बुधवार, २२ जून, २०१६

मुला मुलीनां आणि पालकांना सैराटची बाधा


जगात सायन्स ने खुप प्रगती केली. त्यामुळे शहरातून खेडयाकडे टीव्ही मुळे सिनेमा आणि सीरियल घराघरत पोचले त्यात चांगले आणि वाईट दाखविल्या मुळे मुलामुलीवर चांगलाच परिणाम होत आहे.त्यात स्मार्ट मोबाईल आणि नेटने मुलामुलीना याड लावले.
प्रेम आणि सेक्स हया वेगवेगळ्या पण खुप महत्वाच्या गोष्टी आहेत.त्यातुन होणाऱ्या परिणामाला अनेक पालकांना तोंड द्यावे लागते. त्यात अत्यंत महत्वाची भूमिका पोलिसांना निभवावी लागते, म्हणून पोलिसां कडून सर्व पालकांसाठी नेहमी सूचना दिली जाते.शाळा कॉलेजेस संपत आले आहेत. मागील कांही दिवसा पासुन वयात आलेल्या तरुण मुली निघुन जाण्याच्या तक्रारीमध्ये व प्रकरणा मध्ये शहरा पेक्षा ग्रामीण भागातील भागात वाढ झाली आहे.मुलींनी शैक्षणिक वर्षात केलेले प्लॅनिंग प्रत्यक्षात उतरवतना दिसुन येत आहे.दहावी बारावीत मुलीची टक्केवारी लक्षवेधी असते. त्यात अशा घडलेल्या घटना मुळे काही गंभीर सामाजिक प्रश्न देखील निर्माण होतात.आणि तशातच हिंदी मराठी फिल्म इंडस्ट्रिकडून दाखविण्यात येणारे कामुक व अश्लील चिञपट, काल्पनिक लव्हस्टोरी याचा पगडा भारतातील तरुण तरूणींवर पडत असलेमुळे मुला मुलींवरील संस्कार ढासळले आहेत.या अनुषंगाने पालकांनी आपल्या पाल्यांची (मुलगा/मुलगी) खालील प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
मुले-मुली एकांतामध्ये फोन वरुन जेंव्हा बोलत असतात त्या वेळी त्या/ते कोणाशी आणी काय बोलत असतात हे पहावे.
मी मैत्रणी/नाते वाईकाकड़े चालली आहे अस मुली पालकाना सांगुन घरातून जातात, परत येत नाहीत. अशा वेळी मुलीला एकटी न-पाठवता इत्तर नातेवाईका सोबत पाठवावे.
मुलगी/मुलगा घरातुन शाळा कॉलेजला जातात त्या वेळी ते घरातुन किती वाजता निघाले शाळा कॉलेज मध्येच गेले का ? किती वाजता पोहचले ? पिरेडला बसले का ? शाळा कॉलेज मधुन बाहेर कधी पडले ? सरळ घरी आले का ? किती वाजता आले ? या कड़े लक्ष देणे आवश्यक आहे. बहुतांशी मुला-मुलींनी निघुन जाण्या आगोदर मोबाइल फोनचाच वापर/आधार घेतल्याचे दिसुन येत आहे.
चैनल मिडिया आणि प्रिंट मिडिया बातम्या तुम्ही जरूर पाहली,वाचली असेल. परंतु या गोष्टीची ज्या पालकाना काळजी घेणे आवश्यक आहे.दुर्दैवाने अशा पालकाकडे सोशल मीडियाचा अभाव असतो. त्यामुळे ही बाब कृपया आपण आपला भाऊ, बहिण, मामा, मामी, मावशी, मित्र, चुलते, पुतने, शेजारी यांना अवगत करून सतर्क करावे.धक्का धक्कीच्या व धाव-पळीच्या दुनियेत पालकाना कुटुंब चालवण्यासाठी खुप आटा-पिटा करावा लागतो त्यामुळे पाल्याकड़े पुरेसे लक्ष देवु शकत नाही. परंतु लक्ष देणे आवश्यक आहे.
घटना घडल्या नंतर माता-पित्यानी अश्रु ढाळण्यापेक्षा त्या आधीच काळजी घ्यावी म्हणजे समाजात (नसलेली )इज्जत जात नाही, आणि जात किती ही लपविली तरी ती जात नाही. मुलींनीही विचार करावा की ज्या माता पित्याने जन्म देऊन लहानाचे मोठे करताना मुलीचा तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळ केला.तो त्यांना उतारवयात डोळ्यात पाणी आणून रडवण्यासाठी आणि मानसिक त्रास देण्या साठी करू नये.मुलीच्या  परपुरुषा बरोबर पळून जाण्याने तीच्या मागे तीच्या भावाला कुटुंबाला समाजात आत बाहेर तोंड दाखविणे अवघड होऊन जाते. त्यांच्या संपूर्ण घरावर चारिञ्यहिन घराने म्हणून ठपका बसतो.व नंतर त्या पळून गेलेल्या मुलीच्या भावाचेही लग्न ठरतच नाही.त्यामुळे पालकांनो सावधान तुमची मुलगी तुम्हाला काॅलेज एक्झाम व क्लासच्या बाहाण्याने केव्हा ही फसवू शकते हे शंभर टक्के लक्षात घ्या.एक सैराट सिनेमा पाहिल्याने रातोरात मुलमुली बिगडत नाही, त्यावर आजु बाजूच्या सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक, सायन्स आणि सोशल मिडियाचा परिणाम होतो म्हणुन मुलमुली प्रेम करतांना जात धर्म पाहत नाही. म्हणुन पालकांनो मुला मुलींनी आपली सत्य संस्कृती सांगा, जात धर्म माणसाने स्वार्था करीता निर्माण केलेले आहेत.त्यामुळेच संस्कार धर्म आणि शरीर धर्म केव्हाच बिघडून टाकल्या गेला आहे.केवळ शरीराची वासना शांत करणे म्हणजे प्रेम हेच उद्धीष्ट मुला मुलींचे झाले आहे.म्हणूनच सर्वच पालकांनी सतर्क राहिले पाहिजे. मुलामुलीच्या प्रेम प्रकरणाने एक सामाजीक जबाबदारी मोठया प्रमाणात वाढते आहे, ती योग्य वेळी समजून घेतली तर देशातील जाती जातीतील प्रेम प्रकरनातुन होणारे भीषण हत्याकांड थांबविता येतील. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा