भारतात धर्म रिती रिवाजाचे पालन करून समाजात राहावे लागते.ज्याने समाजाचे रिती रिवाज नाकारले त्यांची त्यांचे जवळचे नातलग सर्व संबधं तोडून टाकतात, गांव सोडून शहरात आलेले लोक सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणारे असतात,आणि ते चाळ, बिल्डिंगच्या प्लॉट,बंगला, किंवा सरकारी निवास स्थानात राहत असल्यामुळे त्यांना त्यांच्या समाजाची नातलागची गरज वाटत नाही. कामावरील,कार्यालयातील सहकारी व राहतात त्याठिकाना वरील रहिवासी जवळचे नातलग मित्र मंडळी होत असतात.ते सुखा दुःखात सहभागी होत असतात,त्यामुळे बहुसंख्य लोक जात लपवून राहतात,हिंदू म्हणून सर्वच जातीचे लोक एकत्र सर्वच सण साजरे करतात.खरा प्रश्न उभा राहतो तो मुत्यू झाल्यावर किंवा लग्न करतांना इथे जात लपवता येत नाही, हिंदू धर्माच्या रिती रिवाजा नुसार नवरा मरो किंवा नवरी मरो ब्राम्हणाला दक्षिणा द्यावीच लागते.तसेच धर्मा नुसार बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल,इथेच जात लपवून राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तीची खरी गोची होते,इथेच समाज आणि नातलगातील आपले स्थान दिसून येते.लोक नालायक आहेत आपणच शहाणे आहोत.असा समज काही लोकांचा असतो.त्यामुळेच त्या लोकांना समाजात वधू वर सूचक मंडळाची गरज भासू लागते,हा चांगला धंदा आणि समाजसेवा करण्याचा मार्ग निर्माण होत आहे,लग्न जुळवून देण्याचे आमचे काम आहे पुढे कोणती ही आमची जबाबदारी नाही, त्यानंतर मुलगी वरील व मुलांवरील संस्कार एकत्र राहूच देत नाही, कारण आर्थिक मुबलता असल्यामुळे सर्व सेवा करणारे उपलब्द असतात.मग मुलीने सासरी घरातील कामे आणि सेवा करणे अशक्य असते.त्यामुळे मुलीला सासूसासरे चालत नाही,मुलीचे आईवडील मुलाच्या आईवडीलाला समजून घेत नाही, कोणालाच कोणाची म्हणजे नातलग समाजाची भीती नसल्यामुळे सुशिक्षित सुरक्षित नोकरी करणाऱ्यांना तडजोड किंवा घटस्फोट करावाच लागतो.यातूनच वृध्दाश्रमाची निर्मिती होत आहे. यातुन कोणताच समाज आणि धर्म सुटलेला नाही.हिंदू धर्मात 6600 जाती आहेत.एका जातीचा दुसऱ्या जातीत बेटी व्यवहार होत नाही.मात्र लग्न आणि मुत्यूच्या सर्व प्रकारच्या विधी करण्यास ब्राम्हण असने बंधनकारक आहे.हिंदू महारचे धर्मांतरीत बौद्धाची आजची परिस्थिती या पेक्षा वेगळी नाही. बौध्द तरुण पिढी का घडत नाही? काही अज्ञानी पालकांमुळे बौध्द धर्माची माहीती पुढील पिढीला पोहचत नाही. बौध्द युवक युवतींना स्वत:च्या धर्माची माहीती मिळविण्यास इच्छा शक्ती नाही.हिंदू धर्मातील तरुण पिढी रिती रिवाजा नुसार अज्ञान,अंधश्रद्धा यात सहभागी होतात.ते भीती मुळे आईवडील,आजोबा, पणजोबा यांनी पालन केले.त्यामुळे काही प्रमाणात ते त्या धर्माचे नऊ दहा दिवस पालन करतात,नंतर जे करायचे ते करतातच.बौध्द लोक हिंदू धर्मावर नेहमी टिका करतात पण धम्म परिवर्तन करून 60 वर्ष झाली तरी 60 टक्के लोक हिंदूंच्या देवा धिकांच्या मोहमाया तुन मुक्त झाले नाही, अर्ध्या पेक्षा जास्त बौध्द युवकांना स्वत: बौध्द असल्याची नीट जाणीव नाही. कारण घरातील आणि परिसरातील वातावरण त्यांना योग्य मार्गाने जाऊ देत नाही.राजकारणाच्या स्पर्धेत सामाजिक,धार्मिक मार्ग दिशाहीन झाले आहेत. बौध्द धम्माचा प्रचार करायला लोकांना राजकीय आशीर्वाद लागतो.सर्वधर्मसमभावाचे कारण पुढे करून सर्रास हिंदु धर्माचा उदो उदो करत बुद्ध विहारा समोर गणेशोत्सव,नवरात्रत्सोव मोठ्या उत्सवात साजरे होतात.त्यामुळे बौध्द धर्माकडे अक्षरशः पाठ फिरविली जाते.मागासवर्गीय समाजातील लोकांना स्वजातीची अस्तित्वच नाही,ते हिंदू म्हणून जगतात,त्यांच्या समाजाचे प्रबोधन करायला कोणीही पुढे येत नाही आणि जरी कोणी येत असेल तर त्याला पाठींबा देत नाहीत.ते शिर्डी, तिरुपती, बालाजीला हजारो रुपयॆ देवून नवस करतील. मग असा लोकांच्या मुलामुलींचे लग्न समाजातील आणि नात्यातील लोक का म्हणुन करतील?.
मराठा आणि मागासवर्गीय समाजातील लोक आजुबाजुला गणपती बसतात म्हणुन ते आपले आराध्य दैवत मानतात.मग ह्यांचे सुध्दा आराध्य दैवत गणपतीच होतो.बाहेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुध्दांचे फोटो पण आत अनेक देवांचा किचनमध्ये किंवा महापुरुषांच्या फोटोच्या बाजूला देव्हारा.
बुध्द विहारांची देखरेख तर सोडा आठवड्यातून एकदा विहारात वंदन करायला जायला सुध्दा यांना जमत नाही.वाचन व आचरण तर नाहीच नाही.अनेक लोक फक्त लग्न, बारसे (नामकरणविधी )बौध्द पध्दतीने करतात. ते लोकं नाव ठेवु नये म्हणुन.आणि पाया पडायला कुलदेवता, ग्रामदेवतेच्या देवळात, शिर्डीला जातात.तेव्हा आता विचार करा की यांच्या घरात कोणते संस्कार होतील ?. ही लपून राहणारी गोष्ट आहे काय?. मग यांच्या मुलामुलीला लग्न करतांना वधु वर सूचक मंडळा शिवाय पर्याय नाही,वधु वर सूचक मंडळाने जुळविलेली लग्न दोनतीन वर्षात वेगळे होतात,फारशी टिकल्याची उदाहरण दिसत नाही.जी टिकतात त्यांचे आई किंवा वडील वृद्धाश्रमात असतात.अनेक वृध्दाश्रमाला भेट देऊन त्यांच्या मुलाची चौकशी केली तर हे सत्य बाहेर येते.पण त्यावर कोणीच कोणती कारवाई करीत नाही.कारण समाज आणि नातलगात न राहणारी मंडळी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमात ठेवते,राज्यात मुबलक वधुवर सूचक मंडळ आणि वृद्धाश्रम खोलली जात आहेत.त्यांच्या मागील ही कारण आहेत.वृद्धाश्रम बंद करण्या करीता सुनेने सासू,सासऱ्यांना संभाळण्या करीता मुलीवर संस्कार असणे आणि समाजाचे नातलगाचे दळपणा असणे खूप गरजेचे आहे.म्हणुन सून करतांना मुलीचे शिक्षणा पेक्षा घरातील एकत्र कुटुंब राहण्याचे संस्कार महत्वाचे आहे,ते पहा उद्याच्या भविष्या करीता
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा