देशात महापुरुष साधु संत,महंत महाराज आणि राजकीय सोम्या गोम्या यांच्या जयंती दिनी व स्मुर्तीदिनी हार्दिक शुभेच्छा किंवा विनम्र अभिवादन करण्याची जाहिरात देण्याची राजकीय परंपरा आहे,ते देण्या मागे मोठा उदेश असतो तो त्या जाती धर्माच्या लोकांच्या मतदारानां आकर्षित करणे. त्यामुळेच भाजपच्या संस्कारात वाढलेल्या पंकजा बाई मुंडे यांनी बुद्ध पोर्णिमेला म्हणजे बुद्ध जयंतीला विष्णुचा नववा अवतार बुद्ध यांच्या जयंतीला हार्दिक शुभेच्छा देऊन एका दगडात अनेक पक्षाचे खूंटे ढीले केले. राज्यातील बौद्ध समाज आणि आंबेडकारी चळवळीच्या लोकांना स्वताच्या असा कोणताही कृती कार्यकर्म नसतोच त्यांना ही दर दोन महिन्याने कार्यक्रम लागतो.तो पंकजा बाईनी दिला आणि आपल्या बरोबर किती मागासवर्गीय (ओ.बी.सी) पोटभरे आहेत ते पण तपासून पाहता आले.कारण राजकारणात नेहमी दक्ष राहावे लागते.पंकजा बाई लोकशाही पध्दतीने निवडुन येऊन घटनेची शपथ घेतली आहे.म्हणुन घटनेनुसार त्या राज्याचे मंत्री आहेत.तुम्ही बुध्द हा विष्णुचा नववा अवतार आहे " असे म्हणणे चुकीचे आहे, यामुळे तुम्ही तमाम भारतातील बौध्द लोकांच्या धार्मिक भावना तर दुखावल्याच
पण त्याच बरोबर बाबासाहेबांनी जे सांगितले आहे त्यांचा ही आपमानच केला आहे. असे बौध्द समाजाला वाटने साहजिक आहे.
बापाच्या पुण्याईने जी आमदारकी आणि मंत्रिपद मिळाले ते नीट सांभाळा. बुध्द नववे अवतार आहे कि दहावे हे येथील बौध्द समाज कधीच समजला आहे, कारण भटा ब्राम्हणा पेक्षा जास्त त्याचा अभ्यास झाला आहे.आपण आपल्या वडीलाच्या मृत्यु विषयी चौकशी व्हावी या करीता थोडी हिंमत करुण बोला.चिक्की घोटाळा लोक विसरले म्हणुन तुम्हाला असे वाटते की लोक मला पण विसरतील असल्या भीती पोटी आपण काही करून प्रसिद्धी झोतात राहण्या करीता हे अवतार वगैरे काढता की आपला इतिहास भूगोल कच्चा आहे?. शौचालय बंधण्यासाठी एका महिलेने स्वतःचे मंगळसुत्र विकुन शौचालय बांधले त्यावेळी तुम्ही तीला मंत्रालयात बोलाऊन तिचा सत्कार केला.तेव्हा राज्यातील जनतेला वाटले मुंडे साहेबांची मुलगी साहेबांचा वारसा पुढे चालवते की काय?.आपण बुद्धाला विष्णुचा अवतार बनवून साहेबांच्या पुरोगामी पणाचा बुरखा फाडला. मुंडे साहेब हप्प चडडी वाल्या सोबत राहून ही कधीच आपण शाहु,फुले आंबेडकर विचारांचे समर्थक आहोत हे विसरत नव्हते, संपूर्ण देशातील लोकनी सांगितले गणपती दूध पिला !.पण एकमेव मुंडे साहेब होते त्यांनी सांगितले नाही गणपती मूर्ति दगडाची धातुची आहे ती दूध पित नाही. नामांतर, मंडलच्या आंदोलनात त्यांनी कधीच स्वतःचा तोल जाऊ दिला नाही.ते राजकारण आणि वैचारिक समाजकारण योग्य पद्धतीने हाताळत असत, ते बुद्धिचा वापर करीत असत.आपण ही तो करावा दुसऱ्याच्या सांगण्या, लिहण्या वरुन अवतार खरा होत नाही. दारु कारखान्याला पाणी दिले पाहिजे या करिता जेव्हा आपला आग्रह होता. तेव्हा गोर गरीबाला पिण्याच्या पाण्याची गरज असतांना आपण दारु कारखान्यांची बाजु मांडली. तेव्हा मात्र याच गोर गरिबाच्या अंगाचा तिळपापड झाला होता. हे असे कष्टकरी शेतकरी,शेतमजुर, ऊसतोड कामगारा करिता आंदोलन करणाऱ्या नेत्यांचे वारसदार कसे होऊ शकतात. नक्कीच काय तरी गडबड आहे .
दुष्काळात पाण्यावाचुन लोक मरतात. महिला पाच पाच किलोमीटर वरुन पाणी आणतात. आणि तुम्ही त्याच भागातील असुनही असे बोलु शकतात. डोक्यावर एक दोन पाण्यानी भरलेले हंडे घेऊन चालत जा दोन ते तीन किलोमीटर मग कळेल. आणि काढा त्या वेळेस सेल्फी, नाहीतर व्हिडीओ शुटींग मग खारच अभिमान वाटला असता आम्हाला, सांगा तुम्हाला दारु कारखान्यासाठी पाणी दिले पाहिजे कि पिण्यासाठी पाणी दिले पाहिजे. मुंढे साहेबाचा पक्ष जरी वेगवेगळा असला आणि त्या पक्षाच्या विचारधारे मध्ये जरी बसले नाही ओबीसीची जनगणना करणे तरी ही मुंढे साहेब ओबीसी जनगणने साठी वेगवेगळ्या विचारमंचावर एकत्र येत फक्त आणि फक्त समाज्याच्या कल्याणासाठी . पण तुम्ही तर ओबीसी करीता जनगणनेचे सोडाच दारु कारखान्यासाठी अग्रही असतात. बौध्द धर्मियांच्या धार्मिक भावनाच दुखवता.
भारतातली कोणतीही महिला दारु कारखान्यासाठी आग्रही नसतात, तुम्ही विचारा कधी गावाकडील महिलांना ,
तुमची सध्याची शहराची परिस्थिती वेगळी असेल. तुमच्या सारख्याना त्याने काही फरक पडत नसेल तुमच्या घरातील वातावराण वेगळे असेल. चुलत भाऊ तुमचे चुलते, मामा या सर्वाची ख्याती खुप आहे, याचा विचार करा आधी. बुध्द नववा अवतार आहे असे तुम्हाला कोणी बोलायला सांगितले कि तुम्ही स्वतः तुमच्या डोक्याचा वापर करुन बोलला आहात.ते ही कळले पाहिजे तुम्हाला बळीचा बकरा बनवत तर नाही ना?.आणि जर तुम्ही तुमच्या डोक्याने विचार करुन बोलत असाल तर समरसता साहित्य सोडुन समतेचे विचारांनी लिहिलेल्या लेखकांचा साहित्य वाचा मग थोडे तरी कळेल.
गौतम बुध्द हे विज्ञानवादी होते,
ते अंद्धश्रध्दा, पुर्नजन्म, भुत, अवतार , या गोष्टींना मानत नव्हते.जर वेळ मिळालाच तर एकदा बुध्द आणि त्याचा धम्म वाचा आणि आपले अदनयांन दूर करा.पंकजा बाई तुमचे काय चुकल ते मान्य करा,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा