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी महाड मुक्कामी चवदार तळे सत्याग्रह आंदोलन केले.बाबासाहेबांनी म्हटल्या प्रमाणे हा केवळ पाणी प्राशन करण्याचा हेतू नाही तर समाजात सर्वच माणसे सारखी.अमुक वरच्या जातीचा-तमुक खालच्या जातीचा असा जातीभेद कशाला? बाबासाहेबांच्या मते, राजकीय, धार्मिक, सामाजिक व आर्थिक बाबतीत समतेचे तत्त्व लागू करणे म्हणजे समाजरचनेतील नीतीच्या पायावर उभे राहण्यासारखे आहे. परंतु घुबडाला सूर्यप्रकाश सहन होत नाही.त्याप्रमाणे सामाजिक विषमतेमुळे ज्यांना जाती श्रेष्ठता मिरवायला मिळते त्यांच्या जातीभेदावर कुऱ्हाड पडलेली पाहून साहजिकच त्यांचा संताप तीव्र होतो.आज ही खेड्या पाड्यातील वातावरण त्याची साक्ष देते.त्यातून आंबेडकरी चळवळीचे नेते अनुयायी काही शिकायला तयार नाहीत.
आज देशात जातीभेदाचा जो काही प्रकार अनुभवयास मिळत आहे. तो अत्यंत निंदनीय आणि संतापजनक आहे. जातीपातीच्या या विषारी झाडाला केवळ उच्चवर्णीयां कडूनच खतपाणी घातले जाते, असे म्हणणे चुकीचे ठरेल.जोपर्यंत एका समाजाकडून दुसऱ्या समाजात रोटी-बेटी व्यवहार होत नाही तोपर्यंत समताधिष्ठ समाजाची निर्मिती अशक्य आहे, असे बाबासाहेबांनी सांगितलेले असताना ही अनेक वेळा बौद्ध आणि नवबौद्ध समाजातील लोकांचा विवाहाच्या वेळी जातीलाच अग्रक्रम असतो. महाडच्या रणसंग्राम भूमीच्या संपूर्ण कोकणात मातृसंस्था आणि पंचायत यातील गावकी भावकी च्या कथा तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या तथागत बुद्धाच्या धम्माच्या चैकाटीत न सुटणाऱ्या आहेत. एकीकडे बाबासाहेबांचे स्वप्न साकार करायचे असा टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वेळ येताच जाती-पातीला खतपाणी घालायला लावणारी कामे करायची अशी दुटप्पी भूमिका बाबासाहेबांना मानणाऱ्या सुशिक्षित वर्गाने सोडून द्यायला हवी.त्या पेक्षा खेड्यातील अज्ञानी अशिक्षित असंघटीत माणूस आंबेडकरी चळवळी करिता लाख मोलाचा ठरतो. आंबेडकरी चळवळीला मानणाऱ्या समाजाने स्वतःचे आत्मपरिक्षण करून बाबासाहेबांनी केलेल्या महाडच्या रणसंग्रामतून योग्य बोध घ्यावा. 
आज महाड चवदार तळे म्हणजे पिकनिक झाली आहे.हे आंबेडकरी चळवळीतील जागृत अनुयायी यांनी लक्षात घेण्याची वेळ आली आहे, म्हणुन महाड रण संग्राम आजच्या तरुणांना आदर्श वाटत नाही,पिकनिक पॉईंट झाला आहे.​म्हणूनच शिवराय ते भिमराय समता मार्च १९ मार्च २०१८ पासुन रायगड पाचाड ते महाड चवदार तळे समता मार्च निघत आहे.मराठी साहित्य संमेलनात क्रांतिकारी विचार मांडून वैचारिक खळबळ निर्माण करणारे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख,माजी मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष सकाळ समूहाचे मुख्य संपादक उत्तम कांबळे, प्रा.अंजली मायदेव कर्वे इन्स्टिट्यूट पुणे,फारूक अहमद सुराज्य सेना प्रामुख्याने उपस्थित सुरुवात झाली होती.१९ मार्च १९२७ च्या सत्याग्रहात ज्यांनी सहभाग नोंदविला होता त्यांचे नातु पणतू पण सहभागी होते.त्यात उल्का महाजन,मधुकर गायकवाड, मिलिंद टिपणीस,श्रीप्रकाश अधिकारी, आरिफ करंबेळकर, सुभाष वारे, युवराज मोहिते,अनिता पगारे,ललित बाबर,सुरेश सावंत,अविनाश कदम,भूषण सिसोदे,नागेश जाधव,कालीदास रोटे प्रदिप शिंदे,चंद्रकांत गमरे,संजय जाधव महाड पंचायत समितीचे सदस्य आणि सागर तायडे असे विविध संस्था संघटनेचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.आणि एक नवी वैचारिक चर्चा घडविण्याचा प्रयत्न केला होता. दरवर्षी आपण सहभागी होऊ शकत नसलो तरी यावर व्यापक चर्चा घडवुन शिवराय ते भिमराय समता कशी प्रस्थापित करता येईल यांचा विचार करूया. कोणती ही दळणवळणाची साधन नसतांना ज्यांनी या सत्याग्रहात सहभाग घेऊन यशस्वी संघर्ष केला त्या सत्यगृहींना कोटी कोटी प्रणाम!!!.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा