बुधवार, २२ जून, २०१६

बौद्धाच्या लग्नात दारुडयांचा बेधुंदनाच


डाँ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका संघटित व्हा व संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला. बौध्द समाज शिकून मोठा झाला. पण तो फार पुढे गेला असे म्हणता येत नाही, आणि खुप मागे राहिला असे ही म्हणता येत नाही.परंतू संघटित नसल्यामुळे सर्व गोष्टीत कमी पडत आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही विभागात बौध्द समाज संघटित नाही हि शोकांतिका आहे. त्याचा फायदा इतर सर्व पक्ष घेत आहे. बौध्द समाज संघटित झाला पाहिजे अशी प्रत्येक सर्वसाधारण व्यक्तीची इच्छा आहे. परंतू त्यांना कोणत्याही आपल्या व्यक्तीवर अथवा अन्य गटातील बौद्ध नेत्यांवर भरवसा राहिलेला नाही असे चित्र दिसत आहे.त्यांचे  इतके नेते असताना सर्व संघटित का होत नाही हा प्रश्न आजही सर्वांच्या मनात आहे. बौध्द समाज संघटित करण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे जरूरी आहे. परंतू लोकांचे येणारे शेकडो नकारात्मक प्रश्न यामुळे कोणीही त्या भानगडीत पडत नाही असे वाटते. तो विचार करतो की, जर समाजाला काही पडलेले नाही तर मला काय देणे घेणे आहे ? तसेच मी पुढाकार कशाला घेऊ ? जर प्रत्येक जण असे म्हणू लागला तर बौद्ध समाजाचे संघटन कोण करणार ? महाराष्ट्रात बौद्ध समाजाच्या कितीतरी संस्था आहेत पण एकही स्थानिक संस्थाने स्थानिक बौद्ध लोकांचे संघटन करण्याचा प्रयत्न केलेला आढळून येत नाही.म्हणून बौद्धाच्या लग्नात दारुडे बेधुंद नाचून लग्नाच्या वेळेचे तीनतेरा वाजवितात.त्यामुळे लग्नाला आलेले इतर समाजातील मित्र मंडळी व्यक्तीला नांव ठेवत नाही तर समाजाला आणि धर्माला,धम्माला दोष देतात.
> भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणुन उठता बसता डॉ बाबासाहेब आंबेडकार यांच्या नांवाचा जयजयकार करणारी बौद्ध समाजातील काही लोक त्यांच्या क्रांतिकारी विचाराचा सार्वजनिक ठिकाणी आपल्या आचाराने खून करतात.ते ठिकाण म्हणजे लग्न. कोणत्याही ठिकाणी, कोणाचे ही लग्न असो ते वेळे वर लावले जात नाही, कारण लग्नाच्या वरातीत दारू पियून बेधुंद नाचणारे लोक. म्हणजेच लोक लज्जा, नीतिमत्ता सोडलेले लोक.त्यांना बौद्ध का म्हणावे हाच मोठा प्रश्न आहे?.तेच लोक शहरातील झोपडपट्टीत असो की गावातील वस्तीत दारू पियून धिंगाना घालणारच कारण ते डॉ बाबासाहेब आंबेडकरानी दिलेली धम्मदीक्षा आणि 22 प्रतिज्ञा मान्यच करीत नाही ते आज ही हिन्दू महार आहेत.त्यांना समाजाची लोकांची,संस्था,संघटनाची कोणती ही भिती वाटत नाही.लोकच त्यांना घाबरून बोलत नाही.यावर उपाय कोण करणार?.दिवसेंदिवस ही मनोवृती वाढत चालली आहे.त्यामुले धम्माची बदनामी होत आहे.
> डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र अभ्यास करून दिलेला धम्म आणि लिहलेले भारतीय सविधान म्हणजेच लोकशाही आहे. त्यानुसार देशातील सर्व जाती धर्माचे लोक एकत्र गुण्य गोविंदाने राहतात. लोकशाही उपभोगण्यासाठी लोकशाही जिवनपद्धती आत्मसात करून पात्रता कमवावी लागते.महाराष्ट्रातील काही बौद्ध लोक लोकशाही उपभोगण्यासाठी स्वत:ला अजुनही पात्र करू शकले नाहीत असे त्यांच्या एकूण सामाजिक वर्तनावरून दिसून येते.बौद्धांमध्ये वाढीस लागलेला दुराग्रह,असहिष्णुता, भक्तीप्रियता आणि त्यातून निर्माण झालेला विघटीतपणा धर्मांधता, पोथीन्निष्ठा इतर कोणत्याही धर्मातील धर्मांध लोकांपेक्षा कमी नाही. याची नेमकी करणे शोधून त्यावर उपाययोजना करण्याची आज नितांत आवश्यकता आहे. मात्र या दुष्टीने बौद्धां मधील बुद्धीजीवी,विचारवंत,साहित्यिक,पत्रकारा कडून आणि भारतीय बौद्ध महासभा(मातृ संस्था),समता सैनिक दल,सामाजिक,धार्मिक संस्था,संघटना कडून ठोस असे प्रयत्न होताना दिसत नाही. ही अत्यंत खेदाची बाब आहे. महाराष्ट्रातील बौद्धां मध्ये जोपर्यंत सत्यनिष्ठा,सविधान प्रति आदर नसेल,आणि त्याची अंमलबजावणी स्वताच्या घरात आणि परिसरात नसेल.तर या बेधुंद बेजबाबदार नंगानाच करणारया तरुणानां आवर कोण घालील हा मोठा प्रश्न समाजातील लोकां पुढे आहे. लग्नात दारू पियून धिंगाना घालणारया तरुणानां रोखल्यास भांडन होणार या भितीमुळे  दुर्लक्ष करने म्हणजे धम्माच्या नितिमत्ते पासुन लांब पळने आहे.जर चोरांना चोर म्हणण्याची व त्यांना साथ न देण्याची निस्पृहता निर्माण होत नाही. तोपर्यंत बौद्धांची उन्नती नव्हे तर अधोगतीच होत राहणार आहे.व्यक्तिगत विकास होईल पण सामाजिक दुष्ट्या समाज वेगवेगळया गटात,वर्गात विभागल्यामुळे त्याची क्रांतिकारी विचारधारे वर लढण्याची हिंमत मेलेली असेल.लग्न हा काही व्यकतिगत समारंभ नाही तो समाजाच्या आणि नातलग मित्र परिवाराच्या साक्षीने मुला-मुलीने आयुष्य भर नितिमतेने जिवन जगण्याचा एक अतिशय महत्वाचा धर्म,धम्म संस्कार विधी आहे.म्हणुन लग्न कार्यात शिस्तबद्धता आणि वेळेचे भान ठेउन लग्न विधी होणे आवश्यक आहे.जर धम्माच्या संस्कार विधि नुसार लग्न लावायचे नसेल तर लग्न प्रत्रिकेवर डॉ बाबासाहेब आंबेडकर, तथागत बुद्धाचे नांव व फोटो छापू नये..तुम्हाला आवडनारया नटनटी किंवा नाचगाने करणारया हिरो हिरोइनचे फोटो लग्न प्रत्रिके वर छापाई करा आणि मित्र मंडळीस वाटा.त्यामुळे समाजाचे आणि धम्म चळवळीचे कोणताही नुकसान होणार नाही.म्हणुन एक तर बौद्धाच्या लग्नातील दारू पिवून होणारा बेधुंद नाच थांबवा.नाही तर धम्म संस्कार विधी थांबवा. बौद्ध समाजातील जागरूक उपासक उपासीका यांनी पुढाकार घेऊन या मनोवृत्ती विरोधात अभियान राबविले पाहिजे . ते ही आपन राहतो त्या परिसरात विभागात. मी ते राबविले भांडुप,मुंबई आणि वरवट  खंडेराव तालुखा संग्रामपुर,जि बुलढाना येथे माझा मुलाच्या लग्नात. पण माझ्या गावात ते शक्य झाले नाही कारण तेच!. गावा पेक्षा, समाजा पेक्षा, संघटना विचारधारे पेक्षा दारू पिणारा गरीबाच्या घरातील लग्नात भांडण करून धिंगाना करेल हया भिती पोटी मोठा ठरला.हे सर्वच ठिकाणी घडत आहे.म्हातारी  मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा