जगात एकमेव भारत असा देश आहे की जो प्रत्येक कामाची सुरवात शुभ मुहूर्त ब्राम्हणा कडे पहिल्या शिवाय करीत नाही.जन्म आणि मुर्त्यु झाल्यावर ही पुढील विधिवत पूजा अर्चा ठरविण्याचा अधिकार कुटुंबा तील प्रमुखाला नाही. खरे म्हणजे ज्या दिवशी आपला जन्म झाला तोच दिवस, तीच वेळ आपल्यासाठी शुभ! आई बाळाला जन्म देतांना कधीच मुहूर्त पाहत नाही.आणि कोणी मरताना ही पाहत नाही. तरी बहुसंख्य लोकांची जिंदगी मुहूर्त पाहण्यात जाते. सगळेच दिवस, सर्वच वेळ शुभ आहेत. फक्त इच्छाशक्ती प्रबळ असावी. आपल्यासाठी सर्वच दिवस सर्वच वेळ शुभ आहे!. वेळेच महत्व जाणले आणि योग्य वेळी काम, कार्य केले तर लाभदायक शुभ होते, अनेक लोक कुंडल्या पाहून लग्नांचे मुहूर्त काढतात, तरी अनेक स्त्रीया विधवा व पुरूष विधूर का होतात? पत्रिका व कुंडली जुळवून लग्न झालेल्या जोडप्यांचे घटस्फोट का होतात?. तर काही अकाली मृत्यू होतात असे का होते ?
देशातील 95% विवाह हे मुहूर्तानुसार वेळेवर लागत नाहीत तरी मुहूर्ताचा आग्रह का धरला जातो ? यांचा कोणी विचारच करीत नाही, राजकीय लोक मुहूर्त पाहून निवडणुक अर्ज भरतात,आणि प्रचार करतात,सर्वच पक्षाचे उमेदवार देवा धर्माची विधिवत पूजा करून निवडणूक लढतात तरी सर्व उमेदवारां पैकी एकच उमेदवार निवडून येतो आणि बाकीचे आपटतात. असे का घडते? एकाचाच मुहूर्त शुभ होता काय ?
मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारण्यासाठी व खुर्चीवर बसण्यासाठी शुभ मुहूर्त शोधतात तरी त्यांच्या योजना अयशस्वी का होतात?. मंत्रीपद अल्प कालावधीत का जाते?.शुभ मुहूर्तावर मूल जन्माला घातल्यास वैज्ञानिक, राष्ट्रपती, पंतप्रधान होईल काय?. अंबानीच्या जन्म मुहूर्ताला जन्माला आलेल्या इतर व्यक्ती पण अंबानी झाल्या का? उच्च शिक्षित डॉक्टर, इंजिनियर, उद्योजक, आपल्या कार्यालयाचे बांधकाम करतांना, व्यवसायास प्रारंभ करतांना मूहूर्त पाहूनच सर्व करतात.तरी सुद्धा कित्येकांना अपयश येते असे का?.महाराष्ट्रात घराघरत पोचलेले प्रसिद्ध भविष्यकार कालनिर्णयवाले र्ज्योतिभास्कर जयंत साळगावकर यांनी शुभ मुहूर्तावर सुरू केलेले मराठी दैनिक का आपटला ?कारण शुभमुहूर्त हे थोतांड आहे.सत्य नाही ज्यांचा स्वतः वर विश्वास नसतो,तेच लोकं अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.मुहूर्त पाहणारी पेशवाई नष्ट झाली आणि कधीही मुहूर्त न पाहणारी ब्रिटिशशाही अख्खा भारत देश गिळून बसली. स्वतःवर व स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा. चांगले काम हेच कुशल कर्म माना. जर कोणता पंडित, ज्योतिषी, बुवा, बापू, कापु, झापु महाराज,साधू ,साध्वी तथा वास्तूशास्त्र विशारद शुभमुहूर्तावरच सर्व काही केल्यास तथा वास्तूशास्त्राप्रमाणेच बांधकाम केल्यास यश येईल असे सांगत असतील तर स्टँम्प पेपरवर लिहून देण्यास सांगा. यश न आल्यास नुकसान भरपाईचा दावा ठोकेन असे सांगा. ते तुमच्या जवळही फिरकणार नाहीत.कारण त्यांनाही माहित असते हे सर्व थोतांड आहे.जर तुमचं मन साफ असेल व तुमच्यात प्रयत्न करण्याची क्षमता असेल.तर तुमच्यासाठी कोणतीही वेळ ही ' शुभ मुहूर्तच ' असते " चला तर आजपासून शुभ-अशुभ या चक्रात न पडता विज्ञानवादी होऊ या.चला..जगण्याची दिशा बदलूया..!! सुरुवात स्वतःपासून..!!
आता तुम्ही पण कुणाचही भविष्य सांगू शकता.त्याकरिता थोडा मानसिक,भौतिक अभ्यास करा.फक्त एवढे पाठ करून ठेवा, भाऊ..लई मोठं मन हाय तुमचं भाऊ,
लोकं फायदा घेतात तुमचा भाऊ, आयुष्यात लई कष्ट केले तुम्ही भाऊ,कुणा बद्दल वाईट चिंतीत नाय तुम्ही भाऊ...पण तुमचे विषयी वाईट करतेत लोक भाऊ, पैसा लई कमवते तुम्ही भाऊ,पण पैसा टिकत नाही भाऊ, लई मेहनत करूनबी काम होत नाही भाऊ, तोंडापशी आलेला घास निघून जातो ना भाऊ, देवावर लई श्रद्धा आहे तुमची भाऊ, पण देवाबद्दल तक्रार बी हाय तुमची भाऊ, पन येचात देवाचा दोष नसतंय भाऊ,
नशिब लई जोरात हाय तुमचं भाऊ, सुख, समाधान आणि बक्कळ पैसा लिहून ठेवलाय देवानी भाऊ, लाथ मारीन तीथं पाणी काढनार तुम्ही भाऊ, फक्त एक नड हाय तुम्हाला भाऊ, तुमच्या जवळच्यांनीच आडून धरलंय तुम्हाला भाऊ, तुमच्या पायाखालची माती नेउन करनी केली तुमच्यावर भाऊ, तुमची परगतीच आडून धरली भाऊ, पण काळजी करायची नाय भाऊ, XYZ चे आशिर्वादानी तुमची सगळी नड काढून टाकतंय भाऊ, फक्त दिड हजार रूपंय खर्च करावं लागन भाऊ..हे सांगणारे ब्राम्हण नाहीत तर पोट भरणारी भटक्या समाजाची माणस असतात,🏽त्यांचे विशेष कौशल संभाषणाचे असते.
भटा ब्राम्हणानी देशातील सर्वच समाजाला शुभ मुहूर्त,भविष्य आणि त्या वरील उपाय सांगून ठेवले, घराच्या दरवाजात आणि गाड़ीला कोळसा,नींबू आणि सात मिर्चया लावल्या की साडे साती, शनी लागत नाही म्हणुन बहुसंख्य लोक शनिवारी न चुकता त्या लावतात.कोणाची साडेसाती गेली माहित नाही पण पारदी समाजाची रोजी रोटी मात्र यावर चालते,भटा ब्राम्हणानी सर्व समाजाला मानसिक गुलाम बनवून ठेवले त्यामुळे शुभ मुहूर्त पाहण्याचा हा धंदा आहे,त्यामुळे काही समाजाचे आर्थिक अंकगणिते यावर अवलंबून होती आणि आहे, आता मोबाईल पिसी नेटच्या वर अवलंबून आहे,नेट वर्क नसेल तर शुभ मुहूर्ताचे काय होणार हा मोठा प्रश्न सर्वच लोकां समोर असला पाहिजे.यातुन काय घ्यावे आणि काय नाही,ते ठरविण्याचा अधिकार कुणाचा???
जातीद्वेष
उत्तर द्याहटवा