गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?


असंतुष्ट आत्मे जातात कुठे ?
भारतात विविध जाती धर्माची माणस राहतात.त्यांचे संसार खूप वेगळे आहेत.त्यात सर्वात मोठा धर्म म्हणजे हिंदू धर्म त्यात त्यांचे मनुस्मुर्ती ने लावलेले सर्व अलिखित कायदे भारतातील बहुसंख्य जाती जमातीचे लोक प्रामाणिकपणे पार पडतात.जन्मापासून मृत्यू पर्यंत सर्व धार्मिक विध्या ह्या ब्राम्हणा कडून करून घेतल्यास पाहिजे.ते हजारो वर्षापासून चालू असलेली परंपरा कोणीच नाकारण्याची हिंमत करीत नाही.तर अशा समाजात जेव्हा गोरगरीब माणसाला मग तो कोणत्याही जातीचा असो.त्याला ताठ मानेने जगण्याचा प्रयत्न केल्यास सामुदाहिक पणे मारल्या जाते.तेव्हा हि मारलेली माणस इतर लोकांच्या मानगुटीवर भूत बनून बसतात.मग त्यांचा बंदोबस्त मांत्रिक,बाबा,महाराज,किंवा ब्राम्हण भरपूर दक्षिणा घेऊन करतात.देशात प्रत्येक गांवात असा घटना घडतात.अन्याय अत्याचार करणाऱ्या समाजाची संख्या मोठी आहे.त्याही पेक्षा अन्याय अत्याचाराचे बळी जाणाऱ्या समाजाची संख्या देशभरात खूपच मोठी आहे.मग प्रवित्र हिंदू धर्माच्या संस्कारानुसार मागासवर्गीय जातीजमातीचे हे बळी जाणाऱ्या माणसाचे आत्मे असंतुष्ट असतात.मग ते भूत बनून शांत का बसतात?.हा प्रश्न मला खूप दिवसा पासून सतावित आहे.म्हणून आज हा लेखप्रपंच.देशात सर्वच गांवातील भूत हे सगळी कडे पिंपळाच्या किंवा वडाच्या ​
झाडाखाली का आढळत असतात.​भारतात काश्मिर ते कन्याकुमारी व गुजरात ते गोहाटी कोठे ही जा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालीच भुते असतात असे लोकं सांगतात, म्हणतात. भारतात वनस्पतींच्या लाखो प्रजाती आहेत मग
सगळी भुते , हडळी, प्रेतात्मे, पिशाच्चे पिंपळाच्याच झाडाखाली/वर का आढळत असावेत?.कारण हिंदू धर्म मानणाऱ्या मानवा करिता मनुस्मुर्ती कारणीभूत आहे.देशातील मानव जातीत जेवढ्या जाती पडतील तेवढ्या निर्माण करण्याचा प्रयत्न यांनी माणसा माणसात विषमता निर्माण करून ठेवली.आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी अज्ञान,अंधश्रद्धा,व भिती कायम माणसाच्या मनावर ठेवली.यालाच प्राचीनकाळी तथागत गौतम बुद्ध यांनी स्वत प्रयोग करून कायमची मूठमाती दिली.पण त्यातून आजही भारतातील बहुसंख्य लोक मुक्त नाहीत.
प्राचीन काळी गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली म्हणुन !
भारतात पिंपळाच्या झाडाचे महत्व प्रचंड वाढले.याला शास्त्रीय कारण असे की पिंपळ वातावरणात आँक्सिजन जास्त सोडतो.जुन्या काळी लोक योगविद्या,ध्यानधरनेसाठी पिंपळाखाली बसून अध्यात्मिक चर्चा करीत असत .आजही लोक गावात पारावर जमतात तेथे पिंपळाचेच झाड असते. एवढेच नव्हे तर बोधगया येथील २५०० वर्षापुर्वीचे झाड अजुनही लोकांनी जपुन ठेवले आहे. अशा रीतीने पिंपळाचे झाड बुद्धाच्या तत्वज्ञानाच्या प्रसाराचे ठिकाण बनले.याचा काही कर्मठ मनुवाद्यांनी याचा खुपच धसका घेतला आणि बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार 
रोखण्यासाठी,त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली भुत अस​तात अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली. म्हणुन आजही सामान्य माणसाचा असा समज असतो की पिंपळाच्या झाडाखाली भुते असतात.विज्ञान अज्ञान,अंधश्रद्धा,भिती दूर करते.हे  
लक्षात ठेवा
भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार "भारतरत्न' हा पिंपळाच्या पानावरच दिला जातो.*भारताचा राष्ट्रीय वृक्ष सुद्धा पिंपळ आहे.अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी राजघाटावर
"पिंपळ'वृक्षाचे रोपण केले.हे कशाचे लक्षण आहे​?.​
आत्मा आहे कि नाही या बाबत तथागत गौतम बुद्ध आणि ब्राम्हण पंडित यात झालेला संवाद लक्ष देऊन वाचा. बुध्दांना एका पंडितने विचारले की तथागत आपण लोकांना सांगता देव नाही, आत्मा नाही , स्वर्ग नाही, पुनर्जन्म नाही.बुध्द म्हणाले , तुम्हाला असे कुणी सांगितले की मी असे बोललो?.पंडित म्हणाला, नाही असे कुणी सांगितले नाही .मग मी असे बोललो असे सांगणारी व्यक्ती तुम्हाला माहित आहे का?.पंडीत म्हणाला नाही.मग असे मी कुणाला सांगताना तुम्ही ऐकले आहे का?.पंडित म्हणाला-  नाही. पण तथागत मी लोकांच्या चर्चेतून तसेच ऐकले आहे .तसे नसेल तर तुम्ही काय सांगता ?. तथागत म्हणाले मी माणसाला वास्तव सत्य स्वीकारायला सांगतो .पंडित म्हणाला मला सोपे करुन सांगा .मग तथागत म्हणाले माणसाला पाच बाह्य ज्ञानेंद्रीय आहेत . ज्या द्वारे माणूस सत्य जाणतो १)डोळे २)कान ३)नाक ४)जीभ आणि ५)त्वचा. माणूस डोळ्यान बघतो,कानान आवाज ऐकतो,नाकान वास घेतो,जीभेन चव घेतो,आणि त्वचेन स्पर्श जाणतो .या पंच ज्ञानेंद्रीयांपैकी कधीकधी दोन किंवा तीन ज्ञानेंद्रीयांचा वापर करुन माणूस सत्य जाणतो.पंडित विचारतो - कसे ?.पाणी डोळ्याने दिसते पण ते थंड की गरम हे बघायला त्वचेची मदत घ्यावी लागते . गोड की खारट कळायला जीभेची मदत घ्यायला लागते .पंडित म्हणाला बरोबर. पण मग देव असण्याचा आणि नसण्याचा संबंध काय ?.तथागत म्हणाले, तुम्ही हवा पाहू शकता ?.पंडित म्हणाला नाही.याचा अर्थ हवा नाही असा होतो का ?.पंडित म्हणाला नाही .हवा दिसत नसली तरी ती आहे .कारण तिच आस्तीत्व नाकारता येत नाही ,आपण श्वासोच्छवास करताना हवाच आत-बाहेर सोडतो. वा-याची झुळूक आली की आपल्याला जाणवते. झाड, पान हवेन हलतात ते दिसत.तथागत म्हणाले, आता मला सांगा देव तुम्हाला पंच ज्ञानेंद्रीयांनी जाणवतो का ?.पंडित म्हणाले नाही .तुम्ही प्रत्यक्ष देव पाहिला आहे ?.पंडित- नाही.तुमच्या आईवडलानी पाहिल्याच सांगितलंय ?​.​पंडित- नाही.मग पूर्वजांन पैकी कुणी पाहिल्याच ऐकलत ?. पंडित -नाही.मग तथागत म्हणाले, आजवर कुणीच पाहिल नाही.आपल्या कुठल्याच ज्ञानेंद्रीयांनी जे जाणता येत नाही ते सत्य नाही. त्याला गृहीत धरायच नाही.त्याचा उपयोग नाही.ज्ञानी पंडिताला ब-या पैकी पटायला लागल होत, तरी त्यान प्रश्न विचारला.तथागत ठिक आहे, पण मग आपण जीवंत आहोत याचा अर्थ आपल्यात आत्मा आहे. हे तरी तुम्ही मान्य कराल की नाही ?.तथागत पंडिताला म्हणाले, तुम्ही सांगता आत्मा अमर आहे, तो कधीच मरत नाही .पंडित म्हणाला, हो. बरोबर आहे.मग तथागत म्हणाले, मला सांगा माणूस मरतो म्हणजे काय ?.पंडित म्हणाला, आत्मा त्या माणसातून निघून गेला की माणूस मरतो .मग मला सांगा आत्मा शरीर सोडतो की शरीर आत्मा सोडतो ?पंडित -आत्मा शरीर सोडतो.का सोडतो आत्मा शरीर ?कंटाळा आला म्हणून ?.पंडित-माणसाच आयुष्य संपल्यावर. तथागत म्हणाले, तस असेल तर सगळी माणस शंभर वर्ष जगली पाहिजे .अपघात , आजार झाल्यावरही उपचार न करता जगली पाहिजे ,पंडितजी -तथागत बरोबर आहे तुमच .पण माणसात जीव आहे त्याला काय म्हणाल ?....तथागत म्हणाले तुम्ही पणती पेटवता , त्यात एक भांड ,भांड्यात तेल, तेलात वात असते. ही वात पेटवायला अग्नी देता .बरोबर ?.पंडित - बरोबर .मग मला सांगा वात कधी विझते?.पंडित -तेल संपत तेंव्हा .तथागत -आणखी ?.पंडित -तेल आहे पण वात संपते तेंव्हा.तथागत-आणखी ?.पंडितजी काहीच बोलले नाहीत.तेंव्हा तथागत म्हणाले पाणी पडले , वारा आला ,पणतीच फुटली तर पणती विझु शकते. मानव देह ही एक पणती समजा .आणि जीव म्हणजे आग (उर्जा ).सजीवाचा देह चार तत्वांनी बनलेला आहे .१) पृथ्वी -घनरुप पदार्थ (माती) २) आप -द्रवरुप पदार्थ (पाणी ,स्नीग्ध तेल ) ३) वायु - वारा.४) तेज -उर्जा, उष्णता या चार पैकी एक पदार्थ वेगळा केला की माणूस मरतो . उर्जा बनणे थांबते .यालाच म्हणतात माणूस मरणे .आणि सजीव माणूस मेल्या नंतरचा जो आत्मा आहे, तुम्ही म्हणता तो देवा सारखाच अस्तीत्वहीन आहे .देव आहे की नाही, आत्मा आहे की नाही या निरर्थक गोष्टीसाठी धम्म वेळ वाया घालवीत नाही .धम्म माणूस जन्मल्यापासून मरे पर्यंत माणसाने कसे जगावे याचे मार्गदर्शन करतो. काय कर्म केल्यावर काय परिणाम होतात ते सांगतो. धम्म जीवंतपणी स्वर्ग उपभोगण्याची माणसाला संधी उपलब्ध करतो आणि जीवंतपणी याच जन्मात अज्ञानामुळ नरक भोगावा लागू नये म्हणून मार्गदर्शन करतो.अंधारातून प्रकाशाकडे जाणे म्हणजे धम्म.जगातील कुठल्याही मानवाला मार्गदर्शक आहे.संतुष्ट असंतुष्ट आत्मे मेलेल्या माणसात नसतात तर जिवंत माणसात असतात त्यामुळेच ते नितीमतेने न वागता अधर्माने वागून मानव जातीत समाजात तणाव निर्माण करतात.त्यातुन मुक्त व्हा त्यातच सर्वांचे मंगल आहे.
सागर रामभाऊ तायडे.भांडुप,मुबई-९९२०४०३८५९.

राजकारणातील वेगळा विदर्भ ?.


रडा हमेशा ऋतु नुसार रंग बदलतो असे म्हणतात,पण त्यांचे विश्व रिकार्ड भारतातील राजकीय नेत्यांनी तोडले, विचार सरणी कोणती ही असो राजकीय नेता हा नेहमी सरडया सारखा रंग बदलनारा असतो, नव्हे सत्ता मिलविण्या करीता आणि टिकविण्या करीता त्याला आपली जात,धर्म,विचार आदर्श बाजूला ठेवून प्रसंगानिरूप त्याला वागावे लागते. यांचे उदाहरण आपण नेहमी ऐंकतो पण काल महाराष्ट्राच्या विधानसभेत पाहण्यास मिळाले.राज्याचे मुख्यमंत्री व विदर्भाच्या मागणीचे खंदे समर्थक मा. देवेंद्र फडणवीस यांनी आज ' विदर्भ निर्मितीचा कोणत्याही प्रस्तावाचा प्रश्नच नसुन अखंड महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण वचनबद्ध असल्याचे जे  विधान केले आहे हे अत्यंत दुर्दैवी असुन त्यांनी विदर्भातील जनतेचा विश्वासघात केला आहे. यानिमित्ताने सत्ता माणसाला कशी लाचार व हतबल करते त्याचे हे ताजे उदाहरण आहे. 
विदर्भ आंदोलनात संयुक्त दौरे करतांना प्रत्येक सभेत " विदर्भाचा विकास आता पॅकेज जाहीर करून किंवा विदर्भाच्या आमदाराला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करून होणार नाही तर विदर्भाचे स्वतंत्र राज्य करूनच होईल " असे छातीठोकपणे सांगणारा हा त्यावेळचा तडपदा र विरोधी नेता देवेंद्र फडणवीस संधी मिळताच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोकळा झाला. खुप दिवसांनी विदर्भातील नेत्याला मुख्यमंत्री पद मिळाले व आता हा माणूस विदर्भाला न्याय मिळवून देईल या आशेवर वैदर्भीय लोकांनी गेली 20 महिने वाट पाहिली पण आज "विदर्भ निर्माण करणे केन्द्र सरकारच्या अखत्यारीत आहे."राज्याचा तो अधिकार नाही " असे विधान करून आपण काही वेगळे राजकीय नेते नाही. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले, त्यामुळे विदर्भातील तमाम नागरिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. 
आमदार देवेन्द्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेते असतांना, एक तडफदार, स्वच्छ चारित्र्याचे ,नितिमत्तेचे पुरस्कार करणारे, विषयाची जाण असणारे, बांधिलकी म्हणुन अभ्यास असलेले एक सुजाण नेता म्हणुन विदर्भवाशियाच्या मनात स्थान होते,त्यांचे जे स्वच्छ चित्र होते, त्यांच्या वर जो विश्वास होता, त्यालाच आता तडा गेला आहे.सेनापतीच जेव्हा शत्रुशी हातमिळवणी करतो तेव्हा स्वाभिमानी जनतेवर जसे आभाळ कोसळते तशी वैदर्भीय जनतेची अवस्था झाली आहे. 
भाजपाने 1996 मधेच विदर्भ राज्याचा भुवनेश्वर येथील अधिवेशनात स्पष्ट ठराव केला होता, पण 2000 मधे मागणी नव्हती अशा छत्तीसगड सह तिन राज्यांची निर्मिती केली. पण विदर्भ निर्माण केला नाही कारण दिले की शिवसेनेचा विरोध आहे व ते आमचे सहयोगी आहेत. भाजपाने विदर्भ राज्याची निर्मिती करावी या मागणी साठी सातत्याने पाठपुरावा केला, आंदोलने केलीत. कॉंगेसचा वाटेल तसा उद्धार केला. आम्हाला एकहाती सत्ता द्या आम्हीच विदर्भाची निर्मिती करू त्यात कुठेही बेईमानी होणार नाही असे म्हणणारे आता एकदम घुमजाव करीत आहेत त्याचे दुखः वाटते. नितीन गडकरी साहेबां विषयी काय बोलावे तेच समजत नाही. " मी मर्दाचा बच्चा आहे, शब्दांचा पक्का आहे " असे बेंबीच्या देठापासून गर्जना करणारा मर्द तर आता विदर्भाचे नावही काढत नाही. 
राज्याची निर्मिती करणे हा केन्द्र सरकारचा अधिकार आहे हे फडणविसांना यापूर्वी माहित नव्हते काय ?.भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना विदर्भाची निर्मिती करणे हा आमच्या घोषणापत्रात आहे व त्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेच  सर्वत्र सांगत फिरलेत.मग मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यावेळी विदर्भा विषयीची भुमिका कां स्पष्ट केली नाही?.यानिमित्ताने मा. देवेंद्र फडणवीस विदर्भ व महाराष्ट्रातील जनतेला मुर्ख बनवित असुन एकतर त्यांनी केन्द्रीय नेतृत्वाकडे विदर्भ राज्याची निर्मिती करावी म्हणून मागणी करावी किंवा विदर्भाचा मुद्दा आता शक्य नाही असे जाहिर करावे.पण विदर्भातील जनतेची फसवणूक करू नये अशी साधारण अपेक्षा आहे. 
"पावर के लिए कितना बदल गया इंसान "  अशी देवेंद्र फडणवीस यांची गत झाली आहे. " बेच दे अपनी जुंबा ,अपनी अना, अपना जमिर ,फिर तेरे हाथोमे सोनेके निवाले होंगे फिर ना कोई गुरूद्वारा, कोई मस्जिद ना कोई शिवाले होंगे सिर्फ तु होंगा और तेरे चाहनेवाले होंगे " असे देवेंद्र साठीच एका शायर ने हा शेर लिहीला असावा असे वाटते. 
जनता भोळी जरूर असते पण खुळी नक्कीच नसते. जनता दरबारात सर्व माफ असते पण विश्वासघात कधीही सहन केल्या जात नाही आणि त्याची प्रचिती भाजपाला नक्की येईल .
विदर्भ हा कायमच चर्चेचा विषय आहे.काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले.आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) - 9.2% आहे, आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2%.
झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले. आता झारखंड चा विकास दर 11.1% आहे, आणि बिहार चा फक्त 4.7%
उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले. आता उत्तराखंड चा विकास दर 8.8% आहे, आणि उत्तरप्रदेश चा 4.6% .तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8% आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5%.तर आता तुम्हीच सांगा कि, विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% वीज तयार होते.विदर्भात महाराष्ट्राच्या 70% खनिज आहे.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% कापूस उत्पादन होते.विदर्भात तर 80% जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे.विदर्भात तर 54% वनसंपदा आहे.विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन, कापूस, डाळ, तूर, तांदूळ, संत्री महाराष्ट्राला देतो.विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे.विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे.विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे.तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल.
कृपया तुम्हीच विचार करा.आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे.फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता.राजकीय फायद्या करीता वेळो वेळी विदर्भातील नेत्यांना पुढे करून म्हणून राजकारण केले.म्हणुन विदर्भातील जनतेने आता पक्षा वर विश्वास न ठेवता. उमेदवारा वर विश्वास ठेऊन मतदान करावे आणि गांवागांवात जनजागृती करने आवश्यक आहे. विदर्भ वेगळा झाला पाहिजे हा फ़क्त राजकीय लोकांचा विषय असता कामा नये, हा सर्वांचा विषय झाला पाहिजे आणि हा विषय सर्वाना पाठवा आणि विदर्भा विषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या, आणि अभिमानाने म्हणा जय विदर्भ.
विदर्भाला विरोध करणारे मुंबई ठाण्यात राहून विरोध करतात,त्यांना विदर्भातील शेतकरी शेतमजुर आणि असंघटित कामगारांची काय परिस्थिति आहे हे कसे समजेल?.विदर्भ राज्य झाल्यास यांचे काय नुकसान होईल.यांना आज जो मुक्तपणे कामगार मजुर उपलब्ध होतो तो होणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाची आज ज्या पद्धतने लूटमार करण्याची दादागिरी आहे ती बंद होईल,म्हणुन ते इंडियात राहून विरोध करतात तो मोडून काढण्या करीता जय भवानी!. जय शिवाजी!!. सोबत जय विदर्भ!!!. म्हणावे लागेल.तर विदर्भा ला न्याय मिळेल करीता राजकारणातील वेगळा विदर्भ दिसेल.(संदर्भ:- वृतपत्रातील आणि सोशल मिडिया वरील अनेक मान्यवराच्या लेखाचे हे संकलन आहे)
सागर रामभाऊ तायडे,भांडुप,मुंबई 9920403859,

बुधवार, २२ जून, २०१६

भूमाता किं भारतमाता ?.


पल्या देशात एक म्हण खूप लोकप्रिय आहे,प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री चा हात असतो,आहे?.तसाच देशात काँग्रेसचे पानिपत होण्यास एका स्त्री चा हात आहे,आणि भाजपा प्रणित केंद्रात सत्ता पालट करण्यास एका पेक्षा एक सरस स्त्रीयांचा हात आहे.सुषमा,उमा,जया,हेमा स्मुर्ती,आणि भूमाता ते भारतमाता देशातील सर्वच पुरुषांना प्रेरणा देणाऱ्या आहेत,त्यांना मनुस्मृती नुसार कोणत्याही देवाच्या देवीच्या मंदिरात प्रवेश नसला तरी देशाच्या सर्वोच्य संसद भवनात त्यांना प्रवेश भेटून समान अधिकार सिद्ध करण्या करीता लढण्याची गर्जना करण्याची सुवर्णसंधी भारतीय संविधाना मुळे मिळाली.त्याचे क्रेडिट ते आज कोणालाही देत असल्या तरी सत्य जे आहे ते सत्य मेव जयतेच आहे.
संसद भवनात भारतमाताच्या घोषणांनी सुरवात होताच ती दिल्ली ते गल्ली बोळात पोहचली त्याच पद्धत ने राज्यात भूमाता अतुप्त तुप्तीच्या अंगात घुसली आणि तिने अनेक विक्रम मोडले गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिने शनिचा चौथरा ओलांडला अंबेच्या गाभारयातही तिने प्रवेश केला, त्याबद्दल तिचे कौतुक ही झाले.पण अतुप्ती सारख्या तुप्तीला चौथरा ओलांडायचा आहे तो स्त्रीयांच्या मनात वर्षानुवर्षे घट्ट रूतून बसलेल्या रूढीपरंपरांचा आणि पापपुण्याच्या भ्रामक कल्पनांचा.खरतर तथाकथित धर्माचा ठेका घेऊन देवावर अधिकार सांगणाऱ्यांना कदाचित या गोष्टीचा विसर पडला असेल की ज्या देवांना तू चालत नाहीस त्यांचा जन्म तुप्ती सारख्य स्त्रीयांच्या उदरातूनच झालाय. पण तिची लढाई समाजाशी नाही.सरकारशीही नाही.पुरूषांशी तर बिलकूल नाही.कारण तिच्या शिक्षणाची मुहुर्तमेढ ज्यांनी रोवली.त्या ज्योति सावित्री, विधवा विवाह आणि संतती नियमनाची सुरूवात करणारे महर्षि आणि रघुनाथ कर्वे, केशवपन आणि सती सारख्या अनिष्ट प्रथांविरोधात लढणारे राजा राम मोहन राॅय या आणि अशा कित्येक पुरूषांनी समाजाच्या विरोधात जाऊन तिच्या आयुष्याला अर्थ दिलाय.माणूस म्हणून तुला ओळख दिलीय.म्हणूनच तिची खरी लढाई फक्त आणि फक्त स्वतःशी आहे.
तू कवटाळून बसलेल्या खोटया कर्मकांडाशी आहे.कारण, पोटच्या तीन पोरांनी उपाशी ठेवल असतानाही 'एक मुलगा पाहिजेच' घराचा वारसदार म्हणून मुलगा पाहिजेच असा उपदेश देणारी तुच आहेस.बाहेर स्त्री समानतेच्या गप्पा मारून घरी मुलगाच हवा असा अट्टाहास धरणारीही तूच आहेस.त्याकरिता लहानपणा पासूनच उपासतापास,धर्माच्या रीतीरीवाजाला मुलीला आईवडिलाच्या बंधनात राहावे लागते.लग्न झाल्यावर पती सासूसासरे त्यांचं शब्दा बाहेर जाण्याची तिला परवानगी नाही.तिला मतमांडण्याचा अधिकारच नाही,तिच्या स्वाभिमानाला किंमतच नाही.जन्मा पासून मृत्यू पर्यंत तिला शारीरिकदृष्ट्या अपवित्रच मानले जाते. 
गणपती-नवरात्रीला स्वतःला अपवित्र समजून पाळीच्या गोळया घेणारीही तूच आहेस.पाळी आल्यावर घरातील कोणत्या वस्तूला हात न लावणारी,कपडा,जमीनला स्पर्श होऊ नये म्हणून गोणपाटवर बसणारी झोपणारी तूच आहे.लग्न न होणार्‍या, मूल न होणार्‍या आणि विधवा झालेल्या स्त्रियांना जगणं नकोसं करणारीही तूच आहेस.आणि म्हणून मंदीर प्रवेशाला विरोध करणारयां मध्ये ही तूच आहेस.कारण तूच स्त्री आहेस.कोणता फरक पडणार आहे मंदिरातील गाभाऱ्यात जाऊन त्यातून स्रीयातील अज्ञान अंधश्रद्धा कमी होऊल कि वाढेल?. 
अतुप्त तुप्ती, तुला बदलाव लागेल.एकवेळ देवीची खणानारळाने ओटी नाही भरलीस तरी चालेल,पण रस्त्याकडेला अर्धवट कपडयात निजलेल्या असहाय्य स्त्रीच शरीर तुला झाकावं लागेल.देवासमोर पंचपक्वांनाची आरास नाही केलीस तरी चालेल पण निराधार आणि गरीब मुलींच्या तोंडात अन्नाचा घास तुला भरवावा लागेल.अन्यायाने गांजलेल्या लेकीबालीना मदतीचा हात द्यावा लागेल.वासनांध समाजाची तुला भिती वाटते ना, मग तुझ्या मुलाच्या वासनेची शिकार कोणी होणार नाही याची जबाबदारी तुला घ्यावी लागेल.
'अशीच आमुची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही झालो असतो सुंदर रूपवान' असे म्हणून परस्त्रीकडे मातेसमान पहायला लावणारी शिवाजी महाराजांची दृष्टी म्हणजे दुसर तिसर काही नव्हत गं! ती जिजाऊंच्या संस्करांची ताकद होती, ही ताकद तुला तुझ्या 'मुलाच्या नजरेत आणावी लागेल.' मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केलास, म्हणून काहीच बदल होणार नाही,त्यापेक्षा तुझ्या मनाच्या गाभाऱ्यात जाऊन तुझ्यातल्या स्त्रीशक्तीच दर्शन तुला दाखवावे लागेल.तुझी बुध्दीमत्ता, विद्वत्ता, तुझं वात्सल्य, तुझा कणखरपणा, तुझी सहनशीलता, सृजनशीलता यांचा साक्षात्कार तुला झाला तरच बदल होईल.स्त्री शक्ती त्याग, समर्पण, नवनिर्मितीची क्षमता साऱ्या निसर्गशक्ती तुझा समोर हात जोडून उभ्या आहेत.तुझ्याशिवाय धर्मच काय सृष्टीच्या निर्मितीची कल्पना सुध्दा करता येत नाही.तुझ्या श्रध्देला कोणीच नाकारत नाही.अतुप्ती तुप्ती एवढच सांगणं आहे; श्रध्दा ठेवायची ती स्त्रित्वावर , जागर करायचा तो स्त्रिशक्तीचा, संहार करायचा तर स्वतःला अपवित्र, दुय्यम,समजणार्‍या स्वतःमधील दुष्ट प्रवृत्तींचा,आणि धर्म पाळायचा तो माणुसकीचा. मंदिर प्रवेश नव्हता तरी माॅसाहेब जिजाऊ 'राष्ट्रमाता' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आहिल्या बाई होळकर एक कुशल राज्य प्रशासक झाल्या.मंदिर प्रवेश नसला तरी सावित्रीबाई 'क्रांतीज्योती' शिक्षिका, मुख्याध्यापिका झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लक्ष्मीबाई झीलकरी झाशीच्या 'राणी' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी लतादीदी हिंदुस्थानच्या 'गानकोकिळा' झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी आनंदीबाई जोशी पहिल्या महिला डाॅक्टर झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरीही कल्पना चावला पहिल्या महिला अंतराळवीर झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी इंदिरा गांधी देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.मंदिर प्रवेश नव्हता तरी ममता,जयललिता,आनंदीबेन आणि मायावती मुख्यमंत्री झाल्या,मंदिर प्रवेश नव्हता तरीही प्रतिभाताई देशाच्या पहिल्या महिला 'राष्ट्रपती' झाल्या.
अतुप्ती तृप्ती तुम्हाला मंदिर प्रवेश मिळालायं.पण मासिक पाळीतून,बाळंतपणातून होणाऱ्या विटाळाला घराघरातुन कसे घालविणार ?.हे मोठे अज्ञान अंधश्रद्धा धर्ममातन्डानी स्रियांबाबत माणसाच्या मेंदूवर कोरून ठेवले ते कसे घालविणार?. निदान तुम्ही 'स्त्रीयापासून स्त्रीयांना होणाऱ्या मानसिक त्रासाला कसे मुक्त कराल?.कारण या देशात जिवंत स्त्रीयांची किंमत मेल्यावर भूमाता किंवा भारतमाता म्हणून केल्या जाते.ते मान्य नसणाऱ्यांना देशद्रोही मग अतुप्ती तुप्ती तुमचा संघर्ष कोणा बरोबर असायला पाहिजे होता,एकूणच सर्वच स्रियांनी याचा विचार मोबाईल कॉम्पुटर,नेटच्या जमान्यात केला पाहिजे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजदूर युनियन कुठे आहे?.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजदूर युनियन कुठे आहे?.


भारतात कामगार,कर्मचारी यांच्यावर होणाऱ्या सामाजिक,आर्थिक अन्याय-अत्याचाराला वाचा फोडनु त्यांना अधिकाधिक आर्थिक लाभ मिळवून देण्याकरीता आणि त्यांचे जीवनस्तर उंचविण्यासाठी कामगार चळवळ ( ट्रेड युनियन मुव्हमेंट ) औधोगिक करणाच्या कालखंडात म्हणजे अठराव्या शतकात जगभरात निर्माण झाली. भारतात या असंघटीत कष्टकरी कामगार चळवळीची सुरवात महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारांच्या माध्यमातून रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांनी १८८४ साली केली. मुंबईतील असंघटीत गिरणी कामगारांची संघटना "बॉम्बे मिल हंड्स असोसिएशन " ही भारतातील पहिली कामगार संघटना आहे. त्यांनी उभारलेल्या कामगार आंदोलनामुळे भारतीय कामगारांना साप्ताहिक भरपगारी सुटी १० जून १८९० पासून मिळण्यास सुरु झाली.त्यांच्या क्रांतिकारी संघर्षामुळे भारतातील कामगार कर्मचारी यांचे कामाचे तास कमी झाले.स्त्रीयांना रात्रपाळीत काम करण्यास बंदी आली,बालकामगारांना शिक्षणाची संधी मिळाली.कामगारांना श्रमाचे मूल्य व सामाजिक सुरक्षितता मिळाली.म्हणूनच रावबहादूर नारायण मेंघाजी लोखंडे यांना भारतीय कामगार चळवळीचे खऱ्या अर्थाने जनक आहेत.पण जगातील कामगारांनो एक व्हा म्हणणारे तसे मानत नाही.
  जगातील कामगारानो एक व्हा असे सांगणारे तेव्हा कुठे होते?. जागतिक कामगार संस्था (ILO ) १९१९ ला स्थापन झाल्या नंतर जगभरातील कामगार चळवळी मध्ये राजकीय जाणीवा निर्माण झाल्या.त्यामुळेच कॉंग्रेसने १९२० ला ऑल इंडिया ट्रेड युनियन कॉंग्रेस (AITUC) ची स्थापना केली.त्यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या समाज क्रांतीकारी विचाराना दूर सारून असंघटीत कष्टकरी गोरगरीब कामगारांच्या सामाजिक,आर्थिक शोषणाला तिरांजली दिली.कॉंग्रेस हे भांडवलदारांचे समर्थक असल्यामुळे देशातील सर्व कामगारांना त्यांनी गुलाम बनविले.त्यामुळे देशात आज बहुसंख्य कामगार कर्मचारी देशोधडीला लागले.ज्या कामगार कर्मचारयांना समता,स्वतंत्रता,आणि बंधुभावाच्या न्यायहक्काची जी आधारशिला आवश्यक होती,ती पद्धतशीरपणे बाजूला सारल्या गेली.त्याचा परिणाम देशातील तमाम असंघटीत कष्टकरी श्रमिक,शेतकरी, शेतमजूर, कामगार,कर्मचारी यांच्या शोषणावर ठोस उपाय आजच्या प्रस्थापित कामगार संघटना,ट्रेड युनियन आणि त्यांच्या राष्ट्रीय पातळीवरील महासंघ,फेडरेशन करू शकल्या नाहीत.त्यातून मार्ग काढण्याची इच्छा त्यांना नाही.कारण त्या ब्राम्हणशाही व भांडवलशाही चे समर्थक आहेत.
 महात्मा ज्योतीराव फुले यांच्या सत्यशोधक विचारधारेचा धागा पकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित,शोषित,पिडीत,वंचित समाजातील सर्व मजूर,शेतमजूर,कामगार कर्मचार्यांना संघटीत होण्यास सांगितले होते.१९३४ ला त्यांनी मुंबईतील सफाई कामगारांना संघटीत करून त्यांची संघटना बांधली.१९३६ ला त्यांनी बृहन्मुंबई पालिकेची निवडणूक लढविली १७ उमेदवार उभे करून 13 उमेदवार सफाई कामगारांच्या बळावर निवडून आणले.असंघटीत कामगार संघटित होऊन राजकारणात उतरले तर राजकीय पक्षाचे समीकरण बदलू शकतात.हे त्यांनी दाखवुन दिले.त्यांचा तो आदर्श आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी आणि कामगारांनी घेतला नाही,
१२ व १३ फेबुवारी १९३८ रोजी मनमाड येथील अस्पुश्य रेल्वे गंगमन कामगार, कर्मचारी यांच्या परिषेद मध्ये बाबासाहेब आंबेडकर यांनी ठाम पणे सांगितले होते की भारतीय कामगारांचे ब्राम्हणशाही व भांडवलशाही हे दोन शत्रू आहेत हे कायम लक्षात ठेवा.त्या करिता दलित,शोषित, पिडीत,वंचित समाजातील सर्व असंघटीत मजूर,शेतमजूर,कामगार कर्मचाऱ्यानी स्वताच्या कामगार संघटना विनाविलंब निर्माण करण्याचे सांगितले होते,त्यांच्या आदेशाचे आज पर्यंत पालन आंबेडकर चळवळीतील नेत्यांनी, बहुसंख्य मागासवर्गीय समाजातील कामगारांनी केलेल नाही. कामगाराच्या हितासाठी तुम्ही संघटन उभारले पाहिजे. यात काही किंतु नाही. परंतु तेवढेच पुरेसे नाही. तुम्ही राष्ट्रीय उद्दिष्टासाठी संघटीत झाले पाहिजे. कामगार संघटनानी राजकारणात शिरलेच पाहिजे. कारण शासन सत्तेवाचून कामगारांच्या हिताचे स्वरक्षण करणे अशक्य आहे.संघटनेच्या शक्तीला कायद्याच्या शक्तीची जोड मिळावयास हवी. तुमची संघटना उभारण्याच्या जोडीलाच तुम्ही देशाच्या राजकारणात भाग घेतल्याशिवाय हे घडू शकत नाही.स्वातंत्र्य, समता व बंधुभाव या तत्वावर आधारलेली नवी पध्दती स्थापन करणे हे तुमचे ध्येय असले पाहिजे. याचा अर्थ समाजाची पुनर्रचना आणि अशा प्रकारची पुनर्रचना समाजात घडवून आणणे हे कामगार वर्गाचे प्राथमिक स्वरूपाचे कर्तव्य आहे. परंतु कामगार वर्ग हे ध्येय कसे साध्य करून शकेल? राजकीय शक्तीचा परिणामकारक उपयोग झाल्यास याबाबतीत ते निश्चितच एक शक्तीशाली साधन ठरते. मग त्यांनी राजकीय शक्ती साध्य केली पाहिजे.कॉंग्रेस पासून स्वतंत्र स्वतःचा असा वेगळा राजकीय पक्ष कामगारांनी स्थापन करावा, असा सल्ला देण्यास मला मुळीच हरकत वाटत नाही.जो पक्ष वर्गहिताच्या, वर्गजाणिवेच्या पायावर आधारलेला असेल, अशा पक्षामध्ये  तुम्ही सामील व्हावे. ही कसोटी लावून पाहिल्यास तुमच्या हिताच्या विरोधी नसलेला, मला माहीत असलेला पक्ष, स्वतंत्र मजूर पक्ष हाच आहे. असा स्पष्ट कार्यक्रम असलेला तो एकच पक्ष असून कामगाराच्या हिताला सर्वोच्च स्थान देतो, त्याचे धोरण सुनिश्चित आहे. (डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन व भाषणे, खंड १८, भाग २) डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच भाषणात म्हणतात की, ‘कम्युनिस्टांपेक्षा कामगारांचा अधिक नाश दुसर्‍या कोणीही केला नाही. कामगार संघटनेचा मात्र निश्चितच सर्वनाश केला. अशाप्रकारच्या निरर्थक चळवळीपासून यापेक्षा अधिक काय अपेक्षा करता येण्यासारखी आहे? आगीचा भडका उडवून देण्याच्या प्रयत्नात आपल्या स्वतःच्या घराचीही काळजी न घेणार्‍या आगलाव्या सारखाच कम्युनिस्ट माणूस सिध्द झालेला आहे. ”तरीही एका आंबेडकरवादी राजकीय पक्षामध्ये वरच्या पदावर काम करणारा व्यक्ती एका कम्युनिस्ट प्रणीत कामगार संघटनामध्ये वरच्या पदावर कसे काय काम करु शकतो?. पुढार्‍यांच्या अशा विसंगत वागणुकीला काय म्हणावे? त्यांनी पहिल्यांदा बाबासाहेबांच्या विचाराचा अभ्यास करावा.नंतरच कामगार चळवळीचे नेतृत्व करावे, तरच बाबासाहेबांच्या विचाराची खर्‍या अर्थाने पेरणी होऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ९ नोव्हेंबर १९४२ रोजी मुंबई आकाशवाणी केंद्रावर मजूरमंत्री या नात्याने भाषण केले. या भाषणात ते म्हणतात की, “देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकतो? हे नेतृत्व फक्त कामगारवर्गच देऊ शकतो, असे मला वाटते. नवी समाज रचनाच कामगारांचे आशास्थान असते. त्यासाठी कामगाराच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात.” तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र लिहिणारे लेखक धनंजय कीर, पान क्रमांक ३७७ वर लिहितात की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मद्रास विभागातील मराठा रेल्वे कामगारांनी मानपत्र दिले, त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजकीय सत्ता काबिज करणे ही गोष्ट कामगार संघ स्थापन करण्यापेक्षा अधिक महत्वाची आहे असे म्हटले होते.”  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कारकुनां पेक्षा मोक्याची जागा हस्तगत करणारे अधिकारी वर्ग अधिक पाहिजे होते. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ब्रिटीश कालीन भारताचे गवर्नरजनरल लॉर्ड लिनलिथगो यांना उच्च शिक्षणाकरीता स्कॉलरशिपची मागणी करतांना म्हणाले होते की, “मला राजवाड्याच्या टोकावर बसणारी माणसे हवीत. कारण तेथून सर्वत्र टेहळणी करता येते. आपल्या लोकांचे संरक्षण करायचे असेल तर अशी पारध करणारी माणसे निर्माण झाली पाहिजेत. कारकून काय करणार?” परंतु अधिकारी वर्गांनी याचे भान ठेवलेले दिसत नाहीत.म्हणून आज देशात उच्च शिक्षित उच्चपदाधिकारी असून ही कामगार संघटनेचे आणि राजकीय पक्षाचे  नेतृत्व करणारे कुशल वक्तृत्व,नेतृत्व आंबेडकरी चळवळीत नाही. आज जे काही नेतृत्व आहे ते अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले आहे,ते केवळ समाजाची टक्केवारी सांगून टक्केवारी वसूल करून घेणारी एक टोळी आहे. तिच्या कडे स्वतःचा कोणताही कृती कार्यक्रम नाही.
एस टी, एस सी,आणि ओ बी सी समाजातील बहुसंख्ये संघटना हया ट्रेड युनियन म्हणून काम करीत नाही,तर वेल्फेयर बोर्ड, असोशिएशन म्हणून सामाजिक,धार्मिक कार्य म्हणजे जयंत्या,सहा डिसेंबर ला भोजन दान करण्याचे काम करतात,पगार वाढ, बोनस,पदउन्नोत्ती, इतर कायदेशीर लढाई करीता त्यांना दुसऱ्या मान्यता प्राप्तयुनियन ची मदत घ्यावी लागते.त्यामुळे हे नांव जरी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे घेत असतील तरी सनदशिर मार्गाने यांना युनियनची वार्षिक वर्गणी त्यांना द्यावी लागते, त्या पैसावर कॉंग्रेस,कम्युनिस्ट,भाजपा ची प्रत्येक शहरात कार्यालय थाटलेली आहेत त्यात फुलटाईम काम करणारा कार्यकर्ता असतो,तो प्रामाणिक पणे चळवळी साठी काम करतो.आंबेडकरी कामगार चळवळी कडे फुलटाईम कार्यालय आणि कार्यकर्ता कुठे आहे?.लेटर हेड वर जगणारा कार्यकर्ता, नेता कामगारांना न्याय मिळवुन देण्यास असमर्थ ठरतो,
 कामगारा मध्ये मागासवर्गीय समाजाचे प्रमाण सर्वच क्षेत्रात बहुसंख्य आहे तरी त्यांची स्वतःच्या विचारधारेची संघटना,युनियन नाही,राज्य,देश पातळीवर कामगारांच्या युनियनचे नेतृत्व करणारे नेते नाहीत,ज्यांना कामगार कायद्याची तोंड ओळख नाही ते राष्ट्रीय नेतृत्व कसे करतील?.ते तर भांडवलदार आणि राजकीय सत्ताधारी पक्षाची दलालीच करणार.उत्तम उदाहरण म्हणजे जॉर्ज फर्नाडिस नंतर रेल्वेच्या    युनियन चे नेतृत्व हुसेन दलवाई,रामदास आठवले यांच्याकडे आल्यावर रेल्वे कामगारांचे संघटन वाढून कामगारांचे कल्याण झाले की संघटन कमकुवत झाले?.संघटित कामगारांचे हे वास्तव आहे,मग असंघटीत कामगार संघटना युनियन चे काय असेल?.
देशात कामगार दिन साजरा केला जातो,राज्यात कामगार दिन व महाराष्ट्र दिन साजरा केला जातो यात आंबेडकरी चळवळीचे योगदान मोठे आहे, पण त्याचा आदर्श आज आंबेडकरी समाजाला आणि राजकीय नेतृत्वाला नाही,त्या करीता या लेखा सोबत मी तीन वेगवेगळ्या असंघटीत कामगारांच्या आंदोलनात सहभाग घेऊन मला पाठिंबा देणारे स्वतःच्या पक्ष,संघटनेच्या वतीने असंघटीत कामगारा बाबत कधी कुठे कोणती भूमिका घेतात काय?. यांचा वाचकांनी बोध घ्यावा म्हणजे यांचे आंबेडकरी चळवळीच्या नेत्याचे कामगार संघटना, युनियन बाबत काय काम आहे,हे दिसुन येईल.म्हणून म्हणतो डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची स्वतंत्र मजदूर युनियन कुठे आहे?.

वधू वर सूचक आणि वृद्धाश्रम


भा
रतात धर्म रिती रिवाजाचे पालन करून समाजात राहावे लागते.ज्याने समाजाचे रिती रिवाज नाकारले त्यांची त्यांचे जवळचे नातलग सर्व संबधं तोडून टाकतात, गांव सोडून शहरात आलेले लोक सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे असतात,आणि ते चाळ, बिल्डिंगच्या प्लॉट,बंगला, किंवा सरकारी निवास स्थानात राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाची नातलागची गरज वाटत नाही. कामावरील,कार्यालयातील सहकारी व राहतात त्याठिकाना वरील रहिवासी जवळचे नातलग मित्र मंडळी होत असतात.ते सुखा दुःखात सहभागी होत असतात,त्यामुळे बहुसंख्य लोक जात लपवून राहतात,हिंदू म्हणून सर्वच जातीचे लोक एकत्र सर्वच सण साजरे करतात.खरा प्रश्न उभा राहतो तो मुत्यू झाल्यावर किंवा लग्न करतांना इथे जात लपवता येत नाही, हिंदू धर्माच्या रिती रिवाजा नुसार नवरा मरो किंवा नवरी मरो ब्राम्हणाला दक्षिणा द्यावीच लागते.तसेच धर्मा नुसार बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,इथेच जात लपवून राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीची खरी गोची होते,इथेच समाज आणि नातलगातील आपले स्थान दिसून येते.लोक नालायक आहेत आपणच शहाणे आहोत.असा समज काही लोकांचा असतो.त्यामुळेच त्या लोकांना समाजात वधू वर सूचक मंडळाची गरज भासू लागते,हा चांगला धंदा आणि समाजसेवा करण्याचा मार्ग निर्माण होत आहे,लग्न जुळवून देण्याचे आमचे काम आहे पुढे कोणती ही आमची जबाबदारी नाही, त्यानंतर मुलगी वरील व मुलांवरील संस्कार एकत्र राहूच देत नाही, कारण आर्थिक मुबलता असल्यामुळे सर्व सेवा करणारे उपलब्द असतात.मग मुलीने सासरी घरातील कामे आणि सेवा करणे अशक्य असते.त्यामुळे मुलीला सासूसासरे चालत नाही,मुलीचे आईवडील मुलाच्या आईवडीलाला समजून घेत नाही, कोणालाच कोणाची म्हणजे नातलग समाजाची भीती नसल्यामुळे सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यांना तडजोड किंवा घटस्फोट करावाच लागतो.यातूनच वृध्दाश्रमाची निर्मिती होत आहे. यातुन कोणताच समाज आणि धर्म सुटलेला नाही.हिंदू धर्मात 6600 जाती आहेत.एका जातीचा दुसऱ्या जातीत बेटी व्यवहार होत नाही.मात्र लग्न आणि मुत्यूच्या सर्व प्रकारच्या विधी करण्यास ब्राम्हण असने बंधनकारक आहे.हिंदू महारचे धर्मांतरीत बौद्धाची आजची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. बौध्द तरुण पिढी का घडत नाही? काही अज्ञानी पालकांमुळे बौध्द धर्माची माहीती पुढील पिढीला पोहचत नाही. बौध्द युवक युवतींना स्वत:च्या धर्माची माहीती मिळविण्यास इच्छा शक्ती नाही.हिंदू धर्मातील तरुण पिढी रिती रिवाजा नुसार अज्ञान,अंधश्रद्धा यात सहभागी होतात.ते भीती मुळे आईवडील,आजोबा, पणजोबा यांनी पालन केले.त्यामुळे काही प्रमाणात ते त्या धर्माचे नऊ दहा दिवस पालन करतात,नंतर जे करायचे ते करतातच.बौध्द लोक हिंदू धर्मावर नेहमी टिका करतात पण धम्म परिवर्तन करून 60 वर्ष झाली तरी 60 टक्के लोक हिंदूंच्या देवा धिकांच्या मोहमाया तुन मुक्त झाले नाही, अर्ध्या पेक्षा जास्त बौध्द युवकांना स्वत: बौध्द असल्याची नीट जाणीव नाही. कारण घरातील आणि परिसरातील वातावरण त्यांना योग्य मार्गाने जाऊ देत नाही.राजकारणाच्या स्पर्धेत सामाजिक,धार्मिक मार्ग दिशाहीन झाले आहेत. बौध्द धम्माचा प्रचार करायला लोकांना राजकीय आशीर्वाद लागतो.सर्वधर्मसमभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदु धर्माचा उदो उदो करत बुद्ध विहारा समोर गणेशोत्सव,नवरात्रत्सोव मोठ्या उत्सवात साजरे होतात.त्यामुळे बौध्द धर्माकडे अक्षरशः पाठ फिरविली जाते.मागासवर्गीय समाजातील लोकांना स्वजातीची अस्तित्वच नाही,ते हिंदू म्हणून जगतात,त्यांच्या समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबा देत नाहीत.ते शिर्डी, तिरुपती, बालाजीला हजारो रुपयॆ देवून नवस करतील. मग असा लोकांच्या मुलामुलींचे लग्न समाजातील आणि नात्यातील लोक का म्हणुन करतील?.
मराठा आणि मागासवर्गीय समाजातील लोक आजुबाजुला गणपती बसतात म्हणुन ते आपले आराध्य दैवत मानतात.मग ह्यांचे सुध्दा आराध्य दैवत गणपतीच होतो.बाहेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांचे फोटो पण आत अनेक देवांचा किचनमध्ये किंवा महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला देव्हारा.
बुध्द विहारांची देखरेख तर सोडा  आठवड्यातून एकदा विहारात वंदन करायला जायला सुध्दा यांना जमत नाही.वाचन व आचरण तर नाहीच नाही.अनेक लोक फक्त लग्न, बारसे (नामकरणविधी )बौध्द पध्दतीने करतात. ते लोकं नाव ठेवु नये म्हणुन.आणि  पाया पडायला कुलदेवता, ग्रामदेवतेच्या देवळात, शिर्डीला जातात.तेव्हा आता विचार करा की यांच्या घरात कोणते संस्कार होतील ?. ही लपून राहणारी गोष्ट आहे काय?. मग यांच्या मुलामुलीला लग्न करतांना वधु वर सूचक मंडळा शिवाय पर्याय नाही,वधु वर सूचक मंडळाने जुळविलेली लग्न दोनतीन वर्षात वेगळे होतात,फारशी टिकल्याची उदाहरण दिसत नाही.जी टिकतात त्यांचे आई किंवा वडील वृद्धाश्रमात असतात.अनेक वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांच्या मुलाची चौकशी केली तर हे सत्य बाहेर येते.पण त्यावर कोणीच कोणती कारवाई करीत नाही.कारण समाज आणि नातलगात न राहणारी मंडळी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवते,राज्यात मुबलक वधुवर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम खोलली जात आहेत.त्यांच्या मागील ही कारण आहेत.वृद्धाश्रम बंद करण्या करीता सुनेने सासू,सासऱ्यांना संभाळण्या करीता मुलीवर संस्कार असणे आणि समाजाचे नातलगाचे दळपणा असणे खूप गरजेचे आहे.म्हणुन सून करतांना मुलीचे शिक्षणा पेक्षा घरातील एकत्र कुटुंब राहण्याचे संस्कार महत्वाचे आहे,ते पहा उद्याच्या भविष्या करीता 

राजकीय घराने अडवा,राष्ट्रीय पक्षाची जिरवा


राठवाडा विदर्भात साध्य पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे,तशी ती दरवर्षी होत असते.त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक लक्षवेधी योजना राबविल्या जातात,करोडो रुपये पाणी अडवा पाणी जिरवा योजने अंतर्गत खर्च केली जातात, परंतु पाणी अडवून जिरविल्या जात नाही पण आलेला निधी मात्र कागदावर शंभर टक्के जिरविला जाते त्यात राजकीय आणि प्रशासकीय अधिकार महत्वपूर्ण भूमिका बजावतात.त्यामुळे दरवर्षी हा पाणी टंचाईचा दुष्काळ निसर्गनिर्मित नाही तर मानव निर्मित आहे असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.त्याला केवळ सत्ताधारी आणि प्रशासनच जबाबदार नाही तर बहुसंख्ये शेतकरी,शेतमजूर,कामगार कर्मचारी तेवढेच जबाबदार आहेत.म्हणुन आपल्याच देशात हे होते, इतर देशात नाही.सारा महाराष्ट्र पाण्यावाचून वणवण फिरतोय पण,छत्रपतींच्या गडकोटांवर अजून देखील पाणी उपलब्ध आहे. रायगड किल्ल्यावरील सर्व पाण्याच्या टाकी आणि तलाव व्यवस्थित साफ करून पाण्याचे योग्य असे व्यवस्थापन केले तर आजूबाजूच्या १०० गावांना बाराही महिने मुबलक पाणीपुरवठा करता येईल. असे जवळपास ३८५ किल्ले महाराष्ट्रात आहेत. ३८५ पैकी ७०% किल्ल्यांवर बाराही महिने पाणी असते अगदी भर उन्हाळ्यात देखील पण अपुऱ्या देखभालीमुळे दुर्गंधी आणि गाळ साचला आहे.
३५० वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी जे जाणले ते आज आपले राजकारणी साधे अंमलात आणू शकत नाही. कारण त्यात प्रामाणिक पणां नाही.समाजहित देशहिता पेक्षा व्यक्तिगत स्वार्थ जास्त मनात भरलेले लोक राज्यकर्ते आणि प्रशासकीय सेवेत आहेत. पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत मराठवाडा, विदर्भ गेली पंचवीस तीस वर्ष टक्कर देत आहे,त्यामुळे उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती कशी साधता येईल यांचे नियोजन करणे आवश्यक आहे,
> > "तहान लागल्यावर विहीर खणायची" हे  जेवढं मूर्खपणाचं लक्षण आहे, तेवढाच मूर्खपणा आपण एप्रिल महिना सुरु झाल्यावरच जे "पाणी वाचवा" ओरडतो, त्यात ही आहे.पाणी हे काय फक्त एप्रिल लागल्यावर जपून वापरण्यासाठी असतं का ? "पाणी जपून वापरा" ही मोहीम आपण वर्षभर का राबवू शकत नाही ? पेलाभर पाणी लागते त्या ऐवजी , मग बादलीभर पाणी ओतायचं हे आता कुठेतरी बदलायला हवे.कुणीतरी म्हटलेलंच आहे कि "पुढचं युद्ध तेल आणि पाण्यासाठी होईल" ते आता खरं होईल कि काय असं वाटायला लागलंय.केवळ आज तुमच्या घरात बादलीभर पाणी आहे म्हणून एखादा तुमचा मुडदा पाडून, ते पाणी घेऊन जाईल अशी परिस्थिती खरंच येऊ शकते.
पाच-सातशे वर्षांपूर्वी, चंद्रगुप्त मौर्याने कुणाशी विवाह करून कुठचा मौर्य जन्माला घातला, आणि महम्मद गजनी ने कुणासोबत काय दिवे लावले हा अभ्यासक्रम आता बास झाला. त्यापेक्षा पाण्याचे व्यवस्थापन अर्थात (Water Management and Water Conservation) हा विषय शाळेच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करायला हवा. तुम्ही शेतकरी असाल किंवा शहरी, हा विषय शिकलाच पाहिजे असं Compulsion असायला हवं.
> > मराठवाडा,विदर्भात पाणी टंचाई निसर्गदत्त नाही तर राजकीय मानव निर्मित आहे,प्रशासन नावाचा चेहरा नसलेला हा मानव हे सर्व भष्ट्र मार्गाने निर्माण करतो,1905 ला कोल्हापुरसह  पच्छिम महाराष्ट्रात राजर्षी शाहू महाराज यांनी धारण बांधून कृषिविभाग कायमचा दुष्काळ मुक्त केला.तेच काम मराठवाडा,विदर्भातील राजकीय नेत्यांना का करता आले नाही. म्हणुन पाणी टंचाई हे मानव निर्मित आहे,अन्यता लातुर रेल्वे स्टेशन प्लॉटफॉर्म वर पिण्याचे पाणी नाही. पण रेल्वे स्टॉल वर बिस्लेली पाणी बॉटल मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.बीड, अंबेजोगई एस टी डेपो वर सार्वजनिक पिण्याचे पाणी नाही. पण पैसे देऊन पाणी आहे.मग या मराठवाडा ग्रामीण, विदर्भात खामगांव,शेगांव,अकोला भागात हे पाणी बिस्लेली कंपनी ने अमेरिका,जापान वरून आणले काय?. 
भाभा अणुसंशोधन केंद्र, सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायर्नमेंटचा निष्कर्ष आहे, बाटलीबंद पाण्याला सुगीचे दिवस आले असले तरी हे पाणी माणसाच्या आरोग्यासाठी अपायकारक  ठरू शकते. भाभा अणुसंशोधन केंद्र आणि सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायर्नमेंटने नुकत्याच केलेल्या चाचणीत बाटलीबंद पिण्याच्या पाण्यात ‘ब्रोमेट’ हे कर्करोगयुक्त रसायन आणि कीटकनाशक आढळले आहे. भूजल प्रदूषणामुळे घरगुती पिण्याचे पाणी प्रदूषित झालेले असताना, आता बाटलीबंद पाण्यातही रसायन व कीटकनाशके आढळल्याने पिण्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार भाभा अणुसंशोधन केंद्राने मुंबईतील बाटलीबंद पाण्याचे नमुने घेतले होते. त्यातील २७ नमुने ‘ब्रोमेट’ या कर्करोगजन्य पदार्थाने दूषित आढळले. ही घातक रसायने बाटलीबंद पाण्यात आढळल्यामुळे मानके ठरविणाऱ्या ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (बीआयएस) संस्थेने आता नवी मानके ठरविण्याचे निश्चित केले आहे. मुंबईच्या या सर्वेक्षणानंतर संपूर्ण भारतातच पाण्याचे नमुने तपासण्यात येणार आहे. सेंटर फॉर सायन्स अ‍ॅन्ड एन्व्हायर्नमेंट या संस्थेनेसुद्धा केलेल्या संशोधनात पिण्याच्या पाण्यात कीटकनाशके आढळली. सर्वच पाणी कंपन्या पाणी शुद्धीकरणासाठी ओझोन व क्लोरीन शुद्धीकरण पद्धती वापरतात. यातून ‘ब्रोमेट’ शिवाय इतर कर्करोगजन्य पदार्थाची दरवर्षी चाचणी करण्यात येणार आहे.पिण्याच्या पाण्याचे उद्योग बेकायदेशीररीत्या सुरू असलेले पिण्याच्या पाण्याचे उद्योग ही दुसरी सर्वात मोठी समस्या आहे. केवळ दिल्लीसारख्या शहरातच पिण्याच्या पाण्याचे अवैधरीत्या सुमारे १० हजार कारखाने सुरू असून, देशात असे ३ लाखांवर कारखाने आहेत. देशातील नामवंत कंपन्यांचे लेबल लावून हे पाणी विकले जाते. हा प्रश्न जनतेला पडत नाही.पाणी कुठून आले? कसे आणले ?. कोण विकतो ?. याचा गांभीर्याने विचार झालाच पाहिजे तरच पाणी टंचाई वर मात करता येईल,पाणी अडवा,पाणी जिरवा ही योजना राज्यकर्ते राबवित नसतील तर जनते च्या सहभागातुन काय होऊ शकते हे नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम संस्थेने करून दाखविले आहे, हे सर्वच सरकारचे काम आहे आपली जबाबदारी नाही असे म्हणुन शेतकरी,शेतमजुर, कामगार,कर्मचारी यांनी पाणी अडवा,पाणी जिरवा योजने सोबत राजकीय घराने अडव,राष्ट्रीय पक्षाची जिरवा हे मोहीम राबविलीच पाहिजे.

बौद्धाच्या लग्नात दारुडयांचा बेधुंदनाच


डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. बौध्द समाज शिकून मोठा झाला. पण तो फार पुढे गेला असे म्हणता येत नाही, आणि खुप मागे राहिला असे ही म्हणता येत नाही.परंतू संघटित नसल्यामुळे सर्व गोष्टीत कमी पडत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही विभागात बौध्द समाज संघटित नाही हि शोकांतिका आहे. त्याचा फायदा इतर सर्व पक्ष घेत आहे. बौध्द समाज संघटित झाला पाहिजे अशी प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीची इच्छा आहे. परंतू त्यांना कोणत्याही आपल्या व्यक्तीवर अथवा अन्य गटातील बौद्ध नेत्यांवर भरवसा राहिलेला नाही असे चित्र दिसत आहे.त्यांचे  इतके नेते असताना सर्व संघटित का होत नाही हा प्रश्न आजही सर्वांच्या मनात आहे. बौध्द समाज संघटित करण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे जरूरी आहे. परंतू लोकांचे येणारे शेकडो नकारात्मक प्रश्न यामुळे कोणीही त्या भानगडीत पडत नाही असे वाटते. तो विचार करतो की, जर समाजाला काही पडलेले नाही तर मला काय देणे घेणे आहे ? तसेच मी पुढाकार कशाला घेऊ ? जर प्रत्येक जण असे म्हणू लागला तर बौद्ध समाजाचे संघटन कोण करणार ? महाराष्ट्रात बौद्ध समाजाच्या कितीतरी संस्था आहेत पण एकही स्थानिक संस्थाने स्थानिक बौद्ध लोकांचे संघटन करण्याचा प्रयत्न केलेला आढळून येत नाही.म्हणून बौद्धाच्या लग्नात दारुडे बेधुंद नाचून लग्नाच्या वेळेचे तीनतेरा वाजवितात.त्यामुळे लग्नाला आलेले इतर समाजातील मित्र मंडळी व्यक्तीला नांव ठेवत नाही तर समाजाला आणि धर्माला,धम्माला दोष देतात.
> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणुन उठता बसता डॉ बाबासाहेब आंबेडकार यांच्या नांवाचा जयजयकार करणारी बौद्ध समाजातील काही लोक त्यांच्या क्रांतिकारी विचाराचा सार्वजनिक ठिकाणी आपल्या आचाराने खून करतात.ते ठिकाण म्हणजे लग्न. कोणत्याही ठिकाणी, कोणाचे ही लग्न असो ते वेळे वर लावले जात नाही, कारण लग्नाच्या वरातीत दारू पियून बेधुंद नाचणारे लोक. म्हणजेच लोक लज्जा, नीतिमत्ता सोडलेले लोक.त्यांना बौद्ध का म्हणावे हाच मोठा प्रश्न आहे?.तेच लोक शहरातील झोपडपट्टीत असो की गावातील वस्तीत दारू पियून धिंगाना घालणारच कारण ते डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेली धम्मदीक्षा आणि 22 प्रतिज्ञा मान्यच करीत नाही ते आज ही हिन्दू महार आहेत.त्यांना समाजाची लोकांची,संस्था,संघटनाची कोणती ही भिती वाटत नाही.लोकच त्यांना घाबरून बोलत नाही.यावर उपाय कोण करणार?.दिवसेंदिवस ही मनोवृती वाढत चालली आहे.त्यामुले धम्माची बदनामी होत आहे.
> डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अभ्यास करून दिलेला धम्म आणि लिहलेले भारतीय सविधान म्हणजेच लोकशाही आहे. त्यानुसार देशातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्य गोविंदाने राहतात. लोकशाही उपभोगण्यासाठी लोकशाही जिवनपद्धती आत्मसात करून पात्रता कमवावी लागते.महाराष्ट्रातील काही बौद्ध लोक लोकशाही उपभोगण्यासाठी स्वत:ला अजुनही पात्र करू शकले नाहीत असे त्यांच्या एकूण सामाजिक वर्तनावरून दिसून येते.बौद्धांमध्ये वाढीस लागलेला दुराग्रह,असहिष्णुता, भक्तीप्रियता आणि त्यातून निर्माण झालेला विघटीतपणा धर्मांधता, पोथीन्निष्ठा इतर कोणत्याही धर्मातील धर्मांध लोकांपेक्षा कमी नाही. याची नेमकी करणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. मात्र या दुष्टीने बौद्धां मधील बुद्धीजीवी,विचारवंत,साहित्यिक,पत्रकारा कडून आणि भारतीय बौद्ध महासभा(मातृ संस्था),समता सैनिक दल,सामाजिक,धार्मिक संस्था,संघटना कडून ठोस असे प्रयत्न होताना दिसत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. महाराष्ट्रातील बौद्धां मध्ये जोपर्यंत सत्यनिष्ठा,सविधान प्रति आदर नसेल,आणि त्याची अंमलबजावणी स्वताच्या घरात आणि परिसरात नसेल.तर या बेधुंद बेजबाबदार नंगानाच करणारया तरुणानां आवर कोण घालील हा मोठा प्रश्न समाजातील लोकां पुढे आहे. लग्नात दारू पियून धिंगाना घालणारया तरुणानां रोखल्यास भांडन होणार या भितीमुळे  दुर्लक्ष करने म्हणजे धम्माच्या नितिमत्ते पासुन लांब पळने आहे.जर चोरांना चोर म्हणण्याची व त्यांना साथ न देण्याची निस्पृहता निर्माण होत नाही. तोपर्यंत बौद्धांची उन्नती नव्हे तर अधोगतीच होत राहणार आहे.व्यक्तिगत विकास होईल पण सामाजिक दुष्ट्या समाज वेगवेगळया गटात,वर्गात विभागल्यामुळे त्याची क्रांतिकारी विचारधारे वर लढण्याची हिंमत मेलेली असेल.लग्न हा काही व्यकतिगत समारंभ नाही तो समाजाच्या आणि नातलग मित्र परिवाराच्या साक्षीने मुला-मुलीने आयुष्य भर नितिमतेने जिवन जगण्याचा एक अतिशय महत्वाचा धर्म,धम्म संस्कार विधी आहे.म्हणुन लग्न कार्यात शिस्तबद्धता आणि वेळेचे भान ठेउन लग्न विधी होणे आवश्यक आहे.जर धम्माच्या संस्कार विधि नुसार लग्न लावायचे नसेल तर लग्न प्रत्रिकेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्धाचे नांव व फोटो छापू नये..तुम्हाला आवडनारया नटनटी किंवा नाचगाने करणारया हिरो हिरोइनचे फोटो लग्न प्रत्रिके वर छापाई करा आणि मित्र मंडळीस वाटा.त्यामुळे समाजाचे आणि धम्म चळवळीचे कोणताही नुकसान होणार नाही.म्हणुन एक तर बौद्धाच्या लग्नातील दारू पिवून होणारा बेधुंद नाच थांबवा.नाही तर धम्म संस्कार विधी थांबवा. बौद्ध समाजातील जागरूक उपासक उपासीका यांनी पुढाकार घेऊन या मनोवृत्ती विरोधात अभियान राबविले पाहिजे . ते ही आपन राहतो त्या परिसरात विभागात. मी ते राबविले भांडुप,मुंबई आणि वरवट  खंडेराव तालुखा संग्रामपुर,जि बुलढाना येथे माझा मुलाच्या लग्नात. पण माझ्या गावात ते शक्य झाले नाही कारण तेच!. गावा पेक्षा, समाजा पेक्षा, संघटना विचारधारे पेक्षा दारू पिणारा गरीबाच्या घरातील लग्नात भांडण करून धिंगाना करेल हया भिती पोटी मोठा ठरला.हे सर्वच ठिकाणी घडत आहे.म्हातारी  मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावते.