सोमवार, २३ मार्च, २०२०

(जमशेटजी नसरवानजी टाटा ३ मार्च जयंतीनिमित्त) सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?

(जमशेटजी नसरवानजी टाटा ३ मार्च जयंतीनिमित्त)


सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
भारत हा कृषिप्रधान देश होता.बहुसंख्येने लोक हे शेतीवर अवलंबून होते,शेतकरी शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य कोण उपलब्ध करून देत होते. वखर,नांगर,खटारा,चाक,कुदळ, फावडा,टिकाव घमेल कोण बनवीत होते तर गांवातील लोहार,सुतार यांच्याकडे मुबलक प्रमाणात हे साहित्य उपलब्ध होत नव्हते.हे सर्व साहित्य उपलब्ध करुन देणारा देशातील पहिला उद्योगपती कोण आहे?.असे आजच्या सुशिक्षित पिढीला नांव विचारले तर सांगता येणार नाही. भारत माझा देश आहे सर्व भारतीय माझे बांधव आहेत.त्यांच्यासाठी लागणारे चांगल्या दर्जाचे साहित्य उपलब्ध करून देणे हे माझ्या कंपनीचे उद्धिष्ट आहे.असा म्हणणार भारतीय उद्योगपती आपणास माहिती आहे काय?.जमशेदजी नसरवानजी टाटा ३ मार्च १८३९ पारशी कुटुंबात यांचा जन्म झाला. तो देशातील पहिला उद्योगपती होता.तो पारशी होता म्हणून त्यांच्या कामाचा खऱ्या अर्थाने गौरव कुठेही होतांना दिसत नाही,तो जर ब्राम्हण असता तर गावागावात साप्ताहिक पारायणे झाली असती. ज्याप्रमाणे रामायण, महाभारत, पांडवप्रताप, कृष्णलीला, श्री समर्थ,यांच्या कथा आणि पारायणे सप्ताह गावागावात मोठ्या उत्साहात साजरा केले जातात. शेतकऱ्यांना शेतमजूरांना यांत कायमस्वरूपी गुंतवून ठेवले जाते.त्या जागी जमशेदजी नसरवानजी टाटा यांच्या देशभक्तीचे गुणगान झाले असते.तर देवा धर्माच्या देवळाच्या जागी, शाळा कॉलेज सुरू झाली असती.टाटा च्या कामाची दखल पाहिजे त्या प्रमाणात कुठे ही होतांना दिसत नाही.
बहुजन समाजाच्या एकूण चळवळीत विशेष आंबेडकरी चळवळीत लोकशाहीर वामन दादा कर्डक यांचे एक क्रांतिकारी गीत प्रत्येक कार्यकर्ताच्या तोंड पाठ असते.सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?. सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?. हे क्रांतिकारी गीत आहे. याबाबत शंकाच नाही, हे गीत लिहतांना कोणती परिस्थिती होती माहीती नाही. पण आज टाटा उद्योग समूहाची भारतीय नागरिकांच्यासाठी विशेष बहुजन समाजातील मागासवर्गीय जाती जमातीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी, कल्याणकारी योजना कुठे राबविण्यात येत आहेत त्यांची माहिती दिली जात नाही.म्हणूनच ३ मार्च ही जमशेदजी टाटा यांच्या जयंती दिनानिमित्त मी पाहिलेल्या गोष्टीवर लिहत आहे.
भारतात अनेक उद्योगपती आहेत.पण त्यांचा भारतीय म्हणून उदोउदो करावा असे त्यांचे कोणतेही ठोस कार्य नाही.केवळ पैसा कमविण्यासाठी वाटेल त्या मार्गाने भारतीय जनताचे आर्थिक शोषण करावे त्यासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांना भ्रष्ट मार्गाने अर्थपुरवठा करून सत्ताधारी बनवून सर्व सार्वजनिक उद्योग धंदे ताब्यात घ्यावे हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. पण टाटा समूहाचा एकूण इतिहास पाहिला तर भारतीय नागरिकांना प्रेरणा देणारा आहे.ब्रिटिश सरकारच्या विरोधात आंदोलनात भाग घेण्यासाठी भरपगारी सुट्टी देणारा उद्योगपती देशात शोधला तर सापडणार नाही.अज्ञान अंधश्रद्धा यांच्यात गुरफटलेल्या बहुसंख्य बहुजन मागासवर्गीय समाजाला वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देऊन कुशल मनुष्यबळ निर्माण करणारा उद्योग समूह म्हणून टाटा चे नांव गर्वाने सांगितले पाहिजे.शेतकरी शेतमजूर यांना शेतीच्या कामासाठी लागणारे साहित्य  वखर,नांगर,खटारा,चाक,कुदळ,फावडा,टिकाव घमेल व लोखंडी पत्रे स्वस्त आणि मस्त देणारा टाटा बँड सर्वांना माहिती आहे. लोक विश्वासाने सांगतात कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर टाटा कंपनीची घ्यावी उत्तम दर्जाची टिकावी असण्याची शंभर टक्के विश्वसनीय असते.
जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या जन्म ३ मार्च १८३९ ला गुजरात मधील नवसारी येथे झाला. भारतात त्यांनी अनेक उद्योग धंद्याची सुरवात केली.त्यांच्या प्रत्येक उद्योग धंद्याला एक ऐतिहासिक पार्श्वभूमी त्यांची माहिती आजच्या पिढीला निश्चितच प्रेरणादायी आहे.पण ती सांगितल्या जात नाही लिहल्या जात नाही. कारण विज्ञानवादी टाटा कंपनीच्या मुख्य कार्यकारी संचालक मंडळाच्या पदावर ब्राम्हणांचे वर्चस्व प्रस्थापित आहे.म्हणून जमशेटजी नसरवानजी टाटा च्या ३ मार्च जयंतीनिमित्त दोन शब्द बोलतांना गजानन महाराज प्रगट दिनाशी तुलना केली जाते. पण ऐतिहासिक पार्श्वभूमी सांगितल्या जात नाही. बंगळुर येथे टाटा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स यांची स्थापना करून तिच्या शाखा,मुंबई, हैदराबाद,पटना, चेन्नई, दिल्ली येथे आहेत.समाजसेवक म्हणून प्रसिद्ध असणारे अनेक समाजसेवक एम एस डब्लू (MSW) मास्टर ऑफ सोशल वर्क  टीस TISS मधून झाले आहेत. तेच केंद्र व राज्य सरकारच्या योजना राबविण्याचे एन जी ओ मार्फत कामे करतात. टाटा यांच्या जीवनात चार घटना घडल्या त्यामुळे त्यांनी चार ध्येय पूर्ण करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केला. भारतीयांना लोकांडाच्या वस्तू लागतात त्या निर्माण करण्यासाठी पोलाद कंपनी जमशेदपूर येथे काढली,साची गांवात टाटाचा लोखंड व पोलाद प्रकल्प उभारला स्थानिक पातळीवरील लोकांना मोठ्या प्रमाणात नोकऱ्या मिळाल्या.जमशेद पूर आज झारखंडमध्ये नामांकित मोठे शहर म्हणून ओळखले जाते, टाटा स्टील पूर्वीची टाटा आर्यन आणि स्टील कंपनी लिमिटेड ही आशियातील पहिली व भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी होती.तिच्या कोरस ग्रुपने दरवर्षी २.८कोटी टन स्टील उत्पादन केल्यामुळे ती जगातील पाचव्या क्रमांकाची स्टील कंपनी ठरली.एक जागतिक दर्जाची शिक्षण संस्था,बंगलोरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स विज्ञान आणि अभियांत्रिकी यामधील संशोधन व शिक्षण देण्यासाठी प्रख्यात भारतीय संस्था आहे.(TISS),  हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती कंपनी खपोली,भिरा, भिवपुरी, टाटा हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर सप्लाय कंपनी म्हणजे आताची टाटा पॉवर कंपनी आठ हजार मेगाव्हॉट पेक्षा जास्त क्षमतेची स्थापित क्षमतेची भारतातील सर्वात मोठी खाजगी वीज निर्मिती, पुरवठा,वितरण करणारी कंपनी आहे.गेट ऑफ इंडिया समोर जी ताजमहाल हॉटेल आहे तिचे ३ डिसेंबर १९०३ ला उद्घाटन झाले ती भारतातील पहिली स्वतःची वीज असणारी एकमेव हॉटेल आहे.एक अद्वितीय हॉटेल ते मुंबई सह प्रत्येक देशात आहे.  जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी १८५३ हिराबाई दबू यांच्या सोबत लग्न केले,१८५८ शिक्षण पूर्ण करून वडिलांच्या व्यवसाया मध्ये सहभागी झाले.१८६८ ला स्वतःची कंपनी स्थापन केली.१८७४ महाराणी मिलची स्थापना केली.१९०१ ला युरोप, अमेरिका येथे स्टील उत्पादन व्यवस्थापन यांचे शिक्षण घेण्यासाठी यात्रा केली,१९०३ ताज हॉटेलची स्थापना केली. शेवटी १९ मे १९०४ ला निधन झाले. जमशेटजी नसरवानजी टाटा संपूर्ण भारताचे उद्योग क्षेत्रातील प्रेरणास्रोत म्हणून ओळखल्या जातात.त्यांची टाटा ग्रुप ऑफ कंपनी भारताचीच नव्हे तर जगातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळखल्या जाते. त्या कंपनीचा मी एक कामगार कर्मचारी आहे नुकताच २५ वर्ष लॉग सर्व्हिस आवार्ड मला मिळाला आहे.जमशेटजी नसरवानजी टाटा यांच्या जयंतीनिमित्त सर्व कामगार कर्मचारी वर्गांना हार्दिक शुभेच्छा.
सागर रामभाऊ तायडे,भांडुप मुंबई- ९९२०४०३८५९,

(जमशेटजी नसरवानजी टाटा यांना अपमानास्पद वागणूक मिळाल्या मुळे त्यांनी काय काय केले आणि कसे केले हे पुढच्या भागात वाचा )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा